निरोधला विरोध!!!

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
10 Aug 2011 - 4:18 pm

निरोधला विरोध!
पुरुष उवाच या तरुणाईच्या डोक्याला खुराक देणाऱ्या २००९च्या दिवाळी अंकात ‘निरोधला विरोध’ कोठे कोठे अन् कसा कसा होतो याचे मोठे अभ्यासपूर्ण रेखाटन केलेले होते. एका नामांकित लेखकाने एड्सग्रस्तांसाठी सामाजिक कार्य करतांना अनावधानानेच या विषयाला तोंड फोडले आहे. निरोधच्या वापराला विरोध जसा सुशिक्षितांकडून होतो त्याच प्रमाणात अशिक्षितांकडूनही होत असतो. यामागील कारणमिमांसा शोधण्याचा लेखकाने प्रयत्न केला व त्याचे निरीक्षण किंवा परीक्षण म्हणजे हा लेख होय.
प्रथम त्याने ग्रामीण भागातील लोकांची मते जाणून घेतली. तेव्हा असे निष्कर्ष समोर आले की गावातील प्रत्येकाला प्रत्येकजण नावानिशी ओळखत असतो. अशावेळी मेडिकल दुकानात जाऊन ‘पाकिटा’ची मागणी करणे त्यांना संकोच उत्पन्न करणारे वाटते. चार चौघांत जर अशी खरेदी झाली तर ‘आज रात्रीचा आपला मुक्काम घरी की दारी’ या अर्थाच्या नजरेचा सामना करावा लागतो. शिवाय दुसऱ्या दिवशी जवळच्या मित्रांच्या सरबत्तीला तोंड द्यावे लागते. त्यात न लिहिता येण्याजोगे प्रश्न असतात. आणखी एक समस्या म्हणजे गावाकडच्या घरात प्रत्येक कुटुंबियांचा या खोलीतून त्या खोलीत मुक्त संचार असतो. म्हाताऱ्या कोताऱ्यांना काही काम नसल्याने घरातील सांदीकोपरा किंवा ‘हातूर्ण-पान्घुर्ण’ आवरताना सदरहू साधन सापडण्याची दाट शक्यता असते. पोरं टोरं असली रंगीत पाकिटे फोडून त्याचे फुगे अंगणभर उडवू शकतात. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जरी सर्व काळजी घेऊन हे साधन व्यवस्थित वापरलं तरी दुसऱ्या दिवशी कोठे जाऊन टाकायचे हा प्रश्न उभा राहतो. गावातला कचरा वर्षानुवर्षे एकाच स्वमालकीच्या उकीरड्यात साठत असतो. अशा ठिकाणी रंगी बेरंगी पाकीट दिसले किंवा पडलेले आढळले तर कुत्री मांजरं कोंबड्या पुन्हा त्या फुग्यांची वरात अंगणापर्यंत घेऊन येऊ शकतात. एकत्र कुटुंब असल्याने फार कमी वेळा जवळ येणे होत असल्याने ऐनवेळी तसेच अल्पवधीत हे साधन उपलब्ध होईलच असेही नाही आणि चार पाच मिनिटांसाठी ते उलगडून लावणे, गुंडाळून काढणे, गाठ मारणे इतका द्रविडी प्राणायाम करण्यापेक्षा सरळसोट कार्यभाग उरकून बाहेर पडवीत परतलेलं बरं असं वाटून निरोधला विरोध केला जातो.
ग्रामीण भागातील महिलांना या विषयावर बोलतं करणं महाकठीण काम ठरलं. पण ज्या कोणी बोलल्या त्यांच्या मते हे साधन वापरणं, न वापरणं हे सर्वस्वी नवरे मंडळीच ठरवतात. महिलांच्या मताला फारसे महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे अनेकदा नको असतांना दिवस राहणे, ते खाली करून घ्यावे लागणे इ. समस्यांना तोंड द्यावे लागते. घरोघरी ही साधने पुरविणाऱ्या आरोग्यसेविकांना चार-चौघींत हे साधन मागणे म्हणजे चेष्टेचा विषयच ठरतो. याउपर जरी हे साधन मागून घेतले तरी ठेवायचे कोठे? ऐनवेळी आवाज न करता दडवलेल्या ठिकाणाहून काढून ह्यांना द्यायचे कसे? हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. वापरलेलं साधन उघड्या कचऱ्यात टाकायची देखील सोय नसते. त्यापेक्षा होईल तसे दोन चार पोरं निपजायची अन् सरळ सरकारी शिबिरात नाव नोंदवून ‘नळ्या’ बांधून घ्यायच्या, हेच ग्रामीण महिलांना सर्वात सोप्पं वाटतं. ‘एकदा का लाईटवरचं ऑपरेशन करून घेतलं की आमच्याबी जीवाला घोर न्हाई आन ह्येंच्याबी!’ असं बऱ्याचजणी सहजच बोलून गेल्या.
शहरी भागात तरी या साधनाचा चांगला प्रसार झाला असेल या हेतूने चर्चा केली असता वेगळीच परिस्थिती समोर आली. तरुणाईचा कल विदाऊट कॉन्टॅक्ट ठेवण्याकडे असून ७२ तासाच्या इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टीव्ह पिल्स वापरण्याकडे अधिक असल्याचे जाणवले. काही मुले म्हणाली की गर्लफ्रेंड सोबत एकांतात, झाडी झुडपात रोमान्स करतांना ऐनवेळी हाताशी हे साधन असेलच असे नाही. साधन न वापरताच आनंद घ्यावा लागतो. असेही काहीजण म्हणाले. याशिवाय काहीजणी ‘तुझ्या मनात आधीपासूनच हे होतं म्हणून तू तयारीनिशी आलास’ असं म्हणत फुरंगटून बसतात. त्यापेक्षा हे साधन जवळ बाळगलं जात नाही. त्यापेक्षा रोमान्सच्या अंतिमक्षणी हे साधन न वापरणेच योग्य ठरते. असेही काही युवा प्रेमी बोलून गेले. काही पोरांना विदाऊट मध्येच जास्त थ्रिल वाटतं. म्हणून ते अजिबात वापरीत नाहीत. त्यातील धोके समजावून सांगितले तरी त्याकडे कानाडोळा करून मस्ती मौज लुटण्यासाठी हा आडपडदा कशाला? असा प्रतिप्रश्न त्यांनीच विचारल्यावर लेखक महाशय अक्षरशः निरुत्तर झाले.
सुशिक्षित शहरी दाम्पत्यांना स्पर्शानंदातच अधिक रस असल्याने ते क्वचित हे साधन वापरतात असे कळले. काहींना ‘नॅचरल’मध्ये खूप काही हवेहवेसे मिळत जाते. त्यामुळे त्या आनंदात आडकाठी ठरणारे हे साधन वापरण्याचे या महिला व पुरुष धुडकावून लावतात. काहींना हे कसे वापरायचे तेच कळलेले नसते व काहीतरी भयंकर चूक होईल अशा भीतीने ते वापरणे टाळले जाते. काहींना ते वापरण्यात वाया जाणारा वेळ दवडायचा नसतो. वृत्तपत्रांच्या मलपृष्ठावरील या साधनाच्या फ्लेवरयुक्त जाहिरातीत काहीही तथ्य नसल्याचे अनेक महिला सांगतात व हे साधन टाळण्याचे सुचवतात. काहीजण कॅलेंडर पद्धत वापरून मुक्ततेचा आनंद उपभोगतात तर काहीजणांना कोणताही आडपडदा न ठेवता आपल्या कोंडलेल्या भावना भडाभड व्यक्त करायच्या असतात...
एकंदर काय तर शहरात बरीच प्रायव्हसी जरी मिळत असली तरी निरोधला विरोध कायमच दिसून येतो.

औषधोपचारसमाजजीवनमानराहणीक्रीडामौजमजाप्रकटनविचारलेखप्रतिसादअनुभवमाहितीवादसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

10 Aug 2011 - 4:20 pm | आत्मशून्य

.

वपाडाव's picture

10 Aug 2011 - 4:41 pm | वपाडाव

Submitted by डॉ.श्रीराम दिवटे on Wed, 10/08/2011 - 16:18

Submitted by आत्मशून्य on Wed, 10/08/2011 - 16:20.

अरे कित्ती कित्ती अधाशी आहेस रे बाबा.....
असल्या आर्टिकल्सवर हजेरी लवुन लगेच प्रतिसाद.....

आत्मशून्य's picture

10 Aug 2011 - 4:53 pm | आत्मशून्य

.

धन्या's picture

10 Aug 2011 - 4:44 pm | धन्या

बेक्कार विकेट काढली राव :D

आत्मशून्य's picture

10 Aug 2011 - 4:50 pm | आत्मशून्य

अरे धाग्याच नाव वाचून हसूच थांबेना म्हणून स्मायली देऊन जागा राखून ठेवली होती.... :)

असल्या आर्टिकल्सवर हजेरी लवुन लगेच प्रतिसाद.....

असल्या म्हणजे नक्की "कसल्या" अभिप्रेत आहे ?

धन्या's picture

10 Aug 2011 - 4:39 pm | धन्या

... व्यासंग दांडगा आहे डॉक्टरसाहेब तुमचा.

शाहिर's picture

10 Aug 2011 - 4:39 pm | शाहिर

कोणि काही बोलेना ..
डॉक्टर बुवा लईच पांघरुणात घुसले

शाहिर's picture

10 Aug 2011 - 4:42 pm | शाहिर

( चार पाच मिनिटांसाठी ते उलगडून लावणे, गुंडाळून काढणे, गाठ मारणे इतका द्रविडी प्राणायाम करण्यापेक्षा सरळसोट कार्यभाग उरकून बाहेर पडवीत परतलेलं बरं )

किसन शिंदे's picture

10 Aug 2011 - 4:50 pm | किसन शिंदे

लेखाचं शीर्षक पाहिल्याबरोबरच कळालं, लेख कोणाचा असणार ते. ;)

साबु's picture

10 Aug 2011 - 5:32 pm | साबु

लै भारि...

इष्टुर फाकडा's picture

10 Aug 2011 - 6:03 pm | इष्टुर फाकडा

एकदा मी, माझा मित्र आणि त्याची बायको असे बोलत बसलो होतो त्याच्या रूम मधे. अचानक काकू आल्या आणि आमच्या बोलण्यात सामील होता होता त्यांनी fan on केला. माझ्या मित्राची जोरदार बसल्याजागी चळवळ झाली आणि क्षणार्धात एक गुलाबी माळ काकुंच्याच गळ्याभोवती पडली. थोडावेळ विचित्र शांतता झाली ....आणि नंतर त्या दोघीही बाहेर पडल्यावर मी गडबडा लोळून तुफान हसत होतो.

शैलेन्द्र's picture

10 Aug 2011 - 6:33 pm | शैलेन्द्र

पब्लीक कुठपण काय्पन ठेवत...

एंब्रेसींग

इष्टुर फाकडा's picture

10 Aug 2011 - 7:00 pm | इष्टुर फाकडा

अहो काय करणार...बाकीची सगळी ठिकाणं, पोचण्यासारखी असतात, त्यात मी मधेच आलो होतो :) घाई गडबडीत गोंधळ झाला बिचार्याचा...

अशोक पतिल's picture

10 Aug 2011 - 6:20 pm | अशोक पतिल

काहि वर्षा पुर्वी आमच्या रेल्वे कारखान्यात स्टोर्स विभागा मधे नियोजन आफिसा कडुन निरोधाचे भरपुर बाक्स यायचे . रेल्वे सामग्री सोबत ते निरोध मोफत मिळत असत .

वपाडाव's picture

10 Aug 2011 - 6:38 pm | वपाडाव

तर मग काय....
मोफत मिळायचे म्हणुन काय अन पैसे द्यावे लागले असते तर काय?

आचारी's picture

10 Aug 2011 - 8:56 pm | आचारी

मोफत मिळाले तर काय ??? आनि हे इथे सान्ग्ण्याचे नेमके प्रयोजन ??

डॉ.श्रीराम दिवटे's picture

10 Aug 2011 - 8:59 pm | डॉ.श्रीराम दिवटे

निरोध मोफतही मिळतात आणि बाजारात शंभर रुपयांत एक असाही उपलब्ध असतो म्हणे. पण नैसर्गिकतेला तोड नाही असेच एकंदर मत आहे

मुक्तसुनीत's picture

10 Aug 2011 - 9:21 pm | मुक्तसुनीत

महत्त्वाच्या विषयावरचा लेख. कुटुंबनियोजन किंवा विवाहपूर्व सुरक्षित लैंगिक व्यवहाराचे उद्देश्य व्यापक स्तरावर साधण्याकरता अजून किती मोठ्या अडथळ्यांना पार करायचे आहे याची कल्पना अशा लिखाणामधून येते आहे. शहरी म्हणा नाहीतर ग्रामीण म्हणा, कुठल्याही भागातल्या कितीही कमी अधिक शिकलेल्या व्यक्तींनी अशा स्वरूपाच्या मूलभूत साधनांच्या बाबत फोबिया किंवा आळस या कारणांमुळे विरोध दर्शवणे अज्ञानमूलक (आणि वेश्याव्यवसायाच्या संदर्भात एडस ला आमंत्रण देणारे) आहे. प्रायव्हसीचा मुद्दाही हा असाच दिङ्मूढ करणारा वाटतो. शारिरीक व्यवहार करण्याइतपत प्रायव्हसी आहे परंतु कुटुंबनियोजनसाधनांना ठेवण्याकरता आणि वापर झाल्यावर काढून टाकण्याकरताची प्रायव्हसी मात्र नाही अशी धारणा करून घेणे कळण्यापलिकडचे आहे.

दिवट्यांनी मूळ लेखाचा पत्ता आणि बाकी संदर्भ दिले तर आनंद होईल.

डॉ.श्रीराम दिवटे's picture

11 Aug 2011 - 6:13 am | डॉ.श्रीराम दिवटे

ग्रामीण दांपत्याची खरोखरच याबाबतीत गोची होत असते. त्यामुळेच लग्नानंतर प्लँनिँग वगैरेच्या भानगडीत ते पडत नाहीत. सलग दोन मुले झाली की ट्युबेक्टॉमी करुन घेतात.
शहरात मात्र अनेक विवाहित पुरुष वेगवेगळ्या कंपन्यांच्या भडक जाहिरातीँच्या आधारे वेगवेगळे कंडोम यशस्वीपणे वापरतांना आढळतात. परंतु मूळ लेखकाला शहरी तरुणीँचा कल गर्भपाताच्या गोळ्या खाण्याकडे जास्त असतो याकडे लक्ष वेधणे अपेक्षित होते म्हणूनच या वेगळ्या विषयाला वाचा फोडली.
संदर्भ- पुरुष उवाच दिवाळी अंक २००९
संपादक- डॉ.गिताली वि. मं. , मुकुंद किर्दत
पान नं १४२
निरोधला विरोध
लेखक- डॉ. हेमंत आपटे

धनंजय's picture

11 Aug 2011 - 7:33 am | धनंजय

विषय महत्त्वचा आहे खरा.