Skip to main content

मले माईतच नाई...

मले माईतच नाई...

Published on शनीवार, 14/02/2015 प्रकाशित मुखपृष्ठ
असं कसं होते मालं मले कयतच नाई तसं झालं तरी काई मले माईतच नाई नेतो नाल्या वरं ढोरं मी पानी दाखोयाले धुनं धूते तथी कशी मले माईतच नाई डाबडुबली खेयाले म्हून आंब्या खाली जातो तिची रखवाली तथी मले माईतच नाई गुळं फोळला दुपारी ढोरं हकल्याले जातो ढोरं हायेतं तिचेचं मले माईतच नाई संद्याकाई ईरीवरं पानी भर्यासाठी जातो नस्ते तिच्या जोळं दोरं मले माईतचं नाई यकं दिसं बुडा म्हने तुयं लगन जुळलं माई नौंरी केलं तिले मले माईतचं नाई तसं झालं काई तरी मले माईतचं नाई शब्दार्थः नालाः नदी पानी दाखोयालेः पाणी पाजण्या साठी डाबडुबलीः आंब्या च्या झाडावर खेळायचा खेळ रखवालीः watch गुळः वैरणा चा ढीग इरः विहीर दोरः roap नौरीः नवरी
लेखनविषय:

याद्या 3147
प्रतिक्रिया 19

हाव!!! आपल्या गावा च्या इकळे अश्शेच लगन होते!!! ४ मैने पैले मले बी बुड्या न अशीच आणून देलती हो!!!

लग्नकथा आवडली :-) 'फोळला' म्हणजे काय?

In reply to by बहुगुणी

"गुळ फ़ोळला" म्हणजे वैरणी चा मोठा ढिग उपसुन एक लहान पेंडी चारा वैरण (कड़बा उर्फ़ ज्वारी मक्याची ताट वगैरे) जनावरा पुढल्या गव्हाणित टाकणे :)

कविता आवडली. बाकी
दोरः roap
हे
दोरः rope
असे हवे होते. दोर या शब्दाचा अर्थ लिहिला नसता तरी चालले असते.

कविता आवडली.. पण त्या पेक्षाही ही भाषा मला जास्त आवडली. लोकभाषेतील शब्द शुद्ध नसतील पण त्यांच्यातील गोडवा अवीट असतो .. मला तर प्रत्येकाची आपली लोकभाषा गावाकडं राहणारी आपली आई वाटते.

In reply to by आदूबाळ

महाराष्ट्रातील इतर भागांतील ग्रामीण शैलीत आईवडिलांना म्हातारी-म्हातारा म्हणण्याची पद्धत आहे तशीच वर्‍हाडीमध्ये बुढी, बुढा असे म्हणण्याची पद्धत आहे. शाळा कॉलेजमध्ये असे संवाद कानावर पडू शकतात. अबे... काय सांगू तुले, काल कलास बुडवून थेट पिच्चर पाहयले गेलो अन नेमकं बुढ्याले मालूम पडलं.

कविता छानच.. तरीही एक उगी अवांतर शंका : हे उ.गा. त्या स.गा. चे कोणी आहेत काय ?

आवडली! सोन्याबापू, तुमच्या बोलीत लग्नाची कहाणी फर्मास लिवा बघू! वाट बघते!