क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ३

किलमाऊस्की's picture
किलमाऊस्की in जनातलं, मनातलं
9 May 2013 - 6:20 am

क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग १
क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग २

https://lh6.googleusercontent.com/-I5Xoi1vmHAE/UYqU6KafJcI/AAAAAAAAA-s/kPsDPGVyO7s/w471-h348-no/Screen-shot-2011-06-20-at-4.44.07-PM.png

(एक्सेल्सिअर)

१८९७ च्या वसंतऋतूत बर्फ वितळून वाहतूक खुली झाली आणि युकानमध्ये अडकलेल्या कित्येकांनी अनेक वर्षांनंतर आपल्या घरची वाट धरली. थोडीशी गंजलेली, चिखलाने माखलेली अशी 'एक्सेल्सिअर' आगबोट १५ जुलै १८९७ साली सानफ्रान्सिस्को बंदराला लागली तेव्हा तिचं स्वागत करायला लाखोंच्या संख्येने जनता लोटली होती. तीच गत सिअ‍ॅटल बंदराची. 'पोर्ट्लँड" सिअ‍ॅटल बंदराला लागली आणि 'Hurrah for the Klondike !!!' च्या गजराने संपूर्ण बंदर दुमदुमून गेलं. बोटीतून बाहेर येणारे प्रवासी युद्धात जिंकून आलेल्या वीरागत बाहेर पडत होते.

"ऐकलं का, त्या धोबी थॉमसला, २०० पौंडाचं सोनं गावलं म्हणे... !!"
"अहो तो अँडरसन, तोच तो उधारी मागत फिरायचा, लाखभर डॉलर्सचं सोनं घेउन आलाय आहात कुठे?"
"बाई, बंदरावर बघ तुझा नवरा पोतं भरून सोनं घेऊन आलाय बघ …" हे एवढं ऐकताच कपडे धूत असलेल्या विल्यम स्टेनलीच्या बायकोने कामधाम टाकून बंदराकडे धूम ठोकली.

कंड्या पिकायला सुरवात झाली होती.

https://lh3.googleusercontent.com/-pdKS1EB8XIw/UYqU7bwX1mI/AAAAAAAAA_I/EgtEsYLSuZE/w285-h190-no/klondike_gold_in_seattle_2.jpg

(सोनं भरून आणलेले प्रवासी)

पिशव्या म्हणू नका, औषधाच्या बाटल्या म्हणू नका, कॅन, पोती, पट्टे, बूट, शर्टांचे खिसे...परतलेल्या प्रवाशांनी अक्षरश: मिळेल त्या जागी सोनं भरून आणलं होतं.. त्यातच बंदराजवळ असलेली टाकसाळ बंद असल्याने हा जामानिमा थोडं दूरच्या Selby Smelting Works मध्ये न्यावा लागला. त्यात अनेक वाहतूकदारांनी आपलं उखळ पांढरं करून घेतलं. जहाज बंदराला लागताच तासाभराच्या आत एक्सेल्सिअरच्या परतीच्या प्रवासाची तिकीटं विकली गेली होती.

https://lh6.googleusercontent.com/-9DpKaWeeF_w/UYqU7Sddg9I/AAAAAAAAA_Q/YMzoauH9owU/w610-h366-no/klondike-gold-rush.jpg

वर्तमानपत्रांच्या कृपेने ही बातमी देशात पसरायला वेळ लागला नाही. त्याचवेळी काही कामानिमित्त सिअ‍ॅटलचा महापौर डब्ल्यू. डी. वूड सानफ्रान्सिस्कोमध्ये होता. क्लोंडायकला जाण्यासाठी त्याने तातडीने टेलिग्राफने आपला राजीनामा पाठवून दिला. 'क्लोंडायक' या शब्दानेच सगळ्यांना स्फुरण चढत होतं. अनेकजण 'I am going', 'I am going this spring' असे बॅच शर्टावर मिरवायला लागले होते. जे क्लोंडयकला जात नव्हते त्यांना तुच्छ कटाक्ष झेलावे लगत होते. सगळ्यांनाच या बातमीने वेडं केलं होतं, हे वेडं साथीच्या रोगासारखं पसरत होतं.आणि या रोगाचा मुख्य बळी होता सिअ‍ॅटल शहर. तशी पश्चिमेकडची सर्वच महत्त्वाची बंदरं - वँकुवर, ब्रिटीश कोलंबिया, ऑरेगॉन, सानफ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, टाकोमा या संधीचा फायदा उचलायचा प्रयत्न करीत होती. पण त्यात बाजी मारली ती सिअ‍ॅटलने. 'Seattle Chamber of Commerce' ने सिअ‍ॅटलची 'Gateway to the Gold Field' म्हणून अशी काही जाहीरात सुरू केली हजारोंचा जमाव सिअ‍ॅट्ल शहराकडे रवाना झाला. ही जाहिरातबाजी चांगलीच फळाला आली. त्यावर्षी सिअ‍ॅट्ल शहराचं उत्पन्न होतं जवळजवळ २ करोड डॉलर्सच्या वर.

ऐकीव माहितीवरून क्लोंडायकच्या वातावरणाचा अंदाज लोकं बांधू लागले. तिथल्या हवेला मानवणाऱ्या लोकरीच्या, फरच्या कपड्यांची, चपलांची, टोप्यांची खरेदी वाढली. अनेकजण सिअ‍ॅट्ल शहरात पोचताच हा जामानिमा चढवून एक छायाचित्र काढून आपल्या घरी पाठवत असतं.

https://lh5.googleusercontent.com/-728qR6TL67g/UYqU58bJQWI/AAAAAAAAA-g/7-DzhhPnEgk/w260-h201-no/hos22.JPG

जाहिरातबाजी करून सिअ‍ॅटलने आधीच बाजी मारली होतीच पण क्लोंडायकला जाणार्‍या गर्दीला अनेकानेक सोयी पुरवणार्‍या वस्तूंच्या दुकानांची जंत्रीच लावली होती. सिअ‍ॅट्ल शहरातले कुत्रे अचानक गायब झाले. चाळीस पौंडापेक्षा जास्त वजनाच्या कुत्र्यांना बर्फात सामान वाहून नेणारी गाडी ओढण्याचं शिक्षण मिळत असे.

https://lh4.googleusercontent.com/-ot1Ea1Q7RGE/UYrIm4zQs1I/AAAAAAAABAI/T1dmVdzti00/w600-h441-no/klondike1.jpg

नवनवीन शोधांना तर उधाण आलं होतं. पाण्यात तरंगणारी पण जमिनीवरही चालणारी, वजन उचलणारी पण चोरांपासून सुरक्षित अशी कुत्र्यांची गाडी, अवजड अवजारं उचलणारी सायकलसदृश्य गाडी, सहज ने-आण करता येण्याजोगी छोटी खोली. अशा एक ना अनेक कल्पना. Trans Alaskan Gopher Company ने तर अलास्काच्या बर्फात सोनं शोधण्याचं प्रशिक्षण देणारी शाळाच काढली. थॉमस आरनॉल्ड आपल्या 'Alaska Carrier Pigeon Mail Service' या कंपनीसाठी गुंतवणूकदार शोधत होता. क्लोंडायकमधल्या कामगारांना आपल्या कुटुंबियांना तात्काळ संपर्क साधता येण्यासाठी तो कबुतरांमार्फत पत्रांची देवाणघेवाण करणार होता.

एकाने भूभागात सोनं नक्की कुठे लपलंय शोधणारं एक्सरे मशिनचा शोध लावला होता. तीक्ष्ण नजर असलेल्या माणसांना सोबत घेऊन काहींना सोन्याचा शोध लावायचा होता. अशा तीक्ष्ण नजरेच्या माणसांची किंमत होती माणशी सुमारे दोन हजार डॉलर्स !!! क्लोंडायक बोट, क्लोंडायक चष्मे, क्लोंडायक टोप्या, औषधं, सूप्स, अन्नाचे डबे, हवेच्या झोताचा वापर करून जमिनीतलं सोनं काढणारं यंत्र. अर्थाच सगळ्याच कल्पना कुचकामी ठरल्या होत्या.

https://lh5.googleusercontent.com/-G1cr44SGz9E/UYrEZ6wQNUI/AAAAAAAAA_8/f6VBBIx7iVA/w367-h488-no/getimage.exe.jpg

लहानथोर सगळयांनाच आता क्लोंडायकने झपाटलं होतं. कोणं नव्ह्तं त्यात. नन्स होत्या, डॉक्टर होते, शिक्षक होते, फुटबॉलचा अख्खा संघ चालला होता, क्लार्क होते, व्यापारी तर होतेच होते. चार दिवसात सिअ‍ॅटल अग्निशमन दलातल्या बारा ऑफिसर्सनी राजीनामा दिला होता. न्यायाधिशांना खटले लवकरात लवकर आटपण्यासाठी धमक्या येऊ लागल्या. आरोपींनाही जायचं होतंच की क्लोंडायला.

https://lh5.googleusercontent.com/-Go_zweKo4ec/UYrEYgHQdcI/AAAAAAAAA_s/zyTeXiEXijY/w436-h488-no/hrs3-1.gif

ज्या दिवशी पोर्ट्लंड ही आगबोट सिअ‍ॅट्ल बंदराला लागली त्याच दिवशी Al-ki ही आगबोट उत्तरेला निघाली. ३०-४० डॉलर्सना मिळणारं तिकीट चोवीस तासांच्या आत हजाराच्या घरात गेलं होतं. तरीही सगळीच्या सगळी तिकीट विकली गेली होती. २०० फुटाच्या Al-ki मध्ये जवळजवळ ११० प्रवासी, ९०० मेंढ्या, ६५ गुरंढोरं, पन्नास एक घोडे भरले होते. वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भरून माहिती, सल्ले लिहीले जात होते. प्रवासाला निघालेले अनेकजण ऐकीव माहितीवरून क्लोंडायकचा अंदाज बांधत होते तर अनेकांनी पैसे देऊन आधी क्लोंडायक वारी करून आलेल्यांकडून माहिती मिळवली होती. हवा तर तापली होतीच पण भविष्यात काय वाढून ठेवलाय याचा काडीमात्र विचारही न करता प्रत्येकाने आपल्या परीने तयारी चालू केली होती.

काहीजणांसाठी ते एक धाडस होतं, काहींसाठी कधीही न संपणारी लालसा पण सिअ‍ॅटल बंदारात लोटलेल्या गर्दीतल्या अनेकांसाठी जगण्याची ती एक शेवटची आशा होती.

क्लोंडायकच्या नावावर केलेल्या अजून काही जाहीराती.

https://lh4.googleusercontent.com/-NayptSMI7LA/UYrX7hF1mRI/AAAAAAAABA4/_Ac_gNPQs3I/w287-h428-no/old_ad2.gif

https://lh5.googleusercontent.com/-z49Ieo9R3sg/UYrX7To0BVI/AAAAAAAABBE/N2DXxMpFIko/w213-h262-no/old_ad.gif

https://lh5.googleusercontent.com/-pl99da1CeOI/UYrX7rrtYVI/AAAAAAAABBA/bhC3G4NNzb0/w200-h468-no/hrs6a3.gif

https://lh6.googleusercontent.com/-CDTiGYvVLkI/UYrEY_90YuI/AAAAAAAAA_w/_9_PVWqyeAs/w400-h412-no/hrs2b5-2.gif

संदर्भ :
१) Yukon Gold (Charlotte Foltz Jones)
२) Alaska: Celebrate the States (Marshall Cavendish)
३) Mission Klondike (James M. Sinclar)
४) Alaska : saga of a bold land (Walter R. Borneman)
५) Gamblers and Dreamers: Women, Men, and Community in the Klondike (Charlene Porsild)
६) Klondike Gold Rush Museum - National Historical Park, Seattle Unit
(लेखात वापरलेली सर्व चित्रे आंतरजालावरून घेतलेली आहेत व प्रताधिकारमुक्त आहेत.)

इतिहासलेख

प्रतिक्रिया

हा भाग पण आवडला. गोल्ड रशच्या वेळी काहींनी उदा. लिव्हाय (बहुतेक) जीनच्या पँटी विकायला सुरुवात केली अन त्यातच स्वतः ची भरभराट केली अस ऐकुन आहे.

किलमाऊस्की's picture

9 May 2013 - 8:25 am | किलमाऊस्की

पण ते कॅलिफोर्निया गोल्ड रशच्या वेळी.

जिन्क्स's picture

12 May 2013 - 1:17 am | जिन्क्स

जीनच्या पँटी!!!!!!!!!!! अवघडच म्हणायच

बॅटमॅन's picture

12 May 2013 - 1:33 am | बॅटमॅन

अच्रत बव्लत

श्रीरंग_जोशी's picture

9 May 2013 - 9:04 am | श्रीरंग_जोशी

अलास्कातील गोल्ड रशचा पुढील टप्पा काय असणार याबद्दल या भागाने बरीच उत्कंठा वाढविलेली आहे.

नाट्यमय शैलीने केलेले वर्णन आवडले. तत्कालिन जाहिरांतीच्या चित्रांनी रोचकता अधिक वाढवली आहे.

प्रचेतस's picture

9 May 2013 - 9:56 am | प्रचेतस

उत्तम लेखमाला.
अशीच एक लेखमाला दक्षिण आफिक्रेतल्या सोने आणि हिर्‍यांच्या शोधांवर पण येऊ द्या.

शिल्पा ब's picture

9 May 2013 - 9:57 am | शिल्पा ब

+१

किलमाऊस्की's picture

9 May 2013 - 10:20 pm | किलमाऊस्की

फार पूर्वी वाचलं होतं त्याबद्द्ल. फार रोचक आहे तो ही इतिहास.

प्रचेतस's picture

10 May 2013 - 3:32 pm | प्रचेतस

हो.
त्याबद्दलच.

मुक्त विहारि's picture

9 May 2013 - 12:07 pm | मुक्त विहारि

हा पण भाग मस्त जमला आहे.

चाणक्य's picture

9 May 2013 - 1:09 pm | चाणक्य

राहिलं काय?

किलमाऊस्की's picture

9 May 2013 - 10:21 pm | किलमाऊस्की

चुकून राहीलं.

अग्निकोल्हा's picture

10 May 2013 - 12:31 am | अग्निकोल्हा

पुढिल भागाच्या प्रतिक्षेत.

हा भाग तर अजूनच भारी झालाय!!! रश रश नक्की म्हणतात कशाला त्याचे वर्णन लै प्रत्ययकारी झालेय. वरिजिनल फटू अन कात्रणे टाकल्यामुळे अजूनच मजा आलीये.

अवांतरः तुमच्या नावामुळे तर या विषयात जास्त रस(श) नाहीये ना तुम्हाला ;)

पण प्रांजळपणे सांगतो अ‍ॅडव्हेंचर सब्जेक्ट हाताळाणे हेच मुळातच अतिशय मोजक्या स्त्रियांना झेपलेलं कार्य आहे. अन्यथा विषय, चर्चा कोणतीही असो "अबोलीछाप" त्यातुन निसटलेला नसतो असच दिसुन येत. पण ही लेखमाला एक सुखद धक्का आहे व अगदी पहिल्या भागापासुन या लेखमालेने जबरदस्त पकड घेतली आहे.

लेखिकेच्या नावाचा संदर्भ कळला नाही स्पश्ट झाल्यास बर होइल...

विषय अन लेखिकेचे नाव म्हंजे आयडी हे बघावे, स्पष्ट होईलच.

अन्यथा विषय, चर्चा कोणतीही असो "अबोलीछाप" त्यातुन निसटलेला नसतो असच दिसुन येत. पण ही लेखमाला एक सुखद धक्का आहे व अगदी पहिल्या भागापासुन या लेखमालेने जबरदस्त पकड घेतली आहे.

हे एक अतिशय रोचक निरीक्षण आहे. या लेखमालेबद्दल पूर्ण सहमत! काहीसा जजमेंटल असा "अबोली टच" कुठेही जाणवत नाही इथे. पण लेखमालेचे कौतुक या कारणासाठी करावे की कसे त्याबद्दल द्विधा मनःस्थितीत आहे.

लेखिकेचे नाव (अथवा आयडी) बघुन स्पश्ट मला झालं नाही म्हणुनच तर प्रांजळ कुतुहलाने विचारलं होत.
क्लोंडायक = हेमांगीके ?
(Klondike) = हेमांगीके ?
गोल्ड = हेमांगीके ?
रश = हेमांगीके ?

काहीसा जजमेंटल असा "अबोली टच" कुठेही जाणवत नाही इथे.

खरयं.

पण लेखमालेचे कौतुक या कारणासाठी करावे की कसे त्याबद्दल द्विधा मनःस्थितीत आहे.

स्त्रियां आणी **च्या भावना दुखावणार असे वाटत असेल तर नका कौतुक करु, सक्टी नॉय.

विषय सोन्याशी संबंधित आहे. लेखिकेचे नाव हेमांगीके. हेम=सोने. म्हणून तसे म्हणालो.

स्त्रियां आणी **च्या भावना दुखावणार असे वाटत असेल तर नका कौतुक करु, सक्टी नॉय.

चूक. मुद्दा तो नाही. एका पातळीपलीकडे चांगल्या लिखाणाचे कौतुक ते चांगले आहे म्हणूनच करावे असे माझे मत आहे. अबोली टच नाही हे एक वैशिष्ट्य म्हणता येईल, पण त्याला मुख्य फीचर बनवू नये असे मला वाटते. असो. अजून चर्चा केल्यास अवांतर होईल असे वाट्टे म्हणून तूर्त इथेच थांबतो.

विषय सोन्याशी संबंधित आहे. लेखिकेचे नाव हेमांगीके. हेम=सोने. म्हणून तसे म्हणालो.

अच्छा. छानच माहिती, आत्ता डोक्यात उजेड पडला. तुमच्या मुळ अवांतराशी अतिशय सहमत. फार सुरेख.

एका पातळीपलीकडे चांगल्या लिखाणाचे कौतुक ते चांगले आहे म्हणूनच करावे असे माझे मत आहे.

होय. सहमत.

अबोली टच नाही हे एक वैशिष्ट्य म्हणता येईल, पण त्याला मुख्य फीचर बनवू नये असे मला वाटते. असो. अजून चर्चा केल्यास अवांतर होईल असे वाट्टे म्हणून तूर्त इथेच थांबतो.

चुक. अबोली टच असणे हे जर तुमच्या लेखी वैगुण्य ठरत असेल तरच अबोली टच नाही हे एक वैशिष्ट्य ठरत. मी मात्र याकडे एखाद्या लिखाणाची/विषयाची गरज "अबोली टच" आहे की नाही इतक्याच निकोपतेने बघतो. आणि लेखिकेने तो या लेखमालेमधे टाळुन विषयाला अतिशय योग्य न्याय दिला आहे जे फार कमी स्त्रि लेखकांकडुन घडते म्हणून अबोली टच टाळला याचे विषेश कौतुक करायला हवेच हवे.

तुम्ही सहज बघु शकता की स्त्रियांचे या लेखमालेत विषेश प्रतिसाद नाहीत ? कारण काय ? तर अबोली टच मिसींग... जणू स्त्रिची लेखमाला म्हणजे तेच लिहलं पाहिजे असा अट्टहास. हीच लेखमाला पुरूषाने लिहली असती तर ... ? म्हणूनच म्हटलं होत की स्त्रियां आणी **च्या भावना दुखावणार असे वाटत असेल तर नका कौतुक करु, सक्टी नॉय. पण हेमांगिके यांनी अबोली टच टाळायचे जे धाडस दाखवले त्याबद्दल विषेश कौतुक झालेच पाहिजे. कारण लिखाण चांगले असुनही केवळ अबोली टच मिसींग असल्याने स्त्रियां आणी **नी प्रतिसाद देण्यात हात आखडते घेतलेत हे वास्तव मला आवडले नाही.

अबोली टच असणे हे जर तुमच्या लेखी वैगुण्य ठरत असेल तरच अबोली टच नाही हे एक वैशिष्ट्य ठरत. मी मात्र याकडे एखाद्या लिखाणाची/विषयाची गरज "अबोली टच" आहे की नाही इतक्याच निकोपतेने बघतो. आणि लेखिकेने तो या लेखमालेमधे टाळुन विषयाला अतिशय योग्य न्याय दिला आहे जे फार कमी स्त्रि लेखकांकडुन घडते म्हणून अबोली टच टाळला याचे विषेश कौतुक करायला हवेच हवे.

असो.अबोली टच हे वैगुण्य नसून तो कुठेही पुसता न येणे हे वैगुण्य असे मी म्हणेन बाकी मी थोडा असहमत आहे हायलाईटेड भागाशी. पण कौतुक का करावे याबद्दल मतभेद असले तरी कौतुकाबद्दल मतभेद नाहीत हेही नसे थोडके :)

तुम्ही सहज बघु शकता की स्त्रियांचे या लेखमालेत विषेश प्रतिसाद नाहीत ? कारण काय ? तर अबोली टच मिसींग... जणू स्त्रिची लेखमाला म्हणजे तेच लिहलं पाहिजे असा अट्टहास. हीच लेखमाला पुरूषाने लिहली असती तर ... ? म्हणूनच म्हटलं होत की स्त्रियां आणी **च्या भावना दुखावणार असे वाटत असेल तर नका कौतुक करु, सक्टी नॉय. पण हेमांगिके यांनी अबोली टच टाळायचे जे धाडस दाखवले त्याबद्दल विषेश कौतुक झालेच पाहिजे. कारण लिखाण चांगले असुनही केवळ अबोली टच मिसींग असल्याने स्त्रियां आणी **नी प्रतिसाद देण्यात हात आखडते घेतलेत हे वास्तव मला आवडले नाही.

हम्म, असो. :)

अग्निकोल्हा's picture

10 May 2013 - 5:02 pm | अग्निकोल्हा

अबोली टच हे वैगुण्य नसून तो कुठेही पुसता न येणे हे वैगुण्य असे मी म्हणेन

अस मानताय तर वैगुण्यावर मात करुन लेखन केलय त्यांच्या कौतुक वर्षावात वैगुण्यावर मातकेल्या बद्दल आपण द्विधामनःस्थिती बाळगणे जास्त अनाकलनिय.

मी थोडा असहमत आहे हायलाईटेड भागाशी

अगदी संपुर्ण असहमत असाल तरी आश्चर्य वाटणार नाही. हा गैरसमज केवळ स्त्रिया व जेष्ठांनी राखलाय असं नाही तर द्विधा मनःस्थितीचे लोकही त्याला बळी पडलेत, फक्त त्यांना काऊंट करत नाही कारण त्याची सध्यस्थितीत विषेश आवश्यक्ता नाही इतकच.

पण कौतुक का करावे याबद्दल मतभेद असले तरी कौतुकाबद्दल मतभेद नाहीत हेही नसे थोडके

हेहेहे... एकदा द्विधा मनःस्थितीतुन बाहेर पडल्यावर आपोआप सगळ्याच बाबतीत एकमत झालेले असेल १००%.

किलमाऊस्की's picture

11 May 2013 - 7:44 am | किलमाऊस्की

लेखिकेचे नाव (अथवा आयडी) बघुन स्पश्ट मला झालं नाही म्हणुनच तर प्रांजळ कुतुहलाने विचारलं होत.

वर स्पष्टीकरण आलच आहे. माझ्या नावाचा अर्थ "सोन्याचं अंग असलेली" (आणि प्रत्यक्ष जीवनात सोन्याच्या दागिन्यांचा तिटकारा असलेली :-P) तुम्ही केलेल्या कौतुकासाठी मनःपूर्वक धन्यवाद :-)

बाकी क्लोंडायकमधल्या अबोली गटाबद्द्ल येईलच पुढच्या काही भागात.

किलमाऊस्की's picture

11 May 2013 - 7:33 am | किलमाऊस्की

अवांतरः तुमच्या नावामुळे तर या विषयात जास्त रस(श) नाहीये ना तुम्हाला smiley

हाहाहा... हे भारीच्चे !!! माझ्याही लक्षात आलं नव्हतं.

lakhu risbud's picture

10 May 2013 - 3:23 pm | lakhu risbud

हं …. चार्ली चाप्लीन याच्या गोल्ड रश चित्रपटा मधील काही प्रसंगांची,व्यक्तीची आत्ता संगती लागली

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 May 2013 - 3:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

पुभाप्र

आवांतर : क्लोंडायक मधली एखादी अलुव्हियल सोन्याने भरलेली जागा चुकून विसरून राहिली असली तर सांगा... सगळ्या मिपाकरांना घेवून जावे म्हणतो +D सहलीचे सोने होईल ;)

किलमाऊस्की's picture

11 May 2013 - 7:45 am | किलमाऊस्की

चालेल की, त्याआधी मला जाउन खात्री करुन येउदे. :-P

अभ्या..'s picture

12 May 2013 - 4:22 pm | अभ्या..

मस्त लेखमाला जमलीय. ते अबोलीटच वैगैरे सोडून देता तुम्ही तत्कालीन जाहीरातींचे जे नमुने दिलेत ते विशेष आवडले.
पुढील भागांना खूप खूप शुभेच्छा. (तुमच्या अ‍ॅझ्टेक लेखमालेतील चित्रे पण अशीच माहीतीपूर्ण होती)

पैसा's picture

10 May 2013 - 11:01 pm | पैसा

अतिशय सुंदर लेखमाला. सावकाश वाचण्यासाठी म्हणून ठेवून दिला होता लेख. मस्त वाटला.

अवांतरः गोल्ड वरून मॅकेन्नाज गोल्ड देखील आठवला.

बॅटमॅन's picture

10 May 2013 - 11:08 pm | बॅटमॅन

अतिअवांतरः

मॅकेन्नाज गोल्ड = मकुअण्णांचं सोनं

गन्स ऑफ नेव्हरॉन = नरवणेंच्या बंदुका

असे दिव्य पीसेस ऑफ लिट्रेचर कधीकाळी वाचले होते. कळायचं बंद झालं तेच्यायला =))

श्रीरंग_जोशी's picture

10 May 2013 - 11:11 pm | श्रीरंग_जोशी

मकुअण्णांचं सोनं, नरवणेंच्या बंदुका :-)

हे दोन्ही चित्रपट माझे आवडते आहेत.

बॅटमॅन's picture

10 May 2013 - 11:22 pm | बॅटमॅन

माझेपण :)

अभ्या..'s picture

12 May 2013 - 4:18 pm | अभ्या..

बॅट्या त्याचा हिंदीत डब काय होता म्हायतीय का? मस्तान का सोना. :)
मी बघितला हाय तो डब. लैच पुस्तकी संवाद होते.

बॅटमॅन's picture

12 May 2013 - 4:26 pm | बॅटमॅन

=)) =)) मस्तान का सोना =)) मजाये राव :D

चित्रा's picture

10 May 2013 - 11:37 pm | चित्रा

तुमचे हे माहितीपूर्ण पण रंजक असलेले लेख नेहमीच खूप आवडतात.
पंधरा वर्षांचा अनुभव मिरवणारी जाहिरात आवडली.
आम्हाला आपले हे युकॉन गोल्ड बटाटे माहिती होते :)
http://en.wikipedia.org/wiki/Yukon_Gold_potato

किलमाऊस्की's picture

11 May 2013 - 7:51 am | किलमाऊस्की

मनःपूर्वक धन्यवाद !!

jaypal's picture

11 May 2013 - 1:09 pm | jaypal

तुझे या पुर्वीचे सगळे ले़ख अप्रतीम होते त्यात हा अजुन एक भर.
खुप छान लिहीतेस. असेच लिहीत रहा.
पुढिल लि़खाणास लक्ष लक्ष शुभेच्छा

प्यारे१'s picture

11 May 2013 - 2:49 pm | प्यारे१

छान माहिती मिळते आहे. मस्त.

कवितानागेश's picture

11 May 2013 - 4:50 pm | कवितानागेश

मस्त माहिती आहे तिन्ही भागात. पुढच्या भागांची वाट बघतेय...

प्रसाद गोडबोले's picture

12 May 2013 - 4:35 pm | प्रसाद गोडबोले

गोल्डरश वाचताना अ‍ॅड्रिनॅलिन रश होत आहे !!

मस्तच लिहित आहात
.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत !!

( अवांतर : क्लोंडायक सारखी जागा भारतात कुठे आहे का हो ? ;) एकवेळ सोनं नसले तरी चालेल पण काहीतरी नवीन शोधण्याचा एक्स्प्लोअर करण्याच्या कल्पनेनेही रोमांच उभे राहतात :) )

किलमाऊस्की's picture

15 May 2013 - 9:42 pm | किलमाऊस्की

.

किलमाऊस्की's picture

15 May 2013 - 9:41 pm | किलमाऊस्की

या मालिकेतील पुढील भाग - क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ४

जुइ's picture

16 May 2013 - 5:50 am | जुइ

रोचक माहीती मीळत आहे.