शाळा?

किचेन's picture
किचेन in काथ्याकूट
24 Mar 2012 - 7:18 pm
गाभा: 

सगळीकडे 'शाळा'चा फार उदोउदो चालला होता म्हणून बघितला.सुरुवातीलाच डोक्यात गेला.मी पुस्तक वाचल नाहीये,त्यामुळे मूळ पुस्तकाचा विषय मला माहित नाही.पण इथे तर पूर्ण चित्रपट विषयावरच बनवलाय.नववीतल्या मुलांच्या मानाने आणि शाळा या नावाचा विचार केला चित्रपटात शाळेचा फळा आणि वर्ग एवढंच आहे.बाकी शाळेची मुल,त्यांची टिंगल टवाळी कॉलेजमधल्या मुलांसारखीच आहे.
त्यातला म्हात्रेनि बर्याच ठिकाणी ' भें....' हि शिवी वापरलीये.तेव्हा सेन्सोर बोर्ड वगैरे काही खरच अस्तित्वात आहे का असा प्रश्न पडला होता.एका दृश्यात शाळेतली मुलं तोंडातून लाळ गळेल एवढा मोठा आ करून त्यांच्या पाठमोर्या बाईंकडे बघत आहेत.जोशीच प्रेमपत्र,शिरोडकरच घर शोधून काढण्याची ट्रिक बघता अस वाटत कि त्याला आधी खूप अनुभव आहे अस आहे.(कदचित हि सगळि त्याच्या मामाचि शिकवण असावी) जे सवांद आहेत ते नववीतल्या मुलांच्या तोंडी शोभतील असे नक्कीच नव्हते.मुलं कॉलेजमध्ये आहेत अस दाखवलं असत तर चित्रपट बघण्याजोगा झाला असता.म्हात्रे नि एका मुलीला सरळसरळ 'लाईन देतेस' का अस विचारलय.त्याचा सुजलेला चेहरा बघून आनंद वाटला.पण कस बदडलं हेदेखील दाखवलं असत तर आत्म्यास शांती मिळाली असती(आणि चालू पिढीला धडा). जोशीच्या वडिलांचं ह्या अडनिड वयातल्या मुलांना समजून घेतलं पाहिजे हे कळतंय.पण ते जरा जास्तच कुल वाटत.
माझ्या पिढीमधील माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि मित्र (वय २६ ते ३०)यांचा प्रतिसाद 'काहीही चित्रपट बनवतात!आमच्या शाळेत नव्हत अस काही.याला कसे काय मिळाले पुरस्कार?'असंच होता.घरी आल्यावर जाणवले कि आजूबाजूच्या मुलांमध्ये म्हण्जे नववी ते कोलेज ह्या मुलांना हा चित्रपट प्रचंड आवडलाय.म्हण्जे 'सोलिड आहे ,कडक आहे,जबरा आहे.' पण थोडी मोठी म्हण्जे जोब करणारी,लग्न न झालेली यांनाहि हा चित्रपट आवडला नव्हता.
तुम्हाला काय वाटत?

प्रतिक्रिया

VINODBANKHELE's picture

24 Mar 2012 - 7:39 pm | VINODBANKHELE

संपादित.

काहितरिच
काय??????????//

परिकथेतील राजकुमार's picture

26 Mar 2012 - 11:35 am | परिकथेतील राजकुमार

तुम्ही शक्यतो श्यामची आई, शेजारी, संत तुकाराम, हळद रुसली कुंकू हसले, ताईची माया, हेच माझे माहेर, ताईच्या बांगड्या, पंढरीची वारी, शाब्बास सुनबाई, कर्ज कुंकवाचे, हिरवा चुडा असे चित्रपट पाहात चला. म्हणजे तुम्हाला, आम्हाला आणि आंतरजालाला सगळ्यांनाच शांती.

जाई.'s picture

26 Mar 2012 - 11:37 am | जाई.

=)) =))
हल्कत

वरील लिस्टमध्ये "अलका कुबल छाप' असे एक कलम जोडले जावे अशी एक मुख्य उपसूचना ;)

परिकथेतील राजकुमार's picture

26 Mar 2012 - 11:52 am | परिकथेतील राजकुमार

पण ते नाव 'अलका बुकल' असे आहे ह्याची नोंद घ्यावी. काही लोक 'अलका कुबट' असा देखील उच्चार करतात. आकाशातला बाप त्यांना क्षमा करो.

बॅटमॅन's picture

26 Mar 2012 - 11:58 am | बॅटमॅन

आँ??? आवो अलका बुकल हे नाव म्हंजे लैच विसंगत वाट्टंय पहिलि गोष्ट आन ह्ये बगा...

http://www.imdb.com/name/nm2453174/

आययेमडीबी वालेबी कुबलच म्हंत्यात म्हून म्हन्लो वो...आता आम्ची चूक आसंल तर मापी करा पर बाईंचे पिच्चर दावू नगासा, हात जोडतो :P

VINODBANKHELE's picture

26 Mar 2012 - 4:50 pm | VINODBANKHELE

हि बै हेणा येडा बनुन पेडा खातीय.........................

...........................

सुहास झेले's picture

24 Mar 2012 - 7:43 pm | सुहास झेले

कैच्याकै... !!

निशदे's picture

24 Mar 2012 - 8:54 pm | निशदे

चित्रपट आवडला नाही पण वरचे एकही कारण त्याला लागू होत नाही. मूळ पुस्तकाचा मी फार मोठा fan आहे आणि हा चित्रपट मी पाहिलेला सर्वात वाईट adapted screenplay होता.......

इष्टुर फाकडा's picture

24 Mar 2012 - 9:23 pm | इष्टुर फाकडा

चित्रपट मलाही फारसा नाही आवडला पण तो वेगळ्या कारणांनी. तुम्ही जे लिहिलंय त्यावरून तुम्हीच बेंद्रे बाई असल्याचा दाट संशय येवू लागलाय.

ता.क. तुम्ही कधीही चुकूनसुद्धा पुण्यातल्या भावे स्कूल च्या आसपास फिरकू नका. जायचेच असेल तर कांदा जवळ ठेवा. घेरी आल्यास लोकांना उगाच धावपळ नको.

किचेन's picture

24 Mar 2012 - 10:28 pm | किचेन

माझा भाऊ होता भावे हायस्कूलमध्ये.एकदा रिक्षावाले काका येणार नव्हते म्हणून बाबा त्याला शाळेतून आणायला गेले.पुढच्या वर्षी भाऊ पाचगणीला होस्टेलला होता. ;)

अवांतर: तुमची सही आवडली.बरेच दिवसंनी हकुना मटाटा ऐकायला मिळाल.

इष्टुर फाकडा's picture

25 Mar 2012 - 4:09 pm | इष्टुर फाकडा

:)

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Mar 2012 - 9:23 pm | बिपिन कार्यकर्ते

२६ ते ३० या वयोगटातल्या पिढीची खूप काळजी वाटते आहे!

=)) =))

अपेक्षित प्रतिसाद
पण फारच सौम्य आहे हो बिका. तुमच्याकडून चिरफाडीची अपेक्षा होती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Mar 2012 - 10:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिका, तुम्ही कंच्या शाळेत व्हता.........आणि तेव्हा तुमचा वयोगट कोणता होता म्हणायचा...! :)

-दिलीप बिरुटे

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Mar 2012 - 11:01 pm | बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद हो प्राडॉ! तुम्हाला कळ्ळं बरोब्बर मला काय म्हणायचंय ते! ;)

श्रावण मोडक's picture

24 Mar 2012 - 10:56 pm | श्रावण मोडक

छ्या हो, बिका... हे अपवाद आहेत. म्हणूनच, पिढी उत्तम आहे. तिला काय नाकारायचं हे या अपवादातून कळतं. म्हणून आपण या अपवादांचे आभारी राहिलं पाहिजे. या पिढीची काळजी अजिबात करू नये.

छोटा डॉन's picture

24 Mar 2012 - 10:57 pm | छोटा डॉन

पिढी उत्तम आहे. तिला काय नाकारायचं हे या अपवादातून कळतं. म्हणून आपण या अपवादांचे आभारी राहिलं पाहिजे. या पिढीची काळजी अजिबात करू नये.

+१,
मोडकमास्तर, ह्या बाबतीत तुमचा आणि माझा मत जुळतां हां :)

- छोटा डॉन

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Mar 2012 - 11:01 pm | बिपिन कार्यकर्ते

दोन दिग्गज गंडले? अरेरे! ;)

छोटा डॉन's picture

24 Mar 2012 - 11:18 pm | छोटा डॉन

गंडले कसे काय म्हणता येईल ?

असो, २ गोष्टी सांगतो.
दुसरी गोष्ट, अपवाद असतात आणि आपण अपवादांचे आभारी राहिले पाहिजे ( संदर्भ : मोडकांचा प्रतिसाद)
आता पहिली गोष्ट, आम्ही अपवाद वगैरे नाही आहोत.

- छोटा डॉन

छोटा डॉन's picture

24 Mar 2012 - 10:56 pm | छोटा डॉन

>>२६ ते ३० या वयोगटातल्या पिढीची खूप काळजी वाटते आहे!
-१
आमची काळजी करण्यासारखे काही नाही, आपल्यापेक्षा १०-१२ वर्षांनी लहान असलेल्या पिढीची काळजी वाटणे हा मानवी स्वभाव आहे, तुम्ही नका काळजी करु ;)

बाकी शाळा हा पिक्चर एक स्वतंत्र चित्रपट म्हणुन चांगला होता, आधी पुस्तक वाचले असेल तर आवडण्याची खात्री नाही.

( १६ ते २० या वयोगटातल्या पिढीची खूप काळजी वाटणारा) छोटा डॉन

बॅटमॅन's picture

24 Mar 2012 - 11:19 pm | बॅटमॅन

+१००० बिका ;)

स्मिता.'s picture

25 Mar 2012 - 3:36 pm | स्मिता.

२६ ते ३० या वयोगटातल्या पिढीची खूप काळजी वाटते आहे!

वडिलकीच्या नात्याने या पिढीची काळजी वाटत असल्यास हरकत नाही, पण उगाच 'खूप काळजी' वगैरे करण्याचं काही कारण नाही ;)
शाळा हा विषय सगळ्यांनाच भूतकाळातल्या गोड आठवणीत घेवून जातो म्हणून त्यावर जे दाखवलं जाईल ते सगळं चांगलंच असं नाही. मलाही तो चित्रपट अजिबात आवडला नाहीये (मी कादंबरी वाचलेली नाही हे देखील नमूद करून ठेवते). किचेनतैनी दिलेल्या कारणातली सगळी नाही पण काही कारणं मलाही पटतात.

नितिन थत्ते's picture

25 Mar 2012 - 5:58 pm | नितिन थत्ते

असेच म्हणतो.

अन्नू's picture

24 Mar 2012 - 9:24 pm | अन्नू

"शाळा" पहायला चुकुनही जाऊ नका, सिनेमातली नटी सोडली तर त्या सिनेमात बघण्यासारख काहीही नाही. ;)

"आत्ता एजंट विनोद बघतोय!" Smiley

चिंतामणी's picture

24 Mar 2012 - 11:38 pm | चिंतामणी

त्यात काय बघण्यासारखे आहे हे नंतर विस्ताराने सांगा.

त्यात काय बघण्यासारखे आहे

त्याचाच आता विचार करतोय! Skype Emoticons

अत्रुप्त आत्मा's picture

24 Mar 2012 - 11:27 pm | अत्रुप्त आत्मा

गणपा's picture

24 Mar 2012 - 10:00 pm | गणपा

कंच्या शाळेत गेल्ता म्हनं तुम्ही?

बिकाशी बाडीस. :)

तुम्हाला काय वाटत?

१०० नक्की. ;)

त्यावर एक धागा काढणार आहे!

शैलेन्द्र's picture

24 Mar 2012 - 10:03 pm | शैलेन्द्र

खरतरं एक तत्व म्हणुन, मी वाचलेल्या साहित्यावर निघालेले चित्रपट बघायच टाळतो, सपक वाटतातं,

पण तुम्ही जी कारण दिलीयेत, न आवडल्याची, ती म्हणजे तुमची शाळा फारच वरणभात होती असं वाटायला लावणारी आहेत.

नववी दहावी सोडा, पाचवी सहावितच चिठ्ठ्या चपाट्या सुरु व्हायच्या, आज पासुन २० वर्षापुर्वी.. लाईन देतेस का हे विचारन तुम्हांला आवडल नाही हे समजु शकतो, पण ते त्या वयातल अर्धकच्च ज्ञान व उतु जाणारी उत्कंठा दाखवत..

बाकी आपण तरी शाळा कादंबरीचे जाम फअ‍ॅन आहोत..

>>>पण तुम्ही जी कारण दिलीयेत, न आवडल्याची, ती म्हणजे तुमची शाळा फारच वरणभात होती असं वाटायला लावणारी आहेत.

एक नम्बर सहमत आहोत आपण याच्याशी!!!

निशदे's picture

25 Mar 2012 - 12:21 am | निशदे

>पण तुम्ही जी कारण दिलीयेत, न आवडल्याची, ती म्हणजे तुमची शाळा फारच वरणभात होती असं वाटायला लावणारी आहेत
+१

दादा कोंडके's picture

25 Mar 2012 - 3:15 am | दादा कोंडके

आमच्या वेळी आयटमसाठी, "खडा" हा शब्द प्रचलीत होता. ६वी पासून पुढे जवळजवळ वर्गात सगळ्या मुलांना खडे असत. जी-एच तुकड्यात (शाळेत प्रत्येक इयत्तेत आठ तुकड्या होत्या. प्रत्येक वर्गात ७०-८० कार्टी!) असणार्‍या काही थोराड मुलांच्यातर (चांगल्या दिसणार्‍या) शिक्षीकाच खडा होत्या! ;)

किचेन's picture

25 Mar 2012 - 1:34 pm | किचेन

अग्ग बाइ....!

श्रावण मोडक's picture

25 Mar 2012 - 1:42 pm | श्रावण मोडक

अरेच्चा...!

दादा कोंडके's picture

25 Mar 2012 - 4:21 pm | दादा कोंडके

आणि पुष्कळवेळा आपल्यावर कोण कोण "मरतंय" हे खड्यांच्या गावीही असायचं नाही आणि एकच खडा असलेली मुलं इकडं हक्कावरून मारामार्‍या करत! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Mar 2012 - 10:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

’उद्या भेटशील इथे’ असं विचारणारा जोश्या आणि ” छे बाबा, आपल्याला नाही जमायचं तसलं काही’ असं म्हणणारी लाज-या शिरोडकरचा प्रसंग जसा आवडला तसा ’ए आपल्याला लाइन देते का’ प्रश्नाच्या उत्तराने नर्व्हस झालेला म्हात्रे तर कितीतरी आवडला.

बाकी, पसंद अपनी, खयाल अपना....! :)

-दिलीप बिरुटे

तर्री's picture

24 Mar 2012 - 11:21 pm | तर्री

चित्रपट खूप चांगला जमला आहे. ९ वी मधल्या मुलांच्या (मुलींच्या नसेल कदाचित) वयाला साजेशी भाषा.
चित्रपटामध्ये फक्त "लाईन मारणे " व त्या अनुषंगाने येणारी भाषा एवढेच दिसले असेल तर ईलाज नाही. मला तर जोश्याचा "एकटयाने" दहावीला जाण्याचा "आकांत" विशेष भावाला.
मुलांमध्ये त्या वयात असणारे शारीरिक/मानसिक आकर्षण हे जर आपण स्वीकारले तर बरे. अन्यथा असे धक्के बसणारच.

डावखुरा's picture

25 Mar 2012 - 12:27 am | डावखुरा

सह्यमत..हाय मी तर्री ताई..पण फक्त सीन्स चे ट्युनिंग नाही जमले..पुस्तक न वाचता पिक्च्र पाहिल्यास किचेन ताई सारखी अवस्था होणे नाकारता येणार नाही...

बॅटमॅन's picture

24 Mar 2012 - 11:32 pm | बॅटमॅन

शाळा नै आवडला????????? नै तर नै पण धिक्कार?????? कैच्याकै बरं का!!!! किचेनतै व्हिक्टोरियन काळातील कन्याशाळेत होत्या की कै???

आणि भाषा म्हणाल तर नववीतल्या नॉर्मल मुलांच्या तोंडात अशी भाषा सर्रास असते. भेन*** वगैरे नसतीलही पण शिव्या सर्रास वापरतात ९वितिल पोरे..आणि शिरोडकर चे घर शोधून काढायची ट्रिक काही जेम्स बॉंड सारखी भारी नव्हती..आणि जोश्याने काहीही केले नव्हते, सो त्याचे वडील हे कूल असणारच की..आणि सुर्‍याला कसे बदडले असते ते दाखवायला पाहिजे होते वगैरे वगैरे तद्दन हिंसक विचार वाचून एक (नवीन) मिपाकर म्हणून शरम वाटली :P

आणि सुर्‍याला कसे बदडले असते ते दाखवायला पाहिजे होते वगैरे वगैरे तद्दन हिंसक विचार वाचून एक (नवीन) मिपाकर म्हणून शरम वाटली

बॅटमॅन यांना मिपाचे ग्रीनकार्ड* देण्याची विनंती केली जाते.
एवढ्या लवकर ग्रीनकार्डला पात्र झाल्याबद्दल बॅटमॅन यांचा कला दालनात विशेष सत्कार केला जावा असाही प्रस्ताव मांडतो.

* युद्ध झाल्यास मी माझ्या जुन्या देशबांधवांना गोळ्या घालण्यास कचरणार नाही अशी शपथ खाण्याची गरज नाही ;-)

थँक्यू थँक्यू यकु :)

एका *नव्या जाणीत्या मिपाकराने हरितपत्र आणि सत्काराची शिफारस केल्याबद्दल एक(नवीन)मिपाकर म्हणून आनंदाने ऊर भरून आला :)

*मिपावर ४.५ वर्षे झाल्याखेरीज "जुने जाणीते" असे स्टेटस नै मिळत असे अधिकृत सूत्रांकडून कळाले, सबब जुन्या च्या जागी नव्या अशी दुरुस्ती केल्या गेली आहे. जाणीत्या च्या जागी मात्र जाणतेपणाने बदल नै केला :P

विश्वनाथ मेहेंदळे's picture

25 Mar 2012 - 1:00 am | विश्वनाथ मेहेंदळे

किचेन मावशी , तुम्ही हुजुरपागेत गेला होतात ना ? कन्याशाळा आहे ना ती ? मग ठीक आहे.
एक काम करा, तुमच्या भावाला / पतीदेवांना विचारा पहिली शिवी कितवीत असताना दिली, नववीत येईपर्यंत किती शिव्या देत होतात, कुठल्या कुठल्या, मित्र कसकसल्या शिव्या देत होते. सर्व बाईंकडे तुम्ही आचार्य देवो भव नजरेने पाहत होतात का ? मुलींचा पाठलाग तुम्ही किंवा तुमच्या वर्गातल्या कुणी केला आहे काय? प्रपोज मारला आहे काय ? या सर्व प्रश्नांची तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळाली तर सदर व्यक्ती साफ खोटे बोलते आहे असे समजायला हरकत नाही.

आपले भावविश्व छोटे असेल तर शाळा अतर्क्य वाटणारच हो. असो, शाळा बघितलात ते ठीक आहे. पण त्यावर जाहीर नकारार्थी टिप्पणी केलीच आहेत तर तुझे आहे तुजपाशी मधील एक संवाद सांगतो, "न पेलणाऱ्या गोळ्या घेऊ नयेत बेटा" ;-)

(शाळेत, ते पण फक्त मुलांच्या शाळेत गेलेला) विमे

विमे, अरे जगातली संपत चाललेली निरागसता जपायचा वसा घेतलाय त्यांनी. त्यामुळे उद्या त्यांनी खालीलप्रमाणे काही अटी घेऊन जनहितयाचिका दाखल केली तर नवल नाही.
१) नववी-दहावीतल्या मुलांनी शिव्या अजिबात देऊ नयेत, कॉलेजात जाणार्‍यांनी माताय वैगरे अशा सौम्य शिव्या दिल्या तर चालतील.
२) लाईन देतेस का हे विचारण्याचा हक्क हा फक्त कॉलेजात जाणार्‍या मुलांना असेल. ते विचारतानाही भाषेत निरागसता हवी. जसं की, 'हे वर्गभगिनी तुला पाह्यलं की माझं ब्लडप्रेश्शर थोडंस्सं लो आणि थोडंस्सं हाय होतं. तुझ्या माता पित्यांना मी आयुष्यभरमामा-मामी म्हणावं अशी माझी इच्छा आहे. तुला हे मान्य आहे का ?'
३) सर्व मराठी शिनेमांमध्ये जिथे नायक नायिकेचा पाठलाग करतोय असे दृश्य असेल तो शिनेमा फक्त अठरा वर्षांवरील मुलांनी पाहावा, बारा ते सतरा वयोगटातील मुलांनी असे शिनेमे पालकांच्या देखरेखीखाली बघावेत. मुलींनी असे शिनेमे बघूच नयेत, त्यांच्या निरागस बालमनावर वाईट परिणाम होईल ( पाह्यचेच असतील तर आपण हुजूरपागेत शिकत नसल्याचा पुरावा आणावा). पुढील अटी क्रमशः

अत्रुप्त आत्मा's picture

25 Mar 2012 - 8:57 am | अत्रुप्त आत्मा

@'हे वर्गभगिनी तुला पाह्यलं की माझं ब्लडप्रेश्शर थोडंस्सं लो आणि थोडंस्सं हाय होतं. तुझ्या माता पित्यांना मी आयुष्यभरमामा-मामी म्हणावं अशी माझी इच्छा आहे. तुला हे मान्य आहे का ?'>>>

शरद's picture

26 Mar 2012 - 7:48 am | शरद

तुझ्या माता पित्यांना मी आयुष्यभर मामा मामी म्हणावे ....हे काय भलतच ! सासू-सासर्‍यांना मामी- मामा म्हणतात .
शरद

ते हुजूरपागेतल्या मुली ओळखण्यासाठी आहे. त्या असं करेक्शन सुचवतील. बाकीच्यांना समजेल मुलगा नक्की काय म्हणतोय ते.

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Mar 2012 - 10:59 am | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा!

@विमे आणि सूड : टुरटुर नाटक बघितलं आहे का? ;)

सुहास झेले's picture

25 Mar 2012 - 11:56 am | सुहास झेले

'हे वर्गभगिनी तुला पाह्यलं की माझं ब्लडप्रेश्शर थोडंस्सं लो आणि थोडंस्सं हाय होतं. तुझ्या माता पित्यांना मी आयुष्यभरमामा-मामी म्हणावं अशी माझी इच्छा आहे. तुला हे मान्य आहे का ?'

आई आई गं... मेलो हसून हसून :D :D :D

हुजूरपागा वेगळी आणि कन्या शाळा वेगळी.उगीच हुजुरपागेला कन्याशाळा म्हणून हुजुरपागेचा अपमान करू नका.
तुम्हाला मुलींची शाळा अस म्हणायचं का?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

25 Mar 2012 - 9:55 pm | विश्वनाथ मेहेंदळे

कन्याशाळा म्हणजेच मुलींची शाळा (आमच्या शाळेत शिकवल्या गेलेल्या मराठीनुसार). आता तुमच्या पुण्यात एखाद्या शाळेचेच नाव कन्याशाळा असेल आणि ती शाळा तुमच्या हुजुरपागेची रायव्हल असेल तर माझा नाईलाज आहे.

+१
दारूण सहमत

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

25 Mar 2012 - 1:27 am | निनाद मुक्काम प...

शाळा ह्या कादंबरी असलेलेल्या सूचक उल्लेखातून हे वर्णन डोंबिवली मधील एका शाळेचे आहे हे सहज कळून येते.
स वा जोशी ह्या शाळेचे हे बहुदा वर्णन आहे.
आणि डोंबिवली मध्ये आगरी मुलांना ब्रिटीश ह्या नावांनी ओळखले जाते. मूळ रहिवाशी असल्याने १९७० च्या दशकात आपल्या जमिनी वर स्वतः बिल्डर होऊन इमारती बांधल्या .पुढे आलेल्या पैशातून जीवाची डोंबिवली केली.
बिनधास्त वृत्ती ,तोंडात शिव्या मात्र मालवणी भाषे इतकीच गोड आगरी भाषा आणी तिचा लहेजा ( तकिया कलाम म्हणजे रागात , पोकल बांबूंचे फटके हानीन. मात्र मित्रांसाठी काहीपण करायची तयारी असायची:

हास्य सम्राट मध्ये जॉनी इलावार ह्या ब्रिटिशाने ही भाषा तमाम महाराष्ट्रात लोकप्रिय केली.
तर आमच्या शाळेत सातवीत माझी ब्रिटीश कंपू सोबत नाळ जोडल्या गेली.
तेव्हा आलेले अनुभव , व मिळालेली शिकवण पाहता म्हात्रे हा फारच सोबर म्हणायच्या. पुढे ८ वीत १०० मार्कचे संस्कृत घेतल्याने अ वर्गात आमची वर्णी लागली. तेथे एकही ब्रिटीश नव्हता.
मात्र आमच्या शाळेतील स्वयं घोषित भाई माननीय पाटील ह्यांनी त्यांच्या मानलेल्या बहिणीला दुसर्या शाळेतील मुलांने चिट्ठी बळजबरीने दिली म्हणून भर रस्त्यात बेदम चोपले.
पुढच्या वर्षी त्यांना आमच्या वर्गातील मुलींनी रक्षा बंधन च्या दिवशी राखी बांधून मानलेला भाऊ बनवले.

आणि आमच्य वर्गात पालक सभेत एका मुलीच्या आईने शिक्षिका आणि त्यांच्या ड्रेस कोड संबंधी लेखी तक्रार केली होती:
हे तिने आम्हाला खूप वर्षांनी दिवाळी नरकचतुर्दशी च्या दिवशी फडके रोड वर वर भेटल्यावर सांगितली होती: त्या दिवशी मोर्दन केफे मध्ये आमचा वीस जणांचा ग्रुप जमला होता: शाळेच्या जुन्या आठवणी ह्या सदराखाली आठवणी उफाळून आल्या होत्या:
आमच्या वर्गातील एका हुशार मुलाला वर्गातील मुलीने एक प्रेम पत्र लिहिले: आता बोर्ड फाडून येणे ही महत्वाकांक्षा असल्याने त्याने तिला चक्क नकार कळविला: तेव्हा तिने जीवाचे बरे वाईट करायच्या विचार मैत्रिणी कडे बोलून दाखवला होता:
सदर किस्सा जेव्हा हॉटेलात त्या मैत्रिणीने सांगितला: तेव्हा आमच्या हुशार मित्राच्या चेहऱ्यावरील भाव जणू वीस

जणांचे बिल स्वतःला द्यावे लागणार असे होते:
तो बिचारा एखाद्या मानलेल्या ताई कडे दाद सुद्धा मागू शकत नव्हता:

तात्पर्य ह्यातील बहुतेक सर्व प्रसंग हे वस्तू स्थिती शी इमान राखून आहेत: असे मला तरी वाटते
बाकी वर्गात एकही प्रेम प्रकरण नव्हते कारण सर्व मुलांचे प्रेम दहावींची अंतिम परीक्षा होते
आणि ह्या मार्क मिळवण्याच्या जीवघेण्या स्पर्ध्धेत आमच्या तारुण्य सुलभ भावना केव्हाच राख झाल्या होत्या:
त्या मुलीला मात्र आपला सलाम
साला नरु मामा बरोबर बोलतो
अश्या मुलींना आपण मदत करायला हवी:

शैलेन्द्र's picture

25 Mar 2012 - 9:14 am | शैलेन्द्र

च्यामायला.. तुझ नी माझ गोत्र एकचं.. हे वर्णन डोंबिवलीतलच आहे, जोशी हायस्कुलचं.. आज मी जोशी हायस्कुलाशेजारीच राहतो, पण शिकलो स्वामी विवेकानंदला.. गोपाळनगर..

बाकी विद्येचे माहेरघर वगैरे असलेली, डोंबिवली यातही मेरीट्वर आहे.. आमच्या शाळॅत पाचवी सहावीपासुनच प्रकर्ण होती, आठवीच्या पेंडसे बाई आठवुन आजही उसासे टाकतात आमचे वर्ग मित्र.. आणि भें--- वगैरे तर फरच कॉमन..

बटाटा चिवडा's picture

25 Mar 2012 - 9:54 am | बटाटा चिवडा

च्यामायला.. तुझ नी माझ गोत्र एकचं.. हे वर्णन डोंबिवलीतलच आहे, जोशी हायस्कुलचं.. आज मी जोशी हायस्कुलाशेजारीच राहतो, पण शिकलो स्वामी विवेकानंदला.. गोपाळनगर..

च्यामारी ... आपल्या तिघांची गोत्रे जुळली म्हणा हो... आणि योगायोगाने मी डोंबिवलीच्या स. वा जोशी शाळेचा विद्यार्थी आहे.. त्यामुळे हा चित्रपट माझ्या शाळेला गृहीत धरून काढला असल्याने तो अगदी 'कसाही' असला तरीही कोमल कोपरा (soft corner) हा येतोच आहे. आणि चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, आमच्या स. वा जोशी शाळेत असे काहीही प्रकार घडलेले मला आठवत नाहीत.. (एक अपवाद सोडला तर..) .. त्याला अपवाद म्हणजे, दहावीच्या रिझल्टच्या दिवशी एका 'नाडर' नावाच्या (काठावर पास झालेल्या टपोरी) मुलाने एका मुलीला अखेरीस प्रपोज केलेच. आणि त्या मुलीने (त्याच्या) दुर्दैवाने नकार दिल्याने, 'नाडर ला नाही बोलली.. नाडर ला नाही बोलली ' अशी बातमीची लाटच संपूर्ण शाळेत पसरल्याचे दृश्य मी अनुभवलेय. इतकाच काय तो एक अनुभव शाळा या चित्रपटात साम्यदर्शी होता. आता या एका घटनेवर आधारित पूर्ण चित्रपट बनू शकत असेल तर काय माहित ब्वा... पण आमच्या शाळेत असे काहीही 'बेंद्रे' बाईना बघून लाळ गाळायचे प्रकार माझ्या तरी पाहण्यात आणि ऐकिवात नाहीत.. मुळात अशा बेंद्रे बाईच आम्हाला लाभल्याचे माझ्या लक्षात नाहीये.. :P

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Mar 2012 - 12:34 am | निनाद मुक्काम प...

क्या बात हे.

मी स्वामी विवेकानंद ( राणाप्रताप ) आणि नेहरू मैदान जवळ म्हणजे स्वामी विवेकानंद ( रामनगर ) च्या बाजूला रहायचो.

माझा वर्गमित्र जो चेपू वर आहे त्याने त्यांच्या ब्लोग वर शाळेचे परीक्षण लिहिले होते. तेव्हा मी त्याला माझी शंका विचारली. आणि तो बोकील सरांच्या संपर्कात असतो. त्याने मला अनुमोदन दिले कि हि शाळा स वा जोशी आहे.

माझा मामा १९७५ वेळी त्या शाळेत होता. तर आई १९७० वेळी टिळक नगर.

आणि पेंडसे बाई मला सहावीत होत्या ( अशी पट्टी मरीन कि कातडी हुळूलेल . असे त्या हातात पट्टी समशेर फिरवल्याच्या थाटात फिरवायच्या.) सिनेमा पाहतांना मला त्यांची प्रकर्षाने आठवण झाली.

तुझ्या माहितीसाठी. रवी जाधव ( नटरंग ) हा गोपाळनगर चा आहे. आणि ऐश्वर्या नार्वेकर दत्तनगर

स वा जोशी च्या बाजूला आमच्या मुख्य बाई महाबळेश्वरकर आणि शिंदे बाई होत्या.

एकदा ९वीत शिंदे बाईंनी एकाला बेन्द्रिनी सारखे पट्टीने फोडले होते.

शैलेन्द्र's picture

26 Mar 2012 - 1:49 am | शैलेन्द्र

नेहरु मैदानजवळची शाखा म्हणजे जुणी गणेश्पथ.. गोपाळनगरची शाळाही आता तिथेच आलिय..

महाबळेश्वर्कर बाई होत्या आम्हाला.. भारदस्त हा शब्द तिथेच अनुभवला पहिल्यांदा.. महाबळेश्वरकर बाई ठाकुर्लीला जायच्या रस्त्यावर रहायच्या..

तुमच्या पेंडसे बाई वेगळ्या असाव्यात.. मी ९१ मधे दहावी सुटलो..

बाकी शाळेत जे जे केल, त्यापुढे कॉलेज म्हणजे फारच फिकं वाटल नंतर..

तिमा's picture

25 Mar 2012 - 11:51 am | तिमा

मी पण 'सवा जोशी' चा विद्यार्थी ! आमच्या वेळेस सुद्धा, सुट्टीच्या दिवशी, कोणीतरी बाहेरच्या बोर्डावर सर्व शिक्षक व शिक्षिकांच्या जोड्या लिहून ठेवल्या होत्या. पण पुढे पार्ले टिळक मधे गेल्यावर मात्र, एकदम बिगरीतून मॅट्रिकला गेल्यासारखे वाटले.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Mar 2012 - 12:46 am | निनाद मुक्काम प...

आमच्या शाळेत हेच पवित्र कार्य शौशालयात भिंतीवर कोरून ठेवायचे व उरल्लेया जागेत भिंतीवर कोण अनामिक चित्रकार खजोराहो च्या शिल्पकलेला तोंडांत मारेल अशी भित्ती चित्रे काढायच्या.

संडासाच्या नळाला कधीच पाणी नसायचे. त्यामुळे वहीतील पान घेऊन आत जावे लागायचे ( वोटेर बेग हा प्रकार शक्यतो मुली आणायच्या.). म्हणून परदेशात मला जड गेले नाही.

दरवाजावर चावट विनोद. म्हणी आणि पिवळे साहित्य अमाप विखुरलेले असायचे.
इच्चा भाना , हे तर आगरी बोलीभाषेत दर वाक्याच्या आड यायचे.

आणि मायबोलीत काय म्हणतोस असे कुतूहलाने विचारणा करण्यासाठी असलेल्या दोन शब्दांना आगरी भाषेत हल हा अतिशय गोड शब्द आहे.

आबा's picture

25 Mar 2012 - 3:31 am | आबा

मी तर द्यायचो बुवा शाळेत असताना शिव्या.. !
शिव्यांच्या भेंड्या खेळणारे नग सुद्धा होते आमच्या वर्गात !

शाळा करुन टाकलीत एकदम, तुम्ही हा धागा काढुन!! ;)

सूड's picture

25 Mar 2012 - 7:22 am | सूड

माताय (शिव्या देणं फार वाईट्ट असतं म्हणे), हा 'निरागसता जपा' सप्ताह पुन्हा सुरु झाला वाटतं !!

शाळा या चित्रपटापेक्षा पुस्तक वाचायला कितीतरी चांगले आहे. चित्रपट बघताना त्याचा एकसंधपणा जाणवत नाही, बरेच तुकडे तुकडे जोडून दाखवल्यासारखे वाटते.
पण, ह्यामध्ये शाळेचे जे चित्र उभे करण्यात आले आहे ते सगळ्या शाळांशी सुसंगत असेलच असे नाही. त्यामुळे काही लोकांना हा आचरटपणा वाटू शकतो.
वास्तविक मिलिंद बोकील यांनी अतिशय ओघवत्या शैलीत पुस्तक लिहिले आहे, पण वरण भात संस्कृती मध्ये वाढलेल्या मराठी माणसाला असा प्रयोग काहीवेळा पचनी पडत नाही.

असो, आशय काहीही असला तरी अभिनयाच्या बाबतीत उत्तम चित्रपट आहे.

बटाटा चिवडा's picture

25 Mar 2012 - 9:59 am | बटाटा चिवडा

मुलं कॉलेजमध्ये आहेत अस दाखवलं असत तर चित्रपट बघण्याजोगा झाला असता.

अहो, मुलं कॉलेजमध्ये आहेत असे दाखवले असते तर त्या चित्रपटाचे नाव 'शाळा' असे नसून 'कॉलेज' असेच नसते का कीचेंजी.. :D
काय राव.. :P

मयुरपिंपळे's picture

25 Mar 2012 - 11:50 am | मयुरपिंपळे

छान चित्रपट आहे... ऊगाच चित्रपटा वर टीका करु नये ;)

सुहास..'s picture

25 Mar 2012 - 12:27 pm | सुहास..

डोक्याला शॉट देऊन गेला मला, अर्थात ते केतकी च दिसण, लाजण आणी परांजपे बाई सोडल्या तर, मुळ धागा जर नववी ची मुल-मुली असं काही करू शकतात या वर असेल , तर नवल असे काहीच नाही, वर काही पाचवी- सहावी ची उदाहरणे आहेत च,

माझा अनुभव , अर्थात अपवाद असू शकतो. मी शिकलो ती संपुर्ण मुलांची ( ओनली बॉयज) शाळा होती. दहावी पर्यंत नीटस कळत देखील नव्हते, पण आमच्या ग्रुप ला कळत नव्हते याचा अर्थ ईतर ग्रुप्स ला कळत नव्हते असे काही नाही, कॅम्प मधे रवीवारी वर्गातलीच काही गँग मार्झोरिन ला मुलींबरोबर दिसायची, अर्थात सगळी च्या सगळी शाळा तशी नव्हती. एकमेकांशी असलेली खुन्नस, मग ती फुटबॉल गेम पासुन ते सायकल च्या स्टाईल पर्यंत सगळीकडे च असायची, मैत्री , ट्रेक्स, सायकल वर ट्रॅफीक मधून रेस ( आणी जमलाच तर अभ्यास ;) ) ...शाळा पाहिल्यानंतर मला सगळ्यात पहिले आठवला तो म्हणजे शाळेतला माझा ग्रुप, दोन - तीन मित्रांना पुण्यात भेटलो, काही चेपु वर शोधुन काढले, याच्या मुळे तो, त्याच्या मूळे हा असे जवळपास सगळेच शोधुन काढले, येत्या एप्रिल मध्ये शाळेतच भेटणार आहोत सारे, अर्थात फोना-फोनी करताना आधी च्या ईतकी मैत्री ची क्रेझ जाणवली नसली तरी, सगळेच जण मिस करताहेत हे मात्र नक्की ...जाता जाता ....

पियुशा's picture

25 Mar 2012 - 2:56 pm | पियुशा

हम्म...
परिक्षण आणी (काही ) प्रतिसाद कसे का असेना एकदा हा पिक्चर अवश्य पाहीन म्हणते ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

25 Mar 2012 - 3:19 pm | विश्वनाथ मेहेंदळे

परिक्षण ?????? या शब्दाचे इतके डीग्रेडेशन करू नका हो. मिपावर किंवा एकूणच जालावर परीक्षण करणारे अगदी थोडे आहेत. बाकीचे स्वयंघोषित समीक्षक सुद्धा केवळ चित्रपटाची ओळख करून देतात. किचेन मावशींनी तर ती पण नाही केली. त्या पण स्वतः या धाग्याला परीक्षण नाही म्हणणार.

मला ही नेमका हाच प्रश्न पड्ला आहे नक्की काय म्हणावे ? त्याचे वैयक्तिक मत ?चित्रपट ऑळ्ख्/का धावता आढावा? + / - पॉइन्ट ? की काय अजुन?

किचेन's picture

25 Mar 2012 - 5:24 pm | किचेन

परीक्षण वगैरे नै बर का तै!कशाला एवढे मोठे मोठे शब्द वापरून लाजवताय आम्हाला.
ते काय आम्ही हुजुरपागेतले...म्हजे १२५ वर्षांचे संस्कार वगैरे झालेत आमच्यावर.फक्त मुली,कडक शिस्त,कडक युनिफोर्म,दोन वर बांधलेल्या वेण्या,आणि अभाय्सात बर्यापैकी प्रगती.आम्ही कि नै कधी कोणत्या पोराकड त्या नजरेनी कधी बघितलाच नाही.
१०वित असताना क्लास मध्ये एका मुलीला एका मुलाने पेन मागितला,लागोपाठ ३ दिवस...तिने ते सरांना सांगितलं.सरांनी पूर्ण वर्गासमोर उभा करून त्याची उतरवली.त्या दिवशी आम्ही त्याच्या सायाकालमाधली हवा उतरवली, स्पोक तोडले.आणि लपून गम्मत बघत उभ्या राहिलो.पण ती सायकल दुसर्या कोणाची निघाली.सायकलला नंबर प्लेट नसते त्याचा हा तोटा.
कराटेच्या क्लासमध्ये सर कोण मुलामुलींना बोलू द्यायचे नाहीत.हा नियम सगळ्यांना होता.म्हण्जे चिल्ली पिल्ली पासून सर आणि मदमला पण. एका सर आणि मदमनी पळून जाऊन लग्न केल तेव्हा सरांनी यांना हाकलून दिले.
कोलेजपण फक्त मुलींचाच... आयुष्यातली पहिली शिवी मी पैल्यानदा कामाला लागले त्याच्या दुसर्यादिवशी दिली. हळू हळू त्यात भर पडत गेली ..आता ३-४ शिव्यांचा संग्रह झालेला आहे.
कामावर असताना पहिल्यांदा मला एकाने प्रपोज मारलं, तेव्हा आपण त्याला 'कशाला नाही त्या फंदात पडतो.चांगला मित्र आहेस मित्र राहा,जास्त आगावूपणा केला तर नाक फोडीन'अशी सौम्य आवाजात धमकी दिली. तेव्हापासून त्यांनी मैत्री ती मैत्रीच राहू दिली. त्याच्याकाधी दुसरा पर्यायच नव्हता.खर हा शुभ शकून...त्याने ज्या ज्या पोरींना प्रपोज मारली होती त्यांची त्यांची लग्न झटपट झाली.त्यांही तितक्याच झटपट नोकर्या बदलल्या.पण माझ लग्न इतक्या झटपट झाल नाही.
मला बघायला बरीच मुल आली ,म्हण्जे हाफ सेन्चुरी तरी नक्की झाली असाल.पण एकानीपण मझ्याकड डोळे वर करून बघितलं न्हायी.वर काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर विचार अस कोण मोठ्या व्यक्तीन सांगितलं तर ते नाव विचारायचे न गप्प बसायचे.मी मात्र आधीच मोठी प्रश्नावली करून ठेवलेली असायची.पण मुल त्यालाही लाजत लाजतच उत्तर द्यायची.त्यांचा तो विनम्र स्वभाव,आणि संस्कार वगैरे वगैरे बघून माझ्या डोळ्यात पाणी यायचं.
आत्ता माझ्यासाठी हा धक्काच आहे.५-६ त चिठ्ठ्या पास करायचा?आणि शिव्यांच्या भेंड्या.....अग बै काय सांगू ऐकवत नाहीये मला.....
शिव शिव शिव....

पैसा's picture

25 Mar 2012 - 5:32 pm | पैसा

लय भारी!

अन्या दातार's picture

25 Mar 2012 - 5:56 pm | अन्या दातार

भारतात बालविवाहास कायद्याने बंदी आहे ना?

कॉलिंग कॉमन मॅन कॉलिंग कॉमन मॅन कॉलिंग कॉमन मॅन

शैलेन्द्र's picture

25 Mar 2012 - 6:29 pm | शैलेन्द्र

मुळ लेखापेक्षा मोठ्ठी प्रतिक्रिया.. पण चांगली आहे.. :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

25 Mar 2012 - 9:59 pm | विश्वनाथ मेहेंदळे

म्हात्रे नि एका मुलीला सरळसरळ 'लाईन देतेस' का अस विचारलय.त्याचा सुजलेला चेहरा बघून आनंद वाटला.पण कस बदडलं हेदेखील दाखवलं असत तर आत्म्यास शांती मिळाली असती(आणि चालू पिढीला धडा).

आणि

त्या दिवशी आम्ही त्याच्या सायाकालमाधली हवा उतरवली, स्पोक तोडले.आणि लपून गम्मत बघत उभ्या राहिलो.

रोचक मते आणि कृती आहेत. गम्मत वाटली.......

रोचक मते आणि कृती आहेत. गम्मत वाटली.......

+१ असेच म्हणतो.

पियुशा's picture

26 Mar 2012 - 11:18 am | पियुशा

परीक्षण वगैरे नै बर का तै!कशाला एवढे मोठे मोठे शब्द वापरून लाजवताय आम्हाला.
ते काय आम्ही हुजुरपागेतले...म्हजे १२५ वर्षांचे संस्कार वगैरे झालेत आमच्यावर.फक्त मुली,कडक शिस्त,कडक युनिफोर्म,दोन वर बांधलेल्या वेण्या,आणि अभाय्सात बर्यापैकी प्रगती.आम्ही कि नै कधी कोणत्या पोराकड त्या नजरेनी कधी बघितलाच नाही

म्हणजे नक्की कोणत्या नजरेने ? ;)
पहिल्यादा क्लिअर कर बघु तुमची शाळा फक्त मुलीन्चीच होती का ?

१०वित असताना क्लास मध्ये एका मुलीला एका मुलाने पेन मागितला,लागोपाठ ३ दिवस...तिने ते सरांना सांगितलं.सरांनी पूर्ण वर्गासमोर उभा करून त्याची उतरवली.त्या दिवशी आम्ही त्याच्या सायाकालमाधली हवा उतरवली, स्पोक तोडले.आणि लपून गम्मत बघत उभ्या राहिलो.पण ती सायकल दुसर्या कोणाची निघाली.सायकलला नंबर प्लेट नसते त्याचा हा तोटा.
कराटेच्या क्लासमध्ये सर कोण मुलामुलींना बोलू द्यायचे नाहीत.

जर तुमची शाळा "कन्याशाळा होती तर पेन मागायला मुल आलीच कुठूण ;)
अन तुम्ही कुनाच्या सायकलचे स्पोक तोड्ले अन हवा काढली ;)शेजारी बॉय'ज स्कुल होते का ग ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Mar 2012 - 11:25 am | बिपिन कार्यकर्ते

असं काय करताय पियुशातै! शाळा मेली फक्त मुलींसाठी होती. त्या क्लासबद्दल बोलत आहेत. तिथे मिश्र लोकवस्ती असेल.

पियुशा's picture

26 Mar 2012 - 11:38 am | पियुशा

बि का तुम किसके साइड्से हो ;)
लेट हर स्पीक ;)

कराटेच्या क्लासमध्ये सर कोण मुलामुलींना बोलू द्यायचे नाहीत.हा नियम सगळ्यांना होता.म्हण्जे चिल्ली पिल्ली पासून सर आणि मदमला पण. एका सर आणि मदमनी पळून जाऊन लग्न केल तेव्हा सरांनी यांना हाकलून दिले.

ऑ !!! काय जमाते हिट्लर होते की काय सगळे ;)

नाय पटेश मला तरी अतिशोयक्ती वाट्ते :(

अन्या दातार's picture

26 Mar 2012 - 11:29 am | अन्या दातार

>>आम्ही कि नै कधी कोणत्या पोराकड त्या नजरेनी कधी बघितलाच नाही
म्हणजे नक्की कोणत्या नजरेने ?

त्यांच्या वर्गातल्या काही मुली टॉम'बॉय' असाव्यात; पण सरतेशेवटी त्या मुलीच ना! ;)

>>जर तुमची शाळा "कन्याशाळा होती तर पेन मागायला मुल आलीच कुठूण

तुमच्या स्क्रिनवरची/चष्म्यावरची धूळ पुसा बघू आधी. अधोरेखित(म्हणजे शुद्ध मराठीत अंडरलाईन) व ठळक (मराठीत बोल्ड) केलेले नीट वाचा

१०वित असताना क्लास मध्ये एका मुलीला एका.......

पैसा's picture

26 Mar 2012 - 11:32 am | पैसा

"क्लासमधे" याचा अर्थ "ट्युशन क्लासच" कशावरून? "वर्गात" असा पण होतो ना?

टॉमबॉयबद्दल आपला पास. =))

जाऊ दे ग पिवशे
तू नको टेन्शन घेऊस

.त्या दिवशी आम्ही त्याच्या सायाकालमाधली हवा उतरवली, स्पोक तोडले.आणि लपून गम्मत बघत उभ्या राहिलो.पण ती सायकल दुसर्या कोणाची निघाली.सायकलला नंबर प्लेट नसते त्याचा हा तोटा.

कामावर असताना पहिल्यांदा मला एकाने प्रपोज मारलं, तेव्हा आपण त्याला 'कशाला नाही त्या फंदात पडतो.चांगला मित्र आहेस मित्र राहा,जास्त आगावूपणा केला तर नाक फोडीन'अशी सौम्य आवाजात धमकी दिली

आयुष्यातली पहिली शिवी मी पैल्यानदा कामाला लागले त्याच्या दुसर्यादिवशी दिली.

ताई तुम्ही पुण्यातल्या हुज्जुरपागे च्या वाटत नाही .

.पण माझ लग्न इतक्या झटपट झाल नाही.

मला बघायला बरीच मुल आली ,म्हण्जे हाफ सेन्चुरी तरी नक्की झाली असाल.पण एकानीपण मझ्याकड डोळे वर करून बघितलं न्हायी.वर काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर विचार अस कोण मोठ्या व्यक्तीन सांगितलं तर ते नाव विचारायचे न गप्प बसायचे.मी मात्र आधीच मोठी प्रश्नावली करून ठेवलेली असायची.

तरीच ....

मस्त कलंदर's picture

26 Mar 2012 - 11:44 am | मस्त कलंदर

तरीच बैंना पुरूष अगतिक आणि दीनवाणे वाटतात!!

बाकी, मी ही कन्या शाळेतच शिकले असले तरी भाऊ आणि मित्रांमुळे बाहेरच्या जगात काय चालते याचे सामान्यज्ञान नक्कीच होते आणि आहे.

असो. एका निरागसता न हरपलेल्या व्यक्तीने अतिशय निरागसतेने लिहिलेल्या धाग्याची निष्ठूर मनाच्या ( आणि स्त्री-पुरूष समानतेच्या धाग्यावर धागाकर्तीच्या प्रगल्भ विचारांची वाहवा केलेल्या) लोकांनी केलेली चिरफाड पाहून अंमळ गंमत वाटली.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

26 Mar 2012 - 3:17 pm | विश्वनाथ मेहेंदळे

असो. एका निरागसता न हरपलेल्या व्यक्तीने अतिशय निरागसतेने लिहिलेल्या धाग्याची निष्ठूर मनाच्या ( आणि स्त्री-पुरूष समानतेच्या धाग्यावर धागाकर्तीच्या प्रगल्भ विचारांची वाहवा केलेल्या) लोकांनी केलेली चिरफाड पाहून अंमळ गंमत वाटली.

एका ठिकाणी मते पटली म्हणून सर्व ठिकाणी पटली पाहिजेत असे नाही. त्यातून दोन्ही विषयांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.
आम्ही पाठींबा किंवा विरोध व्यक्त करतो ते मताला, व्यक्तीला नाही.

नितिन थत्ते's picture

25 Mar 2012 - 6:01 pm | नितिन थत्ते

आमच्या शाळेत ८ वी पासून पुढच्या मुलांनी मुलींशी बोलायला अघोषित बंदी होती. म्हणजे लाईन/प्रपोज खेरीज इतर कारणासाठी बोलण्यास बंदी होती. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

25 Mar 2012 - 6:15 pm | अत्रुप्त आत्मा

@म्हणजे बोलण्यास बंदी होती. Wink >>> बंदुकधारी थत्तेचाचांचा खत्री शॉट ;-)

तर्री's picture

25 Mar 2012 - 6:18 pm | तर्री

आमच्या ही शाळेत ही बंदी "स्वयंघोशीत " होतीच. पण ती ९ पर्यंतच. ९ वी नंतर २/३ जोड्या जमल्या होत्या.
आणि आम्ही मोठ्या धिटाईने मुलींशी बोलू लागलो होतो. १० मध्ये तर मुला-मुलींनी बोलणे काही विषेश राहीले नाही. आणि.....
९ पर्यंत "मुलीं" बद्दल जे (अती रंजीत-अतीअश्लिल )कुजबुजले जात होते , त्याची खूपच पातळी सुधारली.

<बोळा निघाला -पाणी वहाते झाले > - मला वाटते तो आमचा सखाराम गटणे अवतार होता.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Mar 2012 - 8:44 am | अत्रुप्त आत्मा

काल झी मराठी अ‍ॅवॉर्डस २०१२ मधे ... शाळेला ५ पुरस्कार मिळाले...

सर्वोत्कृष्ट लेखन,
सर्वोत्कृष्ट पटकथा लेखन
सर्वोत्कृष्ट संवाद
सर्वोत्कृष्ट चित्रपट
सर्वोत्कृष्ट बालकलाकार = जोश्या.. ;-)
आता बोला...

चिंतामणी's picture

26 Mar 2012 - 9:06 am | चिंतामणी

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन म्हणून आणि जोश्याला बाल कलाकार म्हणून नव्हे तर जोशी आणि माटेगावकर दोघांनाही ज्यूरीचे अ‍ॅवॉर्ड अशी सात अ‍ॅवॉर्डस मिळाली आहेत.

कपिलमुनी's picture

26 Mar 2012 - 10:38 am | कपिलमुनी

>>जे सवांद आहेत ते नववीतल्या मुलांच्या तोंडी शोभतील असे नक्कीच नव्हते

आमच्या शाळेतले नववीचे संवाद एकून बरेच मास्तर , मॅडम झीट येउन पडल्याचा इतिहास आहे..त्या मानाने संवाद चांगले होते म्हणायचे

मी-सौरभ's picture

26 Mar 2012 - 12:09 pm | मी-सौरभ

कपिलशी बाडीस

(मुनीवर्यांसारखेच अनुभव असलेला)

मृत्युन्जय's picture

26 Mar 2012 - 11:44 am | मृत्युन्जय

सगळीकडे 'शाळा'चा फार उदोउदो चालला होता म्हणून बघितला.सुरुवातीलाच डोक्यात गेला.

चित्रपट सुरुवातीलाच डोक्यात जाण्याचे काय कारण? सुरुवात काही भीषण नाही आहे,

चित्रपट अति सुंदर नाही हे मान्य कारण तो पुस्तकाला योग्य न्याय देत नाही. पण तरीही त्यात डोक्यात जाण्यासारखे काहीच नाही

मी पुस्तक वाचल नाहीये,त्यामुळे मूळ पुस्तकाचा विषय मला माहित नाही.

चित्रपट पुर्णतः पुस्तकावर बेतलेला आहे.

पण इथे तर पूर्ण चित्रपट विषयावरच बनवलाय.

चित्रपट विषयावरच बनवावेत अशी अपेक्षा असते, बिनविषयाचा चित्रपट कसा बनवायचा? तश्या तर फक्त पॉर्नफिल्म्स बनवता येउ शकतात. अर्थात त्यातही थोडा विषय असतोच म्हणा.

नववीतल्या मुलांच्या मानाने आणि शाळा या नावाचा विचार केला चित्रपटात शाळेचा फळा आणि वर्ग एवढंच आहे.बाकी शाळेची मुल,त्यांची टिंगल टवाळी कॉलेजमधल्या मुलांसारखीच आहे.

तुम्ही शाळेत नक्कीच कधीही गेला नव्हता आणि गेलाच असाल चुकुन माकुन तर कॉलेजात तर नक्की गेला नव्हता.

आमच्या शाळेत एका विद्यार्थ्याने एका विद्यार्थीनीची आठवीत असताना छेड काढली होती (म्हणजे जबरदस्तीने चुंबन घेतले होते). त्याला त्या मुलीच्या पाया पडुन माफी मागण्याची शिक्षा झाली. त्यावेळेस त्या मुलीने स्कर्ट घातला होता. पाया पडुन झाल्यावर त्या विद्यार्थ्याने जी प्रतिक्रिया दिली ती ऐकुन मला आजही किळस वाटते. शाळा मध्ये दाखवलेले प्रसंग खरोखर निरागस आहेत त्या मानाने. आणि प्रातिनिधिक आणि वास्तव तर नक्कीच आहेत.

त्यातला म्हात्रेनि बर्याच ठिकाणी ' भें....' हि शिवी वापरलीये.तेव्हा सेन्सोर बोर्ड वगैरे काही खरच अस्तित्वात आहे का असा प्रश्न पडला होता.

आम्ही शाळेत् असताना शिव्याच्या भेंड्या खेळल्याची आठवण आहे मला. मला त्या काळी किमान १०० एक शिव्या पाठ होत्या. त्यातील काही युनिक होत्या. भेंड्या खेळताना उपयोगी पडायच्या. माझ्यापेक्षा वर्गातल्या ९०% मुलांचा शब्दसंग्रह खुपच भारी होता हेही नम्रपणे नमूद करु इच्छितो.

वर्गात शिवी न देणारे फारतर २-३ मुले होती. ती शिव्या न देणारी होती म्हणजे दर दूसर्‍या वाक्याला शिवी द्यायची नाही. अन्यथा भें*द, भिका**द, माद**द, **व्या, आ**ल्या, आ**व्या, *डु, अच्चीत गच्ची......, ल्*ड्या आणि अश्या अनेक शिव्या खुपच कॉमन होत्या.

आमच्या शाळेतली किमान ५-७ मुले दरवर्षी बॉर्डात यायची आणि आमच्या ३-४ वर्ष आधीच्या बॅच मधला मुलगा बॉर्डात पहिला आला होता. आमची तुकडी शाळेतली सर्वात हुषार तुकडी होती. यावरुन वर्गात कश्याप्रकारची मुले होती आणि शाळा कशी होती याचा थोडाफार अंदाज येइल. आज वर्गातली ८०% मुले / मुली उत्तम पदांवर काम करत आहे अथवा अतिशय उत्तम शैक्षणिक अर्हता बाळगुन आहेत.

एका दृश्यात शाळेतली मुलं तोंडातून लाळ गळेल एवढा मोठा आ करून त्यांच्या पाठमोर्या बाईंकडे बघत आहेत.

मी लाळ गळालेली मुले बघितली आहेत. शाळेत असताना. अजुनही भन्नाट नमुने आमच्या शाळेत होते. वाचलेत तर तुम्ही तुमच्या मुलांना हिमालयातल्या मठातच शिकवायला पाठवाल बहुधा.

जोशीच प्रेमपत्र,शिरोडकरच घर शोधून काढण्याची ट्रिक बघता अस वाटत कि त्याला आधी खूप अनुभव आहे अस आहे.

याला अनुभव लागतो? अरेरे. आठवीतली मुले करायची हो आमच्या शाळेत हे सगळे आणि आम्हीही हे अनुभव नसतानाच केले आहे (त्यावेळी आम्ही शाळेत नव्हतो ही गोष्ट वेगळी)

(कदचित हि सगळि त्याच्या मामाचि शिकवण असावी)

असेलही. पणा या गोष्टी शिकवायला लागत नाहीत हो. मुले आपसूक शिकतात. लग्न झालेल्या लोकांना कश्या काही गोष्टी अनुभव नसतानाही व्यवस्थित जमतात. तसेच.

जे सवांद आहेत ते नववीतल्या मुलांच्या तोंडी शोभतील असे नक्कीच नव्हते.मुलं कॉलेजमध्ये आहेत अस दाखवलं असत तर चित्रपट बघण्याजोगा झाला असता.

कंबख्त तुने पिहीच नै च्या धर्तीवर कंबख्त तूने शाळा मे पढ्याच नै असे दुर्दैवाने म्हणावे लागते आहे.

म्हात्रे नि एका मुलीला सरळसरळ 'लाईन देतेस' का अस विचारलय.

खरेच सांगतो आमच्या वर्गातली मुले (आणि मुली सुद्धा) याच्या खुप खुप पुढे गेले होते हो. वरती एक उदाहरण तर दिलेच आहे.

आमच्या वर्गात काही जोड्या होत्या. ही आठवी नववीतली गोष्ट. ही मुले मुली सायकलवर डबलसीट फिरायची. कदाचित काही चाळेही केले असावेत कारण याची तक्रार मुख्याध्यापकांकडे गेली होती. एका बाइंनी वर्गात येउन यावर मुलांचे बौद्धिकही घेतले होते. फरक काहीच पडला नाही ही गोष्ट वेगळी.

त्याचा सुजलेला चेहरा बघून आनंद वाटला.पण कस बदडलं हेदेखील दाखवलं असत तर आत्म्यास शांती मिळाली असती(आणि चालू पिढीला धडा).

अरेरे. सुदैवाने असे काही आमच्या शाळेत झाले नाही. नाहितर अर्धी मुले (आणी काही मुलीदेखील) रोज सुजलेल्या चेहर्‍याने वर्गात बसली असती. ;).

बाकी तुमच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी खुपच विचित्र कारण लागते आहे हे बघुन मनाला क्लेष झाले.

जोशीच्या वडिलांचं ह्या अडनिड वयातल्या मुलांना समजून घेतलं पाहिजे हे कळतंय.पण ते जरा जास्तच कुल वाटत.

ते खुपच स्वाभाविक आणि समतोल वाटले.

माझ्या पिढीमधील माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि मित्र (वय २६ ते ३०)यांचा प्रतिसाद 'काहीही चित्रपट बनवतात!आमच्या शाळेत नव्हत अस काही.याला कसे काय मिळाले पुरस्कार?'असंच होता.

माझ्झ्यानंतर एका वर्षाने बाहेर पडलेली पिढी वाया गेली (किंवा शाळेत गेलीच नाही) असे दुर्दैवाने म्हणावे लागते आहे. पण एवढे नक्की की आजची पिढी आमच्या १५ -२० पावले पुढे आहे.

माझ्या १५ वर्षाच्या पुतण्याच्या आत्तापर्यंत आम्हाला ज्ञात असलेल्या ४ गर्लंफ्रेंड्स होउन गेल्या आहेत. त्यातली जी शेवटची आहे तिने त्याला " आर यु व्हर्जिन?" असा प्रश्न एसेमेस द्वारा विचारला होता. त्याने "ऑफकॉर्स" असे उत्तर दिलेले पाहुन वहिनेने निश्वास सोडला. भावाची आणी वहिनीची इतकीच माफक इच्छा आहे की त्याने जे काही करावे ते घरी सांगावे. बादवे वहिनीची होउ घातलेली ( या वेगाने पुतण्या गर्लफ्रेंड्स बदलतो आहे त्या वेगाने ती सून होइल की नाही देव जाणे) सून सध्या १४ वर्षांची आहे.

ओळखीमध्ये अजुन एक असेच कुटुंब आहे ज्यांच्या १४ वर्षाय मुलीच्या बेडरुम मधुन एक दिवस वापरलेला गर्भनिरोधक सापडला होता. तिचे आईवडील अजुन मुलीला याबद्दल स्पष्टीकरण विचारावे की नाही याचा विचार करत आहेत. तिला २ वर्षापासुन बॉयफ्रेंड आहे हे तर त्यांना माहितीच आहे

घरी आल्यावर जाणवले कि आजूबाजूच्या मुलांमध्ये म्हण्जे नववी ते कोलेज ह्या मुलांना हा चित्रपट प्रचंड आवडलाय.म्हण्जे 'सोलिड आहे ,कडक आहे,जबरा आहे.' पण थोडी मोठी म्हण्जे जोब करणारी,लग्न न झालेली यांनाहि हा चित्रपट आवडला नव्हता.

मी वय वर्षे ३० पुर्ण. विवाहीत असे जाहीर नमूद करु इच्छितो की चित्रपट चांगला आहे किमानपक्षी बरा तर नक्कीच आहे. पण या चित्रपटात ज्या गोष्टी आपल्याला आक्षेपार्ह वाटल्या त्या चित्रपटात ज्या पुस्तकातुन उचलल्या आहेत ते पुस्तक केवळ अप्रतिम असे आहे. माझे सर्वात आवडते पुस्तक आहे आणि वय वर्षे २१ ते ४५ ( बिका तुमचे वय काय हो?) मधल्या अगणित व्यक्तींनी मला असाच अभिप्राय दिला आहे.

तुम्हाला काय वाटत?

मला असे वाटते की तुमचे सगळेच्याअ सगळे मुद्दे प्रचंड चुकीचे आहेत.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Mar 2012 - 11:54 am | बिपिन कार्यकर्ते

=))

बा मृत्युंजया! दंडवत रे बाबा! जे करायचं मी टाळलं ते तू केलंस! असंच सविस्तर लिहायचं होतं. पण जाऊ दे म्हणलं! प्रतिसाद आवडला (एक अनावश्यक प्रश्न सोडून. ;) )

इथेच एकांशी व्यक्तिगत चर्चेत म्हणलं तसं... या विषयावर लिहायचं म्हणलं तर खूप लिहिता येईल. या धाग्याची लिंक वर्गमित्रांना पाठवतो आहे. सामुहिक मनोरंजन सेशन होऊ शकते.

सुहास झेले's picture

26 Mar 2012 - 11:58 am | सुहास झेले

ज्ये बात..... !!

प्यारे१'s picture

26 Mar 2012 - 12:00 pm | प्यारे१

>>>मला असे वाटते की तुमचे सगळेच्या सगळे मुद्दे प्रचंड चुकीचे आहेत.

हे वाचेपर्यंत किचेनति शुद्धीवर तरी असायला हव्यात रे मृत्यूंजया...

अरे लोकांची लग्नं लावतात रे . त्या 'असणं' आवश्यक आहे रे! उगाच प्राब्लेम नको करु.
एवढं प्रतिसादास्त्र फेकून पटकन फट म्हणता... (ब्र म्हणता चा कॉपीराईट गविंकडे गेलाय म्हणे! )
निरागस आहेत रे त्या! त्यांना आपलं म्हणा आणि सगळे मिळून संत तुकाराम ला चला. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

26 Mar 2012 - 12:19 pm | अत्रुप्त आत्मा

@त्यांना आपलं म्हणा आणि सगळे मिळून संत तुकाराम ला चला. >>> प्यारे १ यांचा स्फोटक हापटबार... मेलो मेलो ...रे प्यार्‍या... दुष्टा...कुठे फेडशील ही पापं...?

विजय नरवडे's picture

26 Mar 2012 - 12:27 pm | विजय नरवडे

सहमत

मी-सौरभ's picture

26 Mar 2012 - 3:32 pm | मी-सौरभ

आमचा दंडवत कबूल करावा...

तुम्ही सांगितलेले सद्यप्रसंग अजून फार कमी प्रमाणात होत असावेत अशी अपेक्षा आहे. :(

ह्यो धागा नक्कीच सेन्च्युरी मार्नार बगा..जियो किचेनतै!!

दिपक's picture

26 Mar 2012 - 1:34 pm | दिपक

माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि मित्र (वय २६ ते ३०)यांचा प्रतिसाद 'काहीही चित्रपट बनवतात!आमच्या शाळेत नव्हत अस काही

हाय कंबख्त तुने पी ही नही! :-)

बाकी मृत्युन्जयाशी बाडीस.

बॅटमॅन's picture

26 Mar 2012 - 1:56 pm | बॅटमॅन

ये धत्तड तत्तड धत्तड तत्तड..१०० पार झाले!!!!! आता येक अभिनंदनाचा ठराव पास करावा लवकरात लवकर ;)

अत्रुप्त आत्मा's picture

26 Mar 2012 - 2:13 pm | अत्रुप्त आत्मा

चला....! झाले का शंभर....!?

अता प्रथे प्रमाणे ब्यांड वाजवला पाहिजे... ;-)

टवाळखोर's picture

26 Mar 2012 - 2:33 pm | टवाळखोर

आमच्या शाळेत नव्हत अस काही.

किचेन, तुमच्या शाळेत असलं काही नव्हतं म्हणजे काय कुठल्याच शाळेत असलं काही नव्हतं असं म्हणायचंय काय? आम्ही शाळामधले सर्व प्रसंग स्वत: अनुभवले आहेत. अगदी "लाईन देतेस का?" असे विचारण्यापर्यंत! कधी कधी मला वाटते की माझ्या शालेय जीवनावर आधारितच शाळा कादंबरी लिहीली आहे काय?

चिगो's picture

26 Mar 2012 - 4:26 pm | चिगो

चित्रपट पाहीलेला नाही.. मात्र कादंबरी प्रचंड आवडलेली आहे. शाळेबद्दल बोलायचं झालं, तर गावच्या शाळेत काही पोरं अक्षरशः ३-४थी पासून शिव्या द्यायला लागली होती.. खेड्यात हे लै कॉमन असतं. चित्रपटात "ढवळ्या-पवळ्या" म्हणून बैलांना हाका मारणारा शेतकरी प्रत्यक्षात त्यांना अश्या शेलक्या शिव्या घालतो की समजल्या तर बैल मरेल.. :p

पाचवीनंतर नवोदय विद्यालयात असल्याने शिव्या-बिव्या कमी झाल्या थोड्या वर्गातल्या.. (मास्तरं भयंकर म्हणून..) पण पोरांचं लाईन मारणे सुरु असायचं .. आता "लाईन देतेस का?" हे विचारायची हिंमत नव्हती कोणात. पण पोरींना पण कळायचं की त्यांच्यावर लाईन मारल्या जातेय.. आठवीत वगैरे "ह्याची ती, त्याची ती" हे सुरु झालं होतं. नववी/दहावीत पोरांना भुगोलच्या बाईंच्या भुगोलातपण आवड निर्माण व्हायला लागली होतीच..

ह्या असल्या सगळ्या अनुभवांमुळे मला तरी कादंबरी अजिबात अतिरंजीत वाटली नाही, उलट खुप नैसर्गिक ओघवती वाटली..

(पहीली लाईन इयत्ता ८ मध्ये मारलेला) चिगो..

राजघराणं's picture

26 Mar 2012 - 5:47 pm | राजघराणं

आमच्या शाळेतली पोर. कादंबरीतल्या पोरांपेक्षा बरीच पुढारलेली होती. लाइन देते का वगैरे विचारणे हा प्रघात होता. टोळ्या करून मार्‍यामार्‍या करायची पद्धत होती. गुट्खा दारू वगैरे गोष्टी ही तुरळक प्रमाणात होत्याच.

पण शाळा चित्रपट आणी कादंबरी त्याविषयी नाही....... विषय हुजुरपागेला समजलेला नाही.