या घराला विचारले मी एकदा
असा रिकामा रिकामा असतोस
वाईट नाही वाटत?
क्षणभर विचार करून घर म्हणाले,
नाही, म्हणजे नेहमीच नाही
.
.
म्हणाले या भिंती पाहिल्यास
किती सुंदर रंग लेवून उभ्या आहेत
इकडे ये, या खिडक्या पहा
आपली कवाडे उलगडून उनपावसाला बोलावून आणताहेत
.
.
अन् ते दार बघितलेस
सताड उघडे, सगळे सामावून घ्यायला उत्सुक
येणार्याला खिडकीतून आलेला पाऊस विनामूल्य देणारे
वा सोनसळी उन्हाची खुशाल मेजवानी घालणारे
.
.
हे सगळे पहिले कि नाही वाईट वाटत
मी सुखावतो आणि आकंठ भरून जातो
रिकामपण माझे काही क्षण का होईना विसरतो
विचारले त्याला मग मगशी 'नेहमीच नाही' म्हणालास
ते कां?
.
.
म्हणाले जरा वर पहा
ते झगमगणारे आकाश पाहिलेस
ते चांदण मला बेचैन करते रे,
फार जीवाला लागतं ते
तेव्हा अचानक ध्यानी आले माझ्या
त्या घराने आपले छतचं गमावले होते
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०७/०२/२०१३)
प्रतिक्रिया
7 Feb 2013 - 10:49 am | फिझा
खुप छान वाटलि कविता.......
7 Feb 2013 - 10:56 am | अत्रुप्त आत्मा
1 नंबर
7 Feb 2013 - 12:38 pm | चाणक्य
काय बोलू? ...प्रतिक्रिया द्यायला सुद्धा माझ्याजवळचा शब्दसाठा अपुरा आहे मित्रा...सुंदर रचना
7 Feb 2013 - 12:53 pm | मनराव
उत्तम विचार....
7 Feb 2013 - 5:56 pm | प्रचेतस
अत्यंत सुंदर तरीही करूण रचना.
7 Feb 2013 - 5:59 pm | इनिगोय
मिका.. मिका! कोणत्या जगात वावरतोस रे!! __/\__
7 Feb 2013 - 6:07 pm | अभ्या..
इन्नातैला सहमत.
मिकाला वेगळी लेन्स मिळालीय. आणि ते बघितलेलं जाणवणार संवेदनशील मन.
हे सर्व शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मिका
7 Feb 2013 - 6:03 pm | तिमा
नावीन्यपूर्ण कल्पना मांडण्यात हातखंडा आहे मिका तुझा!
कविता अर्थातच आवडली, हे वेगळं सांगायला नकोच.
7 Feb 2013 - 6:05 pm | वपाडाव
टोप्या उडवल्या आहेत...
7 Feb 2013 - 6:20 pm | सूड
छान लिहीलंय !!
7 Feb 2013 - 6:33 pm | यशोधरा
सु रे ख.
7 Feb 2013 - 6:58 pm | संजय क्षीरसागर
हे छत गमावणंच तर कधीही एकाकी न वाटण्याच रहस्य आहे!
7 Feb 2013 - 7:52 pm | शुचि
फार आवडली.
7 Feb 2013 - 10:59 pm | पैसा
अहा!
8 Feb 2013 - 10:25 am | पियुशा
मिका रॉक्स ! एक कवितासंग्रह प्रकाशित करायचे मनावर घ्या आता :)
8 Feb 2013 - 11:35 am | मिसळलेला काव्यप्रेमी
चालत्या फिरत्या कट्ट्याला रामदास काकांनी आम्हाला दाखवलेली 'एक्स्प्लनेड मॅन्शन' बिल्डींग जी जळून गेली होती.. नंतर परत बांधली वगैरे... तिथुन चालू झाली "घर" कविता...
हे लिहायचे राहिले होते, धाग्यावर.
8 Feb 2013 - 6:15 pm | प्रसाद गोडबोले
कविता मस्त आहे !
8 Feb 2013 - 11:00 pm | क्रान्ति
आवडली कविता.
10 Feb 2013 - 5:54 pm | स्पंदना
सुरेख!
10 Feb 2013 - 6:24 pm | गवि
:-( कोंकणातल्या घराचं असं झालंय.... एके दिवशी खूप वर्षांनी गेलो तेव्हा अस्संच भस्सकन दिसलं..
11 Feb 2013 - 11:03 am | श्रिया
अत्यंत सुरेख!
11 Feb 2013 - 12:44 pm | C Ramarao
छा न वाट्ली