बादलीयुद्ध

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
28 Jul 2016 - 9:25 pm

"केवड्याला दिली ओ ही बादली?"
"सत्तर रुपये"
मी क्यान्सल केली. एकतर सत्तर रुपये ही एक अवाढव्य रक्कम होती. एकरकमी एवढा प्रचंड खर्च करणे तेही एका बादलीसाठी मला अजिबात आवडले नव्हते. दुसरं म्हणजे शंभराची नोट मोडणे माझ्या जिवावर आले होते. खिशात शंभर रुपये असणे ही काय किरकोळ बाब नव्हती. शंभर रुपयात मी इथल्या मॅटीनी थेटरात किमान दोन महिने पिच्चर बघू शकलो असतो. गेलाबाजार शाबुद्दीनच्या गाड्यावर महीनाभर नाष्टाही करु शकलो असतो, पण त्यासाठी रोज सकाळी लवकर उठावे लागले असते. जे की मी ठरवलेच होते.

बादली क्यान्सल करुन मी न्यू राजस्थान स्वीटमध्ये जाऊन अंडा पॅटीस खाल्ले. नव्हे त्यासाठीच तर एवढ्या लांबवर आलो होतो. सॉस बरोबर पॅटीस खाल्लं की आमच्या मेंदूच्या तारा झंकारायच्या. आहाहा काय तो स्वाद!
सोबतीला ढोकळ्याचीही एक प्लेट दाबली अन गावात आल्याचं मी सार्थक केलं.

मग जरा बाजारात फिरलो. उगाचच. सवयच आहे तशी. एकदोन जुनी कॅसेटं विकत घेतली. तीस रुपयाला दोन. छंद आहे आपला. बोलून चालून अलिशा. कसली गाणी म्हणते यार.
मग बसस्टँडवर लस्सी पिलो. दोन गल्ल्या ओलांडून थेटराकडं चक्कर टाकली. भारी भारी पोस्टर बघून घेतले. मग डबल अंडापाव तिथंच दाबला.

मग मात्र निघालो. अर्थात फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक 'मग' तेवढा विकत घेतला. एका 'मगा'त आंघोळ उरकणे हे एक दिव्य काम होते.
वाटेत खिसे चापचले. तीस रुपये उरले होते. मूडच गेला. पण वळणावर तो चायनीजचा गाडा दिसला. आणि...

-----------------------

तर नेहमीप्रमाणेच फाटक्या खिशाने रुमवर पोहोचलो. बरीच रात्र झाली होती. जेवण नावाची गोष्ट मी रविवारी करतच नसतो. त्यामुळे त्याचा काही प्रश्न नव्हताच.

चिंटूछाप राजेश समोर बसला होता. कायम जीन्समध्येच. झोपायचाही तसाच. एकदा कँटीगला नाष्टा करायला गेलतो याच्याबरोबर. एकशेदहा रुपयांचं मंच्युरीयन खाल्लं साहेबांनी. वळणावरच्या गाड्यावर पंचवीस रुपयाला मिळतं. याच्यापेक्षा भारी. दणक्यात आदर दुरावलाच. शेवटी बॉम्बेगाय.

तर अशा या हाय प्रोफाईल पोराची बादली मागणे म्हणजे साक्षात गंगू तेलीनं राजा भोजला पोरगी मागण्यासारखं होतं. म्हणून मी ती कधीच मागितली नव्हती.
त्याची बादली कॉटखाली ठेवलेली असायची. गुबगुबीत हिरव्या रंगाची उठावदार बादली. अगदी धष्टपुष्ट वाटायची. भरल्या अंगाची.
रोज सकाळी जेव्हा मी उठायचो, तेव्हा राजेशची आंघोळ अगोदर झालेली असायची. अगदी फ्रेश.
कॉटखाली न्हाऊन निघालेली बादली दिमाखाने मिरवायची. आतमध्ये सोपकेस, कपडे धुण्याचा ब्रश, आणि अंगाला लावण्याची कसलीतरी जाळी असायची. एकंदरीत ती एक समृद्ध आंघोळ होती.

मी मात्र गोरखनाथ नावाच्या माझ्यासारख्याच एका कंगाल पोराच्या बादलीच्या शोधात असायचो. पोचे आलेली जर्मलची बादली. तिला सतराजण वापरायचे. आणि सोबतीला होता तांब्या चक्क. तोही असाच पोचे पोचे आलेला.
खरंतर मला बादली आणण्याची गरजच पडली नसती. पण या गोरखच्या बादलीसाठी रांगा लावल्या जायच्या. नंबर लावले जायचे. काहीजण तर पॉलटिक्सच करायचे. मी मात्र उशीरा उठत असल्याने माझा नंबर सगळ्यात शेवटी. कित्येकदा माझा पहिला तास या बादलीमुळेच बुडालाय.

-----------------------

तर त्या दिवशी राजेश माझ्या 'मगा'कडे बघून न बघितल्यासारखा करत म्हणाला,
"उद्या डॅड येणारायत"
खरंतर डॅड त्याचे येणार होते पण आनंद मला झाला. इव्हन झाला नसला तरी दाखवावा लागतो एवढी फॉर्म्यालीटी मला समजली होती. तीही त्याच्याकडून. शेवटी तो बॉम्बेगाय.
आम्ही आपले खेडवळ. खाटंवर छापड्या हातरुन झोपणारे. खरंतर गादी मलाही घ्यायचीच होती. पण स्वस्तात मिळेपर्यंत मी छापड्या हातरुनच झोपायचं ठरवलं होतं. तसंही आमचं निम्मं होस्टेल छापड्या हातरुनच झोपायचं.

"व्हय का? म्हंजे तू ऊद्याच जाणार का?"
"हो..." त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य मावत नव्हतं.
"आडमिशन मिळालं म्हण की तुला तिकडं"
"हो... अरे पण सामानाचं काय करु? खूप त्रास होईल रे न्यायला, तुला देऊ?"
"चालेल, कितीला देणार?"

तर त्या दिवशी आम्ही जेवण करुन आल्यावर नक्की तो काय काय मला विकणार याचा आढावा घेऊ लागलो.
"बोल, या गादीचे किती लावणार?"
"मला माहित नाही रे, तुच सांग"
"कितीला घेतली होती"
"माहित नाही रे, मम्मी ने घेतली होती"
"बरं, पन्नास रुपय देतो मी, चालेल?"
"ओके, चालेल"
"गादीसोबत ऊशी, बेडशीट फ्री असतं माहित्ये ना?"
"हू..."

राजेश जरा जास्तच बावळट निघाला. याला व्यवहाराचं जरासुदीक ज्ञान नाही.

"हि पुस्तकं, किती लावणार याचे?"
"नाही नाही, अरे पुस्तकं लागतील ना मला तिकडे" हे एक मोठं नुकसानच झालं मला. आता झेरॉक्स काढूनच अभ्यास करावा लागणार.
"बादली?"
"हू..."
"वीस रुपयं"
"चालेल"
"बादलीसोबत सोपकेस, ब्रश, जाळी फ्री"
"ठिक आहे, चालेल"
"हँगर?"

घेतलेल्या एकेका वस्तूंची लिस्ट केली. शेवटी बेरीज लागली दिडशे रुपयांची. ती चक्क मलाही फार कमी वाटली. उगाचच गिल्टी का काय वाटायला लागलं. पण मी लूटमार थोडीच करत होतो.
रोख रक्कम देऊन मी सौदा फायनल केला. आणि सुखाने छापडीवर झोपलो. त्यानंतर मला कधी छापडीवर झोपल्याचं आठवत नाही.

दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कॉलेजवरुन परत आलो, तेव्हा राजेशला त्याच्या डॅडनं झाप झाप झापलं होतं, असं एकदोघांकडून कळालं. पण त्यांनाही समजलं नव्हतं नक्की का? आणि विशेष म्हणजे मी यायच्या आत ते दोघे रिक्षाने निघूनही गेले होते स्टेशनवर.
टेन्शनमध्येच मी रुममध्ये आलो. कॉटवर गादी दूमडून ठेवली होती. लिस्टप्रमाणे सगळं सामानही दिसत होतं. दिसली नाही ती फक्त बादली.
मी सगळी रुम धुंडाळली. पोटमाळ्यावर चढून बघितलं. सगळी बाथरुमं पालथी घातली. पण बादली कुठेच सापडली नाही.

होस्टेलवर येऊन आता कुठं पंधरा दिवस झाले होते. आणि माझी बादली चोरीला गेली होती.
-----------------------

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

28 Jul 2016 - 9:37 pm | कविता१९७८

मस्त

संदीप डांगे's picture

28 Jul 2016 - 10:02 pm | संदीप डांगे

ऐहाय, हॉस्टेल लाईफ आणि जव्हेरगंज का जादू... लै भारी,, फूडचा भाग टाका!

अभ्या..'s picture

28 Jul 2016 - 10:09 pm | अभ्या..

फूडचा भाग???? या भागात काय कमी फूड आहे का? ;)
एनिवे, मस्त मस्त आणि जब्बरदस्त

संदीप डांगे's picture

29 Jul 2016 - 9:12 am | संदीप डांगे

"पुढचा भाग"

प्रचेतस's picture

28 Jul 2016 - 10:13 pm | प्रचेतस

भन्नाट लिहिलंय.
पुभाप्र

संजय पाटिल's picture

28 Jul 2016 - 10:17 pm | संजय पाटिल

भाउ एकदम बाँम्बे... आपलं..पुणेरी होउन र्‍हायला ...

संजय पाटिल's picture

28 Jul 2016 - 10:18 pm | संजय पाटिल

भाउ एकदम बाँम्बे... आपलं..पुणेरी होउन र्‍हायला ...

अन्या दातार's picture

28 Jul 2016 - 10:36 pm | अन्या दातार

खुसखुशीत :)
मजा आली वाचताना. पुभाप्र

एस's picture

28 Jul 2016 - 10:36 pm | एस

कं लिवलंय!

पद्मावति's picture

28 Jul 2016 - 10:38 pm | पद्मावति

मस्तं! वाचतेय...

कंजूस's picture

28 Jul 2016 - 10:50 pm | कंजूस

कोसला नको,हेच बरंय.

रातराणी's picture

28 Jul 2016 - 11:23 pm | रातराणी

खास! पु भा प्र.

नेहमीप्रमाणे सुंदर लेख..आवडला...

ज्योति अळवणी's picture

29 Jul 2016 - 12:18 am | ज्योति अळवणी

अप्रतिम... झक्कास जमली आहे. आवडली खूप.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jul 2016 - 12:52 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लिहिलंय. मनातले भाव शब्दांत उतरले आहेत.

चांदणे संदीप's picture

29 Jul 2016 - 1:05 am | चांदणे संदीप

धुर्ळा धुर्ळा निस्ता धुर्ळा!!

पुभाप्र!

Sandy

तुषार काळभोर's picture

29 Jul 2016 - 6:08 pm | तुषार काळभोर

जव्हेरभौ हवा करत नाय... वादळ करत्यात, नुस्तं वादळ!!!

उडन खटोला's picture

29 Jul 2016 - 1:48 am | उडन खटोला

तुला कसं कळतं बे आमचं दुःख भावड्या?

ही भली मोठी लाईन लावून आंघुळ कराय जायाचं तवर तकडनं मास्तर ची हाजरी. मायची कटकट. ते क्रमश: आधी किती येळला आनि कुटं कुटं लिहिलंय त्ये बघा एकदा. आनि काय ती बनारस यात्रा करा.

रुपी's picture

29 Jul 2016 - 4:42 am | रुपी

मस्त!

कॉटखाली बादली, आतमध्ये सोपकेस, कपडे धुण्याचा ब्रश >> होस्टेलचे दिवस आठवले.

हा एक भाग स्वतंत्र कथा म्हणून पण चांगला आहे :)

मस्त मस्त...आवडली बादलीची गोष्ट!!

जयंत कुलकर्णी's picture

29 Jul 2016 - 7:23 am | जयंत कुलकर्णी

कोसलापेक्षा १०००% चांगल आहे. हे मी खात्रीपूर्वक म्हणू शकतो.
फार छान...मुख्य म्हणजे स्टाईल थोडी बदलल्यामुळे बघा कसे मस्त वाटते आहे आता....अर्थात हे माझे मत...

राही's picture

29 Jul 2016 - 8:01 am | राही

"समृद्ध आंघोळ"!
कथा अतिशय आवडली.
तुमचे इतर लेखनही खूप आवडले आहे. (दर वेळी प्रतिसाद जरी दिले नसले तरी).

लेख मस्त. टिपीकल होस्टेल लाईफ.
(शिर्षक तितके भावले नाही किंवा लेखाशी जुळले नाही असे वाटले.)

राजाभाउ's picture

29 Jul 2016 - 2:51 pm | राजाभाउ

अहो ते बादलीच असणार काय तरं फुड , जव्हेरभौ हाय ते

संत घोडेकर's picture

29 Jul 2016 - 8:35 am | संत घोडेकर

लई भारी लिवलंय राव.

जबराट लिहिलंय.पुभाप्र.

लक्ष ठेवा (च्छ्या बोकाभै असते) तर त्याम्नाच साम्गून मोसादला कामाला लावले असते. नक्की काय खातो तेच कळेना सगळे लेखन अचाट आणि परिघाबाहेरचे अस्सल जग दाखवणारे,टांग्याच्या घोड्याला रानात उधळवणारे.

वाक्य छोटी करण्याचे कसब अफलातून.जियो

शाळेपासून कॉलेज्पर्यंत सलग ७ वर्षे घराबाहेर राहिलेला वसतीगृही नाखु

मी-सौरभ's picture

29 Jul 2016 - 10:17 am | मी-सौरभ

(च्छ्या बोकाभै असते) तर

आलेत म्हणे परत ते

राजाभाउ's picture

29 Jul 2016 - 2:53 pm | राजाभाउ

+१

नक्की काय खातो तेच कळेना सगळे लेखन अचाट आणि परिघाबाहेरचे अस्सल जग दाखवणारे,टांग्याच्या घोड्याला रानात उधळवणारे.

असेच म्हणतो

एकच णंबर जव्हेरभाव

वाचतोय

अंतरा आनंद's picture

29 Jul 2016 - 8:54 am | अंतरा आनंद

मस्त

किसन शिंदे's picture

29 Jul 2016 - 9:39 am | किसन शिंदे

यकच नंबर जव्हेरभौ !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jul 2016 - 9:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शैली आणि लेखन अतिशय सुंदर. उतू नका, मातू नका, मिपावर लिहीण्याचा वसा टाकू नका.

-दिलीप बिरुटे

मस्त ! एकदम झक्कास सुरवात...

रच्याकने...एका वेळी किती स्टोऱ्यांवर काम करता तुम्ही जव्हेर भाऊ ? इथं आम्हाला चार ओळी खरडायला महिना लागतो

मी-सौरभ's picture

29 Jul 2016 - 10:17 am | मी-सौरभ

लेखन नेहमी प्रमाणेच झक्कास

ब़जरबट्टू's picture

29 Jul 2016 - 11:44 am | ब़जरबट्टू

एक नंबर जमली कथा.. :)

पैसा's picture

29 Jul 2016 - 12:39 pm | पैसा

कथा आवडली

सिरुसेरि's picture

29 Jul 2016 - 12:56 pm | सिरुसेरि

जब लाईफ हो ओउट ऑफ कंट्रोल तो बोलो ऑल इस वेल .

छान लेखन . +१००

जगप्रवासी's picture

29 Jul 2016 - 1:14 pm | जगप्रवासी

इतके वेगवेगळे विषय सुचतात कसे हो तुम्हाला?? आणि ते पण इतक्या ताकदीने अप्रतिमरीत्या लिहिता कसे? एक नंबर आहात राव.

मृत्युन्जय's picture

29 Jul 2016 - 1:19 pm | मृत्युन्जय

मस्तय पयला भाग. क्रमशः नसती टाकली तरी एक उत्तम कथा म्हणुन खपली असती. पण क्रमशः आहे त्यामुळे पुभाप्र

अनुप ढेरे's picture

29 Jul 2016 - 2:15 pm | अनुप ढेरे

जमलय!

बाबा योगिराज's picture

29 Jul 2016 - 2:16 pm | बाबा योगिराज

क्या बात है, मस्तच ना. झ्याक.
एकदम आवड्यास.

तुम्हाला शूबेच्छा द्याची काय गरज? फकस्त फ़टा-फ़टा लिवा म्हंजी झालं.

आपलाच
बाबा पंखेश्वर

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Jul 2016 - 5:17 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडली,
एकदम लाइव्ह बघतोय असा फील आला.
पुढचा भाग लवकर लिहा
पैजारबुवा,

श्रीरंगपंत's picture

29 Jul 2016 - 6:01 pm | श्रीरंगपंत

झक्कास जव्हेर भौ.. जब्रा सुरवात! पुभालटं..

आपला पंखा
श्रीरंगा

निर्धार's picture

29 Jul 2016 - 6:15 pm | निर्धार

भारीच केलीये सुरवात तुम्ही....

स्रुजा's picture

29 Jul 2016 - 6:17 pm | स्रुजा

झकास !! तुमच्या अशा कथा नेहमीच आवडतात. लिहीत राहा.

अभिजीत अवलिया's picture

29 Jul 2016 - 10:25 pm | अभिजीत अवलिया

झक्कास

आनंद कांबीकर's picture

30 Jul 2016 - 12:02 am | आनंद कांबीकर

मस्तच

जहापन्ना, तुस्सी ग्रेट हो, तोफो कबुल करे.

होस्टेलची आठवण जागी केल्याबद्दल धन्यवाद.
बाकी बादली, मग, आरसा, कांगवा, पावडर, बॉडीस्प्रे, एवढच काय टुथपेस्ट सुद्धा आम्ही फकस्त पहिल्या वर्षालाच विकत घेतलं, त्यानंतर मात्र वसतीगृहाने आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी जाणवु दिली नाही

निखिल निरगुडे's picture

1 Aug 2016 - 12:16 am | निखिल निरगुडे

क्लास! बाकी तुम्हाला वेगळे काय सांगणार.
फॅन कम फॉलोवर!!

वपाडाव's picture

1 Aug 2016 - 12:18 pm | वपाडाव

हेच, हेच आणि हेच...!

बरखा's picture

1 Aug 2016 - 5:06 pm | बरखा

मस्त लिहीलय. वाचताना मजा आली. :)
माझा वसतीगृहाचा अनुभव मात्र घ्यायचा राहीला :(

सकेंत पाटिल's picture

9 Aug 2016 - 11:02 am | सकेंत पाटिल

जव्हेरगंज स्टाईल

patilachaganya's picture

9 Aug 2016 - 11:57 am | patilachaganya

मस्त

चित्रगुप्त's picture

6 Sep 2016 - 2:41 am | चित्रगुप्त

हा पहिला भाग आत्ता प्रथमच वाचा. एकदम मस्त सुरूवात.

पथिक's picture

14 Sep 2016 - 10:54 am | पथिक

काय भारी लिहिलंय ! मजा आली ! पुभावा :)