मांडतो आहे नव्याने...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
16 Aug 2017 - 5:39 pm

चाललो शहराकडे मी..गाव सांभाळून घे
मांडतो आहे नव्याने..डाव सांभाळून घे!

सवय झाली एकदा की क्षीण होते वेदना
लागतो जो जो जिव्हारी..घाव सांभाळून घे!

जीव तुटतो त्या क्षणीही याद मी येईल पण
तू उखाणे घेत असता,नाव सांभाळून घे!

वेगळ्या वाटा तुझ्या अन् वेगळ्या माझ्या सही
टाळ तू प्रत्येक काटा..धाव सांभाळून घे!

काजळाची रेघसुद्धा वाटते आहे गझल
तू तुझ्या नजरेत माझे भाव सांभाळून घे!

—सत्यजित

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

प्रतिक्रिया

तिसरे कडवे भारी आहे!

प्राची अश्विनी's picture

16 Aug 2017 - 6:50 pm | प्राची अश्विनी

तू उखाणे घेत असता,नाव सांभाळून घे!

क्या बात!

पलाश's picture

16 Aug 2017 - 7:58 pm | पलाश

फारच छान!!!

सत्यजित...'s picture

16 Aug 2017 - 11:14 pm | सत्यजित...

एस,प्राची अश्वीनी,पलाश...प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!

रुपी's picture

17 Aug 2017 - 1:14 am | रुपी

मस्त!

सत्यजित...'s picture

17 Aug 2017 - 2:50 pm | सत्यजित...

धन्यवाद रुपी!

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Aug 2017 - 12:34 am | अमरेंद्र बाहुबली

मस्त

हरवलेला's picture

19 Aug 2017 - 9:10 am | हरवलेला

"तू उखाणे घेत असता,नाव सांभाळून घे!" हि ओळ मस्तच

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Aug 2017 - 10:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काजळाची रेघसुद्धा वाटते आहे गझल
तू तुझ्या नजरेत माझे भाव सांभाळून घे!

क्लास...! लैच आवडली ओळ.

-दिलीप बिरुटे

गामा पैलवान's picture

24 Aug 2017 - 5:52 pm | गामा पैलवान

सत्यजित...,

गझल आवडली. विशेषत: नावचं कडवं खास आहे.

आ.न.,
-गा.पै.

सत्यजित...'s picture

25 Aug 2017 - 12:13 am | सत्यजित...

अमरेंद्र,हरवलेला...प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

बिरुटे सर,गा.पै.जी, आपलेही मनःपूर्वक धन्यवाद!
आपले प्रतिसाद पाहून-वाचून आनंद झाला!

mr.pandit's picture

31 Aug 2017 - 3:48 pm | mr.pandit

आवडली...

विशुमित's picture

31 Aug 2017 - 4:02 pm | विशुमित

कविता आवडली..!

सत्यजित...'s picture

1 Sep 2017 - 1:59 am | सत्यजित...

पंडितजी,विशुमित धन्यवाद!