ट्रॅप आणि विषकन्या बद्दल आरोप

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
10 Mar 2015 - 4:32 am

ट्रॅप या कादंबरीवर झालेल्या आरोपांवरुन बुकगंगा वरुन विषकन्या ही कादंबरी विकत घेऊन मी वाचून काढली. ही कादंबरी ई-बुक स्वरुपात उपलब्ध आहे जी आयपॅड किंवा इतर कोणत्याही टॅबमध्ये डाऊनलोड केली जाऊ शकते. वाचताना मला स्वतःला मूळ संकल्पना आणि काही गोष्टींतील साधर्म्य जाणवलं, परंतु सगळी कादंबरीच चोरली आहे असा आरोप करणार्‍यांपैकी किती जणांनी विषकन्या वाचली आहे याबद्दल मला शंका येऊ लागली आहे.

सुमारे तीन महिन्यांपूर्वी अमेरीकेच्या फुल्टन या पाणबुडीसंदर्भात एक लेख वाचनात आला. ही पाणबुडी अमेरीकन सरकारच्या अधिकार्‍यांना पत्ता लागू न देता रशियात स्मगल करण्यात आली या संदर्भात तो लेख होता. या लेखाचा आधार पकडून रशियन सरकारकडून भारताला मिळणारी अण्विक पाणबुडी कशा तर्‍हेने भारतात आणता येऊ शकते ही कल्पना डोक्यात आल्यावर या कादंबरीची मूळ संकल्पना तयार झाली. उरलेली कथा या मूळ संकल्पनेच्या भोवताली रचलेली आहे.

ज्यांनी विषकन्या वाचली आहे आणि वाचलेली नाही त्यांच्यासाठी -

विषकन्या कादंबरीत भारताकडे येणारी पाणबुडी ही बेरींगच्या सामुद्रधुनीतून आणि चीनच्या दक्षिणेकडून मुंबईत पोहोचते असा उल्लेख केलेला आहे. या मार्गाने पाणबुडी आणण्यात असलेला धोका ट्रॅपमध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे.

सुएझ कालव्यातून ज्या पद्धतीने वाहतूक केली जाते ती कॉन्व्हॉय पद्धत याचा विषकन्या मध्ये उल्लेख कोणाला आढळला का? हे डीटेलींग मी इंटरनेटवरील माहिती वाचून केलं आहे.

पाणबुडीच्या प्रवासाचं डीटेलींग करताना दोन बंदरांमधील अंतर आणि त्यासाठी लागणारा वेळ याचा अंदाज करण्यासाठी मी ही साईट वापरली -

http://ports.com/sea-route/

या साईटवर आपल्या दोन्ही बंदरांचे डीटेल्स आणि पाणबुडीचा वेग ही माहिती दिल्यावर प्रवासास लागणारा वेळ दिसू शकतो. दोन्ही पाणबुड्यांच्या प्रवासाचा अंदाज घेण्यासाठी आणि डीटेलिंग करण्यासाठी मी हे तंत्रं वापरलं होतं आणि त्यावरून लागलेल्या वेळेचा अंदाज बांधला होता. विषकन्या मध्ये हे कोणाला आढळलं का?

हे डीटेल्स कॉपी केले होते हा आरोप कशाच्या आधारावर केला आहे?

पाणबुडीच्या मार्गाच वर्णन करताना केप ऑफ गुड होपच्या परिसरातील वादळाचा कोणता संदर्भ विषकन्या मध्ये आढळतो? मुळात विषकन्यामध्ये केप ऑफ गुड होपशी काही संबंध आला आहे का?

याच पाणबुडीच्या संदर्भात उल्लेख आलेल्या वेगवेगळ्या मिसाईल्सच्या प्रकारांचा आणि अ‍ॅटॉमिक न्यूक्लीयर मिसाईलचा साधा उल्लेखतरी विषकन्यामध्ये आला आहे का? या संदर्भात इतर कोणती कादंबरी चाफा किंवा आणखीन कोणी वाचली आहे का?

विषकन्या हे कथानाक वाचल्यास ते भारतात राजीव गांधी आणि पाकिस्तानमध्ये बेनझीर भुट्टो पंतप्रधान असतानाच्या काळातलं आहे हे समजून येऊ शकतं. त्या काळात उल्लेख केलेली रशियन पाणबुडी १९९० मध्येच रशियन नौदलातून निवृत्त करण्यात आली.

ज्या अत्याधुनिक पाणबुडीचा ट्रॅपमध्ये उल्लेख आहे, ती आजही रशियन नौदलात कार्यरत असलेली अणुपाणबुडी आहे हे कोणाला माहीत आहे काय?

मूळ संकल्पना आणि काही तपशील समान आले म्हणून संपूर्ण कादंबरी चोरली आहे असा आरोप करताना या सर्व संदर्भांचा कोणी साधा विचार तरी केला होता का?

आतापर्यंतच्या माझा इतर लेखनात प्रत्येक वेळी मी वापरलेल्या संदर्भ ग्रंथांचा मूळ लेखकाच्या नावासकट मी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. केनेथ अँडरसनच्या ज्या शिकारकथांचा मी अनुवाद केला आहे त्याच्या प्रताधिकारावरुन मी प्रशासनाला स्पष्टीकरणही दिलेलं होतं आणि ते मान्यं करुन प्रशासनाने या कथा पुन्हा प्रकाशित केल्या आहेत.

या सगळ्या प्रकारात मला स्वत:ला आता विच हंटींगचा आणि स्कोर सेटलींगचा वास येऊ लागला आहे.

या सगळ्यानंतर मिसळपावच काय, पण इतर कोणत्याही मराठी संस्थळावर काहीही लेखन करण्याची माझी इच्छा नाही, कारण ते पूर्वग्रहदूषीत नजरेनेच पाहिलं जाईल याची मला खात्री आहे.

तस्मात,
अखेरचा नमस्कार!

साहित्यिकप्रकटन

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

10 Mar 2015 - 5:01 am | संदीप डांगे

स्पार्टाकस,

विषकन्या मधले पहिले तीन पान मजकूर शब्द आणि शब्द जसाच्या तसा आहे. गुड मॉर्नींग मॅडम मधला क्लायमॅक्सचा स्वीट मधला सीन जसाच्या तसा आहे. हे एवढे संदर्भ स्पष्ट दिसत असतांना तुम्ही वाचकांची माफी न मागता चक्क विच हंटींगचा आणि स्कोर सेटलींगचा आरोप करता म्हणजे बरीच हिंमत दिसते हो तुमच्यात.

तुम्ही एक हौशी लेखक आहात. व्यावसायिक पातळीवर डेडलायिनमधे काम करतांना कुठुनतरी उचलून त्यात आपलं थोडंसं घालून क्लायंटला चुना लावणारे बरेच कलावंत असतात. तुमच्यावर अशी काही बळजबरी होती काय?

मी स्वतः एक व्यवसायिक कलाकार आहे, विशिष्ट परिस्थितीत कुठूनतरी संदर्भ घेऊन चिकटवायची फार उर्मी दाटून येते. पण असे हुबेहुब चौर्यकर्म आपल्याच्याने बापजन्मात होणार नाही. दुसरा कुणी केलं तर सहनही होणार नाही.

तुमच्यावर प्रेम करणार्‍या वाचकांना तुम्ही राजरोस फसवले आहे. त्यांनीच तुमचे वाचन आता न वाचण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही लेखन बंद करण्याचा शहाजोगपणा दाखवायची काही एक गरज नाही.

तुमचे लेखन चोरीचं होतं हे सुर्यप्रकाशाइतकी स्वच्छ बाब आहे. त्याबद्दल तुमच्यावर कायदेशीर कार्यवाही झाली तर तुमचे हे निवेदन कुठेही टिकणार नाही हे नमूद करू इच्छितो. धन्यवाद!

विनोद१८'s picture

10 Mar 2015 - 11:16 pm | विनोद१८

तुमच्यावर प्रेम करणार्‍या वाचकांना तुम्ही राजरोस फसवले आहे. त्यांनीच तुमचे वाचन आता न वाचण्याचा निर्णय घेतला आहे.

How many 'MIPAKARS' approach and informed you only particularly and complaints that they are being cheated by SPARTACUS by borrowing some portions from some other fiction ??? Even if it has been done as you said, we don't mind for it. We always enjoyed all his previous articles here on MIPA and will love in future also.

Pl stop this so called ADVOCACY on behalf of all MIPAKARS, its needless for us.

@...SPARTACUS Pl ignore all this kind of people and keep on continued om MIPA.

संदीप डांगे's picture

10 Mar 2015 - 11:25 pm | संदीप डांगे

so How many 'MIPAKARS' approach and informed you, Mr. Agent Vinod, only particularly and complaints that they don't mind for it.

Don't try to be Devil's advocate. If you do so, you will have to go long way to defend your stand. and I guess that will be pretty dirty business.

clear your own doubts before running behind someone. Its the anguish of getting cheated. If you can not see how many readers are expressing their feelings then I must say you are blind by choice.

come on, give me break.... Please.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Mar 2015 - 8:15 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

True that. It's annoying to see people defending a guilty person. I am not saying he should be punished. But at least he should accept the mistake, give promise that it will not occur here onwards and write something genuine. I and others who are currently accusing Mr.Spartacus will be more than happy to read something genuine written by him. MIPAkars are not going to hang him to death. May be for couple of months every work he types will be criticized a lot, but may be that is his redemption.

Mr. Spartacus if you are reading this.

We are looking forward for a positive stand from your side. You must not quit genuine writing. Not many people can write this nicely. thank you. Have a nice day ahead.

विशाल कुलकर्णी's picture

11 Mar 2015 - 9:19 am | विशाल कुलकर्णी

I am not saying he should be punished. But at least he should accept the mistake, give promise that it will not occur here onwards and write something genuine. I and others who are currently accusing Mr.Spartacus will be more than happy to read something genuine written by him.

सहमत आहे. जे झाले ते चुकीचेच आहे. पण चुका माणसाकडूनच होतात. जर चुक कबुल करुन पुढे जायची तयारी असेल तर स्वागतच आहे. पण मिपावर चोरीदेखील खपवून घेतली जाते असा समज असेल तर ते मान्य नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Mar 2015 - 9:47 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

पण मिपावर चोरीदेखील खपवून घेतली जाते असा समज असेल तर ते मान्य नाही.

७०००००००० टक्के सहमत,

स्रुजा's picture

10 Mar 2015 - 5:12 am | स्रुजा

खुलासा आवडला. मी विषकन्या वाचलेली नाही आणि सकाळ पासून आलेल्या प्रतिसादांवर विश्वास ठेवायची ईच्छा होत नव्हती. तुम्ही खुलासा केला ते बर झाले. लोकांना तर्क वितर्क करायला आता जागा राहणार नाही. आत्ता पर्यन्त झालेल्या गदारोळाने तुम्ही उद्विग्न होण स्वाभाविक आहे . अशा वेळी सगळ्यांनीच संयम दाखवायला हवा . शक्य झाले तर हे फार मनाला लावू नका.

प्रीत-मोहर's picture

10 Mar 2015 - 8:51 am | प्रीत-मोहर

स्पार्टा, आरोपांवर विश्वास ठेवावासा वाटत नाही. तुम्ही लिखाण बंद करु नका प्लीज.

संदीप डांगे's picture

10 Mar 2015 - 5:16 am | संदीप डांगे

याउप्परही तुम्ही चोरी केली नाहीच असं म्हणत असाल तर एवढे प्रचंड साम्य असलेल्या एकाच भाषेतल्या तीन वेगवेगळ्या लेखकांच्या कथा जगातल्या कलेच्या इतिहासातलं एकमेव महान आश्चर्य आहे. यावर जागतिक पातळीवर संशोधन आणि चर्चा झाली पाहिजे. तीनही लेखकांना याचा मनस्वी आनंद व्ह्यायला हवा. ३ वेगवेगळे लोक शब्द अन् शब्द एकसारखा लिहू शकतात हे फक्त परि़क्षाकेंदात होणारी घटना आहे.

विच हंटींग आणि स्कोर सेटलींग(हे जे काहि असेल ते :)) वाल्यानां जाउ द्या. आम्हाला तुमचे लेखन आवडते. ऊगीच कोणासाठी थांबवू नका.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Mar 2015 - 7:21 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

स्पार्टाकस,

ह्या कादंबर्‍यांशी असलेले साधर्म्य म्हणा किंवा अजुन काही म्हणा तो एक आपण सोडुन देउ. तुमचं बाकीचं लेखन चांगलं आहे. वेळोवेळी तुम्हाला तसं कळवलेलही आहे. पुढची पुर्ण स्वरचित कथा टाकुन हे डाग काढुन टाका. मिसळपाव म्हणा किंवा अन्य स्त्रोत म्हणा हे हौशी लेखक-कवी वगैरे कलाकार मंडळींसाठीचं उत्तम व्यासपीठ आहे. इथे तुम्ही परफेक्ट असायची अपेक्षा नाही तर जेन्युइन असायची आवश्यकता आहे. चुका करत टक्के टोणपे पचवतच पुढे जाण्यात मज्जा आहे. असो. लेखन सोडु नका. मी थेट ग्रंथचौर्‍याचा आरोप करणार नाही. पण एवढं साधर्म्य असुनसुद्धा तुम्ही जर का आरोपांचं खंडन करणार असाल तर काय उपयोग हे निवेदन देउन? त्यापेक्षा इथुन पुढे अश्या चुका होणार नाहीत असं पहा. आणि लिखाण सोडु नका. कसं?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Mar 2015 - 7:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इथुन पुढे अश्या चुका होणार नाहीत असं पहा....लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

नाखु's picture

10 Mar 2015 - 8:03 am | नाखु

सहमत.
लिहित रहा
पुलेशु.

प्रथम म्हात्रे's picture

10 Mar 2015 - 7:59 am | प्रथम म्हात्रे

तुम्ही लिहीत रहा हो. बोलणारे बोलणारच.
नावे ठेवणार्यांन्नी आजवर किती दर्जेदार लिहीलंय ते तेच जातात.
U just keep writing.
.पुलेशु

आनंदी गोपाळ's picture

10 Mar 2015 - 8:13 am | आनंदी गोपाळ

मूळ संकल्पना आणि काही तपशील समान आले म्हणून संपूर्ण कादंबरी चोरली आहे असा आरोप करताना या सर्व संदर्भांचा कोणी साधा विचार तरी केला होता का?
<<
शब्दन शब्द जुळणारी पानेच्या पाने कुठून आलीत याबद्दल ती शंका आहे. संपूर्ण कादंबरी चोरली नाही, काही भाग चोरायचा ठेवला. अन दुसर्‍या कादंबरीची त्यात भर घातली हे फार मोठे कलाकारीचे काम केले असे म्हणायचे आहे का?

http://www.maayboli.com/node/53007 इकडे अधिक रोचक चर्चा दिसते.

फोटोग्राफर243's picture

10 Mar 2015 - 8:14 am | फोटोग्राफर243

स्पार्टा यांचा लेख वाचून धक्का बसला, मला आधी चा वाद माहिती नाही, स्पार्टा न चे लेखन आवडते, त्यांनी लिहीत राहावे ही विनंती

तीन पाने शब्द न शब्द कसे काय तंतोतंत येतील ?आणि तुम्ही म्हणता आता बुकगंगा वरून डाऊनलोड करून वाचली कादंबरी. जाऊ दे.

पिंपातला उंदीर's picture

10 Mar 2015 - 9:11 am | पिंपातला उंदीर

भुताळी जहाज या मालिकेत पण तुम्ही ओशन ट्रेगल पुस्तकातले उतारे जशेच्या तसे नकलून काढले होते . मी एका धाग्यावर तशी शंका पण उपस्थित केली होती पण तुम्ही मी त्या पुस्तकातून फक्त संदर्भ घेतले आहेत असा केविलवाणा बचाव केला होतात . पण अनुवाद /स्वैर भांषांतर वेगळे आणि स्वतःचा लेप खऱ्या लिखाणावर चढवणे वेगळे . तुम्ही पुस्तकातली वाक्य जशीच्या तशी नकलून काढलीत . याला सभ्य भाषेत साहित्यिक चोरी म्हणतात . त्यामुळे त्यावेळेपासूनच तुमच्या लिखाणातला रस हरवला त्यामुळे तुमची कादंबरी वाचली नाही . पण लोक म्हणतायेत की तुम्ही निरंजन घाटे यांच्या पुस्तकातल्या ओळी जशाच्या तशा चोप्य पस्ते केल्या आहेत . एकाचवेळेस एकच कथा दोन लोकांना सुचू शकते हे मान्य (खर तर तुमच्या केस मध्ये हे मान्य करणे पण अवघड जात आहे )पण जशीच्या तशी वाक्य कशी येऊ शकतात ? या मुद्द्याला तुम्ही सोयीस्कर टांग मारली आहे या चमत्काराचे स्पष्टीकरण तुम्ही तुमच्या वाचकांना देणे लागता असे वाटते . कारण तुमच्या लिखाणाची आतुरतेने वाट बघणारा असा एक वर्ग आहे त्याचा तुम्ही विश्वासघात केला आहे . पण सगळ्यात मोठा घात आहे तो ओरिजनल लिखाण करणाऱ्या लेखकांचा . लोक तुम्हाला म्हणतायेत की लिखाण चालू ठेवा पण माझा अनाहूत सल्ला आहे की असे प्रकार करणार असाल तर लिखाण करू नका कारण तुमच्यामुळे यापुढे कोणीही चांगले लिखाण केले तरी ते संशयाच्या भोवऱ्यात राहणार आहे . एकूणच आंतरजालीय लिखाणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ करण्याची कामगिरी तुम्ही बजावली आहे . धन्यवाद . लोभ नसावा .

चाफा's picture

10 Mar 2015 - 10:33 am | चाफा

स्पार्टाकस,
मुळातच हा सिध्द झालेला आरोप आहे, स्कोअर सेटलींग किंवा विच हंटींग असले काही भासवण्याचा प्रयत्न करू नका,
हा प्रकार संकेतस्थळांच्या बाहेर जाऊ नये अशी मनापासून इच्छा आहे, अन्यथा तुमच्या लेखनाची लिंक बाळ भागवत आणि निरंजन घाटे यांच्यापर्यंत पोहोचवणे ही फारच सोपी गोष्ट आहे.
त्याच बरोबर मुळ कादंबरीचे स्क्रीनशॉट संकेतस्थळावर टाकणे शक्य होत नसले तरी ब्लॉगवर सहज शक्य आहे.
ओशन ट्रँगल या पुस्तकातल्या भुताळी जहाजे या भागातल्या सर्व जहाजांबद्दलचे लेखन ( जहाजांचे वर्णन नव्हे ) अलंकारासहीत नकलून काढलेले आहे. मुळ इंग्रजी संदर्भग्रंथात मराठी अलंकारीक भाषा कशी काय बुवा होती, हे समजून घ्यायला नक्की आवडेल.

कैलासवासी सोन्याबापु's picture

10 Mar 2015 - 10:51 am | कैलासवासी सोन्याबापु

आपण तर स्पष्ट बोलतो ! ओरिजिनल लेखन नसले सुचत तर रसिक जाणकार वाचक व्हावे!! ते उत्तम!! अन बरेचदा होते ही तसेच ! आपल्याला एखाद्या विषयाबाबत राइटर्स ब्लॉक येतो पण त्याच विषयावर जर कोणी धाराप्रवाही लेखन केल्यास आपल्याला कमेंट मधे वैल्यू एडिशन करता येतेच्!! गेला बाजार फारच लिहायचेच असले तर सरळ भाषांतर भावांतर करावे!!! प्लॉट डोळ्यासमोर असतो रायटर्स ब्लॉक चा बी विषय नाही अन लेखन आनंद ही मिळतो!

(फ़क्त त्यात्या लेखकाला श्रेय दिलेच पाहिजे देवाणु)

या संदर्भात इतर कोणती कादंबरी चाफा किंवा आणखीन कोणी वाचली आहे का? >>>> स्पार्टाकस, कादंबरी वाचल्याखेरीज तुमची ट्रॅप कुठून आली हे कळलं नसतं.

विषकन्या कादंबरीत भारताकडे येणारी पाणबुडी ही बेरींगच्या सामुद्रधुनीतून आणि चीनच्या दक्षिणेकडून मुंबईत पोहोचते असा उल्लेख केलेला आहे. या मार्गाने पाणबुडी आणण्यात असलेला धोका ट्रॅपमध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे. >>>

याचा अर्थ रामाच्या जागी दुसरे नांव आणि लंका प्रवासाचे ठिकाण बदलून मी रामायण माझ्या नावे खपवू शकतो का ??
कॉपीराईट या प्रकाराशी माझा रोजचा संबंध येत असल्यानं हे असलं काही मला पटणार नाही. गळी उतरवण्याचा प्रयत्नही करू नका

सुहास झेले's picture

10 Mar 2015 - 10:57 am | सुहास झेले

अवघड आहे... :(

भृशुंडी's picture

10 Mar 2015 - 11:37 am | भृशुंडी

Good Riddence.
and thanks for nothing.

विषकन्या आणि आपली कादंबरी यातली काही वाक्ये अगदी सारखीच असल्याचं जाणवतंय. त्याचा उल्लेख आपल्या खुलाशात का नाही?

अखेरचा नमस्कार वगैरे दबावाची काय गरज आहे? आत्ता तरी चुक आपली आहे असं स्पष्ट दिसतंय वर आपणच इतरांवर दबाव टाकायला बघताय? हे असं लिहिण्यापेक्षा काही तरी नवीन चांगलं लिहून दाखवतो असं काहीतरी म्हणताल तर बरं दिसेल....विश्वास एकदा गेला की परत मिळवणं फार अवघड असतं हे काय आपल्याला दुसर्‍याने सांगायला हवं का?

..बाकी सर्व ठीक आहे..संकल्पना आधारित असणंही शक्य..
पण विषकन्या हे पुस्तक प्रस्तुत लेखकाने आत्ता प्रथमच वाचले आणि पूर्वी वाचलेच नव्हते हे मात्र पटणे कठीण आहे. वाक्ये आणि क्रमही अनेक ठिकाणी सारखा आहे असे दिसते. शब्दरचना वेगळी आहे.. पण ...यापूर्वी मूळ पुस्तक वाचलेच नव्हते हे जरा पटत नाही.

ता.क. ही दोन्ही पुस्तके एखाद्या मूळ पुस्तकावर आधारित असावीत काय?

मला देखील असेच वाटत आहे. ही पुस्तके कोणत्या तरी परदेशी कादंबरीवरून घेतलेली असावीत, आणि स्पार्टांनी देखील तेच रेफर केलेले आहे. तसे म्हटले तर या पुस्तकांमध्ये सम्य आहे, पण तसे म्हणले तर मूलभूत फरक देखील आहेच. त्यामुळेच या दोन कृतींमध्ये साम्य आहे असे दिसत असूनसुद्धा स्पार्टांनी या कादंबर्‍यांवरून चोरलय असे मला तरी म्हणावेसे वाटत नाहीये.
माझ्याकडूनतरी संशयाचा फायदा स्पार्टांना.

आदूबाळ's picture

10 Mar 2015 - 11:59 am | आदूबाळ

बरं मग. अखेरचा तर अखेरचा नमस्कार.

च्यामारी इथं लोक वाक्यवाक्याच्या पुराव्यासकट माप पदरात घालू रायले अन तुम्ही... जाउदे.

नाखु's picture

10 Mar 2015 - 12:11 pm | नाखु

ट्रॅप या कादंबरी बाबत खरच जर विनाश्रेय संकल्पना चोरी किंवा आणखी तंतोतंत डाका असे काही असेल तर फारच धोकादायक आहे.
नवीन लेखकांचे दर्जेदार आणि अस्सल लेखनही ह्या प्रकारामुळे (पूर्वग्रहदूषीत शंकायुक्त) नजरेनेच पाहिलं जाईल.

पिलीयन रायडर's picture

10 Mar 2015 - 2:52 pm | पिलीयन रायडर

+11111111

लेख वाचून धक्का बसला.
वाक्यच्या वाक्य सारखी आहेत. तरीही ती कादंबरी वाचली सुद्धा नाही म्हणणं म्हणजे कळस झाला.

मृत्युन्जय's picture

10 Mar 2015 - 12:09 pm | मृत्युन्जय

कथा / लेख यामधील साधर्म्यामुळे प्रत्येक वेळेस ते लेखन चौर्य असेलच असे नाही. कधीतरी कुठे काही वाचलेले असते / ऐकलेले असते. ते डोक्यात राहते. कालांतराने संदर्भ विसरतात, आठ्वणी पुसट होतात आणि कथाबीज मात्र डोक्यात राहते. त्यामुळे कधीकधी कथाबीजाशी साधर्म्य असणे नक्कीच शक्य आहे. तसे असल्यास आपल्या कलाकृतीची किंमत थोडी कमी होइल पण त्यामुळे लेखकाने चौर्यकर्मच केले आहे असे म्हणणे अतिरंजित ठरु शकते. माझ्याही एका लेखावर असेच आरोप झाले होते. आरोप करणार्‍या दोघा तिघांनी अजुनही मूळ लेखनाची काही लिंक दिलेली नाही. मी बरीच शोधाशोध विचारपूस करुनही मला तसले काही लेखन कुठे सापडले नाही. पण दोघा / तिघांनी तशी शक्यता व्यक्त केली असल्याने मला अजुनही असे वाटते आहे की कदाचित तशीच कथा कधीतरी वाचनात आली असल्याने माझ्याकडुन कथाबीज उचलले गेले असावे. मी स्वतःशी प्रामाणिक असल्याने आणि मी तो तसा आहे हे वाङ्मयचौर्याचा आरोप करणार्‍यांनाही पटल्याने माझी खात्री आहे की लेखन साधर्म्य हा निव्वळ योगायोग असावा किंवा माझी अजाणतेपणी झालेली चूक असावी. माझ्या त्या लेखावर तसा डिस्क्लोजर देखील आढळेल. अर्थात त्यावेळेसही कोणी जशीच्या तशी कथा ढापली असा आरोप केला नव्हताच.

त्यानंतर एकदा मी एक लेख लिहिला होता. त्या वेळेस कथाबीज ध्यानात होते. पुर्ण कथा अथवा लेखकाचे नाव लक्षात नव्हते. तसे स्पष्टपणे लिहुन कथा प्रदर्शित केली होती. आणी त्यावेळेस चाफ्यानेच स्वतः त्याबद्दल संतोष / आनंद व्यक्त केला होता.

असे दिसते की तुमच्या लेखनात विषवल्लीची काही पाने जशीच्या तशी कॉपी झाली आहेत. निव्वळ स्मरण / विस्मरणाच्या घोटाळ्यामुळे असे झाले आहे हे पटणे सर्वसामान्य माणसांना अवघड आहे.

अर्थात एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की तुमचे पहिले ३ भाग वाचुन ते ब्लडलाइन ची जशीच्या तशी कॉपी आहे असे वाटत होते. चौथ्या भागापासून कथेने वेगळे वळण घेतले. आता ते ३ भाग विषवल्लीची कॉपी आहे असे लोक म्हणत असतील तर मग विषवल्ली आणि ब्लडलाइन मध्ये कमालीचे साधर्म्य आहे असे म्हणावे लागेल. मी विषव्ल्ली वाचलेली नसल्याने त्याबद्दल काही बोलु शकत नाही.

बाकी तुमच्या खुलाश्यावरुन एखादा माणूस फारतर असे म्हणु शकतो की तुम्ही विषवल्लीचे इम्प्रोव्हायझेशन केले आहे. ज्याप्रमाणात साधर्म्य असल्याचा आरोप आहे ते बघता तो केवळ योगायोग म्हणुन सोडुन देता येणार नाही. अर्थात मी विषवल्ली वाचलीच नसल्याने मी याबद्दल काहीही बोलु शकण्यास अपात्र आहे हे नक्कीच.

बाकी तुमचे लेखन मला आवडते. ते वाचुन आनंद मिळाला. तुम्ही लिहित रहा असेच सांगेन. यावेळेस समजा तुमचे लेखन पुर्णपणे ऑरिजिनल नसेल (असेलही. मी ऑरिजिनेबिलिटी बद्दल बोलत नाही आहे) तरीही त्यासाठी लेखन संन्यास घ्यायची गरज नाही.

भुमन्यु's picture

10 Mar 2015 - 2:57 pm | भुमन्यु

बाकी तुमचे लेखन मला आवडते. ते वाचुन आनंद मिळाला. तुम्ही लिहित रहा असेच सांगेन. यावेळेस समजा तुमचे लेखन पुर्णपणे ऑरिजिनल नसेल (असेलही. मी ऑरिजिनेबिलिटी बद्दल बोलत नाही आहे) तरीही त्यासाठी लेखन संन्यास घ्यायची गरज नाही.

+१ हेच म्हणतो

सांगलीचा भडंग's picture

10 Mar 2015 - 12:35 pm | सांगलीचा भडंग

अशी चोरी मारी पण असती होय हौशी लेखक मंडळी मध्ये. अवघडच आहे . फेसबुक वर इकडचे तिकडचे मेसेज कोपी पेस्ट करून टाकतोच कि. पण ते जोक , छोटेसे किस्से अश्या स्वरूपाचे असते कि जिथे मुळ लेखक बर्याच वेळा मिळत नाही . पण थोडे चांगले लेख आणि थोडे मोठे लेख यामध्ये नक्कीच मुळ लेखकाचे नाव असते.

मिसळपाव वर साधारण लोक आपली ओळख लपवण्यासाठी कुठला तरी एक आईडी घेतात . आणि ओळख लपवून परत चोरीचे लिखाण करणे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इथे लोक थोडी मौज मजा करण्यासाठी आणि आपले हौशी लेखन प्रसिद्ध करण्यासाठी येत असतील असे वाटते . इथे कुणाला लेख /कथा लिहून मानधन मिळत असेल असे वाटत नाही . त्यामुळे जिथे कुठलाही दुसरा व्यावसाईक फायदा नाही अश्या ठिकाणी साहित्य ढापून टाकणे म्हणजे " माणसाला पैसा पेक्षा शाबासकी जास्त आवडते " असे वाटते

तुम्ही "अखेरचा नमस्कार" म्हटले असले एक सांगायची इच्छा : ट्रेप हि कथा चांगली होती आणि दोन तीन गोष्टीचे मिश्रण करून चांगली कथा तयार करणे हे एक स्किल असू शकते त्यामुळे परत कधी लिहाल तेव्वा आधीच सांगून टाकायचे . एवढे टेन्शन कशाला घायचे . जीवन मरणाचा प्रश्न थोडीच आहे .

दोन माणस एकमेकासारखी दिसतात. तर एकमेकांसारखं का लिहीणार नाहीत ? या शक्यतेचा आपण विचार केलेला दिसत नाही.
दुसरी शक्यता म्हणजे लेखकाला मूळ लिखाण आवडलं असल. लोक रिकमेण्ड केलं तर वाचतीलच असं नाही हे त्याला माहीत असल म्हणून त्याने क्रमाक्रमाने देण्याचं ठरवलं. तसं करत असताना दुस-या एका कादंबरीची पहील्या कादंबरीशी नियोग संतती केली तर जन्माला येणारं पिल्लू जास्त प्रभावी असेल अस त्याला वाटलं आणि त्याने हे सर्व आपणास वाचायला दिलं. त्यात नाव टाकायचं राहून गेलं.
तिसरी शक्यता जास्त महत्वाची वाटते ती म्हणजे जरी कलाकृती ओरीजिनल असली तरी रीमिक्स कलाकृती ही नव्या कलाकाराची असते. प्राचीन काळी बाबा सहगल, शेरॉन प्रभाकर, अन्नु मलिक, भप्पी लाहीरी, यो यो हनीसिंग यांनी रीउपनिषदे मधे याबद्दल लिहून ठेवलेलं आहेच. त्यामुळं सध्या संगीतापुरता अस्तित्वात असलेला हा अभिजात कलाप्रकार साहीत्याच्या क्षेत्रात आणल्याबद्दल खरं तर लेखकाचं अभिनंदन ही करायला पाहीजे आणि शनिवारवाड्यावर सत्कारसुद्धा ठेवायला पाहीजे. ज्ञानपीठाचा पुरस्कार मिळाला तरी कमीच असं हे अनन्यसाधारण काम आहे.

त्रिवार कुर्निसात !

आदूबाळ's picture

10 Mar 2015 - 1:06 pm | आदूबाळ

रीउपनिषदे :D

या हिशोबाने सत्कार मंगळवारवाड्यावर ठेवला पाहिजे.

तिथं कुस्तीचा आखाडा आणि जुना बाजार आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2015 - 2:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

इथे काय कमी कुस्ती चालली आहे ? :)

आणि "माल जुन्या बाजारातला दिसतोय" ह्याच मुद्द्यावर ती कुस्ती चाललीय हे वेगळेच ;)

रुपी's picture

10 Mar 2015 - 11:53 pm | रुपी

या महान कलाकारांच्या यादीत प्रीतमचे नाव राहीले की...

त्याच्या संगीतचौर्याबद्दल माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीचं म्हणणं असं की निदान अशा संगीतकारांमुळे आपल्याला देशोदेशीचं चांगलं संगीत तरी ऐकायला मिळतं!!

अत्रन्गि पाउस's picture

10 Mar 2015 - 1:58 pm | अत्रन्गि पाउस

कथानकातील क्वचित सापडणारे .. कच्चे दुवे, नं पटणारे तपशील ...ह्याकडे "आपले स्पर्ताकस" म्हणून दुर्लक्ष करून एवढेच नव्हे तर अतिशय प्रेमाने भरभरून कौतुक करून ... ह्याच नव्हे तर आधीच्याही लिखाणावर निखळ प्रेम करणाऱ्या माझ्या सारख्यांच्या अनेकांचा विलक्षण भ्रमनिरास झालेला आहे ...

अतिशय आपुलकीने तरीही सुचवतो कि निस्संनिग्ध चूक मान्य करून जाहीर माफी मागावी ... आणि पुढच्या लिखाणाला लागावे ... एक मिपाकर म्हणून मी त्या नवीन लिखाणाची आतुरतेने वाट बघीन...

असो ...त्याच वेळी हि माफी न आल्यास ...प्रस्तुत कादम्बरी मिपा वर तशीच 'वर' ठेऊन त्याखालील सगळ्या प्रतिक्रिया रीकोल कराव्यात असे सुचवतो ... एक बेदखल लिखाण म्हणून हे अस्तित्वात ठेवावे ..

आतिवास's picture

10 Mar 2015 - 3:38 pm | आतिवास

उद्वेगजनक!
चाफा, धन्यवाद!

गजानन५९'s picture

10 Mar 2015 - 3:50 pm | गजानन५९

अहो स्पार्टाकस,

इथे कुणी तुमच्या सोबत कशाला स्कोर सेटल करेल ? काय गरज आहे कुणाला याची ?

उलट तुमचे लिखाण नेहमीच सर्वांना आनंद देत आले आहे, एक मित्रत्वाचा सल्ला देतो झाले गेले सोडून चूक काबुल करा माफी वगेरे मागायची पण काही गरज नाही पण चूक काबुल न करता तुम्ही तोकडे समर्थन करत आहात आणे ते पण ज्यांनी तुमची चूक दाखवून दिली त्यांच्यावर चिखलफेक करून याला काही अर्थ नाही भाऊ.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Mar 2015 - 4:11 pm | अत्रुप्त आत्मा

@इथे कुणी तुमच्या सोबत कशाला स्कोर सेटल करेल ? काय गरज आहे कुणाला याची ?>>> +++१११ अत्यंत सहमत.

उलट तुमचे लिखाण नेहमीच सर्वांना आनंद देत आले आहे, एक मित्रत्वाचा सल्ला देतो झाले गेले सोडून चूक काबुल करा माफी वगेरे मागायची पण काही गरज नाही पण चूक काबुल न करता तुम्ही तोकडे समर्थन करत आहात आणे ते पण ज्यांनी तुमची चूक दाखवून दिली त्यांच्यावर चिखलफेक करून याला काही अर्थ नाही भाऊ.

>>> याच्याशी तर पूर्ण सहमत!

खटपट्या's picture

11 Mar 2015 - 1:24 am | खटपट्या

अत्यंत + पूर्ण सहमत !!

प्रसाद गोडबोले's picture

10 Mar 2015 - 4:08 pm | प्रसाद गोडबोले

अवघड आहे ...

स्पार्टाकस ह्यांचे बर्‍याच ज्येष्ठ मिपाकरांकडुन कौतुक ऐकले होते ... :(

खरेच अवघड आहे .

अवांतर : ह्या निमित्ताने मागे एकदा आमचेच लेखन आमच्या एका दुसर्‍या डु आयडीने प्रकाशित केले गेल्याने एक भारी वरीजीनल वाटणारा डु आयडी हातातुन गेला होता त्याचे दु:ख उफाळुन वर आले :(

खटासि खट's picture

10 Mar 2015 - 4:22 pm | खटासि खट

बाकी काय असेल ते असो. मिपा हे जिवंत संस्थळ आहे. कुठल्याही सदस्याच्या घोडचुकांमुळे त्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई होऊ नये. जर प्रताधिकाराचा भंग होत असेल तर असे लिखाण काढून टाकावे. सदस्यावर कारवाई व्हावी किंवा नाही याबद्दल मिपाकर/प्रशासक ठरवतील ते योग्य असेल.

पिलीयन रायडर's picture

10 Mar 2015 - 4:25 pm | पिलीयन रायडर

इथे ते स्नॅपशॉट देता येणार नाहीत का?

कारण नुसती कल्पना सारखी नाहीये (ते एकवेळ ठिकच आहे..) तर वाक्य च्या वाक्य (उतारा पाहिला मी तरी पुर्ण..) सारखा आहे..
बरं एवढं होऊनही स्पार्टाकस ह्यांनी काय ते मान्य केलं असतं तर काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण उलट तेच "लिखाण करणार नाही" वगैरे बोलत आहेत हे बघुन जास्त राग आला.

कुणीतरी ते स्नॅपशॉट द्याच.. मग काय ते कळेल की जे लोक चिडलेत ते का चिडलेत..

स्वाती२'s picture

10 Mar 2015 - 4:52 pm | स्वाती२

पिरा, मायबोलीवर स्नॅपशॉट्स दिले होते एका सदस्यांनी. पण असे स्नॅप शॉट्स देणे हे प्रताधिकाराचा भंग यात येत असल्याने अ‍ॅडमिन यांनी काढून टाकले. इथे स्नॅप शॉट्स देवून मिपाला त्रास व्हायला नको.
तिकडे चौकशी करुन खाते गोठवले गेल्याचे आत्ताच समजले. असो.

पिलीयन रायडर's picture

10 Mar 2015 - 4:56 pm | पिलीयन रायडर

आक्खे उतारे चोप्य पस्ते करणे प्रताधिकार भंग होत नाही का? आणि केवळ एका पुस्तकातला ४ ओळींचा उतारा (जो तसाही प्रिव्ह्यु मध्येही मिळतोच..) पुरावा म्हणुन दाखवला (स्वतःच्या फायद्यासाठी वापरला नाही..) तर तो कसा प्रताधिकार भंग?

स्वाती२'s picture

10 Mar 2015 - 6:28 pm | स्वाती२

ते मलाही कळले नाही. पण तसे स्पष्टीकरण मिळाले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2015 - 7:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

कुठल्याही "सार्वजनिक्रित्या उपलब्ध असलेल्या" लिखाणाचा "त्रोटक भाग *" "स्पष्ट संदर्भासह" देणे प्रताधिकारभंग समजला जात नाही.

प्रताधिकारभंगामागे तो केवळ आर्थिक फायद्यासाठी असतो इतका संकुचित अर्थ नाही, तर एकाने बुद्धी, कौशल्य, श्रम, वित्त, इ खर्ची घालून केलेल्या निर्मिती/कामाला दुसर्‍याने आपली निर्मिती/काम म्हणून खपवणे ही भावना आहे; आणि हे केवळ बेकायदेशीरच नाही तर अनैतीक व क्लेशकारकही आहे.

या दृष्टीने पाहता खरं तर "एखाद्या पुस्तकातला सार्वजनिक संस्थळावरच्या प्रिव्ह्यु मध्ये असलेला उतार्‍याची नक्कल करणे" तांत्रिकदृष्ट्या प्रताधिकारभंग होऊ नये. पण जेव्हा एखादा प्रताधिकारभंगाचा दावा बहुचर्चित असतो तेव्हा पुढे शक्य असणारे तोटे टाळण्यासाठी ताकही फूंकून पिणे कधी कधी जास्त श्रेयस्कर समजले जाते. अश्या परिस्थितीत त्या मूळ लेखनाची नक्कल (कॉपी) देण्यापेक्षा त्या पुस्तकाच्या प्रिव्ह्युचा दुवा देणे जास्त योग्य, पुरेसे आणि सुरक्षित असते :)

======

* त्रोटक भाग = साधारणपणे मुद्दा स्पष्ट करण्यास आवश्यक तेवढे लेखन. याला ठोस सीमा ठरवलेली नाही. पण चार-पाच वाक्यांपेक्षा जास्तीची नक्कल झाल्यास भुवया विस्फारण्याची शक्यता वाढते.

विशाल कुलकर्णी's picture

10 Mar 2015 - 6:29 pm | विशाल कुलकर्णी

हे म्हणजे सालां चोर तो चोर वर शिरजोर !

गजानन५९'s picture

10 Mar 2015 - 7:05 pm | गजानन५९

साला आजचा दिवसच खराब गेला एकूण :(

स्क्रिन शॉट चालणार असतील तर टाकू शकतो. अर्थात संमंची परवानगी असेल तर

जे.पी.मॉर्गन's picture

10 Mar 2015 - 7:41 pm | जे.पी.मॉर्गन

पडला का दुधात मिठाचा खडा!

जे.पी.

श्रीरंग_जोशी's picture

10 Mar 2015 - 7:51 pm | श्रीरंग_जोशी

नऊ वर्षांपूर्वी घडलेले हे बहुचर्चित प्रकरण.

Kaavya Viswanathan Plagiarism

असंका's picture

11 Mar 2015 - 10:55 am | असंका

चांगली माहिती मिळाली.

धन्यवाद....

चिमिचांगा's picture

11 Mar 2015 - 1:04 am | चिमिचांगा

मला स्पार्टाकस यांची अजिबात भलामण करायची नाही, पण या निमित्ताने मिपावर काही काळापूर्वी आलेला जुन्या हिंदी संगीतकारांच्या संगीताचौर्याबद्दलचा धागा आठवला. तेव्हा अनेकांनी तावातावाने संगीतकारांच्या बाजूने लिहिलं होतं.
चोरी अ‍ॅक्सेप्टबल असण्या/नसण्याचे नक्की काय नियम असतात? एकीकडे संगीतचौर्य करून लाखो रु. कमावणार्या, अ‍ॅवॉर्ड गोळा करणार्‍यांबद्दल कोणी काही ऐकून घ्यायला तयार नाही, पण संकेतस्थळांवर हौस म्हणून विनामूल्य काहीबाही लिखाण करणारा कुणी सदस्य इकडेतिकडे हात मारताना पकडला जातो, आणि झोडपला जातो, यात एक विरोधाभास जाणवतो, नाही का?

(विचारात पडलेला...)

मला पण ज्या पद्धतीने निषेध केला जातोय ते खटकतंय. काही प्रतिसाद त्यांच्या विरुद्ध असून पण संतुलित आहेत. गवि, म्रुत्युन्जय आणि अजून पण काही. पण सगळेच तो संयम पाळत नाही आहेत.

चिमिचांगा's picture

11 Mar 2015 - 1:12 am | चिमिचांगा

Correction: संगीताचौर्य नाही, संगीतचौर्य.... ;)

संगीताचौर्य करणारे साहेब श्री श्री महंमद अझरुद्दीन, नैका?

रामपुरी's picture

11 Mar 2015 - 2:39 am | रामपुरी

"अनेकांनी तावातावाने संगीतकारांच्या बाजूने लिहिलं होत"
असं असेल तर त्याला दुतोंडीपणा म्हणता येईल. पण त्यामुळे चोरीचे समर्थन होत नाही. शेवटी र्‍हदयनाथ मंगेशकरानी केली काय किंवा स्पार्टाकसनी केली काय चोरी हि चोरीच आहे.

अत्रन्गि पाउस's picture

11 Mar 2015 - 5:34 am | अत्रन्गि पाउस

हृद्यनाथ मंगेशकर ... हे जाहीर पणे कोणते गाणे कोणत्या रचनेवरून सुचले / उचलले हे निस्संकोच सांगतात ...
किंबहुना तसे ते गाऊन दाखवतात हि ... एवढेच नाही तर ..त्यांच्या मते .कोणतीही सांगीतिक रचना हि संपूर्णपणे स्वतंत्र असूच शकत नाही ..ती त्या संगीतकाराने तो पर्यंत ऐकलेल्या सुरावटींच्या परीपाकाचा एक अंश असतो

विषकन्या आणि गुड मॉर्निंग मादाम ह्यांचे ब्लेंडिंग सोपे नाहीच आणि प्रस्तुत वाद निर्माण व्हायच्या आधीपर्यंत trap नाव नवीन लोक वाचत होतेच आणि कौतुकाने वाचत होते ...

इथे प्रश्न मूळ कलाकृतीचे ऋण मान्य करण्याचा आहे ..आणि ते मुळातून नाकारणे पटत नाही ...

नाखु's picture

11 Mar 2015 - 8:52 am | नाखु

कला़कृती बेतलेली आणि हुबेहुब नक्कल यातला नेमका फरक समजेल तो सुदीन.
वरती उधृत केलेल्या धाग्यावरचा माझा आणि बॅट्याचा प्रतिसाद चोपून पेस्त करतोय (होऊ दे चोरीचा आळ)

आपल्या अल्पमतीला...
नाद खुळा - Tue, 14/01/2014 - 11:48
फक्त इतकेच माहीती कि:

•मी घरी (माझ्या/मित्राच्या/नातेवाईंकाच्या) बनविलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना हे कुणाचे पाहून (नक्कल) म्हनून बनविले हे पाहात नाही. काही पुस्तकात पाहून/जालावर वाचून अगदी हुकुमबर्हूकुम बनविले असतील तरी,बल्ल्वाचर्य्/र्यीचे हातगुण त्या पदार्थांवर संस्कार करतातच.
•तत्द्वत हाटेलातून पदार्थ आणून ते घरीच केले आहेत असे भासविणार्यांच्या पंगतीत मि वरच्या नक्कल कारांना बसविणार नाही
पहिल्यामधल्यांनी किमान अक्कल्/श्रम्/प्रयत्न केलेले असतात दुसरयानी फक्त दिखावा (श्रेयासाठी)

आणि हो तिळगुळ घ्या गोड बोला.
घरोघरीच्या तिळगुळात मुख्य घटक तेच असले तरी प्रत्येकाची चव वेगळी असते,तोच दृष्टीकोण बेतलेल्या गाण्यांबाबत ठेवायला काय हरकत आहे?
बेतलेल्या हा शब्द हे दिलेल्या दुव्यावरिल इन्स्पायर्ड चे स्वैर भाषांतर आहे.
जागोजागी हाच शब्द वापरला आहे.

एकवेळ
बॅटमॅन - Sun, 12/01/2014 - 22:21
नैतिकता वैग्रे १२ गडगड्यांच्या व्हिरीत घाला.

पण सगळे भामटे आजच उपटले अन पूर्वी कोणीही उधार उसनवार करीत नव्हते असा काङ्गावा चूक आहे हे मान्यच.

तरीही मी म्हणेन- पूर्वीही चोरी चालायची पण उस मे कुछ दम जरूर था. फक्त व्हर्बॅटिम चोरी नव्हती. थोडे ट्वीकिंगही असावे. पण जे काही होते ते ऐकायला आजही उत्तम वाटते. नैतर अलीकडे पहा, थोडे अपवाद वगळले तर गाणी श्रवणीय नसतात-चोरी ऑर नो चोरी.

तस्मात अलीकडच्यांना शिव्या घालायच्या तर चोरतात म्हणून नाही तर डोके वापरत नाहीत म्हणून घालायला हव्यात.

बाकी प्रदीप यांचा प्रतिसाद लैच आवडल्या गेला आहे. हॅट्स ऑफ!!!! _/\

================
बॅटमन यांनी वरील प्रतिसाद येथे वापरू दिल्याबद्दल योग्य तो मान व नक्की धन (मिसळ रूपात) दिले जाईल.
अखिल मिपा मांपकाढे समीती संचालीत चौर्य्संशोधन-स्वम्ग्न्मूर्ख्जन्तैल्बुद्धीवर्धनबुद्धीभेदनीर्क्षीविवेक मंडळातर्फे "मिपास्वछ्ता अभियानाकरीता प्रसारीत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

11 Mar 2015 - 9:09 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अखिल मिपा मांपकाढे समीती संचालीत चौर्य्संशोधन-स्वम्ग्न्मूर्ख्जन्तैल्बुद्धीवर्धनबुद्धीभेदनीर्क्षीविवेक मंडळातर्फे "मिपास्वछ्ता अभियानाकरीता प्रसारीत.

अनुस्वाराची जागा प वर आहे =))

बाकी ब्रुस्वेणच्या प्रतिसादाशी बर्‍यापैकी सहमत.

हाडक्या's picture

11 Mar 2015 - 3:58 pm | हाडक्या

काढलीच मापं लगेच... ;)

विशाखा पाटील's picture

11 Mar 2015 - 9:47 am | विशाखा पाटील

लेखकावर इतर लेखनाचा प्रभाव असतो, हे मान्य. टी. एस. इलिअट यांचा या विषयाशी संबंधित 'Tradition and Individual Talent' हा निबंध आहे. त्यांच्या मते, लेखक भूतकाळालं इतरांचं लेखन आणि वर्तमानकाळ यांची सांगड घालतात. ती व्यक्ती परंपरेचा एक भाग असते आणि परंपरेशी जोडले जातांना नाविन्याची (हे individual talent) भर घालते.
शेक्सपिअरची नाटके किंवा आपल्याकडे महाकाव्य आणि मिथ्यकथा यांवर आधारित कलाकृती यात नाविन्यतेचं वैशिष्ट्य दिसतं.
इथे जो मुद्दा आहे तो फक्त तेवढ्यापुरता मर्यादित नाही, असे दिसते. वाक्य आणि प्रसंग जसेच्या तसे लिहिण्याचा आहे. एवढं साम्य कोणत्याही दोन लेखनात येत नाही. (एका सिनेमाची ष्टोरीही दोन जण वेगवेगळ्या शब्दात सांगतात किंवा आठवा ते शाळेतले फळ्यावर लिहून दिलेले निबंध जसेच्या तसेच लिहितांना होणारी दमछाक:) हा मुद्दा साहित्यिक चोरीचा आहे. दुर्दैवाने आपल्याकडे याविषयी 'चलता है' अशी वृत्ती आहे. चारपाच वर्षांपूर्वी जर्मनीतल्या एका मंत्र्याने प्रबंधात चौर्य केल्याचे उघडकीस आले तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
संबंधित लेखकाने कथाबिजाबद्दल खुलासा केला आहे, पण उतारे जसेच्या तसे वापरणे याबद्दल खुलासा केलेला नाही, असे दिसतेय.

संदीप डांगे's picture

11 Mar 2015 - 1:42 pm | संदीप डांगे

विशाल भारद्वाज ने शेक्सपीअरच्या अजरामर कलाकृतींवर आधारीत ओंकारा, मक़बूल आणि हैदर हे चित्रपट काढले. त्याचे शेक्सपीअरला उचित श्रेयही दिले. तरी हे तीनही चित्रपट स्वतंत्र म्हणावे असे लिहिले गेले आहेत. हुबेहुब नक्कल नाही. आता मूळ शेक्स्पीअरची नाटकेही जिवनात सामान्यपणे आढळणार्‍या अतिसामान्य घटनांवर आधारीत होती. त्याला आपल्या कौशल्याने राइचा पर्वत शेक्सपीअरने केले. पण म्हणून विशाल भारद्वाजने मी शेक्सपीअरची नाटके पाहिली नाहीत, कथासूत्र समान असले म्हणून काय, ती तर सामान्य कथानके आहेत वैगेरे कांगावा केला नाही.

समजायला लागले तेव्हापासून कलाकार म्हणजे एकच व्याख्या डोक्यात आहे ती म्हणजे:
'चिंधीलाही राजवस्त्र म्हणून जे सादर करू शकतात तेच खरे कलाकार, दुसर्‍याच्या राजवस्त्राला आपले राजवस्त्र म्हणून चिंधीगिरी करतात ते नकलाकार'

*नकलाकारः हुबेहुब नक्कल करणारे, स्टँड-अप कॉमेडीयन नाही.

भीमसेन, कुमार, लता, किशोरी, राजा रविवर्मा, बच्चनसाहेब, पुल ...
आम्ही ह्यांना उच्च प्रतीचे कलाकार मानतो कारण ते चिंधीला राजवस्त्र म्हणून सादर करतात असे म्हणायचे आहे आपल्याला ??

संदीप डांगे's picture

11 Mar 2015 - 2:15 pm | संदीप डांगे

हो. साहेब.

जरा माझ्या म्हणण्याचा मतितार्थ लक्षात घेतला तर आपणास ते लक्षात येइल. त्यांच्या असामान्य कलेने ते सामान्य गोष्टींनाही एका असामान्य पातळीवर नेऊन ठेवतात. ते जे सादर करतात ते चिंधी असते असं नाही म्हणालो मी.

मी गायलेलं ''इंद्रायणी काठी" मुळात कितीही चांगलं गाणं असले तरी पं. भीमसेनजींनी म्हटल्यावर त्याल जे देवत्व प्राप्त होतं ते त्यांच्या कलेनी. पुलंनी आपल्या रोजच्या जीवनातलेच साधे-साधे प्रसंग निवडून आपल्या असामान्य निरिक्षण कलेने, विनोदबुद्धीने त्यांना अजरामर करून ठेवले आहे, 'म्हैस' सारखा प्रसंग कितीतरी लोकांच्या आयुष्यात रोज घडत असेल. पण गोष्ट मांडून तीला असामान्य केले ते पुलंनीच. इतके की आताही कुणी अशा प्रसंगाचे वर्णन केले तर 'म्हैस'चेच आठवण येते हमखास.

तसेच तुम्ही म्हणताय त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल म्हणता येइल. 'पा'मधे अमिताभच्या ठिकाणी दुसर्‍याची कल्पना करू शकत नाही. शोले, जंजीर, काला पत्थर पासून आंखे पर्यंत सामान्य व्यक्तिरेखांना असामान्य पातळीवर नेण्यात अमिताभला कुणाचे आव्हान आहे?

गैरसमज नसावा. धन्यवाद!

जाता जाता, केसरीया बालमा वेगवेगळ्या कलाकारांनी रंगवलेले एकाच ठिकाणी. सगळे दिग्गज आहेत. आनंद घ्या.

अत्रन्गि पाउस's picture

11 Mar 2015 - 4:04 pm | अत्रन्गि पाउस

कळले ... गैरसमज नाही हो ...

रच्याकने : केसरिया ऐकून मग सांगतो ...पण धन्यवाद आधीच ...:)

करतात नाय हो... करू शकतात असं म्हणाले होते ते अगोदर. (आता वर ते परत आपल्याला "हो" सुद्धा म्हणालेत ते सोडा.)

पण एखादा माणूस अगदी अवघड गोष्टही करू शकतो म्हणून तो जे जे करतो ते सगळंच तेवढंच अवघड असेल असं कसं म्हणता येइल?

संदीप डांगे's picture

11 Mar 2015 - 4:04 pm | संदीप डांगे

अहो ते "करतात, करू शकतात" वर लक्ष नाही गेलं माझं. आय माय स्वारी बरंका...

अवघड वा सोप्याचा प्रश्न नाही आहे हो. कलेच्या प्रांतात अवघड-सोपे असे काही असते याबद्दल मला जरा शंका आहे. एखादी गोष्ट सादर करण्यात सादरकर्त्याचे स्व:त्व झळकते, ते जेवढे उच्च तेवढी कला अजून सुंदर होते. एखादी साधी गोष्ट आपल्या कल्पकतेने खुलवत नेणे म्हणजेच ती अवघड होते जाणे. 'जागेच्या वाटपावरून सख्या भावांमधे भांडण झाले' ही एका ओळीची गोष्ट व्यासांनी 'महाभारत' म्हणून मांडले. 'महाभारत' म्हणून वाचतांना ते किती अवघड आहे ते जाणवते. प्रेयसीच्या प्रेमात येडा झालेला प्रियकर ढगालाच प्रेमसंदेश घेऊन जायला सांगतो ही एक साधीशी कल्पना मेघदूत मधून अवघड होऊन समोर येते. उद्या कुणी त्याच ढगाच्या मार्गाने प्रवास करणार्‍या एखाद्या गाडीला उद्देशून सगळे 'मेघदूत' जसेच्या तसे 'गाडीदूत' म्हणून खपवले तर तो नकलाकार.

पार्श्वगायन करणार्‍यांबद्दल माझं असं निरिक्षण आहे की संगितकाराने सांगितलेलं त्याच्याच सुरांमधे राहून त्यात आपलं स्व:त्व मिसळून गाण्याला उच्च अनुभवाच्या पातळीवर घेऊन जाऊ शकतात ते खरे कलाकार. त्यांच्या समोर तेच गाणं तसंच्या तसं आधीच कुणी गायलेलं नसतं ज्याचा ते आधार घेऊ शकतात. एखादं गाणं मुळातून तयार करायला फार कष्ट पडतात. तुनळीवर त्यांचे मेकींग ऑफ बघून कळते. एखादं हजार वेळा ऐकलेलं गाणंच कुणी अगदी हुबेहुब त्याच हरकतींसकट म्हणत असेल तर तो कलाकार नाही, नकलाकार. त्या नकलाकाराला एखादं नविन गाणं गायला सांगतात तेव्हा खरं पितळ उघडं पडतं. असे कित्येक आयडॉल आता धूळ खात पडलेत. ज्यांनी नकला करता करता स्वःत्व शोधलं आणि सादर केलं तेच टिकलेत. सोनू निगम हे त्याचं उत्तम उदाहरण.

अत्रन्गि पाउस's picture

11 Mar 2015 - 4:09 pm | अत्रन्गि पाउस

अप्रतिम नकला करतो ...
उषा उथुप ची तर बेस्टेस्ट ....

बाकी आधीचे मुद्दे पण याग्रीड

संदीप डांगे's picture

11 Mar 2015 - 4:16 pm | संदीप डांगे

गायकांच्या नकलेमधे तर त्याच हात स्वारी गळा कोन्नाय धरू शकत...

https://www.youtube.com/watch?v=tdbpw92Jwfg

अत्रन्गि पाउस's picture

11 Mar 2015 - 4:04 pm | अत्रन्गि पाउस

आमची मिष्टेक झाली

चिंधीलाही राजवस्त्र म्हणून जे सादर करू शकतात तेच खरे कलाकार, दुसर्‍याच्या राजवस्त्राला आपले राजवस्त्र म्हणून चिंधीगिरी करतात ते नकलाकार'
वा साहेब काय म्हणता?
दंडवत स्वीकारा __/\__

चाफा's picture

11 Mar 2015 - 12:00 pm | चाफा

http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5092239646278206025 - ट्रॅप
http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=5415099490333145052... - भुताळी जहाज २
बर्म्युडा ट्रँगल मधील भुताळी जहाजे प्रकरणार उरलेली जहाजे सापडतील, प्रिह्यु मध्ये उपलब्ध नाहीत.

भृशुंडी's picture

12 Mar 2015 - 1:20 am | भृशुंडी

आणखी एक -
स्पार्टाकस साहेबांनी दिलेल्या संदर्भात Ocean triangle by Charles Berlitz हे पुस्तक दिसलं.
अनेकवार शोध घेऊनही ह्या लेखकाचं ह्या नावाचं पुस्तक कुठेच दिसलं नाही- त्याच्या bibliography तही ह्या नावाच्या पुस्तकाचा उल्लेख नाही. कुणी हे पुस्तक शोधण्यात मदत करील काय?
उलट बाळ भागवत ह्यांच ह्याच नावाचं पुस्तक मात्र मराठीत प्रसिद्ध आहे- आणि स्पार्टाकस ह्यांच्या कृपेने त्यातले उतारेही आता आंजावर दिसतात.

उदाहरण - Berlitz ह्यांच्या Bermuda Triangle मधे (जे संदर्भासाठी वापरल्याचा उल्लेख आहे)
WitchCraftबद्दल पुढील विधान दिसतं -
The spoksperson said "we presume they are missing, but not lost at sea".
लेखात ह्याचं भाषांतर (?) झालंय "विचक्राफ्ट हरवली खरी, पण ती समुद्रात नव्हे".
भागवतांच्या पुस्तकात मात्र विचक्राफ्टबद्दल वरील वाक्य हुबेहुब आहे.
असो, असे आणखी अनेक "योगायोग" सापडतील.

आनन्दा's picture

12 Mar 2015 - 2:38 pm | आनन्दा

इथे कोणीतरी या पुस्तकाची चर्चा करताना दिसते.

भृशुंडी's picture

12 Mar 2015 - 10:34 pm | भृशुंडी

ते पुस्तक आमच्याकडेही आहे.
स्पार्टाकस साहेबांनी त्यांच्या संदर्भात उल्लेखलेलं "Ocean Triangle" हे पुस्तक मात्र इंग्रजीत कुठेही सापडलं नाही.

काळा पहाड's picture

11 Mar 2015 - 12:50 pm | काळा पहाड

नक्की काय झालंय हे माहीती नाही आणि तेवढं वाचायला वेळ पण नाही. फक्त एका मेंबर बद्दल बोलताना पातळी सोडू नये ही विनंती.

रवीराज's picture

11 Mar 2015 - 1:09 pm | रवीराज

असेच म्हणतो मी.

स्पार्टाकस's picture

12 Mar 2015 - 6:28 am | स्पार्टाकस

स्पार्टाकसचं सगळंच लेखन चोरीचं कसं आहे हे दाखवण्याचा चंग बांधलेल्यांसाठी -

चाफा यांनी इथे दिलेली अनोखी रात आणि yourghoststories.com इथली कथा ही सारखी वाटणं अगदी साहजिकच आहे, कारण या दोन्ही कथा मी लिहील्या आहेत. BhatakatiAatma हा त्या साईट्वरचा माझा आयडी आहे. ज्यांना आणखीन खात्री करुन हवी असेल त्यांना मी पासवर्डही देण्यास तयार आहे.

स्क्रीनशॉट्सबद्दल -

आजपर्यंत मी अनेक गुप्तहेर कथा मराठी, हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत वाचल्या आहेत. अनेक कथांमध्ये वर्णनांत आश्चर्यकारक साम्यं मला आढळून आलेलं आहे. दोन वेगवेगळ्या देशांतले, भाषेतले लेखन अनेकदा हुबेहूब वर्णन करताना पाहूनही कधी वाड्मयचौर्याची शंका निदान मला तरी आली नाही. कारण एखादी कल्पना एकाच वेळी अनेक लोकांना सुचू शकते याची कित्येक उदाहरणं माझ्यासमोर घडलेली आहेत. त्या स्क्रीनशॉट्मध्ये असलेल्या वर्णनाशी साधर्म्य असलेलं वर्णन इयन फ्लेमींग (जेम्स बाँडचा लेखक), अ‍ॅलीस्टर मॅकलीन, डॅन ब्राऊन या लेखकांच्या कथांमध्ये कित्येक ठिकाणी आढळतं, परंतु याच अर्थ त्यांनी एकमेकांचं लेखन चोरलं असा अर्थ निघतो का?

कोणतंही लेखन करण्यापूर्वी ही कल्पना साहित्यात पूर्वी कोणी वापरली आहे का हे तपासून पाहणं कोणाला तरी शक्यं आहे का?

भुताळी जहाज मालिकेबद्दल-

ओशन ट्रँगल या भागवतांच्या पुस्तकात चार्ल्स बार्लीत्झ आणि रिचर्ड वायनरच्या पुस्तकांतील अनेक वर्णन भाषांतरीत केलेली आहेत. चार्ल्स बार्लीत्झचं बर्म्युडा ट्रँगल, ड्रॅगन ट्रँगल, रिचर्ड वायनरची From the Devil's Triangle to the Devil's Jaw, Ghost Ships: True Stories of Nautical Nightmares, Hauntings, and Disasters, The Devil's Triangle, The Devil's Triangle 2 या सर्व पुस्तकांतील अनेक उतारे भाषांतरीत केलेले आहेत. ही सर्व पुस्तकं माझ्या संग्रही आहेत आणि याच सर्व पुस्तकांतील संदर्भांचा उपयोग मी भुताळी जहाज आणि थोडे अद्भुत थोडे गूढ या मालिकेतील काही प्रकरणांत केला आहे, पण मराठीत भागवतांनी आधीच या घटनांबद्दल लिहील्यामुळे मी भागवतांच्या पुस्तकातून चोरी केली असं चित्रं निर्माण झालं आहे. परंतु या सर्व पुस्तकांबरोबरच या लेखांत जी इतर माहीती आलेली आहे, जी भागवतांच्या पुस्तकात नाही, ती कुठून आली याचा कोणी विचारही करण्याची तसदी घेतलेली नाही.

एव्हरेस्ट, के२, ९० डिग्री साऊथ, आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट या इतर मालिकांतील लेखांबद्दल अद्याप कोणाला काही 'शोध' लागलेला दिसत नाही. लागण्याची शक्यताही नाही कारण हे सर्व लेखन मूलतः माझं स्वतःचं आहे. सर्व मालिकांच्या अखेरीस मी संदर्भग्रंथांची यादी दिलेली आहे.

सरतेशेवटी,
मराठीतील एका लेखकाची कथा मी जाणूनबुजून कॉपी करुन मराठी संस्थळावरच टाकेन, जिथे वेगवेगळ्या विषयावरील पुस्तके नियमितपणे वाचणारे वाचक आहेत इतका मूर्खपणा आणि निर्ढावलेपणा माझ्यात नाही इतकंच स्पष्टं करतो. जे झालं ते दुर्दैवी आहे, परंतु ते जाणिवपूर्वक झालेलं नाही इतकंच मी स्पष्ट करु इच्छीतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

12 Mar 2015 - 7:47 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

वरच्या दोन प्रतिक्रिया परत डकवतो आहे.

स्पार्टाकस,

ह्या कादंबर्‍यांशी असलेले साधर्म्य म्हणा किंवा अजुन काही म्हणा तो एक आपण सोडुन देउ. तुमचं बाकीचं लेखन चांगलं आहे. वेळोवेळी तुम्हाला तसं कळवलेलही आहे. पुढची पुर्ण स्वरचित कथा टाकुन हे डाग काढुन टाका. मिसळपाव म्हणा किंवा अन्य स्त्रोत म्हणा हे हौशी लेखक-कवी वगैरे कलाकार मंडळींसाठीचं उत्तम व्यासपीठ आहे. इथे तुम्ही परफेक्ट असायची अपेक्षा नाही तर जेन्युइन असायची आवश्यकता आहे. चुका करत टक्के टोणपे पचवतच पुढे जाण्यात मज्जा आहे. असो. लेखन सोडु नका. मी थेट ग्रंथचौर्‍याचा आरोप करणार नाही. पण एवढं साधर्म्य असुनसुद्धा तुम्ही जर का आरोपांचं खंडन करणार असाल तर काय उपयोग हे निवेदन देउन? त्यापेक्षा इथुन पुढे अश्या चुका होणार नाहीत असं पहा. आणि लिखाण सोडु नका. कसं?

True that. It's annoying to see people defending a guilty person. I am not saying he should be punished. But at least he should accept the mistake, give promise that it will not occur here onwards and write something genuine. I and others who are currently accusing Mr.Spartacus will be more than happy to read something genuine written by him. MIPAkars are not going to hang him to death. May be for couple of months every work he types will be criticized a lot, but may be that is his redemption.

Mr. Spartacus if you are reading this.

We are looking forward for a positive stand from your side. You must not quit genuine writing. Not many people can write this nicely. thank you. Have a nice day ahead.

नीट वाचलत तर तुम्हाला समजेल लोक तुम्हाला दगडानी मारत नाहियेत किंवा लेखन संन्यास घ्या म्हणुनही सांगत नाहियेत. अजुनही तुमच्याकडुन चांगल्या आणि जेन्युइन लेखनाची अपे़क्षा कमीत कमी मी ठेवतं आहे. धन्यवाद. लिहित राहा.

रवीराज's picture

12 Mar 2015 - 4:30 pm | रवीराज

हेच म्हणतो मी, तुम्ही लिहित रहा.

वर मी उल्लेख केलेली शंका खरी ठरली असे वाटते. एक-दोन मूळ इंग्रजी संदर्भपुस्तकावरुन घाटेंनीही आणि स्पार्टाकस यांनीही वेगवेगळ्या वेळी स्वतंत्रपणे लिहिले असावे. त्यामुळे साम्यस्थळे आढळली असावीत.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा..

प्रसाद१९७१'s picture

12 Mar 2015 - 4:53 pm | प्रसाद१९७१

स्पार्टाकस - तुम्ही बरे आहात ना? तुमची चोरी उघडी झाल्यावर गप्प बसणे हेच श्रेयस्कर आहे. नंतर दुसरा आयडी घ्या आणि लिखाण करा. अजुन स्वताचा अपमान कशाला करुन घेताय?

अजया's picture

12 Mar 2015 - 8:26 am | अजया

स्पार्टाकस,जुने जाऊ दया मरणालागुनी.
नवी छान सिरिज घेऊन ये.संदर्भ घेतले असतील ते देऊन.इथे मिपावर कोणी कोणाचं स्कोअर सेटलिंग करत नाहीये.नवी कोरी स्वरचित कथा,कादंबरी आणुन हा विषय इथेच संपव.

अत्रन्गि पाउस's picture

12 Mar 2015 - 12:41 pm | अत्रन्गि पाउस

+100

चाफा's picture

12 Mar 2015 - 12:47 pm | चाफा

कुठाय लिंक ?
बाकी चालू दे,
सरतेशेवटी,
मराठीतील एका लेखकाची कथा मी जाणूनबुजून कॉपी करुन मराठी संस्थळावरच टाकेन, जिथे वेगवेगळ्या विषयावरील पुस्तके नियमितपणे वाचणारे वाचक आहेत इतका मूर्खपणा आणि निर्ढावलेपणा माझ्यात नाही इतकंच स्पष्टं करतो. जे झालं ते दुर्दैवी आहे, परंतु ते जाणिवपूर्वक झालेलं नाही इतकंच मी स्पष्ट करु इच्छीतो.>>>>>>>>
हे जे काही आहे ते सुर्यप्रकाशासारखं स्वच्छ दीसत असताना काय सिध्द करायचा प्रयत्न चाललाय देव जाणे
चालू दे..