लेख दुसरा...
हा एक प्रयोग आहे... माहित नाही किती जणांना कनेक्ट होऊ शकेन...
प्रतिक्रियांची वाट पाहत आहे...
........भाषेरी कुंपण.........
आता मी हळू हळू लिहायला घेतोय. माझ्या नेहमीच्या टेबलवर -नाही- खुर्चीवर बसून. -बसलोय.
पेन वही समोर ठेऊन. -ठेवलीय. आता हळू हळू हे आर्टीकल लिहिता लिहिता मी स्वत:च्या सबकॉन्शियस मधे अलगद$$ प्रवेश करेन. -केलाय.
मी आज भाषेशी खुप भारदस्त प्रयोग करणार आहे. -करतोय.
माझ्या -'इथल्या!' सबकॉन्शियस मधे वडलांना आणणार आहे. -आनलंयही.
अन
वडलांच्या 'गावच्या' सबकॉन्शियस मधे मी जाणार आहे. -गेलोयही.
(मला भाषा हवी तशी वळवता येईल काय?? 'हा' तो प्रयोग.
मी यशस्वी होईल?? तुम्हाला काय वाटतं??
--वाटलं?? --ते महत्वाचं नाही.)
वडील आता घरी आले असतील. हळूच खांद्याची पिशवी काढून हैंगरला अडकवुन ठेवतील. ठेवलीय. ठेवताना विचार करतील की भैया (-म्हणजे मी) आता ऑफिस वरुन आलो असेन. हातपाय धुत असेन.
मी इथं घरी हातपाय धुता धुता वडलांना आठवतोय. आज दुपारी आईला फ़ोन केला होता. -सहजच. ती परवा दुपारच्या फ़ोनवर म्हटलेली की काल घरासमोरच्या बागेत नवीन फूलझाडं लावणार आहे.
वडील आता किचन मधे पाणी पित पित आईला विचारतील, भैयाचा फ़ोन आलता का गं दुपारी??.
ते विचार करतील की हा या आठवड्यात येतो म्हनलाय. पण याचं काही खरं नसतं हेही खरंय.
हे आठवून मी स्वत:ला सांगतोय की आपण खरंतर कॅन्सल केलंय या आठवड्यात घरी जायचं. आईही त्यांना हेच सांगतेय. ते ऐकतायत.
मी आता माझ्या मनाशी बोलतोय की
बाकीचे घरातले सगळे जेवायला बसले असताना, वडील मात्र नेहमीसारखं नेमकं चोळून मोळून हात पाय धुण्यात मग्न असतील. पण त्यांच्या डोक्यात चक्र मात्र फिरतच असेन ('विचारांचं' हे तुम्हाला एक्सप्लीसिटली सांगावं लागेल का?) की हा तिथं पुण्यात घरात एकटाच राहतो? ह्याला रोज करमत तरी असेल का?? असेल तर कसं?
मला आता इथं एकटं करमत नाही. हल्ली बोर होतं. हे खरंय.
बरं झालं ह्यांना हे न सांगता समजलं.
(उद्याच्या फोनवरचा तेवढाच समजवा-समजवीचा वेळ वाचला.)
उशीर झालाय. -तिकडे अन इकडेही. त्यांच्या मनात एरव्हीही आलंच असेल की ह्याचं आता सगळं आवरलं असेन अन झोपायच्या तयारीत असेन. आता हळू हळू हा पुस्तक हातात घेऊन ते वाचता वाचता कॉन्शियस मधे येईल अन मला विसरुन सावकाश झोपी जाईल.
इकडं झोपताना मला वाटतं की वडीलही आता जेवत -बातम्या ऐकत त्या बातम्यातल्या घटनांसोबत त्यांच्या शांत सबकॉन्शियस मधून बाहेर पडून कॉन्शियस जगात येतील अन शेवटी मला विसरून, हात धुवून झोपायला जातील.....................
वाचने
2401
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी अनकॉन्शियस झालो!
मला आता इथं एकटं करमत नाही. हल्ली बोर होतं. हे खरंय....
अॅबस्ट्रॅक्ट
मी आता कोणाच्या सबकाँशस मध्ये
लग्न करा....
In reply to मी आता कोणाच्या सबकाँशस मध्ये by सूड
प्रश्न नीट वाचा बरं? नाही
In reply to लग्न करा.... by मुक्त विहारि
स्वतःचे म्हणणे बाबांवर ढकलून
In reply to लग्न करा.... by मुक्त विहारि
बाबांच्या स्वानुभवाचे बोल आहेत.....
In reply to स्वतःचे म्हणणे बाबांवर ढकलून by डॉ सुहास म्हात्रे
;)
In reply to लग्न करा.... by मुक्त विहारि
वेगळा प्रयोग....
हीच कथा लेखक जगात नसताना त्याची आठवण काढणारे घरचे
अंदरुनी सच
आवरा . मी पा वर पूर्वी