आयडीचे डू-आयडीस पत्र

नीलमोहर's picture
नीलमोहर in जनातलं, मनातलं
10 Feb 2016 - 3:03 pm

तू उडालास... बरं झालं. आणि लवकर उडालास ते आणखीन बरं झालं.

नाही तरी जिलब्या टाकत सुटायचास.... काय उपयोग होता तुझा? समज दिल्यानंतर तुझं जिलब्या टाकणं कमी होईल या आशेनं संमंनी तुला डोसही दिला. पण आधी बरा लिहीणारा तू, सुमार जिलब्या प्रतिसादांचा रतीब लावायला लागलास, का तर म्हणे डोक्याला त्रास कमी होतो.

मिपाकर तुझी खेचायचे, वारंवार तुझी संपादकांकडे तक्रार करुन, मालकांना पाचारण करायचे. त्यांनी तुला असा काही झोडला आणि म्हणाले, ' .... च्या, जुन्या-जाणत्या आयडींना छपरी प्रतिसाद टाकून चिथवशील तर ब्लॉक करीन !' तेंव्हापासनं तू फक्त गोग्गोड लिहू लागलास.

कधेमधे स्वत:चं समर्थन करायला, `जिलबी बरी असते, अ‍ॅसिडीटी दूर ठेवते' वगैरे सांगायचास. पण त्यावर तुला, ‘मग मी करु का सुरु ?’ विचारल्यावर तुझं बंद झालं.... जिलबी टाकणं नाही, जिलबी टाकण्याचे समर्थन करणं.

कधीकधी तू सोडायचास सुद्धा. पण तुला किकची (कुठे ते सांगायची गरज नसावी) सवय लागल्यानं, ‘हल्ली ऑनलाईन काही मजा येत नाही’ म्हणून पुन्हा सुरु करायचास.

तू गेल्यावर तो आपला दोस्त बंडू, इतक्या वर्षांनी वेळात वेळ काढून भेटला आणि तुझे जुने लेख आठवून गळ्यात पडून रडायला लागला. मी म्हटलं, ‘ लिखाण मी कसंही जमवीन पण या लेखन ठेव्याची मला काळजी वाटते, पुढचं सगळं कसं जमवायचं’....
तसे म्हणाला, तुझंही खरंच आहे. आणि त्यानी त्या पावली जाऊन माय .. मधे आयडी घेतला, म्हणाला, `नेटावरच्या धोरणी संस्थळांनी, काळाची पावलं वेळीच ओळखून, आमच्यासारख्या सदस्यांची कायमची सोय केलीये. हे लेख तिथं इतर सदस्यांचे जीव रमवतील, त्यांची स्व-संपादन पध्दतीपण चांगली आहे'.

कुठे असे दोस्त आणि कुठे तू ? तू जुन्या टुकार लेखांची जवाबदारी माझ्यावर टाकून बिनधास्त गुडूप व्हायचास आणि दोस्तानी गुडगावहून इथे येऊन त्यांची सोय केली.... शिवाय तुला श्रध्दांजलीपर लेखही लिहून टाकला. याला म्हणतात यारी, नाही तर फक्त पार्टीच्याच्या वेळी बसायला येतात दोस्त... स्टॉक भरपूर असल्याचं कन्फर्म करुन फुकटची ढोसायला.

मी बोलून गेलो खरा, पण टुकार लेखन मी तरी कसा करणार होतो ? शेवटी मनाचा हिय्या करुन मिपावर दुसर्‍या नावाने
सदस्य व्हायला गेलो. तिथे तर रेग्युलर पेक्षाही जास्तच झुंबड होती. माझी नजर स्थिरावल्यावर, तिथे एक रिकामा प्रतिसाद जिलब्यापाडू दिसला. त्याच्याशी थोडी मन की बात केल्यावर त्याच्या चेहेर्‍यावरचे भाव बदलायला लागले.

तसे मी विचारलं ‘तुम्ही इकडे कसे?’
‘म्हणजे तुम्ही मला ओळखता?’ तो चकित.
‘सम-दु:ख हीच आपली ओळख नाही का?’ या माझ्या हजरजवाबीवर तो खलासच झाला.
‘माझा आयडी मला सोडून गेला’ तो म्हणाला.
कोणत्या वेळी काय प्रश्न विचारावा हे डू-आयडींना नेमकं कळतं. मी उगीच, तुमचे (संपादकांशी) नक्की काय मतभेद होते?
वगैरे भलत्या चवकशा न करता सरळ म्हटलं, ‘ आणि लिखाण तुमच्यावर टाकून?’
त्यावर तो आणखीच खचला, ‘नाही हो, अनेक धागे आहेत पण आयडी जातांना निर्दयपणे सगळं घेऊन गेला....
मला अगम्य अतर्क्य लेखनाचा इतका लळा आहे पण आता आयुष्यात काही नाही... नुसती पोकळी ’.
‘माझ्याकडे काही जिलब्या आणि काही दवणीय लेख आहेत’ मी पटकन सांगितलं..... माझा डू-आयडी अतिरेकी वाचाळ लेखनापायी मला कायमचा सोडून गेला.
तोही बराच प्रॅक्टीकल असावा. किती लिहायचा? आयडी घेण्यापूर्वी लक्षात नाही का आलं? वगैरे वायफळ प्रश्न न विचारता
तो सरळ म्हणाला, ‘आपण एकमेकांचा आधार होऊ शकतो’.

लिखाण करायला नवाकोरा आणि सालस आयडी मिळाला. आता मिपावर आम्ही मजेत राहातो. नवा आयडी घेण्यापूर्वी मी त्याचे लेखन बघायला गेलो होतो. त्यानी मला त्याचे लिखाण दाखवले आणि म्हणाला, ‘तुला चालेलना मी कधेमधे लिहीले तर?’
मी म्हणालो ‘मी अनेक चुका अनेक वेळा करतो पण एकच चूक पुन्हा करत नाही.’
यावर तो सर्दच झाला... ‘म्हणजे ?’
‘म्हणजे मी सुद्धा तुला कंपनी देईन !'

त्यावर त्याच्या ... तच गेल्या, `त्यानं काय होईल?'

`मग मला लिमीटमधे ठेवायला... तुला कायम लिमीटमधे राहवं लागेल!’ मी म्हणाले.
माझ्या या वाक्यावर तर तो इतका फिदा आहे की आता दोस्तांचे फोन आले तरी तो, `आज मला वेळ नाही म्हणून सांगतो'
आणि मग आम्ही दोघंच धडाधड जिलब्या पाडतो.

आज वर तोंड करून मला विचारतोस, बा सायबा तू इतका कसा बदललास?
इथे एकच सांगतो, ‘... नो, हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी करतोय. तुझा इथला पहिला अवतार गेला,
आता हा अवतार मात्र मला प्राणापरि सांभाळायला पाहिजे ;)

प्रेरणास्त्रोतः __/\__

धोरणसंस्कृतीइतिहासविडंबनशब्दक्रीडाप्रकटनसद्भावनाअभिनंदनचौकशीविरंगुळा

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

10 Feb 2016 - 3:06 pm | महासंग्राम

ठ्ठो करून हसत सुटली हाफिसात

असंका's picture

10 Feb 2016 - 3:13 pm | असंका

+1

महासंग्राम's picture

10 Feb 2016 - 3:06 pm | महासंग्राम

सुटलो असे वाचावे

उगा काहितरीच's picture

10 Feb 2016 - 3:08 pm | उगा काहितरीच

___/\___

मयुरMK's picture

10 Feb 2016 - 3:20 pm | मयुरMK

Smiley

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Feb 2016 - 3:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्या बात, क्या बात, भारी जमलंय. =))

मन की बाते : प्रा.डॉ. निमोत लिहिण्याचे गट्स आहेत लेखन वाचत राहिलं पाहिजे.

-दिलीप बिरुटे

  • नीलमोहर's picture

    11 Feb 2016 - 11:14 am | नीलमोहर

    शाळेत असतांना प्रगतीपुस्तकावर कायम शेरा असायचा, 'Excellent, Can do better..'
    त्यापुढे गाडी सहसा जायची नाही, प्रयत्न कमी पडायचे, अजूनही पडतात एवढं खरं.

    इथे गाडी 'विडंबन नाही जमलं' वरून 'भारी जमलंय' पर्यंत आलीय याचा मनापासून आनंद आहे.
    प्रगतीपुस्तकावरील शेरा बदलण्यासाठी मनापासून धन्यवाद.
    तुम्हा सर्वांच्या अशा प्रोत्साहनामुळेच लिहीण्याचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढतो, कारण मुळात आधी कधी
    काही लिहीले नव्हते, इथेच इतरांचे बघून शिकते आणि लिहायचा प्रयत्न करते . थँक्स टू मिपा !!

    कधीकधी तू सोडायचास सुद्धा. पण तुला किकची (कुठे ते सांगायची गरज नसावी) सवय लागल्यानं
    दंडवत स्विकारा नीमो ___/\___

    विजय पुरोहित's picture

    10 Feb 2016 - 3:40 pm | विजय पुरोहित

    मस्तच नी.मो.....

    मुक्त विहारि's picture

    10 Feb 2016 - 3:54 pm | मुक्त विहारि

    सुडंबन भारी जमले आहे.

    भाते's picture

    10 Feb 2016 - 3:57 pm | भाते

    मस्त जमलंय!

    संस्कृतीचा उल्लेख लेखनविषय मध्ये असला तरी लेखात 'संस्कृती' नसल्याने निषेध.

    अहो संस्कृती ही सालस असते की नै? मग?

    नीलमोहर's picture

    10 Feb 2016 - 5:23 pm | नीलमोहर

    'संस्कृतीचा उल्लेख लेखनविषय मध्ये असला तरी लेखात 'संस्कृती' नसल्याने निषेध.'

    - मिपा संस्कृती हो, मिपा संस्कृती, त्यावर तर आहे सगळं !!
    आता घ्या बरं निषेध मागे.

    काय राव. "डूबेंगे तो साथ लेके सनम " केले आमच्या सरांनी. पटले नाही बघा. :(

    नीलमोहर's picture

    10 Feb 2016 - 6:00 pm | नीलमोहर

    इथे संस्कृती बुडली नाही की मिपा संस्कृती बुडली नाही, हे काय मध्येच म्हणे ??

    Smiley

    अभ्या..'s picture

    10 Feb 2016 - 7:23 pm | अभ्या..

    तुमचं चालतय हो सगळं. आमचे प्रतिसाद डुबविले की दू दू लोकांनी.

    नीलमोहर's picture

    11 Feb 2016 - 4:19 pm | नीलमोहर

    'तुमचं चालतय हो सगळं.'
    - किती ते गोड गैरसमज, तुमचं आमचं सगळ्यांचं सेमच असतंय हो..
    प्रतिसाद म्हणाल तर ते कर्माने उडतात (आपल्याच ;)

    "अब क्या बताऐं इस गम-ए-दिल का फसाना
    ये वो दर्द जो छुपाना भी मुश्किल, बताना भी मुश्किल.."

    दुखऱ्या नसेवर बोट ठेवलंत.. हे असं बोलणं सोपंय.. काश ऐसा होता !!
    माझ्यावर मेहरबानी असायला मिपा म्हणजे गां. फॅमिली नव्हे आणि मीही कुणी रॉ.. नव्हे (श्या काय तरी उदाहरण)
    मलाही सूचना, कानपिचक्या मिळतात, माझ्यावरही नजर असते, मीही काहीबाही ऐकून घेतलंय.. चालायचं.

    हे एक आभासी जग आहे, इथल्या कोणत्या गोष्टी मनावर घ्यायच्या कोणत्या सोडायच्या ते आपल्यावर शेवटी.

    कोनाडेवाल्यांचं सगळं चालतं ओ. बाकीच्यांचं नाय चालत.

    सर्वात ब्येष्ट ह्येच हाये.

    मराठी कथालेखक's picture

    10 Feb 2016 - 4:05 pm | मराठी कथालेखक

    इतर सदस्याचे डूआयडीला (ओळखल्यावर) पत्र असंही होवून जावून देत...

    मितभाषी's picture

    10 Feb 2016 - 5:03 pm | मितभाषी

    एकदम कड्डक.
    बाबल्याला पोकल बांबूने हाणलाय बोल.
    अवांतर : आता अजून एका अतर्क्य तर्कटी धागा झेलायला तयार रहा.

    सुधांशुनूलकर's picture

    10 Feb 2016 - 5:52 pm | सुधांशुनूलकर

    आवडलं. छान जमलंय.
    खुसखुशीत.

    जेपी's picture

    10 Feb 2016 - 5:58 pm | जेपी

    जमलय...

    डॉ सुहास म्हात्रे's picture

    10 Feb 2016 - 7:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

    =))

    ठ्ठो फुसका निघालाय.जिलब्या टाकल्याने ब्यान?

    श्रीरंग_जोशी's picture

    11 Feb 2016 - 3:56 am | श्रीरंग_जोशी

    नीमो - एकदम यॉर्करने क्लीन बोल्ड करणारं विडंबन. __/\__.

    अत्रुप्त आत्मा's picture

    11 Feb 2016 - 5:03 am | अत्रुप्त आत्मा

    +१

    स्रुजा's picture

    11 Feb 2016 - 9:17 pm | स्रुजा

    +१

    हहपुवा

    त्या उपसंहाराचं पण विडंबन करा रे कुणीतरी..

    मदनबाण's picture

    11 Feb 2016 - 6:52 am | मदनबाण

    मस्त ! :)

    मदनबाण.....
    आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction

    राजेश घासकडवी's picture

    11 Feb 2016 - 7:27 am | राजेश घासकडवी

    मजा आली.

    आयडी आणि डू-आयडी हे नातं खरंच फार विचित्र असतं. ओढूनताणून जमवून आणलेलं. मातीचे कुल्ले चिकटवल्यासारखं. या नात्यात नेहेमीच एक कोणीतरी पुढाकार घेणारा असतो. जगात तो खस्ता खातो, नाव कमवतो, भल्याबुऱ्या प्रतिक्रियांचा मारा सहन करतो. हे सगळं होत असताना त्याच्या मागे कुठेतरी जगाला दिसणार नाही अशा स्वरूपात डू-आयडी त्याची पाठराखण करत असतो. बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल आयडी, देअर इज अ डूआयडी, असं म्हणतात ते उगीच नाही.

    पण कधीतरी ही घडी मोडते. हा पुढे जाणारा आयडी अचानक मरतो. आणि मग संसाराची सगळी जबाबदारी डूआयडीवर येते. आत्तापर्यंत घराबाहेर तोंड न दाखवलेल्या या डूआयडीला मूळ आयडीचं काम करावं लागतं. त्यातही थोडीशी धुकधुक असते, कारण आपलाही आयडी मेला तर आपल्या लाघवी मुलांचं काय? म्हणून मूळ आयडीचं समर्थन करतानाच आपला त्याच्याशी काही संबंध नाही हेही दाखवत राहावं लागतं. म्हणजे काही म्हणायचं असेल तर 'आमचे हे असते तर असं म्हणाले असते....' अशी प्रस्तावना करून बोलावं लागतं.

    एकंदरीत काय, आयडी-डूआयडी हे नातं फारच गहन आहे.

    नीलमोहर's picture

    12 Feb 2016 - 11:32 am | नीलमोहर

    'आमचे हे असते तर असं म्हणाले असते....' अशी प्रस्तावना करून बोलावं लागतं.'

    - हो ना, आणि मग लोकांना वेगवेगळ्या आयडींना मोड आणून ते ऑन ऑफ करावे लागतात.

    मराठी कथालेखक's picture

    12 Feb 2016 - 2:05 pm | मराठी कथालेखक

    पुरतेच वस्त्रहरण की हो..

    कविता१९७८'s picture

    11 Feb 2016 - 7:59 am | कविता१९७८

    मस्त

    नीलमोहर's picture

    11 Feb 2016 - 10:41 am | नीलमोहर

    प्रथम मूळ कल्पनेबद्दल सरांचे आभार ! सर्व प्रतिसादकांना धन्यवाद आणि हा उपसंहार :

    __________________

    एकदा माझ्या डू-आयडीला पण धागा टाकायला बोलावणारे...एकदम सत्काराला तो काही येणार नाही. म्हणजे त्याला
    कळेल की संस्थळ तालेवार आहे आणि कोणाही सोम्या गोम्याला लिहीण्याची सोय दिली आहे म्हणून, ऊठला की टाकली जिलबी, असे सदस्यत्व टिकत नाही. आणि एकदा आयडी उडला की (सहजासहजी) पुन्हा माघारी येता येत नाही.
    त्याला सत्कार करतांना सांगणारे, मोक्षवाद्या, मोक्षप्राप्ती म्हणजे आयडी उडणे नाही. असल्या विचारानं अदृश्य आणि हेवनवासी होशिल. संगतीनं मिपावर केलेली मौज हाच खरा मोक्ष.

    आणि तुझा नसला तरी माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. या आयडी काळात केलेलं फेडायला, तुला पुन्हा यावं लागेल.
    पण येशील तेंव्हा या सुंदर संस्थळावर, माझा डू-आयडी बनून ये. म्हणजे तुला लिमिटमधे राहून किती मजा करता येते ते पहिल्यापासूनच कळेल. आयडीनं डू-आयडी कसा टिकवावा आणि असा आयडी असला की डू-आयडी कशी साथ देतो हे तू बघशिल.

    मग कधी मिपावर आलास तर म्हणशिल :

    `डिबी, जिलबीचं प्रमाण किती असावं?.... तोंडास नियंत्रण दिलं की लास न होता दिलखुलास जगता येतं. आणि एकदम स्वर्गात न जाता, आभासी जगतात राहून पण मुक्त विहरता येतं.'

    अन्नू's picture

    11 Feb 2016 - 10:51 am | अन्नू

    हे कुठतरी बघितल्यागत वाटतंय.. Smiley

    स्रुजा's picture

    11 Feb 2016 - 9:19 pm | स्रुजा

    कहर.. ___/\___

    आत्ता पाहिला उपसंहार ;)

    श्रीरंग_जोशी's picture

    11 Feb 2016 - 9:24 pm | श्रीरंग_जोशी

    रिव्हर्स स्वीप करून मारलेला षटकार जणू :-) .

    नंदन's picture

    11 Feb 2016 - 1:50 pm | नंदन

    झकास जमलंय! आयडी-डुआयडीचे नाते म्हणजे 'जुदा हो के भी तू मुझ में कहीं बाकी है' सारखेच. हो की नै, गवि? ;)

    नीलमोहर's picture

    12 Feb 2016 - 11:38 am | नीलमोहर

    प्रेरणा आपलीच __/\__
    ती लिंक चालत नाही, काय आहे ते ?
    कॉलिंग गवि सर..

    बीबीशीआयला जायपीचा डबा जोडलाय नंदनशेटनी.. ;-)

    नीलमोहर's picture

    12 Feb 2016 - 12:11 pm | नीलमोहर

    'बीबीशीआयला जायपीचा डबा जोडलाय'
    - हे काय असतं?

    ते असंच एका विडंबन सम्राटाने लिहिलेलं वाक्य असतं. विडंबनासाठी चांगले वाचन असणे गरजेचं असतं हे दुसर्‍या एका विडंबन सम्राटाचे वाक्य असतं.
    त्या ब्रिटीश काळातल्या दोन वेगवेगळ्या रेल्व्या असतं. त्याचा संदर्भ ईंटरकास्ट म्यारेजला दिलेलं असतं. हितं त्याचा उल्लेख दोन वेगवेगळ्या गोष्टी जोडण्याला असतं.

    नंदनशेटनी दिलेल्या लिंकेत मिपा आणि ऐसीच्या लिंकाची जोडणी झालीय हो.

    राजेश घासकडवी's picture

    12 Feb 2016 - 6:07 pm | राजेश घासकडवी

    ती लिंक इथे जाते.

    मूकवाचक's picture

    11 Feb 2016 - 7:15 pm | मूकवाचक

    =))

    सस्नेह's picture

    11 Feb 2016 - 8:15 pm | सस्नेह

    जमून आलेलं विडंबन !

    भिंगरी's picture

    12 Feb 2016 - 5:43 pm | भिंगरी

    +१

    मम्बाजी सर्वज्ञ's picture

    12 Feb 2016 - 8:23 pm | मम्बाजी सर्वज्ञ

    तसा मी मिपा वर नवीन असल्याने आय-डी, डू आय-डी चा खेळ फार माहिती नाही.
    नवीन लोकांना 'नॉलेज बेस' होण्यासाठी 'आय-डी' 'डू आय-डी' चा जोड्या-लावा सारखा खेळ ठेवा कि. इंडक्शन च्या पेज वर टाकून द्या.....

    || श्री मिसळ पाव ||
    | डूआयडीलक्षणनाम समास द्वितीय |

    मागा सांगितली लक्षणे | मिपाकरांअंगी बाणे |
    आता ऐका सोंग घेणे | असोनी येक आयडी |१ |
    तयां नाव डुआयडी |नामे असती बहु फाकडी |
    खवतुनी लाडीगोडी | करिती सदा |२|
    घेई सोंगे कलह लावण्या | जुने स्कोर सेटल करण्या |
    अथवा उगा मजा बघण्या | आयड्यांची |३|
    बोली स्त्रीआयडींशी मधुर | मयतरी करण्या अति आतुर |
    प्रतिसादी जो बहु चतुर | तो येक डुआयडी |४|
    वाचाळ चोंबडा चौकस |कुटीळ अंतस्थ मानस |
    कुवत नसता भंकस | करी तो येक डुआयडी |५|

    "नवीन लोकांना 'नॉलेज बेस' होण्यासाठी 'आय-डी' 'डू आय-डी' चा जोड्या-लावा सारखा खेळ ठेवा कि."
    - भारी कल्पना काढलीय, तुम्ही काढून बघा धागा यावर, हिट जाईल :)