✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ट्रॅप आणि विषकन्या बद्दल आरोप

स
स्पार्टाकस यांनी
Tue, 03/10/2015 - 04:32  ·  लेख
लेख
ट्रॅप या कादंबरीवर झालेल्या आरोपांवरुन बुकगंगा वरुन विषकन्या ही कादंबरी विकत घेऊन मी वाचून काढली. ही कादंबरी ई-बुक स्वरुपात उपलब्ध आहे जी आयपॅड किंवा इतर कोणत्याही टॅबमध्ये डाऊनलोड केली जाऊ शकते. वाचताना मला स्वतःला मूळ संकल्पना आणि काही गोष्टींतील साधर्म्य जाणवलं, परंतु सगळी कादंबरीच चोरली आहे असा आरोप करणार्‍यांपैकी किती जणांनी विषकन्या वाचली आहे याबद्दल मला शंका येऊ लागली आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी अमेरीकेच्या फुल्टन या पाणबुडीसंदर्भात एक लेख वाचनात आला. ही पाणबुडी अमेरीकन सरकारच्या अधिकार्‍यांना पत्ता लागू न देता रशियात स्मगल करण्यात आली या संदर्भात तो लेख होता. या लेखाचा आधार पकडून रशियन सरकारकडून भारताला मिळणारी अण्विक पाणबुडी कशा तर्‍हेने भारतात आणता येऊ शकते ही कल्पना डोक्यात आल्यावर या कादंबरीची मूळ संकल्पना तयार झाली. उरलेली कथा या मूळ संकल्पनेच्या भोवताली रचलेली आहे. ज्यांनी विषकन्या वाचली आहे आणि वाचलेली नाही त्यांच्यासाठी - विषकन्या कादंबरीत भारताकडे येणारी पाणबुडी ही बेरींगच्या सामुद्रधुनीतून आणि चीनच्या दक्षिणेकडून मुंबईत पोहोचते असा उल्लेख केलेला आहे. या मार्गाने पाणबुडी आणण्यात असलेला धोका ट्रॅपमध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे. सुएझ कालव्यातून ज्या पद्धतीने वाहतूक केली जाते ती कॉन्व्हॉय पद्धत याचा विषकन्या मध्ये उल्लेख कोणाला आढळला का? हे डीटेलींग मी इंटरनेटवरील माहिती वाचून केलं आहे. पाणबुडीच्या प्रवासाचं डीटेलींग करताना दोन बंदरांमधील अंतर आणि त्यासाठी लागणारा वेळ याचा अंदाज करण्यासाठी मी ही साईट वापरली - http://ports.com/sea-route/ या साईटवर आपल्या दोन्ही बंदरांचे डीटेल्स आणि पाणबुडीचा वेग ही माहिती दिल्यावर प्रवासास लागणारा वेळ दिसू शकतो. दोन्ही पाणबुड्यांच्या प्रवासाचा अंदाज घेण्यासाठी आणि डीटेलिंग करण्यासाठी मी हे तंत्रं वापरलं होतं आणि त्यावरून लागलेल्या वेळेचा अंदाज बांधला होता. विषकन्या मध्ये हे कोणाला आढळलं का? हे डीटेल्स कॉपी केले होते हा आरोप कशाच्या आधारावर केला आहे? पाणबुडीच्या मार्गाच वर्णन करताना केप ऑफ गुड होपच्या परिसरातील वादळाचा कोणता संदर्भ विषकन्या मध्ये आढळतो? मुळात विषकन्यामध्ये केप ऑफ गुड होपशी काही संबंध आला आहे का? याच पाणबुडीच्या संदर्भात उल्लेख आलेल्या वेगवेगळ्या मिसाईल्सच्या प्रकारांचा आणि अ‍ॅटॉमिक न्यूक्लीयर मिसाईलचा साधा उल्लेखतरी विषकन्यामध्ये आला आहे का? या संदर्भात इतर कोणती कादंबरी चाफा किंवा आणखीन कोणी वाचली आहे का? विषकन्या हे कथानाक वाचल्यास ते भारतात राजीव गांधी आणि पाकिस्तानमध्ये बेनझीर भुट्टो पंतप्रधान असतानाच्या काळातलं आहे हे समजून येऊ शकतं. त्या काळात उल्लेख केलेली रशियन पाणबुडी १९९० मध्येच रशियन नौदलातून निवृत्त करण्यात आली. ज्या अत्याधुनिक पाणबुडीचा ट्रॅपमध्ये उल्लेख आहे, ती आजही रशियन नौदलात कार्यरत असलेली अणुपाणबुडी आहे हे कोणाला माहीत आहे काय? मूळ संकल्पना आणि काही तपशील समान आले म्हणून संपूर्ण कादंबरी चोरली आहे असा आरोप करताना या सर्व संदर्भांचा कोणी साधा विचार तरी केला होता का? आतापर्यंतच्या माझा इतर लेखनात प्रत्येक वेळी मी वापरलेल्या संदर्भ ग्रंथांचा मूळ लेखकाच्या नावासकट मी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. केनेथ अँडरसनच्या ज्या शिकारकथांचा मी अनुवाद केला आहे त्याच्या प्रताधिकारावरुन मी प्रशासनाला स्पष्टीकरणही दिलेलं होतं आणि ते मान्यं करुन प्रशासनाने या कथा पुन्हा प्रकाशित केल्या आहेत. या सगळ्या प्रकारात मला स्वत:ला आता विच हंटींगचा आणि स्कोर सेटलींगचा वास येऊ लागला आहे. या सगळ्यानंतर मिसळपावच काय, पण इतर कोणत्याही मराठी संस्थळावर काहीही लेखन करण्याची माझी इच्छा नाही, कारण ते पूर्वग्रहदूषीत नजरेनेच पाहिलं जाईल याची मला खात्री आहे. तस्मात, अखेरचा नमस्कार!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
42257 वाचन

💬 प्रतिसाद (131)

प्रतिक्रिया

हे म्हणजे सालां चोर तो चोर वर

विशाल कुलकर्णी
Tue, 03/10/2015 - 18:29 नवीन
हे म्हणजे सालां चोर तो चोर वर शिरजोर !
  • Log in or register to post comments

साला आजचा दिवसच खराब गेला

गजानन५९
Tue, 03/10/2015 - 19:05 नवीन
साला आजचा दिवसच खराब गेला एकूण :(
  • Log in or register to post comments

स्क्रिन शॉट चालणार असतील तर

चाफा
Tue, 03/10/2015 - 19:37 नवीन
स्क्रिन शॉट चालणार असतील तर टाकू शकतो. अर्थात संमंची परवानगी असेल तर
  • Log in or register to post comments

हान तिज्यायला.....

जे.पी.मॉर्गन
Tue, 03/10/2015 - 19:41 नवीन
पडला का दुधात मिठाचा खडा! जे.पी.
  • Log in or register to post comments

यावरून आठवले

श्रीरंग_जोशी
Tue, 03/10/2015 - 19:51 नवीन
नऊ वर्षांपूर्वी घडलेले हे बहुचर्चित प्रकरण. Kaavya Viswanathan Plagiarism
  • Log in or register to post comments

चांगली माहिती मिळाली.

असंका
Wed, 03/11/2015 - 10:55 नवीन
चांगली माहिती मिळाली. धन्यवाद....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

मला स्पार्टाकस यांची अजिबात

चिमिचांगा
Wed, 03/11/2015 - 01:04 नवीन
मला स्पार्टाकस यांची अजिबात भलामण करायची नाही, पण या निमित्ताने मिपावर काही काळापूर्वी आलेला जुन्या हिंदी संगीतकारांच्या संगीताचौर्याबद्दलचा धागा आठवला. तेव्हा अनेकांनी तावातावाने संगीतकारांच्या बाजूने लिहिलं होतं. चोरी अ‍ॅक्सेप्टबल असण्या/नसण्याचे नक्की काय नियम असतात? एकीकडे संगीतचौर्य करून लाखो रु. कमावणार्या, अ‍ॅवॉर्ड गोळा करणार्‍यांबद्दल कोणी काही ऐकून घ्यायला तयार नाही, पण संकेतस्थळांवर हौस म्हणून विनामूल्य काहीबाही लिखाण करणारा कुणी सदस्य इकडेतिकडे हात मारताना पकडला जातो, आणि झोडपला जातो, यात एक विरोधाभास जाणवतो, नाही का? (विचारात पडलेला...)
  • Log in or register to post comments

मला पण ज्या पद्धतीने निषेध

स्रुजा
Wed, 03/11/2015 - 01:11 नवीन
मला पण ज्या पद्धतीने निषेध केला जातोय ते खटकतंय. काही प्रतिसाद त्यांच्या विरुद्ध असून पण संतुलित आहेत. गवि, म्रुत्युन्जय आणि अजून पण काही. पण सगळेच तो संयम पाळत नाही आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिमिचांगा

Correction: संगीताचौर्य नाही,

चिमिचांगा
Wed, 03/11/2015 - 01:12 नवीन
Correction: संगीताचौर्य नाही, संगीतचौर्य.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिमिचांगा

संगीताचौर्य करणारे साहेब श्री

बॅटमॅन
Wed, 03/11/2015 - 12:54 नवीन
संगीताचौर्य करणारे साहेब श्री श्री महंमद अझरुद्दीन, नैका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिमिचांगा

"अनेकांनी तावातावाने

रामपुरी
Wed, 03/11/2015 - 02:39 नवीन
"अनेकांनी तावातावाने संगीतकारांच्या बाजूने लिहिलं होत" असं असेल तर त्याला दुतोंडीपणा म्हणता येईल. पण त्यामुळे चोरीचे समर्थन होत नाही. शेवटी र्‍हदयनाथ मंगेशकरानी केली काय किंवा स्पार्टाकसनी केली काय चोरी हि चोरीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिमिचांगा

हृद्यनाथ मंगेशकर

अत्रन्गि पाउस
Wed, 03/11/2015 - 05:34 नवीन
हृद्यनाथ मंगेशकर ... हे जाहीर पणे कोणते गाणे कोणत्या रचनेवरून सुचले / उचलले हे निस्संकोच सांगतात ... किंबहुना तसे ते गाऊन दाखवतात हि ... एवढेच नाही तर ..त्यांच्या मते .कोणतीही सांगीतिक रचना हि संपूर्णपणे स्वतंत्र असूच शकत नाही ..ती त्या संगीतकाराने तो पर्यंत ऐकलेल्या सुरावटींच्या परीपाकाचा एक अंश असतो विषकन्या आणि गुड मॉर्निंग मादाम ह्यांचे ब्लेंडिंग सोपे नाहीच आणि प्रस्तुत वाद निर्माण व्हायच्या आधीपर्यंत trap नाव नवीन लोक वाचत होतेच आणि कौतुकाने वाचत होते ... इथे प्रश्न मूळ कलाकृतीचे ऋण मान्य करण्याचा आहे ..आणि ते मुळातून नाकारणे पटत नाही ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी

+१

नाखु
Wed, 03/11/2015 - 08:52 नवीन
कला़कृती बेतलेली आणि हुबेहुब नक्कल यातला नेमका फरक समजेल तो सुदीन. वरती उधृत केलेल्या धाग्यावरचा माझा आणि बॅट्याचा प्रतिसाद चोपून पेस्त करतोय (होऊ दे चोरीचा आळ)
आपल्या अल्पमतीला... नाद खुळा - Tue, 14/01/2014 - 11:48 फक्त इतकेच माहीती कि: •मी घरी (माझ्या/मित्राच्या/नातेवाईंकाच्या) बनविलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना हे कुणाचे पाहून (नक्कल) म्हनून बनविले हे पाहात नाही. काही पुस्तकात पाहून/जालावर वाचून अगदी हुकुमबर्हूकुम बनविले असतील तरी,बल्ल्वाचर्य्/र्यीचे हातगुण त्या पदार्थांवर संस्कार करतातच. •तत्द्वत हाटेलातून पदार्थ आणून ते घरीच केले आहेत असे भासविणार्यांच्या पंगतीत मि वरच्या नक्कल कारांना बसविणार नाही पहिल्यामधल्यांनी किमान अक्कल्/श्रम्/प्रयत्न केलेले असतात दुसरयानी फक्त दिखावा (श्रेयासाठी) आणि हो तिळगुळ घ्या गोड बोला. घरोघरीच्या तिळगुळात मुख्य घटक तेच असले तरी प्रत्येकाची चव वेगळी असते,तोच दृष्टीकोण बेतलेल्या गाण्यांबाबत ठेवायला काय हरकत आहे? बेतलेल्या हा शब्द हे दिलेल्या दुव्यावरिल इन्स्पायर्ड चे स्वैर भाषांतर आहे. जागोजागी हाच शब्द वापरला आहे. एकवेळ बॅटमॅन - Sun, 12/01/2014 - 22:21 नैतिकता वैग्रे १२ गडगड्यांच्या व्हिरीत घाला. पण सगळे भामटे आजच उपटले अन पूर्वी कोणीही उधार उसनवार करीत नव्हते असा काङ्गावा चूक आहे हे मान्यच. तरीही मी म्हणेन- पूर्वीही चोरी चालायची पण उस मे कुछ दम जरूर था. फक्त व्हर्बॅटिम चोरी नव्हती. थोडे ट्वीकिंगही असावे. पण जे काही होते ते ऐकायला आजही उत्तम वाटते. नैतर अलीकडे पहा, थोडे अपवाद वगळले तर गाणी श्रवणीय नसतात-चोरी ऑर नो चोरी. तस्मात अलीकडच्यांना शिव्या घालायच्या तर चोरतात म्हणून नाही तर डोके वापरत नाहीत म्हणून घालायला हव्यात. बाकी प्रदीप यांचा प्रतिसाद लैच आवडल्या गेला आहे. हॅट्स ऑफ!!!! _/\
================ बॅटमन यांनी वरील प्रतिसाद येथे वापरू दिल्याबद्दल योग्य तो मान व नक्की धन (मिसळ रूपात) दिले जाईल. अखिल मिपा मांपकाढे समीती संचालीत चौर्य्संशोधन-स्वम्ग्न्मूर्ख्जन्तैल्बुद्धीवर्धनबुद्धीभेदनीर्क्षीविवेक मंडळातर्फे "मिपास्वछ्ता अभियानाकरीता प्रसारीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

अखिल मिपा मांपकाढे समीती

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 03/11/2015 - 09:09 नवीन
अखिल मिपा मांपकाढे समीती संचालीत चौर्य्संशोधन-स्वम्ग्न्मूर्ख्जन्तैल्बुद्धीवर्धनबुद्धीभेदनीर्क्षीविवेक मंडळातर्फे "मिपास्वछ्ता अभियानाकरीता प्रसारीत.
अनुस्वाराची जागा प वर आहे =)) बाकी ब्रुस्वेणच्या प्रतिसादाशी बर्‍यापैकी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

काढलीच मापं लगेच... ;)

हाडक्या
Wed, 03/11/2015 - 15:58 नवीन
काढलीच मापं लगेच... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

फरक

विशाखा पाटील
Wed, 03/11/2015 - 09:47 नवीन
लेखकावर इतर लेखनाचा प्रभाव असतो, हे मान्य. टी. एस. इलिअट यांचा या विषयाशी संबंधित 'Tradition and Individual Talent' हा निबंध आहे. त्यांच्या मते, लेखक भूतकाळालं इतरांचं लेखन आणि वर्तमानकाळ यांची सांगड घालतात. ती व्यक्ती परंपरेचा एक भाग असते आणि परंपरेशी जोडले जातांना नाविन्याची (हे individual talent) भर घालते. शेक्सपिअरची नाटके किंवा आपल्याकडे महाकाव्य आणि मिथ्यकथा यांवर आधारित कलाकृती यात नाविन्यतेचं वैशिष्ट्य दिसतं. इथे जो मुद्दा आहे तो फक्त तेवढ्यापुरता मर्यादित नाही, असे दिसते. वाक्य आणि प्रसंग जसेच्या तसे लिहिण्याचा आहे. एवढं साम्य कोणत्याही दोन लेखनात येत नाही. (एका सिनेमाची ष्टोरीही दोन जण वेगवेगळ्या शब्दात सांगतात किंवा आठवा ते शाळेतले फळ्यावर लिहून दिलेले निबंध जसेच्या तसेच लिहितांना होणारी दमछाक:) हा मुद्दा साहित्यिक चोरीचा आहे. दुर्दैवाने आपल्याकडे याविषयी 'चलता है' अशी वृत्ती आहे. चारपाच वर्षांपूर्वी जर्मनीतल्या एका मंत्र्याने प्रबंधात चौर्य केल्याचे उघडकीस आले तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. संबंधित लेखकाने कथाबिजाबद्दल खुलासा केला आहे, पण उतारे जसेच्या तसे वापरणे याबद्दल खुलासा केलेला नाही, असे दिसतेय.
  • Log in or register to post comments

सहमत..

संदीप डांगे
Wed, 03/11/2015 - 13:42 नवीन
विशाल भारद्वाज ने शेक्सपीअरच्या अजरामर कलाकृतींवर आधारीत ओंकारा, मक़बूल आणि हैदर हे चित्रपट काढले. त्याचे शेक्सपीअरला उचित श्रेयही दिले. तरी हे तीनही चित्रपट स्वतंत्र म्हणावे असे लिहिले गेले आहेत. हुबेहुब नक्कल नाही. आता मूळ शेक्स्पीअरची नाटकेही जिवनात सामान्यपणे आढळणार्‍या अतिसामान्य घटनांवर आधारीत होती. त्याला आपल्या कौशल्याने राइचा पर्वत शेक्सपीअरने केले. पण म्हणून विशाल भारद्वाजने मी शेक्सपीअरची नाटके पाहिली नाहीत, कथासूत्र समान असले म्हणून काय, ती तर सामान्य कथानके आहेत वैगेरे कांगावा केला नाही. समजायला लागले तेव्हापासून कलाकार म्हणजे एकच व्याख्या डोक्यात आहे ती म्हणजे: 'चिंधीलाही राजवस्त्र म्हणून जे सादर करू शकतात तेच खरे कलाकार, दुसर्‍याच्या राजवस्त्राला आपले राजवस्त्र म्हणून चिंधीगिरी करतात ते नकलाकार' *नकलाकारः हुबेहुब नक्कल करणारे, स्टँड-अप कॉमेडीयन नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील

चिंधीलाही राजवस्त्र म्हणून जे सादर करू शकतात तेच खरे कलाकार ??

अत्रन्गि पाउस
Wed, 03/11/2015 - 13:52 नवीन
भीमसेन, कुमार, लता, किशोरी, राजा रविवर्मा, बच्चनसाहेब, पुल ... आम्ही ह्यांना उच्च प्रतीचे कलाकार मानतो कारण ते चिंधीला राजवस्त्र म्हणून सादर करतात असे म्हणायचे आहे आपल्याला ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

हो. साहेब.

संदीप डांगे
Wed, 03/11/2015 - 14:15 नवीन
हो. साहेब. जरा माझ्या म्हणण्याचा मतितार्थ लक्षात घेतला तर आपणास ते लक्षात येइल. त्यांच्या असामान्य कलेने ते सामान्य गोष्टींनाही एका असामान्य पातळीवर नेऊन ठेवतात. ते जे सादर करतात ते चिंधी असते असं नाही म्हणालो मी. मी गायलेलं ''इंद्रायणी काठी" मुळात कितीही चांगलं गाणं असले तरी पं. भीमसेनजींनी म्हटल्यावर त्याल जे देवत्व प्राप्त होतं ते त्यांच्या कलेनी. पुलंनी आपल्या रोजच्या जीवनातलेच साधे-साधे प्रसंग निवडून आपल्या असामान्य निरिक्षण कलेने, विनोदबुद्धीने त्यांना अजरामर करून ठेवले आहे, 'म्हैस' सारखा प्रसंग कितीतरी लोकांच्या आयुष्यात रोज घडत असेल. पण गोष्ट मांडून तीला असामान्य केले ते पुलंनीच. इतके की आताही कुणी अशा प्रसंगाचे वर्णन केले तर 'म्हैस'चेच आठवण येते हमखास. तसेच तुम्ही म्हणताय त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल म्हणता येइल. 'पा'मधे अमिताभच्या ठिकाणी दुसर्‍याची कल्पना करू शकत नाही. शोले, जंजीर, काला पत्थर पासून आंखे पर्यंत सामान्य व्यक्तिरेखांना असामान्य पातळीवर नेण्यात अमिताभला कुणाचे आव्हान आहे? गैरसमज नसावा. धन्यवाद! जाता जाता, केसरीया बालमा वेगवेगळ्या कलाकारांनी रंगवलेले एकाच ठिकाणी. सगळे दिग्गज आहेत. आनंद घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

ओके ओके

अत्रन्गि पाउस
Wed, 03/11/2015 - 16:04 नवीन
कळले ... गैरसमज नाही हो ... रच्याकने : केसरिया ऐकून मग सांगतो ...पण धन्यवाद आधीच ...:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

करतात नाय हो... करू शकतात असं

असंका
Wed, 03/11/2015 - 14:46 नवीन
करतात नाय हो... करू शकतात असं म्हणाले होते ते अगोदर. (आता वर ते परत आपल्याला "हो" सुद्धा म्हणालेत ते सोडा.) पण एखादा माणूस अगदी अवघड गोष्टही करू शकतो म्हणून तो जे जे करतो ते सगळंच तेवढंच अवघड असेल असं कसं म्हणता येइल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

अहो ते "करतात, करू शकतात" वर

संदीप डांगे
Wed, 03/11/2015 - 16:04 नवीन
अहो ते "करतात, करू शकतात" वर लक्ष नाही गेलं माझं. आय माय स्वारी बरंका... अवघड वा सोप्याचा प्रश्न नाही आहे हो. कलेच्या प्रांतात अवघड-सोपे असे काही असते याबद्दल मला जरा शंका आहे. एखादी गोष्ट सादर करण्यात सादरकर्त्याचे स्व:त्व झळकते, ते जेवढे उच्च तेवढी कला अजून सुंदर होते. एखादी साधी गोष्ट आपल्या कल्पकतेने खुलवत नेणे म्हणजेच ती अवघड होते जाणे. 'जागेच्या वाटपावरून सख्या भावांमधे भांडण झाले' ही एका ओळीची गोष्ट व्यासांनी 'महाभारत' म्हणून मांडले. 'महाभारत' म्हणून वाचतांना ते किती अवघड आहे ते जाणवते. प्रेयसीच्या प्रेमात येडा झालेला प्रियकर ढगालाच प्रेमसंदेश घेऊन जायला सांगतो ही एक साधीशी कल्पना मेघदूत मधून अवघड होऊन समोर येते. उद्या कुणी त्याच ढगाच्या मार्गाने प्रवास करणार्‍या एखाद्या गाडीला उद्देशून सगळे 'मेघदूत' जसेच्या तसे 'गाडीदूत' म्हणून खपवले तर तो नकलाकार. पार्श्वगायन करणार्‍यांबद्दल माझं असं निरिक्षण आहे की संगितकाराने सांगितलेलं त्याच्याच सुरांमधे राहून त्यात आपलं स्व:त्व मिसळून गाण्याला उच्च अनुभवाच्या पातळीवर घेऊन जाऊ शकतात ते खरे कलाकार. त्यांच्या समोर तेच गाणं तसंच्या तसं आधीच कुणी गायलेलं नसतं ज्याचा ते आधार घेऊ शकतात. एखादं गाणं मुळातून तयार करायला फार कष्ट पडतात. तुनळीवर त्यांचे मेकींग ऑफ बघून कळते. एखादं हजार वेळा ऐकलेलं गाणंच कुणी अगदी हुबेहुब त्याच हरकतींसकट म्हणत असेल तर तो कलाकार नाही, नकलाकार. त्या नकलाकाराला एखादं नविन गाणं गायला सांगतात तेव्हा खरं पितळ उघडं पडतं. असे कित्येक आयडॉल आता धूळ खात पडलेत. ज्यांनी नकला करता करता स्वःत्व शोधलं आणि सादर केलं तेच टिकलेत. सोनू निगम हे त्याचं उत्तम उदाहरण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

सोनू निगम

अत्रन्गि पाउस
Wed, 03/11/2015 - 16:09 नवीन
अप्रतिम नकला करतो ... उषा उथुप ची तर बेस्टेस्ट .... बाकी आधीचे मुद्दे पण याग्रीड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

ती मिमिक्री हो...

संदीप डांगे
Wed, 03/11/2015 - 16:16 नवीन
गायकांच्या नकलेमधे तर त्याच हात स्वारी गळा कोन्नाय धरू शकत... https://www.youtube.com/watch?v=tdbpw92Jwfg
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

व्ह्य व्ह्य

अत्रन्गि पाउस
Wed, 03/11/2015 - 16:04 नवीन
आमची मिष्टेक झाली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

चिंधीलाही राजवस्त्र म्हणून जे

सुबोध खरे
Fri, 03/13/2015 - 10:09 नवीन
चिंधीलाही राजवस्त्र म्हणून जे सादर करू शकतात तेच खरे कलाकार, दुसर्‍याच्या राजवस्त्राला आपले राजवस्त्र म्हणून चिंधीगिरी करतात ते नकलाकार' वा साहेब काय म्हणता? दंडवत स्वीकारा __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

लिंक्स

चाफा
Wed, 03/11/2015 - 12:00 नवीन
http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5092239646278206025 - ट्रॅप http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=5415099490333145052&PreviewType=books - भुताळी जहाज २ बर्म्युडा ट्रँगल मधील भुताळी जहाजे प्रकरणार उरलेली जहाजे सापडतील, प्रिह्यु मध्ये उपलब्ध नाहीत.
  • Log in or register to post comments

+१

भृशुंडी
गुरुवार, 03/12/2015 - 01:20 नवीन
आणखी एक - स्पार्टाकस साहेबांनी दिलेल्या संदर्भात Ocean triangle by Charles Berlitz हे पुस्तक दिसलं. अनेकवार शोध घेऊनही ह्या लेखकाचं ह्या नावाचं पुस्तक कुठेच दिसलं नाही- त्याच्या bibliography तही ह्या नावाच्या पुस्तकाचा उल्लेख नाही. कुणी हे पुस्तक शोधण्यात मदत करील काय? उलट बाळ भागवत ह्यांच ह्याच नावाचं पुस्तक मात्र मराठीत प्रसिद्ध आहे- आणि स्पार्टाकस ह्यांच्या कृपेने त्यातले उतारेही आता आंजावर दिसतात. उदाहरण - Berlitz ह्यांच्या Bermuda Triangle मधे (जे संदर्भासाठी वापरल्याचा उल्लेख आहे) WitchCraftबद्दल पुढील विधान दिसतं - The spoksperson said "we presume they are missing, but not lost at sea". लेखात ह्याचं भाषांतर (?) झालंय "विचक्राफ्ट हरवली खरी, पण ती समुद्रात नव्हे". भागवतांच्या पुस्तकात मात्र विचक्राफ्टबद्दल वरील वाक्य हुबेहुब आहे. असो, असे आणखी अनेक "योगायोग" सापडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाफा

इथे कोणीतरी या पुस्तकाची

आनन्दा
गुरुवार, 03/12/2015 - 14:38 नवीन
इथे कोणीतरी या पुस्तकाची चर्चा करताना दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भृशुंडी

ते नव्हं..

भृशुंडी
गुरुवार, 03/12/2015 - 22:34 नवीन
ते पुस्तक आमच्याकडेही आहे. स्पार्टाकस साहेबांनी त्यांच्या संदर्भात उल्लेखलेलं "Ocean Triangle" हे पुस्तक मात्र इंग्रजीत कुठेही सापडलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

नक्की काय झालंय हे माहीती

काळा पहाड
Wed, 03/11/2015 - 12:50 नवीन
नक्की काय झालंय हे माहीती नाही आणि तेवढं वाचायला वेळ पण नाही. फक्त एका मेंबर बद्दल बोलताना पातळी सोडू नये ही विनंती.
  • Log in or register to post comments

सहमत +१

रवीराज
Wed, 03/11/2015 - 13:09 नवीन
असेच म्हणतो मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

स्पार्टाकसचं सगळंच लेखन

स्पार्टाकस
गुरुवार, 03/12/2015 - 06:28 नवीन
स्पार्टाकसचं सगळंच लेखन चोरीचं कसं आहे हे दाखवण्याचा चंग बांधलेल्यांसाठी - चाफा यांनी इथे दिलेली अनोखी रात आणि yourghoststories.com इथली कथा ही सारखी वाटणं अगदी साहजिकच आहे, कारण या दोन्ही कथा मी लिहील्या आहेत. BhatakatiAatma हा त्या साईट्वरचा माझा आयडी आहे. ज्यांना आणखीन खात्री करुन हवी असेल त्यांना मी पासवर्डही देण्यास तयार आहे. स्क्रीनशॉट्सबद्दल - आजपर्यंत मी अनेक गुप्तहेर कथा मराठी, हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत वाचल्या आहेत. अनेक कथांमध्ये वर्णनांत आश्चर्यकारक साम्यं मला आढळून आलेलं आहे. दोन वेगवेगळ्या देशांतले, भाषेतले लेखन अनेकदा हुबेहूब वर्णन करताना पाहूनही कधी वाड्मयचौर्याची शंका निदान मला तरी आली नाही. कारण एखादी कल्पना एकाच वेळी अनेक लोकांना सुचू शकते याची कित्येक उदाहरणं माझ्यासमोर घडलेली आहेत. त्या स्क्रीनशॉट्मध्ये असलेल्या वर्णनाशी साधर्म्य असलेलं वर्णन इयन फ्लेमींग (जेम्स बाँडचा लेखक), अ‍ॅलीस्टर मॅकलीन, डॅन ब्राऊन या लेखकांच्या कथांमध्ये कित्येक ठिकाणी आढळतं, परंतु याच अर्थ त्यांनी एकमेकांचं लेखन चोरलं असा अर्थ निघतो का? कोणतंही लेखन करण्यापूर्वी ही कल्पना साहित्यात पूर्वी कोणी वापरली आहे का हे तपासून पाहणं कोणाला तरी शक्यं आहे का? भुताळी जहाज मालिकेबद्दल- ओशन ट्रँगल या भागवतांच्या पुस्तकात चार्ल्स बार्लीत्झ आणि रिचर्ड वायनरच्या पुस्तकांतील अनेक वर्णन भाषांतरीत केलेली आहेत. चार्ल्स बार्लीत्झचं बर्म्युडा ट्रँगल, ड्रॅगन ट्रँगल, रिचर्ड वायनरची From the Devil's Triangle to the Devil's Jaw, Ghost Ships: True Stories of Nautical Nightmares, Hauntings, and Disasters, The Devil's Triangle, The Devil's Triangle 2 या सर्व पुस्तकांतील अनेक उतारे भाषांतरीत केलेले आहेत. ही सर्व पुस्तकं माझ्या संग्रही आहेत आणि याच सर्व पुस्तकांतील संदर्भांचा उपयोग मी भुताळी जहाज आणि थोडे अद्भुत थोडे गूढ या मालिकेतील काही प्रकरणांत केला आहे, पण मराठीत भागवतांनी आधीच या घटनांबद्दल लिहील्यामुळे मी भागवतांच्या पुस्तकातून चोरी केली असं चित्रं निर्माण झालं आहे. परंतु या सर्व पुस्तकांबरोबरच या लेखांत जी इतर माहीती आलेली आहे, जी भागवतांच्या पुस्तकात नाही, ती कुठून आली याचा कोणी विचारही करण्याची तसदी घेतलेली नाही. एव्हरेस्ट, के२, ९० डिग्री साऊथ, आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट या इतर मालिकांतील लेखांबद्दल अद्याप कोणाला काही 'शोध' लागलेला दिसत नाही. लागण्याची शक्यताही नाही कारण हे सर्व लेखन मूलतः माझं स्वतःचं आहे. सर्व मालिकांच्या अखेरीस मी संदर्भग्रंथांची यादी दिलेली आहे. सरतेशेवटी, मराठीतील एका लेखकाची कथा मी जाणूनबुजून कॉपी करुन मराठी संस्थळावरच टाकेन, जिथे वेगवेगळ्या विषयावरील पुस्तके नियमितपणे वाचणारे वाचक आहेत इतका मूर्खपणा आणि निर्ढावलेपणा माझ्यात नाही इतकंच स्पष्टं करतो. जे झालं ते दुर्दैवी आहे, परंतु ते जाणिवपूर्वक झालेलं नाही इतकंच मी स्पष्ट करु इच्छीतो.
  • Log in or register to post comments

वरच्या दोन प्रतिक्रिया परत

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 03/12/2015 - 07:47 नवीन
वरच्या दोन प्रतिक्रिया परत डकवतो आहे.
स्पार्टाकस, ह्या कादंबर्‍यांशी असलेले साधर्म्य म्हणा किंवा अजुन काही म्हणा तो एक आपण सोडुन देउ. तुमचं बाकीचं लेखन चांगलं आहे. वेळोवेळी तुम्हाला तसं कळवलेलही आहे. पुढची पुर्ण स्वरचित कथा टाकुन हे डाग काढुन टाका. मिसळपाव म्हणा किंवा अन्य स्त्रोत म्हणा हे हौशी लेखक-कवी वगैरे कलाकार मंडळींसाठीचं उत्तम व्यासपीठ आहे. इथे तुम्ही परफेक्ट असायची अपेक्षा नाही तर जेन्युइन असायची आवश्यकता आहे. चुका करत टक्के टोणपे पचवतच पुढे जाण्यात मज्जा आहे. असो. लेखन सोडु नका. मी थेट ग्रंथचौर्‍याचा आरोप करणार नाही. पण एवढं साधर्म्य असुनसुद्धा तुम्ही जर का आरोपांचं खंडन करणार असाल तर काय उपयोग हे निवेदन देउन? त्यापेक्षा इथुन पुढे अश्या चुका होणार नाहीत असं पहा. आणि लिखाण सोडु नका. कसं?
True that. It's annoying to see people defending a guilty person. I am not saying he should be punished. But at least he should accept the mistake, give promise that it will not occur here onwards and write something genuine. I and others who are currently accusing Mr.Spartacus will be more than happy to read something genuine written by him. MIPAkars are not going to hang him to death. May be for couple of months every work he types will be criticized a lot, but may be that is his redemption. Mr. Spartacus if you are reading this. We are looking forward for a positive stand from your side. You must not quit genuine writing. Not many people can write this nicely. thank you. Have a nice day ahead.
नीट वाचलत तर तुम्हाला समजेल लोक तुम्हाला दगडानी मारत नाहियेत किंवा लेखन संन्यास घ्या म्हणुनही सांगत नाहियेत. अजुनही तुमच्याकडुन चांगल्या आणि जेन्युइन लेखनाची अपे़क्षा कमीत कमी मी ठेवतं आहे. धन्यवाद. लिहित राहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस

+१

रवीराज
गुरुवार, 03/12/2015 - 16:30 नवीन
हेच म्हणतो मी, तुम्ही लिहित रहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

वर मी उल्लेख केलेली शंका खरी

गवि
गुरुवार, 03/12/2015 - 12:17 नवीन
वर मी उल्लेख केलेली शंका खरी ठरली असे वाटते. एक-दोन मूळ इंग्रजी संदर्भपुस्तकावरुन घाटेंनीही आणि स्पार्टाकस यांनीही वेगवेगळ्या वेळी स्वतंत्रपणे लिहिले असावे. त्यामुळे साम्यस्थळे आढळली असावीत. पुढील लेखनासाठी शुभेच्छा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस

स्पार्टाकस - तुम्ही बरे आहात

प्रसाद१९७१
गुरुवार, 03/12/2015 - 16:53 नवीन
स्पार्टाकस - तुम्ही बरे आहात ना? तुमची चोरी उघडी झाल्यावर गप्प बसणे हेच श्रेयस्कर आहे. नंतर दुसरा आयडी घ्या आणि लिखाण करा. अजुन स्वताचा अपमान कशाला करुन घेताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस

+१००

अजया
गुरुवार, 03/12/2015 - 08:26 नवीन
स्पार्टाकस,जुने जाऊ दया मरणालागुनी. नवी छान सिरिज घेऊन ये.संदर्भ घेतले असतील ते देऊन.इथे मिपावर कोणी कोणाचं स्कोअर सेटलिंग करत नाहीये.नवी कोरी स्वरचित कथा,कादंबरी आणुन हा विषय इथेच संपव.
  • Log in or register to post comments

+१

अत्रन्गि पाउस
गुरुवार, 03/12/2015 - 12:41 नवीन
+100
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

कुठाय लिंक ?

चाफा
गुरुवार, 03/12/2015 - 12:47 नवीन
कुठाय लिंक ? बाकी चालू दे, सरतेशेवटी, मराठीतील एका लेखकाची कथा मी जाणूनबुजून कॉपी करुन मराठी संस्थळावरच टाकेन, जिथे वेगवेगळ्या विषयावरील पुस्तके नियमितपणे वाचणारे वाचक आहेत इतका मूर्खपणा आणि निर्ढावलेपणा माझ्यात नाही इतकंच स्पष्टं करतो. जे झालं ते दुर्दैवी आहे, परंतु ते जाणिवपूर्वक झालेलं नाही इतकंच मी स्पष्ट करु इच्छीतो.>>>>>>>> हे जे काही आहे ते सुर्यप्रकाशासारखं स्वच्छ दीसत असताना काय सिध्द करायचा प्रयत्न चाललाय देव जाणे चालू दे..
  • Log in or register to post comments

स्पार्टाकस

कपिलमुनी
गुरुवार, 03/12/2015 - 15:26 नवीन
ती क्रिकेटबद्दलची सीरीज पूर्ण करा बघू लौकर !
  • Log in or register to post comments

या निमीत्ताने माझे (व्यक्तीगत) मत

माहितगार
गुरुवार, 03/12/2015 - 18:10 नवीन
सर्व प्रथम एक डिसक्लेमर मी वकील नाही आणि या कॉपीराईट विषयाबद्दलचा व्यावसायीक सल्लागारही नाही. (माझ्या वाचनाच्या स्मरणावर लिहित आहे चुभूदेघे. आणि आवश्यक ठिकाणी कायदे तज्ञाचाच सल्ला घेणे) खर म्हणजे मराठी आंतरजालावर मार्गदर्शक कायदा विषयावरच्या तज्ञांची वानवा जाणवते असा विचार बरेच दिवस मनात होता लिगल अवेरनेसच्या कँपेन्सची चर्चा होते पण प्रत्यक्षात आंतरजालावर मराठीच नाही एरवी इतर भाषांसाठीही कायदा सल्लागार मंडळी कमी दिसतात आणि लिगल अवेअरनेसच्या अभावी अशा गोष्टी पुढे आल्यास नवल नाही. जिथ पर्यंत कॉपीराईट कायद्याचा संबंध आहे २०१२ च्या अमेंडमेंट पासून सेवदात्या संकेतस्थळांचे काम तसे पाहता सोपे झाले आहे. ज्यांना आंजावरील प्रताधिकार भंगाबद्दल अधिकृत प्रताधिकार भंगाचा दावा करावयाचा आहे त्यांनी २१ दिवसाच्या आत कोर्टाचे स्थगिती आदेश आणण्याचे संस्थळ प्रशासनाकडे कळवावे, संस्थळ प्रशासनाने असा दावा आलेले साहित्य लगेच २१ दिवसांपर्यंत काढून टाकायचे २१ दिवसात कोर्टाचा आदेश आणण्यात संबधीत दावा करणारे अयशस्वी झाल्यास ते साहित्य कोर्टाचा आदेश जेव्हा केव्हा पुन्हा येईल तो पर्यंत पुनः प्रकाशित करावयाचे. यात संस्थळ प्रशासनाच्या दृष्टीने तांत्रिक अडचणी असणार आहेत कारण प्रताधिकार दावा असलेला मजकुर काढण्याची विनंती करताना संबंधीतांनी पुरावा देणे आणि संस्थळ प्रशासनाने तो तसा तपासणे अशी तुर्तास गरज नाही त्यामुळे कोणतेही साहित्यावर आरोप करून किमान २१ दिवस उडवत रहाण्याचा परवाना मिळत राहणार का ? हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे काही नवे निर्णय येई पर्यंत अथवा कायद्यात काही बदल होइ पर्यंत तरी तसे समजावयास हवे. एकुण मजकूर साहित्य खूप मोठे असेल ते उडवणे आणि तेवढेच २१ दिवसांनी पुनः प्रकाशित करणे तांत्रिक दृष्ट्या जिकीरीचे असु शकते हा अजून एक भाग झाला. जिथ पर्यंत ज्यांच्यावर कॉपीराईट भंगाचा दावा आहे अशा लेखकांचा भाग झाला; कायद्याने त्यांची जबाबदारी खूप मोठी आहे. जिथ पर्यंत मला एक केस स्टडी आठवते (चुभूदेघे) साहित्यातील प्रताधिकार भंगाचा विचार करताना साहित्याची चोरी किती सबस्टँशियल प्रमाणात झाली आहे याचा न्यायालय विचार करते पण साहित्यिकाने एकाही वाक्याची चोरी कायद्या समक्ष कमी महत्वाची आहे असे समजण्याची चुक करू नये कारण अंतीम निर्णय न्यायालयावर अवलंबून असतात. दुसरे प्रेरणा आणि चोरी यातील फरकही न्यायालये सर्वसामान्य वाचकाच्या हातात दोन्ही साहित्य दिल्या नंतर त्यांना ते चोरी सदृष्य साम्य वाटण्याची शक्यता आहे का हे विचारात घेण्यावर न्यायालयांचे निर्णय अंशतःतरी अवलंबून असावेत. एक साहित्यिक म्हणून शेवटचा सल्ला तुम्ही तुमच्या व्यक्तीगत व्यावसायिक कायदे तज्ञाचाच घेणे श्रेयस्कर पण असा सल्ला जर गाठीशी नसेल किंवा सल्ला घेण्यास वेळ लागणार असेल आणि इतर चार जण साहित्यात महत्वपुर्ण साधर्म्याचा आणि प्रताधिकार भंगाची शक्यता वर्तवत असतील तर सन्मान्य संकेतस्थळाची गरज म्हणून नव्हे तर साहित्यिकाने स्वतःस कायद्याच्या दृष्टीने सुरक्षीत करण्याच्या दृष्टीने संस्थळांवरून (अगदी स्वतःच्याही) संबंधीत मजकुर कायदे विषयक अधिकृत सल्ला मिळे पर्यंत काढून घेणे अधिक उचीत असेल असे माझा अंदाज आहे. यात तुमचे बरोबर आहात का नाही याचा संबंध नाही कारण न जाणो उद्या कोर्टात तुमची बाजू हरली तर इतरांनी सुचवूनही तुम्ही जाणीवपुर्वक प्रताधिकार भंग चालुच ठेवला असा अर्थ होतो. आणि जाणीवपुर्वक कृतीला प्रताधिकार भंग झाला असे न्यायालयाने स्विकारल्या नंतर न्यायालय अधिक गंभीर पणे घेते. due diligence चा भाग म्हणून इतर संस्थळ सदस्यांनी लक्षवेधणे आणि त्यानुसार भारतीय संस्थळ व्यवस्थापनांनी कृती करणे अशी एक नियमी प्रक्रीया असावी या अंतर्गत चा लक्षवेध आणि संस्थळ प्रशासनाची कृती काय असेल याचे एक स्वतंत्र धोरण असावे आणि प्रताधिकार भंगाचा अधिकृत दावा करू इच्छिणार्‍या व्यक्तीं उपयूक्त निवडण्यास सुलभ संदेशही उपलब्ध असावेत असे माझे मत बनत चालले आहे. मी येथील आणि मायबोली संस्थळावरील संबंधीत प्रतिसादांपलिकडे संबंधीत लेखकाचे फारसे वाचलेले नाही. म्हणून त्या बद्दल अधिक लिहितही नाही आणि मी या प्रतिसादातून लेखकावर टिकाही करत नाही आहे आणि या प्रतिसादातून प्रताधिकार भंगाचा माझ्यावतीने दावाही करत नाही आहे. एखाद दुसरा जो काही लेख (उपरोक्त वादाशी संबंध नसलेला) वाचला तो इतरत्रच्या लेखनाने अंशतः प्रभावित असावा असेच त्यावेळचे माझे व्यक्तीगत मत झाले होते. प्रताधिकारीत लेखनाच्या कॉपी पेस्टींगचा विचार करताना मला दोन वेगळ्या गोष्टी ज्या जाणवतात सिओईपीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विकिवर मागे एकदा बरिच टिका वाचण्यात आली होती जेव्हा मी गोष्ट जवळून समजून घेण्याचा प्रयत्न केला अत्यंत चांगली स्मरणशक्ती आणि सोबतीला मर्यादीत परिघातले (एका अर्थाने एकाच प्रकारचे एकाच विषयाचे एकाच लेखन शैली प्रकारचे इत्यादी) वाचन अशा व्यक्तींकडून प्रत्यक्ष लेखन होताना मूळ लेखनाचा प्रभाव समोर पुस्तक नसेल तरीही इतपत चांगला टिकून राहतो कि इतर वाचणार्‍यांना प्रताधिकार भंगाची सहाजिक शंका वाटावी. मला स्वतःला माझी स्मरणशक्ती कमी वाटते म्हणून विकिपीडियावर मला माझ्या शब्दात लेखन अधिक सोपे जात असावे आणि स्मरणशक्ती चांगली असलेल्यांना स्वतःच्या शब्दात लेखन तौलनीक दृष्ट्या कठीण जात असावे का ? असा विचार माझ्या मनात बर्‍याचदा येतो. दुसरे मराठी भाषेतील आलंकारीकता, रुपके आणि लेखनशैलीतही एकुण तोचतो पणा आला आहे कि कोणी लिहिलेतरी एकमेकाचे लिहिले असे वाटावे अशा प्रकारची चर्चा ऐसीवरील एका धाग्यातून वाचल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments

उचित व्यवहार अर्थात फेअर डिलिंग.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/12/2015 - 21:58 नवीन
माहितगार प्रतिसादाबद्दल आभारी आहे. मराठी भाषेतील अलंकारिकता, रुपके,आणि लेखनशैलीतही तोच तोपणा आलाय का हा मुद्दा मला बाकी प्रतिसादा इतका चांगला वाटला. क्रिकेटमधे जसे डाऊटऑफ बेनीफिट फलंदाजाला दिले जाते तसेच मला बेनीफिट लेखक महोदयांना द्यावे वाटत आहे, लेखन जर सर्वच कॉपी पेष्ट केले असेल तर प्रताधिकार भंग होतो. मात्र अनुवाद सारखा होत असेल तर मला वाटतं इथे डाऊट ऑफ् बेनिफिट दिले गेले पाहिजे. संशोधनामधे जसे कमीत कमी दहा ओळी, एखादा उतारा लेखकाचे उद्धृत जसेच्या तसे दिले असल्यास किंवा प्रतिपादनाचा सारांश दिला तर तळटीपेत नोंद करायची असते तेव्हा इथेही जर काही उतार्‍यात तसे होतच असेल तर तळटीप दिली पाहिज असे वाटत आहे. पण, इथे जर सारखा अनुवाद होत असेल तर गोष्ट वेगळी ठरते असे माझं मत आहे. फेअर डिलिंग किंवा उचित वापर यात काही फायदा आहे का हाही विचार महत्वाचा ठरतो. लेखनातील काही उतारे जेव्हा गुणदोष कथन करण्यासाठी वापरतो तेव्हा असे कॉपी पेष्ट चालते. समालोचनासाठी असे उतारे चालते. जी घटना, जी उक्ती सर्वश्रुत आहे तेव्हा तळटीप देण्याची गरज नसते. फेरफार करुन लिहिलं असेल तरीही प्रताधिकार भंग होतो असे मला वाटते. आणि असा प्रताधिकार भंग होतोय असे वाटत असेल तर तसा दावा मुळ लेखकाने केला पाहिजे, कुठे प्रताधिकार भंग झाला आहे, हे सिद्ध करता आले पाहिजे तसे कुठे प्रताधिकार भंग होत नाही तेही सिद्ध झाले पाहिजे, असे मला वाटते. प्रताधिकाराच्या बाबतीत अजूनही काही सिमारेषा या अंधुक आहेत असे वाटते. एकदा भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ च्या कायद्यावर मिपावर काथ्याकुटला पाहिजे असे मला वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

* कॉपीराईट अ‍ॅक्ट १९५७

माहितगार
गुरुवार, 03/12/2015 - 23:19 नवीन
* कॉपीराईट अ‍ॅक्ट १९५७ (कॉपीराईट ऑफीस या शासकीय संकेतस्थळावर) * कॉपीराईट अमेंडमेंट बील २०१२ शासकीय संकेतस्थळावरील माझ्याकडील दुवा उघडत नसल्यामुळे पर्यायी वृत्तपत्रीय दुवा दिला आहे. * सर्वसाधारणपणे मुळ कायद्याच्या प्रत्येक कलम अंमेंडमेंट आहे की नाही हे तपासत वाचावे लागेल + सोबत भारतीय सर्वोच्च न्यायालयातील, मुंबई उच्चन्यायालयातील आणि मग भारतातील इतर उच्च न्यायालयातील केसस्टडीज (निर्णय लक्षात घ्यावे लागतील) आजकाल जुन्या केसेस न्यायालयांच्या वेबसाइटवर तसेच indian kanoon सारख्या वेबसाईटवर शोधता येतात. मी बेनीफीट ऑफ डाऊट व्यक्तीगत अनुभवावर आधारीत दिला कायद्याच्या तत्वावर हा युक्तीवाद किती टिकेल हे या घटकेला शंकास्पदच वाटते आहे. फेअर डिलचा बेनीफीट स्पार्टाकस यांच्या लेखनाची इतरांच्या लेखना सोबत वाक्य ते वाक्य तुलना करताना समीक्षण आणि टिका या दोन सदरांखाली इतर प्रतिसाद कर्त्यांना होऊ शकेल. ललितेतर लेखनात आपण म्हणतात तसे संदर्भ नमुद करताना काही अल्प-अंश तळटीपेत नमुदकरता येऊ शकतात अर्थात मुलतः तेही समीक्षणात मोडते म्हणून. (तुम्ही शालेय-महाविद्यालयीन शिक्षक म्हणून काम करताना शिक्षणक्रमाचा भाग वगैरेत थोडीशी अतिरीक्त मुभा मिळते इत्यादी) पण या फेअरडील मुद्द्यांचा स्पार्टाकस यांच्या सारख्या लेखनास फारसा लाभ घेता येईल असे वाटत नाही.
प्रताधिकार भंग होतोय असे वाटत असेल तर तसा दावा मुळ लेखकाने केला पाहिजे, कुठे प्रताधिकार भंग झाला आहे, हे सिद्ध करता आले पाहिजे तसे कुठे प्रताधिकार भंग होत नाही तेही सिद्ध झाले पाहिजे, असे मला वाटते.
२०१२ अमेंडमेंट आल्या नंतर प्रणेश प्रकाश यांचा विश्लेषणात्मक लेख आला होता. त्यानुसार २०१२ अमेंडमेंट मधील तरतुदी संकेतस्थळांना त्रासदायक असून सध्याच्या स्थितीत कुणाही सोम्या गोम्याने प्रताधिकार भंग होतोय असे साधे म्हटले तरी असा आक्षेप घेतलेला मजकुर संबंधीत संकेतस्थळाने तातडीने वगळावा आणि २१ दिवस पर्यंत काही कोर्ट ऑर्डर येते आहे का याची वाट पहावी काही कोर्ट ऑर्डर नाही आल्यास संबंधीत मजकुर पुन्हा रिस्टोअर करावा. आता यात अजूनही एका अडचणी कडे प्रणेश प्रकाश लक्ष वेधतात जर मी माझी दहा वीस माणसे उभी करून म्हणजे केवळ संबधीत संस्थळावर दर २१ दिवसांनी नवी तक्रार नोंदवून मला नको असलेला मजकुर दाबण्यास संबंधीत संस्थळास भाग पाडू शकतो. अनलेस यातून अभिव्यक्ती स्वातंत्र्यास तडा जातो हे हायकोर्टातून ऑर्डर आणून काही बदल घडे पर्यंत संस्थळांना हि बाब स्विकारावी लागेल. प्रताधिकार भंगाच्या प्रत्येक सर्वसाधारण आरोळीवर मजकुर उडवावा लागू नये म्हणून कोर्टात केस दाखल करत असल्याचे किमान आश्वासन संस्थळांनी मागावे. म्हणजे धोरण बाबीत याचा समावेश करावा. किमान पक्षी प्रत्यक्षात कोर्टकेस दाखल न करता नुसताच खेळ चालवला गेल्यास जबाबदार धरता येते. बाकी तुर्तास कुणीही तक्रार दिली तरी ती व्यक्ती प्रताधिकार भंगाने अफेक्टेड पार्टी आहे की नाही हे न पाहताही त्यांच्या दाव्यांची दखल घेणे संस्थळांना भाग आहे असे वाटते. बाकी स्पार्टाकस यांना व्यक्तीगत स्तरावर बेनीफिट ऑफ डाऊट दिला तरी कायदे विषयक पातळीवर ते तुर्तास तरी अत्यंत वीक भासताहेत आणि त्यांनी तुर्तास तरी इगो पॉईंट बाजूस ठेऊन एक पाऊल मागे घेणे अधीक सयुक्तीक असू शकेल असे माझे व्यक्तीगत मत आहे. (हा कायदेशीर सल्ला नव्हे हे ओघाने आलेच)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सरांचा हा पॉईंट बरोबर आहे, माझीच गल्लत झालेली दिसते

माहितगार
Fri, 03/13/2015 - 12:47 नवीन
असा प्रताधिकार भंग होतोय असे वाटत असेल तर तसा दावा मुळ लेखकाने केला पाहिजे,
प्रताधिकार कायदा १९५७ कलम ५२ उपकलम (१) क्लॉज (C) २१०२च्या अमेंडमेंटने अद्ययावत पुरेसे स्पष्ट आणि खालील प्रमाणे आहे. written complaint from the owner of copyright in the work, complaining that such transient or incidental storage is an infringement, such person responsible for the storage shall refrain from facilitating such access for a period of twenty-one days or till he receives an order from the competent court refraining from facilitating access and in case no such order is received before the expiry of such period of twenty-one days, he may continue to provide the facility of such access
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

+१११

माहितगार
गुरुवार, 03/12/2015 - 23:28 नवीन
प्रताधिकाराच्या बाबतीत अजूनही काही सिमारेषा या अंधुक आहेत असे वाटते. एकदा भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ च्या कायद्यावर मिपावर काथ्याकुटला पाहिजे असे मला वाटते.
या विषयावर अधिक अभ्यासपूर्ण चर्चा आणि लेखन होण्याची नितांत गरज आहे. वर मी कायद्यांच्या बेअर अ‍ॅक्टचा दुवा दिलाच आहे. कायदे विषयक भाषा वाचण्यास सुरवातीस जिकीरीची वाटू शकते पण ते अत्यंत गरजेचे आहे. नाही तर खाया पिया कुछ नही रांजण फोडा लाखोका उपर से चक्की पिस रहेथे छे महीना ! ज्याचा प्रताधिकार भंगाचा दावा आहे अशी व्यक्ती येत्या काही वर्षांच सेलच नुकसान झाल म्हणून केलेला दावा किमान स्वरुपाचा असू शकेल आणि प्रताधिकार भंग झालेल्या मजकुराला मिळालेल्या हिटा मोजून नुकसान भरपाई मागितली गेली तर रांजण फोडा लाखोका होणार म्हणून सर्वांनीच हा विषय अधिक व्यवस्थीत समजून घेणे गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/13/2015 - 14:13 नवीन
माहितगार सर्व प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत प्रताधिकार विषय समजुन घेण्यास मदत होत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

शिल्लक प्रश्न

माहितगार
गुरुवार, 03/12/2015 - 23:41 नवीन
इथे जर सारखा अनुवाद होत असेल तर गोष्ट वेगळी ठरते असे माझं मत आहे.
समजा 'अ' हा मूळ इंग्रजी लेखक आहे, त्याचा 'ब' आणि 'क' या दोन अनुवादकांनी शब्दशः अनुवाद केले तर ते मिळते जुळते होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समजा या युक्तीवादात 'क' ने ब ची नक्कल न मारता अनुवाद केला असे गृहीत धरले तरी ते एवढे शब्दशः एकसारखे होत असतील तर ब आणि क या दोघांनी 'अ' ची अनुवादकरताना शब्दशः नक्कल मारली असे होते. मग तुम्ही 'अ' या मूळ लेखकाची अनुवाद करताना परवानगी घेतली होती का , हा प्रश्न शिल्लक राहतोच .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मरी गयो!

अजया
गुरुवार, 03/12/2015 - 19:18 नवीन
सारांश सांगेल का कुणी सारांश!!
  • Log in or register to post comments

सारांशः

आदूबाळ
गुरुवार, 03/12/2015 - 19:53 नवीन
सारांशः प्रो-स्पार्टा लीग - नका सोडुन जाऊ ... रंगमहाल अँटी-स्पार्टा लीग - मार ही त्राटिका, रामचंद्रा सामान्य वाचक - कशी नशिबानं थट्टा आज मांडली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा