मला भेटलेले रुग्ण - १९

Primary tabs

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
6 Sep 2019 - 6:46 pm

‘डॉक्टर कभी भी कुछ लगे तो याद किजीये ‘ असं म्हणत पेशंटच्या बापानी हात जोडून नमस्कार केला .....

६ महीन्यांपुर्वी टिबीचं निदान झालं आणि सेकंड ओपिनीयनसाठी माझ्याकडे आले होते.... मग औषधं लिहीणं, टिबीची माहिती देणं आणि आहारासंबंधी बोलून झाल्यावर धीर देणं हा माझा नियमीत प्रोटोकाॅल !

प्रत्येक व्हिसीट वेळेवर किंवा वेळेआधीच आणि शेवटी पेशंट आजारातून बाहेर असा सगळा काळ गेला परंतू डोळ्यात अश्रु घेऊन धन्यवाद देतांना त्यांनी अदृश्य आर्शिवाद दिलेला मला दिसला ....

मी असं काय जगावेगळं केलं की त्यांच्या डोळ्यात पाणी यावं ? मी ईतका महान आहे का ? ह्या प्रश्नांची उत्तरं स्वत:ला विचारणं सोडून दिलंय आताशा .....

—————————————-

ह्या बाई ओपिडीत मुलगा आणि सुनेसोबत आल्या होत्या.....नुकत्यात आयसीयू मधून सुटी बाहेर आल्या आणि दम्यासाठी माझ्याकडे त्यांच्या फॅमिली डाॅक्टरांनी पाठवलेलं होतं....

तपासणी केली आणि औषधं , ईन्हेलर्स देऊन महीनाभरानी दाखवा म्हणून सागितलं....

महीनाभरानी त्या मुलीला सोबत घेऊन आल्या; तब्येत अगदी ठणठणीत होती ... मला बघून त्यांनी विचारलं की ते आधीचे डाॅक्टर नाहीत का ? मला कळेचना असं का विचारत आहेत , मी म्हणालो अहो मावशी मीच तर आहे तो आधीचा डाॅक्टर त्यावर त्यांनी विचार केला आणि बोलल्या की माफ करा डाॅक्टर मला आठवतच नाहीये हो ..... ह्याचं कारण असं होतं की ज्या दिवशी आयसीयूमधून बाहेर पडल्या तेव्हा रक्तातलं आॅक्सिजनचं प्रमाण कमी होतं , तसचं मी पहील्यांदा तपासल्यावरही कमीच होतं त्यामुळे त्यांच्या मुलाला मी कल्पना दिली होती की पेशंटला घरी आॅक्सिजनची व्यवस्था करावी लागू शकते ( पण तब्येत सुधारली तर नाही गरज पडणार)...

मेंदूला पण आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे काही गोष्टी रजिस्टर नव्हत्या करता आल्या .... पण आज अगदी फ्रेश दिसत होत्या आणि रक्तातल्या आॅक्सिजनचं प्रमाण ९९% !!

——————————————

दमा आहे निदान झालेलं होतं परंतु औषधांचा असर होत नाहीये आणि त्याला सारखा त्रास होतो असं आई कळवळून सांगत होती .... आई-वडील दोघही हवालदिल झालेले आणि मुलगा खोकून बेजार... शांतपणे सगळी माहिती घेतली आणि ईन्हलर्स कसे घ्यायचे , आहार काय असावा शिवाय त्रास झाला तर काय ॲक्शन प्लॅन हवा हे सगळं समजावलं आणि दमा प्रशिक्षण कार्यक्रमाला बोलावलं ....

महिन्यानी कार्यक्रमानंतर ओपिडीत तपासणी करतांना त्यांचा (आई-वडील) चेहराच सगळं काही सांगत होता , पण त्यांच्या शब्दात ऐकायचा ईच्छा होती म्हणून विचारलं कसं आहे आता ? त्यावर आई म्हणाली सगळं छान आहे हो पण हा अभ्यासातच मागे आहे हो , अजिबात लक्ष्य देत नाही .... तुम्ही सांगा बरं त्याला ...मी पेशंटकडे बघून का कोण जाणे विचारलं “तू काय खेळतोस किंवा तुला नेहमीच्या विषयांशिवाय काय आवडतं? “ .... त्याची कळी खुलली “सर मी ॲथलेटीक्स (लाॅन्ग जंप आणि रनिंग) मध्ये डिस्ट्रीक्ट ला खेळतो”.... मी आई वडीलांना विचारलं “किती मुलं शाळेकडून खेळायला जातात ?” तर त्यांनी सांगीतलं हा एकाटाच शाळेला रिप्रेझेंट करतो !!
मग मी म्हणालो ...”तू चालू ठेव खेळण..... एक दिवस एखादी मस्त स्पोर्ट स्काॅलरशिप परदेशी शिकायला जा आणि परत येऊन जास्त छानसं करिअर कर... आॅल द बेस्ट”

आई-वडीलांना सांगितलं की त्याच्या आवडीचं करू दिलंत ना तर तो दम्यातून बाहेर पडेलच पण आयुष्यात खूप पुढे जाईल.... मला हे बोलतांना खूपच भारी वाटलेलं :))

——————————————

“ डाॅक्टर सगळ्या टेस्ट झालेल्या आहेत हो, माझा दमा कधीच बरा होणार नाही असं त्या डाॅक्टरांनी सांगीतलं “ अतिशय निराश सुरातच त्यानी सुरवात केली .....

मी सगळे रिपोर्ट चाळत त्याचं ऐकलं आणि विचारलं “ तू काय करतोस , म्हणजे शिक्षण चालू आहे की काम करतोस की एखाद्या स्पर्धापरिक्षेची तयारी करतो आहेस ?” त्यावर तो उत्तरला “सर पोलीस भरतीचा लेखी परिक्षा पास झालो , ग्राउंड बाकी आहे ...पण पळतांना खूप दम लागतोय, तयारी करतांना त्रास होतोय “...... औषधं बदलून दिली आणि सांगितलं की तुला काहीही अडचण येणार नाही , महिनाभरात परत भेट तुझ्या ग्राउंडआधी .

हा प्रसन्न चेहेऱ्यानी गेला आणि त्याच हास्यासकट परत तपासणीसाठी आला .... औषधांची मात्रा कमी करतांना म्हणालो पुढच्या वेळेस पेढे घेऊनच ये रे....

हा जेव्हा परत येईल तेव्हा एक संपूर्ण भाग लिहून काढणार आहे .......

——————————————

समाजजीवनमानआरोग्यऔषधोपचारव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशिक्षणप्रकटनप्रतिक्रियासमीक्षालेखअनुभवसल्लामाहितीप्रश्नोत्तरेआरोग्य

प्रतिक्रिया

किरण कुमार's picture

6 Sep 2019 - 7:01 pm | किरण कुमार

नेहमीप्रमाणे झक्कास ..

स्थितप्रज्ञ's picture

6 Sep 2019 - 7:16 pm | स्थितप्रज्ञ
सुधीर कांदळकर's picture

6 Sep 2019 - 7:16 pm | सुधीर कांदळकर


”तू चालू ठेव खेळण..... एक दिवस एखादी मस्त स्पोर्ट स्काॅलरशिप परदेशी शिकायला जा आणि परत येऊन जास्त छानसं करिअर कर... ऑ द बेस्ट”


औषधं बदलून दिली आणि सांगितलं की तुला काहीही अडचण येणार नाही , महिनाभरात परत भेट तुझ्या ग्राउंडआधी .

वा! याला म्हणतात सल्ला! झकास. वैद्यराज चिंताहर देखील असतात बरें!

मस्त लेखाबद्दल धन्यवाद.

स्थितप्रज्ञ's picture

6 Sep 2019 - 7:22 pm | स्थितप्रज्ञ

तुस्सी ग्रेट हो डॉक!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2019 - 7:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर ! बर्‍याच दिवसांनी लिहिलंत. पुभाप्र.

गवि's picture

6 Sep 2019 - 8:09 pm | गवि

उत्कृष्ट

पण इतके मोठे ब्रेक्स घेऊ नका.

तमराज किल्विष's picture

6 Sep 2019 - 9:24 pm | तमराज किल्विष

मस्त लेख.

भंकस बाबा's picture

6 Sep 2019 - 9:33 pm | भंकस बाबा

मस्त लेख

शलभ's picture

7 Sep 2019 - 10:31 am | शलभ

छान लिहिलंय.

अमोल निकस's picture

7 Sep 2019 - 8:57 pm | अमोल निकस

प्रत्येक क्षयरुग्णांस पोषण आहार योजने विषयी माहिती दिली, तर रुग्णांस आर्थिक मदत होत जाईल सर..(500रुपये प्रति महिना ) ती आर्थिक मदत तुम्ही त्यास प्राप्त करुन देऊ शकता.!

डॉ श्रीहास's picture

8 Sep 2019 - 8:24 am | डॉ श्रीहास

माझ्या क्लिनीक ला JEET (Joint Efforts to Eliminate TB) सेंटर आहे.
धन्यवाद _/\_

अमोल निकस's picture

8 Sep 2019 - 8:31 pm | अमोल निकस

म्हणजे डॉट सेंटर आहे का ? ? कूठे आहे ? ?

डॉ श्रीहास's picture

9 Sep 2019 - 9:56 am | डॉ श्रीहास

डाॅटस् सेंटर नाहीये ... JEET सेंटर वेगळा पण डाॅटस् ला सपोर्ट म्हणून सुरू झालेला प्रयोग आहे ...

जॉनविक्क's picture

7 Sep 2019 - 9:52 pm | जॉनविक्क

पुढील लिखाण लवकर एउदया

डॉ श्रीहास's picture

8 Sep 2019 - 8:26 am | डॉ श्रीहास

प्रतिक्रीयांसाठी आभारी आहे .... असाच लोभ असू द्या

पैलवान's picture

8 Sep 2019 - 8:08 pm | पैलवान

तुम्ही अगणित रुग्णांसाठी आणि कुटुंबासाठी सुखकर्ता दुःखहर्ता आहात.
प्रश्न-पोलीस भरतीची शारीरिक परीक्षा आणि जिल्हास्तरावर अॅथलेटिक्स मध्ये खेळणे हे सामान्य तरुणांसाठीसुद्धा खूप दमखाऊ असतं. दमा असलेला रुग्ण या स्तरावर तसेच पोलीस भरतीची शारीरिक परीक्षा देण्यासाठी आजार कसा बाजूला ठेवतात?

डॉ श्रीहास's picture

9 Sep 2019 - 9:54 am | डॉ श्रीहास

नियमीत ईन्हेलर्स वापरले तर दमा १००% आटोक्यात राहातो .... दमा आटोक्यात आणणं अवघड नाहीये , लोकांची भिती / गैरसमज जास्त अवघड आहेत आणि ते दूर केले की माझं काम सोपं होतं !!

अमोल निकस's picture

8 Sep 2019 - 8:33 pm | अमोल निकस

jeet या सामजिक संस्थेचे लोक भेटीसाठी पण येत असतील ? ?

डॉ श्रीहास's picture

9 Sep 2019 - 10:06 am | डॉ श्रीहास

अहो त्यांनी एक व्यक्ती फुलटाईम नेमलेली आहे ...

JEET सेंटरची खास बाब (बाकी लोकांसाठी सांगतो) अशी की रुग्णाचं टिबीचं निदान झाल्यावर सरकारी नोंदणी (Notification)करण अत्यावश्यक असतं , त्या नंतर रुग्णाचं आधारकार्ड ज्या बॅंक खात्याशी जोडलेलं आहे त्याचं रेकाॅर्ड घेऊन त्या दर महिन्याला ५००₹ डायरेक्ट जमा होतात ( incentive/support) म्हणून ... आजतागायत महाराष्ट्रात ३५ कोटी ₹ ची मदत केली गेलेली आहे आणि ५० कोटींपर्यत करायचं टार्गेट ठेवलं गेलंय.. ही बाब फारच कमी डाॅक्टर्स , रुगण आणि ईतरांना माहिती आहे पण हळूहळू समाजात पोहोचेल आणि टिबीचं प्रमाण कमी होईलच!!

अमोल तुमचे आभार .... उत्तराच्या निमित्तानी सरकार नी सुरू केलेल्या आणि आमचा सक्रीय सहभाग असलेल्या जनहीत कार्याबद्दल लिहीता आलं _/\_

अमोल निकस's picture

9 Sep 2019 - 9:02 pm | अमोल निकस

सर मी जिल्हा क्षयरोग केंद्र येथेच (T.B.H.V) म्हणून नौकरीला आहे..

अमोल निकस's picture

9 Sep 2019 - 9:09 pm | अमोल निकस

तुमच्या कडे JEET वाले Full time असतील. आमच्याकडे private च बहुतांश notification मलाच बघाव लागत.. private डॉक्टरांनी क्षयरोग निर्मूलनासाठी सर्वोत्तपरी मदत करने खुप आवश्यक आहे.. त्यांना सर्व सोयी-सुविधा देऊन पण पाहिजे तेवढे सरकारी यंत्रणेला खाजगी रुग्णांलयांकडून मदत होतांना दिसत नाही..

mayu4u's picture

9 Sep 2019 - 2:02 pm | mayu4u

डॉक, तुस्सी ग्रेट हो!

शशिकांत ओक's picture

18 Sep 2019 - 11:23 pm | शशिकांत ओक

वाचून पुढच्या भागाची वाट बघतोय.