✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

खाद्यसंस्कृती पुणेकरांची

म
मृत्युन्जय यांनी
Mon, 11/18/2013 - 00:10  ·  लेख
लेख
"ऐ कंबख्त तुने पेयिच नै " असे वारंवार ऐकवणार्‍या एका मित्राच्या खास आग्रहास्तव एके दिवशी धीर करुन नगरातल्या जगप्रसिद्ध लस्सीच्या दुकानात जाउन पिउन आलो. लस्सी. लस्सी पिउन आलो. उगा भलते संशय नकोत. ऑस्कर वाइल्ड (हा गे होता) एकदा फ्रान्समधल्या एका प्रसिद्ध कुंटणखान्यातुन तोंडात मारल्यासारखा चेहरा करुन बाहेर पडला होता. बरोबर आहे गाढवाला गुळाची चव काय तशी "आदमी हु आदमी से प्यार करता हु" म्हटल्यावर मग बाई ती फ्रान्समधल्या जगप्रसिद्ध वेश्यागृहातली असली तरी काय फरक पडतो. आमचेही तसेच झाले. म्हणजे कुंटणखान्यातुन बाहेर पडुन नाही. लस्सीगृहातुन बाहेर पडुन. तोंड कडु झाले. मित्रवर्य उद्गारलेच "गाढवाला गुळाची चव काय?" . "यात गुळ घातला होता?" मी अविश्वासाने विचारले. "हेच. हेच. दुनिया चंद्रावर जाउन आली आणि अजुन तुमचे पुणे - ३० चे गचाळ विनोद जात नाहित" वास्तविक तो विनोद नव्हता. ती प्रतिक्षिप्त क्रिया होती प्रश्न विचारण्याची. बुद्धी गहाण न ठेवलेल्या कुठल्याही माणसाला कळाले असते की त्या लस्सीत गोडवा निर्माण करणारा कुठलाही पदार्थ नव्हता. गूळ नाही, साखर नाही. बॅगोन असावे अशी दाट शंका आली पण तसे बोलुन दाखवले असते तर मित्र वस्सकान अंगावर आला असता. घरी बायकोचा मार खातो त्यामुळे आधीच दुर्मुखलेला असतो त्यामुळे काही झाले की असा वस्सकन समोरच्याच्या अंगावर येतो. पुणेकर म्हटला की याला गेस्टापोंना ज्यु दिसल्यावर व्हायचा तसा आनंद होतो. त्यामुळे लस्सीला बॅगोनचा वास आला म्हटल्यावर मी बॅगोन पितो असा सोयिस्कर निष्कर्ष काढुन तो गावभर बोंबलायला मोकळा झाला असता. वर पुण्यात हॉटेलमध्ये बॅगोन मिळते म्हणुन पण ओकला असता. पुण्यातल्या गणेशची लस्सी चांगली असते या निष्पाप विधानाचा तो सूड होता. लस्सी म्हटल्यावर ती दह्याची हवी, त्यावर मलईचा गोळा हवा आणि ती गोड (किंवा खारट. खारट हा प्रकार एरवी मला मानवत नाही. खारट लस्सी प्यायच्या ऐवजी ताक प्याले तर काय वाईट?) हवी. तर मी परदेशात (पुणे सोडुन बाकी दुसरे कुठलेही गाव आमच्यासाठी परदेश असते. मुळात नदीपल्याडच्या वस्तीला आम्ही पुणे म्हणत नाही तर पुण्यापल्याडच्या वस्तीला तर आम्ही ओळखही द्यायला नको. पण असो. तो वेगळा विषय) जाउन प्यालेली ती लस्सी चक्क कडु होती आणि त्यात आईसक्रीम होते. आईस्क्रीम लस्सीत? अर्रे आमच्याक्डे ते मस्तानीत टाकतात (मस्तानी म्हणजे थिकशेक. मस्तानी मस्तानी काय करता? आमच्या हाज्जीअली ला याहुन भारी थिकशेक मिळते ही पण एक नेहमी मिळणारी प्रतिक्रिया. तर असो. ) . "लस्सीत आइस्क्रीम टाकता तर तुम्ही मटकीच्या उसळीत फरसाण टाकुन त्याला मिसळ म्हणाल रे" मी कळवळुन करवादलो. "मग मिसळ अजुन कशाला म्हणतात?" अर्रे मिसळ म्हटल्यावर त्यात पोहे येतात, बटाट्याची भाजी येते, मटकीचे दाणे येतात, फरसाण येते तशी थोडी शेवही वेगळी येते, त्यात आम्ही चिवडा घालतो, दुसर्‍या दिवशी मुक्काम ठोकायचा नसेल तर् म्ह्णुन एक गोडसर आणि लाल पाट वाहु द्यायची तयारी असेल तर एक तिखट झणझणीत रस्सा तयार ठेवतो. त्यावर मस्त कांदा भुरुभुरतो, कोथिंबिर टाकतो. मग आमची साग्रसंगीत मिसळ तयार होते. झालेच तर भजीचे तुकडे टाकुन आम्ही त्याला अजुन थोडी रंगत आणतो. मिसळ म्ह्णजे असा चटकन उरकुन टाकायचा पदार्थ नव्हे आमच्यासाठी. मिसळ आमच्यासाठी पूजा आहे. बेदी, बत्रा किंवा भटांची नाही. देवळात करतो तशी. अर्रे आमच्याकडे आरतीला पण फक्त साखर देउन बोळवण होत नाही. खायचे म्हटले की तिथे आमच्याकडे कलाकुसर आलीच. एवढे बोलुन झाल्यावर "गोड मिसळ खाणारे पुचाट लोकं तुम्ही.तुम्हाला लस्सी कडुच लागणार" असे फुत्कार टाकुन महोदय निघुन गेले. वास्तविक दोन गोष्टींचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. तसा माणुस चंद्रावर जाउन आल्याचा आणि पुणॅरी विनोदाचा पण काही सम्बंध नाही म्हणा. माझ्या त्या मित्राचा आणि विनोदाचा पण नाही (आणि त्याचा आणि गुळाचापण नाही). पण दोष त्याचा नाही. काय आहे पुणॅ म्हटल्यावर उगाचच शिव्या घालायच्या आणि आपल्याला पण कुजकटपणा करता येतो असे दाखवायची एक फ्याशन आहे. पुणेकर जेव्हा कुजकटपणा करतात तेव्हा मण्यारीचे विष सुद्धा त्यापुढे फिक्के पडेल. एरवीची शब्दलीला ज्याला लोक कुजकटपणा म्हणतात ते म्हणजे उगाच शाही बिर्याणी बरोबर तोंडी लावायला दिलेल्या सॅलॅड सारखे असते. अर्रे तुम्हाला नकोय ना गोड मिसळ? मग तर्री मागा. देतात ते. तेही नको असेल तर रामनाथला जा. पार्श्वभागातुन जाळ निघेपर्यंत तिखट नरड्यात ओता. तेही नको असेल तर टिंबर मार्केटला जा महेश भुवन मध्ये मिसळ ओरपा. अगदीच नाहितर कर्वे रोड वर आयकर गल्लीत जाउन उभे रहा. वाडगा घेउन नाही. प्लेट घेउन., हे बाहेरच्यांना समजावुन सांगायला लागते. सपच्य अमागे जा, सिष्टर षिटीत नेवाळे, दे धक्का ला जा. पण मरायला तुम्हाला मित्राच्या *गणाला ढुं** लावुन यत्ता नववीत तुमच्या शहरात खाल्लेलीच मिसळ हवी असेल तर तशीच कशी मिळेल? (इथे *गणाचा आणि मिसळीच्या चवीचा संबंध नाही. त्याचा संबंध वातावरणनिर्मितीशी आहे हे लक्षात घ्या). ढेकण्या तुझ्या आईच्या आणि तुझ्या आज्जीच्या हातच्या पदार्थांची चव तरी एकसारखी आहे का रे? चवी बदलतात ना? कसे असते प्रत्येक शहराची एक संस्कृती असते आणि ती तिथल्या खाद्यसंस्कृतीतुन परावर्तित होते. आता गोव्याला जाउन पाटवड्या आमच्या गावसारख्या नाही मिळत म्हणुन गळे काढण्यात काय अर्थ आहे? तिथे गेलात तर मासे खा, काजु करी खा, फेणी प्या, समुद्राचा वारा प्या. पाटवड्या तुला परसदारात मिळतात ना रे भावड्या? तुझ्या गावात मिसळीबरोबर लादीपाव देतात, ब्रेड स्लाइस देतात. पिझ्झा बेस देतात की ढेकळे देतात याच्याशी कोणाला घेणेदेणे आहे? पुणेरी मिसळीबरोबर ठिकानानुरुप यापैकी काहिही देउ शकतात (ढेकळे आणि पिझ्झा बेस सोडुन). मग? पुढे काय? पण लोकांचे हे असे असते त्यांची दुनिया स्वतःपाशी संपते. स्वतःला नाही आवडले आणि न आवडणारे आपण एकटे असलो तर हे लोक आख्ख्या समाजाच्या नावाने गळे काढणार. तुला नाही ना आवडले तु नको ना खाऊ. तिथे रांगा लावुन खाणारे मुर्ख म्हणुन कशाला केकाटतोस बाबा? बाकी पुण्याला खाद्यसंस्कृती शिकवणे म्हणजे सामान्य माणसाने देवाला धर्म, आनंदला बुद्धीबळ आणि तेंडुलकरला क्रिकेट शिकवण्याएवढे हास्यास्पद आहे. अर्रे खाण्यात राज्ये बुडवली आम्ही (याला किमान २ आयडी अनुमोदन देतील याबाबत शंका नाही). इतिहासाची पुस्तके उघडुन बघा. साले लग्नसमारंभात पानावर केवळ चटण्या ८ प्रकारच्या वाढायचो आम्ही. लोणच्याच्या जागी कोशिंबीर आणि कोशिंबीरिच्या जागी अळुचे फदफदे असले नतद्रष्ट प्रकार करत नाही आम्ही. प्रत्य्के चौथे दुकान इथे एक हॉटेल असेल आणि पाचही खंडातल्या व्यंजनांची चव चाखायला मिळेल या शहरात (पेंन्ग्विन आणी कांगारु कुठे मिळतात हे विचारु नये. अपमान करण्यात येइल). जाओ अपने गिरेबान मे जाकर ढुंढो तुमच्या शहरात जो खाद्यपदार्थ बरा मिळतो त्याचे नाव सांगा पुण्यात खायला घालतो तुम्हाला. (पैसे तुमचे. पुणेकराने वाद जिंकण्यासाठी सुद्धा स्वतःचा पैसा खर्च करावा ही अपेक्षाच फोल आहे). अर्रे आम्ही नाणे वाजवुन घेतो तिथे खायचे पदार्थ असेच कुठलेही उचलु होय? हॅट. हुडत. अर्रे केशराची कांडी आणि तिचा स्वाद आणि रंग दिसला नाही तर आम्ही चितळेच्या श्रीखंडालाही दहीसाखर म्हणुनच खाउ. पण चितळे देतो उत्कृष्ट श्रीखंड तर मग कसला आलाय दु:स्वास? पण पण. पुणेकराचे एक आहे. "अर्रे आमच्या नागपुरची संत्री बघा एक एक काय रसाळ असतात (पुलं). नाहितर तुमच्या पुण्याच्या संत्री ..... " असली वाक्ये आमच्या तोंडुन निघायची नाहित. आम्ही बेडेकरांची सो कॉल्ड गोड मिसळ खाउन तृप्त आहोत. तुमची रसरंग, मामलेदार, गोखले, फडतरे, खासबाग, बावडा जी काही चांगली असेल ती तुम्हाला लखलाभ. आम्हीही खाउन बघु. आवडली तर आम्हालाही लखलाभ. आम्ही उगा नसतीकडे वाकड्यात शिरत नाही. अर्रे अन्न ते पुर्णब्र्हम. त्यात कसली आलीय इर्ष्या, तिरस्कार, स्पर्धा, मानापमान आणि तुच्छता (आम्ही परगावचा आख्खा माणुसच तुच्छ लेखु ती गोष्ट वेगळी). आमच्या श्रद्धास्थानांवर गरळ ओकाल तर मात्र फणा काढुन उभे राहु ही गोष्ट वेगळी. सुदैवाने मी १० गावात राहिलो आहे. नंदुरबारचा पात्रा ज्या सुखाने चाखला त्याच आनंदाने सातारी कंदी पेढा खाल्ला, रंकाळ्यावर भेळ खाल्ली, इंदौरला कचोरी हाणली, ठाण्याला राजमाताचा वडापाव कोंबला, कुंजविहारचा वडापाव रिचवला, मामलेदारची झणझणीत ( अहाहा. आत्ताही लाळ सुटली) मिसळ, संगमनेरला सुदाम्याची पावभाजी आणि नढेची भेळ हे स्वर्गसुख अनुभवले. त्याच भक्तीभावाने मी आता कल्याणला जाउन भेळ, मनिषात पाणीपुरी, जेजे गार्डनला (आणि विट्ठल मंदिरा च्या बाहेर आणि शिवदीपमध्ये आणि भोलाकडे) वडापाव, सुप्रीमची पावभाजी, बेडेकरची मिसळ, गणेशची लस्सी आणि सुजाताची मस्तानी खाउ शकतो. देवाच्या दयेने मी खाण्याच्या बाबतीत भेदभाव करत नाही. त्याबाबतीत आकस ठेवत नाही. चांगले आहे हे कळत असुनही केवळ नावे ठेवण्याच्या लालसेपायी माझ्या जिव्हेवर अन्याय करत नाही. जे जे उत्तम उदात असेल ते ते खावे हा नियम भक्तिभावाने जोपासतो. जीभ (बोलुन आणि खाउन) संस्कृती घडवते हे माहिती असलेल्या गावात राहुन मी इतके तरी शिकु शकतोच ना?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कला
धर्म
पाकक्रिया
इतिहास
समाज
औषधोपचार
शिक्षण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
आस्वाद
लेख
अनुभव
मत
वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
41265 वाचन

💬 प्रतिसाद (186)

प्रतिक्रिया

मस्त

चाणक्य
Mon, 11/18/2013 - 00:16 नवीन
अगदी फर्मास
  • Log in or register to post comments

ये बात! ये बात! ये बात! ये

आदूबाळ
Mon, 11/18/2013 - 00:21 नवीन
ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात! ये बात!
  • Log in or register to post comments

ज्जे बात!

अत्रुप्त आत्मा
Mon, 11/18/2013 - 00:35 नवीन
ज्जे बात! :) . . . . . . या आता!!!!! =))
  • Log in or register to post comments

विषय मस्त चितारलाय

अग्निकोल्हा
Mon, 11/18/2013 - 00:44 नवीन
फक्त इतके समतोल विचारी लिखाण असताना विशेषत: पुण्याला यात अनावश्यक घुसड्लेले पटले नाही.
  • Log in or register to post comments

टायटल सकट कोठेही पुण्याचा उल्लेख केला नसता तर

अग्निकोल्हा
Mon, 11/18/2013 - 00:47 नवीन
लेखातील मताशी लेखक प्रामाणिक आहे हे जाणवले असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

द्यायचा होता 'सुज्ञ' ला

प्यारे१
Mon, 11/18/2013 - 01:03 नवीन
द्यायचा होता 'सुज्ञ' ला प्रतिसाद, झाला लेख! होतंय असं. :) लेख आवडला रे! -पुण्याच्या लांबच्या परिघातला प्यारे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

खरे आहे पण पुणेरी अहमन्यतेला बळी गेलेले लेखकाच्या प्रांजळतेला

अग्निकोल्हा
Mon, 11/18/2013 - 01:38 नवीन
समजुन घेणार की लेखकाला फाट्यावर मारून हिडिसतेचा नंगानाच दाखवणार याचे कुतुहल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

बळी गेलेले .. फाटा ... ????

पक पक पक
Tue, 11/19/2013 - 21:18 नवीन
बळी गेलेले .. ;) फाटा ... ???? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

कसय जे काही चांगले पुण्यात आहे त्याला पुणेकर छान म्हणतात

अग्निकोल्हा
Fri, 11/22/2013 - 15:35 नवीन
पण जे चांगले नाही त्याला सुध्दा छान म्हणतात. म्हनुनच लेखकावर अनावश्यक पुण्याचा उल्लेख करायची नामुष्की आली व् अमुक तमुक हिकड़े नाय आवडलं तर तिकड जाऊंन खा म्हणावे लागले. इतर शहरात असे ऑप्शन देणारे नसतात तिथे अमुक ठिकाणी छान असते असे सांगतात तेव्हां ते छानच निघते उगाच त्याच पदार्थासाठी दुसर होटेल ट्राय मारावे लागत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

पुण्याचा उल्लेख पुणेकर कधीही

मृत्युन्जय
Fri, 11/22/2013 - 16:22 नवीन
पुण्याचा उल्लेख पुणेकर कधीही नामुष्कीने करणार नाही. अभिमानानेच करेल. मी रुढार्थाने पुणेकर नाही ते वेगळे. अनेक पर्याय देण्यामागचे कारण असे की वेगवेगळ्या चवींचे अनेक पर्याय पुण्यात उपलब्ध आहेत. प्रत्येकाने स्वतःच्या आवडीप्रमाणे निवडावे. उदाहरणच द्यायचे झाले तर मी नगरातल्या लस्सीचे दिले. मला अजिबात नाही आवडली. कोल्हापुरची फडतरे मिसळ अशीच माझ्यासाठी हुकलेली होती. त्याप्रमाणे एखाद्याला बेडेकर नाही आवडणार तर अजुन अनेक पर्याय आहेत. शक्यता आहे की एखाद्याला काहिच नाही आवडणार. पण असा एखादाच असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

अगदी, अगदी!!!

बॅटमॅन
Wed, 11/20/2013 - 00:16 नवीन
अगदी, अगदी!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

मिसळ जमून आली आहे. अगदी

जॅक डनियल्स
Mon, 11/18/2013 - 00:57 नवीन
मिसळ जमून आली आहे. अगदी माझ्या मनातले लिहिले आहे सगळे.
विट्ठल मंदिरा च्या बाहेर
कुठल्या ? पासोड्या का नवीपेठेतल्या ?
  • Log in or register to post comments

नवीपेठ. गोखले किंवा आण्णा या

मृत्युन्जय
Mon, 11/18/2013 - 10:40 नवीन
नवीपेठ. गोखले किंवा आण्णा या नावाने ओळखला जातो तो वडापाव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

तुम्हाला कंटाळा (किंवा टंकाळा

रेवती
Mon, 11/18/2013 - 01:44 नवीन
तुम्हाला कंटाळा (किंवा टंकाळा) येत नाही का हो मृत्युंजयजी? कशाला नादी लागावे कोणाच्या (किंवा कोणाच्याही)! ;)
  • Log in or register to post comments

मला असा वाद ऐकला वाचला की

प्यारे१
Mon, 11/18/2013 - 02:01 नवीन
मला असा वाद ऐकला वाचला की राहून राहून मुंबई पुणे मुंबई हा सिनुमामा आठवतो. सारसबागेतली भेळ खाताना (पुणेकर असून देखील) स्वप्निल जोशी म्हणतो : भेळ! कुरमुरे, शेंगदाणे, फरसाण, लिंबू, कोथिंबीर.... भेळ! त्या पदार्थाला अस्मितांचे टॅग न लावता खा की! फॉर दॅट मॅटर सगळ्याच गोष्टी तशा अस्मितांचा टॅग न लावता एन्जॉय करा की! आणखी मजा येईल. आनि लई बारीक बगायचंच म्हनलं तर बाईला बी मिशा दिसत्यातच की! तेला काय शीमा हाय व्हय मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

भेळ! कुरमुरे, शेंगदाणे, फरसाण

मृत्युन्जय
Mon, 11/18/2013 - 10:42 नवीन
भेळ! कुरमुरे, शेंगदाणे, फरसाण, लिंबू, कोथिंबीर.... भेळ! त्या पदार्थाला अस्मितांचे टॅग न लावता खा की! आयला प्यारे हेच लिहायचे होते रे. त्यासाठी एक लेख खर्ची पाडायला लागला. छ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

तुम्ही लोक उचकता लय लवकर…

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 11/18/2013 - 02:13 नवीन
तुम्ही लोक उचकता लय लवकर… जालावर तुमच्यावर सर्वात जास्त टीका होण्याचे कारण तेच असावे. ;-)
  • Log in or register to post comments

हा हा हा, नेमके!!!! उचकणारे

बॅटमॅन
Mon, 11/18/2013 - 17:27 नवीन
हा हा हा, नेमके!!!! उचकणारे असले की उचकवणारे भेटतातच! बरं मजा अशी की दुर्लक्षिलेलेही चालत नाही =)) धरलं तर चावतंय आणि सोडलं तरी परत जवळ येतंय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

हाण्ण तेच्या!

स्पंदना
Mon, 11/18/2013 - 03:12 नवीन
हाण्ण तेच्या! शंभर घाव एक तुकडा अर्धा पांगळा अर्धा वाकडा!! (गैरसमज नको, मला सौ बात की एक बात म्हणायच आहे. जरा पद्यात म्हंटल)
  • Log in or register to post comments

बालिशपणा!

नगरीनिरंजन
Mon, 11/18/2013 - 04:18 नवीन
बालिशपणा! नगरच्या लस्सीवाल्याच्या लस्सीला नावं ठेवली म्हणून आम्हाला राग येत नाही; पण हा असला बालिशपणा पाहून करमणूक मात्र होते. :-)
  • Log in or register to post comments

सहमत..

मीता
Mon, 11/18/2013 - 10:44 नवीन
नगर ची लस्सी जगात भारी.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

हे हे हे, आम्ही दिल्लीची

पक्या
Tue, 11/19/2013 - 04:18 नवीन
हे हे हे, आम्ही दिल्लीची लस्सी उत्कृष्ट मानतो नगरची काहीच नाही त्यापुढे. अजुन पंजाबला जायचा योग आला नाही पण तिकडची अजुन बेस्ट असेल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीता

लुधियाणात ४-५ दिवस होतो

यसवायजी
Tue, 11/19/2013 - 18:07 नवीन
लुधियाणात ४-५ दिवस होतो तेंव्हा रोज लस्सी प्यायचो. आपल्याकडे मिळणारी आणी तिकडची लस्सी यात फरक आहे. इथे लस्सी खुप दाट असते. तिकडे तितकी दाट नव्हती. तिथल्या स्विट अन साल्टी दोन्ही मस्त वाटल्या. खाण्याच्या -(पिण्याच्या सुद्धा ;) ) बाबतीत चंगळ होती. पण एके दिवशी कांदे-पोह्यात पनीर पाहीले अन एकदाच ठरवलं की, व्हेन यु आर इन पंजाब, पंजाबीच खा. (हे इतरत्रही लागु पडावे असे वाटते) उगाच आमच्या महारष्ट्रात असले पोहे मिळतात असे सांगण्यात काही अर्थ नाही ना. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

मस्तानी ?

रमेश आठवले
Mon, 11/18/2013 - 08:14 नवीन
पुण्याबाहेर रहणार्या मझ्या सारख्याच्या माहितीसाठी मस्तानी हा कोणता खाद्य पदार्थ आहे ते सांगाल का ?
  • Log in or register to post comments

मस्तानी हा खाद्य्/पिद्य

शैलेन्द्र
Mon, 11/18/2013 - 11:34 नवीन
मस्तानी हा खाद्य्/पिद्य पदार्थ आहे, घट्टश्या दुधात, कस्टर्ड, फ्लेवर, आइस्क्रीम व चवीपुरते जिन्नस टाकुन स्टृऑ/ चमच्याने खातात.. पोटभर पिण्यासाठी मात्र तुम्ही बाजीरावच हवे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

ही घ्या मस्तानी

सुहास..
Mon, 11/18/2013 - 11:48 नवीन
Image removed. ही घ्या मस्तानी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

सोपंय.

आनंदी गोपाळ
गुरुवार, 11/21/2013 - 13:06 नवीन
थोडे पाणचट चवीचे फ्रूट सॅलड ग्लासात भरून, त्यावर आंबट अननसाची चकती खोचून, व वर थोडी टूटीफ्रूटी उर्फ रंगीत साखरेच्यापाकातल्या भोपळ्याच्या बारीक फोडी टाकल्या, त्याला अव्वाच्या सव्वा किम्मत लावून ओव्हरहाईप केले, की जे बनते, त्याला पुण्यात मस्तानी म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

अशी मस्तानी पुण्यात कुठे

मृत्युन्जय
गुरुवार, 11/21/2013 - 14:20 नवीन
अशी मस्तानी पुण्यात कुठे मिळते? सुजातात नक्कीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

गोपाळराव, मलाही मस्तानी आवडत

रेवती
गुरुवार, 11/21/2013 - 18:21 नवीन
गोपाळराव, मलाही मस्तानी आवडत नाही पण तुम्ही म्हणताय तितकी वाईट्ट नक्कीच बनवलेली नसते. उगीच नावं ठेवताना कै च्या कै नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

याला मस्तानी म्हणतात ?? नक्की

सूड
Fri, 11/22/2013 - 19:00 नवीन
याला मस्तानी म्हणतात ?? नक्की?? एकदा सुजातामधली आंबा-केशर विथ ड्रायफ्रुट ट्राय कराच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

जाऊ द्या हो...

तुषार काळभोर
Sat, 11/23/2013 - 10:19 नवीन
चव काय... असं कायतरी म्हनत्यात ना..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

झक्कास! एकदम आवडलं!

यशोधरा
Mon, 11/18/2013 - 08:19 नवीन
झक्कास! एकदम आवडलं!
  • Log in or register to post comments

पात्राची आठवण करून

त्रिवेणी
Mon, 11/18/2013 - 09:35 नवीन
पात्राची आठवण करून दिल्याबद्दल तुमचा त्रिवार निषेढ.... तसही जळगाव, धुळे, मालेगाव साइडचा बटाटेवडाही मस्तच असतो.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!

मैत्र
Mon, 11/18/2013 - 10:39 नवीन
पुण्यापासून शेकडो मैल लांब असल्याने सर्व वर्णने वाचून थोडा त्रास झाला पण जी खास पुणेरी तळमळ दिसली - की जे जे उत्तम उदात्त उन्नत च्या चालीवर
जे जे चविष्ट खमंग रूचकर ते ते मनापासून खा ना लेको!!
ती विलक्षण आवडली. पण तरीही नगरची लस्सी चांगलीच आहे. जरा कालमानाप्रमाणे थोडी दर्जात घसरली आहे. तरी एका विधानाचा सूड घेण्यासाठी दुसर्‍या पदार्थात पार बेगॉन (बॅगोन नव्हे) घालण्यापर्यंत जाणं हे शेवटच्या परिच्छेदाशी जुळलं नाही.. बाकी आनंदच वाटला जरा अस्सल आपल्या खाद्यकुळीतला पाहून :)
  • Log in or register to post comments

मस्त !!

सुहास..
Mon, 11/18/2013 - 10:44 नवीन
पुणेकरांना घुसडल्याबद्दल निषेध, पण आय डी नेमका आपलाच असल्याने ;) ....लेख अतिशय समतोल आणी प्रामाणीक . माझे ही होते असे , चेन्नईल एकदा सांबर, रस्सम, ईडलई ;) , वडाई ;) , दोसाई ;) आणि उथ्थप्पम खाल्ले की दुसरी कडे (अगदी जगात ) खायला जरा त्रास च होतो ....आमच्या पुनमला मिळणारी दाल -खिचडी मी बाहेर कुठे ही खावु शकय नाही .......तसेच नोएडा/दिल्ली ला गेलो की लस्सी , कुलचे , तंदुरी याची चव तोंडार रेंगाळत असते ...
  • Log in or register to post comments

चेन्नईल एकदा सांबर, रस्सम,

मृत्युन्जय
Mon, 11/18/2013 - 10:46 नवीन
चेन्नईल एकदा सांबर, रस्सम, ईडलई Wink , वडाई Wink , दोसाई Wink आणि उथ्थप्पम खाल्ले मुरुगन रे मित्रा मुरुगनची आठवण झाली. कासावीस झाला रे जीव. मला ते सर्वणा भवन एवढे आठवत नाही पण मुरुगन म्हटल्यावर जीव जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

__/\__

अनुप ढेरे
Mon, 11/18/2013 - 11:12 नवीन
आम्ही बेडेकरांची सो कॉल्ड गोड मिसळ खाउन तृप्त आहोत.
एकदम चपखल !! हेच वाटतं बेडेकर मिसळ खाल्लीकी... लेख फक्कड !!
  • Log in or register to post comments

बेडेकर ..

विटेकर
Mon, 11/18/2013 - 11:31 नवीन
खरयं , म्हणोन आमची चक्कर दर शनिवारी सकाळी बेडेकरांकडे ! अगदी गेल्यी जन्मीचे देणे असल्यासारखे. मधे त्यांनी कमिन्स कॉलेजच्या गलीत ब्राण्च काढली होती पण तिथे ती " अस्मिता " की कायशी नव्ह्ती ( त्यांना तुसडेपणा म्हणायचा असावा !) त्यामुळे पुन्हा गावातल्या चकरा सुरु झाल्या ! हल्ली फार महाग झालीय पण बेडेकर मिसळ ! चाळीस रुपये घेतात आणि पुन्हा स्वंय्-सेवा( शेल्फ सर्विस) पण मजा येते हां ! लेख छानच ! बा़की अस्मिता वगैरे ठीक आहे , पण बा़कीच्या गावांत चांगले पदार्थ मिळ्तात. मागे एकदा धाराशिव ( उस्मानाबाद ) ला एका मुस्लिम होटेल मधून आणलेले गुलाब जामून खाल्ले होते ! अप्रतिम ! एवढ्या दुष्काळी गावात ( तेव्हा महिन्यातून दोनदा पाअणी येते होते शहरात ) असला जबराट मेवा मिळाला ! फार प्रसिद्ध आहेत म्हणे हे गुलाब जामून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

हल्ली एक्स्ट्रा रस्श्याचे

मृत्युन्जय
Mon, 11/18/2013 - 11:54 नवीन
हल्ली एक्स्ट्रा रस्श्याचे पैसे घेतात हो ते. त्यामुळे जास्तच महाग पडते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

पण सुरुवातीला जेवढा देतात तो

अनुप ढेरे
Mon, 11/18/2013 - 17:57 नवीन
पण सुरुवातीला जेवढा देतात तो रग्गड असतो मिसळीला. काही लोक यक्ष्ट्रा स्लाइस घेउन फुकटच्या तर्रिबरोबर हादडायचे. त्यांचा वांदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

विटेकर साहेब 'उस्मान' असे नाव

गणामास्तर
Mon, 11/18/2013 - 22:50 नवीन
विटेकर साहेब 'उस्मान' असे नाव आहे त्या हॉटेल (त्याला हॉटेल म्हणणे म्हणजे मांजरीला वाघ म्हणण्यासारखे आहे)चे. बाकी तिथे बसून गरमागरम, भल्या मोठ्या आकाराचे गुलाब्जाम (तिथे असाचं उच्चार होतो) खाण्याची मजा निराळीचं.तिथे पुरी भाजी सुद्धा अप्रतिम मिळते..पुरी सोबत येणारी तिखट जाळ बटाट्याची भाजी खाल्ल्यावर रामनाथ आणि चिंचवडातला नेवाळे मिसळवाला सुद्धा लाजेल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

बाकी रामनाथ बद्दल आपले मत कै

बॅटमॅन
Tue, 11/19/2013 - 00:05 नवीन
बाकी रामनाथ बद्दल आपले मत कै खास नै आज्याबात. पाटी जितकी बुंगाट आहे तितके खाणे बुंगाट असते तर अजून बरे झाले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

धन्यवाद

विटेकर
Wed, 11/20/2013 - 11:46 नवीन
धन्यवाद गणामास्तर ! आमच्या बहिणाबाईनी तृप्त केले होते ते गुलाबजामुन खायला घालून ! पुरी -भाजी खाण्याची वेळ आली नाही पण रस्सा हादडयचा म्हणजे पाण्याची सोय मस्ट आहे हो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

मुरुगन च !!

सुहास..
Mon, 11/18/2013 - 11:18 नवीन
:) मुरुगन च !!
  • Log in or register to post comments

हा मुरुगन काय प्रकार आहे?

बॅटमॅन
Mon, 11/18/2013 - 17:29 नवीन
हा मुरुगन काय प्रकार आहे? चेन्नैतच आहे की पुण्यात पण आहे??? (पुण्यात राहूनही रोज एकवेळ आंध्रा मेसमध्ये जेवून तृप्त होणारा) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

आंध्रा मेस?

कपिलमुनी
Tue, 11/19/2013 - 13:49 नवीन
हिंजवडीमधे आहे ती का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हिंजवडीत असेल तर माहिती नाही.

बॅटमॅन
Tue, 11/19/2013 - 15:30 नवीन
हिंजवडीत असेल तर माहिती नाही. आम्ही मगरपट्ट्यातल्या मेशीत जेवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

आहे हिंजवडीत

सौंदाळा
Wed, 11/20/2013 - 12:31 नवीन
आहे हिंजवडीत फेज १, परर्सिटंट्च्या मागे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मुरुगन चेन्नैतले एक उच्च

मृत्युन्जय
Tue, 11/19/2013 - 14:25 नवीन
मुरुगन चेन्नैतले एक उच्च शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे. तिथे केळीच्या पानावर पदार्थ वाढतात, सांबारासकट सग्ळे. सांबार चटणीसाठी वेगळ्या वाट्या नसतात. तर मिनिटाला येउन पानात वाढुन जातात. मद्रासी स्टाइलने ओरपायचे. दाक्षिणात्य पदार्थांसाठी निव्व़ळ सुख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ओहोहोहो....घासाघासाला

बॅटमॅन
Tue, 11/19/2013 - 15:30 नवीन
ओहोहोहो....घासाघासाला ऑर्गॅझमच म्हणायचा तर. वॉव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा