मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एका वेश्येचे मनोगत..............

अमितसांगली · · जनातलं, मनातलं
मीना शेषु व त्यांची संग्राम हि संस्था वेश्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी, शिक्षणासाठी लढत आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी सातारा शहरात आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांचे भाषण ऐकून मनात आलेले विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कहाणी ऐका एका वेश्येची पुरुषांची वासना शमविणाऱ्या साधनाची पशुंकडून ओरबाडले जाणाऱ्या एका स्त्रीची कहाणी ऐका एका वेश्येची..... बालपण सगळ चिखलातच गेल आईच दुधपण बाटलीतूनच पिल जगायचं रडगाण पण लवकरच कळल कहाणी ऐका एका वेश्येची.... शाळा कसली माहीतच नाही शिक्षणाचा तर मला गंधच नाही भातुकलीचा खेळ ठाऊकच नाही पशूंचा सहवास तर नवीनच नाही कहाणी ऐका एका वेश्येची..... संसार पडलाय उघड्यावर सुहागरात्रही केली दुसऱ्याबरोबर संसाराचा गाडा माझ्याच देहावर कहाणी ऐका एका वेश्येची..... रात्र-रात्र ज्यांनी आम्हाला जागविल वेश्या-वेश्या म्हणून त्यांनीच हिणवल समाजातील घाण म्हणून गावाबाहेर हाकलल कहाणी ऐका एका वेश्येची.... तान्हुल्याला माझ्या मात्र मी घडविलं नरकातून या बाहेर ढकललं आमच आयुष्य असच गंजल त्याच्या तरी आयुष्यात नंदनवन फुलविल कहाणी ऐका एका वेश्येची.... या जगात वेश्या असूनही ४ वर्षांच्या चिमुरडीपासून ते ८० वर्षांच्या आजींवर देखील बलात्कार होतो. त्या जर नसत्या तर स्त्रियांना जगणे अशक्य झाले असते.....

वाचन 20226 प्रतिक्रिया 0