रंजना देशमुख.

गणपा's picture
गणपा in जनातलं, मनातलं
27 Jan 2011 - 5:47 pm

सायली ताईंचा हा धागा आम्ही हायजॅक केला...

देर आये दुरुस्त ये म्हणत तिथे आवंतर न करता मुद्दाम हा वेगळा धागा खास रंजना ताईंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी.
आपणा पैकी कुणालाही तिच्या बद्दल काही बोलायच / सांगायच असल्यास इथे मांडा.

तिथे इतर गाण्यांबद्द्ल चर्चा घडत असतानाच रंजाना या काळाच्या पडद्या आड गेलेल्या गुणी अभिनेत्रीच्या आठवणी निघाल्या. त्यावर निनादने एक चांगला प्रतिसाद ही दिला.
तो वाचुन वाटलं की खरच त्या मिडिया सारखे आपण ही या हिर्‍याला विसरलो.
मी तरी आजवर रंजना वर कधी एखादा धागा आलेला पहिला नाही.

निनाद म्हणतो तस एके काळची मराठीतली हे लेडी अमिताभ, तिच्या अपघाता नंतर जग तिला वसरल.
अण तिन जिद्ध सोडली नाही. धैर्यान उभी राहीली झुंजत राहीली आणि परत रंगभुमीवर अवतरली. ३ मार्च २००० साली या अभिनेत्रीनं या जगातुन कायमची एक्झिट घेतली.

८० च्यावर मराठी हिंदी चित्रपटांतुन एकसे एक पात्रं जगलेल्या रंजना ताईना मानाचा मुजरा.
त्यांनी जस खळखळुन हसवल तसच टच कन डोळ्यात पाणी ही आणलं.
त्यांची मला आवडलेली भुमीका अरे संसार संसार मधली.

चित्रपटमाहिती

प्रतिक्रिया

गवि's picture

27 Jan 2011 - 5:52 pm | गवि

रंजना ही अभिनेत्री जरी जरा थोराड असली तरी तिने तरुण अवखळ रोल ही केल्याचं आठवतं.

एका कुठल्यातरी सिनेमात डबलरोल होता. दोन बहिणी असल्याचे दाखवत.. एक साधी एक मॉड. इ इ.

बादवे या धाग्याचा विषय मर्यादित का ठेवला.. मराठी गाण्यांवरही धमाल चालू होती. त्याचाही समावेश करायला हवा होता.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Jan 2011 - 5:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एका कुठल्यातरी सिनेमात डबलरोल होता. दोन बहिणी असल्याचे दाखवत.. एक साधी एक मॉड. इ इ.

"गुपचुप गुपचुप" हे त्या पिक्चरचं नाव. धमाल पिक्चर आहे तो; ती ज्या पद्धतीने अशोक सराफला "अहो, धोंऽड" म्हणून हाक मारते ते एकदम मस्तच वाटतं. त्याच पिक्चरमधलं पाहिले न मी तुला हे गाणंही छान आहे.

ती ज्या पद्धतीने अशोक सराफला "अहो, धोंऽड" म्हणून हाक मारते ते एकदम मस्तच वाटतं.

त्यापेक्षा अधिक पेक्युलीयर अशोक सराफ ज्यापद्धतीने दोन्ही कोपरांनी पँट वर करत "आमी धोंऽऽड" म्हणतो ते आहे.

स्वानन्द's picture

27 Jan 2011 - 9:41 pm | स्वानन्द

अगदी अगदी.

मिडीया प्लेयर वर मराठी गाणी चालू असतात, अचानक 'पाहिले न मी तुला' हे गाणं लागतं आणि त्यानंतर तीच गाणं किमान २-३ वेळा ऐकलं जातंच. आणि त्याबरोबर आठवतो रंजना आणि अशोक सराफचा गुपचुप गुपचुप मधला झकास अभिनय :)

नन्दादीप's picture

27 Jan 2011 - 6:07 pm | नन्दादीप

"चानी" (नाव नक्की आठवत नाही पण त्या प्रमुख पात्राचे नाव चानी होते.) हा देखील त्यांचाच चित्रपट होता का??

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jan 2011 - 6:07 pm | परिकथेतील राजकुमार

हो चानी देखील रंजनाचाच चित्रपट. त्यात 'तो एक राजपुत्र..' सारखी मस्त मस्त गाणी होती.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jan 2011 - 5:55 pm | परिकथेतील राजकुमार

धन्स रे गणपा.

कृपया निनादनी मगाशी तीच्या अपघातानंतर आलेल्या नाटकाची अजुन माहिती दिली तर वाचायला आवडेल.

बाकी रंजना म्हणले की आम्हाला आठवते ते 'पाहिले न मी तुला..' हे MP3 शेअर करुन मी कमीत कमी १००+ दोस्त ऑर्कुटवर गोळा केले असतील ;)

छोटा डॉन's picture

27 Jan 2011 - 5:57 pm | छोटा डॉन

सायली ताईंचा हा धागा आम्ही हायजॅक केला...

देर आये दुरुस्त ये म्हणत तिथे आवंतर न करता मुद्दाम हा वेगळा धागा खास रंजना ताईंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी.
आपणा पैकी कुणालाही तिच्या बद्दल काही बोलायच / सांगायच असल्यास इथे मांडा

धन्यवाद गणपाशेठ, आपण घेतलेला पुढाकार पाहुन आनंद झाला.
अनेक आभार ...

- छोटा डॉन

स्वाती दिनेश's picture

27 Jan 2011 - 6:01 pm | स्वाती दिनेश

रंजनाच्या आठवणी वाचण्यास उत्सुक,
ब्लॅक & व्हाइट टीव्हीच्या जमान्यात दर शनिवारी मराठी सिनेमे लागायचे, तेव्हा रंजनाचे अनेक सिनेमे पाहिलेले आठवत आहेत आणि मराठी चित्रहार मध्ये गाणी..
स्वाती

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Jan 2011 - 6:20 pm | निनाद मुक्काम प...

पूर्वी शनिवारी संध्याकाळी मराठी सिनेमे दाखवायचे .
त्यातून ह्या गुणी अभिनेत्रीचे दर्शन व्हायचे . टोकीज मध्ये पहिला तो मुंबईचा फौजदार
ह्यात सागरी किनारा हे वाद्कारांचे गाणे अंगावर रोमांच उभा करतात
मला आवडलेली भूमिका भुजंग सिनेमातील
मदर इंडिया किंवा आराधना मधील नायिकेप्रमाणे तारुण्य ते वृध्ध्वस्थेत तिचा प्रवास समर्थ अभिनयाने सजतो .
बाकी शहरी किंवा ग्राम्य अश्या कोणत्याही भूमिकेला साजेसा अभिनय व अत्यंत आत्मविश्वासाने पद्यारील वावर अभिनय व अदा ह्यांचे बेमालून मिश्रण .भूमिकेची पारख
व शांताराम बाबूंचे मार्गदर्शन ह्यामुळे ह्या अभिनेत्रीने मराठी सिनेमा गाजवला .
तिच्या नंतर घेड गुजरी विनोदपट त्यात केसाळ छातीचे पोट पुढे आलेले (मद्य सेवनाचा अतिरेक ) चित्र विचित्र कपडे घालून उद्यानात सुबल सरकारांच्या तालावर कवायत चालायची .व हास्याचे फवारे उडायचे.
ह्यातून उद्यानात लाफ्टर क्लब ची कल्पना निघाली असावी .
तिच्या अदा नि अभिनय हे पडद्यावर पाहणे हि एक पर्वणी असायची .
ती आली /तिने पहिले /तिने जिंकले
तिच्या नंतर सिनेमा पोरका झाला.
तिच्या अदा नि अभिनय हे पडद्यावर पाहणे हि एक पर्वणी असायची .

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Jan 2011 - 7:37 pm | निनाद मुक्काम प...

नाटकाचे नाव फक्त एकदाच
ह्यात विल चेअर ला खिळलेली नायिका जिची तिच्या नायाकाकडून फसवणूक झाली आहे .असे काहीसे वास्तव व कल्पनेची सरमिसळ करून हे नाटक आल्याचे आठवते .
पण का कुणास ठावूक कदाचित दबावामुळे असेन पण त्याचे फारसे प्रयोग झाले नाहीत .
माझ्या मते चानी हा सिनेमा बापूंनी सत्य कथेवर आधारित कांदबरी वरून घेतला होता .
हे बापूंचे ड्रीम प्रोजेक्ट पैकी तो एक होता
.http://www.youtube.com/watch?v=nkwoJHcvNos
झुंज सिनेमातील हेच ते प्रसिध्द दंद्वागीत
तिचा संवाद अथवा गाण्याचे बोल नसले तरी नुसत्या देहबोलीतून तिचा आत्मविश्वास झळकतो .

बिनकामाचा नवरा....... अणखी एक तुफान चित्रपट....

मी-सौरभ's picture

27 Jan 2011 - 6:42 pm | मी-सौरभ

एक अतिशय प्रथितयश अभिनेत्री होती :)
तिचा न आवडणारा चित्रपट निवडण अवघड आहे, कारण तिचे सगळेच चित्रपट चान चान असत :)

मिळालेल्या भूमिकेचा बाज लक्षात घेऊन ती व्यक्तीरेखा सुरेख साकारणारी अभिनेत्री म्हणजे रंजना...
गंभीर चित्रपटात रंजनाचा अभिनय मन हेलावून टाकायचा.
भुजंग नावाचा साधारण कथा असलेला चित्रपट, पण त्यात रंजनाने गावाकडच्या स्त्रीची केलेली भूमिका अप्रतिम. तिचे चुलीवर भाकरी भाजणे, शेणसडा टाकणे, डोक्यावर मोळी वाहणे आणि ग्रामीण उच्चार सगळे काही भूमिकेशी चपखल बसणारे.

पण तेच 'भालू' चित्रपटातील वकिलीण बघा. अगदी शहरी आणि उच्चशिक्षित बाईची भाषा.
'सासू वरचढ जावई' चित्रपटात रंजना, अशोक सराफ, पद्मा चव्हाण आणि निळू फुले यांनी जी धमाल उडवून दिलीय ती औरच..

अगदी अगदी.
शब्दा शब्दाशी सहमत आहे.

हे चित्रपट जालावर कुठे उपलब्ध आहेत का?

मुंबईचा फौजदसर, गुपचूप गुपचूप .. रंजनाचे एकसेएक बहारदार चित्रपट !

काही मराठी चित्रपट राजश्री.कॉम वर आहेत.

प्रचेतस's picture

27 Jan 2011 - 7:01 pm | प्रचेतस

'सासू वरचढ जावई' अप्रतिमच.
त्यात घाण्यावर बसलेल्या जयराम कुलकर्णीला पद्मा चव्हाण उठवते आणि अशोक सराफला त्याजागी बसवते. रंजना हताश होउन पाहात राहाते.
रात्री रंजनाकडे चोरून जातांना अचानक तिच्या शेजारी झोपलेल्या पद्मा चव्हाणला जाग येते. मग जे म्यांव म्यांव सुरु होते ते पडद्यावर पाहाण्यातच गंमत आहे.

प्रीत-मोहर's picture

28 Jan 2011 - 10:26 am | प्रीत-मोहर

एक्दा हा पिच्चर दुरचित्रवाणीवर पाहत असताना म्यांव म्यांवचा सीन सुरु झाला आणि ते ऐकुन आतल्या खोलीतुन माझा बोका ओरडत बाहेर येउन अजुन कोण उपटसुंभ इकडे आलाय अश्या थाटात शोधत होता ....

प्राजु's picture

27 Jan 2011 - 7:01 pm | प्राजु

ही कशानं धुंदी आली.... या गाण्यात रंजना एखद्या अप्सरे सारखी दिसली आहे..
असला नवरा नको गं बाई ... हा धम्माल होता चित्रपट. रंजना, राजा गोसावी आणि शरद तळवलकर.

गवि's picture

27 Jan 2011 - 7:28 pm | गवि

चेष्टा करत नाही.खरंच सांगतो.
'ही कशानं धुंदी आली' गाण्यात बापसदृश राजा गोसावींसोबत हिला लाडाने गाणे म्हणताना बघून आधी 'खरंच का बरं बापासोबत ही आपल्या धुंदीबद्दल बोलतेय??', असं वाटलं.

मग लक्षात आलं की हाच तिचा 'तो'.

मग मलाही प्रश्न पडला.खरंच कशानं आली असावी बरं धुंदी हीस? असो.

कच्ची कैरी's picture

27 Jan 2011 - 7:17 pm | कच्ची कैरी

माझी खूपच आवडती अभिनेत्री !सिनेमातला त्यांचा बिनधास्त वावर मला खूपच आवडायचा .

मेघवेडा's picture

27 Jan 2011 - 7:21 pm | मेघवेडा

झुंज मधील "कोण होतीस/होतास तू"!

चित्रपट फारसा आठवत नाही मात्र चित्रपटाच्या सुरूवातीलाच हे गाणं आहे. रवींद्र महाजनी आणि रंजनाबाई एकमेकांकडे टशनमध्ये बघत "सार्‍यांना भुलवीत रस्त्यानं चालली, सडक लैला अशी बदनाम झालीस तू.." "पोरींची छेडाछेडी लोचट लाडीगोडी, सडक मजनू असा बदनाम झालास तू" असे आळीपाळीने आरोपांच्या तोफा डागत असलेले आठवतात! "कालची सीता आज डॅडींची रीटा झाली" अशाही काही ओळी आहेत गाण्यात. लै इनोदी गाणं आहे!

"निसर्गराजा ऐक सांगते" याच चित्रपटातलं गाणं ना?

कोण होतीस तु फुल्ल टीपी गाणं आहे, अ‍ॅक्टींग वगैरे पाहुन हहपुवा होतं.. पण पुरुष गायकाची स्टाईलपण भारी आहे.

काळ बद्द्ल्लल्ला... तु ही बद्दल्ल्ली वगैरे =))

चित्रा's picture

28 Jan 2011 - 7:17 am | चित्रा

काळ बदलल्ला .. आठवले. :))

बदलला, बदलली हे बरोबर की बदललास, बदललीस असे बरोबर असते?

बाकी रंजना माझी आवडती मराठी नटी होती.

दोन्ही बरोबर असावं असं वाटतं.

तु बदललास/बदललीस.

तो बदलला, ती बदलली, काळ/ऋतु बदलला वगैरे.

(काय ती प्रथम, द्वितीय तृतीय वचनाची भानगड असते ती ;-) )

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jan 2011 - 9:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

(काय ती प्रथम, द्वितीय तृतीय वचनाची भानगड असते ती Wink )

बोल्लास! पूर्ण, अपूर्ण, संपूर्ण अशी भानगड असते ती. डान्रावांना माहित्ये सगळं! (हे उगाच)

आजानुकर्ण's picture

28 Jan 2011 - 9:36 am | आजानुकर्ण

वचन नाही रे पुरूष. घाबरतोस की काय पुरुष हा शब्द उच्चारायला?

तुम्ही आणि अदिती आधी ठरवा बरं नक्की काय असतं ते. तुमच्या पिढीतल्या (तुमच्या सारख्याच) ढ शिक्षकांनी नीट न शिकवल्याने आज मराठीची अशी दुरावस्था झाली आहे. ;-)

बाकी कर्णा, ती (बदलली) चा पुरुषाशी काय सबंध रे? च्यायला वांदा करुन ठेवतोस काय माझा!

आजानुकर्ण's picture

28 Jan 2011 - 10:24 am | आजानुकर्ण

तू बदललास/तो बदलला मध्ये द्वितीय आणि तृतीय पुरूष आहेत
तो बदलला/ती बदलली मध्ये लिंगबदल आहे.

'ती'चा संबंध पुरुषाशी असणे संभवनीय असले तरी नक्की सांगता येत नाही.

विशाखा राऊत's picture

27 Jan 2011 - 7:53 pm | विशाखा राऊत

मुबईचा फौजदार असेल तर लिन्क हवी आहे..

मला रंजनाबाईंचा मुंबईचा फौजदार मधील अभिनय लक्षात आहे.
बाकी फारसे सिनेमे पाहिले जायचे नाहीत तेंव्हा.

सुहास..'s picture

27 Jan 2011 - 9:46 pm | सुहास..

मस्त रे गणपा !!

अभिनय + मेक-अप च जबरदस्त नॉलेज असाव या अभिनेत्रीला, आता हेच बघ ना !!
झुंज च्या गाण्यात (कोण होतास तु मध्ये) एका हातात घातलेले लेडीज घड्याळ , त्या काळातली मॉडर्न स्त्री दाखविते, उलट ' ओ प्यांटवाल " उच्चारताना गावरान वाटते.

तिचा 'भुजंग. पाटलीण, चानी ' कोणी पाहिला आहे का ?

शहराजाद's picture

29 Jan 2011 - 4:42 am | शहराजाद

मी रंजनाबाईंचे फक्त दोन चित्रपट पाहिले आहेत. एक डाव भुताचा आणि तुम्ही उल्लेखलेला चानी. खानोलकरांची चानी कादंबरी मला आवडली होती. आणि हा चित्रपटही चांगला काढला आहे. वास्तविक, पुस्तक वाचून माझ्या डोळ्यांपुढे जी चानी उभी राहिली होती ती सतरा- अठराच्या कोवळ्या वयाची, नाजूक चेहर्‍यामोहर्‍याची, अटकर बांध्याची , खारीसारख्या भुरक्या केसांची. रंजनाबाईंची चानी तशी नव्हती. पण तरीही बाईंच्या अभिनयसामर्थ्याने ती व्यक्तिरेखा जिवंत झाली आहे. आता चानी म्हटले की मला बाईंचे त्या भूमिकेतले, चांदीच्या लहान घंटा किणकिणाव्यात तसे खळखळून हसणे आठवते.

विस्मरणात गेलेल्या ह्या गुणवंत नटीबद्दल धागा काढल्याबद्दल धागाकर्त्याचे आभार.

इन्द्र्राज पवार's picture

27 Jan 2011 - 11:02 pm | इन्द्र्राज पवार

रंजना यांची भूमिका असलेला पाहिलेला एकमेव चित्रपट म्हणजे "एक डाव भुताचा" तोही टीव्हीवर. पण त्यातही त्याना तसे दुय्यमच स्थान होते, कारण जवळपास सर्व चित्रपट श्री.अशोक सराफ व श्री.दिलीप प्रभावळकर या दुकलीभोवतीच गुंफला गेला होता. असे असले तरी वर कित्येक प्रतिसादकांनी उल्लेख केल्याप्रमाणे रंजना देशमुख यांनी आपल्या बिनधास्त (अगदी 'चालबाज'मधील श्री देवीप्रमाणे) अभिनय शैलीने मराठी चित्रपटातील एक दशक गाजविले होते यात शंका नाही. व्ही.शांताराम यांच्यासारख्या दिग्गजाचे त्याना सुरुवातीच्या काळात मिळालेले मार्गदर्शनही फार उपयुक्त ठरले असणार. [मला वाटते 'संध्या' या अभिनेत्री रंजनाच्या मावशी होत....चू.भू.दे.घे.]

एका दुर्दैवी मोटर अपघातात त्याना कायमचे अपंगत्व आले होते असे ऐकिवात आहे (फार माहिती नाही याबद्दल) आणि त्यामुळे त्यांची सिनेकारकिर्दही अकालीच संपुष्टात आली. मोटर अपघाताने संपविलेले आणखीन दोन नामवंत कलाकार म्हणजे भक्ती बर्वे आणि अरुण सरनाईक. [अपघातानंतर रंजना काही काळ जगल्या तरी, पण हे दोन दुर्दैवी जीव जागीच गेले....असो.]

इन्द्रा

स्वाती दिनेश's picture

27 Jan 2011 - 11:09 pm | स्वाती दिनेश

ह्यावरुन अपघाती मरण आलेले दुर्दैवी शांताबाई जोग, जयराम हर्डीकर आठवले.
स्वाती

विकास's picture

27 Jan 2011 - 11:30 pm | विकास

आणि भक्ती बर्वे...

स्वाती दिनेश's picture

27 Jan 2011 - 11:35 pm | स्वाती दिनेश

भक्ती बर्वे आणि अरुण सरनाई़कांचा उल्लेख केला आहे पवारांनी म्हणून परत नाही केला..
स्वाती

विकास's picture

28 Jan 2011 - 7:16 am | विकास

माझ्या नजरेतून निसटला...

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Jan 2011 - 9:21 am | llपुण्याचे पेशवेll

जयराम हर्डीकर म्हणजे सामना मधला स्मगलर ना?

स्वाती दिनेश's picture

28 Jan 2011 - 12:32 pm | स्वाती दिनेश

सामना? सिंहासन मधला स्मगलर...
स्वाती

चित्रा's picture

28 Jan 2011 - 7:22 am | चित्रा

हे आपल्यापेक्षा वयाने बरेच लहान असावेत, याची हा प्रतिसाद वाचून जाणीव झाली :)

रंजनाचा केवळ एकच चित्रपट पाहिला असणे हे आमच्या काळात (आई ग!) वाढला असतात तर शक्यच नव्हते.

अरेच्च्या!

इंद्रराजरावभाउसाहेब पवार आमच्याही पेक्षा लहान असावेत तर, आम्ही तर लै पिच्चर पाहिल रंजनाचे. ;-)

आमचा फेव्हरेट म्हंजी... तो एक राजपुत्र.. मी मी.. एक रानफुलं... ****** चा घो रे चानी.....! ;-)

इन्द्र्राज पवार's picture

28 Jan 2011 - 10:08 pm | इन्द्र्राज पवार

चित्राताई....स्वातीताई....नाईल....विकास....सर्वांना उद्देश्यून,

~ रंजना यांचेच असे नव्हे तर एकूणच मराठी चित्रपट आमच्या कोल्हापुरातील थिएटर्समधून पाहाणे हे एक प्रकारचे दिव्यच आहे...(आज मल्टिप्लेक्सच्या जमान्याची डोळ्यांना आणि देहाला सवय होत असताना, मराठी निर्माते तिथे चित्रपट लावण्यास धजत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे....कारण? अनेक आहेत, पण इथे या एका गुणवान अभिनेत्रीच्या आठवणीसाठी काढलेल्या धाग्यात ती चर्चा नको...) त्यामुळे रंजनाचेच नव्हे तर अगदी ताज्या दमातील दिग्दर्शकांचे चित्रपटही ते कोणत्या थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत यावर इथला प्रेक्षक पाहायचे की नाही असा विचार करतो.

असे असले तरी चित्रपट कलेचा एक अभ्यासक (वा प्रेमी) या नात्याने मी वेळोवेळी वाचन मात्र भरपूर केले आहे,विविध चर्चेत, क्षेत्रातील ज्येष्ठांसमवेत (कोल्हापुरात यांची कमतरता नाही) या विषयावर प्रदीर्घ गप्पागोष्टी याद्वारेही ज्ञानात भर पडत जातेच. त्यामुळे प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे रंजना यांचा एकच चित्रपट जरी पाहिला असला तरी त्यांच्या एकूण कारकिर्दीबाबत मला तशी बर्‍यापैकी माहिती आहे. विशेषतः 'त्या' दुर्दैवी अपघातानंतर तर माहितीत आपसूकच भर पडत गेली.

श्रीमती शांता जोग आणि अकाली गेलेला तो एक देखणा कलाकार जयराम हर्डीकर यांच्या अपघाती मृत्युचा उल्लेख माझ्याकडून निसटला....कसा काय कोण जाणे....बट थॅन्क्स टु स्वाती दिनेश. जयराम हर्डीकर यांची ओळख आहे ती निव्वळ 'सिंहासन' (दयानंद पानिटकर या भूमिकेत) मुळे नव्हे तर पटवर्धन दांपत्याच्या "२२ जून १८९७' या गाजलेल्या चित्रपटातील 'गणेश द्रविड' च्या भूमिकेमुळेही.

'मंतरलेली चैत्रवेल' टीमच्या बसला कोल्हापूरच्याच दौर्‍यावर असताना (इस्लामपूरच्या आसपास) झालेल्या अपघातात जयराम हर्डिकरांचा चटका लावणारा मृत्यू झाला....[बातमी तर अशीही होती की, पेटत्या बसमधून स्वतः सुखरूप बाहेर येऊनही आत शांताबाई अडकल्याचे समजल्यावर परत त्या बसमध्ये त्यानी धाव घेतली होती व त्याना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघेही जळून गेले].....तीच गोष्ट अरुण सरनाईक यांची, त्यांच्या पत्नीची आणि त्यांच्या ज्येष्ठ मुलीची, कोल्हापुर-पुणे महामार्गावरील एका जबरदस्त अपघातात मृत्यू....ड्रायव्हरदेखील वाचला नाही......दुसर्‍या मुलीची बारावीची परीक्षा चालू असल्याने ती प्रवासात त्यांच्यासोबत नव्हती....म्हणून वाचली.

भक्ती बर्वे यांचाही असाच क्षणार्धात झालेला अपघाती मृत्यू.....[योगायोगाने त्याच पुणे महामार्गावर]

अकाली गेलेल्या या कलाकारांच्या संदर्भात फार हळव्या आठवणी आहेत.....जरी अपघाती नसले तरी स्मिता पाटील, मच्छिन्द्र कांबळी, शंकर घाणेकर, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याही अकाली मृत्युने मराठी रसिक मनाला चटके दिलेच आहेत.

इन्द्रा

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Jan 2011 - 1:13 pm | निनाद मुक्काम प...

ह्या सिनेमातील अजून एक महत्वाचे पात्र म्हणजे खलनायक सरपंच .निळू फुले
ते शाळेत येतात व शिक्षक दिलीप ला म्हणतात कि
पास कोण करतो
दिलीप ;; मी
नापास कोण करतो ?
दिलीप '' मी
मग खर्जातील आवाज काढून म्हणतात निळूभाऊ
मास्तर मग माझा मुलगा नापास कसा झाला ?
लय भारी हा शिनेमा अशोकाचा प्रमुख भूमिका असलेलें
त्यात रंजनाने त्यासाठी फक्त हा सिनेमा केला हे जाणवते .

अडगळ's picture

27 Jan 2011 - 11:22 pm | अडगळ

रंजना : हातात काय हाय ?
अशोक सराफ : हे . आपलं कुठं काय. सर्कस. सर्कशीची ह्यान्डबिलं.
रं : सर्कशीला जाताय. कशाला ? चड्ड्या घातलेल्या बायका बगायला ?
अ.स.: तुला फकस्त तेच आठिवनार.. सर्कशीत वाघशिव्ह बी असत्यात. ते बी चड्डी न घातलेले.

ग्रामीण ढंगाच्या भुमिका करताना रंजना यांची देहबोली आणि ग्रामीण (पश्चिम महाराष्ट्रातली )भाषा लाजवाब असायची.

पैसा's picture

28 Jan 2011 - 10:20 pm | पैसा

धमाल पिक्चर आहे. त्यातले 'लोकशाई' बद्दलचे विनोद, रंजनाच्या नुसत्या डोळ्यांकडे पाहून भिजलेलं मांजर होणारं "आमचं धनी" अशोक सराफ आणि काठी घेऊन गंगीच्या मागनं गाव भटकणारी रंजना कधीच विसरणं शक्य नाही. कितीही वेळा लागला तरी आम्ही सगळे, माझी मुलं सुद्धा बघतोच!

विकास's picture

27 Jan 2011 - 11:30 pm | विकास

अजून आठवणारे दोन चित्रपट म्हणजे - सासुरवाशीण (रिबेलीयन भुमीका) आणि गोंधळात गोंधळ (विनोदी भुमीका)

स्वाती दिनेश's picture

29 Jan 2011 - 12:22 pm | स्वाती दिनेश

तोच ना सिनेमा, आशा काळे मोठी जाऊ आणि रंजना धाकटी..
ललिता पवार खाष्ट सासू असते आणि रंजना तिला सरळ करते.. इ. इ...
मला पुण्याच्या भानुविलास थेटरात बघितलेला आठवतोय.. रंजना आणि ललिताबाईंची जुगलबंदीच होती..
स्वाती

विकास's picture

29 Jan 2011 - 6:32 pm | विकास

बरोबर तोच चित्रपट!

पहिला गणपाचे आभार!

आता, रंजना सारख निरागस दिसण आजवर कुणा अभिनेत्रीला जमल नाही. तीने 'मुंबईचा फौजदार्'मध्ये मारलेला एक डायलॉग मला आजवर हसवतो, लग्ना नंतर कामावर निघालेल्या रविंद्र महाजनीला जिन्यातुन उतरु देत ती वरुन सांगते' आव लग्ना नंतर पयल्यांदाच ड्युटीवत निघालासा, चांगल दोन चार चोर पकडुन दावा'.

गोंधळात गोंधळ हा आणखी एक चित्रपट.

अशोक सराफला बहुतेक जणांनी अपघातानंतर तीला विसरल्याचा वा फसवल्याचा आरोप केला आहे त्यांच्या साठी, ती ज्या हॉस्पिटल मध्ये होती तिथे बहुतेक दा अशोक सराफला लोकांनी पाहिले आहे. कदाचित रिकव्हरीचे अजिबात चान्सेस नाहित म्हणुन तीनेच त्याला जाउ दिल असाव. माझ्या वाचनात तरी कुठेही तीने अशोक सराफ वर आरोप केलेले नाहीत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Jan 2011 - 1:08 pm | निनाद मुक्काम प...

तिने त्याला जाऊ दिले असेल कदाचित नसेन .
पण खुपणारी गोष्ट म्हणजे ह्या मामाच्या एवढ्या मुलाखती होतात .पण एकदाही रंजनाचा उल्लेख नाही .(तसा कोणीच करत नाही .म्हणा आता )

त्यांची जोडी गाजली होती .
बाकी भुजंग सिनेमा मला रंजना आठवतो तो म्हणजे भुजंग हि उपमा त्या सिनेमातील खलनायक सावकार ह्याला असते जो तिच्या रूपावर मोहित होऊन ती मिळवण्यासठी वाट्टेल त्या लातापती करतो .ह्यात तिचा नवरा मारतो .कुटुंब उद्ध्वस्त होते .पण हि जिद्दीने उभी राहते .ती म्हातारी होते. तेव्हा सुध्धा हा सावकार तीच्य अडवा येतो .म्हातारपणातील तिचे बेअरिंग अप्रतिम

यशोधरा's picture

28 Jan 2011 - 1:20 pm | यशोधरा

आयबीएन लोकमतवर अशोक सराफ ह्यांच्या नितीन वागळे ह्यांनी घेतलेल्या मुलाखतीत, रंजनाबद्दल वागळे ह्यांनी प्रश्न विचारले होते आणि सराफ ह्यांनी खूप संयत व हृद्द्य उत्तर दिले होते.

नेहमी काय बोलणार ते तिच्याबद्दल? आणि का बोलावे? त्यांच्या मनात तिला जरुर काहीतरी स्थान असेल.

यशो - ही मुलाखत नेटावर आहे का? दुवा वगैरे असेल तर बरेच होईल.

यशोधरा's picture

28 Jan 2011 - 10:23 pm | यशोधरा

माहित नाही गं पहायला हवे.

>>लग्ना नंतर कामावर निघालेल्या रविंद्र महाजनीला जिन्यातुन उतरु देत ती वरुन सांगते' आव लग्ना नंतर पयल्यांदाच ड्युटीवत निघालासा, चांगल दोन चार चोर पकडुन दावा'

हाहाहा :-)
मला पण 'मुंबईचा फोजदार' सिनेमा खूप आवडतो.
आणि रंजना पण माझी खूप आवडती नटी.

थोडे अवांतरः
सध्याच्या मराठी सिनेमातला १ अभिनेता पण मला खूप आवडतो. रूपामुळे थोडा दुर्लक्षिलेला पण अभिनयसंपन्न सिद्धार्थ जाधव.

यशोधरा's picture

28 Jan 2011 - 12:40 pm | यशोधरा

रंजनावरचा धागा खूप आवडला. अतिशय गुणी अभिनेत्री होती.
शांताबाई जोग, जयराम हर्डीकर, भक्ती बर्वे, अरुण सरनाई़क ह्यांचे उल्लेख पाहूनही बरे वाटले. गुणी कलाकार होते.

मुलूखावेगळी's picture

28 Jan 2011 - 1:07 pm | मुलूखावेगळी

ही असली तरच मी लहानपनी मराठी पिक्चर बघायचे
डान्स तर लै भारी असायचा
ते १ गाने होते
डोळ्याला डोळं हातात हातात
आरं सजना हिथेच भेट घडली

हिच्यासोबत अशोक सराफ असला तर अजुन मज्जा

अनि अजुन १ पिक्चर होता हिचा
कुलदीप पवार सोबतचा
त्यात त्यान्चा बालविवाह होता
अनि आंतरपाटातुन त्यांचे भान्डने
त्याचा नाव आठवतेय का कोनाला?
बाकि मुम्बैचा फौजदार,गोण्धळात गोन्धल, गुपचुप गुपचुप पन भारी

अनि अजुन १ आहे
त्यात ही निवडनुकीत उभी रहाते
अनि अशोक सराफ हिचा नवरा आहे
तो फार कॉमेडी आहे.

विजुभाऊ's picture

28 Jan 2011 - 1:16 pm | विजुभाऊ

ऱंजना चा चित्रपट , तिचा सहज अभिनय आणि डायलॉग डीलेव्हरी फारच उत्तम होती.
एक डाव भुताचा मध्ये प्रेमात पडल्यावर दिलीप प्रभावळकराना ती काही गोडधोड खाऊ घालते. त्यावर प्रभावळकर विचारतात " आज काही सण आहे का?" रंजना उत्तरते " पोळा आहे... गिळा...." सगळा विनोद त्या उच्चारात आणि रंजनाच्या नजरेत आहे.
दुसरे म्हणजे चित्रपट आठवत नाही पण रंजनाची आई जावयाला तेलाच्या घाण्याला जुंपते . रंजना नवर्‍याला "गोणपाट" म्हणून हाक मारत असते. इतकी सहजता अभिनयात फारच क्वचित दिसते

योगप्रभू's picture

28 Jan 2011 - 2:37 pm | योगप्रभू

विजूभाऊ,
तो चित्रपट म्हणजे 'सासू वरचढ जावई'. पण त्यात रंजना लाडाने नवर्‍याला गोणपाट नव्हे तर 'टिनपाट' म्हणून हाक मारत असते. कारण दोघांची पहिली भेट आठवडा बाजारात झालेली असते. विचारांच्या नादात असलेले ते दोघे एक टिनपाट लाथ मारुन परस्परांकडे टोलवत असतात. म्हणून पुढे रंजना अख्ख्या चित्रपटात अशोकला 'माजं टिनपाट' असे म्हणते. रंजनाला अशोक तिच्या नावाने म्हणजे 'मोगरा' असेच म्हणतो. पिक्चर भारीच होता. पद्मा चव्हाणने साकारलेली खाष्ट सासू 'गंगू तेलीण' एकदम ठसकेबाज.

मेघवेडा's picture

28 Jan 2011 - 5:08 pm | मेघवेडा

रंजना उत्तरते " पोळा आहे... गिळा...." सगळा विनोद त्या उच्चारात आणि रंजनाच्या नजरेत आहे.

अगदी अगदी!

आणि योगप्रभू म्हणतात त्याप्रमाणं 'सासू वरचढ जावई' मध्ये गोणपाट नव्हे "आवं टिनपाट". ते म्हणण्याची तर्‍हाही न्यारीच! धमाल एकदम!!

असुर's picture

28 Jan 2011 - 4:58 pm | असुर

लहानपणी रंजनाचे चित्रपट अतिशय आवडीने पहायचो. गोंधळात गोंधळ, बिनकामाचा नवरा, गुपचुप गुपचुप!! व्वा! अजूनही आवडतात पहायला! रंजनाचा अजून एक पिक्चर आहे, 'खिचडी' नावाचा, अर्थातच अशोक सराफ बरोबर! काय अशक्य काम केलंय तिने, बाकी स्टारकास्ट सोसो आहे!

आणि अपघातानंतर अशोक सराफने तिला सोडून दिलं, जाणूनबुजून दुर्लक्ष केलं वगैरे हे आपण गॉसिप म्हणून म्हणू शकतो, पण कदाचित असं नसेलही! कारण रंजनाची एक मुलाखत दूरदर्शनवर झाली होती, तेव्हा ती अशोक सराफ बद्दल अतिशय व्यवस्थित बोलल्याचं आठवतं. तसंच अशोक सराफला सुद्धा गेल्या अनेक मुलाखतींपैकी एकात रंजनाविषयी विचारले असता तोही छानच बोलला होता, अगदी भावूक वगैरे होऊन!
रंजना आणि अशोक सराफ दोघेही अगदीच लाडके असल्याने या दोन्ही मुलाखती लक्षात आहेत.

एक मात्र खरं, या अतिशय गुणी अभिनेत्रीच्या कारकिर्दीची अखेर अशी व्हायला नको होती! ती सध्याच्या सिरियलच्या जमान्यात खतरनाक सासू, प्रेमळ आई, किंवा धमाल विनोदी भूमिका करुन सगळ्यांच्या लक्षात राहीली असती आणि हल्लीच्या एखाद्या तद्दन बकवास पुरस्कार सोहळ्यातदेखील तिला जीवनगौरब पुरस्कार वगैरे स्विकारुन पुरस्काराची शोभा वाढवताना पाहून बरं वाटलं असतं!

--असुर

गणपा चांगला धागा आहे. बरेचसे चित्रपट नीट आठवत नाहीत, त्यामुळे या विकांताला एक्-दोन बघायला मिळाला तर छानच!

ज्यांच्या कडे नेट चा स्पीड चांगला आहे त्यांच्या साठी ही मेजवानी.

गोंधळात गोंधळ. (ही लिंक माझ्या कडे चालत नाहीये. त्यामुळे खात्री देतायेत नाही.)
http://www.imovietv.com/movies/show_details.aspx?i=125&s=1

बिनकामाचा नवरा

http://www.imovietv.com/movies/show_details.aspx?i=451&s=DAILYMOTION-1

sneharani's picture

29 Jan 2011 - 12:39 pm | sneharani

बिनकामाचा नवरा...! मस्त पिक्चर! मजा येते ज्या ज्या वेळी हा चित्रपट पाहते तेव्हा!
आभार हो गणपाभाऊ.! :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 Jan 2011 - 3:21 pm | निनाद मुक्काम प...

http://www.dailymotion.com/video/x8z78t_sasu-varchadh-jawai-1_shortfilms...
सासू वर चढ जावई ची लिंक .देतो

अमित मुंबईचा's picture

25 Feb 2015 - 3:52 pm | अमित मुंबईचा

युट्यूब वर सुद्धा आहे, बीनकामाचा नवरा

Bin Kamacha Navra - Full Marathi Movie - Ashok Saraf, Ranjana, Nilu Phule - Superhit Comedy Movie

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Jan 2011 - 7:41 pm | निनाद मुक्काम प...

कोण होतीस तू ह्या गाण्याच्या निम्मिताने लिहितो
माझ्या मते हा महाजनी ह्यांचा पहिला चित्रपट
महाजनी ह्यांना त्यांच्या कॉलेजात मराठी विनोद खन्ना म्हणायचे .
असा हा रुबाबदार उमदा नायक पदार्पणात बापूच्या तालमीत अत्यंत जोशात वावरला आहे .त्याचे स्टार होण्याची लक्षणे व रंजना बरोबर जमलेली केमिस्ट्री दिसून येते .
ह्या गाण्यात वाया गेलास तू असे म्हणाना पंजांनी तुच्छतेने महाजनी ह्यांकडे रंजना कटाक्ष टाकते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भाव हे अस्सल नट व स्टार चे आहेत .
ह्या गाण्यातील शब्द हे त्या काळातील मुलांची मुलींशी तुलना व एकंदरीत सवाल जवाब जबरदस्त .
माझ्या मते हिंदी सिनेमात तिने चुकुनही नोकरांची तीनपट कामे केली नसती ते तिच्या स्वभावाला शोभले नसते (मराठी चे सुपरस्टार जेव्हा पायपुसणी चे रोल हिंदीत करायचे तेव्हा खरच वाईट वाटायचे .

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Mar 2011 - 8:58 pm | निनाद मुक्काम प...

लक्ष्मीची पावले ह्या सिनेमातील शेवटचा सीन हा रंजनाबदल म्हणजेच मी तिला मराठी सिनेमातील अमिताभ का म्हणालो होतो .ते स्पष्ट होईन .

प्रसंग असा की कंपनीचे मालक व कामगार नेते ह्यांच्यात मांडवली होते .व कराराची बोलणी होतात .
ह्या प्रसंगात रंजना मालकीण बाई म्हणून हजर असतात .
बाकी माझ्या मते अशोक सराफ /रविद्र महाजनी ( मराठी सिनेमातील विनोद खन्ना असा त्यांचा उल्लेख व्हायचा .) त्याकाळात विनोद हा अमिताभ पेक्षा प्रसिध्द होता .
व आशा काळे असे अनेक दिग्गज
ह्यात रंजना ह्यांना एकाही वाक्य नाही मात्र .अशोक मामास आहे .

पण जेव्हा सर्व कलाकारांची एक झलक दिसते .त्यात केवळ २ ते ३ सेकंद रंजनाची झलक दिसते .
तेव्हा तोंडात काजू किंवा तस्सम गोष्ट चघळत असल्याचा एक बिलंदर भाव मुद्रा ती करते .( पूर्ण सिनेमात तिची ह्याच पठडीतील भूमिका म्हणजे श्रीमंतीचा व आपल्या शिक्षण व शहरी पणाचा तोरा मिरवणे होती. )

ह्या संपूर्ण सीन मध्ये महत्वाचे संवाद म्हणणारे (म्हणजे समाजवादाचे समर्थन करणारे /कामगार एकजुटीचा विजय दाखवणारे ) संवाद बाजूला दुय्यम ठरतात व प्रेषक सिनेमागृहातून बाहेर पडताना रंजना व तिची भूमिका एवडेच लक्षात ठेवून बाहेर पडतो .

नुकताच महिला दिन झाला .

पण त्या काळात पुरुष प्रधान भारतीय सिनेजगतात
एक महिला असून अशी एकतर्फी सत्ता गाजवणारी तीच
.
अनिल कपूर ने तेजाब मध्ये माधुरी गाजली त्याची सव्याज परतफेड १ टू का ४ म्हणत रामलखन मध्ये केली .
रंजनाला असे कोणीच भारी पडले नाही .

तिच्या नंतर प्रिया बेर्डे म्हणतात तसे'' भूमिकांची वाटणी झाली''
गावाकडच्या भूमिका तिच्याकडे व शहरी किशोरी व अश्विनी कडे
वर्षा ताई होत्या त्या दोन्ही साकारायच्या
पण महागुरू त्यांना संधी देत नसत शिनेमाचे मुख्य आकर्षण बनण्याचे .

म्हणून म्हणतो'' तिच्या सारखी तीच''

मीरा राने's picture

25 Feb 2015 - 12:13 pm | मीरा राने

२०११ चा ब्लोग आहे. आत्ताहि चालु आहे का?

दुश्यन्त's picture

25 Feb 2015 - 1:51 pm | दुश्यन्त

रंजना ही मराठीतील आवडत्या अभिनेत्रींच्या यादीत आहेच. वर उल्लेखण्यात बरेचसे आलेले चित्रपट आणि भूमिका पाहिले आहेत. तिचे आणि अशोक सराफचे 'मनाने माझ्या हेरलाय ऐसा…' हे गाणे लहानपणी टीव्ही वर लागायचे. युट्यूबवर पण सापडले नाही.बहुतेक गुपचूप'मधले आहे पण त्या पिक्चरच्या विडीओ मध्ये पण दिसत नाहीये. रंजना आणि अशोक गवळी, शेतकरी, सोनार , शहरी पांढरपेशा अश्या अनेक गेटअपमध्ये एकाच गाण्यात दिसतात. मस्त वाटायचे तेव्हा गाणे पाहताना.

माझ्यापण प्रचंड आवडीचं आहे हे गाणं!! गाणं चार की पाच मिनटांचं असल्याने पिक्चरमधून वजा केलं असावं. सह्याद्रीवर कधी कधी लागतं. तुनळीवर अजून शोधलं नाहीये.