चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग-२

लाल टोपी's picture
लाल टोपी in जनातलं, मनातलं
20 May 2013 - 12:57 am

चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग पहिला

प्रत्यक्ष उड्डाणाचा दिवस २८ जानेवरी उगवला. अजूनही उड्डाण नक्की होईल किंवा नाही याबाबत काही अंशी साशंकताच होती. कारण आदल्या रात्री उणे आठ इतके कमी तापमान नोंदवले गेले होते. २८ ला सकाळी +१ पर्यंत तापमान सुधारले होते. मात्र यापूर्वी १२ अंश सेल्सियश पेक्षा कमी तापमानात स्पेस शटल कधीही झेपावले नव्हते. अशा परीस्थितीत कधीही उड्डाण पुढे ढकलता येते. अगदी प्रत्यक्ष उड्डाणाची उलटी गणना १ असेपर्यंत उड्डाण तहकूब करता येऊ शकत होते.
सकाळी ९.३० वाजता उड्डाण होणार होते मात्र शटलच्या दरवाजामध्ये तांत्रिक बिघाड झाला तो दुरुस्त करण्यात आला परंतु आदल्या रात्रीच्या (-८ अंश सेल्शिअस) तापमानामुळे प्रक्षेपणाच्या पॅडवर १.५ से.मी. बर्फ जमा झाले होते त्याला वितळण्यासाठी वेळ मिळावा म्हणुन आणखी दोन तास उड्ड्ण पुढे ढकलण्यात आले.
Ice

अंतराळ यानाच्या प्रक्षेपणाच्या वेळी त्याभागातून होणारी हवाई वाहतूक साहजिकच रोखलेली असते परंतु दोन तासांसाठी चॅलेंजरचे प्रक्षेपण पुढे ढकलल्यामुळे स्थानिक हवाई नियंत्रण कक्षाने त्या भागतील वाहतूक पुन्हा सुरु केली त्यावेळी 'इस्टर्न एअर लाईन्स चे प्लाईट ६७७' चॅलेंजरच्या प्रक्षेपणापूर्वी आर्धा तास आधी, केनेडी स्पेस सेंटर वरून जात असतांना अचानक हवेचा दाब मोठ्या प्रमाणावर वाढल्याने वैमानिकाला विमान आपल्या मूळ उचीवरुन स्थिर ठेवण्यासाठी साठी ९००० फूट इतके खाली घ्यावे लागले, त्यावेळी फ्लाईट ६७७ च्या वैमानिकाला चॅलेंजर अजूनही प्रक्षेपणाच्या पॅडवर असल्याचे दिसले तेंव्हा "बहुधा हवेच्या अतिरिक्त दबावामुळे प्रक्षेपण पुढे ढकलले असावे" असा अंदाज त्याने आपल्या मनाशी बांधला.

अखेरीस ऐनवेळी निर्माण झालेले सर्व अडथळे दूर सारून, तांत्रिक बिघाडांवर मात करून २८ जानेवारीला सकाळी ११.३८ ला चॅलेंजरने अवकाशात भरारी घेतली.
launch
उड्डाणाच्या वेळी यानाची तीनही इंजिने १००% क्षमतेने कार्य करीत होती संगणकाच्या मदतीने आणखी क्षमता वाढवून हा वेग १०४% इतका करण्यात आला. अंतरीक्ष यानाच्या दोन्ही बाजूंना जोडलेले रॉकेट बूस्टर कार्यरत होऊन लाँच पॅड पासून वेगळे होऊन यान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर झेपावण्यासाठी आवश्यक वेग आणि बळ देऊ लागले. प्रक्षेपणाच्या वेळी दोन अनपेक्षीत घटना घडल्या. रॉकेट बुस्टर कार्यरत होतांना जो स्फोट होतो त्याच्या आगीचे लोळ यानाच्या बाह्य इंधन टाकीच्या अगदी जवळून गेला मात्र त्याने यानाला स्पर्श केला नाही असे नंतर करण्यात आलेल्या पाहणीत आढळून आले. प्रक्षेपणानंतरच्या, प्रक्षेपण पॅडच्या पाहणीत यानाला वर ढकलण्यासाठी असलेल्या चार स्प्रिंग पैकी एकाचे बोल्ट नाहीसे झाल्याचे दिसून आले मात्र त्यामुळे यानाला काहीच नुकसान पोहचत नाही असा निष्कर्ष नासाने काढला.
प्रक्षेपणानंतर १ सेकंद होण्यापूर्वी उजव्या बाजूच्या रॉकेट बूस्टरच्या बाह्य इंधन टाकीजवळच्या भागातून करड्या रंगाचा धूर येतांना दिसून आला. हा धूर २.७० सेकंदापर्यंत दिसून येत होता. पुन्हा एकदा ३.३७ सेकंदांनंतर असाच धूर दुसून आला. नंतर करण्यात आलेल्या परिक्षणानुसार हा धूर उजव्या बाजूच्या सॉलिड रॉकेट बुस्टर चे सांधे जूळवण्यासाठीच्या वापरल्या गेलेल्या भागाच्या जळण्यामुळे आला असावा असा निष्कर्ष काढण्यात आला. इंधन प्रज्वलीत होतांना निर्माण झालेल्या उष्णते मुळे हे घडले. त्यामूळे जुळवले गेलेले सांधे उघडले गेले त्यातून २७६० अंश सेल्शियस इतक्या गरम तापमानाचे वायूची गळती झाली. वास्तविक अशाच प्रकारच्या घटना यापूर्वीच्या उड्डणांच्या वेळी देखील घडल्या होत्या मात्र त्यावेळी रबरी O रिंग पूर्ण कार्यक्षम होती आणि आवश्यक त्या प्रमाणात प्रसरण पाऊन सील झाली आणि वायू गळती रोखली गेली होती. मात्र २७ च्या रात्रीच्या आणि २८ जानेवारीच्या सकाळच्या अतिशय थंड हवामानामुळे O अतिशय कडक झाली होती. त्यामुळे वेळेत प्रसारण पाऊन बाहेर येणारा गरम वायू सील करू शकली नाही. या गरम वायुंमुळे ही संरक्षक रबरी O रिंग जळून गेली. त्यामुळे गरम वायुंच्या गळतीला रोखणारे आवरणच शिल्लक राहिले नाही. मात्र घन इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणा-या अ‍ॅल्युमिनियम ऑक्साईडचे तात्पुरते आवरण तयार झाले आणि पुढचे काही क्षण वायुगळती रोखली गेली. पुढचे ५० सेकंद ऊड्डाणा नंतरच्या आवश्यक कार्यप्रणाली पूर्ण करण्यामध्ये केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा, जॉन्सन स्पेस सेंटर, ह्युस्टन, टेक्सास व्यस्त झाले. ३७ सेकंदांनंतर अंतराळ यानावर या आधीच्या कोणत्याही उड्डाणात जाणवला नाही इतका जास्त हवेचा दाब जाणवायला सुरुवात झाली.(वर उल्लेख केल्याप्रमाणे अशाच प्रकारचा हवेचा दाब इस्टर्न एअर लाईन्स चे प्लाईट ६७७ च्या वैमानिकाला आला होता) त्या अतिरिक्त दबावामुळे स्पेस शटल काही काळ हेलकावे खाऊ लागले. प्रक्षेपणापासून ५८.७८ सेकंदांनंतर उड्डाणाचा मागोवा घेणा-या कॅमे-यामध्ये उजव्या रॉकेट जोडणीच्या भागातून हलक्या ज्वाळा दिसून येऊ लागल्या. मात्र चॅलेंजर वरील अंतराळवीर किंवा ह्युस्टन नियंत्रण कक्षाला या प्रकाराची काहीच कल्पना नव्हती जळून गेलेल्या ओ रिंगच्या जागी तयार झालेले अ‍ॅल्युमिनियम ऑक्साईडचे तात्पुरते आवरण हवेच्या जोरदार दाबामुळे आणि त्यामुळे झालेल्या स्पेस शटलच्या कंपनामुळे नष्ट झाले आणि ज्वाळांना रोखून धरणारा योगायोगाने तयार झालेला शेवटचा अडथळा दूर झाला. हवेचा अतिरीक्त दाब तयार झाला नसता तर कदाचीत पुढील ६६ सेकंदांपर्यंत अ‍ॅल्युमिनियम ऑक्साईडचे आवरण टिकले असते आणि बुस्टर रॉकेट मधील इंधनाचे संपुर्ण ज्वलन होऊन ते नियोजित कार्यक्रमाप्रमाणे अंतरीक्ष यानापासून वेगळे झाले असते. (खरेंतरं अशा घडामोडीत जर ... तर .... च्या संकल्पनांना फारसे महत्वच नसते).

एका सेकंदातच आगीची तीव्रता वाढली आणि आता स्पेस शटल वर आगीचे अस्तित्व स्पष्ट दिसू लागले. उखडलेल्या सांध्याचे छिद्र आता मोठे होत होते त्यामुळे उजव्या बाजूच्या बुस्टर रॉकेटची क्षमता जाणवण्या इतपत घटू लागली होती. ६०.२३ सेकंदांनी आग वाढली आणि ती आता बाह्य इंधन टाकीच्या दिशेने झेपावतांना दिसू लागली. ६४.६६ सेकंदांनी ज्वाळाचा आकार एकदम बदलला कारण आता बाह्य टाकीच्या द्रव इंधनाची (हायड्रोजन) गळती सुरु झाली होती. ६६.७६ सेकंदांनंतर इंधन गळतीचा परीणाम म्हणुन बाह्य इंधन टाकीतील इंधनाचा दाब लक्षणीय घटला.

Fire
ही सर्व निरिक्षणे अपघाता नंतरच्या चित्रफितीच्या अभ्यासात आढळून आली आहेत कारण प्रत्यक्ष घटना घडत असतांना हे सर्व वेगाने घडलेले नाट्य कोणाच्याच लक्षात आले नव्हते 'ना चॅलेंजर वरील अंतराळवीरांना ना दोन्ही नियंत्रण कक्षातील प्रक्षेपण संचालकांना'. सर्वजण 'सुरळीतपणे' झालेले प्रक्षेपण पहात होते. 'मोर्ट्न थिओकिल' चे तंत्रज्ञ बिकट परिस्थितीतही प्रक्षेपण यशस्वी झाल्यामुळे सुटकेचा श्वास सोडत होते. सर्वकाही ठिकठाक आहे असेच सर्व संबंधीत मानून चालले होते. ६८ व्या सेकंदाला चॅलेंजर पृथ्वीच्या वातावरणाच्या अगदी वरच्या थरात पोहोचले येथून पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या बाहेर जाण्यासाठी इंजीन पूर्ण क्षमतेने कार्यरत करणे आवश्यक असते त्यासाठी कॅप्सूल कम्युनिकेटर (अमेरीकन अंतराळ मोहिमेत जमिनीवरील नियंत्रण कक्षातून अंतरीक्ष यानातील व्यक्तींशी फक्त कॅप्सूल कम्युनिकेटर संभाषण करू शकतो) "गो अ‍ॅट थ्रोटल अप" अशी सूचना दिली त्यावर स्पेस शटल मधील कमांडर डिक स्कोबी ने "रॉजर गो अ‍ॅट थ्रोट्ल अप" हे उत्तर दिले. हा चॅलेंजर वरील अंतराळवीरांचा जमिनीवरील नियंत्रण कक्षाशी झालेला अंतीम संवाद होता. ७२.२८ व्या सेकंदाला स्पेस शटल अचानक उजव्या बाजूला झुकले. ही बाब कदाचित स्पेस शटल मधील प्रवाशांच्याही लक्षात आली असावी चॅलेंजर मधील ध्वनिमुद्रणात शटलचा पायलट मायकेल स्मिथ चे शेवटचे उद्गार "uh oh " असेच मुद्रित झाले आहेत. कदाचित त्याच्या समोरील नियंत्रकावरील दिसणारा शटलच्या इंजिनाचा चुकणारा आलेख किंवा बाह्य इंधन टाकीचा घटता दाब यांना उद्देशुनही वरील उद्गार काढले असणे शक्य आहे.
७३.१२ व्या सेकंदाला स्पेस शटलच्या बाह्य टाकीत मोठ स्फोट झाला. यामुळे आगीचे प्रचंड मोठे लोळ निघाले त्यांनी संपूर्ण संपूर्ण स्पेस शटल वेढले गेले.
चॅलेंजरचे अंतीम विघटन ७२ व्या सेकंदाला सुरु झाले. यावेळी अनेक विनाशकारी घटनांची मालिकाच सुरु झाली. उजव्या बाजूना रॉकेट बुस्टर यानापासून वेगळा व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे स्पेस शटल नियोजित दिशेपासून इतरत्र भरकटू लागले. ७३ व्या सेकंदाला बाह्य टाकीच्या तळाच्या भागातून पांढ-या रंगाचा धूर दिसू लागला. स्पेस शटलच्या रचनेतील बिघाड आणखी वाढत असल्याचाच हा पुरावा होता. याच घटनेची निष्पत्ती म्हणुन बाह्य टाकीच्या तळाचे आवरण उघडले गेले आणि टाकीतील द्रव स्वरुपातील हायड्रोजन सर्वत्र पसरले. त्यामुळे मोठीच पोकळी बाह्य इंधन टाकीत निर्माण झाली परिणामी टाकीतील हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्रीत मिसळले गेले. मोकळा झालेला उजवा रॉकेट बुस्टर बाह्य इंधनाच्या टाकीच्या तळाच्या भागात अडथळा निर्माण करू लागला. त्यामुळे टाकीत होणा-या इंधन प्रवाहात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे ७३.१३ व्या सेकंदाला यानाच्या तळाच्या भागात जमा होणा-या इंधनाचा पांढरा ढग दिसू लागला.
fire1
जवळंपास त्याच वेळी गळती झालेल्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिश्रणाला भयावह आग लागली. संपूर्ण स्पेस शटल विस्फोटक आगीच्या ढगांनी वेढले गेले. यावेळेपर्यंत प्रक्षेपणाला ७६ सेंकंद झाली होती चॅलेंजर ४६००० फूट उंचीवर पोहोचले होते. २०४० कि.मी. प्रतितास यावेगाने हे यान प्रवास करत होते. मात्र मोकळ्या झालेल्या उजव्या रॉकेट बुस्टरच्या हेलकाव्यांमुळे आता यानाचे नांक सरळ दिशेने प्रवास करीत नव्हते. इतक्या मोठ्या वेगात जाणा-या यानावर अवास्तव हालचालींमुळे हवेचा अत्याधिक दबाव येऊ लागला. एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेला दबाव सहन करणे यानाच्या क्षमते पलीकडचा भाग होता त्यामुळे क्षणार्धात यानाचे असंख्य मोठे तुकडे झाले. सर्वात प्रथम यानाचा पुढचा भाग जेथे अंतराळात सोडण्याचे उपग्रह ठेवले होते तुटुन वेगळा झाला. यानाचा पुढचा नाकाचा भागही तुटुन वेगळा झाला. तेथे असलेल्या इंधनाला आग लागून लालसर करड्या रंगाच्या ज्वाळा आसमंतात पसरल्या आणि यानाच्या भग्नावषेशांना वेधू लागल्या.
fre2

यानाचा उर्वरीत भाग आता उघडा झाला होता. यानाचे असंख्य तुकडे सर्वत्र पसरले होते. एवढे होऊनही उर्वरित इंधनाच्या सहाय्याने यानाची तिन्ही इंजीन कार्यरत होती. यानाची अंतराळ विरांची केबीन, डावा पंख, पुढचा भाग यांचे तुकडे उंच फेकले गेले. दोन्ही बूस्टर रॉकेट दिशाहीन उडत होती. ७८ व्या सेकंदाला यान नष्ट झाले मात्र ११० व्या सेकंदांपर्यंत ही रॉकेट काम करीत होती शेवटी नियोजित वेळेत स्वयंस्फोटाने ती नष्ट झाली.

fire3
लाखों अमेरीकन नागरीक दूरचित्रवाणीद्वारे आणि हजारो नागरीक केनेडी स्पेस सेंटर जवळून हे प्रक्षेपण पहात होते. त्यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच सांत अंतराळवीरांचे नातेवाईक देखील अचानक घडलेल्या घटनेने स्तब्ध झाले होते.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना एकाच प्रश्नाचे उत्तर पाहिजे होते. नक्की कोठे चूक झाली? असे काय घडले की ज्यामुळे विनाशकारी घटना घडून चॅलेंजर नष्ट झाले?

सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार..

- क्रमश:

विज्ञानलेख

प्रतिक्रिया

वाचतोय..

बरीच नवीन माहिती!!

सानिकास्वप्निल's picture

20 May 2013 - 1:41 am | सानिकास्वप्निल

वाचत आहे
पुभाप्र :)

प्रभाकर पेठकर's picture

20 May 2013 - 2:17 am | प्रभाकर पेठकर

४६००० हजार फूटांवरील विनाशकारी थरारनाट्यातील शब्द शब्द अंगावर कांटा उभा करणारे आहेत.

लॉरी टांगटूंगकर's picture

20 May 2013 - 8:59 am | लॉरी टांगटूंगकर

जब्रा लिहिलंय!!!! पु.भा.ची वाट बघतोय

कोमल's picture

20 May 2013 - 9:59 am | कोमल

सुन्न करणारी घटना, :(
उत्तम लिखाण..
पुभाप्र

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 May 2013 - 12:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

या अवकाश दुर्घटनेचे खूप बाकाव्यांसकट केलेले वर्णन सुन्न करून सोडते.
पुभाप्र.

सुहास झेले's picture

20 May 2013 - 1:29 pm | सुहास झेले

अगदी ह्येच बोलतो...

राघवेंद्र's picture

20 May 2013 - 11:26 pm | राघवेंद्र

एकदम सुन्न करणारी घटना!!!

दशानन's picture

20 May 2013 - 1:24 pm | दशानन

वाचतो आहे..

मुक्त विहारि's picture

20 May 2013 - 1:26 pm | मुक्त विहारि

पुभाप्र.

५० फक्त's picture

20 May 2013 - 3:14 pm | ५० फक्त

खरं सांगु, मरण यावं तर असं. प्रत्यक्ष मृत्युला देखील आकर्षण वाटेल असा मृत्यु.

धन्यवाद माहितीबद्दल.

लाल टोपी's picture

20 May 2013 - 5:46 pm | लाल टोपी

आपण म्हणता ते खरंच आहे या विषयी आणखी पुढल्या भागात लिहीणार आहे..

उपास's picture

21 May 2013 - 2:36 am | उपास

जिवंत मृत्यू.. चुका कशा शोधल्या हे जाणून घेण्यास उत्सुक... पुढील भागाची वाट बघतोय!

जुइ's picture

21 May 2013 - 5:48 am | जुइ

वाचले, सुन्न करणारी घटना. पुढील भागाच्या प्रतिशेत.

किलमाऊस्की's picture

21 May 2013 - 10:18 am | किलमाऊस्की

वाचतेय. पुभाप्र!!

अजो's picture

21 May 2013 - 4:27 pm | अजो

मस्त भाग. पुभाप्र.

Mrunalini's picture

21 May 2013 - 6:57 pm | Mrunalini

मस्त भाग. पुभाप्र

पैसा's picture

22 May 2013 - 9:27 am | पैसा

एक अयशस्वी उड्डाण एवढीच तांत्रिक माहिती. पण त्यात जळून गेलेल्यांचे नातेवाईक नंतर आयुष्यभर जळत राहिले असतील.

लाल टोपी's picture

23 May 2013 - 1:42 am | लाल टोपी

सर्वांचे मनःपूर्वक आभार.