मि.पा. येते.... आणिक जाते

Primary tabs

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
15 Jun 2013 - 11:24 pm

ढिशुम क्लेमर ;) --- गेल्या काही दिवसात,मि.पा.चे जे "झाले'',ते स्पॅम अ‍ॅटॅक मुळे झाले,पण प्रस्तुत जिल्बी ही,आंम्हाला मि.पा... आले..आले...अश्या बातम्या लागल्यावर..मि.पा.वर येता येता,जे काही "झाले"..त्यामुळे आलेली आहे,ती तितक्या'च मजेनी चाखावी,ही णम्र विणंती...! :p

(ही जिल्बी,आंम्ही मठ्ठा पीत,मा.आगोबास समर्पित करीत आहोत! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-pillow-fight-games-smiley-emoticon.gif )

मि.पा. येते.... आणिक जाते... येताना कधि एरर आणिते,
अन जाताना...आशा लाविते, मि.पा. येते आणिक जाते

येणे-जाणे,'गायब' होणे
"असले" जाणे जे ना
कुणी ध्या..नी धरते.

येताना मि.पा. अस्से.. त्रासते
तर,रिफ्रेश होताना त्रासविते
रिफ्रेश काही होतच नाही
कितिदा दट्या दाबुन पाही,
लॉग-इन करुन,,,पुन्हा पुन्हा ए..रर म्हणते.

आले मि.पा.- कापली फीत http://www.sherv.net/cm/emo/funny/1/running-around-smiley-emoticon.gif
जाणार नाही ना,पुन्हा मी भीत http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/facepalm-smiley-emoticon.gif
जाताना कधि offline देत,
येण्यासाठिच(?) ऑफ-ला-इन देत.. ;)
Retry येते,येताच जाते,लै..लै...सलते.

कॉकटेल रेसिपीबालसाहित्यहास्यबालगीतविडंबनशुद्धलेखनजीवनमानऔषधोपचारफलज्योतिषमौजमजा

प्रतिक्रिया

पैसा's picture

15 Jun 2013 - 11:44 pm | पैसा

=)) =)) =))
=)) =))
=))

बर्‍याच जणांना हा शुद्ध आध्यामिक अनुभव गेल्या २ दिवसांत आला आहे!! परत येऊ नये यासाठी तुमच्या सगळ्या देवचारांना एकेक नारळ द्या!!!

मार्कस ऑरेलियस's picture

16 Jun 2013 - 1:45 am | मार्कस ऑरेलियस

=))

प्रचेतस's picture

16 Jun 2013 - 7:04 am | प्रचेतस

मिपा सतत येत जात असल्याने आलेल्या अस्वस्थतेतूनच हे काव्य बाहेर आलंय हे जाणवत होतंच. म्हणून फक्त इतकेच म्हणतो, यथायोग्य रचना.

पाषाणभेद's picture

16 Jun 2013 - 8:28 am | पाषाणभेद

जिल्बी पाडणे हा अआचा हातखंडा आहे.

तर्री's picture

16 Jun 2013 - 1:34 pm | तर्री

भवना अगदी पश्ट लिव्ल्या आहेत !

मिपागमनसंबंधी रचना समयोचिता!
खाई मठ्ठ्यासवे साची जिलबी जी कराकरा ;)

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jun 2013 - 4:17 pm | अत्रुप्त आत्मा

भाष भक्षक वृत्तराजा,मजसवे तांब्या धरिता...
तू ही खा रे दोन जिल्ब्या,थोडासा मठ्ठा उरता... =))

बॅटमॅन's picture

17 Jun 2013 - 2:01 am | बॅटमॅन

आत्मुस जिल्बी पाडी, मठ्ठ्यासवे सेवि हेचि वदता|
दिसते भांडे तरिही, म्हणे मजपासुनि भांडे का लपविता? ||

जिल्बी आत्म्यासि रुचे, इच्या ठायी असे जशी गोडी |
आहे इतरा छंदी गोडी, परि इच्या परिस ती थोडी ||

वाल्गुदपंत(अवजड अन सुटसुटीत आर्यावृत्त-फेम).

बॅटमॅन's picture

17 Jun 2013 - 2:19 am | बॅटमॅन

यो आत्मा सर्वकाव्येषु जिल्बीरूपेण संस्थितः |
नमस्तस्मै नमस्तस्मै नमस्तस्मै नमो नमः ||
आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ |
मरिचलवणाभ्यां हि प्रोक्षणं कुरुते सदा ||
दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः |
विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||

पैसा's picture

18 Jun 2013 - 4:47 pm | पैसा

ठार मेले!

पॉइंट ब्लँक's picture

6 Apr 2015 - 10:19 am | पॉइंट ब्लँक

जबरी जुगलबंदी!

अत्रन्गि पाउस's picture

6 Apr 2015 - 11:59 am | अत्रन्गि पाउस

हहपुवा ...

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jun 2013 - 8:02 am | अत्रुप्त आत्मा

@ म्हणे मजपासुनि भांडे का लपविता? ||>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif
@वाल्गुदपंत(अवजड अन सुटसुटीत आर्यावृत्त-फेम).>>>http://www.sherv.net/cm/emo/laughing/red-neck-laughing-smiley-emoticon.gif __/\__ वा...!काय...मन,आहे तुमचं पंत!!!

@आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ |
मरिचलवणेभ्यो हि प्रोक्षणं कुरुते सदा || >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughing-hard-smiley-emoticon.gif

@दुष्टो http://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः |
विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||
...............................http://www.sherv.net/cm/emo/laughing/msn-laughing-smiley-emoticon.gif

वाल्गुदपंत इम्रती-करांचा इजय असो!!! =))

सविता००१'s picture

6 Apr 2015 - 12:44 pm | सविता००१

मेले हसून हसून

आशु जोग's picture

16 Jun 2013 - 3:46 pm | आशु जोग

झकास !

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jun 2013 - 4:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

आधीच अतृप्त, त्यातची झाला मिपाविरह तयाला !
अश्या आत्म्याची कथा काय सांगू तुम्हाला ? ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Jun 2013 - 4:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'मिपा येते आणिक जाते’ अजून उत्तम माल भरता आला असता.
पण, जो भरलाय तोही ठीकच आहे. :)

-दिलीप बिरुटे

चौकटराजा's picture

16 Jun 2013 - 6:16 pm | चौकटराजा

एका इतिहास संशोधकाला... ही जिलबी मठ्यासकट अर्पण केली ही समयोचित आहे. हा एक महत्वाचा ऐतिहासिक दस्तावेज ठरावा. कारण पुढे मागे जालसंशीधन झाल्यास. मिपा नावाचे एक रम्य , रमणीय, रम रमी वाल्यांचे संस्थळ होते काय ? व त्याने वारंवार होणार्‍या हल्ल्याला ( पंजाब व राजपुतान्या प्रमाणे ) कसे धैर्याने तोड दिले त्याचा उलगडा होईल !

आत्मुसची जिल्बी अन ब्याम्याचा मठ्ठा...!
केले सगळे मिपाकरांनी चट्टामट्टा.

प्यारे१'s picture

20 Jun 2013 - 12:16 am | प्यारे१

+१११११

मिसळपाव या पावसाळयात तरी सुरू व्हायला पाहिजे .त्याऐवजी जिलबी मठठा नको .पुढे खिचडीवर पण कविता येतील आणि त्यावर कशी झालीय हे लिहिण्याची वेळ येईलमिसळपाव या पावसाळयात तरी सुरू व्हायला पाहिजे .त्याऐवजी जिलबी मठठा नको .पुढे खिचडीवर पण कविता येतील . .

=)) =))

काय एक एक पात्र जमलेत मिपावर .

लई दिवसांनी हापिसात हसतोय

भारी रे . आत्मा आणि ब्याट्या .

अत्रुप्त आत्मा's picture

8 Aug 2013 - 5:53 pm | अत्रुप्त आत्मा

आज तुझी अठवण येते.... मि.पा..येते..आणिकं जाते! =))

अत्रुप्त आत्मा's picture

6 Apr 2015 - 9:08 am | अत्रुप्त आत्मा

आले मि.पा.- कापली फीत
जाणार नाही ना,पुन्हा मी भीत

तुम्ही कुठे चाल्लात भिऊन ?

पॉइंट ब्लँक's picture

6 Apr 2015 - 10:22 am | पॉइंट ब्लँक

चंद्रगहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कुण्या ज्योतिषाचा सल्ला मानून मिपा बंद ठेवण्यात आले होते असा निरागस विचार करून काम चालवले ;)

अत्रुप्त आत्मा's picture

6 Apr 2015 - 11:03 am | अत्रुप्त आत्मा

@चंद्रगहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कुण्या ज्योतिषाचा सल्ला मानून मिपा बंद ठेवण्यात आले होते असा निरागस विचार करून काम चालवले ;)>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif .. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif .. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Apr 2015 - 11:33 am | कैलासवासी सोन्याबापु

काय राव माझा लिहायचा फ्लो मोडला!!!!

प्रचेतस's picture

6 Apr 2015 - 12:39 pm | प्रचेतस

खी खी खी.

काय राव च्या जागी एक शिवी टाकून वाचलं.
मिपा विपश्यना संपली,भृगुसंहिता बहुतेक ओककाकांना सापडली असणार.पुढे काय?

एक एकटा एकटाच's picture

6 Apr 2015 - 8:58 pm | एक एकटा एकटाच

सॉल्लीड

बॅटमॅन's picture

7 Apr 2015 - 12:41 am | बॅटमॅन

लय मज्जा =))