काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने -२

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
15 Feb 2013 - 7:35 pm

आणखी काही नामांकित रसायने ही आहेत.

शेजारी.

हे रसायन स्फोटक नसले तरी अत्यंत उपद्रवी व बरेचसे चिकट असते. याचा शब्द-नाद अत्यंत मधुर असतो. किल्ल्यांपासून कुत्र्याच्या पिल्ल्यांपर्यंत काहीही जबाबदारी यांच्याकडून आपल्याला चिकटवली जाऊ शकते. म्हणून हे रसायन हाताळताना त्याचे अति निकट सान्निध्य टाळण्याची खबरदारी बाळगावी अन्यथा चिकट अनुभव येतो.
हे रसायन पाण्यापेक्षाही प्रवाही असल्याने फट दिसली की आत घुसलेच म्हणून समजावे.
आपल्या घरी काही खमंग पदार्थ बनत असताना आपल्याआधी याला त्या पदार्थाचा वास पोचतो. लगेच बाल-शेजारी ‘काकू, काय मस्त वास सुटलाय हो, काय बनवताय ?’ असे म्हणत थेट आपल्या स्वयंपाकघरात येऊन चिकटतात. यावेळी घरातील किमती व नाजूक वस्तू बंदोबस्तात असल्याची खात्री करून घ्यावी अन्यथा त्यांचे लग्न लागलेच म्हणून समजावे.
आपले टपाल आपल्याआधी यांच्या हाती पडावे असे पोष्टखात्याचे सर्क्युलर असल्याचे समजते. शिवाय आपले वर्तमानपत्र, भांडी, शेकायच्या ब्यागा, थर्मामीटर, आले, कोथिंबीर, कढीपत्ता, सायकलीचा पंप, स्क्रू-ड्रायव्हर, बागकामाची कात्री इ. असंख्य वस्तूंवर यांचाच प्रथम हक्क असतो.
आपल्या घरी पहिल्यांदा येणाऱ्या, महत्त्वाच्या पाहुण्याने यांना पत्ता विचारला तर हे रसायन कोरेच राहते. पण गणेशोत्सवाची वर्गणी , शस्त्रक्रियेसाठी मदत, मंदिर जीर्णोद्धार देणगी इ. मागत फिरणारे लोक आपला अगर इतर कुणाचा पत्ता विचारू लागल्यास मात्र यांचा रंग लिटमस पेपरप्रमाणे गुलाबी होतो व वर्गणीवाल्यास तत्परतेने आपल्या दारापर्यंत आणून सोडले जाते.
पाहता पाहता रंग बदलणारे हे रसायन स्वत:च्या पिडणाऱ्या कार्ट्यांना ‘नको’ त्या वेळी आपल्या घराचा रस्ता दाखवण्यात पटाईत असते. मात्र आपली कार्टी त्यांच्या घरी गेली, की ‘अरे, आमच्या सोनूला ताप आलाय, तुला इन्फेक्शन होईल, बरं. घरी जा आपल्या.’ असे बिनदिक्कत सांगतात.
चौकसपणा हा या रसायनाचा आणखी एक अव्वल गुणधर्म आहे.
‘काल काय पाहुणे आले होते वाटतं ? नाही, श्रुती कधी नव्हे ते साडी नेसली होती...?’
‘आजींना बरे वाटत नाही काय ? झोपल्यायेतशा ?... बाकी, रात्री वैनींचा आवाज आजींच्या वर कडी करत होता हो...’
‘हरीश बाळ , चेहेरा का रे सुकलाय तुझा ? अरे हो, निकाल काय लागला तुझा दहावीचा ?’
अशा अनंत चौकशा अविरत करीत राहिल्यामुळे भगवंतानंतर सर्वज्ञ ते हेच असे आपण जाणून असावे..
असे हे ‘ शेजारी’ नावाचे रसायन काहीसे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशा प्रकारात मोडते.
बॉस :
हापिसातील सर्वोच्च स्थानी असणारे हे रसायन बहुरंगी असून त्याचा ‘मूड’ एकसारखा बदलत असतो.म्हणून हापिसकरांना वेळोवेळी त्याचा राग-रंग पाहून त्याप्रमाणे त्याला हाताळावे लागते. याची मर्जी व्यवस्थित सांभाळू शकणाऱ्या चाकरमान्यास चाकरमानी आयुष्यात सहसा काही विवंचना पडत नाही. पण हे काम सोपे नसून ‘तेथे पाहिजे जातीचे ...येरागबाळ्याचे काम नोहे.’ या उक्तीचा प्रत्यय देणारे आहे. चाकरमानी हापिसकरांच्या बाबतीत बॉस या रसायनाचे ब्रीदवाक्य म्हणजे, ’आगे चले भें**, पीछे चले मा****, और साथ चले तो साला बराबरी करता है...’ हे असते. त्यामुळे कोणत्या वेळी आगे चालायचे अन कोणत्या वेळी साथ साथ याचे अत्यंत तरल भान राखणारा प्राणीच त्याला हाताळण्यात यशस्वी होऊ शकतो.
हे रसायन वरचेवर गरम होत असल्याने त्याला वातानुकूलित ‘केबिन’मध्ये ठेवावे लागते. रसायन केबिनमध्ये असण्याचा दुसरा एक फायदा म्हणजे एका हापिसकराला मिळालेले शाब्दिक फटके दुसऱ्याला समजत नाहीत. ‘यूसलेस’, ‘बेअक्कल’, ‘होपलेस’, इ. शेलक्या विशेषणांचे बुडबुडे या रसायनातून जातायेता उठत असतात.. सराईत अन पोचलेले हापिसकर ती फारशी मनावर घेत नाहीत.
चाणाक्ष हापिसकर बॉसच्या येण्याजाण्याच्या वेळा, अजेंड्यावरचं आजचं ताजं कलम अन महत्वाचं म्हणजे याची आजची मनस्थिती याची खबरबात ‘शिपाई’ नामक दुसऱ्या रसायनाच्या मदतीने व्यवस्थित ठेवतात. तसेच हे हापिसकर स्वत:च्या कामापेक्षा बॉसच्या आवडीनिवडीचे अन त्याबरोबरच सौ. बॉस, चि. बॉस आणि कु. बॉस यांच्याही आवडीनिवडींचे ज्ञान अन भान विशेषत्वाने ठेवतात. सौ. बॉसना मार्केटमधील कोणती वस्तू कोठे उत्तम मिळते, याचा न मागता सल्ला देणे, कॉलेजात जाणाऱ्या चि. बॉससाठी टेनिस कोर्टचे बुकिंग करणे , कु. बॉससाठी आवर्जून तिच्या आवडीप्रमाणे पांढरीशुभ्र किंवा सोनेरी मनीम्याव आणून देणे, इ. कृत्ये हापिसकराच्या हातून पार पडली, की बॉस हे झोम्बरे रसायन अंतर्यामी निवळ बनते अन ही कार्ये करणाऱ्या चाकरमान्याला फारसे झोंबत नाही.
एकंदरीत, हे रसायन काहीशा विशेष कौशल्याने हाताळले असता, फारसे उपद्रवी नाही.
(क्रमश:)

विनोदप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

किल्ल्यांपासून कुत्र्याच्या पिल्ल्यांपर्यंत काहीही जबाबदारी यांच्याकडून आपल्याला चिकटवली जाऊ शकते

एक नंबर.....

आदूबाळ's picture

15 Feb 2013 - 8:22 pm | आदूबाळ

दोन दोन बॉस असणं म्हणजे तर एकाच वेळी दोन दोर्‍यांवरची कसरत.

मला काही काळापूर्वी असेच दोन बॉस होते. त्यातला टाप बॉस केबिनमध्ये बसायचा आणि उप-बॉस माझ्या पलिकडे चार खुराडी (क्युबिकल्स) टाकून बसायचा. टाप बॉसच्या चमत्कारिक वागण्याचा त्यालाही त्रास व्हायचा आणि मलाही, आणि मग तो माझ्याकडे येऊन चिडचिड करायचा.

एकदा मी कामात गर्क असताना उप-बॉस माझ्याकडे आला आणि कोणतीही प्रस्तावना न करता "आपल्याकडे तो गाढव आहे ना, त्याने अमुक-तमुक केलं" वगैरे रडगाणं गायला लागला. मी अनावधानाने त्याला म्हणालो, "कोण? तो केबिनमधला गाढव, की..." आणि चट्कन जीभ चावली!

उप-बॉस रागाने जांभळा झाला!

क्युबिकल म्हणजे खुराडं आणि केबिन म्हणजे गोठा.. अत्यंत समर्पक उपमा आहेत.

चौकटराजा's picture

15 Feb 2013 - 8:25 pm | चौकटराजा

शेजारी नावाचे रसायन जे आपण वर्णीलेले आहे त्याचे आता हाफ लाईफ संपले आहे. त्यात पूर्वीचे चौकसपणा, आगाउपणा, राहिलेला नाही. कारण आपुलकी ग्रूप या रसायना पासून काळाच्या प्रयोगशाळेत अलग झालेला आहे.

बॉस हे रसायन आहे पण ते मौल आहे. सोडीयम सारखे. त्याला चापलूसी , विशेस, बर्थ्डे गिफट यांच्या मिंळून झालेल्या द्रावणात बुडवून ठेवले की ते चुप्प बसते. त्याच्या बायकोच्या माहेरचा एखाद्या गुणाचा ग्रूप तुमच्या रसायनात असेल तर
मात्र हे रसायन तुमच्याशी मस्त रूम टेपरेचरला संयोग पावते व आपला दोघांचा संकर अ‍ॅरोमॅटिक कंपाउण्ड असते.

यसवायजी's picture

17 Feb 2013 - 10:27 pm | यसवायजी

@ स्नेहांतै : मस्त लिहीलय..
--------------------
>> शेजारी नावाचे रसायन जे आपण वर्णीलेले आहे त्याचे आता हाफ लाईफ संपले आहे. पूर्वीचे चौकसपणा, आगाउपणा, राहिलेला नाही >>
अपार्टमेंट मध्ये (किंवा पुण्या-मुंबई सारख्या मेट्रोत) राहणार्‍या शेजार्‍यांच्या बाबतीत हे खरे असले तरी, इतरत्र हे गुण (आणी दोष सुद्धा :) ) अजुन टिकून आहेत. (असं मला वाटतं.)

"शेजारी" रसायनाचे वर्णन आवडले.

अभ्या..'s picture

15 Feb 2013 - 9:20 pm | अभ्या..

स्नेहातै अप्रतिम वर्णन या रसायनांचं पण.
तरी हा केमिस्ट्रीचा तास जरा लवकरच आटपला म्याडम तुम्ही. पण क्रमश: वाचून जरा हायसे वाटले. :)
और आन दो जल्दी जल्दी.

इनिगोय's picture

17 Feb 2013 - 1:52 am | इनिगोय

हो ना.. आणखी येऊदेत अशी नमुनेदार रसायनं :)

मुक्त विहारि's picture

15 Feb 2013 - 9:24 pm | मुक्त विहारि

एकदम खुश्खुशीत लेख..

वेल्लाभट's picture

15 Feb 2013 - 9:40 pm | वेल्लाभट

सुसाट !!!

पैसा's picture

15 Feb 2013 - 9:58 pm | पैसा

शेजारी जास्त आवडले. पुढचा भाग येऊ द्या!

किसन शिंदे's picture

16 Feb 2013 - 6:49 am | किसन शिंदे

हेच म्हणतो.

पै तैंशी सहमत. शेजारी नावाचं रसायन जरा जास्त आवडलं.

हे हे हे. भलत्याच अभ्यासू बुवा तुम्ही स्नेहातै! ;)

लीलाधर's picture

16 Feb 2013 - 8:39 am | लीलाधर

शेजारी नामक रसायन अफलातुनच ओ !
अवांतर : बाकी हे क्रमाने येणारे शहा नामक रसायन त्यावर काही तोडगा असेल तर तोही लौकर येउद्या :))

इनिगोय's picture

17 Feb 2013 - 1:54 am | इनिगोय

:P

गौरव जमदाडे's picture

16 Feb 2013 - 9:36 am | गौरव जमदाडे

रासायनिक पृथ्थकरण भलतेच चांगले केले आहे.

क्रमश वाचून पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

स्पंदना's picture

16 Feb 2013 - 12:23 pm | स्पंदना

आजींना बरे वाटत नाही काय ? झोपल्यायेतशा ?... बाकी, रात्री वैनींचा आवाज आजींच्या वर कडी करत होता हो...

खपले!!

बॅटमॅन's picture

16 Feb 2013 - 12:28 pm | बॅटमॅन

+१११११११११११११११.

शेजारी इज़ बेस्ट!!!! ते वाक्य वाचून रुकमणी रुकमणी ची उगीच आठवण झाली =))

नि३सोलपुरकर's picture

16 Feb 2013 - 12:47 pm | नि३सोलपुरकर

" हे रसायन वरचेवर गरम होत असल्याने त्याला वातानुकूलित ‘केबिन’मध्ये ठेवावे लागते." :१००% सहमत.

जाम हसतोय. बाकी रेवतीतैशी बाडीस आहेस हा स्नेहातै!

और आन दो

सानिकास्वप्निल's picture

16 Feb 2013 - 2:09 pm | सानिकास्वप्निल

‘ शेजारी’ नावाचे रसायन काहीसे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशा प्रकारात मोडते.

चिगो's picture

16 Feb 2013 - 4:41 pm | चिगो

"शेजारी" नावाचे रसायन एकदम जमून आलेय.. बाकी तुमच्या रसायनांवरुन केमिस्ट्रीच्या फायनल प्रॅक्टीकलचा व्हायवा आठवला.
मी माझ्या आयुष्यातला सगळा अभ्यास फक्त कॉलेजनंतरच केलाय. त्यामुळे प्रॅक्टीकल एक्झाममध्ये ग्रुपमधल्या पोरींच्या ज्ञानावर किंवा मधाळपणावर (जो लॅब अटेंडंटकडून उत्तरे मिळवण्यात कामी यायचा ;-)) आमची भिस्त असायची. एका व्हायवात एक्सटर्नलने "ह्या प्रक्रियेत सॉल्व्हंट कुठला वापरलाय?" म्हणून विचारलं. आता मी कशाला रिअ‍ॅक्शन केलेली? ते काम बिचार्‍या पोरींचं.. त्यामुळे शष्प काही माहीत नव्हतं.. मला एकच युनिव्हर्सल सॉल्व्हंट माहीत.. पाणी ! सांगितलं.. एक्सटर्नल थिजला बिचारा ! शेवटी त्यानीच मला "ह्या रिअ‍ॅक्शनमध्ये कुठेच पाणी नाहीय" हे सगळी रिअ‍ॅक्शन समजावून देत सांगितलं.. मी "थँक्यु सर" म्हणून सुटलो...
मला अजूनही त्या प्रॅक्टीकलमध्ये फेल झाल्याने ग्रॅज्युएट न झाल्याची भयाण स्वप्ने पडतात !! :-(

हे रसायन वरचेवर गरम होत असल्याने त्याला वातानुकूलित ‘केबिन’मध्ये ठेवावे लागते.

हम्म.. केबीनचा एसी तपासून घ्यावा म्हणतो..

जेनी...'s picture

16 Feb 2013 - 7:56 pm | जेनी...

जबरदस्त .

अब्या एक रीक्वेस्ट आहे ... ती बनवलेली चित्र आणिराहिलेली चित्र प्लिझ
कम्प्लिट करुन लेखात टाक ... खुप मजा येइल .. अ‍ॅटलिस्ट ३र्या भागात तरि येवुदे

लेख अ‍ॅझ युझ्वल स्नेहाटैप ... झक्कास :)

अधिराज's picture

16 Feb 2013 - 11:43 pm | अधिराज

हाही लेख आवडला.

उपास's picture

17 Feb 2013 - 2:00 am | उपास

शेजारी आवडलंच पण बॉसच्या रसायनाचं ब्रीदवाक्य भातात खडा यावा तस अस्थानी वाटलं (लेखातील इतर भाषा, प्रसं यांचा विचार करता).

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Feb 2013 - 9:39 am | ज्ञानोबाचे पैजार

शेजार्‍यांची गैरसोय नको म्हणुन सध्या आमचा पेपर वाला पेपर शेजारीच टाकतो. (हे पेपरवाल्याला त्यांनीच परस्पर सांगीतले आहे.) संध्याकाळी घरी गेल्यावर मग मी त्यांच्याकडून मागून आणून वाचतो. त्यांना वेळी अवेळी दारात कोणी आलेले आवडत नाही.त्यामुळे देताना कपाळावर आठी पडते त्यांच्या. पण मी लोचटासारखा रोज तो मागुन आणतोच.
पैजारबुवा,

मोदक's picture

17 Feb 2013 - 10:06 am | मोदक

वाचतोय...

पुभाशु.

तुमचा अभिषेक's picture

17 Feb 2013 - 12:14 pm | तुमचा अभिषेक

जरा वाढवले असते तरी आवडले असते वाचायला..
पुढच्या रसायनांच्या प्रतिक्षेत.. :)

मनोरा's picture

17 Feb 2013 - 4:12 pm | मनोरा

स्नेहांकिता, फार छान वर्णन केलं आहे. त्या शिव्या एडिट केल्या दिसतंय. मी त्या शिव्या बद्दलच कमेंट करणार होतो. खरोखरच अशा शिव्या महिलांसमोर पुणे, मुंबई च्या ऑफीसेस मधुन कुनी देतं का? ही रीयालिटी आहे काय?
एकदा मी पुन्यात एका ऑफीस मधे गेलो होतो. रीसेप्शन वर बसलेली मुलगी मी समोर असतानाही मला ऐकु येत असतानाही तीच्या कलीग ला बोलताना माझ्या क्डे दुर्लक्श करुन सारखे "फक, फक" म्हनु लागली. म्हनजे जसं "आयला किंवा च्याआयला" म्हनतात ना तसे. तीला त्याचा अर्थ माहीत नसावा. माहीत असुन जर ती म्हनत असेल तर धन्य ती अबला/ पाशवी शक्ती. असो. आयला किन्वा च्यायला जर पोरी म्हनत असतील तर त्याच्या पुढे फार घान शब्द येतो. तो उच्चारायचं टाळतात काही लोक.
लेखन अतीशय छान वाट्ले. वाचुन मजा आली.

सस्नेह's picture

17 Feb 2013 - 10:09 pm | सस्नेह

मनोरा आणि उपास,
सदर शब्द(शिवी) लेख लिहिताना मलाही खटकले होते. तथापि वस्तुस्थितीचे यथार्थ वर्णन करण्यासाठी याहून चपखल शब्द मला सुचले नाहीत. औचित्यभंगाबद्दल क्षमस्व.
'बॉस’चे हे वर्णन मी प्रथम ऐकले ते नुकतीच नोकरीला लागल्यानंतरच्या काळात एका ज्येष्ठ निवृत्त्याभिमुख सहकाऱ्याकडून. तेव्हापासून ते माझ्या मनात घर करून आहेत...

उपास's picture

17 Feb 2013 - 10:50 pm | उपास

शब्द हे हत्यार आहे.. मनातल्या भावना पोहोचवण्यासाठी चपखल शब्द/ म्हण/ वाक्प्रचार सुचणे ही कला आहे. तुमच्या लिखाणाचा बाज, सूक्ष्म निरीक्षणशक्ती तसेच शब्दसंपत्ती बघता हे वाक्य वाचताना खटकलच. मुख्य म्हणजे 'गोलपीठा' किंवा तात्याची 'रोशनी' अशा कथांमध्ये/ लेखांमध्ये किंवा मारामारीच्या वर्णनामध्ये वातावरणनिर्मितीसाठी असे (अप्)शब्द आपण समजू शकतो इथे ते अस्थानी वाटण्याचं कारण मूळ लेखापासून, त्यतील मध्यमवर्गीय भाषेपासून/ परिस्थितीपासून ते वेगळे वाटले, शिवाय स्त्रीजातीस अपमानास्पद असूनही सहजपणे (मजा म्हणून) वापरल्यासारखे वाटले.
शिवाय, स्त्रियांना कानकोंडे होईल असे वातावरण इथे सुरु व्हायला मिपावर मग वेळ लागणार नाही, तुमच्या लेखाची लिंक देऊन, हे चालते मग ते का नाही असे तुलनात्मक पांडित्य पुढे येणार नाही ह्याची खात्री नाहीच, शेवटी हा पब्लिक फोरम आहे आणि तिथे सौजन्याची अपेक्षा असणे गैरे वाटत नाही.
लेख आवडला हे पुन्हा नमूद करतोय, लोभ असावा! :)
इतके बोलून आणि सं मं चे आभार मानून मी माझे चार शब्द संपवतो.. :)

यसवायजी's picture

17 Feb 2013 - 11:09 pm | यसवायजी

+१

शब्द हे हत्यार आहे.मनातल्या भावना पोहोचवण्यासाठी चपखल शब्द/ म्हण/ वाक्प्रचार सुचणे .
१०० टक्के सहमत. इथे एक नमूद केले पाहिजे की सदर लेखन या मनातल्या भावना नसून सामाजिक घटनांचे निरिक्षण आहे. निरिक्षण तटस्थ असावे. मी सोज्वळ शब्द वापरले म्हणून परिस्थिती तशी असत नाही....दुर्दैवाने.
मागे एकदा पर्ल यांनी एका धाग्यात कितीतरी संदर्भ देऊन मिपावरच्या भाषेवर टीका केली होती. हे सर्व लेखन भावनात्मक होते. माझे निरिक्षणात्मक आहे.

एडिट करण्याची गरज नव्हति .. लेखकाने लिहिताना वस्तुस्थिती जी आहे जशी आहे
ते दाखवण्याचा प्रयत्न करणे , वाईट नाहि ..
असो .

यसवायजी's picture

17 Feb 2013 - 10:46 pm | यसवायजी

पूजाक्का, वस्तुस्थिती दर्शवणारे लेख वेगळे येउ देत. इतका मस्त खुसखुशीत लेख वाचत असताना मधेच तार तुटते.
फॅमिली-मुव्ही मोड मध्ये असताना; एकच अडल्ट सीन टाकला की मग द-एंड पर्यंत तो दुसराच मोड ऑन राहतो.

विषयच तसा असेल तेंव्हा त्या टाईपचे शब्द पण चालतीलच ना. (आम्ही भर टाकण्याचा प्रयत्नही करु..)

स्वाती दिनेश's picture

18 Feb 2013 - 11:59 am | स्वाती दिनेश

मागच्या भागातली आणि ही सगळीच रसायने (हास्य)स्फोटक!
पु भा प्र
स्वाती

मनीषा's picture

20 Feb 2013 - 5:52 pm | मनीषा

ही पण रसायने छान.
सख्खे शेजारी मस्तच
आता पुढे ... ?

मृत्युन्जय's picture

20 Feb 2013 - 7:19 pm | मृत्युन्जय

मस्तच जमलाय हा भागही.