तो आणि ती..... प्रस्तावना भाग १

Primary tabs

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
7 Jul 2018 - 8:54 pm

तो आणि ती............... प्रस्तावना

तो जगद्नियंता.......... विश्वनिर्माता......... बंसीधर........ गोपाल.......... यदुकुलनंदन.......... देवकीपुत्र............... कृष्ण..... मधुसूदन............ मोहन............ आणि वासुदेव! असा खूप काही.... आणि तरीही उरणारा! सर्वांमध्ये असूनही नसलेला.......... चमत्कार करूनही मानवी रुपात रमलेला. अशा त्या विश्वरुपी मानवाशी त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक स्त्रीची भावनात्मक गुंतवणूक वेगवेगळ्या स्तरावरची होती. त्याची जन्मदात्री आई देवकी, त्याचा सांभाळ करणारी आई यशोदा, त्याच्यावर निस्सीम प्रेम करणारी त्याची प्रेयसी राधा, त्याची धाकटी बहिण सुभद्रा, त्याची सखी द्रौपदी, त्याच्या चार आत्यांपैकी त्याला अत्यंत प्रिय आणि जवळची आत्या कुंती आणि त्याच्या आठही पत्नी... रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, मित्रविंदा, सत्या, लक्ष्मणा, भद्रा आणि कालिंदी.......... तसं तर त्याच्या सोळा सहस्त्र एकशे पत्नी देखील होत्याच. अर्थात ती कथाच वेगळी. त्याच्याशी वेगवेगळ्या स्तरावर तादम्य पावलेल्या प्रत्येकीने त्याला आपल्या आंतर्मनातल्या भावनेने बघितलं. त्याने देखील त्या भावनेचा आदर करून त्याप्रमाणे त्या प्रत्येकीला आपल्या जीवनात स्वीकारलं. या नात्यांचा गोषवारा म्हणजे तो आणि ती.......... त्या प्रत्येक स्त्रीमनाने आयुष्यतल्या एखाद्या वळणावर सगळे पाश तोडून त्याच्याशी मन मोकळं केलं. त्याने देखील न बोलून काहीसा दोष स्वतःकडे घेत तिचं सगळंच ऐकून घेतलं. कारण त्यात चूक-बरोबर; न्याय-अन्याय अस काही नव्हतंच. त्याचा कितीही श्वास मिळाला तरीही अतृप्ति प्रत्येकीच्या मनात होतीच.... आणि त्येंही तो प्रत्येकीच्या आयुष्यात त्याने ठरवल्या प्रमाणे तितकाच होता.

अर्थात हे कथास्वरूपी लेख हा संपूर्ण कल्पनाविलास आहे. पौराणिक कथा-कादंबऱ्या वाचताना ज्या ज्या वेळी मी श्रीकृष्ण आणि त्याच्या आयुष्यात आलेली स्त्री यांच्यातील प्रसंग वाचायचे त्या त्या वेळी मला वाटायचे की हिला जर आयुष्याच्या उत्तरार्धात श्रीकृष्णाकडे मन मोकळं करायचं असेल तर ती काय सांगेल त्याला? आणि मग मला तिचं अंतर्मन उलगडत गेलं... माझ्या दृष्टिकोनातून. ते तुमच्या समोर ठेवत आहे.

व्यक्तिचित्रप्रकटन

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

7 Jul 2018 - 9:16 pm | टवाळ कार्टा

आयला....हे असंच काहीसं मी एका मिपामयतरणीकडून* ऐकलंय....म्हणजे सुरवात या लेखात लिहिले आहे त्याच्या जवळपास जाणारी आहे....अर्थात पुढे वेगळा विषय असू शकतोच

*मिपामयातरीण कोण याबाबत व्यनी क्रू नै... उत्तर मिळणार नाही.....लल्लल्लूऊउऊऊ