चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग-१

लाल टोपी's picture
लाल टोपी in जनातलं, मनातलं
17 May 2013 - 4:31 pm

१९७६ मध्ये अमेरिकेच्या अवकाश संशोधन केंद्राने एक महत्वाकांक्षी योजना जाहीर केली. अंतराळात पुन्हा पुन्हा वापरता येण्यासारखे मनुष्य घेऊन जाणारे अंतरीक्ष यान बनवण्याची ही कल्पना त्यावेळी फारच नाविन्यपूर्ण होती, नासाने या प्रकल्पाला 'स्पेस शटल' हे नांव दिले होते. अनेकांना ही कल्पना अशक्यप्राय वाटत होती मात्र पांचच वर्षात 'कोलंबिया' या स्पेस शटलने उड्डाण केले ५४ तांस पृथ्वीच्या कक्षेबाहेर भ्रमण करून नियोजित कार्यक्रमानुसार फायर इंजीनाचा वेग कमी करून हळूहळू पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला आणि एखाद्या ग्लायडर प्रमाणे नियोजित तळावर सुखरूप उतरले. एक स्वप्नवत प्रवास मानवाच्या आवाक्यात आला होता. सुरुवातीच्या काही उड्डाणांतून स्पेस शटलने काही शास्त्रीय प्रयोग केले.
कशी होती स्पेस शटलची रचना? यापुढे आपण जे वाचणार आहोत त्या घटनेचा संबंध स्पेस शटलच्या रचनेशी आणि कार्यप्रणालीशी असल्यामुळे त्याची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
अधिकृत नांव 'स्पेस ट्रान्सपोर्टेशन सिस्टम' असलेल्या या वाहनाचे खालील चित्रात दाखवल्या प्रमाणे तीन मुख्य भाग असतांत. मुख्य यान (ऑरबिटर), बाह्य इंधन टाकी (एक्सटर्नल टँक) आणि दोन सॉलिड रॉकेट बुस्टर.

space shuttle
अंतरीक्ष वाहनाच्या मुख्य यानात अंतराळात जाणारे अवकाशयात्री यांची बसण्याची जागा, अंतराळात सोडण्यात येणारे विविध उपग्रह वाहून नेण्याचा कक्ष, नियंत्रण कक्ष अशी संरचना असते. अंतरीक्ष यानाचा हा भाग पुन्ह-पुन्हा वापरण्यासारखा असतो. एखाद्या विमाना प्रमाणे हा भाग अंराळात प्रवास करून पुन्हा जमिनीवर उतरतो. मात्र या यानामध्ये पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर जाण्यासाठी लागणारी ताकद स्वत: निर्माण करण्याची क्षमता नसते तसेच या प्रवासासाठी लागणारे मोठ्या प्रमाणातील इंधन हे यान स्वत: वाहून नेत नाही. अंतरीक्ष यानाला आवश्यक असणारी प्रचंड उर्जा दोन्ही बाजुंना जोडलेल्या रॉकेट मधून घन इंधनाच्या ज्वलनातून पुरवली जाते. ही रॉकेट मजबूत धातुंपासून बनवलेली असतांत आणि वेगवेगळ्या प्रकारचे घन इंधन त्यात ठासून भरलेले असते. ही रॉकेट कंत्राटदार कंपनीच्या मार्फत तीन कप्प्यांमध्ये इंधन भरून नंतर नासाच्या फ्लोरिडा येथील यान जुळवणी केंद्रात पाठवली जातात. त्याठिकाणी जुळवणी करतांना दोन रॉकेट आणि बाह्य इंधन टाकी हे तीन भाग यानाला जोडले जातात. या जोडणीच्या ठिकाणी दोन रबरी o रिंग लावून सील केली जातात त्यामुळे इंधन जळत असतांना हे रबरी सील प्रसरण पावते आणि मोठ्या प्रमाणात निर्माण होणारी उष्णता बाहेरच्या भागात इतरत्र पसरू देत नाही. बूस्टर रॉकेटचे मुख्य काम अंतराळ यान पृथ्वीच्या कक्षेबाहेर पोहचवण्यासाठी उर्जा पुरवणे हेच असते. यामध्ये वापरले जाणारे घन इंधन तुलनेने हे यानाच्या अंतर्गत इंधन टाकीत वापरल्या जाणा-या इंधनापेक्षा तुलनेने स्वस्त असते आणि त्याची रचना सहज सोपी असते मात्र घन इंधन वापरतांनाचा महत्वाचा धोका म्हणजे या इंधनाला एकदा प्रज्वलीत केले की काही कारणास्तव मध्येच बंद करता येत नाही पूर्ण इंधन जळून गेल्यानंरच त्याचे काम संपते. अंतरीक्ष यानाला सुमारे १,५०,०० फूट उंचीवर पोहचवल्यावर बूस्टर रॉकेटचे काम संपते तेथेच एक हलकासा स्फोट करून ही रॉकेट अंतरीक्ष यानापासून वेगळी होतात आणि त्यांना जोडलेल्या पॅराशुटच्या सहाय्याने अ‍ॅटलांटिक महासागरात कोसळतात. तेथून टग बोटीच्या सहाय्याने परत किना-यावर आणून पुढील मोहिमेच्या वापरासाठी तयार केली जातात.
जोडलेल्या बाह्य टाकीचे काम यानाच्या तीन इंजिनांसाठी द्रव इंधनाचा पुरवठा करणे हे आहे. हा स्पेस शटलचा सर्वात मोठा भाग असतो. बूस्टर रॉकेटच्या बरोबरीने स्पेस शटलला पृथ्वीच्या वातावरणाबाहेर ढकलण्यासाठी ही तीन इंजीन देखील कार्य करीत असतात. उड्डाणापासून नऊ मिनीटे ही इंजीन कार्यरत असतात. टाकीच्या तळाच्या दोन तृतियांश भागात द्रव स्वरूपातील हायड्रोजन आणि वरच्या उर्वरित भागात द्रव ऑक्सीजन भरलेला असतो. अतिशय थंड केलेली ही द्रावणे एका विशिष्ट प्रक्रियेने पाइपद्वारे प्रक्षेपणाच्या कित्येक तांस आधी प्रक्षेपणाच्या पॅड वर भरली जातात. प्रत्यक्ष प्रेक्षेपणाच्या वेळेपासून साडेआठ मिनिटांपर्यंत बाह्य इंधन टाकीतून तीन इंजिनांना उर्जा पुरवली जाते. यावेळेपर्यंत स्पेस शटल ३.६५,००० फूट उंचीवर पोहोचले असते आणि आता बाह्य इंधन टाकीचे काम संपलेले असते हा भाग देखील स्पेस शटल पासून वेगळा होऊन पृथ्वीवर अरबी महासागरावर असतांना जळून नष्ट होतो. स्पेस शटलच्या तीन मुख्य भागांपैकी हा एकमेव भाग आहे कि ज्याचा पुन्हा वापर केला जात नाही.
chllenger
स्पेस शटलच्या मालिकेतील दुसरे, चॅलेंजर अंतरीक्षयान ४ एप्रिल, १९८२ ला पहिले उड्डाण करून नासा (नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन)च्या सेवेत दाखल झाले. १८७० च्या सुमारास ब्रिटिश नौदलाच्या अ‍ॅटलांटिक आणि पॅसिफिक महासागरात संशोधन कार्य करणा-या 'एच एम एस चॅलेंजर' युद्धनौकेच्या स्मरणार्थ या अंतरीक्ष यानाला हे नांव देण्यात आले. १९८२ च्या पहिल्या मोहिमेत याच स्पेस शटलमधून बाहेर जाऊन मानवाचा पहिला अंतरीक्षात चालण्याचा प्रवास झाला. याच अंतरीक्ष यानातून अमेरिकेची पहिली महिला सेली राईड अंतराळात जाऊन आली. रात्रीच्या वेळी ऊड्डाण करणारे आणि पृथ्वीवर परतणारे चॅलेंजर हेच पहिले अंतराळ याने होते हे आणि असे आणखीही मैलाचे दगड या चार वर्षात चॅलेंजरने पार केले जोते. १९८६ पर्यंत या अंतरीक्ष यानाने ९ उड्डाणे यशस्वीपणे पूर्ण केली होती.
१९८६ मध्येही या यानाचे भरगच्च वेळापत्रक होते. दहाव्या मोहिमेसाठी मूळ नियोजित कार्यक्रमानुसार चॅलेंजर २२ जानेवारी, १९८६ ला दुपारी २.४२ ला रवाना होणार होते. ही नासाची २५ वी 'स्पेस शटल' मोहीम होती. (कोलंबिया आणि चॅलेंजर दोन्ही यानांच्या मिळून) मात्र 'कोलंबिया' या अंतरीक्ष यानाची २४ वी मोहीम विविध कारणांमुळे उशीरा होऊन ती मोहीम १८ जानेवारीला पूर्ण झाल्यामुळे चॅलेंजरचे उड्डाण प्रथम २३ आणि नंतर २४ जानेवारी पर्यंत पुढे ढकलण्यात आले. मात्र २४ जानेवारीला अंतरीक्ष यान उतरण्याच्या (डकार, सेनेगल) ठिकाणी वाईट हवामानामुळे आणखी एक दिवस पुढे ढकलावे लागले. त्यातच डकार ला रात्रीच्या वेळी यान उतरवण्याची सोय नसल्यामुळे पुन्हा एकदा वेळ बदलली गेली आणि तोपर्यंत आणखी एकदा खराब हवामानामुळे २७ जानेवारीच्या सकाळी उड्डाणाची वेळ निश्चित झाली मात्र आता काही तांत्रिक बिघाड समोर आले आणि उड्डाण आणखी एक दिवस पुढे ढकलले गेले आणि अखेर २८ जानेवारीला सकाळी प्रक्षेपण करण्याचे निश्चित झाले.
२८ जानेवारीला सकाळी प्लोरीडामध्ये अनपेक्षीतपणे अतिशय थंड हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्या सकाळी -१ अंश सेंटिग्रेड तापमान असणार होते. यानाच्या बांधणी आणि देखभाल व्यवस्थापनाचे काम पाहणा-या 'मोर्ट्न थिओकिल' कंपनीच्या तंत्रज्ञाना इतके कमी तापमान चिंतेत टाकणारे वाटत होते. त्यामुळेच २७ जानेवारीला संध्याकाळी नासाच्या केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा आणि मार्शल स्पेस सेंटर ह्युस्टन यांच्याबरोबरील टेली कोन्फ़रन्स मध्ये या कंपनीच्या तंत्रज्ञानी इतक्या कमी तापमानात बूस्टर रॉकेटच्या सांध्यांना जोडणा-या रबरी O रिंगच्या कार्यक्षमतेबद्दल शंका होती. त्यांच्या मते १२ अंश पेक्षा कमी तापमानात ओ रिंग कितपत कार्यक्षम राहतील यासंबंधी फारसा अभ्यास झालेला नाही त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेची हमी देता येत नाही. म्हणुन दुस-या दिवशी ठरलेले उड्डाण रद्द करावे. १२ अंश पेक्षा कमी तापमानात प्राथमिक आणि दुय्यम O रिंग कशा प्रकारे कार्य करेल या संबंधी फारशी आकडेवारी उपलब्ध नाही असे त्यांचे म्हणणे होते. या युक्तीवादामागे कारणही तसेच महत्वाचे होते. o रिंग अंतरीक्ष यानाचा 'क्रिटिकल-१' दर्जाचा भाग होता म्हणजेच जर या भागात काही बिघाड निर्माण झाला तर संपूर्ण अंतरिक्ष यान त्यातील अंतराळ वीरांसह नष्ट होण्याचा धोका होता. त्यामुळे 'मोर्ट्न थिओकिल'चे तंत्रज्ञ उड्डाण पुढे ढकलावे अशा मताचे होते. परंतु अनेक कारणांमुळे नासाचे व्यवस्थापन हे उड्डाण पुढे ढकलण्यास तयार नव्हते. अखेर नियोजित कार्यक्रमानुसार उड्डाण करावे असेच नक्की झाले.
नासाच्या या मोहिमेचे खास वैशिष्ट्य होते. राष्ट्राध्यक्ष रेगन यांनी अंतराळ कार्यक्रम सर्वसामान्यांपर्यंत लोकप्रिय करण्याच्या महत्वाकांक्षी योजनेनुसार या मोहिमेत सामान्य जनतेमधून 'टिचर इन स्पेस' या घोषणेसह एक शिक्षिका सहभागी होणार होती. या मोहिमेपूर्वी एक वर्षापासून ती नासाचा लोकप्रिय चेहरा ठरली होती. या घटनेला खूपच गाजावाजा करून प्रसिध्दी देण्यात आली होती. तिच्या व्यतिरिक्त आणखी ६ अंतराळ्वीर या मोहिमेत सहभागी होणार होते. इतर कार्याक्रमा बरोबर हॅलेच्या धूमकेतूचे सर्वप्रथम निरीक्षण केले जाणार होते. दूरचित्रवाणी वरून या उड्डाणाचे थेट प्रक्षेपण करण्यात येत होते.
-क्रमशः

विज्ञानलेख

प्रतिक्रिया

खुप छान माहिती. पुढील भागाची खुप आतुरतेने वाट पाहतेय.

प्रभाकर पेठकर's picture

17 May 2013 - 6:16 pm | प्रभाकर पेठकर

उत्कंठावर्धक माहिती. वाचतो आहे.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

श्रीरंग_जोशी's picture

17 May 2013 - 6:38 pm | श्रीरंग_जोशी

वाचतोय.

यावरून आठवले - तीन वर्षांपूर्वी अटलांटिस या स्पेस शटल चे उड्डाण मी माझ्या कार्यालयाबाहेरून फोनकॅमेर्‍याने टिपले होते. केनेडी स्पेस सेंटर पासून मी (रस्त्याच्या अंतराने) ४४ मैल लांब होतो म्हणजे हवाई अंतर ५० किमीपेक्षा नक्कीच अधिक असेल.

त्या उड्डाणाची हि चित्रफीत.

लाल टोपी's picture

17 May 2013 - 7:34 pm | लाल टोपी

छान चित्रीकरण

मस्त माहीती. धन्यवाद.
पु भा प्र.

बापु देवकर's picture

17 May 2013 - 8:06 pm | बापु देवकर

पुलेशु

पैसा's picture

17 May 2013 - 8:13 pm | पैसा

लाल टोपीकडून अजून एक छान लेखमालिका. अतिशय उत्कंठावर्धक आहे. पुढचा भाग लवकर येऊ द्या!

प्रचेतस's picture

17 May 2013 - 8:27 pm | प्रचेतस

उत्तम सुरुवात.

सानिकास्वप्निल's picture

17 May 2013 - 8:38 pm | सानिकास्वप्निल

पुभाप्र

सोत्रि's picture

17 May 2013 - 8:54 pm | सोत्रि

एकदम झक्कास लेख. पु भा प्र

-(सदध्या अंतराळात असलेला) सोकाजी

छान सुरवात, मस्त माहिती.
पुभाप्र.

सुहास झेले's picture

17 May 2013 - 9:25 pm | सुहास झेले

मस्त सुरुवात... :)

अंतराळ आणि स्पेस शटल नेहमीच आकर्षणाचा भाग राहिलेत माझ्यासाठी... पुढचा भाग?

किलमाऊस्की's picture

17 May 2013 - 9:51 pm | किलमाऊस्की

पुभाप्र

मोदक's picture

17 May 2013 - 10:38 pm | मोदक

गुड..!!!

वाचतोय. पुढील भाग लवकर येवूद्यात.

प्यारे१'s picture

17 May 2013 - 10:46 pm | प्यारे१

पु भा प्र.

छान माहितीपूर्ण अन रोचक लेख.

दशानन's picture

18 May 2013 - 9:33 pm | दशानन

छान विषय व माहीतीपुर्ण लेखमाला वाचायला मिळेल. आनंदात आहे मी :)

शिल्पा ब's picture

19 May 2013 - 10:12 am | शिल्पा ब

आवडलं बॉ !! पुढचे भाग पण चटचट लिहा.

लाल टोपी's picture

20 May 2013 - 1:11 am | लाल टोपी

उत्साह वाढवणा-या सर्व वाचकांना मनापसून धन्यवाद. दुस-या भागासाठी जास्त वाट पहावी लागणार नाही. लवकरच प्रकाशित करीत आहे..

यशोधन वाळिंबे's picture

20 May 2013 - 6:11 pm | यशोधन वाळिंबे

असे लेख वाचताना उत्सुकता खूप ताणली जाते.. म्हणुन मी शक्यतो असे लेख शेवटचा भाग प्रकाशित झाल्यावरच सरसकट वाचतो..!! :-)

उत्कंठावर्धक पुढील भागांची वाट बघतोय.

एक विनंती: कृपया प्रत्येक भागात पुढील व मागील भागाचा दुवा द्यावा.

लाल टोपी's picture

29 May 2013 - 6:44 pm | लाल टोपी

मालीका पूर्ण केली आहे पुढील भागांचे दुवे देत आहे:
भाग दुसरा: http://www.misalpav.com/node/24861
भाग तीसरा: http://www.misalpav.com/node/24887