दूर गाव माझा

भास्कर केन्डे's picture
भास्कर केन्डे in जे न देखे रवी...
28 Oct 2011 - 3:20 am

राहिला दूर गाव माझा
मी असा का भरकटलो
श्वास इथे अन आत्मा तिकडे
खरे, असा मी का जगलो?

क्षण क्षणातून जगलो मी
का कण कणातून मी वधलो
नेत्र इथे अन अश्रू तिकडे
खरे, असा मी का रडलो?

नव्हता दुश्मन रणही नव्हते
दमून पुरता मी हरलो
हृदय इथे अन स्पंदन तिकडे
अरे असा मी का लढलो?

जावे फिरूनी कुशी गावच्या
साद गावची घुमत असे
उगव भास्करा रात्र ढळू दे
प्रभात मंगल पुन्हा दिसे.

करुणकविता

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Oct 2011 - 9:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गावाकडे परतण्याची हुरहुर शब्दातून उत्तम व्यक्त झाली आहे.
काही इथे तर काही तिथे अशा भावभावनांची गर्दीही झालेली आहे.
अजून येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

लीलाधर's picture

28 Oct 2011 - 8:15 pm | लीलाधर

अहो राव खुपच छान....

असावं असच आपलं गाव,

जीथे शब्दांनी व्यक्त होईल मनातील भाव.............

इंटरनेटस्नेही's picture

29 Oct 2011 - 8:25 pm | इंटरनेटस्नेही

वा! वा! चान!! चान!!

मनस्विनि२५१'s picture

2 Nov 2011 - 5:00 pm | मनस्विनि२५१

छान व्यक्त झाल्या आहेत भावना आणि ओढही !!
उत्तम कविता .. आणखी वाचायला आवडतील