किती भाग्यवान आम्ही!

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
11 Sep 2015 - 12:15 am

किती भाग्यवान आम्ही,
आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले!
किती गंडलो आम्ही!
मायभूमीच्या आठवांचे गाणे आम्ही,
'चिट्ठी आयी है वतनसे' मध्ये ऐकले!

उमाळे, उसासे विमानतळावरच विरतात बहुतेक!
नव्या जगातल्या शांतसमृद्ध किनार्याचा मोह नसतोच,
छातीठोकपणे सांगावेच कुणी!

आठवणी तर येणारच...... अथपासून इतिपर्यंत सगळ्या...
नव्या मातीवर मृगजळामागे धावले नाहीत,
असे पाय दाखवावेतच कुणी!

प्रेमामायेचे पाश कुणाला चुकलेत?
'सुटलो एकदाचा जंजाळातून' म्हणत
अनोळख्या टापटिपीत स्वच्छंद शीळ घातलीच नाही
असा त्रिशंकू भेटावाच कधी!

किती भाग्यवान आम्ही,
आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले!

अनर्थशास्त्रकविता माझीफ्री स्टाइलभावकवितामुक्त कवितासांत्वनावावरसंस्कृतीकवितामुक्तकसमाजजीवनमानराहणीप्रवासभूगोलदेशांतर

प्रतिक्रिया

स्रुजा's picture

11 Sep 2015 - 12:20 am | स्रुजा

ह्म्म.. आवडली.

एस's picture

11 Sep 2015 - 12:21 am | एस

हम्म्म्! खरेय.

नाखु's picture

11 Sep 2015 - 2:47 pm | नाखु

दुसरी (की दुखरी) बाजू वाचायला आवडेल.

कुणी आहे का हे आव्हान स्वीकारणारा !!!!!

साशंक नाखु

शिव कन्या's picture

11 Sep 2015 - 3:02 pm | शिव कन्या

यातल्या उपहासातच दुखणे आहे.
अर्थात कुठल्याही बाजूने लिवणार्याचे वाचायला आवडेलच. स्वागत .

चलत मुसाफिर's picture

11 Sep 2015 - 4:17 pm | चलत मुसाफिर

देशाची ओढ वाटत असेल तर त्यात काहीच गैर नाही. परत या.

इथे काही नंदनवन आहे अशातला भाग नाही. पण निदान आपल्या स्वतःच्या घरात असल्याचं हक्काचं सुख!

मांत्रिक's picture

11 Sep 2015 - 8:53 pm | मांत्रिक

आवडली कविता! पोटासाठी माणूस दूर जातो. स्वतःच्या देशात चांगल्या संधी नाहीत म्हणून किंवा अन्य कारणाने. पण गावची ओढ कायमच राहते. सुंदर!

द-बाहुबली's picture

11 Sep 2015 - 9:24 pm | द-बाहुबली

छान लिहले आहे.

शिव कन्या's picture

23 Sep 2015 - 8:48 pm | शिव कन्या

समजून घेऊन वाचल्या बद्दल सर्वांचे आभार.