Skip to main content

शाळा?

लेखक किचेन यांनी शनिवार, 24/03/2012 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
सगळीकडे 'शाळा'चा फार उदोउदो चालला होता म्हणून बघितला.सुरुवातीलाच डोक्यात गेला.मी पुस्तक वाचल नाहीये,त्यामुळे मूळ पुस्तकाचा विषय मला माहित नाही.पण इथे तर पूर्ण चित्रपट विषयावरच बनवलाय.नववीतल्या मुलांच्या मानाने आणि शाळा या नावाचा विचार केला चित्रपटात शाळेचा फळा आणि वर्ग एवढंच आहे.बाकी शाळेची मुल,त्यांची टिंगल टवाळी कॉलेजमधल्या मुलांसारखीच आहे. त्यातला म्हात्रेनि बर्याच ठिकाणी ' भें....' हि शिवी वापरलीये.तेव्हा सेन्सोर बोर्ड वगैरे काही खरच अस्तित्वात आहे का असा प्रश्न पडला होता.एका दृश्यात शाळेतली मुलं तोंडातून लाळ गळेल एवढा मोठा आ करून त्यांच्या पाठमोर्या बाईंकडे बघत आहेत.जोशीच प्रेमपत्र,शिरोडकरच घर शोधून काढण्याची ट्रिक बघता अस वाटत कि त्याला आधी खूप अनुभव आहे अस आहे.(कदचित हि सगळि त्याच्या मामाचि शिकवण असावी) जे सवांद आहेत ते नववीतल्या मुलांच्या तोंडी शोभतील असे नक्कीच नव्हते.मुलं कॉलेजमध्ये आहेत अस दाखवलं असत तर चित्रपट बघण्याजोगा झाला असता.म्हात्रे नि एका मुलीला सरळसरळ 'लाईन देतेस' का अस विचारलय.त्याचा सुजलेला चेहरा बघून आनंद वाटला.पण कस बदडलं हेदेखील दाखवलं असत तर आत्म्यास शांती मिळाली असती(आणि चालू पिढीला धडा). जोशीच्या वडिलांचं ह्या अडनिड वयातल्या मुलांना समजून घेतलं पाहिजे हे कळतंय.पण ते जरा जास्तच कुल वाटत. माझ्या पिढीमधील माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि मित्र (वय २६ ते ३०)यांचा प्रतिसाद 'काहीही चित्रपट बनवतात!आमच्या शाळेत नव्हत अस काही.याला कसे काय मिळाले पुरस्कार?'असंच होता.घरी आल्यावर जाणवले कि आजूबाजूच्या मुलांमध्ये म्हण्जे नववी ते कोलेज ह्या मुलांना हा चित्रपट प्रचंड आवडलाय.म्हण्जे 'सोलिड आहे ,कडक आहे,जबरा आहे.' पण थोडी मोठी म्हण्जे जोब करणारी,लग्न न झालेली यांनाहि हा चित्रपट आवडला नव्हता. तुम्हाला काय वाटत?

वाचने 18519
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

संपादित. काहितरिच काय??????????//

In reply to by VINODBANKHELE

तुम्ही शक्यतो श्यामची आई, शेजारी, संत तुकाराम, हळद रुसली कुंकू हसले, ताईची माया, हेच माझे माहेर, ताईच्या बांगड्या, पंढरीची वारी, शाब्बास सुनबाई, कर्ज कुंकवाचे, हिरवा चुडा असे चित्रपट पाहात चला. म्हणजे तुम्हाला, आम्हाला आणि आंतरजालाला सगळ्यांनाच शांती.

In reply to by बॅटमॅन

पण ते नाव 'अलका बुकल' असे आहे ह्याची नोंद घ्यावी. काही लोक 'अलका कुबट' असा देखील उच्चार करतात. आकाशातला बाप त्यांना क्षमा करो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आँ??? आवो अलका बुकल हे नाव म्हंजे लैच विसंगत वाट्टंय पहिलि गोष्ट आन ह्ये बगा... http://www.imdb.com/name/nm2453174/ आययेमडीबी वालेबी कुबलच म्हंत्यात म्हून म्हन्लो वो...आता आम्ची चूक आसंल तर मापी करा पर बाईंचे पिच्चर दावू नगासा, हात जोडतो :P

चित्रपट आवडला नाही पण वरचे एकही कारण त्याला लागू होत नाही. मूळ पुस्तकाचा मी फार मोठा fan आहे आणि हा चित्रपट मी पाहिलेला सर्वात वाईट adapted screenplay होता.......

चित्रपट मलाही फारसा नाही आवडला पण तो वेगळ्या कारणांनी. तुम्ही जे लिहिलंय त्यावरून तुम्हीच बेंद्रे बाई असल्याचा दाट संशय येवू लागलाय. ता.क. तुम्ही कधीही चुकूनसुद्धा पुण्यातल्या भावे स्कूल च्या आसपास फिरकू नका. जायचेच असेल तर कांदा जवळ ठेवा. घेरी आल्यास लोकांना उगाच धावपळ नको.

In reply to by इष्टुर फाकडा

माझा भाऊ होता भावे हायस्कूलमध्ये.एकदा रिक्षावाले काका येणार नव्हते म्हणून बाबा त्याला शाळेतून आणायला गेले.पुढच्या वर्षी भाऊ पाचगणीला होस्टेलला होता. ;) अवांतर: तुमची सही आवडली.बरेच दिवसंनी हकुना मटाटा ऐकायला मिळाल.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिका, तुम्ही कंच्या शाळेत व्हता.........आणि तेव्हा तुमचा वयोगट कोणता होता म्हणायचा...! :) -दिलीप बिरुटे

In reply to by बिपिन कार्यकर्ते

छ्या हो, बिका... हे अपवाद आहेत. म्हणूनच, पिढी उत्तम आहे. तिला काय नाकारायचं हे या अपवादातून कळतं. म्हणून आपण या अपवादांचे आभारी राहिलं पाहिजे. या पिढीची काळजी अजिबात करू नये.

In reply to by श्रावण मोडक

पिढी उत्तम आहे. तिला काय नाकारायचं हे या अपवादातून कळतं. म्हणून आपण या अपवादांचे आभारी राहिलं पाहिजे. या पिढीची काळजी अजिबात करू नये.
+१, मोडकमास्तर, ह्या बाबतीत तुमचा आणि माझा मत जुळतां हां :) - छोटा डॉन

In reply to by बिपिन कार्यकर्ते

गंडले कसे काय म्हणता येईल ? असो, २ गोष्टी सांगतो. दुसरी गोष्ट, अपवाद असतात आणि आपण अपवादांचे आभारी राहिले पाहिजे ( संदर्भ : मोडकांचा प्रतिसाद) आता पहिली गोष्ट, आम्ही अपवाद वगैरे नाही आहोत. - छोटा डॉन

In reply to by बिपिन कार्यकर्ते

>>२६ ते ३० या वयोगटातल्या पिढीची खूप काळजी वाटते आहे! -१ आमची काळजी करण्यासारखे काही नाही, आपल्यापेक्षा १०-१२ वर्षांनी लहान असलेल्या पिढीची काळजी वाटणे हा मानवी स्वभाव आहे, तुम्ही नका काळजी करु ;) बाकी शाळा हा पिक्चर एक स्वतंत्र चित्रपट म्हणुन चांगला होता, आधी पुस्तक वाचले असेल तर आवडण्याची खात्री नाही. ( १६ ते २० या वयोगटातल्या पिढीची खूप काळजी वाटणारा) छोटा डॉन

In reply to by बिपिन कार्यकर्ते

२६ ते ३० या वयोगटातल्या पिढीची खूप काळजी वाटते आहे!
वडिलकीच्या नात्याने या पिढीची काळजी वाटत असल्यास हरकत नाही, पण उगाच 'खूप काळजी' वगैरे करण्याचं काही कारण नाही ;) शाळा हा विषय सगळ्यांनाच भूतकाळातल्या गोड आठवणीत घेवून जातो म्हणून त्यावर जे दाखवलं जाईल ते सगळं चांगलंच असं नाही. मलाही तो चित्रपट अजिबात आवडला नाहीये (मी कादंबरी वाचलेली नाही हे देखील नमूद करून ठेवते). किचेनतैनी दिलेल्या कारणातली सगळी नाही पण काही कारणं मलाही पटतात.

"शाळा" पहायला चुकुनही जाऊ नका, सिनेमातली नटी सोडली तर त्या सिनेमात बघण्यासारख काहीही नाही. ;) "आत्ता एजंट विनोद बघतोय!" Smiley

कंच्या शाळेत गेल्ता म्हनं तुम्ही? बिकाशी बाडीस. :)
तुम्हाला काय वाटत?
१०० नक्की. ;)

खरतरं एक तत्व म्हणुन, मी वाचलेल्या साहित्यावर निघालेले चित्रपट बघायच टाळतो, सपक वाटतातं, पण तुम्ही जी कारण दिलीयेत, न आवडल्याची, ती म्हणजे तुमची शाळा फारच वरणभात होती असं वाटायला लावणारी आहेत. नववी दहावी सोडा, पाचवी सहावितच चिठ्ठ्या चपाट्या सुरु व्हायच्या, आज पासुन २० वर्षापुर्वी.. लाईन देतेस का हे विचारन तुम्हांला आवडल नाही हे समजु शकतो, पण ते त्या वयातल अर्धकच्च ज्ञान व उतु जाणारी उत्कंठा दाखवत.. बाकी आपण तरी शाळा कादंबरीचे जाम फअ‍ॅन आहोत..

In reply to by शैलेन्द्र

>>>पण तुम्ही जी कारण दिलीयेत, न आवडल्याची, ती म्हणजे तुमची शाळा फारच वरणभात होती असं वाटायला लावणारी आहेत. एक नम्बर सहमत आहोत आपण याच्याशी!!!

In reply to by बॅटमॅन

>पण तुम्ही जी कारण दिलीयेत, न आवडल्याची, ती म्हणजे तुमची शाळा फारच वरणभात होती असं वाटायला लावणारी आहेत +१

In reply to by शैलेन्द्र

आमच्या वेळी आयटमसाठी, "खडा" हा शब्द प्रचलीत होता. ६वी पासून पुढे जवळजवळ वर्गात सगळ्या मुलांना खडे असत. जी-एच तुकड्यात (शाळेत प्रत्येक इयत्तेत आठ तुकड्या होत्या. प्रत्येक वर्गात ७०-८० कार्टी!) असणार्‍या काही थोराड मुलांच्यातर (चांगल्या दिसणार्‍या) शिक्षीकाच खडा होत्या! ;)

In reply to by श्रावण मोडक

आणि पुष्कळवेळा आपल्यावर कोण कोण "मरतंय" हे खड्यांच्या गावीही असायचं नाही आणि एकच खडा असलेली मुलं इकडं हक्कावरून मारामार्‍या करत! :)

’उद्या भेटशील इथे’ असं विचारणारा जोश्या आणि ” छे बाबा, आपल्याला नाही जमायचं तसलं काही’ असं म्हणणारी लाज-या शिरोडकरचा प्रसंग जसा आवडला तसा ’ए आपल्याला लाइन देते का’ प्रश्नाच्या उत्तराने नर्व्हस झालेला म्हात्रे तर कितीतरी आवडला. बाकी, पसंद अपनी, खयाल अपना....! :) -दिलीप बिरुटे

चित्रपट खूप चांगला जमला आहे. ९ वी मधल्या मुलांच्या (मुलींच्या नसेल कदाचित) वयाला साजेशी भाषा. चित्रपटामध्ये फक्त "लाईन मारणे " व त्या अनुषंगाने येणारी भाषा एवढेच दिसले असेल तर ईलाज नाही. मला तर जोश्याचा "एकटयाने" दहावीला जाण्याचा "आकांत" विशेष भावाला. मुलांमध्ये त्या वयात असणारे शारीरिक/मानसिक आकर्षण हे जर आपण स्वीकारले तर बरे. अन्यथा असे धक्के बसणारच.

In reply to by तर्री

सह्यमत..हाय मी तर्री ताई..पण फक्त सीन्स चे ट्युनिंग नाही जमले..पुस्तक न वाचता पिक्च्र पाहिल्यास किचेन ताई सारखी अवस्था होणे नाकारता येणार नाही...

शाळा नै आवडला????????? नै तर नै पण धिक्कार?????? कैच्याकै बरं का!!!! किचेनतै व्हिक्टोरियन काळातील कन्याशाळेत होत्या की कै??? आणि भाषा म्हणाल तर नववीतल्या नॉर्मल मुलांच्या तोंडात अशी भाषा सर्रास असते. भेन*** वगैरे नसतीलही पण शिव्या सर्रास वापरतात ९वितिल पोरे..आणि शिरोडकर चे घर शोधून काढायची ट्रिक काही जेम्स बॉंड सारखी भारी नव्हती..आणि जोश्याने काहीही केले नव्हते, सो त्याचे वडील हे कूल असणारच की..आणि सुर्‍याला कसे बदडले असते ते दाखवायला पाहिजे होते वगैरे वगैरे तद्दन हिंसक विचार वाचून एक (नवीन) मिपाकर म्हणून शरम वाटली :P

In reply to by बॅटमॅन

आणि सुर्‍याला कसे बदडले असते ते दाखवायला पाहिजे होते वगैरे वगैरे तद्दन हिंसक विचार वाचून एक (नवीन) मिपाकर म्हणून शरम वाटली
बॅटमॅन यांना मिपाचे ग्रीनकार्ड* देण्याची विनंती केली जाते. एवढ्या लवकर ग्रीनकार्डला पात्र झाल्याबद्दल बॅटमॅन यांचा कला दालनात विशेष सत्कार केला जावा असाही प्रस्ताव मांडतो. * युद्ध झाल्यास मी माझ्या जुन्या देशबांधवांना गोळ्या घालण्यास कचरणार नाही अशी शपथ खाण्याची गरज नाही ;-)

In reply to by यकु

थँक्यू थँक्यू यकु :) एका *नव्या जाणीत्या मिपाकराने हरितपत्र आणि सत्काराची शिफारस केल्याबद्दल एक(नवीन)मिपाकर म्हणून आनंदाने ऊर भरून आला :) *मिपावर ४.५ वर्षे झाल्याखेरीज "जुने जाणीते" असे स्टेटस नै मिळत असे अधिकृत सूत्रांकडून कळाले, सबब जुन्या च्या जागी नव्या अशी दुरुस्ती केल्या गेली आहे. जाणीत्या च्या जागी मात्र जाणतेपणाने बदल नै केला :P

किचेन मावशी , तुम्ही हुजुरपागेत गेला होतात ना ? कन्याशाळा आहे ना ती ? मग ठीक आहे. एक काम करा, तुमच्या भावाला / पतीदेवांना विचारा पहिली शिवी कितवीत असताना दिली, नववीत येईपर्यंत किती शिव्या देत होतात, कुठल्या कुठल्या, मित्र कसकसल्या शिव्या देत होते. सर्व बाईंकडे तुम्ही आचार्य देवो भव नजरेने पाहत होतात का ? मुलींचा पाठलाग तुम्ही किंवा तुमच्या वर्गातल्या कुणी केला आहे काय? प्रपोज मारला आहे काय ? या सर्व प्रश्नांची तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळाली तर सदर व्यक्ती साफ खोटे बोलते आहे असे समजायला हरकत नाही. आपले भावविश्व छोटे असेल तर शाळा अतर्क्य वाटणारच हो. असो, शाळा बघितलात ते ठीक आहे. पण त्यावर जाहीर नकारार्थी टिप्पणी केलीच आहेत तर तुझे आहे तुजपाशी मधील एक संवाद सांगतो, "न पेलणाऱ्या गोळ्या घेऊ नयेत बेटा" ;-) (शाळेत, ते पण फक्त मुलांच्या शाळेत गेलेला) विमे

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विमे, अरे जगातली संपत चाललेली निरागसता जपायचा वसा घेतलाय त्यांनी. त्यामुळे उद्या त्यांनी खालीलप्रमाणे काही अटी घेऊन जनहितयाचिका दाखल केली तर नवल नाही. १) नववी-दहावीतल्या मुलांनी शिव्या अजिबात देऊ नयेत, कॉलेजात जाणार्‍यांनी माताय वैगरे अशा सौम्य शिव्या दिल्या तर चालतील. २) लाईन देतेस का हे विचारण्याचा हक्क हा फक्त कॉलेजात जाणार्‍या मुलांना असेल. ते विचारतानाही भाषेत निरागसता हवी. जसं की, 'हे वर्गभगिनी तुला पाह्यलं की माझं ब्लडप्रेश्शर थोडंस्सं लो आणि थोडंस्सं हाय होतं. तुझ्या माता पित्यांना मी आयुष्यभरमामा-मामी म्हणावं अशी माझी इच्छा आहे. तुला हे मान्य आहे का ?' ३) सर्व मराठी शिनेमांमध्ये जिथे नायक नायिकेचा पाठलाग करतोय असे दृश्य असेल तो शिनेमा फक्त अठरा वर्षांवरील मुलांनी पाहावा, बारा ते सतरा वयोगटातील मुलांनी असे शिनेमे पालकांच्या देखरेखीखाली बघावेत. मुलींनी असे शिनेमे बघूच नयेत, त्यांच्या निरागस बालमनावर वाईट परिणाम होईल ( पाह्यचेच असतील तर आपण हुजूरपागेत शिकत नसल्याचा पुरावा आणावा). पुढील अटी क्रमशः

In reply to by सूड

@'हे वर्गभगिनी तुला पाह्यलं की माझं ब्लडप्रेश्शर थोडंस्सं लो आणि थोडंस्सं हाय होतं. तुझ्या माता पित्यांना मी आयुष्यभरमामा-मामी म्हणावं अशी माझी इच्छा आहे. तुला हे मान्य आहे का ?'>>>

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुझ्या माता पित्यांना मी आयुष्यभर मामा मामी म्हणावे ....हे काय भलतच ! सासू-सासर्‍यांना मामी- मामा म्हणतात . शरद

In reply to by शरद

ते हुजूरपागेतल्या मुली ओळखण्यासाठी आहे. त्या असं करेक्शन सुचवतील. बाकीच्यांना समजेल मुलगा नक्की काय म्हणतोय ते.

In reply to by सूड

'हे वर्गभगिनी तुला पाह्यलं की माझं ब्लडप्रेश्शर थोडंस्सं लो आणि थोडंस्सं हाय होतं. तुझ्या माता पित्यांना मी आयुष्यभरमामा-मामी म्हणावं अशी माझी इच्छा आहे. तुला हे मान्य आहे का ?' आई आई गं... मेलो हसून हसून :D :D :D

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

हुजूरपागा वेगळी आणि कन्या शाळा वेगळी.उगीच हुजुरपागेला कन्याशाळा म्हणून हुजुरपागेचा अपमान करू नका. तुम्हाला मुलींची शाळा अस म्हणायचं का?

In reply to by किचेन

कन्याशाळा म्हणजेच मुलींची शाळा (आमच्या शाळेत शिकवल्या गेलेल्या मराठीनुसार). आता तुमच्या पुण्यात एखाद्या शाळेचेच नाव कन्याशाळा असेल आणि ती शाळा तुमच्या हुजुरपागेची रायव्हल असेल तर माझा नाईलाज आहे.

शाळा ह्या कादंबरी असलेलेल्या सूचक उल्लेखातून हे वर्णन डोंबिवली मधील एका शाळेचे आहे हे सहज कळून येते. स वा जोशी ह्या शाळेचे हे बहुदा वर्णन आहे. आणि डोंबिवली मध्ये आगरी मुलांना ब्रिटीश ह्या नावांनी ओळखले जाते. मूळ रहिवाशी असल्याने १९७० च्या दशकात आपल्या जमिनी वर स्वतः बिल्डर होऊन इमारती बांधल्या .पुढे आलेल्या पैशातून जीवाची डोंबिवली केली. बिनधास्त वृत्ती ,तोंडात शिव्या मात्र मालवणी भाषे इतकीच गोड आगरी भाषा आणी तिचा लहेजा ( तकिया कलाम म्हणजे रागात , पोकल बांबूंचे फटके हानीन. मात्र मित्रांसाठी काहीपण करायची तयारी असायची: हास्य सम्राट मध्ये जॉनी इलावार ह्या ब्रिटिशाने ही भाषा तमाम महाराष्ट्रात लोकप्रिय केली. तर आमच्या शाळेत सातवीत माझी ब्रिटीश कंपू सोबत नाळ जोडल्या गेली. तेव्हा आलेले अनुभव , व मिळालेली शिकवण पाहता म्हात्रे हा फारच सोबर म्हणायच्या. पुढे ८ वीत १०० मार्कचे संस्कृत घेतल्याने अ वर्गात आमची वर्णी लागली. तेथे एकही ब्रिटीश नव्हता. मात्र आमच्या शाळेतील स्वयं घोषित भाई माननीय पाटील ह्यांनी त्यांच्या मानलेल्या बहिणीला दुसर्या शाळेतील मुलांने चिट्ठी बळजबरीने दिली म्हणून भर रस्त्यात बेदम चोपले. पुढच्या वर्षी त्यांना आमच्या वर्गातील मुलींनी रक्षा बंधन च्या दिवशी राखी बांधून मानलेला भाऊ बनवले. आणि आमच्य वर्गात पालक सभेत एका मुलीच्या आईने शिक्षिका आणि त्यांच्या ड्रेस कोड संबंधी लेखी तक्रार केली होती: हे तिने आम्हाला खूप वर्षांनी दिवाळी नरकचतुर्दशी च्या दिवशी फडके रोड वर वर भेटल्यावर सांगितली होती: त्या दिवशी मोर्दन केफे मध्ये आमचा वीस जणांचा ग्रुप जमला होता: शाळेच्या जुन्या आठवणी ह्या सदराखाली आठवणी उफाळून आल्या होत्या: आमच्या वर्गातील एका हुशार मुलाला वर्गातील मुलीने एक प्रेम पत्र लिहिले: आता बोर्ड फाडून येणे ही महत्वाकांक्षा असल्याने त्याने तिला चक्क नकार कळविला: तेव्हा तिने जीवाचे बरे वाईट करायच्या विचार मैत्रिणी कडे बोलून दाखवला होता: सदर किस्सा जेव्हा हॉटेलात त्या मैत्रिणीने सांगितला: तेव्हा आमच्या हुशार मित्राच्या चेहऱ्यावरील भाव जणू वीस जणांचे बिल स्वतःला द्यावे लागणार असे होते: तो बिचारा एखाद्या मानलेल्या ताई कडे दाद सुद्धा मागू शकत नव्हता: तात्पर्य ह्यातील बहुतेक सर्व प्रसंग हे वस्तू स्थिती शी इमान राखून आहेत: असे मला तरी वाटते बाकी वर्गात एकही प्रेम प्रकरण नव्हते कारण सर्व मुलांचे प्रेम दहावींची अंतिम परीक्षा होते आणि ह्या मार्क मिळवण्याच्या जीवघेण्या स्पर्ध्धेत आमच्या तारुण्य सुलभ भावना केव्हाच राख झाल्या होत्या: त्या मुलीला मात्र आपला सलाम साला नरु मामा बरोबर बोलतो अश्या मुलींना आपण मदत करायला हवी:

In reply to by निनाद मुक्काम …

च्यामायला.. तुझ नी माझ गोत्र एकचं.. हे वर्णन डोंबिवलीतलच आहे, जोशी हायस्कुलचं.. आज मी जोशी हायस्कुलाशेजारीच राहतो, पण शिकलो स्वामी विवेकानंदला.. गोपाळनगर.. बाकी विद्येचे माहेरघर वगैरे असलेली, डोंबिवली यातही मेरीट्वर आहे.. आमच्या शाळॅत पाचवी सहावीपासुनच प्रकर्ण होती, आठवीच्या पेंडसे बाई आठवुन आजही उसासे टाकतात आमचे वर्ग मित्र.. आणि भें--- वगैरे तर फरच कॉमन..

In reply to by शैलेन्द्र

च्यामायला.. तुझ नी माझ गोत्र एकचं.. हे वर्णन डोंबिवलीतलच आहे, जोशी हायस्कुलचं.. आज मी जोशी हायस्कुलाशेजारीच राहतो, पण शिकलो स्वामी विवेकानंदला.. गोपाळनगर..
च्यामारी ... आपल्या तिघांची गोत्रे जुळली म्हणा हो... आणि योगायोगाने मी डोंबिवलीच्या स. वा जोशी शाळेचा विद्यार्थी आहे.. त्यामुळे हा चित्रपट माझ्या शाळेला गृहीत धरून काढला असल्याने तो अगदी 'कसाही' असला तरीही कोमल कोपरा (soft corner) हा येतोच आहे. आणि चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, आमच्या स. वा जोशी शाळेत असे काहीही प्रकार घडलेले मला आठवत नाहीत.. (एक अपवाद सोडला तर..) .. त्याला अपवाद म्हणजे, दहावीच्या रिझल्टच्या दिवशी एका 'नाडर' नावाच्या (काठावर पास झालेल्या टपोरी) मुलाने एका मुलीला अखेरीस प्रपोज केलेच. आणि त्या मुलीने (त्याच्या) दुर्दैवाने नकार दिल्याने, 'नाडर ला नाही बोलली.. नाडर ला नाही बोलली ' अशी बातमीची लाटच संपूर्ण शाळेत पसरल्याचे दृश्य मी अनुभवलेय. इतकाच काय तो एक अनुभव शाळा या चित्रपटात साम्यदर्शी होता. आता या एका घटनेवर आधारित पूर्ण चित्रपट बनू शकत असेल तर काय माहित ब्वा... पण आमच्या शाळेत असे काहीही 'बेंद्रे' बाईना बघून लाळ गाळायचे प्रकार माझ्या तरी पाहण्यात आणि ऐकिवात नाहीत.. मुळात अशा बेंद्रे बाईच आम्हाला लाभल्याचे माझ्या लक्षात नाहीये.. :P

In reply to by बटाटा चिवडा

क्या बात हे. मी स्वामी विवेकानंद ( राणाप्रताप ) आणि नेहरू मैदान जवळ म्हणजे स्वामी विवेकानंद ( रामनगर ) च्या बाजूला रहायचो. माझा वर्गमित्र जो चेपू वर आहे त्याने त्यांच्या ब्लोग वर शाळेचे परीक्षण लिहिले होते. तेव्हा मी त्याला माझी शंका विचारली. आणि तो बोकील सरांच्या संपर्कात असतो. त्याने मला अनुमोदन दिले कि हि शाळा स वा जोशी आहे. माझा मामा १९७५ वेळी त्या शाळेत होता. तर आई १९७० वेळी टिळक नगर. आणि पेंडसे बाई मला सहावीत होत्या ( अशी पट्टी मरीन कि कातडी हुळूलेल . असे त्या हातात पट्टी समशेर फिरवल्याच्या थाटात फिरवायच्या.) सिनेमा पाहतांना मला त्यांची प्रकर्षाने आठवण झाली. तुझ्या माहितीसाठी. रवी जाधव ( नटरंग ) हा गोपाळनगर चा आहे. आणि ऐश्वर्या नार्वेकर दत्तनगर स वा जोशी च्या बाजूला आमच्या मुख्य बाई महाबळेश्वरकर आणि शिंदे बाई होत्या. एकदा ९वीत शिंदे बाईंनी एकाला बेन्द्रिनी सारखे पट्टीने फोडले होते.

In reply to by निनाद मुक्काम …

नेहरु मैदानजवळची शाखा म्हणजे जुणी गणेश्पथ.. गोपाळनगरची शाळाही आता तिथेच आलिय.. महाबळेश्वर्कर बाई होत्या आम्हाला.. भारदस्त हा शब्द तिथेच अनुभवला पहिल्यांदा.. महाबळेश्वरकर बाई ठाकुर्लीला जायच्या रस्त्यावर रहायच्या.. तुमच्या पेंडसे बाई वेगळ्या असाव्यात.. मी ९१ मधे दहावी सुटलो.. बाकी शाळेत जे जे केल, त्यापुढे कॉलेज म्हणजे फारच फिकं वाटल नंतर..

In reply to by निनाद मुक्काम …

मी पण 'सवा जोशी' चा विद्यार्थी ! आमच्या वेळेस सुद्धा, सुट्टीच्या दिवशी, कोणीतरी बाहेरच्या बोर्डावर सर्व शिक्षक व शिक्षिकांच्या जोड्या लिहून ठेवल्या होत्या. पण पुढे पार्ले टिळक मधे गेल्यावर मात्र, एकदम बिगरीतून मॅट्रिकला गेल्यासारखे वाटले.

In reply to by तिमा

आमच्या शाळेत हेच पवित्र कार्य शौशालयात भिंतीवर कोरून ठेवायचे व उरल्लेया जागेत भिंतीवर कोण अनामिक चित्रकार खजोराहो च्या शिल्पकलेला तोंडांत मारेल अशी भित्ती चित्रे काढायच्या. संडासाच्या नळाला कधीच पाणी नसायचे. त्यामुळे वहीतील पान घेऊन आत जावे लागायचे ( वोटेर बेग हा प्रकार शक्यतो मुली आणायच्या.). म्हणून परदेशात मला जड गेले नाही. दरवाजावर चावट विनोद. म्हणी आणि पिवळे साहित्य अमाप विखुरलेले असायचे. इच्चा भाना , हे तर आगरी बोलीभाषेत दर वाक्याच्या आड यायचे. आणि मायबोलीत काय म्हणतोस असे कुतूहलाने विचारणा करण्यासाठी असलेल्या दोन शब्दांना आगरी भाषेत हल हा अतिशय गोड शब्द आहे.

मी तर द्यायचो बुवा शाळेत असताना शिव्या.. ! शिव्यांच्या भेंड्या खेळणारे नग सुद्धा होते आमच्या वर्गात !

शाळा या चित्रपटापेक्षा पुस्तक वाचायला कितीतरी चांगले आहे. चित्रपट बघताना त्याचा एकसंधपणा जाणवत नाही, बरेच तुकडे तुकडे जोडून दाखवल्यासारखे वाटते. पण, ह्यामध्ये शाळेचे जे चित्र उभे करण्यात आले आहे ते सगळ्या शाळांशी सुसंगत असेलच असे नाही. त्यामुळे काही लोकांना हा आचरटपणा वाटू शकतो. वास्तविक मिलिंद बोकील यांनी अतिशय ओघवत्या शैलीत पुस्तक लिहिले आहे, पण वरण भात संस्कृती मध्ये वाढलेल्या मराठी माणसाला असा प्रयोग काहीवेळा पचनी पडत नाही. असो, आशय काहीही असला तरी अभिनयाच्या बाबतीत उत्तम चित्रपट आहे.

मुलं कॉलेजमध्ये आहेत अस दाखवलं असत तर चित्रपट बघण्याजोगा झाला असता.
अहो, मुलं कॉलेजमध्ये आहेत असे दाखवले असते तर त्या चित्रपटाचे नाव 'शाळा' असे नसून 'कॉलेज' असेच नसते का कीचेंजी.. :D काय राव.. :P

छान चित्रपट आहे... ऊगाच चित्रपटा वर टीका करु नये ;)

डोक्याला शॉट देऊन गेला मला, अर्थात ते केतकी च दिसण, लाजण आणी परांजपे बाई सोडल्या तर, मुळ धागा जर नववी ची मुल-मुली असं काही करू शकतात या वर असेल , तर नवल असे काहीच नाही, वर काही पाचवी- सहावी ची उदाहरणे आहेत च, माझा अनुभव , अर्थात अपवाद असू शकतो. मी शिकलो ती संपुर्ण मुलांची ( ओनली बॉयज) शाळा होती. दहावी पर्यंत नीटस कळत देखील नव्हते, पण आमच्या ग्रुप ला कळत नव्हते याचा अर्थ ईतर ग्रुप्स ला कळत नव्हते असे काही नाही, कॅम्प मधे रवीवारी वर्गातलीच काही गँग मार्झोरिन ला मुलींबरोबर दिसायची, अर्थात सगळी च्या सगळी शाळा तशी नव्हती. एकमेकांशी असलेली खुन्नस, मग ती फुटबॉल गेम पासुन ते सायकल च्या स्टाईल पर्यंत सगळीकडे च असायची, मैत्री , ट्रेक्स, सायकल वर ट्रॅफीक मधून रेस ( आणी जमलाच तर अभ्यास ;) ) ...शाळा पाहिल्यानंतर मला सगळ्यात पहिले आठवला तो म्हणजे शाळेतला माझा ग्रुप, दोन - तीन मित्रांना पुण्यात भेटलो, काही चेपु वर शोधुन काढले, याच्या मुळे तो, त्याच्या मूळे हा असे जवळपास सगळेच शोधुन काढले, येत्या एप्रिल मध्ये शाळेतच भेटणार आहोत सारे, अर्थात फोना-फोनी करताना आधी च्या ईतकी मैत्री ची क्रेझ जाणवली नसली तरी, सगळेच जण मिस करताहेत हे मात्र नक्की ...जाता जाता ....

In reply to by पियुशा

परिक्षण ?????? या शब्दाचे इतके डीग्रेडेशन करू नका हो. मिपावर किंवा एकूणच जालावर परीक्षण करणारे अगदी थोडे आहेत. बाकीचे स्वयंघोषित समीक्षक सुद्धा केवळ चित्रपटाची ओळख करून देतात. किचेन मावशींनी तर ती पण नाही केली. त्या पण स्वतः या धाग्याला परीक्षण नाही म्हणणार.

मला ही नेमका हाच प्रश्न पड्ला आहे नक्की काय म्हणावे ? त्याचे वैयक्तिक मत ?चित्रपट ऑळ्ख्/का धावता आढावा? + / - पॉइन्ट ? की काय अजुन?