मले माईतच नाई...

ऊध्दव गावंडे's picture
ऊध्दव गावंडे in जे न देखे रवी...
14 Feb 2015 - 12:34 pm

असं कसं होते मालं
मले कयतच नाई
तसं झालं तरी काई
मले माईतच नाई

नेतो नाल्या वरं ढोरं
मी पानी दाखोयाले
धुनं धूते तथी कशी
मले माईतच नाई

डाबडुबली खेयाले
म्हून आंब्या खाली जातो
तिची रखवाली तथी
मले माईतच नाई

गुळं फोळला दुपारी
ढोरं हकल्याले जातो
ढोरं हायेतं तिचेचं
मले माईतच नाई

संद्याकाई ईरीवरं
पानी भर्यासाठी जातो
नस्ते तिच्या जोळं दोरं
मले माईतचं नाई

यकं दिसं बुडा म्हने
तुयं लगन जुळलं
माई नौंरी केलं तिले
मले माईतचं नाई

तसं झालं काई तरी
मले माईतचं नाई

शब्दार्थः
नालाः नदी

पानी दाखोयालेः पाणी पाजण्या साठी

डाबडुबलीः आंब्या च्या झाडावर खेळायचा खेळ

रखवालीः watch

गुळः वैरणा चा ढीग

इरः विहीर

दोरः roap

नौरीः नवरी

कविता

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Feb 2015 - 1:13 pm | कैलासवासी सोन्याबापु

हाव!!! आपल्या गावा च्या इकळे अश्शेच लगन होते!!! ४ मैने पैले मले बी बुड्या न अशीच आणून देलती हो!!!

बहुगुणी's picture

14 Feb 2015 - 1:32 pm | बहुगुणी

लग्नकथा आवडली :-)

'फोळला' म्हणजे काय?

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Feb 2015 - 1:46 pm | कैलासवासी सोन्याबापु

"गुळ फ़ोळला" म्हणजे वैरणी चा मोठा ढिग उपसुन एक लहान पेंडी चारा वैरण (कड़बा उर्फ़ ज्वारी मक्याची ताट वगैरे) जनावरा पुढल्या गव्हाणित टाकणे :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Feb 2015 - 1:46 pm | कैलासवासी सोन्याबापु

फ़ोळला = फोडला

श्रीरंग_जोशी's picture

14 Feb 2015 - 10:01 pm | श्रीरंग_जोशी

कविता आवडली.

बाकी

दोरः roap

हे

दोरः rope

असे हवे होते.

दोर या शब्दाचा अर्थ लिहिला नसता तरी चालले असते.

गणेशा's picture

14 Feb 2015 - 10:53 pm | गणेशा

कविता आवडली.. पण त्या पेक्षाही ही भाषा मला जास्त आवडली.

लोकभाषेतील शब्द शुद्ध नसतील पण त्यांच्यातील गोडवा अवीट असतो .. मला तर प्रत्येकाची आपली लोकभाषा गावाकडं राहणारी आपली आई वाटते.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Feb 2015 - 4:15 am | अत्रुप्त आत्मा

+++१११ गणेशा

आदूबाळ's picture

15 Feb 2015 - 1:29 am | आदूबाळ

मस्त भाषा!

बुडा म्हणजे वडील का?

श्रीरंग_जोशी's picture

15 Feb 2015 - 3:52 am | श्रीरंग_जोशी

महाराष्ट्रातील इतर भागांतील ग्रामीण शैलीत आईवडिलांना म्हातारी-म्हातारा म्हणण्याची पद्धत आहे तशीच वर्‍हाडीमध्ये बुढी, बुढा असे म्हणण्याची पद्धत आहे.

शाळा कॉलेजमध्ये असे संवाद कानावर पडू शकतात.

अबे... काय सांगू तुले, काल कलास बुडवून थेट पिच्चर पाहयले गेलो अन नेमकं बुढ्याले मालूम पडलं.

मधुरा देशपांडे's picture

15 Feb 2015 - 5:16 am | मधुरा देशपांडे

आवडली. तुमच्या कवितांमुळे ही अस्सल बोली भाषा वाचायला मिळते आहे. धन्यवाद.

चाणक्य's picture

15 Feb 2015 - 4:05 pm | चाणक्य

भाषा फारच छान

ऊध्दव गावंडे's picture

18 Feb 2015 - 7:29 pm | ऊध्दव गावंडे

मित्रांनो...
धन्यवाद !

हाडक्या's picture

18 Feb 2015 - 10:59 pm | हाडक्या

कविता छानच..
तरीही एक उगी अवांतर शंका : हे उ.गा. त्या स.गा. चे कोणी आहेत काय ?

ऊध्दव गावंडे's picture

19 Feb 2015 - 5:36 pm | ऊध्दव गावंडे

धन्यवाद !
सगा चा कोणीही नाही
मी ऊगा च.

पदकि's picture

18 Feb 2015 - 11:30 pm | पदकि

उत्कृष्ट , अस्सल कविता! मानतो!

ऊध्दव गावंडे's picture

19 Feb 2015 - 5:37 pm | ऊध्दव गावंडे

धन्यवाद !

पद्मश्री चित्रे's picture

19 Feb 2015 - 5:40 pm | पद्मश्री चित्रे

काय सुंदर भाषा आहे ही!

ऊध्दव गावंडे's picture

19 Feb 2015 - 9:51 pm | ऊध्दव गावंडे

धन्यवाद !

पैसा's picture

1 Mar 2015 - 10:47 pm | पैसा

आवडली!
सोन्याबापू, तुमच्या बोलीत लग्नाची कहाणी फर्मास लिवा बघू! वाट बघते!