काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने -२
आणखी काही नामांकित रसायने ही आहेत.
शेजारी.
हे रसायन स्फोटक नसले तरी अत्यंत उपद्रवी व बरेचसे चिकट असते. याचा शब्द-नाद अत्यंत मधुर असतो. किल्ल्यांपासून कुत्र्याच्या पिल्ल्यांपर्यंत काहीही जबाबदारी यांच्याकडून आपल्याला चिकटवली जाऊ शकते. म्हणून हे रसायन हाताळताना त्याचे अति निकट सान्निध्य टाळण्याची खबरदारी बाळगावी अन्यथा चिकट अनुभव येतो.
हे रसायन पाण्यापेक्षाही प्रवाही असल्याने फट दिसली की आत घुसलेच म्हणून समजावे.
आपल्या घरी काही खमंग पदार्थ बनत असताना आपल्याआधी याला त्या पदार्थाचा वास पोचतो. लगेच बाल-शेजारी ‘काकू, काय मस्त वास सुटलाय हो, काय बनवताय ?’ असे म्हणत थेट आपल्या स्वयंपाकघरात येऊन चिकटतात. यावेळी घरातील किमती व नाजूक वस्तू बंदोबस्तात असल्याची खात्री करून घ्यावी अन्यथा त्यांचे लग्न लागलेच म्हणून समजावे.
आपले टपाल आपल्याआधी यांच्या हाती पडावे असे पोष्टखात्याचे सर्क्युलर असल्याचे समजते. शिवाय आपले वर्तमानपत्र, भांडी, शेकायच्या ब्यागा, थर्मामीटर, आले, कोथिंबीर, कढीपत्ता, सायकलीचा पंप, स्क्रू-ड्रायव्हर, बागकामाची कात्री इ. असंख्य वस्तूंवर यांचाच प्रथम हक्क असतो.
आपल्या घरी पहिल्यांदा येणाऱ्या, महत्त्वाच्या पाहुण्याने यांना पत्ता विचारला तर हे रसायन कोरेच राहते. पण गणेशोत्सवाची वर्गणी , शस्त्रक्रियेसाठी मदत, मंदिर जीर्णोद्धार देणगी इ. मागत फिरणारे लोक आपला अगर इतर कुणाचा पत्ता विचारू लागल्यास मात्र यांचा रंग लिटमस पेपरप्रमाणे गुलाबी होतो व वर्गणीवाल्यास तत्परतेने आपल्या दारापर्यंत आणून सोडले जाते.
पाहता पाहता रंग बदलणारे हे रसायन स्वत:च्या पिडणाऱ्या कार्ट्यांना ‘नको’ त्या वेळी आपल्या घराचा रस्ता दाखवण्यात पटाईत असते. मात्र आपली कार्टी त्यांच्या घरी गेली, की ‘अरे, आमच्या सोनूला ताप आलाय, तुला इन्फेक्शन होईल, बरं. घरी जा आपल्या.’ असे बिनदिक्कत सांगतात.
चौकसपणा हा या रसायनाचा आणखी एक अव्वल गुणधर्म आहे.
‘काल काय पाहुणे आले होते वाटतं ? नाही, श्रुती कधी नव्हे ते साडी नेसली होती...?’
‘आजींना बरे वाटत नाही काय ? झोपल्यायेतशा ?... बाकी, रात्री वैनींचा आवाज आजींच्या वर कडी करत होता हो...’
‘हरीश बाळ , चेहेरा का रे सुकलाय तुझा ? अरे हो, निकाल काय लागला तुझा दहावीचा ?’
अशा अनंत चौकशा अविरत करीत राहिल्यामुळे भगवंतानंतर सर्वज्ञ ते हेच असे आपण जाणून असावे..
असे हे ‘ शेजारी’ नावाचे रसायन काहीसे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशा प्रकारात मोडते.
बॉस :
हापिसातील सर्वोच्च स्थानी असणारे हे रसायन बहुरंगी असून त्याचा ‘मूड’ एकसारखा बदलत असतो.म्हणून हापिसकरांना वेळोवेळी त्याचा राग-रंग पाहून त्याप्रमाणे त्याला हाताळावे लागते. याची मर्जी व्यवस्थित सांभाळू शकणाऱ्या चाकरमान्यास चाकरमानी आयुष्यात सहसा काही विवंचना पडत नाही. पण हे काम सोपे नसून ‘तेथे पाहिजे जातीचे ...येरागबाळ्याचे काम नोहे.’ या उक्तीचा प्रत्यय देणारे आहे. चाकरमानी हापिसकरांच्या बाबतीत बॉस या रसायनाचे ब्रीदवाक्य म्हणजे, ’आगे चले भें**, पीछे चले मा****, और साथ चले तो साला बराबरी करता है...’ हे असते. त्यामुळे कोणत्या वेळी आगे चालायचे अन कोणत्या वेळी साथ साथ याचे अत्यंत तरल भान राखणारा प्राणीच त्याला हाताळण्यात यशस्वी होऊ शकतो.
हे रसायन वरचेवर गरम होत असल्याने त्याला वातानुकूलित ‘केबिन’मध्ये ठेवावे लागते. रसायन केबिनमध्ये असण्याचा दुसरा एक फायदा म्हणजे एका हापिसकराला मिळालेले शाब्दिक फटके दुसऱ्याला समजत नाहीत. ‘यूसलेस’, ‘बेअक्कल’, ‘होपलेस’, इ. शेलक्या विशेषणांचे बुडबुडे या रसायनातून जातायेता उठत असतात.. सराईत अन पोचलेले हापिसकर ती फारशी मनावर घेत नाहीत.
चाणाक्ष हापिसकर बॉसच्या येण्याजाण्याच्या वेळा, अजेंड्यावरचं आजचं ताजं कलम अन महत्वाचं म्हणजे याची आजची मनस्थिती याची खबरबात ‘शिपाई’ नामक दुसऱ्या रसायनाच्या मदतीने व्यवस्थित ठेवतात. तसेच हे हापिसकर स्वत:च्या कामापेक्षा बॉसच्या आवडीनिवडीचे अन त्याबरोबरच सौ. बॉस, चि. बॉस आणि कु. बॉस यांच्याही आवडीनिवडींचे ज्ञान अन भान विशेषत्वाने ठेवतात. सौ. बॉसना मार्केटमधील कोणती वस्तू कोठे उत्तम मिळते, याचा न मागता सल्ला देणे, कॉलेजात जाणाऱ्या चि. बॉससाठी टेनिस कोर्टचे बुकिंग करणे , कु. बॉससाठी आवर्जून तिच्या आवडीप्रमाणे पांढरीशुभ्र किंवा सोनेरी मनीम्याव आणून देणे, इ. कृत्ये हापिसकराच्या हातून पार पडली, की बॉस हे झोम्बरे रसायन अंतर्यामी निवळ बनते अन ही कार्ये करणाऱ्या चाकरमान्याला फारसे झोंबत नाही.
एकंदरीत, हे रसायन काहीशा विशेष कौशल्याने हाताळले असता, फारसे उपद्रवी नाही.
(क्रमश:)
Book traversal links for काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने -२
वर्गीकरण
प्रतिक्रिया
किल्ल्यांपासून कुत्र्याच्या
:)
क्युबिकल म्हणजे खुराडं आणि
आमचा अनुभव
@ स्नेहांतै : मस्त लिहीलय..
"शेजारी" रसायनाचे वर्णन आवडले
मस्तच
हो ना.. आणखी येऊदेत अशी
मस्त,,
सुसाट !!!
खुसखुशीत!
हेच म्हणतो.
‘यूसलेस’, .... बुडबुडे या रसायनातून जातायेता उठत असतात..
हे हे हे. भलत्याच अभ्यासू
अता काय म्हणॉव
(No subject)
रासायनिक पृथ्थकरण
आजींना बरे वाटत नाही काय ?
+१११११११११११११११.
स्नेहातै
हहपुवा
मस्तच..
जबरदस्त .
हाही लेख आवडला.
हं..
चांगले शेजारी मिळायला भाग्य लागत.
वाचतोय...
मस्त खुसखुशीत
छान वर्णन
धन्यवाद , मनोरा.
असो...
+१
शब्द हे हत्यार आहे.मनातल्या
शब्द हे हत्यार आहे.मनातल्या भावना पोहोचवण्यासाठी चपखल शब्द/ म्हण/ वाक्प्रचार सुचणे .१०० टक्के सहमत. इथे एक नमूद केले पाहिजे की सदर लेखन या मनातल्या भावना नसून सामाजिक घटनांचे निरिक्षण आहे. निरिक्षण तटस्थ असावे. मी सोज्वळ शब्द वापरले म्हणून परिस्थिती तशी असत नाही....दुर्दैवाने. मागे एकदा पर्ल यांनी एका धाग्यात कितीतरी संदर्भ देऊन मिपावरच्या भाषेवर टीका केली होती. हे सर्व लेखन भावनात्मक होते. माझे निरिक्षणात्मक आहे.एडिट करण्याची गरज नव्हति ..
पूजाक्का, वस्तुस्थिती
मस्त रसायने..
ही पण रसायने छान.
मस्तच जमलाय हा भागही.