Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by नीलमोहर on Wed, 02/10/2016 - 15:03
लेखनविषय (Tags)
धोरण
संस्कृती
इतिहास
विडंबन
शब्दक्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना
अभिनंदन
चौकशी
विरंगुळा
तू उडालास... बरं झालं. आणि लवकर उडालास ते आणखीन बरं झालं. नाही तरी जिलब्या टाकत सुटायचास.... काय उपयोग होता तुझा? समज दिल्यानंतर तुझं जिलब्या टाकणं कमी होईल या आशेनं संमंनी तुला डोसही दिला. पण आधी बरा लिहीणारा तू, सुमार जिलब्या प्रतिसादांचा रतीब लावायला लागलास, का तर म्हणे डोक्याला त्रास कमी होतो. मिपाकर तुझी खेचायचे, वारंवार तुझी संपादकांकडे तक्रार करुन, मालकांना पाचारण करायचे. त्यांनी तुला असा काही झोडला आणि म्हणाले, ' .... च्या, जुन्या-जाणत्या आयडींना छपरी प्रतिसाद टाकून चिथवशील तर ब्लॉक करीन !' तेंव्हापासनं तू फक्त गोग्गोड लिहू लागलास. कधेमधे स्वत:चं समर्थन करायला, `जिलबी बरी असते, अ‍ॅसिडीटी दूर ठेवते' वगैरे सांगायचास. पण त्यावर तुला, ‘मग मी करु का सुरु ?’ विचारल्यावर तुझं बंद झालं.... जिलबी टाकणं नाही, जिलबी टाकण्याचे समर्थन करणं. कधीकधी तू सोडायचास सुद्धा. पण तुला किकची (कुठे ते सांगायची गरज नसावी) सवय लागल्यानं, ‘हल्ली ऑनलाईन काही मजा येत नाही’ म्हणून पुन्हा सुरु करायचास. तू गेल्यावर तो आपला दोस्त बंडू, इतक्या वर्षांनी वेळात वेळ काढून भेटला आणि तुझे जुने लेख आठवून गळ्यात पडून रडायला लागला. मी म्हटलं, ‘ लिखाण मी कसंही जमवीन पण या लेखन ठेव्याची मला काळजी वाटते, पुढचं सगळं कसं जमवायचं’.... तसे म्हणाला, तुझंही खरंच आहे. आणि त्यानी त्या पावली जाऊन माय .. मधे आयडी घेतला, म्हणाला, `नेटावरच्या धोरणी संस्थळांनी, काळाची पावलं वेळीच ओळखून, आमच्यासारख्या सदस्यांची कायमची सोय केलीये. हे लेख तिथं इतर सदस्यांचे जीव रमवतील, त्यांची स्व-संपादन पध्दतीपण चांगली आहे'. कुठे असे दोस्त आणि कुठे तू ? तू जुन्या टुकार लेखांची जवाबदारी माझ्यावर टाकून बिनधास्त गुडूप व्हायचास आणि दोस्तानी गुडगावहून इथे येऊन त्यांची सोय केली.... शिवाय तुला श्रध्दांजलीपर लेखही लिहून टाकला. याला म्हणतात यारी, नाही तर फक्त पार्टीच्याच्या वेळी बसायला येतात दोस्त... स्टॉक भरपूर असल्याचं कन्फर्म करुन फुकटची ढोसायला. मी बोलून गेलो खरा, पण टुकार लेखन मी तरी कसा करणार होतो ? शेवटी मनाचा हिय्या करुन मिपावर दुसर्‍या नावाने सदस्य व्हायला गेलो. तिथे तर रेग्युलर पेक्षाही जास्तच झुंबड होती. माझी नजर स्थिरावल्यावर, तिथे एक रिकामा प्रतिसाद जिलब्यापाडू दिसला. त्याच्याशी थोडी मन की बात केल्यावर त्याच्या चेहेर्‍यावरचे भाव बदलायला लागले. तसे मी विचारलं ‘तुम्ही इकडे कसे?’ ‘म्हणजे तुम्ही मला ओळखता?’ तो चकित. ‘सम-दु:ख हीच आपली ओळख नाही का?’ या माझ्या हजरजवाबीवर तो खलासच झाला. ‘माझा आयडी मला सोडून गेला’ तो म्हणाला. कोणत्या वेळी काय प्रश्न विचारावा हे डू-आयडींना नेमकं कळतं. मी उगीच, तुमचे (संपादकांशी) नक्की काय मतभेद होते? वगैरे भलत्या चवकशा न करता सरळ म्हटलं, ‘ आणि लिखाण तुमच्यावर टाकून?’ त्यावर तो आणखीच खचला, ‘नाही हो, अनेक धागे आहेत पण आयडी जातांना निर्दयपणे सगळं घेऊन गेला.... मला अगम्य अतर्क्य लेखनाचा इतका लळा आहे पण आता आयुष्यात काही नाही... नुसती पोकळी ’. ‘माझ्याकडे काही जिलब्या आणि काही दवणीय लेख आहेत’ मी पटकन सांगितलं..... माझा डू-आयडी अतिरेकी वाचाळ लेखनापायी मला कायमचा सोडून गेला. तोही बराच प्रॅक्टीकल असावा. किती लिहायचा? आयडी घेण्यापूर्वी लक्षात नाही का आलं? वगैरे वायफळ प्रश्न न विचारता तो सरळ म्हणाला, ‘आपण एकमेकांचा आधार होऊ शकतो’. लिखाण करायला नवाकोरा आणि सालस आयडी मिळाला. आता मिपावर आम्ही मजेत राहातो. नवा आयडी घेण्यापूर्वी मी त्याचे लेखन बघायला गेलो होतो. त्यानी मला त्याचे लिखाण दाखवले आणि म्हणाला, ‘तुला चालेलना मी कधेमधे लिहीले तर?’ मी म्हणालो ‘मी अनेक चुका अनेक वेळा करतो पण एकच चूक पुन्हा करत नाही.’ यावर तो सर्दच झाला... ‘म्हणजे ?’ ‘म्हणजे मी सुद्धा तुला कंपनी देईन !' त्यावर त्याच्या ... तच गेल्या, `त्यानं काय होईल?' `मग मला लिमीटमधे ठेवायला... तुला कायम लिमीटमधे राहवं लागेल!’ मी म्हणाले. माझ्या या वाक्यावर तर तो इतका फिदा आहे की आता दोस्तांचे फोन आले तरी तो, `आज मला वेळ नाही म्हणून सांगतो' आणि मग आम्ही दोघंच धडाधड जिलब्या पाडतो. आज वर तोंड करून मला विचारतोस, बा सायबा तू इतका कसा बदललास? इथे एकच सांगतो, ‘... नो, हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी करतोय. तुझा इथला पहिला अवतार गेला, आता हा अवतार मात्र मला प्राणापरि सांभाळायला पाहिजे ;) प्रेरणास्त्रोतः __/\__
  • Log in or register to post comments
  • 14488 views

प्रतिक्रिया

Submitted by महासंग्राम on Wed, 02/10/2016 - 15:06

Permalink

हसलो

ठ्ठो करून हसत सुटली हाफिसात
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 02/10/2016 - 15:13

In reply to हसलो by महासंग्राम

Permalink

+1

+1
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Wed, 02/10/2016 - 15:06

Permalink

सुटलो असे वाचावे

सुटलो असे वाचावे
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Wed, 02/10/2016 - 15:08

Permalink

___/\___

___/\___
  • Log in or register to post comments
Profile picture for user मयुरMK

Submitted by मयुरMK on Wed, 02/10/2016 - 15:20

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 02/10/2016 - 15:24

Permalink

व्वाव !

क्या बात, क्या बात, भारी जमलंय. =)) मन की बाते : प्रा.डॉ. निमोत लिहिण्याचे गट्स आहेत लेखन वाचत राहिलं पाहिजे. -दिलीप बिरुटे
    • Log in or register to post comments

    Submitted by नीलमोहर on गुरुवार, 02/11/2016 - 11:14

    In reply to व्वाव ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

    Permalink

    __/\__

    शाळेत असतांना प्रगतीपुस्तकावर कायम शेरा असायचा, 'Excellent, Can do better..' त्यापुढे गाडी सहसा जायची नाही, प्रयत्न कमी पडायचे, अजूनही पडतात एवढं खरं. इथे गाडी 'विडंबन नाही जमलं' वरून 'भारी जमलंय' पर्यंत आलीय याचा मनापासून आनंद आहे. प्रगतीपुस्तकावरील शेरा बदलण्यासाठी मनापासून धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या अशा प्रोत्साहनामुळेच लिहीण्याचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढतो, कारण मुळात आधी कधी काही लिहीले नव्हते, इथेच इतरांचे बघून शिकते आणि लिहायचा प्रयत्न करते . थँक्स टू मिपा !!
    • Log in or register to post comments

    Submitted by होबासराव on Wed, 02/10/2016 - 15:27

    Permalink

    कधीकधी तू सोडायचास सुद्धा. पण

    कधीकधी तू सोडायचास सुद्धा. पण तुला किकची (कुठे ते सांगायची गरज नसावी) सवय लागल्यानं दंडवत स्विकारा नीमो ___/\___
    • Log in or register to post comments

    Submitted by विजय पुरोहित on Wed, 02/10/2016 - 15:40

    Permalink

    मस्तच नी.मो.....

    मस्तच नी.मो.....
    • Log in or register to post comments

    Submitted by मुक्त विहारि on Wed, 02/10/2016 - 15:54

    Permalink

    सुडंबन भारी जमले आहे.

    सुडंबन भारी जमले आहे.
    • Log in or register to post comments

    Submitted by भाते on Wed, 02/10/2016 - 15:57

    Permalink

    हाहाहा

    मस्त जमलंय! संस्कृतीचा उल्लेख लेखनविषय मध्ये असला तरी लेखात 'संस्कृती' नसल्याने निषेध.
    • Log in or register to post comments

    Submitted by एस on Wed, 02/10/2016 - 16:04

    In reply to हाहाहा by भाते

    Permalink

    अहो संस्कृती ही सालस असते की

    अहो संस्कृती ही सालस असते की नै? मग?
    • Log in or register to post comments

    Submitted by नीलमोहर on Wed, 02/10/2016 - 17:23

    In reply to हाहाहा by भाते

    Permalink

    असं कसं..

    'संस्कृतीचा उल्लेख लेखनविषय मध्ये असला तरी लेखात 'संस्कृती' नसल्याने निषेध.' - मिपा संस्कृती हो, मिपा संस्कृती, त्यावर तर आहे सगळं !! आता घ्या बरं निषेध मागे.
    • Log in or register to post comments
    Profile picture for user अभ्या..

    Submitted by अभ्या.. on Wed, 02/10/2016 - 17:39

    In reply to असं कसं.. by नीलमोहर

    Permalink

    काय राव. "डूबेंगे तो साथ लेके

    काय राव. "डूबेंगे तो साथ लेके सनम " केले आमच्या सरांनी. पटले नाही बघा. :(
    • Log in or register to post comments

    Submitted by नीलमोहर on Wed, 02/10/2016 - 18:00

    In reply to काय राव. "डूबेंगे तो साथ लेके by अभ्या..

    Permalink

    आँ..??

    इथे संस्कृती बुडली नाही की मिपा संस्कृती बुडली नाही, हे काय मध्येच म्हणे ?? Image removed.
    • Log in or register to post comments
    Profile picture for user अभ्या..

    Submitted by अभ्या.. on Wed, 02/10/2016 - 19:23

    In reply to आँ..?? by नीलमोहर

    Permalink

    तुमचं चालतय हो सगळं. आमचे

    तुमचं चालतय हो सगळं. आमचे प्रतिसाद डुबविले की दू दू लोकांनी.
    • Log in or register to post comments

    Submitted by नीलमोहर on गुरुवार, 02/11/2016 - 16:19

    In reply to तुमचं चालतय हो सगळं. आमचे by अभ्या..

    Permalink

    Grass is always greener on the other side

    'तुमचं चालतय हो सगळं.' - किती ते गोड गैरसमज, तुमचं आमचं सगळ्यांचं सेमच असतंय हो.. प्रतिसाद म्हणाल तर ते कर्माने उडतात (आपल्याच ;) "अब क्या बताऐं इस गम-ए-दिल का फसाना ये वो दर्द जो छुपाना भी मुश्किल, बताना भी मुश्किल.." दुखऱ्या नसेवर बोट ठेवलंत.. हे असं बोलणं सोपंय.. काश ऐसा होता !! माझ्यावर मेहरबानी असायला मिपा म्हणजे गां. फॅमिली नव्हे आणि मीही कुणी रॉ.. नव्हे (श्या काय तरी उदाहरण) मलाही सूचना, कानपिचक्या मिळतात, माझ्यावरही नजर असते, मीही काहीबाही ऐकून घेतलंय.. चालायचं. हे एक आभासी जग आहे, इथल्या कोणत्या गोष्टी मनावर घ्यायच्या कोणत्या सोडायच्या ते आपल्यावर शेवटी.
    • Log in or register to post comments

    Submitted by बॅटमॅन on Fri, 02/12/2016 - 14:47

    In reply to Grass is always greener on the other side by नीलमोहर

    Permalink

    कोनाडेवाल्यांचं सगळं चालतं ओ.

    कोनाडेवाल्यांचं सगळं चालतं ओ. बाकीच्यांचं नाय चालत.
    • Log in or register to post comments

    Submitted by एस on Wed, 02/10/2016 - 16:02

    Permalink

    सर्वात ब्येष्ट ह्येच हाये.

    सर्वात ब्येष्ट ह्येच हाये.
    • Log in or register to post comments
    Profile picture for user मराठी कथालेखक

    Submitted by मराठी कथालेखक on Wed, 02/10/2016 - 16:05

    Permalink

    इतर सदस्याचे डूआयडीला

    इतर सदस्याचे डूआयडीला (ओळखल्यावर) पत्र असंही होवून जावून देत...
    • Log in or register to post comments

    Submitted by मितभाषी on Wed, 02/10/2016 - 17:03

    Permalink

    एकदम कड्डक.

    एकदम कड्डक. बाबल्याला पोकल बांबूने हाणलाय बोल. अवांतर : आता अजून एका अतर्क्य तर्कटी धागा झेलायला तयार रहा.
    • Log in or register to post comments

    Submitted by सुधांशुनूलकर on Wed, 02/10/2016 - 17:52

    Permalink

    छान जमलंय.

    आवडलं. छान जमलंय. खुसखुशीत.
    • Log in or register to post comments

    Submitted by जेपी on Wed, 02/10/2016 - 17:58

    Permalink

    जमलय...

    जमलय...
    • Log in or register to post comments

    Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 02/10/2016 - 19:13

    Permalink

    =))

    =))
    • Log in or register to post comments

    Submitted by कंजूस on Wed, 02/10/2016 - 20:00

    Permalink

    ठ्ठो फुसका निघालाय.जिलब्या

    ठ्ठो फुसका निघालाय.जिलब्या टाकल्याने ब्यान?
    • Log in or register to post comments

    Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 02/11/2016 - 03:56

    Permalink

    क्या बात है

    नीमो - एकदम यॉर्करने क्लीन बोल्ड करणारं विडंबन. __/\__.
    • Log in or register to post comments

    Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 02/11/2016 - 05:03

    In reply to क्या बात है by श्रीरंग_जोशी

    Permalink

    +१

    +१
    • Log in or register to post comments

    Submitted by स्रुजा on गुरुवार, 02/11/2016 - 21:17

    In reply to क्या बात है by श्रीरंग_जोशी

    Permalink

    +१

    +१ हहपुवा त्या उपसंहाराचं पण विडंबन करा रे कुणीतरी..
    • Log in or register to post comments
    Profile picture for user मदनबाण

    Submitted by मदनबाण on गुरुवार, 02/11/2016 - 06:52

    Permalink

    मस्त ! :)

    मस्त ! :)

    मदनबाण.....

    आजची स्वाक्षरी :- Birds-of-Paradise Project Introduction
    • Log in or register to post comments

    Submitted by राजेश घासकडवी on गुरुवार, 02/11/2016 - 07:27

    Permalink

    मजा आली.

    मजा आली. आयडी आणि डू-आयडी हे नातं खरंच फार विचित्र असतं. ओढूनताणून जमवून आणलेलं. मातीचे कुल्ले चिकटवल्यासारखं. या नात्यात नेहेमीच एक कोणीतरी पुढाकार घेणारा असतो. जगात तो खस्ता खातो, नाव कमवतो, भल्याबुऱ्या प्रतिक्रियांचा मारा सहन करतो. हे सगळं होत असताना त्याच्या मागे कुठेतरी जगाला दिसणार नाही अशा स्वरूपात डू-आयडी त्याची पाठराखण करत असतो. बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल आयडी, देअर इज अ डूआयडी, असं म्हणतात ते उगीच नाही. पण कधीतरी ही घडी मोडते. हा पुढे जाणारा आयडी अचानक मरतो. आणि मग संसाराची सगळी जबाबदारी डूआयडीवर येते. आत्तापर्यंत घराबाहेर तोंड न दाखवलेल्या या डूआयडीला मूळ आयडीचं काम करावं लागतं. त्यातही थोडीशी धुकधुक असते, कारण आपलाही आयडी मेला तर आपल्या लाघवी मुलांचं काय? म्हणून मूळ आयडीचं समर्थन करतानाच आपला त्याच्याशी काही संबंध नाही हेही दाखवत राहावं लागतं. म्हणजे काही म्हणायचं असेल तर 'आमचे हे असते तर असं म्हणाले असते....' अशी प्रस्तावना करून बोलावं लागतं. एकंदरीत काय, आयडी-डूआयडी हे नातं फारच गहन आहे.
    • Log in or register to post comments

    Submitted by नीलमोहर on Fri, 02/12/2016 - 11:32

    In reply to मजा आली. by राजेश घासकडवी

    Permalink

    __/\__

    'आमचे हे असते तर असं म्हणाले असते....' अशी प्रस्तावना करून बोलावं लागतं.' - हो ना, आणि मग लोकांना वेगवेगळ्या आयडींना मोड आणून ते ऑन ऑफ करावे लागतात.
    • Log in or register to post comments
    Profile picture for user मराठी कथालेखक

    Submitted by मराठी कथालेखक on Fri, 02/12/2016 - 14:05

    In reply to मजा आली. by राजेश घासकडवी

    Permalink

    पुरतेच वस्त्रहरण की हो..

    पुरतेच वस्त्रहरण की हो..
    • Log in or register to post comments

    Submitted by कविता१९७८ on गुरुवार, 02/11/2016 - 07:59

    Permalink

    मस्त

    मस्त
    • Log in or register to post comments

    Submitted by नीलमोहर on गुरुवार, 02/11/2016 - 10:41

    Permalink

    उपसंहार

    प्रथम मूळ कल्पनेबद्दल सरांचे आभार ! सर्व प्रतिसादकांना धन्यवाद आणि हा उपसंहार : __________________ एकदा माझ्या डू-आयडीला पण धागा टाकायला बोलावणारे...एकदम सत्काराला तो काही येणार नाही. म्हणजे त्याला कळेल की संस्थळ तालेवार आहे आणि कोणाही सोम्या गोम्याला लिहीण्याची सोय दिली आहे म्हणून, ऊठला की टाकली जिलबी, असे सदस्यत्व टिकत नाही. आणि एकदा आयडी उडला की (सहजासहजी) पुन्हा माघारी येता येत नाही. त्याला सत्कार करतांना सांगणारे, मोक्षवाद्या, मोक्षप्राप्ती म्हणजे आयडी उडणे नाही. असल्या विचारानं अदृश्य आणि हेवनवासी होशिल. संगतीनं मिपावर केलेली मौज हाच खरा मोक्ष. आणि तुझा नसला तरी माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. या आयडी काळात केलेलं फेडायला, तुला पुन्हा यावं लागेल. पण येशील तेंव्हा या सुंदर संस्थळावर, माझा डू-आयडी बनून ये. म्हणजे तुला लिमिटमधे राहून किती मजा करता येते ते पहिल्यापासूनच कळेल. आयडीनं डू-आयडी कसा टिकवावा आणि असा आयडी असला की डू-आयडी कशी साथ देतो हे तू बघशिल. मग कधी मिपावर आलास तर म्हणशिल : `डिबी, जिलबीचं प्रमाण किती असावं?.... तोंडास नियंत्रण दिलं की लास न होता दिलखुलास जगता येतं. आणि एकदम स्वर्गात न जाता, आभासी जगतात राहून पण मुक्त विहरता येतं.'
    • Log in or register to post comments

    Submitted by अन्नू on गुरुवार, 02/11/2016 - 10:51

    In reply to उपसंहार by नीलमोहर

    Permalink

    अ?

    हे कुठतरी बघितल्यागत वाटतंय.. Image removed.
    • Log in or register to post comments

    Submitted by स्रुजा on गुरुवार, 02/11/2016 - 21:19

    In reply to उपसंहार by नीलमोहर

    Permalink

    कहर.. ___/\___

    कहर.. ___/\___ आत्ता पाहिला उपसंहार ;)
    • Log in or register to post comments

    Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 02/11/2016 - 21:24

    In reply to उपसंहार by नीलमोहर

    Permalink

    रिव्हर्स स्वीप

    रिव्हर्स स्वीप करून मारलेला षटकार जणू :-) .
    • Log in or register to post comments

    Submitted by नंदन on गुरुवार, 02/11/2016 - 13:50

    Permalink

    फर्मास!

    झकास जमलंय! आयडी-डुआयडीचे नाते म्हणजे 'जुदा हो के भी तू मुझ में कहीं बाकी है' सारखेच. हो की नै, गवि? ;)
    • Log in or register to post comments

    Submitted by नीलमोहर on Fri, 02/12/2016 - 11:38

    In reply to फर्मास! by नंदन

    Permalink

    :)

    प्रेरणा आपलीच __/\__ ती लिंक चालत नाही, काय आहे ते ? कॉलिंग गवि सर..
    • Log in or register to post comments

    Submitted by गवि on Fri, 02/12/2016 - 11:57

    In reply to :) by नीलमोहर

    Permalink

    बीबीशीआयला जायपीचा डबा जोडलाय

    बीबीशीआयला जायपीचा डबा जोडलाय नंदनशेटनी.. ;-)
    • Log in or register to post comments

    Submitted by नीलमोहर on Fri, 02/12/2016 - 12:11

    In reply to बीबीशीआयला जायपीचा डबा जोडलाय by गवि

    Permalink

    ??

    'बीबीशीआयला जायपीचा डबा जोडलाय' - हे काय असतं?
    • Log in or register to post comments
    Profile picture for user अभ्या..

    Submitted by अभ्या.. on Fri, 02/12/2016 - 13:45

    In reply to ?? by नीलमोहर

    Permalink

    ते असंच एका विडंबन सम्राटाने

    ते असंच एका विडंबन सम्राटाने लिहिलेलं वाक्य असतं. विडंबनासाठी चांगले वाचन असणे गरजेचं असतं हे दुसर्‍या एका विडंबन सम्राटाचे वाक्य असतं. त्या ब्रिटीश काळातल्या दोन वेगवेगळ्या रेल्व्या असतं. त्याचा संदर्भ ईंटरकास्ट म्यारेजला दिलेलं असतं. हितं त्याचा उल्लेख दोन वेगवेगळ्या गोष्टी जोडण्याला असतं.
    • Log in or register to post comments

    Submitted by गवि on Fri, 02/12/2016 - 14:37

    In reply to ?? by नीलमोहर

    Permalink

    नंदनशेटनी दिलेल्या लिंकेत

    नंदनशेटनी दिलेल्या लिंकेत मिपा आणि ऐसीच्या लिंकाची जोडणी झालीय हो.
    • Log in or register to post comments

    Submitted by राजेश घासकडवी on Fri, 02/12/2016 - 18:07

    In reply to :) by नीलमोहर

    Permalink

    ती लिंक इथे जाते.

    ती लिंक इथे जाते.
    • Log in or register to post comments

    Submitted by मूकवाचक on गुरुवार, 02/11/2016 - 19:15

    Permalink

    =))

    =))
    • Log in or register to post comments

    Submitted by सस्नेह on गुरुवार, 02/11/2016 - 20:15

    Permalink

    भारी ;

    जमून आलेलं विडंबन !
    • Log in or register to post comments

    Submitted by भिंगरी on Fri, 02/12/2016 - 17:43

    Permalink

    +१

    +१
    • Log in or register to post comments

    Submitted by मम्बाजी सर्वज्ञ on Fri, 02/12/2016 - 20:23

    Permalink

    तसा मी मिपा वर नवीन असल्याने

    तसा मी मिपा वर नवीन असल्याने आय-डी, डू आय-डी चा खेळ फार माहिती नाही. नवीन लोकांना 'नॉलेज बेस' होण्यासाठी 'आय-डी' 'डू आय-डी' चा जोड्या-लावा सारखा खेळ ठेवा कि. इंडक्शन च्या पेज वर टाकून द्या.....
    • Log in or register to post comments

    Submitted by नीलमोहर on Mon, 02/15/2016 - 15:39

    In reply to तसा मी मिपा वर नवीन असल्याने by मम्बाजी सर्वज्ञ

    Permalink

    सर्वज्ञ होकर भी आप डू-आयडी नहीं जानते ??

    || श्री मिसळ पाव || | डूआयडीलक्षणनाम समास द्वितीय | मागा सांगितली लक्षणे | मिपाकरांअंगी बाणे | आता ऐका सोंग घेणे | असोनी येक आयडी |१ | तयां नाव डुआयडी |नामे असती बहु फाकडी | खवतुनी लाडीगोडी | करिती सदा |२| घेई सोंगे कलह लावण्या | जुने स्कोर सेटल करण्या | अथवा उगा मजा बघण्या | आयड्यांची |३| बोली स्त्रीआयडींशी मधुर | मयतरी करण्या अति आतुर | प्रतिसादी जो बहु चतुर | तो येक डुआयडी |४| वाचाळ चोंबडा चौकस |कुटीळ अंतस्थ मानस | कुवत नसता भंकस | करी तो येक डुआयडी |५| "नवीन लोकांना 'नॉलेज बेस' होण्यासाठी 'आय-डी' 'डू आय-डी' चा जोड्या-लावा सारखा खेळ ठेवा कि." - भारी कल्पना काढलीय, तुम्ही काढून बघा धागा यावर, हिट जाईल :)
    • Log in or register to post comments

    प्रवेश करा

    • नवीन खाते बनवा
    • Reset your password

    © 2026 Misalpav.com