✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मि.पा. येते.... आणिक जाते

अ — अत्रुप्त आत्मा, Sat, 06/15/2013 - 23:24
ढिशुम क्लेमर ;) --- गेल्या काही दिवसात,मि.पा.चे जे "झाले'',ते स्पॅम अ‍ॅटॅक मुळे झाले,पण प्रस्तुत जिल्बी ही,आंम्हाला मि.पा... आले..आले...अश्या बातम्या लागल्यावर..मि.पा.वर येता येता,जे काही "झाले"..त्यामुळे आलेली आहे,ती तितक्या'च मजेनी चाखावी,ही णम्र विणंती...! :p (ही जिल्बी,आंम्ही मठ्ठा पीत,मा.आगोबास समर्पित करीत आहोत! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-pillow-fight-games-smiley-emoticon.gif ) मि.पा. येते.... आणिक जाते... येताना कधि एरर आणिते, अन जाताना...आशा लाविते, मि.पा. येते आणिक जाते येणे-जाणे,'गायब' होणे "असले" जाणे जे ना कुणी ध्या..नी धरते. येताना मि.पा. अस्से.. त्रासते तर,रिफ्रेश होताना त्रासविते रिफ्रेश काही होतच नाही कितिदा दट्या दाबुन पाही, लॉग-इन करुन,,,पुन्हा पुन्हा ए..रर म्हणते. आले मि.पा.- कापली फीत http://www.sherv.net/cm/emo/funny/1/running-around-smiley-emoticon.gif जाणार नाही ना,पुन्हा मी भीत http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/facepalm-smiley-emoticon.gif जाताना कधि offline देत, येण्यासाठिच(?) ऑफ-ला-इन देत.. ;) Retry येते,येताच जाते,लै..लै...सलते.

प्रतिक्रिया द्या
12088 वाचन

💬 प्रतिसाद (32)

=))

पैसा
Sat, 06/15/2013 - 23:44 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) बर्‍याच जणांना हा शुद्ध आध्यामिक अनुभव गेल्या २ दिवसांत आला आहे!! परत येऊ नये यासाठी तुमच्या सगळ्या देवचारांना एकेक नारळ द्या!!!
  • Log in or register to post comments

भारीये

प्रसाद गोडबोले
Sun, 06/16/2013 - 01:45 नवीन
=))
  • Log in or register to post comments

मिपा सतत येत जात असल्याने

प्रचेतस
Sun, 06/16/2013 - 07:04 नवीन
मिपा सतत येत जात असल्याने आलेल्या अस्वस्थतेतूनच हे काव्य बाहेर आलंय हे जाणवत होतंच. म्हणून फक्त इतकेच म्हणतो, यथायोग्य रचना.
  • Log in or register to post comments

जिल्बी पाडणे हा अआचा हातखंडा

पाषाणभेद
Sun, 06/16/2013 - 08:28 नवीन
जिल्बी पाडणे हा अआचा हातखंडा आहे.
  • Log in or register to post comments

पश्ट कविता..

तर्री
Sun, 06/16/2013 - 13:34 नवीन
भवना अगदी पश्ट लिव्ल्या आहेत !
  • Log in or register to post comments

मिपागमनसंबंधी रचना समयोचिता!

बॅटमॅन
Sun, 06/16/2013 - 13:45 नवीन
मिपागमनसंबंधी रचना समयोचिता! खाई मठ्ठ्यासवे साची जिलबी जी कराकरा ;)
  • Log in or register to post comments

भाष भक्षक वृत्तराजा,मजसवे

अत्रुप्त आत्मा
Sun, 06/16/2013 - 16:17 नवीन
भाष भक्षक वृत्तराजा,मजसवे तांब्या धरिता... तू ही खा रे दोन जिल्ब्या,थोडासा मठ्ठा उरता... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आत्मुस जिल्बी पाडी,

बॅटमॅन
Mon, 06/17/2013 - 02:01 नवीन
आत्मुस जिल्बी पाडी, मठ्ठ्यासवे सेवि हेचि वदता| दिसते भांडे तरिही, म्हणे मजपासुनि भांडे का लपविता? || जिल्बी आत्म्यासि रुचे, इच्या ठायी असे जशी गोडी | आहे इतरा छंदी गोडी, परि इच्या परिस ती थोडी || वाल्गुदपंत(अवजड अन सुटसुटीत आर्यावृत्त-फेम).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

यो आत्मा सर्वकाव्येषु

बॅटमॅन
Mon, 06/17/2013 - 02:19 नवीन
यो आत्मा सर्वकाव्येषु जिल्बीरूपेण संस्थितः | नमस्तस्मै नमस्तस्मै नमस्तस्मै नमो नमः || आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ | मरिचलवणाभ्यां हि प्रोक्षणं कुरुते सदा || दुष्टो स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः | विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ह्याह्याह्याह्या!!!

पैसा
Tue, 06/18/2013 - 16:47 नवीन
ठार मेले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

जबरी जुगलबंदी!

पॉइंट ब्लँक
Mon, 04/06/2015 - 10:19 नवीन
जबरी जुगलबंदी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सम्प्लोय

अत्रन्गि पाउस
Mon, 04/06/2015 - 11:59 नवीन
हहपुवा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

@ म्हणे मजपासुनि भांडे का

अत्रुप्त आत्मा
Mon, 06/17/2013 - 08:02 नवीन
@ म्हणे मजपासुनि भांडे का लपविता? ||>>> Image removed. @वाल्गुदपंत(अवजड अन सुटसुटीत आर्यावृत्त-फेम).>>>Image removed. __/\__ वा...!काय...मन,आहे तुमचं पंत!!! @आत्मा सः खलु अत्रुप्तः अग्निवेतालसन्निधौ | मरिचलवणेभ्यो हि प्रोक्षणं कुरुते सदा || >>> Image removed. @दुष्टो Image removed. स अग्निवेतालः क्रीडते हि इतस्ततः | विशेषेण आत्मनस्तु खवमध्ये डुबुक् डुबुक् || ...............................Image removed. वाल्गुदपंत इम्रती-करांचा इजय असो!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आईग्ग.......

सविता००१
Mon, 04/06/2015 - 12:44 नवीन
मेले हसून हसून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

झकास !

आशु जोग
Sun, 06/16/2013 - 15:46 नवीन
झकास !
  • Log in or register to post comments

हाहाहा...

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 06/16/2013 - 16:27 नवीन
आधीच अतृप्त, त्यातची झाला मिपाविरह तयाला ! Image removed. अश्या आत्म्याची कथा काय सांगू तुम्हाला ? ;)
  • Log in or register to post comments

अजून माल ठासून भरायला हवा होता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/16/2013 - 16:34 नवीन
'मिपा येते आणिक जाते’ अजून उत्तम माल भरता आला असता. पण, जो भरलाय तोही ठीकच आहे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

एका इतिहास संशोधकाला...

चौकटराजा
Sun, 06/16/2013 - 18:16 नवीन
एका इतिहास संशोधकाला... ही जिलबी मठ्यासकट अर्पण केली ही समयोचित आहे. हा एक महत्वाचा ऐतिहासिक दस्तावेज ठरावा. कारण पुढे मागे जालसंशीधन झाल्यास. मिपा नावाचे एक रम्य , रमणीय, रम रमी वाल्यांचे संस्थळ होते काय ? व त्याने वारंवार होणार्‍या हल्ल्याला ( पंजाब व राजपुतान्या प्रमाणे ) कसे धैर्याने तोड दिले त्याचा उलगडा होईल !
  • Log in or register to post comments

आत्मुसची जिल्बी अन ब्याम्याचा

सस्नेह
Wed, 06/19/2013 - 21:32 नवीन
आत्मुसची जिल्बी अन ब्याम्याचा मठ्ठा...! केले सगळे मिपाकरांनी चट्टामट्टा.
  • Log in or register to post comments

+१११११

प्यारे१
गुरुवार, 06/20/2013 - 00:16 नवीन
+१११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

मिसळपाव या पावसाळयात तरी सुरू

कंजूस
गुरुवार, 06/20/2013 - 03:48 नवीन
मिसळपाव या पावसाळयात तरी सुरू व्हायला पाहिजे .त्याऐवजी जिलबी मठठा नको .पुढे खिचडीवर पण कविता येतील आणि त्यावर कशी झालीय हे लिहिण्याची वेळ येईलमिसळपाव या पावसाळयात तरी सुरू व्हायला पाहिजे .त्याऐवजी जिलबी मठठा नको .पुढे खिचडीवर पण कविता येतील . .
  • Log in or register to post comments

काय एक एक पात्र जमलेत मिपावर

अद्द्या
Sat, 06/22/2013 - 12:13 नवीन
=)) =)) काय एक एक पात्र जमलेत मिपावर . लई दिवसांनी हापिसात हसतोय भारी रे . आत्मा आणि ब्याट्या .
  • Log in or register to post comments

आज तुझी अठवण येते.... मि.पा.

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 08/08/2013 - 17:53 नवीन
आज तुझी अठवण येते.... मि.पा..येते..आणिकं जाते! =))
  • Log in or register to post comments

मिपा येते आणिक जाते! :-\

अत्रुप्त आत्मा
Mon, 04/06/2015 - 09:08 नवीन
आले मि.पा.- कापली फीत जाणार नाही ना,पुन्हा मी भीत
  • Log in or register to post comments

तुम्ही कुठे चाल्लात भिऊन ?

सूड
Mon, 04/06/2015 - 14:53 नवीन
तुम्ही कुठे चाल्लात भिऊन ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ग्रहण

पॉइंट ब्लँक
Mon, 04/06/2015 - 10:22 नवीन
चंद्रगहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कुण्या ज्योतिषाचा सल्ला मानून मिपा बंद ठेवण्यात आले होते असा निरागस विचार करून काम चालवले ;)
  • Log in or register to post comments

@चंद्रगहणाचे दुष्परिणाम

अत्रुप्त आत्मा
Mon, 04/06/2015 - 11:03 नवीन
@चंद्रगहणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कुण्या ज्योतिषाचा सल्ला मानून मिपा बंद ठेवण्यात आले होते असा निरागस विचार करून काम चालवले ;)>>> Image removed. .. Image removed. .. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक

काय राव माझा लिहायचा फ्लो

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 04/06/2015 - 11:33 नवीन
काय राव माझा लिहायचा फ्लो मोडला!!!!
  • Log in or register to post comments

खी खी खी.

प्रचेतस
Mon, 04/06/2015 - 12:39 नवीन
खी खी खी.
  • Log in or register to post comments

काय राव च्या जागी एक शिवी

कंजूस
Mon, 04/06/2015 - 13:00 नवीन
काय राव च्या जागी एक शिवी टाकून वाचलं. मिपा विपश्यना संपली,भृगुसंहिता बहुतेक ओककाकांना सापडली असणार.पुढे काय?
  • Log in or register to post comments

सॉल्लीड

एक एकटा एकटाच
Mon, 04/06/2015 - 20:58 नवीन
सॉल्लीड
  • Log in or register to post comments

लय मज्जा =))

बॅटमॅन
Tue, 04/07/2015 - 00:41 नवीन
लय मज्जा =))
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा