ट्रॅप आणि विषकन्या बद्दल आरोप

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
10 Mar 2015 - 4:32 am

ट्रॅप या कादंबरीवर झालेल्या आरोपांवरुन बुकगंगा वरुन विषकन्या ही कादंबरी विकत घेऊन मी वाचून काढली. ही कादंबरी ई-बुक स्वरुपात उपलब्ध आहे जी आयपॅड किंवा इतर कोणत्याही टॅबमध्ये डाऊनलोड केली जाऊ शकते. वाचताना मला स्वतःला मूळ संकल्पना आणि काही गोष्टींतील साधर्म्य जाणवलं, परंतु सगळी कादंबरीच चोरली आहे असा आरोप करणार्‍यांपैकी किती जणांनी विषकन्या वाचली आहे याबद्दल मला शंका येऊ लागली आहे.

सुमारे तीन महिन्यांपूर्वी अमेरीकेच्या फुल्टन या पाणबुडीसंदर्भात एक लेख वाचनात आला. ही पाणबुडी अमेरीकन सरकारच्या अधिकार्‍यांना पत्ता लागू न देता रशियात स्मगल करण्यात आली या संदर्भात तो लेख होता. या लेखाचा आधार पकडून रशियन सरकारकडून भारताला मिळणारी अण्विक पाणबुडी कशा तर्‍हेने भारतात आणता येऊ शकते ही कल्पना डोक्यात आल्यावर या कादंबरीची मूळ संकल्पना तयार झाली. उरलेली कथा या मूळ संकल्पनेच्या भोवताली रचलेली आहे.

ज्यांनी विषकन्या वाचली आहे आणि वाचलेली नाही त्यांच्यासाठी -

विषकन्या कादंबरीत भारताकडे येणारी पाणबुडी ही बेरींगच्या सामुद्रधुनीतून आणि चीनच्या दक्षिणेकडून मुंबईत पोहोचते असा उल्लेख केलेला आहे. या मार्गाने पाणबुडी आणण्यात असलेला धोका ट्रॅपमध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे.

सुएझ कालव्यातून ज्या पद्धतीने वाहतूक केली जाते ती कॉन्व्हॉय पद्धत याचा विषकन्या मध्ये उल्लेख कोणाला आढळला का? हे डीटेलींग मी इंटरनेटवरील माहिती वाचून केलं आहे.

पाणबुडीच्या प्रवासाचं डीटेलींग करताना दोन बंदरांमधील अंतर आणि त्यासाठी लागणारा वेळ याचा अंदाज करण्यासाठी मी ही साईट वापरली -

http://ports.com/sea-route/

या साईटवर आपल्या दोन्ही बंदरांचे डीटेल्स आणि पाणबुडीचा वेग ही माहिती दिल्यावर प्रवासास लागणारा वेळ दिसू शकतो. दोन्ही पाणबुड्यांच्या प्रवासाचा अंदाज घेण्यासाठी आणि डीटेलिंग करण्यासाठी मी हे तंत्रं वापरलं होतं आणि त्यावरून लागलेल्या वेळेचा अंदाज बांधला होता. विषकन्या मध्ये हे कोणाला आढळलं का?

हे डीटेल्स कॉपी केले होते हा आरोप कशाच्या आधारावर केला आहे?

पाणबुडीच्या मार्गाच वर्णन करताना केप ऑफ गुड होपच्या परिसरातील वादळाचा कोणता संदर्भ विषकन्या मध्ये आढळतो? मुळात विषकन्यामध्ये केप ऑफ गुड होपशी काही संबंध आला आहे का?

याच पाणबुडीच्या संदर्भात उल्लेख आलेल्या वेगवेगळ्या मिसाईल्सच्या प्रकारांचा आणि अ‍ॅटॉमिक न्यूक्लीयर मिसाईलचा साधा उल्लेखतरी विषकन्यामध्ये आला आहे का? या संदर्भात इतर कोणती कादंबरी चाफा किंवा आणखीन कोणी वाचली आहे का?

विषकन्या हे कथानाक वाचल्यास ते भारतात राजीव गांधी आणि पाकिस्तानमध्ये बेनझीर भुट्टो पंतप्रधान असतानाच्या काळातलं आहे हे समजून येऊ शकतं. त्या काळात उल्लेख केलेली रशियन पाणबुडी १९९० मध्येच रशियन नौदलातून निवृत्त करण्यात आली.

ज्या अत्याधुनिक पाणबुडीचा ट्रॅपमध्ये उल्लेख आहे, ती आजही रशियन नौदलात कार्यरत असलेली अणुपाणबुडी आहे हे कोणाला माहीत आहे काय?

मूळ संकल्पना आणि काही तपशील समान आले म्हणून संपूर्ण कादंबरी चोरली आहे असा आरोप करताना या सर्व संदर्भांचा कोणी साधा विचार तरी केला होता का?

आतापर्यंतच्या माझा इतर लेखनात प्रत्येक वेळी मी वापरलेल्या संदर्भ ग्रंथांचा मूळ लेखकाच्या नावासकट मी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. केनेथ अँडरसनच्या ज्या शिकारकथांचा मी अनुवाद केला आहे त्याच्या प्रताधिकारावरुन मी प्रशासनाला स्पष्टीकरणही दिलेलं होतं आणि ते मान्यं करुन प्रशासनाने या कथा पुन्हा प्रकाशित केल्या आहेत.

या सगळ्या प्रकारात मला स्वत:ला आता विच हंटींगचा आणि स्कोर सेटलींगचा वास येऊ लागला आहे.

या सगळ्यानंतर मिसळपावच काय, पण इतर कोणत्याही मराठी संस्थळावर काहीही लेखन करण्याची माझी इच्छा नाही, कारण ते पूर्वग्रहदूषीत नजरेनेच पाहिलं जाईल याची मला खात्री आहे.

तस्मात,
अखेरचा नमस्कार!

साहित्यिकप्रकटन

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

12 Mar 2015 - 3:26 pm | कपिलमुनी

ती क्रिकेटबद्दलची सीरीज पूर्ण करा बघू लौकर !

सर्व प्रथम एक डिसक्लेमर मी वकील नाही आणि या कॉपीराईट विषयाबद्दलचा व्यावसायीक सल्लागारही नाही. (माझ्या वाचनाच्या स्मरणावर लिहित आहे चुभूदेघे. आणि आवश्यक ठिकाणी कायदे तज्ञाचाच सल्ला घेणे) खर म्हणजे मराठी आंतरजालावर मार्गदर्शक कायदा विषयावरच्या तज्ञांची वानवा जाणवते असा विचार बरेच दिवस मनात होता लिगल अवेरनेसच्या कँपेन्सची चर्चा होते पण प्रत्यक्षात आंतरजालावर मराठीच नाही एरवी इतर भाषांसाठीही कायदा सल्लागार मंडळी कमी दिसतात आणि लिगल अवेअरनेसच्या अभावी अशा गोष्टी पुढे आल्यास नवल नाही.

जिथ पर्यंत कॉपीराईट कायद्याचा संबंध आहे २०१२ च्या अमेंडमेंट पासून सेवदात्या संकेतस्थळांचे काम तसे पाहता सोपे झाले आहे. ज्यांना आंजावरील प्रताधिकार भंगाबद्दल अधिकृत प्रताधिकार भंगाचा दावा करावयाचा आहे त्यांनी २१ दिवसाच्या आत कोर्टाचे स्थगिती आदेश आणण्याचे संस्थळ प्रशासनाकडे कळवावे, संस्थळ प्रशासनाने असा दावा आलेले साहित्य लगेच २१ दिवसांपर्यंत काढून टाकायचे २१ दिवसात कोर्टाचा आदेश आणण्यात संबधीत दावा करणारे अयशस्वी झाल्यास ते साहित्य कोर्टाचा आदेश जेव्हा केव्हा पुन्हा येईल तो पर्यंत पुनः प्रकाशित करावयाचे.

यात संस्थळ प्रशासनाच्या दृष्टीने तांत्रिक अडचणी असणार आहेत कारण प्रताधिकार दावा असलेला मजकुर काढण्याची विनंती करताना संबंधीतांनी पुरावा देणे आणि संस्थळ प्रशासनाने तो तसा तपासणे अशी तुर्तास गरज नाही त्यामुळे कोणतेही साहित्यावर आरोप करून किमान २१ दिवस उडवत रहाण्याचा परवाना मिळत राहणार का ? हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे काही नवे निर्णय येई पर्यंत अथवा कायद्यात काही बदल होइ पर्यंत तरी तसे समजावयास हवे. एकुण मजकूर साहित्य खूप मोठे असेल ते उडवणे आणि तेवढेच २१ दिवसांनी पुनः प्रकाशित करणे तांत्रिक दृष्ट्या जिकीरीचे असु शकते हा अजून एक भाग झाला.

जिथ पर्यंत ज्यांच्यावर कॉपीराईट भंगाचा दावा आहे अशा लेखकांचा भाग झाला; कायद्याने त्यांची जबाबदारी खूप मोठी आहे. जिथ पर्यंत मला एक केस स्टडी आठवते (चुभूदेघे) साहित्यातील प्रताधिकार भंगाचा विचार करताना साहित्याची चोरी किती सबस्टँशियल प्रमाणात झाली आहे याचा न्यायालय विचार करते पण साहित्यिकाने एकाही वाक्याची चोरी कायद्या समक्ष कमी महत्वाची आहे असे समजण्याची चुक करू नये कारण अंतीम निर्णय न्यायालयावर अवलंबून असतात.

दुसरे प्रेरणा आणि चोरी यातील फरकही न्यायालये सर्वसामान्य वाचकाच्या हातात दोन्ही साहित्य दिल्या नंतर त्यांना ते चोरी सदृष्य साम्य वाटण्याची शक्यता आहे का हे विचारात घेण्यावर न्यायालयांचे निर्णय अंशतःतरी अवलंबून असावेत. एक साहित्यिक म्हणून शेवटचा सल्ला तुम्ही तुमच्या व्यक्तीगत व्यावसायिक कायदे तज्ञाचाच घेणे श्रेयस्कर पण असा सल्ला जर गाठीशी नसेल किंवा सल्ला घेण्यास वेळ लागणार असेल आणि इतर चार जण साहित्यात महत्वपुर्ण साधर्म्याचा आणि प्रताधिकार भंगाची शक्यता वर्तवत असतील तर सन्मान्य संकेतस्थळाची गरज म्हणून नव्हे तर साहित्यिकाने स्वतःस कायद्याच्या दृष्टीने सुरक्षीत करण्याच्या दृष्टीने संस्थळांवरून (अगदी स्वतःच्याही) संबंधीत मजकुर कायदे विषयक अधिकृत सल्ला मिळे पर्यंत काढून घेणे अधिक उचीत असेल असे माझा अंदाज आहे. यात तुमचे बरोबर आहात का नाही याचा संबंध नाही कारण न जाणो उद्या कोर्टात तुमची बाजू हरली तर इतरांनी सुचवूनही तुम्ही जाणीवपुर्वक प्रताधिकार भंग चालुच ठेवला असा अर्थ होतो. आणि जाणीवपुर्वक कृतीला प्रताधिकार भंग झाला असे न्यायालयाने स्विकारल्या नंतर न्यायालय अधिक गंभीर पणे घेते.

due diligence चा भाग म्हणून इतर संस्थळ सदस्यांनी लक्षवेधणे आणि त्यानुसार भारतीय संस्थळ व्यवस्थापनांनी कृती करणे अशी एक नियमी प्रक्रीया असावी या अंतर्गत चा लक्षवेध आणि संस्थळ प्रशासनाची कृती काय असेल याचे एक स्वतंत्र धोरण असावे आणि प्रताधिकार भंगाचा अधिकृत दावा करू इच्छिणार्‍या व्यक्तीं उपयूक्त निवडण्यास सुलभ संदेशही उपलब्ध असावेत असे माझे मत बनत चालले आहे.

मी येथील आणि मायबोली संस्थळावरील संबंधीत प्रतिसादांपलिकडे संबंधीत लेखकाचे फारसे वाचलेले नाही. म्हणून त्या बद्दल अधिक लिहितही नाही आणि मी या प्रतिसादातून लेखकावर टिकाही करत नाही आहे आणि या प्रतिसादातून प्रताधिकार भंगाचा माझ्यावतीने दावाही करत नाही आहे. एखाद दुसरा जो काही लेख (उपरोक्त वादाशी संबंध नसलेला) वाचला तो इतरत्रच्या लेखनाने अंशतः प्रभावित असावा असेच त्यावेळचे माझे व्यक्तीगत मत झाले होते. प्रताधिकारीत लेखनाच्या कॉपी पेस्टींगचा विचार करताना मला दोन वेगळ्या गोष्टी ज्या जाणवतात सिओईपीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विकिवर मागे एकदा बरिच टिका वाचण्यात आली होती जेव्हा मी गोष्ट जवळून समजून घेण्याचा प्रयत्न केला अत्यंत चांगली स्मरणशक्ती आणि सोबतीला मर्यादीत परिघातले (एका अर्थाने एकाच प्रकारचे एकाच विषयाचे एकाच लेखन शैली प्रकारचे इत्यादी) वाचन अशा व्यक्तींकडून प्रत्यक्ष लेखन होताना मूळ लेखनाचा प्रभाव समोर पुस्तक नसेल तरीही इतपत चांगला टिकून राहतो कि इतर वाचणार्‍यांना प्रताधिकार भंगाची सहाजिक शंका वाटावी. मला स्वतःला माझी स्मरणशक्ती कमी वाटते म्हणून विकिपीडियावर मला माझ्या शब्दात लेखन अधिक सोपे जात असावे आणि स्मरणशक्ती चांगली असलेल्यांना स्वतःच्या शब्दात लेखन तौलनीक दृष्ट्या कठीण जात असावे का ? असा विचार माझ्या मनात बर्‍याचदा येतो. दुसरे मराठी भाषेतील आलंकारीकता, रुपके आणि लेखनशैलीतही एकुण तोचतो पणा आला आहे कि कोणी लिहिलेतरी एकमेकाचे लिहिले असे वाटावे अशा प्रकारची चर्चा ऐसीवरील एका धाग्यातून वाचल्याचे आठवते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Mar 2015 - 9:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

मराठी भाषेतील अलंकारिकता, रुपके,आणि लेखनशैलीतही तोच तोपणा आलाय का हा मुद्दा मला बाकी प्रतिसादा इतका चांगला वाटला. क्रिकेटमधे जसे डाऊटऑफ बेनीफिट फलंदाजाला दिले जाते तसेच मला बेनीफिट लेखक महोदयांना द्यावे वाटत आहे, लेखन जर सर्वच कॉपी पेष्ट केले असेल तर प्रताधिकार भंग होतो. मात्र अनुवाद सारखा होत असेल तर मला वाटतं इथे डाऊट ऑफ् बेनिफिट दिले गेले पाहिजे. संशोधनामधे जसे कमीत कमी दहा ओळी, एखादा उतारा लेखकाचे उद्धृत जसेच्या तसे दिले असल्यास किंवा प्रतिपादनाचा सारांश दिला तर तळटीपेत नोंद करायची असते तेव्हा इथेही जर काही उतार्‍यात तसे होतच असेल तर तळटीप दिली पाहिज असे वाटत आहे. पण, इथे जर सारखा अनुवाद होत असेल तर गोष्ट वेगळी ठरते असे माझं मत आहे.

फेअर डिलिंग किंवा उचित वापर यात काही फायदा आहे का हाही विचार महत्वाचा ठरतो. लेखनातील काही उतारे जेव्हा गुणदोष कथन करण्यासाठी वापरतो तेव्हा असे कॉपी पेष्ट चालते. समालोचनासाठी असे उतारे चालते. जी घटना, जी उक्ती सर्वश्रुत आहे तेव्हा तळटीप देण्याची गरज नसते. फेरफार करुन लिहिलं असेल तरीही प्रताधिकार भंग होतो असे मला वाटते. आणि असा प्रताधिकार भंग होतोय असे वाटत असेल तर तसा दावा मुळ लेखकाने केला पाहिजे, कुठे प्रताधिकार भंग झाला आहे, हे सिद्ध करता आले पाहिजे तसे कुठे प्रताधिकार भंग होत नाही तेही सिद्ध झाले पाहिजे, असे मला वाटते.

प्रताधिकाराच्या बाबतीत अजूनही काही सिमारेषा या अंधुक आहेत असे वाटते. एकदा भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ च्या कायद्यावर मिपावर काथ्याकुटला पाहिजे असे मला वाटते.

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

12 Mar 2015 - 11:19 pm | माहितगार

* कॉपीराईट अ‍ॅक्ट १९५७ (कॉपीराईट ऑफीस या शासकीय संकेतस्थळावर)
* कॉपीराईट अमेंडमेंट बील २०१२ शासकीय संकेतस्थळावरील माझ्याकडील दुवा उघडत नसल्यामुळे पर्यायी वृत्तपत्रीय दुवा दिला आहे.
* सर्वसाधारणपणे मुळ कायद्याच्या प्रत्येक कलम अंमेंडमेंट आहे की नाही हे तपासत वाचावे लागेल + सोबत भारतीय सर्वोच्च न्यायालयातील, मुंबई उच्चन्यायालयातील आणि मग भारतातील इतर उच्च न्यायालयातील केसस्टडीज (निर्णय लक्षात घ्यावे लागतील) आजकाल जुन्या केसेस न्यायालयांच्या वेबसाइटवर तसेच indian kanoon सारख्या वेबसाईटवर शोधता येतात.

मी बेनीफीट ऑफ डाऊट व्यक्तीगत अनुभवावर आधारीत दिला कायद्याच्या तत्वावर हा युक्तीवाद किती टिकेल हे या घटकेला शंकास्पदच वाटते आहे. फेअर डिलचा बेनीफीट स्पार्टाकस यांच्या लेखनाची इतरांच्या लेखना सोबत वाक्य ते वाक्य तुलना करताना समीक्षण आणि टिका या दोन सदरांखाली इतर प्रतिसाद कर्त्यांना होऊ शकेल. ललितेतर लेखनात आपण म्हणतात तसे संदर्भ नमुद करताना काही अल्प-अंश तळटीपेत नमुदकरता येऊ शकतात अर्थात मुलतः तेही समीक्षणात मोडते म्हणून. (तुम्ही शालेय-महाविद्यालयीन शिक्षक म्हणून काम करताना शिक्षणक्रमाचा भाग वगैरेत थोडीशी अतिरीक्त मुभा मिळते इत्यादी) पण या फेअरडील मुद्द्यांचा स्पार्टाकस यांच्या सारख्या लेखनास फारसा लाभ घेता येईल असे वाटत नाही.

प्रताधिकार भंग होतोय असे वाटत असेल तर तसा दावा मुळ लेखकाने केला पाहिजे, कुठे प्रताधिकार भंग झाला आहे, हे सिद्ध करता आले पाहिजे तसे कुठे प्रताधिकार भंग होत नाही तेही सिद्ध झाले पाहिजे, असे मला वाटते.

२०१२ अमेंडमेंट आल्या नंतर प्रणेश प्रकाश यांचा विश्लेषणात्मक लेख आला होता. त्यानुसार
२०१२ अमेंडमेंट मधील तरतुदी संकेतस्थळांना त्रासदायक असून सध्याच्या स्थितीत कुणाही सोम्या गोम्याने प्रताधिकार भंग होतोय असे साधे म्हटले तरी असा आक्षेप घेतलेला मजकुर संबंधीत संकेतस्थळाने तातडीने वगळावा आणि २१ दिवस पर्यंत काही कोर्ट ऑर्डर येते आहे का याची वाट पहावी काही कोर्ट ऑर्डर नाही आल्यास संबंधीत मजकुर पुन्हा रिस्टोअर करावा. आता यात अजूनही एका अडचणी कडे प्रणेश प्रकाश लक्ष वेधतात जर मी माझी दहा वीस माणसे उभी करून म्हणजे केवळ संबधीत संस्थळावर दर २१ दिवसांनी नवी तक्रार नोंदवून मला नको असलेला मजकुर दाबण्यास संबंधीत संस्थळास भाग पाडू शकतो. अनलेस यातून अभिव्यक्ती स्वातंत्र्यास तडा जातो हे हायकोर्टातून ऑर्डर आणून काही बदल घडे पर्यंत संस्थळांना हि बाब स्विकारावी लागेल.

प्रताधिकार भंगाच्या प्रत्येक सर्वसाधारण आरोळीवर मजकुर उडवावा लागू नये म्हणून कोर्टात केस दाखल करत असल्याचे किमान आश्वासन संस्थळांनी मागावे. म्हणजे धोरण बाबीत याचा समावेश करावा. किमान पक्षी प्रत्यक्षात कोर्टकेस दाखल न करता नुसताच खेळ चालवला गेल्यास जबाबदार धरता येते. बाकी तुर्तास कुणीही तक्रार दिली तरी ती व्यक्ती प्रताधिकार भंगाने अफेक्टेड पार्टी आहे की नाही हे न पाहताही त्यांच्या दाव्यांची दखल घेणे संस्थळांना भाग आहे असे वाटते.

बाकी स्पार्टाकस यांना व्यक्तीगत स्तरावर बेनीफिट ऑफ डाऊट दिला तरी कायदे विषयक पातळीवर ते तुर्तास तरी अत्यंत वीक भासताहेत आणि त्यांनी तुर्तास तरी इगो पॉईंट बाजूस ठेऊन एक पाऊल मागे घेणे अधीक सयुक्तीक असू शकेल असे माझे व्यक्तीगत मत आहे. (हा कायदेशीर सल्ला नव्हे हे ओघाने आलेच)

असा प्रताधिकार भंग होतोय असे वाटत असेल तर तसा दावा मुळ लेखकाने केला पाहिजे,

प्रताधिकार कायदा १९५७ कलम ५२ उपकलम (१) क्लॉज (C) २१०२च्या अमेंडमेंटने अद्ययावत पुरेसे स्पष्ट आणि खालील प्रमाणे आहे.

written complaint from the owner of copyright in the work, complaining that such transient or incidental storage is an infringement, such person responsible for the storage shall refrain from facilitating such access for a period of twenty-one days or till he receives an order from the competent court refraining from facilitating access and in case no such order is received before the expiry of such period of twenty-one days, he may continue to provide the facility of such access

माहितगार's picture

12 Mar 2015 - 11:28 pm | माहितगार

प्रताधिकाराच्या बाबतीत अजूनही काही सिमारेषा या अंधुक आहेत असे वाटते. एकदा भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ च्या कायद्यावर मिपावर काथ्याकुटला पाहिजे असे मला वाटते.

या विषयावर अधिक अभ्यासपूर्ण चर्चा आणि लेखन होण्याची नितांत गरज आहे. वर मी कायद्यांच्या बेअर अ‍ॅक्टचा दुवा दिलाच आहे. कायदे विषयक भाषा वाचण्यास सुरवातीस जिकीरीची वाटू शकते पण ते अत्यंत गरजेचे आहे. नाही तर खाया पिया कुछ नही रांजण फोडा लाखोका उपर से चक्की पिस रहेथे छे महीना ! ज्याचा प्रताधिकार भंगाचा दावा आहे अशी व्यक्ती येत्या काही वर्षांच सेलच नुकसान झाल म्हणून केलेला दावा किमान स्वरुपाचा असू शकेल आणि प्रताधिकार भंग झालेल्या मजकुराला मिळालेल्या हिटा मोजून नुकसान भरपाई मागितली गेली तर रांजण फोडा लाखोका होणार म्हणून सर्वांनीच हा विषय अधिक व्यवस्थीत समजून घेणे गरजेचे आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2015 - 2:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार सर्व प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत प्रताधिकार विषय समजुन घेण्यास मदत होत आहे.

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

12 Mar 2015 - 11:41 pm | माहितगार

इथे जर सारखा अनुवाद होत असेल तर गोष्ट वेगळी ठरते असे माझं मत आहे.

समजा 'अ' हा मूळ इंग्रजी लेखक आहे, त्याचा 'ब' आणि 'क' या दोन अनुवादकांनी शब्दशः अनुवाद केले तर ते मिळते जुळते होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समजा या युक्तीवादात 'क' ने ब ची नक्कल न मारता अनुवाद केला असे गृहीत धरले तरी ते एवढे शब्दशः एकसारखे होत असतील तर ब आणि क या दोघांनी 'अ' ची अनुवादकरताना शब्दशः नक्कल मारली असे होते. मग तुम्ही 'अ' या मूळ लेखकाची अनुवाद करताना परवानगी घेतली होती का , हा प्रश्न शिल्लक राहतोच .

अजया's picture

12 Mar 2015 - 7:18 pm | अजया

सारांश सांगेल का कुणी सारांश!!

आदूबाळ's picture

12 Mar 2015 - 7:53 pm | आदूबाळ

सारांशः

प्रो-स्पार्टा लीग - नका सोडुन जाऊ ... रंगमहाल
अँटी-स्पार्टा लीग - मार ही त्राटिका, रामचंद्रा

सामान्य वाचक - कशी नशिबानं थट्टा आज मांडली

मोदक's picture

12 Mar 2015 - 8:20 pm | मोदक

__/\__

:))

अत्रन्गि पाउस's picture

12 Mar 2015 - 8:46 pm | अत्रन्गि पाउस

ठ्ठो :D

आतिवास's picture

12 Mar 2015 - 9:21 pm | आतिवास

:-)

आनन्दिता's picture

12 Mar 2015 - 9:46 pm | आनन्दिता

____/\___

धन्य !! =))

सामान्य वाचक's picture

12 Mar 2015 - 9:59 pm | सामान्य वाचक

माझे नाव वाचून गोंधळ झाला ना

हाडक्या's picture

12 Mar 2015 - 10:06 pm | हाडक्या

:)))

आदुबाळ, या चारोळी सारांशाबद्दल एक मद्यकुपी तुम्हांस.. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Mar 2015 - 10:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

+D

अत्रुप्त आत्मा's picture

13 Mar 2015 - 12:26 am | अत्रुप्त आत्मा

प्रो-स्पार्टा लीग - नका सोडुन जाऊ ... रंगमहाल
अँटी-स्पार्टा लीग - मार ही त्राटिका, रामचंद्रा

सामान्य वाचक - कशी नशिबानं थट्टा आज मांडली

http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif....http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif....http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif....http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif....http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif....http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif....http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif....http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif....http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif....http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif

नाखु's picture

13 Mar 2015 - 8:49 am | नाखु

_/\_

ब़जरबट्टू's picture

13 Mar 2015 - 9:19 am | ब़जरबट्टू

अगदी अगदी... :))

मृत्युन्जय's picture

13 Mar 2015 - 10:25 am | मृत्युन्जय

यासाठी एक दंडवत स्वीकारावा आदूबाळ

बॅटमॅन's picture

13 Mar 2015 - 2:05 pm | बॅटमॅन

अगागागागागागागा =)) =)) =)) _/\_

मैत्र's picture

13 Mar 2015 - 5:49 pm | मैत्र

एक दंडवत घ्या..
काय ह्सलोय , काय हसलोय...

आदूबाळ, मेड माय डे...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Mar 2015 - 8:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आदुण्णा

एक वडक्कम हाणतो _/\_

अजया's picture

12 Mar 2015 - 9:48 pm | अजया

a

पैसा's picture

12 Mar 2015 - 10:19 pm | पैसा

एकेक पाणबुडी देऊन संबंधितांचा सत्कार करण्यात येत आहे.

-जेपी-

आता महत्त्वाचे माझे २ पैसे.

१) स्पार्टाकस यांचे इतर सर्वच लिखाण मिपावर कौतुकाने वाचले गेले आहे.
विच हंटिंग आणि स्कोअर सेटलिंग मिपावर तरी नक्कीच झालेले नाही.

२) एकाच पुस्तकाची २ भाषांतरे असतील तर त्यात शब्द आणि वाक्ये सारखी असू शकतील. अन्य कादंबरी बरीच प्रसिद्ध असेल असे लेखकाचे नाव 'निरंजन घाटे' पाहून वाटले. त्या पुस्तकातील उतारे मिपावर कॉपी पेस्ट करण्याएवढे स्पार्टाण्णा गतिमंद नक्कीच नाहीत. मात्र कोणत्या मूळ कादंबरीच आधार घेतला आहे हे त्यांनी सांगितल्यास बरे होईल.

३) भाषांतरात साम्य असल्याचा खुलासा वाचकांनी स्वीकारला तरी कॉपीराईट कायद्याच्या कचाट्यात सापडल्यास स्पार्टाकस यांना बराच त्रास सहन करावा लागेल, विशेषतः श्री घाटे न्यायालयात गेले तर हे उतारे त्यांच्या पुस्तकातून घेतले नाहीत हे सिद्ध करणे अवघड आहे. तेव्हा त्यांनी या वादाला इथेच पूर्णविराम देऊन पुढे वाटचाल सुरू करावी.

ज्यांना ही साम्यस्थळे सापडली त्यांच्या चौफेर वाचनाबद्दल कौतुक आहेच. तसेच मिपावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून सजग राहून हे सर्व प्रकरण नजरेस आणून देणार्‍यां मित्रांचे विशेष आभार. मात्र आता एकमेकांना दुखवण्याचा कार्यक्रम सर्वांनीच बंद करावा ही विनंती.

आनन्दा's picture

12 Mar 2015 - 10:26 pm | आनन्दा

विच हंटिंग आणि स्कोर सेटलिंगचे आरोप इतरत्र एका संस्थळावर झालेल्या पर्सनल टीकेवरोन झालेले आहेत असे वाटते.

स्मिता श्रीपाद's picture

13 Mar 2015 - 11:03 am | स्मिता श्रीपाद

पैसा ताई शी १००% सहमत
मी या कादंबरीवर मनापासुन प्रेम केलं होतं...त्यामुळे सुरुवातीला मलापण खुप धक्का बसला हा धागा बघुन
पण आता खरच असं वाटतय की २ वेगवेगळ्या लेखकांनी एकाच पुस्तकाचा संदर्भ घेउन लिखाण केलं तर ते ९५% तरी एकसारखच उतरणारच....
त्यामुळे मला वाटत की आता खरच हा विषय बास करुयात.
आणि हा काही अगदी खून केल्याएवढा मोठा गुन्हा नाहीये....त्यामुळे प्लीज हे आरोप प्रत्यारोप बास करुयात
स्पार्टाकस यांनी यापुढे लिहायचं की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्ण आहे...
पण त्यानी लिहित राहावं अशी मनापासुन ईच्छा माझ्यासकट ईथल्या अनेक लोकांची आहेच :-)

रवीराज's picture

13 Mar 2015 - 2:15 pm | रवीराज

पुर्णपणे सहमत.

इरसाल's picture

13 Mar 2015 - 2:32 pm | इरसाल

१. समजा न्यायालयात सिद्ध करायचे ठरवले की हे चोप्य पस्ते आहे. तर, न्यायालय ही कथा नी ते आधीचे पुस्तक दोन्ही ओळ नी ओळ वाचणार काय की त्या कामाला वाचकाम्या ठेवणार.बर वाचल्यानंतर किती दिवस लागतील ह्यावर काही निर्णय किंवा शिक्षा द्यायला.
२. समजा वर काही लोक जस म्हणताहेत तसं झालेल असेल तर मला त्या वाचनातुन मिळालेला आनंद व्यर्थ कसा ?
ह्यावर मला फार दु:ख झाले, धक्का बसला, अशी अपेक्षा नव्हती वगैरे, चुकीचे आहे वगैरे मला निरर्थक वाटते (हे माझ स्वतःच मत आहे).

आता मिपावर नाही का प्रतिसाद देताना आपण सरळ सरळ पुलंची वाक्य कशी चोप्य पस्ते करतो(तेव्हा कोणीही काही बोलत नाही लब्बाड कुठले उम्म्म ! मी नाय ज्जा !)

मला त्या वाचनातुन मिळालेला आनंद व्यर्थ कसा ?

"त्या वाचनातून" म्हणजे सरळ सरळ "जशीच्या तशी उचललेली वाक्यांच्या वाचनातून" असं म्हणायचं असेल,तर त्या आनंदाचं श्रेय कुणाचं? ज्याचं त्याला ते श्रेय मिळालं का?

इरसाल's picture

13 Mar 2015 - 4:34 pm | इरसाल

म्हणण पटलं.
सम्जा दिल नाही नाव त्याने पडणारा फरक नाव दिल्याने कितपत बदलेल.समजा *वर्जिनल लेखक कै. झाला असेल तर, हे म्हणजे काही केस मधे मरणोपरांत भारतरत्न दिल्या सारखे किंवा मेल्यावर परमवीर चक्र दिल्यासारखे वाटते.(कदाचित उदाहरन चुकीचे वाटु शकते)

फरक नाव दिल्याने कितपत बदलेल

फरक तर नक्कीच पडेल. वाचकांना, लेखकाला, आणि ज्याच्या लेखनाची नक्कल झाली आहे त्यांनाही असा फरक जाणवेल.

इथे लोक चिडले आहेत, याचाच अर्थ काही वाचकांना तरी नक्कीच फरक पडला आहे. स्पार्टाकस यांच्या लिहिण्याचे अक्षरशः पंखे झालेले होते असे इथे बरेच आहेत-त्यात मीही आहे.

लिहिणार्‍याला फरक पडेल, कारण आपण जे लिहिलं आहे, ते खरं तर आपण फक्त टायपिंग करत आहोत - त्यामागची प्रतिभा आपली नाही हे त्याने सांगितलेलं असेल. आता तो असं दाखवतोय की ही सगळी त्याचीच प्रतिभा आहे.

आणि मुळ लेखकाला फरक पडेल कारण त्याला आता माहित झालेलं आहे की कुणीतरी त्याचं लिखाण वापरून स्वतःच्या आजुबाजुची सजावट करत आहे. याचा- या माहितीचा- त्याला काय फायदा आहे, हे तर त्या व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून असेल.

लेखक कै. झाला असेल तर काय हे थोडे कायदेशीर झाले. हक्क तर कुणाकडे तरी दिलेलेच असतात आताशा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2015 - 3:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्र १ला
उत्तर : मा. न्यायालय पुस्तक वाचत बसणार नाहीत असे वाटते. पार्टीच्या दोन्ही वकीलांना कुठे कुठे चोप्य पस्ते आहे त्या प्रत्येक ओळीखाळी अंडरलाईन करायला लावतील आणि किती चोप्य पस्ते आहे त्याचा शोध मा.न्यायालय घेईल.

प्र.२ रा.
उत्तर : आनंद व्यर्थ जाऊ शकत नाही. मात्र आनंदावर विरजण पडू शकते.

मिपावर नाही का प्रतिसाद देताना आपण सरळ सरळ पुलंची वाक्य कशी चोप्य पस्ते करतो

पुलंची वाक्य सर्वश्रृत असल्यामुळे तळटीप देण्याची गरज नाही. संशोधन सिद्धांत आणि पद्धती या पुस्तकात डॉ.सदा क-हाडे म्हणतात-

”ज्ञानेश्वरीचा किंवा तुकारामाच्या अभंगाचा दाखला देतांना ज्या ओळी सर्वशृत आहेत त्यांना तळटीप देण्याची गरज नाही.

'’मऊ मेणाहुनि विष्णुदास आम्ही' ''ना.सी.फडके कलावादी होते'' ''वि.स.खांडेकर जीवनवादी होते'' ''केशवसुत हे आधुनिक मराठी कवितेचे जनक आहेत'' ही विधाने सर्वसाधारण, सर्वश्रुत, सर्वसंमत आहेत. तळटीपेत त्यांचे स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नसते'' 
 
संदर्भ : १. डॉ.सदा कर्‍हाडे, संशोधन सिद्धांत आणि पद्धती, प्रकाशन, लोकवाङ्मय गृह,मुंबई.आवृत्ती दुसरी.पृ.क्र.१३१.

-दिलीप बिरुटे

इरसाल's picture

13 Mar 2015 - 4:30 pm | इरसाल

पण मग ते सर्वश्रुत आहेत ह्याचा क्रायटेरिया काय ?
आता आनंदावर विरजण पाडुन घेणे न घेणे आपल्याच हातात, बरेचसे हिंदी सिनेमे आणी मराठी सिनेमे हे ही भ्रष्ट नक्कल असतात. अक्षरशः एकीकडचा नायक जितक्या पायर्‍या चढुन खलनायकाला लात मारतो दुसरिकडे तितक्याच पायर्‍या, लाकडी कठडे, लोंबकळणार्‍या साखळ्या सारख्याच अस वाटतं पट राखुनच ठेवला होता की कॉय ?

अजया's picture

13 Mar 2015 - 2:36 pm | अजया

आता खरोखरच बास करावा हा विषय.मेलेल्याला मारण्यात काही अर्थ नाही.

गजानन५९'s picture

13 Mar 2015 - 4:50 pm | गजानन५९

पैसाताई यांच्याशी सहमत

पण मला १ प्रश्न खूप जेनुएन्लि पडला आहे सर्व जण विषकन्या विषयी बोलले पण “ गुड मोर्निंग म्याडम” मधील साम्याविषयी विषयी स्पार्टाकस यांनी काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही :(

हम्म मी ललित साहित्याचा रेग्यूलर वाचक नसल्यामुळे असेल कदाचित माझी माहिती जरा कमी पडत होती असे दिसते, एनी वे एकुण हे जे काही प्रकरण आहे त्याची कायदे विषयक अकॅडेमीक सर्कल मध्ये फॅन फिक्शन म्हणून चर्चेत आहे असे दिसते. या संबंधाने गूगल शोधात दोन भारतीयांचे लेख हाती लागले त्यात झोया नफीस यांच्या लेखात फॅन फिक्शन करताचा सॉफ्ट कॉर्नर दिसून येतो आणि ते फेअरयूज कसे आहे वगैरे तर दुसर्‍या किरण मेरी जॉर्ज यांच्या लेखात भारतीय दृष्टीकोणातून अधिक डिटेल्स येताना दिसतात किरण जॉर्ज त्यांच्या लेखाची सुरवातच "Fan fiction writers, you’re walking on thin ice! " अशी करताना दिसतात. किरण जॉर्ज यांचा लेख अधिक अभ्यासपूर्ण वाटतो.

बाकी इतर काही चांगले लेख आंजावर आढळले त्यांचे दुवे :

इंग्रजी विकिपिडियावरील हे दोन लेख खुपच प्रायमरी माहिती देतात
* Fan fiction -इंग्लिश विकिपीडिया
* Legal issues with fan fiction

अधिक वाचनासाठी (ब्रिटीश आणि आमेरीकन दृष्टीकोणातून)

* Sequel rights: are fictional characters, plots and themes protectable?- Harbottle & Lewis
* Are fan fiction and fan art legal? Lauren Davis

Rajnandini's picture

10 Jun 2018 - 1:06 pm | Rajnandini

i am new member of misalpav. Dead man's hand series cought my attention.. thats why became member of misalpav. i want to read Trap.. but not getting link for 1st 4 parts and the last one also.. can anyone help?

हस्तर's picture

8 Nov 2019 - 4:17 pm | हस्तर

बुम्प