बादलीयुद्ध ९

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
18 Aug 2016 - 12:24 pm

[ सातव्या भागातला बराच मजकूर वगळला आहे. त्या स्टोरीचं वळण वेगळं होतं. या स्टोरीचं वेगळं. ]
-------------------------------------------------------------------------------------------------------------

मनी आपली कोण नाय आणि आपण मनीचा कोण नाय. छ्या.

बराच वेळ मी नुसताच झाडूकडे बघत ऊभा होतो. शेवटी ती छतावरची जळमटं काढून टाकलीच.

कोण अशी लागून गेली मनी?

गच्च भरुन आणली बादली.
पण नेमकी कशाला आणली?
परत जाऊन मग ओतून दिली.

मनी आपल्याला आवडतंच नाय

मग मी गादीपण झटकून घेतली

मनी म्हणते,
जाऊंद्या, आता तिचा विषयंच नको.

मग मी झोपलो.

लाईट बंद.

बहुतेक ते झुरळ वगैरे असलं पाहिजे.

लाईट चालू केली. तर तिथे खरंच एक झुरळ होतं.

छ्या.

--------------

पिंगळे म्हणजे लायब्ररीत पाय वगैरे टेबलावर ठेऊन अभ्यास करत बसला होता. रात्री नऊ दहाला लायब्ररी ओस पडली की हा इथं बसायचा. फारंच सिन्सियर वगैरे वाटला. कॉलेजमध्ये कधीच दिसला नाही. त्याला म्हटलं, कुठल्या वर्षाला आहेस?
तर तो थर्ड इयरचाच निघाला. म्हणजे माझ्याच वर्गात.?
म्हटलं, दिसला नाही कधीच.
म्हणाला, नापास झालोय.
भरपूर वर्षे नापास झालेला हा माझा पहिलाच मित्र. याने म्हणे कॉलेज सोडून दोन वर्षे घरीच धंदापाणी केला. बापाने हाकललं म्हणून परत कॉलेजवर आला. फर्स्ट इयरला दोन, सेकंडला तीन, आणि थर्डला हे त्याचं दुसरं वर्ष होतं.
मला म्हणाला, गर्ल्स होस्टेलेच्या समोरच रुम घेतलीय.
मी म्हटलं, एकदम तोफेच्या तोंडीच!

मला सांगितलं की दूर दूरच्या गावात त्याच्या भरपूर गर्लफ्रेंड्स आहेत. पुण्याला तर याने कहरच करुन ठेवलाय. याने म्हणे एक फ्लॅट बुक करुन ठेवलाय. आणि तिथल्याच एका बाईशी याची घट्ट मैत्री आहे.
पहिल्याच भेटीत मला समजलं की हा भरपूर फेकतोय. पण तोही बोलून चालून रिकामटेकडा.
मग मीही रोज त्याला शोधून काढायचो. आणि त्याच्याच टेबलावर बसायचो.
मी म्हटलं, पिगळ्या, तुझा फ्लॅट वगैरे दाखव एकदा मला. जाऊया आपण पुण्यात.
तो म्हणाला, सध्या कडकी चालूय. फ्लॅटचे दोन चेक बाऊंस झालेत. बँकेने म्हणाला फ्लॅट सील केलाय.
मी म्हटलं, आपण मग तोडून टाकू.
त्याने ते हसण्यावर नेलं. खरंतर सील तोडून पुन्हा आहे असं बसवणं एवढं काय अवघड.
'पुचाट' हा त्याचा आवडता शब्द.
म्हटला, इथल्या पोरी किती पुचाट आहेत. खरे आयटम पुण्यातच.

एकदा त्याला म्हटलं, माझीपण एक गर्लफ्रेंड आहे. इथेच राहते.
पुढं माझं काहीच ऐकून न घेता तो म्हणाला, आधी तिच्याकडून लिहून घे. 'लग्न करणार नाही' असं लिहून घे. वाटल्यास स्टँपपेपरवर लिहून घे. पुढं कोर्टात वगैरे बरं पडतं.
म्हटलं, इथं सगळं उलटं आहे.
तसंही स्टँपपेपरवर लिहून घेऊन मग प्रेम करणे ही सुद्धा एक पुचाट कल्पनाच आहे.

एकदा मनी म्हटली, पिगळ्या तुझा दोस्त आहे का? मोनिकाच्या मागे बरेच दिवस होता.

म्हटलं च्यायला याने कुठं कुठं जॅक लावून ठेवलाय. म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंड वगैरे सगळं खरंच होतं की काय!
त्याला म्हटलं, मोनिकाला ओळखतो का?
मग लाजलाच तो. म्हटला, ती अजून तिथंच आहे का?
मोनिका ही त्याची गाववाली. कुठून कशी ओळख काढली आणि तिच्यापर्यंत पोहोचला.
पिगळ्याची एक खासियत. बऱ्याच म्हणजे कित्येक वर्षापुर्वी काढलेला एक फोटो. ऑफिसर्स टाईप सुट घालून. पिंगळ्याच्या जवानीतला फोटो म्हटलं तरी काही हरकत नाही. हाच फोटो तो कुठल्याही मुलीला द्यायचा म्हणे. मोनिकाकडेही तसाच एक.

पिगळ्या म्हणाला, अर्रे, तीच काय ती, मोनिकाची मैत्रीण. तीच काय मनी?
म्हटलं, नक्की कुठली म्हणतोय काय माहीत. तीच असेल.

मनी म्हणाली, पिंगळ्या लैच विचित्र माणूस आहे. नुसती ओळख असताना कोणी कोणाला फोटो भेट देत का?

फोटोप्रकरणामुळे मोनिका घाबरली म्हणे. आणि त्यांच तिथेच बंद पडलं.

गार वाऱ्यात चैनी खैनी देत पिंगळ्या मला म्हणाला, आपण पुण्याला जाऊ. उद्याच.
हे अचानकच ठरलं. 'पुणे हे विद्येचं माहेरघर' म्हटलं चला, कसं आहे बघून तरी येऊ.

--------------

पॅसेंजेर ट्रेन. भरधाव वगैरे अजिबात नव्हती. रात्रीचा प्रवास म्हटल्यावर एवढा काही खास नाही. पिंगळ्याची बॅग रिकामीच दिसली. म्हटलं, हे काय? तुझे कपडे?
तो म्हणाला, आपण काय तिकडे राहायला चाललोय काय?

गर्दी वगैरे बरीच होती. पण आम्ही जागा शोधली आणि झोपलो. कुठल्यातरी स्टेशनवर म्हणे गाडी बराच वेळ थांबली होती. पण भरपूर प्रवास घडला.

सकाळी सहाला पुण्याला पोहोचलो. पुण्याचं पहिलं दर्शन म्हणजे भरपूर रुळ आणि भरपूर मालगाड्या. गाडी बराच वेळ फलाटाच्या अलिकडेच थांबली. पुण्याचं ट्राफीक ऐकूण होतो. म्हटलं इथं रेल्वेलापण ट्राफिक लागतं की काय? वैताग आला.

पुण्यात मी जेव्हा पहिल्यांदाच आलो होतो तेव्हा मला वैताग आला होता.

स्टेशनच्या बाहेर आल्यावर पिंगळ्या मला म्हणाला, हे बघ. हेच ते बी.जे. हॉस्पिटल.
म्हटलं, असेल.
एकतर ती काय बघण्यासारखी वस्तू नव्हती. आणि तिथे विचित्र वासपण पसरला होता.

बराच वेळ म्हणजे जवळजवळ खूपच वेळ एका स्टॉपवर ऊभारलो. शेवटी एक पीएमटी आली. लोकं रांगा लावून शिस्तात बसमध्ये चढली. म्हटलं हे बरंय. मग आम्हीही चढलो.
मध्येच एका स्टॉपवर उतरुन आम्ही एक दिवसाचा पास घेतला. फोटो वगैरे त्याने अगोदरंच आणायला सांगितले होते. मला म्हणाला, हे आयकार्ड आता वर्षभर चालेल. पुन्हा कधीही ये फक्त पास काढला की झालं.
म्हटलं परत कोण कशाला इथं बोंबलायला येतंय.

मग नाष्टा वगैरे करुन आम्ही डेक्कनला गेलो.
पिगळ्या म्हणाला, आता कुठे खरं पुणे सुरु झालं. बघून घे.
मला फक्त तिथला एक पडका वाडा इंटरेस्टींग वाटला.

मग तो एका भल्यामोठ्या गटाराकडे बोट दाखवत म्हणाला, हीच ती नदी. पुण्याची नदी.

मग आम्ही कार्पोरेशन नामक एका गोंधळाच्या ठिकाणी आलो. दिवस फारंच वर आला होता.
तो म्हणाला, आपण निगडीला जाऊ. इंडस्ट्रीयल एरिया तिकडेच आहे. तुला कंपन्या दाखवतो.
म्हटलं चला, कंपन्या आतून दिसतात तरी कश्या ते पाहू.
एक बस आली, मी शिस्तात वगैरे वर चढायला गेलो तर भयानक भरगच्च.
एकतर बस थांबलीच नव्हती. दरवाज्याला लोंबकळलेला पिंगळ्या मग उडी टाकून माझ्याकडे आला.
म्हणाला, सकाळीच फक्त गर्दी नसते. आता पळतच जावून बस पकडायची. दिवसभर हे असंच असणार.

चांगल्या माणसाने पुण्याला कधीच येऊ नये.

मग नंतर दुसऱ्या बसनं आम्ही निगडीला गेलो. फारंच कंटाळवाणा प्रवास. ट्राफीक तर इतके होते की म्हटलं या जन्मात तरी पुण्यातून बाहेर पडणं अशक्य आहे. शेवटी एकदाचं ते निगडी आलं. पिंगळ्या बसमधूनच म्हणाला, ते बघ, ते बघ फोर्स मोटार
मग म्हणाला, ते बघ ते बघ , बजाज इलेक्ट्रीकल.

म्हटलं बस तरी थांबू दे.मग जाऊ.
निगडीला वळसा घालून गाडी थांबली. पिंगळ्या लगेच दुसऱ्या गाडीत चढून बसला.
मी म्हटलं, अरे कंपन्या?
तो म्हणाला, बघितल्या की आत्ताच.

म्हणजे दिड दोन तास प्रवास करुन याने मला कंपन्यांचे फक्त गेट्स दाखवले. च्यायला या पिंगळ्याच्या.

जाताना त्याने मला भरपूर लांब डोंगरावर ऊभारलेल्या बिल्डींग दाखवल्या. भरपूर धुक्यामुळे त्या नीट दिसतपण नव्हत्या.
म्हणाला, तिथेच आहे माझा फ्लॅट. डावीकडून तिसऱ्या बिल्डींगचा पाचवा मजला. दिसतीय का माझ्या फ्लॅटची खिडकी

बोंबला.

दोन गोष्टी मी ठरवून टाकल्या. एकतर पुण्याला कधी यायचं नाय. दुसरं म्हणजे पिंगळ्याच्या बरोबर कुठं जायचं नाय.
कारण दोघेही पकाऊ होते.

त्याला म्हटलं, मी रिस्क घेतो. पकडलं तर मलाच पोलिस पकडतील. आणि आपणंच ते सील तोडलंय याला पुरावा काय? पोलिस काय तिथे चोवीस तास नजर ठेऊन थोडीच बसलेत.
यावरुन आमची बरीच चर्चा झाली.
मुळात अस्तित्वात नसलेल्या फ्लॅटचं सील तोडणे ही फारंच अवघड गोष्ट होती

मग आम्ही पुन्हा स्टेशनवर आलो. बराच अंधार वगैरे पडला होता. एका टपरीवर बडीशेपच्या पुड्या वगैरे विकत घ्याव्या म्हणून गेलो तर तिथे एक पोलीस "चलंय चल साल्या भुरट्या" म्हणून एकाला गचुरं धरुन ओढत घेऊन गेला. त्याच्या पिंडरीवर लांबड्या दांडक्यानं दोन फटकेही मारले.
म्हटलं अबब, काय चाललंय हे इथं.

रात्रभर प्रवास करुन आम्ही पुन्हा कॉलेजवर.
म्हणजे जाताना रात्रभर.मग पुण्यात दिवसभर. परत येताना रात्रभर. हा प्रवास म्हणजे भयंकरच होता.
पुण्याला 'पश्चाताप' हेच नाव दिले पाहिजे.

-------------------------------------------------------------------------------
क्रमशः

बादलीयुद्ध एक , दोन , तीन , चार , पाच , सहा , सात , आठ
------------------------

कथा

प्रतिक्रिया

राजाभाउ's picture

18 Aug 2016 - 1:59 pm | राजाभाउ

मस्त मजा येतीय !!!

राजाभाउ's picture

18 Aug 2016 - 2:00 pm | राजाभाउ

हां आणि मी पयला !

उडन खटोला's picture

18 Aug 2016 - 2:53 pm | उडन खटोला

सांगली,मिरज का कोल्हापूर नेमकं?
पुण्याबद्दलच्या भावना नेमक्या व्यक्त झाल्यात ;)

कपिलमुनी's picture

18 Aug 2016 - 3:02 pm | कपिलमुनी

अग्गागा !
धाग्याचा सैराट होणार !

नाखु's picture

18 Aug 2016 - 4:40 pm | नाखु

पण जरा "हवा" येऊ द्या मगच कारण धागा जव्हेरभाऊंचा आहे आणि फोकस मनी-माऊ गोष्टींवर आहे,पुणे उगी तोंडी लावण्यापुरतं म्हणून .......

शेजारी शेजारी गाववाला नाखु

पैसा's picture

18 Aug 2016 - 3:07 pm | पैसा

बोंबला! =))

पद्मावति's picture

18 Aug 2016 - 3:28 pm | पद्मावति

मस्तं! पु.भा.प्र.

अस्वस्थामा's picture

18 Aug 2016 - 4:11 pm | अस्वस्थामा

"आजच्या" पुण्याबद्दलच्या भावना अगदी चपखल व्यक्त झाल्या आहेत. :)
व्यवस्थित शब्दात मांडल्याबद्दल आभार.

विजुभाऊ's picture

18 Aug 2016 - 7:03 pm | विजुभाऊ

बरोब्बर एकदम ....... बरोबर बोललास रे असस्थाम्या.......

च्यामारी पुणेकर पेटतेत आता. ;)

चाणक्य's picture

18 Aug 2016 - 6:42 pm | चाणक्य

बजाज ईलेक्ट्रिकल ऐवजी बजाज आॅटो पाहिजे.

क्षमस्व's picture

18 Aug 2016 - 7:07 pm | क्षमस्व

झकास झालंय जव्हेरभाऊ।
फक्त जरा छोटा भाग वाटला।।

बोका-ए-आझम's picture

18 Aug 2016 - 7:09 pm | बोका-ए-आझम

दोन गोष्टी मी ठरवून टाकल्या. एकतर पुण्याला कधी यायचं नाय. दुसरं म्हणजे पिंगळ्याच्या बरोबर कुठं जायचं नाय.
कारण दोघेही पकाऊ होते.

राडा होणार ना भौ! बाकी चाललंय छान!

कथा नायक लैच भोळा होता कॉलेज जीवनात. एवढ्या फेकाड्या माणसाबरोबर दोन दीवस घालवले...

साती's picture

18 Aug 2016 - 10:16 pm | साती

भारीच!
आवडला वगैरे हा भाग!

रातराणी's picture

18 Aug 2016 - 10:42 pm | रातराणी

खतरनाक!

लालगरूड's picture

18 Aug 2016 - 11:05 pm | लालगरूड

अरे वा !!! असले महानग असतात काॅलेज मध्ये..... मला वाटलं आता तो नायकाला नेतोय BP ... पण PCMC मध्ये नेलं :)) :)) बाकी लेखनशैली उत्तम... वैशिष्ट म्हणजे वाक्य पटापट संपतं.

ज्योति अळवणी's picture

18 Aug 2016 - 11:06 pm | ज्योति अळवणी

छान लिहिलंय

सोनुली's picture

18 Aug 2016 - 11:31 pm | सोनुली

<<मग तो एका भल्यामोठ्या गटाराकडे बोट दाखवत म्हणाला, हीच ती नदी. पुण्याची नदी.>>
काय लिवलंय

सोनुली's picture

18 Aug 2016 - 11:37 pm | सोनुली

मग तो एका भल्यामोठ्या गटाराकडे बोट दाखवत म्हणाला, हीच ती नदी. पुण्याची नदी.
काय लिवलंय

चांगल्या माणसाने पुण्याला कधीच येऊ नये.

=))))))
लैच!