Skip to main content

चालू घडामोडी - जून २०१८

लेखक manguu@mail.com यांनी मंगळवार, 12/06/2018 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
भय्युजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली आहे. उदयसिंह देशमुख असं त्यांचं मूळ नाव असून अध्यात्मिक गुरु म्हणून त्यांची ओळख आहे. इंदूरमधील बॉम्बे रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि दिवाळखोरीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असं सांगण्यात येत आहे. भय्युजी महाराज यांना अनेक राजकारणी राजकीय गुरु मानत होते. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा छंद होता. स्वच्छता अभियान असेल किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग घेतला जात होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते त्यांचा राजकीय सल्ला घेत होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्जबाजारी झाले होते अशीही माहिती समोर येते आहे. भय्यूजी महाराज यांनी असे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राजकारणातलाही सहभाग कमी केला होता. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत. भय्युजी महाराजांना मध्यप्रदेश सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. गेल्याच वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. त्याचसुमारास भय्युजी महाराजांनी आपण राजकीय क्षेत्राशी संबंध कमी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पहिल्या पत्नीच्या निधनानंतर परिस्थिती बिघडलेली होती. समाजाला दिशा दाखवणारा संत अशी त्यांची ओळख होती. धार्मिक, सांप्रदायिक, कृषि, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांना गती होती. भय्यूजी महाराजांनी कामाचा व्याप प्रचंड वाढवला होता आणि तो व्याप सांभाळण्यापलीकडे गेला होता असं मत त्यांच्या निटवर्तीयांनी व्यक्त केलं आहे. अत्यंत धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवावं लागलं होतं. त्यासोबत कौटुंबिक समस्याही त्यांना सतावत होत्या अशी शक्यता व्यक्त होत आहे.

वाचने 118713
प्रतिक्रिया 363

प्रतिक्रिया

काय प्रतिक्रिया द्यायची बुवा ? असा सगळ्यांना प्रश्न पडलेला दिसतोय . भय्युजी महाराज यांनी कला ,क्रीडा ,उदयोग आणि व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्रातील गोरगरिबांना संसारातून मोक्षा कसा साधावा याबद्दल मार्गदर्शन केले . देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो . वाद होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे .

In reply to by सोमनाथ खांदवे

शांती मुस्लिम ख्रिश्चनमध्ये असते. कारण पुन्हा जन्म नाही हिंदूंच्यात सद्गती मिळो , असे म्हणायचे असते . म्हणजे पुन्हा नव्या गतीला सुरुवात होणार असते. ( शांती मिळो , हे इंग्रजी rest in peace चे हल्ली वापरले जाणारे भाषांतर आहे , जे हिंदू धरमाला अपेक्षित नाही. )

In reply to by manguu@mail.com

शांती मुस्लिम मध्ये असते? मग ते ७२ काय प्रकार आहे? मुस्लिम अतिरेक्यांना मरणानंतर काय मिळते ?

In reply to by हरवलेला

मुस्लिम आणि ख्रिश्चन लोक जेंव्हा "rest in peace" म्हणतात तिथे आपल्या थडग्यांत शांतीने राहा असे अभिप्रेत असते. कारण ख्रिस्ती धर्मांत जीजस जजमेंट डे ला परत येऊन सर्व मृतांना जिवंत करणार आहे आणि त्यांना अनंत काळ पर्यंत स्वर्गांत किंवा नरकात पाठवणार आहे. इस्लाम मध्ये तसेच होईल ज्याला ते कयामत का दिन म्हणतात. Rest हा स्वर्गांतील किंवा नरकात रेस्ट नसून थडग्यांतील रेस्ट आहे. म्हणूनच ह्या धर्मांत पुरतात जाळत नाहीत त्याशिवाय आपले कॉफिन आरामदायक आहे कि नाही, शरीरावर व्यवस्थित कपडे वगैरे आहे कि नाही ह्याची काळजी घेतात. आमच्यांत काय लावली आग आणि झाले मोकळे. ७२ कुमारिका ह्या कयामत के दिन के बाद. तोपर्यंत सारे टोणगे थडग्यांत.

In reply to by manguu@mail.com

माझ्या मर्यादित ज्ञानानुसार आत्म्यास शांती म्हणजेच मोक्ष मिळो असा अर्थ आहे. सद्गती म्हणजे परत पुनर्जन्म. हिंदू धर्मात आत्म्याचे अंतिम स्थान पुनर्जन्म नव्हे तर मोक्ष आहे. या उलट ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्या "शरीरास" कयामत च्या दिवसापर्यंत कोणी त्रास देऊ नये यासाठी "रेस्ट इन पीस" RIP म्हटले जाते.

इथे भय्यू महाराजांविषयी सुरस कथा सापडतील : १. http://www.vikrantjoshi.com/2018/04/blog-post_18.html २. भानगडबाज भय्यू : http://www.vikrantjoshi.com/2018/02/blog-post_18.html ३. विकृत भय्यू : http://www.vikrantjoshi.com/2018/02/blog-post_9.html ४. सासू - सून भांडणं : http://www.vikrantjoshi.com/2017/11/blog-post_13.html ५. लफडेबाज भय्यू : http://www.vikrantjoshi.com/2017/04/blog-post_27.html ६. (लेडीज) बारकरी भय्यू : http://www.vikrantjoshi.com/2017/04/blog-post_28.html एकंदरीत भोंदूगिरी नडली. स्वत:ला , नातेवाईकांना आणि आजुबाजूच्यांना पण. भय्यू महाराजांना शांती लाभो. तूर्तास बोलण्यासारखं काही नाही. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सुरस तर काहीच नव्हतं. नेहमीचे जे बुवालोकांबद्दल ऐकु येतं त्यापेक्षा वेगळं नव्ह्त!

देवेंद्र फडणविसांनी श्रद्धांजली वाहतांना भय्यू महाराजांना सेवाभावी म्हंटलंय : https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/bhaiyyu… नाईलाज असतो नाही एकेकाचा ? -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गा. मा .पैलवान , शालजोडे मस्त लावताय राव तुमी . तुम्ही दिलेली माहिती खूप रोचक होती . बुवा , बाई आणि पुढारी एकत्र आले की कलियुग सुरु झाले म्हणून समजा . बुवा लोकांना कुठलाही पक्ष वर्ज्य नाही , हे काँग्रेस चे खंदे समर्थक होते . शिवराज सिंह यांनी त्यांना मंत्रपद ऑफर केले व भय्यु महाराजांनी नाकारले . आता त्यांनी कुठल्या नैराश्यातून आत्महत्या केली हे देवालाच माहीत पण काँग्रेस चे प्रवक्ते सुरजेवाला यांना त्यात भाजप चा हात दिसला व सुरजेवाला नीं खाल्ल्या मिठाला जागून सी बी आई चौकशी ची मागणी केली .

https://www.loksatta.com/manoranjan-news/akshay-kumar-close-to-rekha-br… "खिलाडी" करून करून भागला आणि आता देव पूजेला लागलाय..! === भोंदू संत गुरु बाबा नंतर (संधी)साधू हिरो लोकांचं तण लय जोमाने वाढत चाललंय.

In reply to by विशुमित

विषय काय ? चर्चा काय अन लिंक कसली ! विशुमित, ह्ये असलं अक्षयकुमारचं लग्न अन (संधी)साधू पणाचा काय संबंध ?

रच्याकने भय्यू महाराज जन्माने ब्राम्हण असते तर कशा प्रतिक्रिया आल्या असत्या? मी जातीयवादी नाहीय पण काहींनी ते गेल्या वर टीका केलीय जिवंत असताना नाही .

In reply to by Ram ram

एकीकडे म्हणताय मी जातीयवादी नाही आणि मग असला प्रश्न का विचारताय? मृत्यू झाल्यावर जात, धर्म वगैरे काही तरी राहतं का? जिवंतपणी कोणी काय केलं हे नंतर सांगितलं जातंच. एखाद्या महाराज किंवा गुरु म्हणवणाऱ्या व्यक्तीने आत्महत्या करावी हे जरा विचित्रच आहे असं नाही वाटत?

In reply to by ट्रेड मार्क

दुर्दैवी घटना. चॅनेलसवरून तरी "कौटुंबिक कलह' असे म्हंटले जातेय. एक प्रश्न नेहमी पडतो. लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांना सत्ता राबवायला निवडून दिलेले असते, त्यांना अशा काय समस्या असतात की हे गुरू सोडवू शकतात? चॅनेलसवर पाहिले ते बघता भाजपा/कॉण्ग्रेस्/शिवसेना/राष्ट्रवादी... सगळ्याच राजकीय नेत्यांची त्यांच्याकडे उठबस असायची.


In reply to by कपिलमुनी

जोपर्यन्त जातीनिहाय जनगणना, आरक्षण वगैरे गोष्टी चालू आहेत तोपर्यंत असले निर्देश हास्यास्पद आहेत.

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते आणि धार्मिक नेते मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीने आरोपींकडून एक डायरी जप्त केली आहे. त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभिनेते गिरीश कर्नाड, ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिक बी. टी. ललिता नाइक, निदुमामिडी मठाचे प्रमुख वीरभद्र चन्नामल्ला स्वामी आणि सामाजिक कार्यकर्ते सी. एस. द्वारकानाथ आदींच्या नावांचा समावेश आहे. या सगळ्यांची नावे हिंदीमध्ये लिहीण्यात आली आहेत. मारेकऱ्यांच्या हिटलिस्टवर असणाऱ्या या व्यक्तींनी उघडपणे कट्टरवादी हिंदुत्वाच्याविरोधात भूमिका घेतली होती. दरम्यान, एसआयटीने याआधी कर्नाटकातील विजयपूरा जिल्ह्यातील सिंधागीमधून २६ वर्षाच्या परशूराम वाघमारे याला अटक केली होती. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील त्याच्या भूमिकेबद्दल नंतर माहिती जाहीर करण्यात येणार असल्याचे एसआयटीने मंगळवारी सांगितले होते. वाघमारेनेच गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडल्याचा अंदाज आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसणारी व्यक्ती ही वाघमारेसारखी दिसणारी आहे. परशूराम वाघमारे हा कट्टर हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

In reply to by manguu@mail.com

काही अतिउत्साही , हरामखोर कार्यकर्त्यां मूळे संपूर्ण भाजप बदनाम झाली हे ही तितकेच खरे आहे , दलितांना विवस्त्र करून मारहाण करणे , तथाकथित गोरक्षकांनी मुस्लिमांचे मुडदे पाडणे या घटनांचे कोणीही समर्थन करू शकत नाही . या असल्या वागण्यामुळे भाजप ने केलेले चांगली कामे झाकोळून गेली आहेत . भाजप चे नेते या घटना नियंत्रित करू शकले नसल्यामुळे 2019 ची निवडणूक भाजप आणि त्यांचे उधळलेले कार्यकर्ते यांना जड जाणार हे निश्चित .

In reply to by सोमनाथ खांदवे

भाजप नेते जातीय समीकरणे ते पॉलिटिकली करेक्ट बोलणे सगळ्या कसरती नीट सांभाळतायत (कित्येक माध्यमे अन माध्यमकर्मी विरोधात असतानाच) मात्र स्वघोषित भक्त त्या सगळ्याचं मातेरे करून टाकतात. असो.

भारत देशाच्या भावी पंतप्रधानांचे एक जबरदस्त भाषण. सर्वांनी जरुर ऐकावे असे. -----

In reply to by प्रसाद_१९८२

राहून गांधी यांनी, "व्यंगचित्रकारांना जास्तित जास्त काळ सतत व्यस्त ठेवण्याचा" जागतिक विक्रम करण्याचा विडा उचलला आहे, असे म्हणायला बराच वाव आहे. :)

जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पोहल्याचा राग आल्याने तीन मातंग तरुणांना विवस्त्र करून पट्ट्याने बेदम मारहाण केली गेल्याची धक्कादायक घटना तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रात घडली आहे. आता उत्तर प्रदेश-बिहार आणि महाराष्ट्रात काय फरक राहिला?

In reply to by एस

पिण्याच्या पाण्याच्या तलावात पोहणे ही चुकच ! सदर पोहणारे कोणत्याही समाजचे असले तरी त्यांना फोकळुनच काढले पाहिजे ! इथे आपल्या पिण्याच्या पाण्यात कोणी बोटे बुडवली तर आपल्याल्ला ते पिववत नाही , मग अखंड माणुस पोहलेले पाणी पिववेल का ? जातीचा उल्लेख अनवश्यक !

मिपाने कोणत्याच जातीचा उल्लेख मिपावर होवु नये ह्या साठी ठोस धोरण केले पाहिजे !


In reply to by प्रसाद गोडबोले

त्या विहिरीत तेरा मुले पोहत होती. त्यांपैकी तीन मुलांना वेगळे काढून पट्ट्याने बेदम मारहाण केली गेली. महाराष्ट्रात तीर्थात लघुशंका करणे चालते. पण कुणी विहिरीत पोहले तर चालत नाही. येथे मारहाणीची तीव्रता, धिंड काढणे, गुन्हा नोंदवू नये म्हणून दबाव आणणे इत्यादी पाहता जात्याधारीत तिरस्कारभावना अशा अत्याचारांमागे असण्याखेरीज दुसरे कुठले सबळ कारण सकृतदर्शनी सापडत नाही. मध्यंतरी हिमाचल प्रदेशात एका शिक्षकाने दलित विद्यार्थ्यांना गोठ्यात बसवले आणि बाकीच्यांना घरात. तेव्हा त्या कृतीचेही असेच समर्थन केले गेले की सर्वांना बसवण्यास पुरेशी जागा नव्हती. समाजात कुठल्याही जातीधर्माविषयी इतरांमध्ये कसलीही घृणा असणे, तिरस्काराची भावना असणे हे सर्वांगीण सामाजिक सलोख्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. एव्हढेच नव्हे तर समाजाच्या व देशाच्या आर्थिक उन्नतीकरितादेखील ते घातक आहे. बाकी मिपावर कुठल्याही जातीचा उल्लेख न होऊ देणे हे शक्य असेल की नाही माहीत नाही, पण स्वतःपुरती ही जात नामक हीनता संपवणे हे ज्याच्यात्याच्या हातात आहे.

In reply to by एस

त्या विहिरीत तेरा मुले पोहत होती. त्यांपैकी तीन मुलांना वेगळे काढून पट्ट्याने बेदम मारहाण केली गेली.
असे असेल तर त्या तेरा च्या तेरा पोरांना फोकळुन काढले पाहिजे , मोजक्या तिघांनाच मारत असतील तर ते चुकीचेच आहे ! पण म्हणुन मी त्याचा निषेध करणार नाही , उर्वरीत दहा जणांना का रट्टे दिले नाहीत ह्याचाच निषेध केला पाहिजे ! बाकी मुद्द्यांवर चर्चा करुन मुळ मुद्दा डायलुट करणे टाळत आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

ठारच मारायची होती पोरं. जिवंतच ठेवायला नव्हती पाहिजे. जगण्याचा हक्कच कशाला पाहिजे? माणूस म्हणून जगू पाहणं हे तर भलतंच! छे छे! घोर अपराध!

In reply to by एस

हे असले पराचा कावळा करणारे प्रतिसाद देऊन तुम्ही स्वतःची बाजु अजुन कमकुवत करीत आहात ! तुम्हाला हॉटेलात वेटर ने पाण्याच्या ग्लास मध्ये बोटं बुडवुन पाणी आणुन दिले तर तुम्ही ते प्याल का ? कोणीही सुजाण मनुष्य पिणार नाही ! मग ते बोटे बुडवणार्‍याची जात कोणतीही असो ! पिण्याचा पाणवठा स्वच्छ ठेवावा , पिण्याच्या पाण्यात पोहु नये हा अत्यंत सर्वसामान्य संकेत आहे ! पाणी दुषित करणार्‍यांना शिक्षा ही झालीच पाहिजे ! पिण्याचे पाणी दुषित करणार्‍यांना तर १००% झाली पाहिजे . मग ते कोणत्या का जातीचे असेनात ! उगाच जातीपातीचा मामला त्यात मिक्स करु नका ! उगाच जातीचा अहंकार डोळ्यावर ओढुन सामान्य ज्ञानाला फाटा देणार असाल शुभेच्छा च :)

In reply to by प्रसाद गोडबोले

मी माझी बाजू आता केव्हाच सोडून दिली आहे हो मार्कसभौ. मी तुमचीच बाजू उचलून धरतो आहे. तुम्ही म्हणालात की अशा 'फोकलीच्यांना' मार दिला पाहिजे. मी त्यापुढे जाऊन म्हणतो की त्यांना पुन्हा तसा गुन्हा करण्याची संधीच द्यायला नको. मारूनच टाकूयात. संपला विषय. आले मुले पळवणारे की मारा. गोमांस खाल्लं, मारा. अजून काय? इकडेच कशाला, जागतिक स्तरावर प्रश्न नेऊ - केली अमुक धर्मग्रंथाची तथाकथित विटंबना, मारा. ही कारणे निमित्तमात्र असतात हो. खरे कारण हे मानसिकता आहे. कसली मानसिकता? तर द्वेषाची आणि वर्चस्वाची मानसिकता. मग ते कुठल्याही जातीधर्माचे, समाजाचे, देशाचे, प्रांताचे लोक असोत. माणसेच माणसांमधीलच इतर घटकांना परके मानत राहतात, केवळ धर्म-जात-वर्ण आणि अशाच अनेक चित्रविचित्र कारणांपायी. मूळ मुद्दा हा आहे. केवळ जातीयतेच्या चष्म्यातूनही पाहायचं म्हटलं तरी कधी उघड तर कधी छुपी अस्पृश्यता आहेच. ही किती भयानक बाब आहे आणि गावपातळीवर एकांड्या घरटी असणाऱ्या निम्न व दुर्बल घटकाला अन्यायाविरुद्ध दाद मागण्याची साधी हिम्मत करणे हे किती भीतीदायक असू शकते हे वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कळणार नाही. माझ्या फिल्डमध्ये माझा अशा आणि इतर अनेक प्रकारच्या अन्यायग्रस्तांंशी नेहमीच संबंध येतो. आपण शहरात राहतो, आपल्याला वाटतं की सगळं आलबेल आहे. तसं नाहीये. येथे कुठेही वैयक्तिक काही वाटून घेऊ नये. पण हा प्रश्न, ही खदखद, हा असंतोष कुठेतरी व्यक्त झाला पाहिजे, समजून घेतला गेला पाहिजे. अन्यथा पुनरेकवार सांगतो की एक अखंड समाज म्हणून आणि त्यापुढे जाऊन मानवजात म्हणून आपलं भवितव्य धूसर दिसते आहे. इत्यलम.

In reply to by एस

समीर गायकवाडची आजची पोस्ट वाचून मला या बातमीचे डिटेल्स कळले. अवघड आहे सगळंच ..... === ही किती भयानक बाब आहे आणि गावपातळीवर एकांड्या घरटी असणाऱ्या निम्न व दुर्बल घटकाला अन्यायाविरुद्ध दाद मागण्याची साधी हिम्मत करणे हे किती भीतीदायक असू शकते हे वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कळणार नाही. >> +१. माझ्या फिल्डमध्ये माझा अशा आणि इतर अनेक प्रकारच्या अन्यायग्रस्तांंशी नेहमीच संबंध येतो. आपण शहरात राहतो, आपल्याला वाटतं की सगळं आलबेल आहे. तसं नाहीये. >> तुमचे वर्क एथिक्स कंप्रोमाईज न करता तुम्ही याबद्दल अधिक लिहू शकता का?

In reply to by एमी

मी हा प्रतिसाद कितीवेळा लिहिला आणि डिलीट केला असेल! नाही लिहू शकत. फक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अशा घटना घडतात आणि समाजाच्या सर्व स्तरांत पीडित असतात, असू शकतात. जास्त सांगता येणे शक्य नाही.

In reply to by एस

हेच ते पराचा कावळा करणे म्हणातात ना ते ! साधा मुददा आहे कि प्यायच्या पाण्याच्या विहिरित पोहुन ते प्रदुषित करावे की नाही ? जो प्रदुषित करतो त्याला गुन्हेगार मानुन काही शिक्षा व्हावी की नाही ? आणि इथे तुमच्यासार्खी सुशिक्शित लोकं जर ह्या विषयाचा विपर्यास करुन त्याला जातीय रंग देत असतील तर खरेच ही काळजी करण्यासारखीच परिस्थीती आहे ! मारुन टाका काय अन गोमांस काय अन धर्मग्रंथांची विटंबना काय ? कुठला विषय कुठे नेता ? त्याला काही ताळतंत्र ? आमच्या कास तलावात पुर्वी लोकं बियर पिऊन झाली की बाटल्या फेकायची , आता कोणी फेकतना दिसले तर त्याला चोपच मिळेल महादरे तलावाचे पाणी प्याय्ला वापरतात , त्यात पोहाय्ला नगरपरिषदेनेच बंदी केली आहे , आणि ५० एक लाख खर्च करुन संपुर्ण कंपाऊंड करुन घेतले आहे , शिवाय येथे कोणी पोहतना आढळल्यास त्वरित पोलिसांना संपर्क करा असा स्पष्ट बोर्ड ही लावलेला आहे ! फुटक्या तळ्याचे पाणी प्याय्ला वापरत नसल्याने त्यात पोहाय्ला परवानगी आहे पण तिथेही साबण वापराय्ला आणि कपडे धुवायला सक्त मनाई आहे , एकदा एक जण कपडे धुताना दिसलेला तर मंदिराचा मॅनेजर हातात काठी घेवुन त्याला चोपायला पळालेला मी स्वतःच्या डोळ्याने पाहिला आहे ! इतके दिवस मी स्वतःदेखील आमच्या पवनामाई मध्ये कोणी ही काही टाकताना दिसला कि तिथल्या तिथे झाडायचो , मग तो पिंड किंवा कसलास प्रसाद टाकणारा भडजी असो कि निर्माल्य टाकणारा कोणीतरी भाविक असो कि अन्य कोणीही असो ! मी स्वतः घरच्या गणापतीचे विसर्जन घरी केले होते, तेही केवळ एकवीताचा अन १००% मातीचा गणापती असुनही !! हे माझे गाव आहे , माझा देश आहे , माझी पवनामाई आहे , तिला प्रदुषित करायचा कोणालाही अधिकार नाही अशी ठाम श्रध्दा होती पण आता तुमचे प्रतिसाद वाचुन माझे डोळे उघडले आहेत . काही विशिष्ठ समाजाच्या लोकांना पाणी प्रदुषित अन अन्य काहीही कराय्ची परवान्गी असावी असा जो काही तुमचा अ‍ॅटीटुड आहे तो माझ्यासाठी खरेच धक्कादायक आहे ! इथुन पुढे नदीत कोणीही काहीही टाकतान दिसले तर आधी त्याचे आडनाव विचारेन अन त्या नुसार ठरवेन की त्याला आडवाय्चहे की नाही ! पाणी प्रदुषित करु नये असे सामान्य ज्ञानाचा संकेत आव्हेरुन त्याला जातीय रंग दिला जात असेल अन चक्क चक्क चुकीचे समर्थन केले जात असेल तर पुनरेकवार सांगतो की एक अखंड समाज म्हणून आणि त्यापुढे जाऊन मानवजात म्हणून आपलं भवितव्य धूसर दिसते आहे. इत्यलम.

In reply to by एस

ती विहीर ज्याची आहे त्याचं आडनाव जोशी आहे असं समजल्यावर, ब्राम्हण समजून माध्यमांनी लगेच जातीवादी रंग देण्याचा प्रयत्न केला. पण नंतर उघडकीला आलं की जोशी म्हणजे गोसावी जोशी, जे भटक्या विमुक्त जमातीमधील आहेत. या दोन आधीच्या बातम्या - बातमी १ आणि बातमी २ बघा. ज्यात म्हणलंय गावातील उच्चवर्णीय लोकांनी मारहाण केली नंतर जेव्हा कळले की मारहाण करणारे गोसावी जोशी आणि त्याचा कामगार लोहार उच्चवर्णीय नाहीत तेव्हा मग मात्र समस्त पुरोगामी जमात वाळूत डोके खुपसून बसली. बादवे, या घटनेचे इतरत्र आणि अगदी इथे मिपावर भांडवल करणाऱ्यांपैकी कोणी प. बंगाल मध्ये मारल्या गेलेल्या दलित (पण भाजप कार्यकर्ते) तरुणांसाठी एवढी सहानुभूती दाखवली नाही. अगदी पुरोगामी वृत्तपत्रांमधील बातम्यांमध्ये पण ते दलित असल्याचे सांगणे टाळले गेले.

In reply to by ट्रेड मार्क

हा हा हा. हे म्हणजे आगदीच हा सुर्य अन हा जयद्रथ सारखे झाले :)
पण नंतर उघडकीला आलं की जोशी म्हणजे गोसावी जोशी, जे भटक्या विमुक्त जमातीमधील आहेत.
=)))) आता बघु एस साहेब "चुकीच्या बाजुचे चुकीच्या मुद्द्याचे समर्थन केले" म्हणुन मान्य करतात की तेच स्वतःचे घोडे दामटत रहातात तें ! आता पाहु खरे पुरोगामित्व जिंकते की स्वमतांध दांभिकता ! - एस रावांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत ....

In reply to by प्रसाद गोडबोले

वेल, आपल्या प्रतिसादांंची घसरती भाषा पाहून वाईट वाटलं. असो. मारहाण करणारे कोणत्या जातीचे आहेत हे पाहण्यात मला रस नाही. मी प्रतिसाद दिला तेव्हाच ते अमुक भटक्या विमुक्त जमातीचे लोक होते हे माहीत होते. तेव्हा, केवळ तथाकथित उच्चवर्णीय-दलित असा हा वाद मी निर्माण करतोय हे चित्र केवळ चुकीचेच नाही, तर अत्यंत खोडसाळ आहे. शिवाय, ज्या व्यक्तींना माझी परखड आणि संतुलित मते माहीत नाहीत त्यांनी मला अमुक एका कॅटेगरीत ढकलावे ह्याचे मला आश्चर्य अजिबात वाटत नाही. मूळ मुद्दा पुन्हा मांडतो. समाजातील कुठल्याही घटकामध्ये इतर कुठल्याही घटकाबद्दल कसलीही असहिष्णुता निर्माण होणे हे तुम्हां व्यक्तींना समर्थनीय वाटते का? चला, आपण असता विचार करूयात की तुम्ही समजा 'क्ष' आहात, आणि अमुक 'य' प्रकारच्या व्यक्तींविषयी तुमच्या मनात केवळ ते 'क्ष' नाहीत ह्या कारणाने घृणा आहे. आणि 'य' व्यक्तींनी काहीतरी कृत्य केले ज्यामुळे तुम्हांला त्यांचा प्रचंड राग आला. इतका राग आला, की त्यांना बेदम मारहाण करण्याची तुमची इच्छा झाली व समाज, कायदा इत्यादींना न जुमानता तुम्ही अमानुष पद्धतीने त्यांना तुमच्या मर्जीप्रमाणे 'शिक्षा' केली. हे कितपत समर्थनीय आहे? ही एक घटना, किंवा केरळमध्ये रास्वसं च्या कार्यकर्त्यांची हत्या असो वा प. बंगालमध्ये आधी डाव्या आणि सध्या तृणमूलच्या कार्यकर्त्यांची दहशत असो, वा बिहारमध्ये रणवीरसेनेचा धुमाकूळ असो वा काश्मीरमध्ये दहशतवाद आणि त्यांना समर्थन देत दगडफेक करणारे तरुण असोत, वा पुण्यात अमुक एक भागात आडनाव पाहून खोल्या भाड्याने देणारे असोत, वा त्यांच्याविरुद्ध प्रति-द्वेषाने पछाडलेले त्यांच्या मुलींविषयी घाणेरड्या कॉमेंट करणारे लोक असोत, वा लव्ह जिहादवाले असोत, वा अन्य कोणीही असोत. या अशा घटनांमध्ये, किंवा प्रवृत्तींमागे अशा प्रकारचा द्वेष व तिरस्कार दडलेला असतो ज्याचा वैयक्तिक त्या-त्या व्यक्तींचा तसा स्वतःचा काहीच संबंध नसतो. 'क्ष' ला 'य' किंवा 'य' ला 'क्ष' केवळ तो 'क्ष' किंवा 'य' नाही ह्या कारणावरून परका, कमी दर्जाचा, शत्रू किंवा तिरस्करणीय वाटू शकते, हे वास्तव धक्कादायक का वाटत नाही कोणाला? मी कोणाही अमुक समाजगटाचं समर्थन करत नाही किंवा त्यांच्या कुठल्याही अशा कृत्यांकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करत नाही. दलितांचा द्वेष करणारा उच्चवर्णीय किंवा उच्चवर्णीयांचा द्वेष करणारा दलित, दोन्हींना मी तेथल्या तेथे सुनावण्यास मागेपुढे पाहत नाही. आरएसएस असो वा बामसेफ, भाजप असो वा लाल बावट्यावाले, कॉंग्रेस असो वा शिवसेना, तुम्ही कल्पना करू शकत असलेल्या सर्व वर्तुळांंतल्या सर्व प्रकारच्या माणसांशी मी समानपणे वागतो. त्यातल्या कुणीही कसलाही दांभिकपणा केल्यास तो त्यांच्या तोंडावरच दाखवून देत 'आय डोन्ट हेट इन प्ल्यूरल' याचा खरा अर्थ सांगणे ह्याला म्हणतात खरा पुरोगामीपणा. अजून कोणाला काही चिखलफेक करायची आहे का माझ्यावर?

In reply to by एस

दोन प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत : १) पाणी प्रदुषित करणार्‍यांना जात पाहुन कमी अधिक शिक्षा किंव्वा संपुर्ण माफी करावी का ? २) ही पहा : पुरोगाम्यांचे महाआघाडीचे स्वयंघोषित नेते रागा ह्यांची प्रतिक्रिया : हे देखील मारहाण करणारे सवर्ण होते असे बेमालुन ठोकुन देत आहेत , ह्या विषयी तुमचे काय मत आहे ? https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/rahul-gandhis-commen… मी कोणाही अमुक समाजगटाचं समर्थन करत नाही किंवा त्यांच्या कुठल्याही अशा कृत्यांकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करत नाही असे तुम्ही म्हणाता खरे पण सुरुवातीला दिलेला तुमचा प्रतिसाद अन त्यात कैच्याकै संबंध नसतना केलेला गोमांस वगैरे उल्लेख एका विशिष्ठ गटाला टारगेट करणाराच होता ! शिवाय सांप्रत काळ एकदम बायनरी क्लासिफिकेशन्चा असल्याने तुम्ही पुणेरी पगडी घालता कि फुले पागोटे ह्यावरुन ठरणार आहे तुम्ही कोणत्या कंपुत आहात ते , त्याला नाईलाज आहे !

In reply to by एस

मी आधीच दिलीत उत्तरे : पाहिजे तर परत देतो : इतका राग आला, की त्यांना बेदम मारहाण करण्याची तुमची इच्छा झाली व समाज, कायदा इत्यादींना न जुमानता तुम्ही अमानुष पद्धतीने त्यांना तुमच्या मर्जीप्रमाणे 'शिक्षा' केली. हे कितपत समर्थनीय आहे? >>> तेरा जणां पैकी केवळ तीन जणांना जात पाहुन बाजुला काढुन मारहाण केली हे चुकीचेच आहे ! १००% चुकीचे ! तेराच्या तेरा जणांना फोकलुन काढायला हवे होते !
'क्ष' ला 'य' किंवा 'य' ला 'क्ष' केवळ तो 'क्ष' किंवा 'य' नाही ह्या कारणावरून परका, कमी दर्जाचा, शत्रू किंवा तिरस्करणीय वाटू शकते, हे वास्तव धक्कादायक का वाटत नाही कोणाला?
>>>> हे धक्कादायक आहेच . कोण्याही जीवाचा न घडो मत्सर | वर्म सर्वेश्वर पुजनचे || किंव्वा जे जे भेटे भूत | ते ते मानिजे भगवंत | हाचि भक्तीयोग निश्चित | जाण माझा || असे म्हणणार्‍या महान संतांच्या परंपरेचा वारसा आम्ही सांगत असताना कोणी केवळ जन्मावरुन , जातीवरुन परका कमी दर्जाचा , तीरस्करणीय वाटत असेल तर ते धक्कादायकच आहे ! माणुस त्याच्या वागणुकीवरुन परका , कमी दर्जाचा अन तीरस्करणीय ठरत असतो . माझ्या लेखी माझ्या पवनामाईचे पाणी प्रदुषित करणारे परके , कमीदर्जाचे अन तीरस्करणीय आहेत ! दुसर्‍या कोणाच्या लेखी त्याच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पोहणारे तिरस्करणीय असु शकतात. अजुन काही प्रश्न आहेत का? मजा येत आहे प्रश्नोत्तरे खेळायला . आत तुम्ही उत्तरे द्या माझ्या प्रश्नांची !! ( अवांतर : बाकी ते आडनाव पाहुन खोली भाड्याने देणे किंव्वा नाकारणे मला एकदम योग्य वाटते . मला सुकट बोंबिलचा वास आवडत नाही , परतलेल्या कांद्याचा वास आवडत नाही , मासाळीचा वास आवडत नाही , मटण चिकन, चा वास घरात आवाडत नाही , दुर्दैवाने/ सुदैवाने ह्या गोष्टी नित्यनेमाने खाणार्‍या लोकांना आडनावावरुन ओळखता येते , तत्स्मात माझ्या शेजार्‍यांनी ह्यांना फ्लॅट भाड्याने देवु नये असा माझा कायम आग्रहच असेल ! दिलाच तर त्याला कोणते वास आवडत नाहीत हे शोदुन काढुन त्याच्या घरात ते वास येतील ह्याची सोय करेन ! बाकी ज्याल कोणाला वरणाचा , ईंद्रायणी भातचा , पुरणपोळीचा वास आवडत नसेल त्यांनी मला घर भाड्याने देण्यास नकार दिला तर माझी त्याला हरकत नसेल ! )

In reply to by प्रसाद गोडबोले

मला डाव्यांची आणि उजव्यांची सारखीच अॅलर्जी आहे ;-) तेव्हा प्रतिसाद जास्तच उजवी-उजवीकडे जाऊ लागल्यास मला टंकाळा येतो. :-) असो. तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मीही दिले आहे. तुम्ही म्हणता मारा. मी अजून थोडे पुढे जाऊन म्हणतो की मारून टाका. तुमचीच बाजू उचलून धरतो आहे. काय म्हणता? 'दूरितांचे तिमिर जावो'. येथे दूरित हे अत्याचारित व अत्याचारी दोन्ही अर्थांनी आणि तिमिर हे अन्याय व अन्याय करण्याची मानसिकता ह्या दोन्ही अनुक्रमे अर्थांनी अधिक व्यापक. मानवजातीतील 'नॅरो डोमेस्टिक वॉल्स' गळून पडोत हेच पसायदान मागतो.

In reply to by एस

हा हा हा
मी अजून थोडे पुढे जाऊन म्हणतो की मारून टाका.
हेच ते , हाच तो अतिशयोक्तीयुक्त उपरोधिक प्रतिसाद ! कितिही झाले तरी पोरांनी पिण्याच्या पाण्यात पोहुन पाणी प्रदुषित केले अन त्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायलाच हवी हे तुम्ही मान्यच करायला तयार नाहीये ह्यावरुनच कळायचं ते कळतं लोकांना ! आणि मग ह्या "मला डाव्यांची आणि उजव्यांची सारखीच अॅलर्जी आहे " असल्या पोकळ वाक्यांना अर्थ उरत नाही ! तुम्हाला डाव्या उजव्यांची अ‍ॅलर्जी नाही तर " पिण्याच्या पाण्यात पोहल्याने ते पाणी प्रदुषित होते , त्यातुन साथीचे रोग पसरु शकतात" ह्या सामान्य ज्ञानची अ‍ॅलर्जी आहे ! बाकी काही नाही ! आता बासच , हे घ्या , फुले पागोटे देऊन तुमचा सत्कार करण्यात येत आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

बादवे, राहुल गांधी हे आपल्या देशाचे नेतृत्त्व करण्यास बौद्धिकदृष्ट्या पात्र नाहीत असे माझे मत आहे. काँग्रेसची घराणेशाही आणि गांधी घराण्याव्यतिरिक्त इतर नेतृत्त्व कुजवायची काँग्रेसी प्रवृत्ती ही घातक आहे. आणि या घटनेबाबत - या घटनेचं कुठल्याही प्रकारे राजकारण करणारे हे फक्त स्वतःची पोळी भाजून घेत असतात. त्यांचा निषेध.

In reply to by प्रसाद गोडबोले

पुणेरी पगडीचा वाद - शरद पवारांची एक धूर्त राजकीय खेळी. भाजपचे हिंदुत्वाचे ध्रुवीकरण आणि पवारांचे ब्राह्मणेतर जातीय ध्रुवीकरण यात काहीच फरक नाही. सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने दोन्ही वाईटच. मला व्यक्तिशः पुणेरी पगडी, शिंदेशाही पगडी, फुले-धाटणीचे मुंडासे, गांधी टोपी, फेटा, उपरणे, इत्यादी सर्व पारंपरिक वेशभूषा आवडतात. आणि त्यावरून माझी जात किंवा कंपू शोधू पाहणाऱ्याची मला कीव येते.

In reply to by एस

जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पोहल्याचा राग आल्याने तीन मातंग तरुणांना विवस्त्र करून पट्ट्याने बेदम मारहाण केली गेल्याची धक्कादायक घटना तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रात घडली आहे. आता उत्तर प्रदेश-बिहार आणि महाराष्ट्रात काय फरक राहिला? यात तुम्ही "मातंग" असा एकाच जातीचा उल्लेख केलात. या ऐवजी जर कोणाचीच जात पुढे न आणता फक्त `एका "क्षुल्लक" गोष्टीवरून २ व्यक्तींनी २ तरुणांना मारहाण केली' असं साधं सरळ म्हणून किंवा मार खाणाऱ्यांबरोबर मार देणाऱ्यांची पण जात "भटके विमुक्त" म्हणून लिहिली असतीत तर एवढा मोठा प्रतिसाद आणि स्वतःचे समर्थन करण्याची वेळच आली नसती नाही का? वर आणि त्यात "मारहाण करणारे कोणत्या जातीचे आहेत हे पाहण्यात मला रस नाही." असं म्हणताय! मग मार खाणाऱ्यांची जात पाहण्यात का बरं रस उत्पन्न झाला? नंतर म्हणताय दुसऱ्या कुठल्या जमातीचा द्वेष करणाऱ्यांना तुम्ही लगेच फटकारता, रास्वसं, भाजपच्या कार्यकर्त्यांची केवळ द्वेषावरून हत्या झाली, याविरोधात मिपावर किंवा इतर कुठे तुम्ही जाहीर निषेध व्यक्त केलाय का? असल्यास माझ्या या प्रतिसादाखाली त्याचा पुरावा द्या... आणि "त्यातल्या कुणीही कसलाही दांभिकपणा केल्यास तो त्यांच्या तोंडावरच दाखवून देत 'आय डोन्ट हेट इन प्ल्यूरल' याचा खरा अर्थ सांगणे ह्याला म्हणतात खरा पुरोगामीपणा." हे जागीच सिद्ध करून टाका. काय म्हणता?

In reply to by ट्रेड मार्क

अवश्य. https://www.misalpav.com/comment/959133#comment-959133 हा प्रतिसाद व त्याआधीचे प्रतिसाद जरूर पहा. कम्युनिस्ट गुंडगिरी मी फार जवळून पाहिली आहे. केवळ हेच नाही, तर इतरत्रही रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्त्यांचा मी निषेधच केला आहे. एक डॉ. म्हात्रे की आणखी कोणाचा प्रतिसाद होता. आणि त्याखाली मी अशा राजकीय हत्त्यांचा निषेध केला होता. अर्थात मिपावर किती प्रतिसाद कुठे दिलेत यावरून कुठल्या गोष्टीची सिद्धता तपासायला जाणे हेच हास्यास्पद आहे. बादवे, पहिल्या मुद्द्याबद्दल. मार खावा लागलेल्याची जात प्रतिसादात सांगणे आणि मारणाऱ्याची जात न सांगणे हा प्रकार मुद्दामच केला नाही कारण जातीभेद हा केवळ उच्चवर्णीयांकडून दलितांवर होतो असे नाहीये. जात ही एक फार मोठी उतरंड आहे. प्रत्येक जात ही इतर कोणत्याही जातीपेक्षा खाली किंवा वर आहे. पण बरोबरीला नाही. त्यामुळेच जाती-आधारित द्वेष ही कुण्या एका समाजघटकाची मक्तेदारी नाही. हे वास्तव आहे. हे नीट समजून घ्या. वरील घटनेला चिकटपट्टी लावून टाका. आणि अशाच स्वरूपाची इतर कुठलीही घटना घ्या ज्यात कृत्रिम भेदभावांच्या आधारे तीव्र द्वेषभावनांचे दर्शन घडले आहे. आणि मग, त्या अनुषंगाने वाटल्यास माझ्या मुद्द्यावर पुन्हा विचार करून बघा. शुभेच्छा.

In reply to by एस

त्या धाग्यातील तुमचा पहिला प्रतिसाद बघा. त्याखालील इतर प्रतिसाद पण सरकारच्या (मोदी) नावाने नावे ठेवणारेच आहेत. समस्त पुरोगामी मंडळींना याची खात्री होती की मोदी, भाजप आणि रास्व संघ या सगळ्या हत्यांमध्ये आहे. आणि मग नंतर गापै चा प्रतिसाद बघा, ज्यावर तुम्ही उपरोक्त प्रतिसाद दिला आहे. अश्या प्रत्येक घटनेत पुरोगाम्यांकडून केवळ मोदी, भाजप आणि रास्व संघ हे तीन आणि हिंदू यांना दोष दिला जातो आणि मग जेव्हा सत्य समोर येते तेव्हा मग "मी नाही त्यातला" असे प्रतिसाद येतात, यात काही नवं नाही. बादवे, सध्या आपण मिपावरच बोलतोय त्यामुळे येथील प्रतिसाद दाखवा असेच म्हणायला लागणार. तुम्हाला बाकी कुठले काही दाखवून सिद्ध करायचे असेल तर माझी हरकत नाही. माझ्यामते सदर घटनेत जातीचा काही संबंध नसावा. त्यांच्या वैयक्तिक मालकीच्या विहिरीत, ज्याचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते, हि मुले पोहायला लागली. पोहू नका असे सांगून, दम देऊनही ऐकत नव्हती त्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली. आता हा वादाचा मुद्दा होऊ शकतो की किती मारहाण करावी, कपडे काढणे कसे चुकीचे आहे वगैरे. पण मुळात आपल्याला तिथे काय झालं आपल्याला माहित नाही, कशावरून त्या मुलांनी उलट उत्तरं दिली नसतील. सांगून सुद्धा ती मुलं "बघू तू काय करतो" असं म्हणून उचकवत असतील तर त्या क्षणी रागात काहीही होऊ शकतं. त्याला जातीय रंग द्यायची काहीच आवश्यकता नाही. तुमच्या या धाग्यावरील मूळ प्रतिसादावरून तसे वाटले म्हणून इतके प्रतिसाद झाले... नाहीतर तुम्ही कुठल्या बाजूचे याने मला असा काय फरक पडणार आहे!

In reply to by एस

नै तर काय.. कुणीही काहीही केलं की सगळ्या गावाला त्यांना पार विवस्त्र करून वाट्टेल तितकं मारायची मुभा मिळतेच, घटनेत लिहिलं आहे तसं. कायदा वगैरे भास आहेत. नै तरी तिथे न्याय मिळत नाहीच, मग आम्ही केला न्याय तर बिघडलं कुठे?? आणि जातीयता वगैरे क्षुल्लक मुद्दे मध्ये आणू नका. तसं काही नसतंच आणि असलं तरी पिण्याच्या पाण्यात पोहणे ह्या घनघोर गुन्ह्याहून मोठं नसतं.

In reply to by एस

प्यायच्या पाण्याच्या विहीरीत हि मुलं पोहायला जायची. कित्येकदा हटकलं तरी ऐकायची नाहि. शेवटी त्यांना चोप मिळाला. हि सरळ सरळ मारहाणीची केस आहे. त्याला जातीयवादाचा रंग दिला मिडीयाने. दुर्दैवाने भारतात अजुनही बर्‍याच वेळा अशाच मार्गाने समस्या सोडवल्या जातात... मग ते रस्त्यावरचे अपघात असो, बेकायदा वीज/पाणी जोडणी असो, किंवा दान-धर्माचं बक्षीस आपल्या पदरात पाडणं असो. दिवसेंदीवस ३६इंची छाती सरकारला घेरण्याचं तंत्र आहे हे.. आणि सरकार त्याला बळी पडतय.

आर्य व वैदिक संस्कृती अस्सल भारतीयच – पुरातत्व खात्याचं नवं संशोधन https://www.loksatta.com/desh-videsh-news/arya-and-vedic-era-is-indigen… असले संशोधन पुण्याच्या कुठल्या गल्लीबोळात तयार होते आणि नागपूरमार्फत दिल्लीला कसे पोचते हे आम्हाला ठाऊक आहे. लवकरच मूलनिवासी संघटना याचा पर्दाफाश करेल.

In reply to by अर्धवटराव

आर्य व वैदिक संस्कृती अस्सल भारतीयच – पुरातत्व खात्याचं नवं संशोधन हे संशोधन नवीन नसून बरेच जुने आहे. तरीही वैयक्तिक व राजकिय स्वार्थासाठी "आर्यन इन्व्हेजन थियरी" जिवित ठेवण्याचा काही पाश्च्यात्य आणि भारतिय डाव्यांचा प्रयत्न आहे... हे सुद्धा काही गुपित नाही, कारण त्यांनीचे ते बर्‍याचदा अनवधानाने मान्य केलेले आहे. मात्र, त्यासंबंधी नवनवीन पुरावे हाती येत असल्याने "आर्यन इन्व्हेजन थियरी" वाले सतत तोंडावर आपटत आहेत. जागतिक स्तरावर मान्यता मिळालेल्या पुरातत्व शास्त्रज्ञांचे खालील व्हिडिओ वानगीदाखल देत आहे. या पहिल्या व्हिडिओत "आर्यन इन्व्हेजन थियरी" ही एक कवीकल्पना होती आणि तिचे निर्माण व पुरस्कार का केला गेला याबाबत सखोल विश्लेशण आहे. सर्वच व्हिडिओ शांतपणे पाहणे रोचक होईल. गडबडीत असल्यास सुरुवातीला नुसती शेवटची १५ मिनिटे तर पहायलाच हवी... ही दुसरी छोटी क्लिपसुद्धा बरेच काही सांगून जाते...

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

"आर्यन इन्व्हेजन थियरी डिबंक्ड" अशी जालावर आणि यु ट्युबवर विचारणा केल्यास, आर्य हे मूळ भारतिय लोकच होते, हे सिद्ध करणारी (जनुकशास्त्रासह ) शास्त्रिय संशोधनांची बरीच माहिती मिळेल.

In reply to by सोमनाथ खांदवे

धाग्याचे शीर्षक : चालू घडामोडी - जून २०१८ च च ला काना चा , ल ल ला दुसरा ऊकार लू चालू म्हणजे current . घ ड ला काना डा म म ला एक काना एक मात्रा मो, ड ड ला दुसरी वेलांटी डी , घडामोडी म्हणजे affairs ज ज ला दुसरा ऊकार जू न नळातला न , जून - म्हणजे जून महिना २०१८ म्हणजे ईसवी सन २०१८ , येशु ख्रिस्ताच्या जन्मानंतर २०१८ वर्षे झाली ते वर्ष ! अर्थात चालू घडामोडी - जून २०१८ म्हणाजे जुन २०१८ मधील करंट अफेयर्स ! =))))

In reply to by सोमनाथ खांदवे

काडीबाज सगा ! पण सोखांपण भारी मुरलेले दिसत आहेत, त्यामुळे एक तीर (पक्षी समीधा) वाया गेला ! =))

In reply to by manguu@mail.com

चालू घडामोडी - जून २०१८ हे नाव दिले ते बरे झाले. महिना निहाय घडामोडी शोधायला सोपे जाईल. पूर्वीचे १ २ ३ आकड्यांमुळे प्रतिसाद लिहताना खूप गफलत होयची.

स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा मिळणार; ६ महिन्यात प्रक्रिया पूर्ण होणार; अभ्यास करण्यासाठी उपसमिती मुंबई:- देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणीत तुरुंगात गेलेल्या बंदींना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा मिळणार असून त्यांना १० हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळणार असल्याचे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी जनशक्तिशी बोलताना सांगितले. हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला असताना मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल असे सांगितले. त्या पार्शवभूमीवर मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली असून त्या कैद्यांना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा देऊन मानधन देण्याचा निर्णय झाला असल्याचे बापट यांनी सांगितले. या विषयावर माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आणीबाणीत कैदी असलेल्या मिसाबंदीच्या संदर्भात मानधन देण्याचा निर्णय झाला असून उपसमिती नेमलीअसल्याचे बापट यांनी सांगितले. 2 महिन्यात या समितीचे काम पूर्ण होईल असे ते म्हणाले. तसेच जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात कमिटी याबाबत सर्वे करणार असल्याचे ते म्हणाले. याबाबत सगळे कामकाज 6 महिन्यात पूर्ण होईल तसेच यासाठी राज्याची एक कमिटी करणार असल्याचे बापट यांनी सांगितले. या काळात जे लोक कैद किंवा मिसाबंदी होते ते जर मृत झाले असतील तर त्यांच्या पत्नींना मानधन देणार असल्याचे बापट म्हणाले. १९९५ साली त्यांना सन्मानपत्र दिले होते. 10 हजारापर्यंत मानधन देणार असून वर्षातून एकदा मेडिकल सुविधा देण्यासाठी एकदा 10 हजार देणार असल्याचे ते म्हणाले. राज्यभरात अडीच ते तीन हजार असे स्वातंत्र्यसैनिक असतील असे ते यावेळी म्हणाले. मी आणीबाणीच्या काळात 19 महिने जेलमध्ये होतो. त्यावेळी मी टेलको कंपनीत काम करत होतो. मला हा लाभ मिळाला तर मी सामाजिक कामासाठी देणार आहे. या निर्णयासाठी उशीर झाला असला तरी चांगला निर्णय आहे. गिरीश बापट, संसदीय कार्यमंत्री मी स्वतः 13 महिन्यांचा बंदीवास भोगला आहे. मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये आणीबाणीच्या काळात बंदीवास भोगलेल्यांना सन्माननिधी देण्यात येतो. महाराष्ट्रातील अनेक जणांनी 1975 ते 77 याकाळात आणिबाणी कालावधीमध्ये तुरुंगवास भोगला आहे. अशा व्यक्तींचा यथोचित सन्मान व गौरव करण्याचा निर्णय 40 वर्षांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. - पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री