Skip to main content

शाळा?

लेखक किचेन यांनी शनिवार, 24/03/2012 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
सगळीकडे 'शाळा'चा फार उदोउदो चालला होता म्हणून बघितला.सुरुवातीलाच डोक्यात गेला.मी पुस्तक वाचल नाहीये,त्यामुळे मूळ पुस्तकाचा विषय मला माहित नाही.पण इथे तर पूर्ण चित्रपट विषयावरच बनवलाय.नववीतल्या मुलांच्या मानाने आणि शाळा या नावाचा विचार केला चित्रपटात शाळेचा फळा आणि वर्ग एवढंच आहे.बाकी शाळेची मुल,त्यांची टिंगल टवाळी कॉलेजमधल्या मुलांसारखीच आहे. त्यातला म्हात्रेनि बर्याच ठिकाणी ' भें....' हि शिवी वापरलीये.तेव्हा सेन्सोर बोर्ड वगैरे काही खरच अस्तित्वात आहे का असा प्रश्न पडला होता.एका दृश्यात शाळेतली मुलं तोंडातून लाळ गळेल एवढा मोठा आ करून त्यांच्या पाठमोर्या बाईंकडे बघत आहेत.जोशीच प्रेमपत्र,शिरोडकरच घर शोधून काढण्याची ट्रिक बघता अस वाटत कि त्याला आधी खूप अनुभव आहे अस आहे.(कदचित हि सगळि त्याच्या मामाचि शिकवण असावी) जे सवांद आहेत ते नववीतल्या मुलांच्या तोंडी शोभतील असे नक्कीच नव्हते.मुलं कॉलेजमध्ये आहेत अस दाखवलं असत तर चित्रपट बघण्याजोगा झाला असता.म्हात्रे नि एका मुलीला सरळसरळ 'लाईन देतेस' का अस विचारलय.त्याचा सुजलेला चेहरा बघून आनंद वाटला.पण कस बदडलं हेदेखील दाखवलं असत तर आत्म्यास शांती मिळाली असती(आणि चालू पिढीला धडा). जोशीच्या वडिलांचं ह्या अडनिड वयातल्या मुलांना समजून घेतलं पाहिजे हे कळतंय.पण ते जरा जास्तच कुल वाटत. माझ्या पिढीमधील माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि मित्र (वय २६ ते ३०)यांचा प्रतिसाद 'काहीही चित्रपट बनवतात!आमच्या शाळेत नव्हत अस काही.याला कसे काय मिळाले पुरस्कार?'असंच होता.घरी आल्यावर जाणवले कि आजूबाजूच्या मुलांमध्ये म्हण्जे नववी ते कोलेज ह्या मुलांना हा चित्रपट प्रचंड आवडलाय.म्हण्जे 'सोलिड आहे ,कडक आहे,जबरा आहे.' पण थोडी मोठी म्हण्जे जोब करणारी,लग्न न झालेली यांनाहि हा चित्रपट आवडला नव्हता. तुम्हाला काय वाटत?

वाचने 18519
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

परीक्षण वगैरे नै बर का तै!कशाला एवढे मोठे मोठे शब्द वापरून लाजवताय आम्हाला. ते काय आम्ही हुजुरपागेतले...म्हजे १२५ वर्षांचे संस्कार वगैरे झालेत आमच्यावर.फक्त मुली,कडक शिस्त,कडक युनिफोर्म,दोन वर बांधलेल्या वेण्या,आणि अभाय्सात बर्यापैकी प्रगती.आम्ही कि नै कधी कोणत्या पोराकड त्या नजरेनी कधी बघितलाच नाही. १०वित असताना क्लास मध्ये एका मुलीला एका मुलाने पेन मागितला,लागोपाठ ३ दिवस...तिने ते सरांना सांगितलं.सरांनी पूर्ण वर्गासमोर उभा करून त्याची उतरवली.त्या दिवशी आम्ही त्याच्या सायाकालमाधली हवा उतरवली, स्पोक तोडले.आणि लपून गम्मत बघत उभ्या राहिलो.पण ती सायकल दुसर्या कोणाची निघाली.सायकलला नंबर प्लेट नसते त्याचा हा तोटा. कराटेच्या क्लासमध्ये सर कोण मुलामुलींना बोलू द्यायचे नाहीत.हा नियम सगळ्यांना होता.म्हण्जे चिल्ली पिल्ली पासून सर आणि मदमला पण. एका सर आणि मदमनी पळून जाऊन लग्न केल तेव्हा सरांनी यांना हाकलून दिले. कोलेजपण फक्त मुलींचाच... आयुष्यातली पहिली शिवी मी पैल्यानदा कामाला लागले त्याच्या दुसर्यादिवशी दिली. हळू हळू त्यात भर पडत गेली ..आता ३-४ शिव्यांचा संग्रह झालेला आहे. कामावर असताना पहिल्यांदा मला एकाने प्रपोज मारलं, तेव्हा आपण त्याला 'कशाला नाही त्या फंदात पडतो.चांगला मित्र आहेस मित्र राहा,जास्त आगावूपणा केला तर नाक फोडीन'अशी सौम्य आवाजात धमकी दिली. तेव्हापासून त्यांनी मैत्री ती मैत्रीच राहू दिली. त्याच्याकाधी दुसरा पर्यायच नव्हता.खर हा शुभ शकून...त्याने ज्या ज्या पोरींना प्रपोज मारली होती त्यांची त्यांची लग्न झटपट झाली.त्यांही तितक्याच झटपट नोकर्या बदलल्या.पण माझ लग्न इतक्या झटपट झाल नाही. मला बघायला बरीच मुल आली ,म्हण्जे हाफ सेन्चुरी तरी नक्की झाली असाल.पण एकानीपण मझ्याकड डोळे वर करून बघितलं न्हायी.वर काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर विचार अस कोण मोठ्या व्यक्तीन सांगितलं तर ते नाव विचारायचे न गप्प बसायचे.मी मात्र आधीच मोठी प्रश्नावली करून ठेवलेली असायची.पण मुल त्यालाही लाजत लाजतच उत्तर द्यायची.त्यांचा तो विनम्र स्वभाव,आणि संस्कार वगैरे वगैरे बघून माझ्या डोळ्यात पाणी यायचं. आत्ता माझ्यासाठी हा धक्काच आहे.५-६ त चिठ्ठ्या पास करायचा?आणि शिव्यांच्या भेंड्या.....अग बै काय सांगू ऐकवत नाहीये मला..... शिव शिव शिव....

In reply to by किचेन

भारतात बालविवाहास कायद्याने बंदी आहे ना? कॉलिंग कॉमन मॅन कॉलिंग कॉमन मॅन कॉलिंग कॉमन मॅन

In reply to by किचेन

म्हात्रे नि एका मुलीला सरळसरळ 'लाईन देतेस' का अस विचारलय.त्याचा सुजलेला चेहरा बघून आनंद वाटला.पण कस बदडलं हेदेखील दाखवलं असत तर आत्म्यास शांती मिळाली असती(आणि चालू पिढीला धडा).
आणि
त्या दिवशी आम्ही त्याच्या सायाकालमाधली हवा उतरवली, स्पोक तोडले.आणि लपून गम्मत बघत उभ्या राहिलो.
रोचक मते आणि कृती आहेत. गम्मत वाटली.......

In reply to by किचेन

परीक्षण वगैरे नै बर का तै!कशाला एवढे मोठे मोठे शब्द वापरून लाजवताय आम्हाला. ते काय आम्ही हुजुरपागेतले...म्हजे १२५ वर्षांचे संस्कार वगैरे झालेत आमच्यावर.फक्त मुली,कडक शिस्त,कडक युनिफोर्म,दोन वर बांधलेल्या वेण्या,आणि अभाय्सात बर्यापैकी प्रगती.आम्ही कि नै कधी कोणत्या पोराकड त्या नजरेनी कधी बघितलाच नाही म्हणजे नक्की कोणत्या नजरेने ? ;) पहिल्यादा क्लिअर कर बघु तुमची शाळा फक्त मुलीन्चीच होती का ? १०वित असताना क्लास मध्ये एका मुलीला एका मुलाने पेन मागितला,लागोपाठ ३ दिवस...तिने ते सरांना सांगितलं.सरांनी पूर्ण वर्गासमोर उभा करून त्याची उतरवली.त्या दिवशी आम्ही त्याच्या सायाकालमाधली हवा उतरवली, स्पोक तोडले.आणि लपून गम्मत बघत उभ्या राहिलो.पण ती सायकल दुसर्या कोणाची निघाली.सायकलला नंबर प्लेट नसते त्याचा हा तोटा. कराटेच्या क्लासमध्ये सर कोण मुलामुलींना बोलू द्यायचे नाहीत. जर तुमची शाळा "कन्याशाळा होती तर पेन मागायला मुल आलीच कुठूण ;) अन तुम्ही कुनाच्या सायकलचे स्पोक तोड्ले अन हवा काढली ;)शेजारी बॉय'ज स्कुल होते का ग ;)

In reply to by पियुशा

असं काय करताय पियुशातै! शाळा मेली फक्त मुलींसाठी होती. त्या क्लासबद्दल बोलत आहेत. तिथे मिश्र लोकवस्ती असेल.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बि का तुम किसके साइड्से हो ;) लेट हर स्पीक ;) कराटेच्या क्लासमध्ये सर कोण मुलामुलींना बोलू द्यायचे नाहीत.हा नियम सगळ्यांना होता.म्हण्जे चिल्ली पिल्ली पासून सर आणि मदमला पण. एका सर आणि मदमनी पळून जाऊन लग्न केल तेव्हा सरांनी यांना हाकलून दिले. ऑ !!! काय जमाते हिट्लर होते की काय सगळे ;) नाय पटेश मला तरी अतिशोयक्ती वाट्ते :(

In reply to by पियुशा

>>आम्ही कि नै कधी कोणत्या पोराकड त्या नजरेनी कधी बघितलाच नाही म्हणजे नक्की कोणत्या नजरेने ? त्यांच्या वर्गातल्या काही मुली टॉम'बॉय' असाव्यात; पण सरतेशेवटी त्या मुलीच ना! ;) >>जर तुमची शाळा "कन्याशाळा होती तर पेन मागायला मुल आलीच कुठूण तुमच्या स्क्रिनवरची/चष्म्यावरची धूळ पुसा बघू आधी. अधोरेखित(म्हणजे शुद्ध मराठीत अंडरलाईन) व ठळक (मराठीत बोल्ड) केलेले नीट वाचा
१०वित असताना क्लास मध्ये एका मुलीला एका.......

In reply to by किचेन

.त्या दिवशी आम्ही त्याच्या सायाकालमाधली हवा उतरवली, स्पोक तोडले.आणि लपून गम्मत बघत उभ्या राहिलो.पण ती सायकल दुसर्या कोणाची निघाली.सायकलला नंबर प्लेट नसते त्याचा हा तोटा. कामावर असताना पहिल्यांदा मला एकाने प्रपोज मारलं, तेव्हा आपण त्याला 'कशाला नाही त्या फंदात पडतो.चांगला मित्र आहेस मित्र राहा,जास्त आगावूपणा केला तर नाक फोडीन'अशी सौम्य आवाजात धमकी दिली आयुष्यातली पहिली शिवी मी पैल्यानदा कामाला लागले त्याच्या दुसर्यादिवशी दिली.
ताई तुम्ही पुण्यातल्या हुज्जुरपागे च्या वाटत नाही .
.पण माझ लग्न इतक्या झटपट झाल नाही. मला बघायला बरीच मुल आली ,म्हण्जे हाफ सेन्चुरी तरी नक्की झाली असाल.पण एकानीपण मझ्याकड डोळे वर करून बघितलं न्हायी.वर काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर विचार अस कोण मोठ्या व्यक्तीन सांगितलं तर ते नाव विचारायचे न गप्प बसायचे.मी मात्र आधीच मोठी प्रश्नावली करून ठेवलेली असायची.
तरीच ....

In reply to by मनीषा

तरीच बैंना पुरूष अगतिक आणि दीनवाणे वाटतात!! बाकी, मी ही कन्या शाळेतच शिकले असले तरी भाऊ आणि मित्रांमुळे बाहेरच्या जगात काय चालते याचे सामान्यज्ञान नक्कीच होते आणि आहे. असो. एका निरागसता न हरपलेल्या व्यक्तीने अतिशय निरागसतेने लिहिलेल्या धाग्याची निष्ठूर मनाच्या ( आणि स्त्री-पुरूष समानतेच्या धाग्यावर धागाकर्तीच्या प्रगल्भ विचारांची वाहवा केलेल्या) लोकांनी केलेली चिरफाड पाहून अंमळ गंमत वाटली.

In reply to by मस्त कलंदर

असो. एका निरागसता न हरपलेल्या व्यक्तीने अतिशय निरागसतेने लिहिलेल्या धाग्याची निष्ठूर मनाच्या ( आणि स्त्री-पुरूष समानतेच्या धाग्यावर धागाकर्तीच्या प्रगल्भ विचारांची वाहवा केलेल्या) लोकांनी केलेली चिरफाड पाहून अंमळ गंमत वाटली.
एका ठिकाणी मते पटली म्हणून सर्व ठिकाणी पटली पाहिजेत असे नाही. त्यातून दोन्ही विषयांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. आम्ही पाठींबा किंवा विरोध व्यक्त करतो ते मताला, व्यक्तीला नाही.

आमच्या शाळेत ८ वी पासून पुढच्या मुलांनी मुलींशी बोलायला अघोषित बंदी होती. म्हणजे लाईन/प्रपोज खेरीज इतर कारणासाठी बोलण्यास बंदी होती. ;)

आमच्या ही शाळेत ही बंदी "स्वयंघोशीत " होतीच. पण ती ९ पर्यंतच. ९ वी नंतर २/३ जोड्या जमल्या होत्या. आणि आम्ही मोठ्या धिटाईने मुलींशी बोलू लागलो होतो. १० मध्ये तर मुला-मुलींनी बोलणे काही विषेश राहीले नाही. आणि..... ९ पर्यंत "मुलीं" बद्दल जे (अती रंजीत-अतीअश्लिल )कुजबुजले जात होते , त्याची खूपच पातळी सुधारली. बोळा निघाला -पाणी वहाते झाले > - मला वाटते तो आमचा सखाराम गटणे अवतार होता.

काल झी मराठी अ‍ॅवॉर्डस २०१२ मधे ... शाळेला ५ पुरस्कार मिळाले... सर्वोत्कृष्ट लेखन, सर्वोत्कृष्ट पटकथा लेखन सर्वोत्कृष्ट संवाद सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट बालकलाकार = जोश्या.. ;-) आता बोला...

In reply to by अत्रुप्त आत्मा

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन म्हणून आणि जोश्याला बाल कलाकार म्हणून नव्हे तर जोशी आणि माटेगावकर दोघांनाही ज्यूरीचे अ‍ॅवॉर्ड अशी सात अ‍ॅवॉर्डस मिळाली आहेत.

>>जे सवांद आहेत ते नववीतल्या मुलांच्या तोंडी शोभतील असे नक्कीच नव्हते आमच्या शाळेतले नववीचे संवाद एकून बरेच मास्तर , मॅडम झीट येउन पडल्याचा इतिहास आहे..त्या मानाने संवाद चांगले होते म्हणायचे

In reply to by कपिलमुनी

कपिलशी बाडीस (मुनीवर्यांसारखेच अनुभव असलेला)

सगळीकडे 'शाळा'चा फार उदोउदो चालला होता म्हणून बघितला.सुरुवातीलाच डोक्यात गेला. चित्रपट सुरुवातीलाच डोक्यात जाण्याचे काय कारण? सुरुवात काही भीषण नाही आहे, चित्रपट अति सुंदर नाही हे मान्य कारण तो पुस्तकाला योग्य न्याय देत नाही. पण तरीही त्यात डोक्यात जाण्यासारखे काहीच नाही मी पुस्तक वाचल नाहीये,त्यामुळे मूळ पुस्तकाचा विषय मला माहित नाही. चित्रपट पुर्णतः पुस्तकावर बेतलेला आहे. पण इथे तर पूर्ण चित्रपट विषयावरच बनवलाय. चित्रपट विषयावरच बनवावेत अशी अपेक्षा असते, बिनविषयाचा चित्रपट कसा बनवायचा? तश्या तर फक्त पॉर्नफिल्म्स बनवता येउ शकतात. अर्थात त्यातही थोडा विषय असतोच म्हणा. नववीतल्या मुलांच्या मानाने आणि शाळा या नावाचा विचार केला चित्रपटात शाळेचा फळा आणि वर्ग एवढंच आहे.बाकी शाळेची मुल,त्यांची टिंगल टवाळी कॉलेजमधल्या मुलांसारखीच आहे. तुम्ही शाळेत नक्कीच कधीही गेला नव्हता आणि गेलाच असाल चुकुन माकुन तर कॉलेजात तर नक्की गेला नव्हता. आमच्या शाळेत एका विद्यार्थ्याने एका विद्यार्थीनीची आठवीत असताना छेड काढली होती (म्हणजे जबरदस्तीने चुंबन घेतले होते). त्याला त्या मुलीच्या पाया पडुन माफी मागण्याची शिक्षा झाली. त्यावेळेस त्या मुलीने स्कर्ट घातला होता. पाया पडुन झाल्यावर त्या विद्यार्थ्याने जी प्रतिक्रिया दिली ती ऐकुन मला आजही किळस वाटते. शाळा मध्ये दाखवलेले प्रसंग खरोखर निरागस आहेत त्या मानाने. आणि प्रातिनिधिक आणि वास्तव तर नक्कीच आहेत. त्यातला म्हात्रेनि बर्याच ठिकाणी ' भें....' हि शिवी वापरलीये.तेव्हा सेन्सोर बोर्ड वगैरे काही खरच अस्तित्वात आहे का असा प्रश्न पडला होता. आम्ही शाळेत् असताना शिव्याच्या भेंड्या खेळल्याची आठवण आहे मला. मला त्या काळी किमान १०० एक शिव्या पाठ होत्या. त्यातील काही युनिक होत्या. भेंड्या खेळताना उपयोगी पडायच्या. माझ्यापेक्षा वर्गातल्या ९०% मुलांचा शब्दसंग्रह खुपच भारी होता हेही नम्रपणे नमूद करु इच्छितो. वर्गात शिवी न देणारे फारतर २-३ मुले होती. ती शिव्या न देणारी होती म्हणजे दर दूसर्‍या वाक्याला शिवी द्यायची नाही. अन्यथा भें*द, भिका**द, माद**द, **व्या, आ**ल्या, आ**व्या, *डु, अच्चीत गच्ची......, ल्*ड्या आणि अश्या अनेक शिव्या खुपच कॉमन होत्या. आमच्या शाळेतली किमान ५-७ मुले दरवर्षी बॉर्डात यायची आणि आमच्या ३-४ वर्ष आधीच्या बॅच मधला मुलगा बॉर्डात पहिला आला होता. आमची तुकडी शाळेतली सर्वात हुषार तुकडी होती. यावरुन वर्गात कश्याप्रकारची मुले होती आणि शाळा कशी होती याचा थोडाफार अंदाज येइल. आज वर्गातली ८०% मुले / मुली उत्तम पदांवर काम करत आहे अथवा अतिशय उत्तम शैक्षणिक अर्हता बाळगुन आहेत. एका दृश्यात शाळेतली मुलं तोंडातून लाळ गळेल एवढा मोठा आ करून त्यांच्या पाठमोर्या बाईंकडे बघत आहेत. मी लाळ गळालेली मुले बघितली आहेत. शाळेत असताना. अजुनही भन्नाट नमुने आमच्या शाळेत होते. वाचलेत तर तुम्ही तुमच्या मुलांना हिमालयातल्या मठातच शिकवायला पाठवाल बहुधा. जोशीच प्रेमपत्र,शिरोडकरच घर शोधून काढण्याची ट्रिक बघता अस वाटत कि त्याला आधी खूप अनुभव आहे अस आहे. याला अनुभव लागतो? अरेरे. आठवीतली मुले करायची हो आमच्या शाळेत हे सगळे आणि आम्हीही हे अनुभव नसतानाच केले आहे (त्यावेळी आम्ही शाळेत नव्हतो ही गोष्ट वेगळी) (कदचित हि सगळि त्याच्या मामाचि शिकवण असावी) असेलही. पणा या गोष्टी शिकवायला लागत नाहीत हो. मुले आपसूक शिकतात. लग्न झालेल्या लोकांना कश्या काही गोष्टी अनुभव नसतानाही व्यवस्थित जमतात. तसेच. जे सवांद आहेत ते नववीतल्या मुलांच्या तोंडी शोभतील असे नक्कीच नव्हते.मुलं कॉलेजमध्ये आहेत अस दाखवलं असत तर चित्रपट बघण्याजोगा झाला असता. कंबख्त तुने पिहीच नै च्या धर्तीवर कंबख्त तूने शाळा मे पढ्याच नै असे दुर्दैवाने म्हणावे लागते आहे. म्हात्रे नि एका मुलीला सरळसरळ 'लाईन देतेस' का अस विचारलय. खरेच सांगतो आमच्या वर्गातली मुले (आणि मुली सुद्धा) याच्या खुप खुप पुढे गेले होते हो. वरती एक उदाहरण तर दिलेच आहे. आमच्या वर्गात काही जोड्या होत्या. ही आठवी नववीतली गोष्ट. ही मुले मुली सायकलवर डबलसीट फिरायची. कदाचित काही चाळेही केले असावेत कारण याची तक्रार मुख्याध्यापकांकडे गेली होती. एका बाइंनी वर्गात येउन यावर मुलांचे बौद्धिकही घेतले होते. फरक काहीच पडला नाही ही गोष्ट वेगळी. त्याचा सुजलेला चेहरा बघून आनंद वाटला.पण कस बदडलं हेदेखील दाखवलं असत तर आत्म्यास शांती मिळाली असती(आणि चालू पिढीला धडा). अरेरे. सुदैवाने असे काही आमच्या शाळेत झाले नाही. नाहितर अर्धी मुले (आणी काही मुलीदेखील) रोज सुजलेल्या चेहर्‍याने वर्गात बसली असती. ;). बाकी तुमच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी खुपच विचित्र कारण लागते आहे हे बघुन मनाला क्लेष झाले. जोशीच्या वडिलांचं ह्या अडनिड वयातल्या मुलांना समजून घेतलं पाहिजे हे कळतंय.पण ते जरा जास्तच कुल वाटत. ते खुपच स्वाभाविक आणि समतोल वाटले. माझ्या पिढीमधील माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि मित्र (वय २६ ते ३०)यांचा प्रतिसाद 'काहीही चित्रपट बनवतात!आमच्या शाळेत नव्हत अस काही.याला कसे काय मिळाले पुरस्कार?'असंच होता. माझ्झ्यानंतर एका वर्षाने बाहेर पडलेली पिढी वाया गेली (किंवा शाळेत गेलीच नाही) असे दुर्दैवाने म्हणावे लागते आहे. पण एवढे नक्की की आजची पिढी आमच्या १५ -२० पावले पुढे आहे. माझ्या १५ वर्षाच्या पुतण्याच्या आत्तापर्यंत आम्हाला ज्ञात असलेल्या ४ गर्लंफ्रेंड्स होउन गेल्या आहेत. त्यातली जी शेवटची आहे तिने त्याला " आर यु व्हर्जिन?" असा प्रश्न एसेमेस द्वारा विचारला होता. त्याने "ऑफकॉर्स" असे उत्तर दिलेले पाहुन वहिनेने निश्वास सोडला. भावाची आणी वहिनीची इतकीच माफक इच्छा आहे की त्याने जे काही करावे ते घरी सांगावे. बादवे वहिनीची होउ घातलेली ( या वेगाने पुतण्या गर्लफ्रेंड्स बदलतो आहे त्या वेगाने ती सून होइल की नाही देव जाणे) सून सध्या १४ वर्षांची आहे. ओळखीमध्ये अजुन एक असेच कुटुंब आहे ज्यांच्या १४ वर्षाय मुलीच्या बेडरुम मधुन एक दिवस वापरलेला गर्भनिरोधक सापडला होता. तिचे आईवडील अजुन मुलीला याबद्दल स्पष्टीकरण विचारावे की नाही याचा विचार करत आहेत. तिला २ वर्षापासुन बॉयफ्रेंड आहे हे तर त्यांना माहितीच आहे घरी आल्यावर जाणवले कि आजूबाजूच्या मुलांमध्ये म्हण्जे नववी ते कोलेज ह्या मुलांना हा चित्रपट प्रचंड आवडलाय.म्हण्जे 'सोलिड आहे ,कडक आहे,जबरा आहे.' पण थोडी मोठी म्हण्जे जोब करणारी,लग्न न झालेली यांनाहि हा चित्रपट आवडला नव्हता. मी वय वर्षे ३० पुर्ण. विवाहीत असे जाहीर नमूद करु इच्छितो की चित्रपट चांगला आहे किमानपक्षी बरा तर नक्कीच आहे. पण या चित्रपटात ज्या गोष्टी आपल्याला आक्षेपार्ह वाटल्या त्या चित्रपटात ज्या पुस्तकातुन उचलल्या आहेत ते पुस्तक केवळ अप्रतिम असे आहे. माझे सर्वात आवडते पुस्तक आहे आणि वय वर्षे २१ ते ४५ ( बिका तुमचे वय काय हो?) मधल्या अगणित व्यक्तींनी मला असाच अभिप्राय दिला आहे. तुम्हाला काय वाटत? मला असे वाटते की तुमचे सगळेच्याअ सगळे मुद्दे प्रचंड चुकीचे आहेत.

In reply to by मृत्युन्जय

=)) बा मृत्युंजया! दंडवत रे बाबा! जे करायचं मी टाळलं ते तू केलंस! असंच सविस्तर लिहायचं होतं. पण जाऊ दे म्हणलं! प्रतिसाद आवडला (एक अनावश्यक प्रश्न सोडून. ;) ) इथेच एकांशी व्यक्तिगत चर्चेत म्हणलं तसं... या विषयावर लिहायचं म्हणलं तर खूप लिहिता येईल. या धाग्याची लिंक वर्गमित्रांना पाठवतो आहे. सामुहिक मनोरंजन सेशन होऊ शकते.

In reply to by मृत्युन्जय

>>>मला असे वाटते की तुमचे सगळेच्या सगळे मुद्दे प्रचंड चुकीचे आहेत. हे वाचेपर्यंत किचेनति शुद्धीवर तरी असायला हव्यात रे मृत्यूंजया... अरे लोकांची लग्नं लावतात रे . त्या 'असणं' आवश्यक आहे रे! उगाच प्राब्लेम नको करु. एवढं प्रतिसादास्त्र फेकून पटकन फट म्हणता... (ब्र म्हणता चा कॉपीराईट गविंकडे गेलाय म्हणे! ) निरागस आहेत रे त्या! त्यांना आपलं म्हणा आणि सगळे मिळून संत तुकाराम ला चला. ;)

In reply to by प्यारे१

@त्यांना आपलं म्हणा आणि सगळे मिळून संत तुकाराम ला चला. >>> प्यारे १ यांचा स्फोटक हापटबार... मेलो मेलो ...रे प्यार्‍या... दुष्टा...कुठे फेडशील ही पापं...?

In reply to by मृत्युन्जय

आमचा दंडवत कबूल करावा... तुम्ही सांगितलेले सद्यप्रसंग अजून फार कमी प्रमाणात होत असावेत अशी अपेक्षा आहे. :(

माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि मित्र (वय २६ ते ३०)यांचा प्रतिसाद 'काहीही चित्रपट बनवतात!आमच्या शाळेत नव्हत अस काही
हाय कंबख्त तुने पी ही नही! :-) बाकी मृत्युन्जयाशी बाडीस.

ये धत्तड तत्तड धत्तड तत्तड..१०० पार झाले!!!!! आता येक अभिनंदनाचा ठराव पास करावा लवकरात लवकर ;)

आमच्या शाळेत नव्हत अस काही.
किचेन, तुमच्या शाळेत असलं काही नव्हतं म्हणजे काय कुठल्याच शाळेत असलं काही नव्हतं असं म्हणायचंय काय? आम्ही शाळामधले सर्व प्रसंग स्वत: अनुभवले आहेत. अगदी "लाईन देतेस का?" असे विचारण्यापर्यंत! कधी कधी मला वाटते की माझ्या शालेय जीवनावर आधारितच शाळा कादंबरी लिहीली आहे काय?

चित्रपट पाहीलेला नाही.. मात्र कादंबरी प्रचंड आवडलेली आहे. शाळेबद्दल बोलायचं झालं, तर गावच्या शाळेत काही पोरं अक्षरशः ३-४थी पासून शिव्या द्यायला लागली होती.. खेड्यात हे लै कॉमन असतं. चित्रपटात "ढवळ्या-पवळ्या" म्हणून बैलांना हाका मारणारा शेतकरी प्रत्यक्षात त्यांना अश्या शेलक्या शिव्या घालतो की समजल्या तर बैल मरेल.. :p पाचवीनंतर नवोदय विद्यालयात असल्याने शिव्या-बिव्या कमी झाल्या थोड्या वर्गातल्या.. (मास्तरं भयंकर म्हणून..) पण पोरांचं लाईन मारणे सुरु असायचं .. आता "लाईन देतेस का?" हे विचारायची हिंमत नव्हती कोणात. पण पोरींना पण कळायचं की त्यांच्यावर लाईन मारल्या जातेय.. आठवीत वगैरे "ह्याची ती, त्याची ती" हे सुरु झालं होतं. नववी/दहावीत पोरांना भुगोलच्या बाईंच्या भुगोलातपण आवड निर्माण व्हायला लागली होतीच.. ह्या असल्या सगळ्या अनुभवांमुळे मला तरी कादंबरी अजिबात अतिरंजीत वाटली नाही, उलट खुप नैसर्गिक ओघवती वाटली.. (पहीली लाईन इयत्ता ८ मध्ये मारलेला) चिगो..

आमच्या शाळेतली पोर. कादंबरीतल्या पोरांपेक्षा बरीच पुढारलेली होती. लाइन देते का वगैरे विचारणे हा प्रघात होता. टोळ्या करून मार्‍यामार्‍या करायची पद्धत होती. गुट्खा दारू वगैरे गोष्टी ही तुरळक प्रमाणात होत्याच. पण शाळा चित्रपट आणी कादंबरी त्याविषयी नाही....... विषय हुजुरपागेला समजलेला नाही.