अवधूत (भाग-१)

मांत्रिक's picture
मांत्रिक in जनातलं, मनातलं
23 Aug 2015 - 1:47 pm

शारद पौर्णिमेची रात्र होती. चंद्राच्या दुधाळ प्रकाशाने सारं जग भरून गेलेलं होतं. त्या प्रकाशात तारका मात्र फार क्षीण दिसत होत्या. नेहमीच्या सरावाने त्याची पावले त्या दुधाळ प्रकाशात गडवाटेवर पडत होती. जवळपास ११ वर्षांपासूनचा परिचित रस्ता. कधीही मनात लहर येईल तेव्हा जायचं जगदंबेच्या भेटीला गड चढून.

हवेत मंदसा प्रसन्न गारवा. वर्षाकाळात तरारून उगवलेल्या गवताचा आणि रानफुलांचा मादक सुगंध मात्र सगळीकडे दरवळत होता. कधी कुठे तरी एखाद्या चुकार रात्रिंचराची फडफड नाहीतर बाकी सर्व शांत शांत. मागे वळून पाहिलं तर खाली गावात घरोघरी लागलेल्या दिव्यांची नाजुकशी रांगोळी. पुढे वर पाहिलं तर आईच्या देवळातून बाहेर झिरपत येणारा समयांचा दिसणारा न दिसणारा असा मंदसा प्रकाश.

एरवी भयानक आकार धारण करणारी झाडेझुडुपे आज मात्र बरीचशी निरुपद्रवी वाटत होती. पलिता घ्यायची गरज नव्हती म्हणून त्याने उजव्या हातात पानांचा द्रोण धरून त्यात रानफुलं भरून आणलेली होती, त्याच्या आईच्या चरणांवर अर्पण करायला. डाव्या हातात स्वसंरक्षणासाठी म्हणा किंवा अवघड गडवाटेवर आधारासाठी म्हणा, एक लांब आणि जाडजूड काठी. कमरेला एक जुनाट मळकट भगवं वस्त्र राहिलेलं फक्त. केसांच्या कधीच जटा झालेल्या. अन्नाच्या आबाळीने शरीराची खोळ हाडाचा सापळा म्हणावी अशीच दिसणारी. पण मन मात्र एका अनोख्या शक्तीने भरुन गेलेलं. तीच शक्ती डोळ्यांतून डोकवायची, बोलण्यातून बाहेर पडायची आणि कृतीतून पण दिसून यायची.

पावलं नेहमीच्या सवयीने वाट चालत होती, पण मनात मात्र आईच्या मंत्राचा अखंड जप आणि डोक्यात असंख्य विचारांची आवर्तने. ११ वर्षांपूर्वीच त्यानं माणसांचं जग सोडून दिलं होतं. आता त्याच्या मनात कशालाच, कुणालाच काही स्थान उरलेलं नव्हतं. तसा पण तो लहानपणापासून बराचसा वेगळा. कुणाच्यात फारसं न मिसळणे, सतत कशाचा तरी विचार करणे, शून्यात नजर लावून बसणे यामुळे तो लवकरच इतर मुलांच्या चेष्टेचा विषय बनला. घरात देखील परिस्थिती फारशी बरी नव्हतीच.

त्याच्या एकलकोंड्या प्रवृत्तीला कंटाळून घरच्यांनी त्याची कुंडली इकडे तिकडे दाखवायला सुरुवात केली. बरेच जणांनी काहीतरी नेहेमीसारखी गुळमुळीत उत्तरं दिली. एक साधू मात्र फार वेगळा निघाला. त्या कुंडलीकडे आणि मग त्या मुलाच्या डोळ्यांत पहात तो उत्तरला, “हा पूर्वजन्मीचा योगभ्रष्ट आहे. मागच्या जन्मीचा शोध पूर्ण करायलाच तुमच्या पोटाला आलाय. तुमचं याचं नातं फार थोडे दिवस! एके दिवशी सर्व काही टाकून देऊन त्याच्या ख-या आईबापाच्या शोधात निघून जाणार. याची काळजी करू नका. ती जगदंबाच करेल!”

हे ऐकून आईवडिलांना फारसा फरक पडला नाही. त्याच्या पूर्वीच जन्मलेली ६ भावंडं. ह्या एकट्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ आहे? थोरला तर चांगल्यापैकी शेतीवाडी आणि गाईगुरांचं बघू लागलेला होता. दोन बहिणी देखील लग्नाच्या वयात आलेल्या. याला मात्र अत्यानंद झाला. माझा शोध पूर्ण होणार तर! मला आई भेटणार तर! काळ झपाट्याने बदलत गेला. वडील आता घरीच जास्त राहू लागले. थोरल्या भावंडांनी याच्याविरोधात कुरबुरी सुरु केल्या. आईबापांनी जबरदस्ती लग्नाचा घाट घातला. याला तर प्रपंच, पोरेबाळे वगैरे सांसारिक पाश पहिल्यापासूनच नको होते. एके रात्री कुणालाही कळू न देता घराबाहेर पडला तो कायमचाच!

काही दिवस सतत चालत राहिला. गावांमागून गावं. चेहे-यांमागून चेहरे. प्रश्नचिह्न, सहानुभूती, हेटाळणी आणि संशय यांनी भरलेले. दिलं कुणी अन्न तर खायचं नाहीतर आईवर विश्वास ठेवून पुढच्या गावाला चालू लागायचं. हळूहळू अंगावरील तारूण्याची रया पार निघून गेली. अन्न न मिळाल्याने शरीर कृश झालं. पोटाला देखील उपाशी राहण्याचीच सवय झाली. असाच चालत चालत एके दिवशी सप्तशृंगास पोहोचला. पायथ्याच्या वणी गावात रात्रीचा मुक्काम करून सकाळी गड चढून देवीच्या दर्शनास उपस्थित झाला.

तेव्हांपासून ११ वर्षं तिथेच राहतोय तो. त्या अद्भुत ठिकाणाच्या ओढीने त्याला पुन्हा कुठे जाऊच दिलं नाही. सप्तशृंगाच्या पुढे मार्कंडेयाचा डोंगर आहे. तिथेच याचा जास्तीत जास्त वेळ उपासनेत जायचा. दोनेक दिवसांनी भूक लागायची. मग आजूबाजूच्या पंचक्रोशीत फिरलं तर थोडीफार भिक्षा आयाबाया वाढायच्या. काहीच नाही मिळालं तरी मंदिरातील पुजारी केळी, खोबरं-खडीसाखर देत असे. कधी आईच्या दर्शनाची लहर आली की सप्तशृंगावर जायचं. एरव्ही अखंड नामस्मरण फक्त!

(क्रमशः)

हे ठिकाण

प्रतिक्रिया

जेपी's picture

23 Aug 2015 - 1:53 pm | जेपी

वाचतोय.

पुभाप्र.

यशोधरा's picture

23 Aug 2015 - 2:02 pm | यशोधरा

वाचते आहे. सुरुवात आवडली.

पु भा प्र

पद्मावति's picture

23 Aug 2015 - 3:28 pm | पद्मावति

छान सुरूवात.
पु. भा. प्र.

पैसा's picture

23 Aug 2015 - 4:26 pm | पैसा

लिहा लवकर पुढचा भाग!

एक एकटा एकटाच's picture

23 Aug 2015 - 5:36 pm | एक एकटा एकटाच

मस्त सुरुवात

स्रुजा's picture

23 Aug 2015 - 5:38 pm | स्रुजा

सुरुवात आवडली. पुढचा भाग वाचण्यास उत्सुक

सुरेख सुरुवात. शैली आवडली.

बाबा योगिराज's picture

23 Aug 2015 - 6:49 pm | बाबा योगिराज

छान जमलय. पुढिल भाग लवकर येउ द्या........

द-बाहुबली's picture

23 Aug 2015 - 7:10 pm | द-बाहुबली

वॉटीज धिस ?

मांत्रिक's picture

24 Aug 2015 - 9:47 pm | मांत्रिक

माफ करा! पण आपल्याला नक्की काय खटकले ते कळले नाही? कृपया स्पष्ट कराल?

द-बाहुबली's picture

26 Aug 2015 - 12:10 pm | द-बाहुबली

आपली लेखन शैली ओघवती आहे, वाचताना कंटाळा येत नाही. परंतु मला कथाबीजच लक्षात येत नाहीये म्हणून विचारले की हे काय आहे. (मला अवधुत कोणाला म्हणतात याची जुजबी माहिती आहे).

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Sep 2015 - 11:20 pm | निनाद मुक्काम प...

प्रवाही लेखनशैली
कथाबीज पहिल्या भागात लक्षात न येणे हे देखील लिखाणाचे वैशिष्ट्ये आहे म्हणजे पुढे कथा भय गूढ रहस्य सामाजिक कोणत्याही अंगाने पुढे जाऊ शकते
आता दुसरा भाग वाचायला घेतो
आयडी च्या नावास साजेसे कथानक दिसत आहे.

मांत्रिक's picture

10 Sep 2015 - 11:22 pm | मांत्रिक

धन्यवाद! निनाद साहेब!

बोका-ए-आझम's picture

23 Aug 2015 - 8:25 pm | बोका-ए-आझम

पुभाप्र!

प्रचेतस's picture

23 Aug 2015 - 8:30 pm | प्रचेतस

मस्त सुरुवात.

तीरूपुत्र's picture

23 Aug 2015 - 10:22 pm | तीरूपुत्र

येऊद्या.....वाचतोय...

दोन दिवस बारा तासांच्या मानाने फारच भारी लिहिलंय. आधी होता काय आपण इथे?

प्यारे१'s picture

23 Aug 2015 - 10:31 pm | प्यारे१

प्रतिभा देखो श्रीमान.... हमारे लिए इतने सालोंके बावजूद इस श्रेणी का लेखन असंभव है|
आम्र फलोंका ग्रहण करे, शाखाओं और पर्णों के गणन से क्या लाभ? ;)

मांत्रिक's picture

23 Aug 2015 - 10:44 pm | मांत्रिक

धन्यवेद प्यारेजी!!! काय बोलू यावर!!! आपण तर बोलतीच बंद केलीत नेहमीप्रमाणे!!!;););)

प्यारे१'s picture

23 Aug 2015 - 10:55 pm | प्यारे१

नेहमीप्रमाणे?
डू आयडी, सापडलास की नाही????
माहेर कुठचं तुझं बाळ ;)

मांत्रिक's picture

24 Aug 2015 - 12:57 pm | मांत्रिक

आपलं गाव एकच राजे एम एच-११ ;)

अस्वस्थामा's picture

26 Aug 2015 - 6:27 pm | अस्वस्थामा

प्यारे, अजून एक एम एच-११ .. ( देव मिपाच भलं करो..) ;)

(बादवे, तुला बरं प्यारेंच गाव माहीत.. आँ?)

तुडतुडी's picture

24 Aug 2015 - 1:29 pm | तुडतुडी

मस्त . पुढचा भाग येवूद्या लवकर.

मस्त, येऊद्या लौकर पुढचा भाग.

नाखु's picture

28 Aug 2015 - 12:03 pm | नाखु

या निमीत्ताने शिवरायकालीन इतीहास लेखमाला गुंफावी अशी बॅटोबांना आग्रही विनंती.

याचकांची पत्रेवाला नाखुस

शीतल जोशी's picture

24 Aug 2015 - 2:02 pm | शीतल जोशी

छान सुरवात

मांत्रिक's picture

25 Aug 2015 - 8:49 am | मांत्रिक

सर्व प्रतिसादकर्ते व वाचक यांचे मनःपूर्वक आभार!

स्पंदना's picture

25 Aug 2015 - 9:53 am | स्पंदना

सप्तशॄंगी!!
कसली भव्य देवी आहे ती!! __/\__!!
लेखन सुंदर!!
लेखाचं नाव सुद्धा आवडलं. अवधुत!! मस्तच!

मांत्रिक's picture

26 Aug 2015 - 7:16 am | मांत्रिक

धन्यवाद! अवधूत हा नाथपंथी शब्द. आत्मशोधार्थ मोहमाया त्याग करून सतत भ्रमणशील राहणार्या उपासकांसाठी हे नाव वापरले जाते. याचा एक अर्थ दत्तात्रेय देखील आहे.
काही दिवसांपूर्वीच सप्तशृंगीला जाऊन आलो. तेव्हाच या कथेने मनात आकार घेतला. जमल्यास सप्तशृंगी येथील फोटो व व्हिडिओ देखील टाकायचा प्रयत्न करेन.

प्रीत-मोहर's picture

26 Aug 2015 - 8:27 am | प्रीत-मोहर

सुरेख सुरवात. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Aug 2015 - 6:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर सुरुवात ! पुभाप्र.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Aug 2015 - 7:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

छान लिहिलय. पु.भा.प्र.

रातराणी's picture

29 Aug 2015 - 3:06 am | रातराणी

खूप मस्त!

नीलमोहर's picture

29 Aug 2015 - 10:39 am | नीलमोहर

लिखाणामधील अध्यात्मिक भाग खूप छान मांडता आपण,

सप्तशृंगी माता कुलदैवत असल्यामुळे बरयाच वेळा जाणं होतं, दरवेळेस गेलं की एक वेगळंच समाधान मिळतं,
असाच अनुभव सज्जनगडावरही येतो.
हल्ली बरीच धार्मिक ठिकाणं देवालय कमी आणि बाजार जास्त अशी स्थिती असते त्यामूळे तिथे गेल्यावर समाधान मिळत नाहीच,चिडचिड जास्त होते.

मांत्रिक's picture

31 Aug 2015 - 12:59 pm | मांत्रिक

धन्यवाद, बरेच ठिकाणी झालंय असं ख्ररं. म्हणून फारसं देवालयांच्या वाटेला जात नाही. कधी गेलोच तर नुसतं दर्शन घेणे. उगाच ते अभिषेकांच्या रांगेत उभे राहणे आवडत नाही.
देवालय कमी आणि बाजार जास्त अशी स्थिती असते त्यामूळे तिथे गेल्यावर समाधान मिळत नाहीच,चिडचिड जास्त होते. अगदी सत्य आहे. म्हणून घरीच काय ते भजन पूजन बरे वाटते. पण अजूनही अशी काही देवस्थानं आहेत, जिथं अद्याप माणसांची वर्दळ व वाढलेली नाही. अशा ठिकाणी मात्र जायला आवडते.

कविता१९७८'s picture

31 Aug 2015 - 1:07 pm | कविता१९७८

छान सुरुवात, आवडता विषय.

दिनु गवळी's picture

23 Sep 2015 - 7:50 am | दिनु गवळी

मी त्या मार्कंडयाच्या डोंगरावर चढुन आलोय हो आठवड्याला जातो राव मी

रेवती's picture

24 Nov 2015 - 2:46 am | रेवती

मालिकेची सुरुवात अगदी चित्रदर्शी झालीये.