मले माईतच नाई...
असं कसं होते मालं
मले कयतच नाई
तसं झालं तरी काई
मले माईतच नाई
नेतो नाल्या वरं ढोरं
मी पानी दाखोयाले
धुनं धूते तथी कशी
मले माईतच नाई
डाबडुबली खेयाले
म्हून आंब्या खाली जातो
तिची रखवाली तथी
मले माईतच नाई
गुळं फोळला दुपारी
ढोरं हकल्याले जातो
ढोरं हायेतं तिचेचं
मले माईतच नाई
संद्याकाई ईरीवरं
पानी भर्यासाठी जातो
नस्ते तिच्या जोळं दोरं
मले माईतचं नाई
यकं दिसं बुडा म्हने
तुयं लगन जुळलं
माई नौंरी केलं तिले
मले माईतचं नाई
तसं झालं काई तरी
मले माईतचं नाई
शब्दार्थः
नालाः नदी
पानी दाखोयालेः पाणी पाजण्या साठी
डाबडुबलीः आंब्या च्या झाडावर खेळायचा खेळ
रखवालीः watch
गुळः वैरणा चा ढीग
इरः विहीर
दोरः roap
नौरीः नवरी
लेखनविषय:
याद्या
3147
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
हाव!!! आपल्या गावा च्या इकळे
आवडली!
"गुळ फ़ोळला" म्हणजे वैरणी चा
In reply to आवडली! by बहुगुणी
फ़ोळला = फोडला
कविता आवडली
कविता आवडली.. पण त्या
+++१११ गणेशा
In reply to कविता आवडली.. पण त्या by गणेशा
मस्त भाषा!
हो
In reply to मस्त भाषा! by आदूबाळ
आवडली. तुमच्या कवितांमुळे ही
आवडली
मित्रांनो... धन्यवाद !
कविता छानच..
धन्यवाद !
In reply to कविता छानच.. by हाडक्या
मले माईतच नाई...
धन्यवाद !
In reply to मले माईतच नाई... by पदकि
आवडली कविता!!
धन्यवाद !
In reply to आवडली कविता!! by पद्मश्री चित्रे
मस्त कविता!