Skip to main content

चालू घडामोडी - जून २०१८

लेखक manguu@mail.com यांनी मंगळवार, 12/06/2018 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
भय्युजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या केली आहे. उदयसिंह देशमुख असं त्यांचं मूळ नाव असून अध्यात्मिक गुरु म्हणून त्यांची ओळख आहे. इंदूरमधील बॉम्बे रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं मात्र त्याचा काही उपयोग झाला नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि दिवाळखोरीमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असं सांगण्यात येत आहे. भय्युजी महाराज यांना अनेक राजकारणी राजकीय गुरु मानत होते. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा छंद होता. स्वच्छता अभियान असेल किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग घेतला जात होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते त्यांचा राजकीय सल्ला घेत होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्जबाजारी झाले होते अशीही माहिती समोर येते आहे. भय्यूजी महाराज यांनी असे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समोर येऊ शकलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राजकारणातलाही सहभाग कमी केला होता. काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराज यांच्या आश्रमात अनेक व्हीआयपी व्यक्ती येत असत. कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्ती भय्यू महाराजांच्या आश्रमात येत. भय्युजी महाराजांना मध्यप्रदेश सरकारने कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. गेल्याच वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं होतं. त्याचसुमारास भय्युजी महाराजांनी आपण राजकीय क्षेत्राशी संबंध कमी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पहिल्या पत्नीच्या निधनानंतर परिस्थिती बिघडलेली होती. समाजाला दिशा दाखवणारा संत अशी त्यांची ओळख होती. धार्मिक, सांप्रदायिक, कृषि, शिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांना गती होती. भय्यूजी महाराजांनी कामाचा व्याप प्रचंड वाढवला होता आणि तो व्याप सांभाळण्यापलीकडे गेला होता असं मत त्यांच्या निटवर्तीयांनी व्यक्त केलं आहे. अत्यंत धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवावं लागलं होतं. त्यासोबत कौटुंबिक समस्याही त्यांना सतावत होत्या अशी शक्यता व्यक्त होत आहे.

वाचने 118713
प्रतिक्रिया 363

प्रतिक्रिया

In reply to by manguu@mail.com

नको यार. असले काही तरी फालतू निर्णय घेऊ नका. भाजपवाल्यांनो बंद करा असले प्रकार. स्वातंत्र्यसैनिकांना पेन्शन म्हणजे केवढा मोठा घोटाळा आहे हे सर्वश्रूत आहे. अक्षरशः स्वातंत्र्य मिळताना ३-४ वर्षांचे असणारे काही काही तर महाभाग जन्मेअले नव्हते तेव्हासुद्धा स्वातंत्र्यसैनिक होते. हे असले फुकट वाटण्याचे धंदे म्हणजे भ्रष्टाचाराला आणखी एक कुरण उपलब्ध करून देणे आहे. आणि मुळातच, आपल्या देशाच्या घटनेच्या रक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी, हुकुमशाही प्रवृत्तीच्या सत्ताधार्‍यांच्या विरोधात आवाज उठवणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे, त्यासाठी बक्षिशी कसली वाटताय. आजिबात आवडला नाही हा प्रकार. :(

शिक्षण विभागाने काढले परिपत्रक (GR)_ ६ मे २०१८ ते २० जुन २०१८ पर्यत सुट्टी , २१ June पासुन शाळा चालु. रमजान ईद निमित्त केलेले बदल . सर्वाना ईदच्या शुभेच्छा. मुलांना भरपूर ईदी मिळो

In reply to by manguu@mail.com

( आपण म्हणता तसा स्वतंत्र जी आर असू शकेल नाही असे नाही) पण आपण उपलब्ध केलेले छायाचित्र बहुधा विनंती निवेदन असावे, शासन निर्णय म्हणजे जी. आर नसावा. असे प्रथमदर्शनी वाटते. चुभूदेघे.

रोचक माहिती : ब्रिटिश राजपुत्र विलियमचे पुर्वज भारतिय असल्याचा जनुकशास्त्रिय पुरावा...

अतिक्रमणधारकांना सरकारी जमिनीवरुन हटवण्यासाठी तसंच महत्वाच्या प्रकल्पांना उशीर होऊ नये यासाठी राज्य सरकारने अतिक्रमण करणाऱ्या कुटुंबांना मोफत घर देण्याचा निर्णय घेतला आहे. जागा रिकामी व्हावी यासाठी त्यांना २६९ चौरस फुटांचं घर देण्यात येणार आहे. तसंच ज्या कुटुंबांना घर नको असेल त्यांना रोख रकमेचाही पर्याय उपलब्ध असणार आहे. घराची जितकी किंमत असेल तेवढे पैसे त्यांना देण्यात येतील. जमीन लवकरात लवकर रिक्त व्हावी यासाठी ज्यांनी महापालिका क्षेत्रातील सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलं आहे, तसंच सरकारी नियमाप्रमाणे पुनर्वसनासाठी पात्र असतील त्यांना मोफत २६९ चौरस फुटांचं घर देण्यात येईल किंवा घराच्या किंमतीचे पैसे देण्यात येतील. https://www.loksatta.com/mumbai-news/maharashtra-governemnt-to-give-hou…

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी (23 एप्रिल) रोजी दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअममध्ये 'संविधान बचाव रॅली'ला संबोधित केलं. या रॅलीविषयी लोकांना माहिती देताना राहुल गांधींकडून चूक झाली. 'संविधान बचाव रॅली' विषयी ट्विट करून लोकांना माहिती देताना राहुल गांधी यांनी चुकीने 'संसद घेराव रॅली' असं ट्विट केलं. ट्विट करताना झालेली चूक लक्षात येताच राहुल गांधी यांनी काही वेळात ते ट्विट डिलीट केलं. व त्यानंतर 'संविधान बचाव रॅली'चं दुसरं ट्विट केलं.

May 19, 2018 पंतप्रधानांचे राज्य असलेल्या गुजरातमधील हिंदू हे धर्मांधांच्या उद्दामपणामुळे असुरक्षित असतील, तर इतर ठिकाणच्या हिंदूंचा विचारही न केलेला बरा ! वडोदरा (गुजरात) – शहरापासून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या वाघोडिया येथे धर्मांधांनी रमझानच्या पहिल्याच दिवशी क्षुल्लक कारणावरून हिंदूंवर आक्रमण केले. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली असून त्यात हिंदू आणि मुसलमान यांचा समावेश आहे. (धर्मांधांनी आक्रमण केल्यावर हिंदूंनी प्रतिकार करायचा नाही का ? ‘आम्ही हिंदूंचे रक्षण करणार नाही आणि त्यांनाही स्वतःचे रक्षण करू देणार नाही’, या वृत्तीचे हिंदुद्वेषी पोलीस ! – संपादक) त्यांच्यावर संपत्तीची हानी करणे आणि हिंसाचार करणे, हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. येथील वाघोडिया भागात सुट्या पैशांवरून हिंदु युवकांचा मुसलमान सोडा विक्रेत्याशी वाद झाला. रमझानचा पहिला दिवस असल्याने येथे मोठ्या प्रमाणात मुसलमान उपस्थित होते. त्यामुळे येथील वादानंतर धर्मांधांनी हिंसाचार चालू केला आणि त्याला हिंदूंनी विरोध केला. यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची हत्या परशुराम वाघमारेनेच केल्याचा दावा आज याप्रकरणी चौकशी करत असलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) केला. गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी या तिघांची हत्या करण्यासाठी एकाच शस्त्राचा वापर करण्यात आला होता, अशी महत्त्वपूर्ण माहितीही एसआयटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये उजव्या विचारधारेसाठी काम करणारी एक कट्टरपंथी टोळी सक्रिय आहे. या टोळीकडूनच या तिन्ही हत्या घडवून आणण्यात आल्या. सुजीतकुमार उर्फ प्रवीण हा या टोळीसाठी भरती करायचा. त्याच्या चौकशीतच या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीत किमान ६० सदस्य सक्रिय आहेत. यातील अनेक जण सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित आहेत, असे या अधिकाऱ्याने नमूद केले.  या टोळीत सनातन आणि हिंदू जनजागृतीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असला तरी या दोन संस्थांचा या हत्यांशी थेट संबंध आहे का, याबाबत अजूनतरी कोणतेही पुरावे आमच्या हाती लागलेले नाहीत, असे या अधिकाऱ्याने पुढे स्पष्ट केले. ही टोळी कोणत्याही नावाशिवाय सक्रिय असून उत्तर प्रदेशातही या टोळीचे जाळे पसरलेले आहे का, याचा तपास आम्ही करत आहोत, असे या अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.  - गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येत साम्य असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या तिन्ही हत्यांसाठी वापरण्यात आलेले पिस्तुल आणि त्यातील गोळ्या एकसारख्या होत्या, असे फॉरेन्सिक चाचणीत आढळून आले. तिन्ही हत्यांसाठी ज्या गोळ्या झाडण्यात आल्या त्याच्या मागील बाजूस एकाच प्रकारची खूण असल्याचे या अधिकाऱ्याने नमूद केले.  - गौरी यांच्यावर हल्ला करण्यात आला तेव्हा आणखी तीन जण तिथे मुख्य हल्लेखोरासोबत आले होते.  - कोणालाही मागमूस लागणार नाही, अशा पद्धतीने ही टोळी हत्येचा कट रचते. हल्ल्याआधी रेकी करायची, ज्याची हत्या घडवून आणायची आहे त्याच्याबाबत संपूर्ण माहिती गोळा करायची आणि नंतर नियोजनबद्धपणे हत्या घडवायची, अशाप्रकारे या टोळीचे काम चालते. सहा महिने ते एक वर्ष आधी कट रचून त्यावर काम केले जाते, अशीही माहिती तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहे.  - कन्नड लेखक प्रा. एस. भगवान यांची हत्या घडवून आणण्याची योजना या टोळीने आखली होती. मात्र, हा कट उधळला गेला. याप्रकरणी अटक केलेल्या चारही आरोपींनी त्याची कबुली दिली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.  - गौरी लंकेश हत्येप्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली असून परशुराम वाघमारेची अटक निर्णायक ठरल्याचे सांगण्यात आले.  https://m.maharashtratimes.com/india-news/parashuram-waghmare-killed-la…

In reply to by manguu@mail.com

च्यायला म्हणे गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी या तिघांची हत्या करण्यासाठी एकाच शस्त्राचा वापर करण्यात आला होता. कोणे एके काळी पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी हत्येतील पिस्तूल व गोळ्या समान होत्या. गौरी लंकेश ची नव्याने हत्या झाल्यावर दाभोलकर सुटले आणि त्यांची जागा गौरी लंकेशांनी घेतली. बोंबला तिच्यायला. मस्त मनोरंजक संगीत खुर्ची चाललीये. (संपादित) फक्त हे मनोरंजन हिंदुत्ववादी संघटनांवर शेकायला नको ! बस्सं, इतकंच !! -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

2 खून महाराष्ट्रात 2 खून कर्नाटकात मारेकरी तेच असतील कदाचित पण एकीकडे भाजपा राज्यसरकार , एकीकडे कोंग्रेस राज्यसरकार कट्टरपंथी अडकले तर आता दोष कोणच्या सरकारला द्यायचा ?

In reply to by गामा पैलवान

त्या गायकवाडचे काय झाले ? आता हा वाघमारे आला . परशुराम वाघमारे , नावात परशु आणि आडनावात मारे , नाव आडनाव दोन्ही हिंसक आहे . !!!!

In reply to by गामा पैलवान

एकेक धर्मद्रोही मरू घातलेत हेच खरे अच्छे दिन.
इथे हा आयडी सरळसरळ धर्माधारीत दहशतवादाचे समर्थन करतो आहे. संपादकांनी नोंद घ्यावी. हेट स्पीचेसना आवर घालण्यासाठी मिपावर संपादकांनी आणखी सजग राहण्याची गरज आहे असे मला वाटते. मी गामा पैलवान ह्या दहशतवादाला समर्थन करणार्‍या आयडीचा तीव्र निषेध करतो.

In reply to by पुंबा

पुंबा, माझं वाक्य थोडं दुरुस्त करून परत सांगतो. ठळक शब्द दुरुस्तीचे :
एकेक धर्मद्रोही माफिया आपसांत मारामारी करून मरू घातलेत हेच खरे अच्छे दिन.
चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. आ.न., -गा.पै.

चालू घडामोडी मध्ये फक्त केंद्रीय सरकार विरोधातील बातम्या कॉपी पेस्ट करत बसणे यात कसलं आलंय ज्ञान ? भडकलेली काही डोकी हिंसाचार करत आहेत त्या मारहाणी मुळे हिरव्या गॉगल्स वाल्यानां आनंद झालाय . जो तो हिरव्या नजरेतून भाजपचं चुकाचं कुसळ शोधतोय आणि हेतुपुरस्सर काँग्रेस च मुसळ विसरतोय . त्यामुळे भाजप ने केलेली चांगली कामे दिसत नाहीत . 60 वर्ष ओरबाडून खाल्लेलं सोयीस्कर रित्या विसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दलितांना मारहाण करणारे चाबकाने फोडून काढून फासावर लटकवले पाहिजेत , त्या शिवाय हिरव्या गॉगल्स गॅंग जिलब्या घालायची बंद होणार नाही .

In reply to by सोमनाथ खांदवे

खांदवेसाहेब, केवळ मोदी सरकार हे दलितद्वेष्टे आहे हा शुद्ध दांभिक प्रचार आहे. काँग्रेसनेही काही वेगळे केलेले नाही. डाव्यांनीही नाही. तृणमूलसारख्यांनी नाही. बसपवगैरेंनीही नाही. दलित असो वा कुठल्याही समाजघटकांची स्थिती असो. ती तशीच राहण्यात सर्वच राजकीय पक्षांचा खरा स्वार्थ असतो. अन्यथा यांची दुकाने चालणार नाहीत. ध्रुवीकरण आणि संकुचित विचारसरणी हीच राजकीय पक्षांची खरी हत्यारे असतात.

In reply to by सोमनाथ खांदवे

मागे एकदा मिपावर "विशेष सूचना" जाहीर केली होती. त्या सूचनेचा परिणाम असा झाला की श्रीगुरुजी आणि अरुण जोशी यांसारख्या मोदी सरकार/ हिंदुत्व या बाजूने बोलणाऱ्यांनी मिपासन्यास घेतला. कारण त्यातून तसा अर्थ ध्वनित होत होता हे मी निदर्शनास आणून दिलं होतं. तेव्हा काही सन्माननीय सदस्यांनी मी कसा चुकीचा आहे हे दाखवायचा प्रयत्न केला होता आणि वर संमं विरोधात बोलतो म्हणून कांगावा सुद्धा केला होता. अर्थात त्यानंतरच्या बऱ्याच धाग्यांमध्ये सरकारविरोधी म्हणा किंवा भाजप/ रास्वसं यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी आक्षेपार्ह म्हणता येतील असे बरेच प्रतिसाद दिले. परंतु आता त्यांचा दणकून प्रतिवाद करणारे कोणी उरले नाही. आणि परत कुठली "विशेष सूचना"ही आली नाही! असो. हा लेख वाचा. शतकानोशतके घडलेल्या घटनांवरून हे सिद्ध झालेले आहे की हिंदूच, किंबहुना हिंदूंमधलेच बहुसंख्य, स्वतःवर होणाऱ्या अत्याचारांसाठी कारणीभूत आहेत. हिंदूंना सहिष्णुतेचा आणि सेक्युलर असण्याचा इतका पुळका आहे की त्यांना इतर धर्मांकडून असलेला धोका लक्षातच येत नाही. बहुतांशी हिंदू मी कसा निधर्मी आणि पुरोगामी आहे हे दाखवण्यात इतके गुंग होतात की आपण विरोध कोणाचा आणि समर्थन कोणाचे करतोय हेच त्यांच्या लक्षात येत नाही. एखादा देश लढाईशिवाय आपल्या अमलाखाली आणायचा असेल तर तिथल्या शिक्षणव्यवस्थेला अमलाखाली आणलं तर काम होतं. हा उपाय दीर्घ कालावधीचा आहे, पण कुठल्याही लढाईशिवाय १००% यशाची खात्री आहे. त्या जोडीला त्या देशातील वृत्तपत्र आणि न्यूज चॅनेल पण घेतले की मग कामच झालं. आपल्याला शाळेपासूनच अकबर कसा महान होता आणि टिपू सुलतान कसा शूर होता हे शिकवलं जातं. औरंगजेब स्वतःच्या हाताने टोप्या (?) शिवून विकायचा म्हणजे तो किती साधा होता हे सांगितलं जातं. पण तेवढं चांगलं हिंदू राजांबद्दल शिकवलं जात नाही. सोशल मेडिया, वृत्तपत्र यामधून सुद्धा फक्त हिंदू इतर धर्मियांवर कसे अत्याचार करतात हेच गुऱ्हाळ चालू असतं. नाहीतर केवळ रेल्वेमध्ये सीटवरून झालेल्या मारामारीला जातीय रंग देऊन मुसलमान लोकांवर कसा अत्याचार होतो हेच दाखवत बसले नसते. दुसऱ्या बाजूला जेव्हा प्रशांत पुजारीची हत्या भर बाजारात मुस्लिम लोकांकडून केली जाते तेव्हा एक छोटीशी बातमी देऊन पुढे मौन पाळलं जातं. जनगणनेप्रमाणे आत्ता जरी ७०% च्या वर हिंदू आणि ३०% च्या आसपास इतर धर्मीय म्हणले, तरी ७०% हिंदूंमधले ५०-६०% जरी स्वतःला निधर्मि/ पुरोगामी समजत असतील तर त्यांना या ३०% मुळे होत असलेला धोका दिसतच नाही. मग ते उर्वरित ४०-५०% हिंदूंना लोकांना नावे ठेवून गप्प बसायला भाग पाडतात. हे ३०% कधी डोईजड होऊन जातील हे आपल्याला कळणार पण नाही कारण ३०% चे ५०% व्हायला फार वर्ष लागत नाहीत. याचे जिवंत उदाहरण म्हणजे युरोपातील देश आहेत. अमेरिकेतही काही फार बरी परिस्थिती नाही, बुरखाधारी आणि नुसती दाढीधारी (मिशी नसलेले) यांची संख्या वेगाने वाढते आहे. कॅनडा सारख्या देशात बऱ्याच दुकानात/ रेस्टॉरंट मध्ये आम्ही हलाल फूड विकतो असे बोर्ड लावलेले असतात. शाळांमध्ये पोर्क विकू नका एवढंच नव्हे तर इतर मुलांना डब्यातून आणायला पण बंदी करा अशी मागणी होते. एखाद्या भागात स्थलांतरित मुस्लिम लोकसंख्या वाढायला लागली की तिथून तिथले स्थानिक लोक तो भाग सोडून जातात. मग त्या भागात दुसऱ्या कुठल्या धर्माचा माणूस जाऊच शकत नाही. जाऊद्या. काय बोलणार. जे जे होईल ते बघत राहावे, पण त्यांचा संपूर्ण कब्जा होईपर्यंत आपण काही जगणार नाही याचे समाधान मानावे का आपल्या मुलाबाळांचे कसे होणार याची काळजी करावी हाच गोंधळ सध्या आहे.

In reply to by ट्रेड मार्क

च्यायला , मुस्कटदाबी लईच जोरात चाल्लीय म्हणायच . पंचाचा निर्णय अंतिम ह्ये मान्य पण कुस्ती स्परधा नीकोप झाली तर मजा येति नायतर आपला पैलवान पडायला लागला की गुणवान पैलवान ला सारख फाऊल द्यायचा आस मीपा च्या पंचांना शोभत का ?

In reply to by ट्रेड मार्क

नुसता द्वेषाने कोणतीच लढाई जिंकू शकत नाही. प्रेमाने जग जिंकलेली लाखो उदाहरणे सापडतील. === काल आमच्या येथील सोमेश्वर मंदिरात मामाच्या पोराने भंडारा ठेवला होता. पर्वा शिरखुमयाची किटल्या घरी येऊन देणारी त्याचे मित्र झाडून उपस्थित होते. प्रेम वाटल्याने प्रेम मिळते आणि द्वेष वाटल्याने काय मिळणार ते प्रत्येकाने ठरवा. === भविष्याचा बागुलबुवा दाखवण्यापेखा भावी पिढीतील मुलाबाळांना प्रेम वाटायला शिकवा, त्यांचे आयुष्य सुखकर जाईल. === बाकी सगळ्या थेऱ्या प्रॅक्टिकली तंतोतंत शक्य होतातच असे नाही.

उजवीकडे गेलेली चर्चा वाचनाच्या सोयीसाठी डावीकडे आणत आहे.
पोरांनी पिण्याच्या पाण्यात पोहुन पाणी प्रदुषित केले अन त्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायलाच हवी
अगदी बरोबर. शिक्षा व्हायला 'च' हवी. कुठली शिक्षा व्हायला हवी? आणि ती कोणी द्यायची? बाकीच्या प्रतिसादास फाट्यावर मारण्यात येत आहे.

In reply to by एस

अगदी बरोबर. शिक्षा व्हायला 'च' हवी.
हुश्श ! येवढे मान्य केलेत ते ही खुप झाले :) पहिल्यांदा कोणत्या तरी स्वयंघोषित पुरोगामी माणसाला स्वतःचे म्हणणे बदलुन योग्य ते म्हणणे स्विकारताना पाहिले आहे , एकदम हायसं वाटलं !
कुठली शिक्षा व्हायला हवी? आणि ती कोणी द्यायची?
खाजगी पाण्याची विहीर असल्यास मालकानेच चार रट्टे द्यावेत , शिवाय पोरांचा कान पकडुन त्यांच्या पालकांकडे न्यावे , अन झालेला प्रकार सांगावा , अन मग पालकांनी पोरांची उत्तरपुजा बांधावी ! सार्वजनिक तलाव विहीर मालमत्ता असल्यास आपण केवळ चार शव्द सुनाऊ शकतो असे मी म्हणणार होतो पण एकुणच तुमचे प्रतिसाद पाहुन मत बदलले आहे ते असे : आपण १००% दुर्लक्ष करावे , तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे || हा अभंग आठवावा . केले प्रदुषित पाणी तर करु दे , आपलं काय जातंय असा विचार करुन अलिप्त रहावे ! चुकुनही चार शब्द समजावयाल जाऊ नये , पोलिस कंपलेंटचा तर विचारही करु नये , सदर पाणी प्रदुषित करणारी व्यक्ती कोणत्या तरी विशिष्ठ समाजाची असली तर आपल्यावरच केस दाखल करुन आपल्यालाच भोगायला लागु शकते ! सार्वजनिक पाणवठे विहिरी नद्या प्रदुषित झाल्या तर बिनधास्त होऊ द्यावे , आपण आपला हाय क्वालिटी वॉटर प्युरीफायर घरात लाऊन घेतला की विषय खलास !! :)

In reply to by ट्रेड मार्क

:-) मी कुठल्याही एका संकुचित विचारधारेला बांधील नाही हे पाहून मला बळेच त्यांची आवडती पगडी चढवून माझा सत्कार करत आपले आवडते/नावडते बनवू पाहणारे असेच अचंबित होतात. हे पाहून मजा येते. बादवे, सत्कार म्हटलं की मला 'सरकारनामा' आठवतो. बाप रे! सांभाळून राहिलं पाहिजे. :-) :-) :-)

In reply to by प्रसाद गोडबोले

खाजगी पाण्याची विहीर असल्यास मालकानेच चार रट्टे द्यावेत , शिवाय पोरांचा कान पकडुन त्यांच्या पालकांकडे न्यावे , अन झालेला प्रकार सांगावा , अन मग पालकांनी पोरांची उत्तरपुजा बांधावी !
'चार रट्ट्यांची' तुमची व्याख्या नेमकी काय आहे? ह्या घटनेत नागवं करून पट्ट्याने बेदम मारहाण करून वर व्हिडीओ बनवून तो व्हायरल केला गेला. ह्याला तुम्ही 'चार रट्टे देणं' म्हणाल का? विचार करा, त्या पोरांचं वय कितीसं आहे. अशा कोवळ्या वयात झालेली मानहानी ते जन्मभर विसरू शकतील का? मानसशास्त्राचा तुमचा अभ्यास किती आहे ह्याची मला कल्पना नाही. पण ऐन तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मुलांना आपल्या बहरू पाहणाऱ्या पौरुषत्वाची व आत्मसन्मानाची सर्वांदेखत इतकी मानखंडना होणं हे किती 'डिव्हास्टेटिंग' असू शकतं आणि त्याचा त्यांच्यावर होणार असलेला आयुष्यभराचा परिणाम फार भयानक असेल. बाकी माझया प्रतिसादांचा वाट्टेल तसा अर्थ काढण्याच्या तुमच्या सवयीला सलाम!

In reply to by एस

मंडळी वार जाग्यावर सोडा , आता स्पश्ट झालय त्या मारहाणीत मराठी व ब्राह्मण या पैकी कुणीच नाय . राहुल गांधी ( आदर दिला पायजे बाबा ! कदाचित व्हईल सुदा पंतपरधान ) नेहमी परमाणे तोंडावर पडले त्यांना बी वाटल व्हत या केस मदी ब्राह्मण हायेत .

In reply to by सोमनाथ खांदवे

जागता पहारा यामधे आलेलि प्रतिक्रिया "आम्ही पाणी पितोय आणि तुम्ही नागड्याने यात आंघोळ करताय व्हय रे भाड्यानो, बाहेर या, तुम्हाला दाखवतो हिसका," असे म्हणून राहुल आणि सचिन या नागव्याने आंघोळ करत असलेल्या पोरांना जसे आहेत तसे विहिरीतून बाहेर काढले. त्यांना तसेच रागाने शेजारच्या शेडमध्ये नेण्यात आले. तेव्हा जाताना त्यांनी झाडाच्या फांद्या तोडून लज्जारक्षण केले. "नालायकांनो, तुम्हाला हजारदा सांगून तुम्ही ऐकायला तयार नाही, माजलाय रे !!" असे म्हणून सुती पट्ट्याने त्यांना चार फटके देण्यात आले व सोडण्यात आले. नंतर त्यांनी आंघोळीस उतरण्यापूर्वी विहिरीच्या काठावर दगड ठेवून ठेवलेले कपडे घालून पळ काढला. जामनेर मधील वाकडी गावातील ही तसे पाहायला गेले तर तशी अत्यंत सामान्य घटना आहे पण सध्या या घटनेला देशावर काहीतरी फार मोठे संकट आले आहे ..महाराष्ट्र खूप वर्षे पाठीमागे गेला ...अशा पद्धतीने घेतले जातेय आणि पराचा कावळा केला जातोय !! विहिरीचा मालक ईश्वर जोशी हा मुळात कोणी ब्राम्हण नव्हे. 'जोशी हा जातीने ब्राह्मण असता तर मजा आली असती' असे वाटणाऱ्यांचा हिरमोड झाला, हे खरे. त्यांचे जातीय दंगल घडवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले पण त्याला इलाज नाही! भिक्षा मागत फिरणाऱ्या कुडमुडे जोशी समाजाच्या भटक्या विमुक्तातील ईश्वर जोशी याची ही विहीर आहे आणि राहुल व सचिन ही मातंग समाजाची पोरे आहेत. ईश्वर जोशीने अनेक वेळा सांगितले की "बाबांनो, आम्ही हे पाणी पितो. आमच्या बरोबर अनेक लोक हे पाणी पितात. त्यामुळे तुम्हाला अंघोळ करायची असली तर पाणी बाहेर काढून आंघोळ करत चला. आत उतरून करू नका. पुन्हा सांगितले नाही म्हणू नका." असे अनेकदा समजावून सांगितलं. त्याचबरोबर अती झाल्यावर "तंगडे तोडीन" असे धमकावून सांगून सुद्धा पाहिले पण ऐकतील ती पोरे कसली..!! गुरं - शेळ्या घेऊन जायचं आणि कोणी नाही असे बघून धडाधड विहिरीत उड्या टाकायच्या. कुणी आलं, असे दिसले की, पळून जायचं.. या सर्वाला ईश्वर वैतागला होता. त्याने या दोघांच्या घरी जाऊन त्यांना व त्यांच्या पालकांना समजावले होते... पालकांची अगदी रडक्या स्वरात अजीजी केली होती. "जरा तुमच्या पोरांस्नी समजावून सांगा. नागड्यानं अंगुळ करत्यात. त्यात मुतत्यात. तेच पानी आमी पितावय !" तेव्हा "हिकडं यारं" म्हणून पालकांनी पोरांना समजावले होते. "जाऊ नका रं, तिकडं आन गेल्यासात तर हीरीत उतरू नगासा बगा. आज्याबाद पवायचं न्हाई. कळत नाही काय रे, तुम्हासनी !!" पण पोरांनी ऐकलं नाही !! एका मातंग व्यक्तीने पोरांच्या आईला उभा करून केस केली. मग पोलिसांनीही व्हिडिओ पाहिला व प्रथमदर्शी 323, 405, 506 व अट्रोसिटी नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत राहुल व सचिनने आपली चूक झाल्याचे पटकन मान्य केले !! तसेच त्यांच्या पालकांनीही 'आमची कोणतीही तक्रार नाही. पोरच harami हाईती. आमचं दिकाल ऐकत न्हाईती' असं पोलीस स्टेशनला स्पष्टपणे सांगितले आहे.

In reply to by शाम भागवत

वाह ! हे वाचुन एकदम मनाला हायसं वाटलं ! आता पाहुया वृत्तपत्रे ही बातमी कधी देतात ते अन मिपावरील स्वयं घोषित पुरोगामी कधी स्वतःची चुक कबुल करतात ते !!

In reply to by एस

ह्या घटनेत नागवं करून पट्ट्याने बेदम मारहाण करून वर व्हिडीओ बनवून तो व्हायरल केला गेला. ह्याला तुम्ही 'चार रट्टे देणं' म्हणाल का?
>>> चार रट्टे म्हणजे मोजून चार रट्टे ! सदर प्रकरणात मोजक्याच तिघांना बाजूला काढून मारणं हा प्रकार झालाय तो चुकीचाच आहे हे मी किमान 3 वेळा म्हणालो आहे वर ! त्यातून नागव करून मारणे अन त्याचा विडिओ काढून वायरल करणे हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाहीयेच ! चुकीचेच आहे ! मी त्याचे कदापि समर्थन करणार नाही , कोणताच सुज्ञ मनुष्य झाल्या प्रकाराचे समर्थन करणार नाही . कृपया गैरसमज करून घेऊ नका, मी कोणत्याही प्रकारे झालेल्या घटनेचे समर्थन करत नाहीये, पण झालेल्या घटनेला विहिरीचा मालक " जोशी" आहे म्हणून जो जातीय रंग द्यायचा प्रयत्न केवळ मिपावरच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर झाला त्याचा मी निषेध करत आहे आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे ह्या जातीपातीच्या राजकारणात सुशिक्षित लोकं सामान्यज्ञान फाट्यावर मारत आहेत त्याचा अजून जोरदार निषेध करत आहे ! बाकी गैरसमज नको . लहानग्या पोरांना नागव करून मारण्याचा जो झाला प्रकार चुकीचाच झालाय, ती पोरं कोणत्या का जातीची असेनात, मला त्यांच्या बाबत वाईटच वाटते आहे, आणि सदर प्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी ह्यात काहीही दुमत नाही . आता बास.

In reply to by प्रसाद गोडबोले

ओके. चार रट्टे देऊन पोरांना सज्जड दम भरून हाकलून लावणे योग्य ठरले असते. प्रसंगी त्यांच्या आईवडिलांकडे त्यांची तक्रार केली असती, योग्यच झाले असते. एक म्हणजे विहीरमालकाची ती विहीर खासगी मालमत्ता आहे. तिथे कुणाही आगंतुकाला पोहू देण्यात बराच धोकाही आहे. कुणाच्या जीवाचं काही बरेवाईट झालं तर मालकाच्याच डोक्याला ताप होणार. त्यापेक्षा विहिरीत मुलांना पोचण्यास मज्जाव करणं योग्यच आहे. गावाकडे पिण्याच्या पाण्याच्या विहिरीतही पोहतात. पण आरोग्यदृष्ट्या तो मुद्दाही योग्य धरू. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत पोहू नये. अंघोळ करू नये. पण हे सगळं टाळण्यासाठी, मुलांना भीती बसावी व परत आपल्या विहिरीत ती उतरू नयेत हे करण्यासाठी मालकाने जी अमानुष पद्धत वापरली आहे ती मानवतेला कलंक फासणारी आहे. असो. माझ्याकडूनही चर्चेला पूर्णविराम.

गेल्या आठवड्याभरात राखीगढीतील मृतावशेषांच्या जेनेटीक अभ्यासा बद्दलची बातमी आणि चर्चा इंग्रजी वृत्त माध्यमातून प्रामुख्याने दिसते आहे. त्या प्रमाणेच नागपूरजवळील नगरधन येथील वाकाटक कालीन अवशेषांचे उत्खनना बाबत इंडींयन एक्सप्रेस मध्ये हे वृत्त आले आहे.

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या पुजार्‍यांच्या नेमणूकी बाबत बातमी आहे. सर्वजातीच्या पुजार्‍यांना समान संधी असेल असे या बातमी वरुन दिसते. पौरोहीत्यात समान संधींचे स्वागत केले पाहीजे. आणि अशा सकारात्मक बातम्या असल्या म्हणजे समाजातील भेदाभेदही मिटण्यास मदत होईल आणि समाजातील परस्पर विश्वासास चालना मिळेल.

In reply to by माहितगार

माहितगार, माझ्या मते पौरोहित्य हे वाट्टेल त्याने करायची गोष्ट नाही. वंशपरंपरेने पुरोहित होत असेल तर कुणाच्या पोटात दुखायचं कारणंच काय मुळातून? पुरोहिताने फक्त धर्म पाळला म्हणजे झालं. दर वेळेस वेगळा पुरोहित नेमला तर पौरोहित्याच्या प्रशिक्षणासाठी अतिरिक्त संसाधनं खर्ची घालावी लागतील. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

प्रश्न उलटा आहे समान संधीने कुणाच्या पोटात का दुखावे ? थोडक्यात ज्या परंपरा सर्वजनांच्या आहेत त्या सर्व परंपरात समान संधी असणे नक्कीच गरजेचे आहे, आणि हिंदू धर्माच्या उदात्ततेच्या तत्वांना हे पाऊल साजेसेच आहे. इन एनी केस समाज बदलाची प्रागतिक प्रक्रीयेची ईश्वरेच्छा थांबवणे तुमच्या आणि आमच्या हातात नाही. या विषयावर सविस्तर भूमिका आधीच्या विवीध धागाचर्चांमधून मांडून झाली आहे. त्याची पुर्नावृत्ती करत नाही. शरदजींच्या एका धागा चर्चेत वंशपरंपरे बाबत आपणास विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर (आपण स्वतची समजूत नेमकी कशी काढता ? ) आपणाकडून अद्याप तरी आले नाही -कि आपण देऊ शकला नाही - त्यामुळे आपली वैचारीक प्रक्रीया अपुर्ण रहात असावी, याचे या निमीत्ताने स्मरण झाले. असो.

In reply to by माहितगार

माहितगार, माझ्या माहितीप्रमाणे समान संधी पोटभरू व्यवसायार्थ उचित आहे. पौरोहित्य ही पोट भरायची विद्या नाही. त्यामुळे इथे समान संधीचं सूत्र लावण्यात येऊ नये. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पौरोहित्य ही पोट भरायची विद्या नाही.
पौरोहित्य करणारे लोक पौरोहित्य करण्याचे पैसे घेत नाहीत काय?

In reply to by सतिश गावडे

पण सैध्यांतीकरित्या ति मजुरी किंवा कष्टाचे दाम नसुन पुरोहिताप्रती यजमानाने कृतज्ञना व्यक्त करण्याची पद्धत म्हणुन आहे. (पुरोहीतवर्ग सर्रास आपला 'रेट' सांगुन सेवा देतात हे खरं आहे, पण निरालसपणे आपली नित्य साधना करुन पौरोहित्य करणारे एक महाराज मी स्वतः बघितले आहेत. पुरोहीत वर्गाप्रती असणारी माझी चीड त्यांच्या संपर्कात आल्यावर बरीच कमी झाली)

In reply to by माहितगार

तुमच्याप्रमाणेच मीही त्या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची वाट पहात होतो. तसेच श्री. शरद यांना विचारलेल्या मनुस्मृतीबाबतच्या प्रश्नाचेही, उत्तर मिळाले नाही. त्यांनी ‘प्रिय श्री स्वधर्म’ असा नविन धागाही काढला, पण उत्तर दिलेले नाही. त्यामुळेच मी त्या धाग्यावर काहीच लिहू शकलो नाही. एकदा भूमिका घेतलेलीच असेल, तर अशा प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत की काय, असे वाटते.

काश्मीरमधील पत्रकार शुजात बुखारी यांची गोळ्या घालून हत्त्या करण्यात आली. तसेच ड्युटीवरून गावी परतत असलेला निशस्त्र पोलीस औरंगजेब याचे अपहरण करून निर्घृण हत्त्या केली गेली. या दोन्ही घटनांमधून दहशतवाद्यांचा भ्याडपणा सिद्ध होतो आहे.

In reply to by एस

आस काय करताय ? काश्मिर प्रश्न , आतेरिकी कारवाया , ह्ये असल इथ चघळत बसायला आमाला येळ हाये का ? . इथ फकस्त दलित मुस्लिम इरुद्ध सवर्ण ह्यानच्या मारामाऱ्या आणि भाजप इरोध या वर वाद घालत बसायच त्यो देश गेला खड्ड्यात . आमच्या मॅगुं बाबा ने तर त्या ईशयाच कापीराईट च घेतलय , जवा पासून धागा काडलय तवा पासून रोज रतीब च घालताय .

In reply to by सोमनाथ खांदवे

भाजपये विरोधी पक्षात होते तेमव्हा तेही असेच करायचे. आता आम्ही विरोधी पक्षात आहोत ना ?

In reply to by manguu@mail.com

आर तस नव्ह ! काश्मीर मध्ये शांतते साठी ज्यांनी जीव दिला शुजात बुखारी , पोलिसदलातील शिपाई औरंगजेब यांच्या बद्दल सवताच्या मनाने धा वीस वळी लिव की , तुज बी मन हलक व्हईल . सारख सारख भाजप इरोधात लिवल्या मूळ अजीर्ण व्हईल रे बाबा .

In reply to by सोमनाथ खांदवे

आमच्या मॅगुं बाबा ने तर त्या ईशयाच कापीराईट च घेतलय , जवा पासून धागा काडलय तवा पासून रोज रतीब च घालताय . तस करुन मंगु बाबा ला वाटतय की २०२८ मध्ये तरी कॉंग्रेस येईल !

In reply to by एस

शुजात बुखारींना शासनाने व्यक्तीगत सुरक्षा का दिलेली नव्हती , पोलीस दलाचा शिपाई औरंगजेब बहुधा बस मध्ये होता (चुभूदेघे) त्या बसला सुद्धा संरक्षण नव्हते का ?

गुटख्याची गाडी सोडली नाही म्हणून संतापलेल्या भाजपा आमदाराने पोलीस निरीक्षकाला दमबाजी केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली. गंगापूर- खुलताबादचे आमदार प्रकाश बंब यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना दमबाजी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. गंगापूर पोलिसांनी गुटख्याची एक गाडी पकडली होती. ती गाडी आमदार प्रकाश बंब यांच्या कार्यकर्त्याची होती, अशी चर्चा आहे. ती गाडी सोडण्यासाठी आमदार बंब यांनी पोलिसांना फोन केला. मात्र, पोलीस ऐकत नसल्याने आमदार बंब थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना दमबाजी केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘मला कळतं कुठे काय चालतं ते. याबाबत लोकप्रतिनिधींनी पोलिसांना सांगू नये आणि पोलिसांनी लोकप्रतिनिधींना शिकवू नये. आजपासून विभागात कुठेही अवैध धंदे चालणार नाही. सीएम साहेबांकडून मुंबईतून बदली करायला लावेन’, अशी धमकी देताना ते व्हिडिओत दिसत आहेत. आमदाराचा फोन आल्यावर कुठलीही गाडी सोडलीच पाहिजे आणि माझे म्हणणे ऐकत नसाल तर बदली करुन टाकेन, असा धमकीवजा इशाराच त्यांनी पोलिसाला दिला. https://www.loksatta.com/maharashtra-news/will-transfer-you-bjp-mla-pra…

In reply to by manguu@mail.com

सतत , विना थकता , भाजपा विरोधी बातम्या मग त्या गल्लीतल्या भाजपा कार्यकर्त्यांशी संबंधित असोत वा राष्ट्रीय पातळीवरील नेत्याशी संबंधित असोत शेअर करण्याच्या तुमच्या अथक परीश्रमाला सलाम ! जगभरात भाजपा संबंधित जरा कुठे खुट्ट झालं की लगेच तुमच्या JIRA Heat map मध्ये दिसत असणार बहुतेक ;-) प्रत्येक पोस्ट शेअर करण्यासाठी ठराविक पैसे जरी मिळाले तरी पण मला माझे रोजचे काम सोडून होणे अवघड आहे. म्हणून जरा जास्तच आदर वाटतोय तुमचा.


दोन दिवस बाजूला ठेवून या देशाचा इचार करून बग ,या रमजान च्या पवित्र महिन्यात लष्करान पाकिस्तान बरुबर एकतर्फी शस्त्रसंधी क्येली व्हती ,पण ती बेनी कुत्री गोळीबार करायची कै थांबली नाय . आन ती काश्मिरी पब्लिक मस्जिद मदी नमाज पडून आल्या बरुबर कशापायी लष्करावर दगडफेक करत व्हती ? कंच्याच धर्मात आस शिकवल नाय . तूंच काय मत हाये याबद्दल ? जबरदस्ती नाय पण इग्नोर मारू नगस .

In reply to by सोमनाथ खांदवे

रमजानच्या वेळी अतिरेक्यांनी गोळी का मारली , याचे उत्तर मी द्यायचे. मग अधिक मासाच्या मुहूर्तावर अनारसे खात हरिहरी करण्याऐवजी विहिरीवरून बडवाबडवी केली , तर त्याचे उत्तर तुम्ही देणार का ?

In reply to by manguu@mail.com

आहो मंगु बाबा , देशा बद्दल , नमाज नंतर दगडफेक करणाऱ्या काश्मिरी जंते बद्दल , पत्रकार शुजात बुखारी बद्दल आणि देशासाठी वीरगती प्राप्त झालेल्या शिपाई औरंगजेब बद्दल आपली काय तरी मत मांडा ना आस मी म्हणल्यालो .तुमी फिरून फिरून त्याच चौकात येताय मला काय समजना .

In reply to by सोमनाथ खांदवे

शाइस्तेखान प्रकरण रमजान महिन्यात झाले. पानिपत संक्रांतीला झाले. हिंदु पौराणिक लढाया - रावण , नरकासुर वगैरे कोणत्या ना कोणत्या सणालाच झालेत ना ? राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेब याच्या हत्येनंतर देशभरात संतापाचं वातावरण आहे. निवृत्त लष्करी अधिकारी असलेल्या औरंगजेबच्या वडिलांनी मुलाच्या हौतात्म्यानंतर केंद्र सरकारला अल्टिमेटम दिला आहे. औरंगजेबच्या मारेकऱ्यांना ७२ तासांत संपवा, अन्यथा मी स्वत: त्याच्या हत्येचा बदला घेईन,' असं त्यांनी म्हटलं आहे. ईदच्या सुट्टीसाठी घरी परतणाऱ्या औरंगजेबचं पुलवामा इथं दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं. अपहरणानंतर या जवानाची निर्घृण हत्या करण्यात आली. मुलाच्या हत्येमुळं औरंगजेबचे वडील हनीफ यांना मोठा धक्का बसला आहे. अशा स्थितीतही देशासाठी लढण्याची व मरण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. 'औरंगजेबच्या मारेकऱ्यांना ७२ तासांत संपवा', असं आवाहन त्यांनी मोदी सरकारला केलं आहे. 'सरकारनं ७२ तासांत माझ्या मुलाच्या हल्लेखोरांना मारलं नाही तर मी स्वत: दहशतवाद्यांशी दोन हात करून सूड घेईन,' असं त्यांनी म्हटलं आहे.

In reply to by manguu@mail.com

हिंदु पौराणिक लढाया - रावण , नरकासुर वगैरे कोणत्या ना कोणत्या सणालाच झालेत ना ?

तुमचे डोकं नेहेमी तिरपंच चालतं म्हणून सगळा बेसिकमध्येच लोच्या आहे.

असे

चांगल्याचे वाईटावर विजय

म्हणूनच सण साजरे होतात. उदा. विजयादशमी साजरी केली जाते ते श्री रामानी रावणावर विजय मिळवला म्हणून

त्यांनी(श्री रामानी) काही विजयादशमीचा मुहूर्त पाहून लढाई नव्हती केली.

काहीही हा मोगा

In reply to by सुबोध खरे

ह्या सणांची पौराणिक महत्वे त्याहीपूर्वीपासून आहेत. नंतर रामायण महाभारत कालीन काही घटनाही त्याच दिवशी घडल्या , ज्यांचा पगडा लोकांवर जास्त असल्याने त्या घटना त्या सणाशी अधिक निगडीत झाल्या आहेत. उदा. विजयादशमी ला तुम्ही राम रावणाचा संदर्भ देताय , पण या सणाला कौत्स गुरुदक्शिणा - मोहरांचा पाऊस, पांडवानी शस्त्र घेतले, महिषासुर वध असे अनेक संदर्भ आहेत , त्यातले काही रामायणाच्याही पूर्वीही आहेत. उदा - कौत्स गुरुदक्शिणा - मोहरांचा पाऊस मीही तेच म्हणतोय - त्यांनी(श्री रामानी) काही विजयादशमीचा मुहूर्त पाहून लढाई नव्हती केली. इतकेच नव्हे तर विजयादशमी अन दिवाळी आहे, सण आहे, म्हणून लढाई करायचे कुणी पुढेही ढकलले नव्हते.

In reply to by manguu@mail.com

तेंव्हा तुमच्या सारखे पुरोगामी, सेक्युलर, बुद्धिवादी, निधर्मांध लोक नव्हते ना त्यामुळे श्रीरामाना अशा चिंता कराव्या लागत नव्हत्या. बाकी रामायण अगोदर होते का महाभारत याचा हि नीट अभ्यास करून सांगा बरं आम्हाला काय काय कसं कसं आणि केंव्हा झालं ते बाकी महिषासुराला शहिद म्हणणारी मंडळी ज ने यु मध्ये आहेतच काड्या घालायला.

In reply to by सुबोध खरे

निधर्मि लोक सत्तेत आहेत का हो सध्या ? पूर्ण बहुमतात भाजपाजी सत्तेत आहेत ना ? युद्ध करायचे की तह हे सरकार ठरवते ना ? विजया दशमीचे संदर्भ 1. कौत्स , महिषासुर , ह्यातले 1, 2 मला माहीत नाही 2. राम रावण 3. पांडव शस्त्र https://www.speakingtree.in/blog/vijayadashami/m-lite इथे अजून संदर्भ आहेत .

In reply to by सोमनाथ खांदवे

मंगूखानला म्हणायचे आहे की शाइस्तेखानाची बिनपाण्याची हजामत करायला शिवाजी महाराज ( इथे ह च्या जागी ग ची भाषा वापरणार होतो , पण मंगुच्या भावना.... असो) रमजान संपण्याची वाट बघत बसले नाही, तर संधि मिळाल्यावर वार केला . असेच ना मोगाभाई?

In reply to by भंकस बाबा

मला काय म्हणायचे आहे हे कुणाला तरी समजले, ( या विषयापुरता , आता मी सुखाने मरतो. )

In reply to by manguu@mail.com

ते मगासच्याला टायम नव्हता म्हनून अर्धच टायपलं. थोरल्या महाराजाच्या वक्ताला ते तुमचं मानवाधिकार का क़ाय ते नव्हतं, आणि असत तरी महाराजांनी पैलादाँ त्यांना टकमक टोक दावलं असतं आणि मग स्वराज्य उभारल असत

In reply to by भंकस बाबा

मानवाधिकारवाल्यांपुढे कोंगेसवाले लोटांगण घालत होते म्हणून तर श्री मोदीजीना निवडून दिलेत ना ? आता तेही तेच कारण देणार ?

In reply to by manguu@mail.com

धोबीपछाड झाली तरी पैलवानांन हार मानायचं नसत , मर्दा सारख पुढच्या कुस्तीला तयार व्हायच . शाब्बास र पठ्ठ्या ! . आपल्या गव्हर्नमेंट ने रमजान महिन्या साठी मोठ्या मनानं एकतर्फी शस्त्रसंधी क्येली आन त्यात बी तू मानवाधिकार च राजकारण करतोय व्हय र ? रमजान महिन्यात आपल्या सैन्याने उलटा गोळीबार क्येला असता तर तुमच्या सारख्यानी मोदी सरकार ला घेरलं असत "रमजान महिन्यात गोळीबार करता ?" . आर !! त्या अफगाणिस्तान मधी सुदा तीन दिवस गोळीबार बंद व्हता . आज आपली बुलट बंद हाय का ? चालू कर बुलट , आन सुरवात कर गावच्या ह्या गल्लीतून त्या गल्लीत फिरायला , फटार !!!!!! ठो !! ठो ! ठो !!!! फटार !!!!! दुपार व्हत आली तरी भाजप च्या उण्या दुण्या नाय काढल्या याला काय आर्थ हाये का ?.

In reply to by manguu@mail.com

मोदी सरकारने काढलेल्या विकेट या कोंग्रेसच्या काळातील विकेटपेक्षा भरपूर जास्त आहेत, मानवाधिकार्वारल्यांना तेव्हाच फाट्यावर मारायला पाहिजे होते जेव्हा काश्मीरात पंडित बेघर झाले होते, मताच्या बेगमीसाठी लांगुलचलन केले आणि काश्मीर जवळ जवळ हातातून गेले

In reply to by भंकस बाबा

तेंव्हा हे करायला हवे होते, अन ते नको करायला हवे होते. आता तुम्हाला का निवडून दिलय ? शिवाजी महाराज असते तर - मानवाधिकारवाल्याना जुमानले नसते , हे भक्त लोक स्वतःच लिहितात . शिवरायांचे आशिर्वाद देऊ , मोदीना निवडून देऊ , असे म्हणून त्याना निवडूनही दिले. आणि आता विसंगत आचरण ? भक्तांची फसगत झाल्याचे आता तरी लक्शात येते आहे का ?

In reply to by manguu@mail.com

आताशी कुठ 4 वर्ष झाल्यात , आर !! पॉर्ऱ्ह सुद्धा नऊ माहिन्यानीच व्हत्यात , लै प्रश्न सोडवायच हायेत बाबा . 40 वर्ष्यात जर भाजप न काँग्रेस ने तयार क्येलेल्या अडचणी नाय सोडवल्या तरच म्हणता येईल फसगत झाली . जगातील सीरिया ,येमेन या आणि काही आफ्रिकेतल्या मुस्लिम कन्ट्री सोडल्या तर गेल्या साठ सत्तर वर्ष्यात सगळ्या द्येशानी प्रगती क्येलेली हाये . मंगु बाबा तुमाला नै वाटत का आपण पण अशीच प्रगती क्येली पायजे ?. सोच भला व्होगा भला !!!!