तिने त्याला जाऊ दिले असेल कदाचित नसेन .
पण खुपणारी गोष्ट म्हणजे ह्या मामाच्या एवढ्या मुलाखती होतात .पण एकदाही रंजनाचा उल्लेख नाही .(तसा कोणीच करत नाही .म्हणा आता )
त्यांची जोडी गाजली होती .
बाकी भुजंग सिनेमा मला रंजना आठवतो तो म्हणजे भुजंग हि उपमा त्या सिनेमातील खलनायक सावकार ह्याला असते जो तिच्या रूपावर मोहित होऊन ती मिळवण्यासठी वाट्टेल त्या लातापती करतो .ह्यात तिचा नवरा मारतो .कुटुंब उद्ध्वस्त होते .पण हि जिद्दीने उभी राहते .ती म्हातारी होते. तेव्हा सुध्धा हा सावकार तीच्य अडवा येतो .म्हातारपणातील तिचे बेअरिंग अप्रतिम
आयबीएन लोकमतवर अशोक सराफ ह्यांच्या नितीन वागळे ह्यांनी घेतलेल्या मुलाखतीत, रंजनाबद्दल वागळे ह्यांनी प्रश्न विचारले होते आणि सराफ ह्यांनी खूप संयत व हृद्द्य उत्तर दिले होते.
नेहमी काय बोलणार ते तिच्याबद्दल? आणि का बोलावे? त्यांच्या मनात तिला जरुर काहीतरी स्थान असेल.
>>लग्ना नंतर कामावर निघालेल्या रविंद्र महाजनीला जिन्यातुन उतरु देत ती वरुन सांगते' आव लग्ना नंतर पयल्यांदाच ड्युटीवत निघालासा, चांगल दोन चार चोर पकडुन दावा'
हाहाहा :-)
मला पण 'मुंबईचा फोजदार' सिनेमा खूप आवडतो.
आणि रंजना पण माझी खूप आवडती नटी.
थोडे अवांतरः
सध्याच्या मराठी सिनेमातला १ अभिनेता पण मला खूप आवडतो. रूपामुळे थोडा दुर्लक्षिलेला पण अभिनयसंपन्न सिद्धार्थ जाधव.
रंजनावरचा धागा खूप आवडला. अतिशय गुणी अभिनेत्री होती.
शांताबाई जोग, जयराम हर्डीकर, भक्ती बर्वे, अरुण सरनाई़क ह्यांचे उल्लेख पाहूनही बरे वाटले. गुणी कलाकार होते.
ही असली तरच मी लहानपनी मराठी पिक्चर बघायचे
डान्स तर लै भारी असायचा
ते १ गाने होते
डोळ्याला डोळं हातात हातात
आरं सजना हिथेच भेट घडली
हिच्यासोबत अशोक सराफ असला तर अजुन मज्जा
अनि अजुन १ पिक्चर होता हिचा
कुलदीप पवार सोबतचा
त्यात त्यान्चा बालविवाह होता
अनि आंतरपाटातुन त्यांचे भान्डने
त्याचा नाव आठवतेय का कोनाला?
बाकि मुम्बैचा फौजदार,गोण्धळात गोन्धल, गुपचुप गुपचुप पन भारी
अनि अजुन १ आहे
त्यात ही निवडनुकीत उभी रहाते
अनि अशोक सराफ हिचा नवरा आहे
तो फार कॉमेडी आहे.
ऱंजना चा चित्रपट , तिचा सहज अभिनय आणि डायलॉग डीलेव्हरी फारच उत्तम होती.
एक डाव भुताचा मध्ये प्रेमात पडल्यावर दिलीप प्रभावळकराना ती काही गोडधोड खाऊ घालते. त्यावर प्रभावळकर विचारतात " आज काही सण आहे का?" रंजना उत्तरते " पोळा आहे... गिळा...." सगळा विनोद त्या उच्चारात आणि रंजनाच्या नजरेत आहे.
दुसरे म्हणजे चित्रपट आठवत नाही पण रंजनाची आई जावयाला तेलाच्या घाण्याला जुंपते . रंजना नवर्याला "गोणपाट" म्हणून हाक मारत असते. इतकी सहजता अभिनयात फारच क्वचित दिसते
विजूभाऊ,
तो चित्रपट म्हणजे 'सासू वरचढ जावई'. पण त्यात रंजना लाडाने नवर्याला गोणपाट नव्हे तर 'टिनपाट' म्हणून हाक मारत असते. कारण दोघांची पहिली भेट आठवडा बाजारात झालेली असते. विचारांच्या नादात असलेले ते दोघे एक टिनपाट लाथ मारुन परस्परांकडे टोलवत असतात. म्हणून पुढे रंजना अख्ख्या चित्रपटात अशोकला 'माजं टिनपाट' असे म्हणते. रंजनाला अशोक तिच्या नावाने म्हणजे 'मोगरा' असेच म्हणतो. पिक्चर भारीच होता. पद्मा चव्हाणने साकारलेली खाष्ट सासू 'गंगू तेलीण' एकदम ठसकेबाज.
लहानपणी रंजनाचे चित्रपट अतिशय आवडीने पहायचो. गोंधळात गोंधळ, बिनकामाचा नवरा, गुपचुप गुपचुप!! व्वा! अजूनही आवडतात पहायला! रंजनाचा अजून एक पिक्चर आहे, 'खिचडी' नावाचा, अर्थातच अशोक सराफ बरोबर! काय अशक्य काम केलंय तिने, बाकी स्टारकास्ट सोसो आहे!
आणि अपघातानंतर अशोक सराफने तिला सोडून दिलं, जाणूनबुजून दुर्लक्ष केलं वगैरे हे आपण गॉसिप म्हणून म्हणू शकतो, पण कदाचित असं नसेलही! कारण रंजनाची एक मुलाखत दूरदर्शनवर झाली होती, तेव्हा ती अशोक सराफ बद्दल अतिशय व्यवस्थित बोलल्याचं आठवतं. तसंच अशोक सराफला सुद्धा गेल्या अनेक मुलाखतींपैकी एकात रंजनाविषयी विचारले असता तोही छानच बोलला होता, अगदी भावूक वगैरे होऊन!
रंजना आणि अशोक सराफ दोघेही अगदीच लाडके असल्याने या दोन्ही मुलाखती लक्षात आहेत.
एक मात्र खरं, या अतिशय गुणी अभिनेत्रीच्या कारकिर्दीची अखेर अशी व्हायला नको होती! ती सध्याच्या सिरियलच्या जमान्यात खतरनाक सासू, प्रेमळ आई, किंवा धमाल विनोदी भूमिका करुन सगळ्यांच्या लक्षात राहीली असती आणि हल्लीच्या एखाद्या तद्दन बकवास पुरस्कार सोहळ्यातदेखील तिला जीवनगौरब पुरस्कार वगैरे स्विकारुन पुरस्काराची शोभा वाढवताना पाहून बरं वाटलं असतं!
--असुर
ज्यांच्या कडे नेट चा स्पीड चांगला आहे त्यांच्या साठी ही मेजवानी.
गोंधळात गोंधळ. (ही लिंक माझ्या कडे चालत नाहीये. त्यामुळे खात्री देतायेत नाही.)
http://www.imovietv.com/movies/show_details.aspx?i=125&s=1
बिनकामाचा नवरा
http://www.imovietv.com/movies/show_details.aspx?i=451&s=DAILYMOTION-1
कोण होतीस तू ह्या गाण्याच्या निम्मिताने लिहितो
माझ्या मते हा महाजनी ह्यांचा पहिला चित्रपट
महाजनी ह्यांना त्यांच्या कॉलेजात मराठी विनोद खन्ना म्हणायचे .
असा हा रुबाबदार उमदा नायक पदार्पणात बापूच्या तालमीत अत्यंत जोशात वावरला आहे .त्याचे स्टार होण्याची लक्षणे व रंजना बरोबर जमलेली केमिस्ट्री दिसून येते .
ह्या गाण्यात वाया गेलास तू असे म्हणाना पंजांनी तुच्छतेने महाजनी ह्यांकडे रंजना कटाक्ष टाकते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भाव हे अस्सल नट व स्टार चे आहेत .
ह्या गाण्यातील शब्द हे त्या काळातील मुलांची मुलींशी तुलना व एकंदरीत सवाल जवाब जबरदस्त .
माझ्या मते हिंदी सिनेमात तिने चुकुनही नोकरांची तीनपट कामे केली नसती ते तिच्या स्वभावाला शोभले नसते (मराठी चे सुपरस्टार जेव्हा पायपुसणी चे रोल हिंदीत करायचे तेव्हा खरच वाईट वाटायचे .
लक्ष्मीची पावले ह्या सिनेमातील शेवटचा सीन हा रंजनाबदल म्हणजेच मी तिला मराठी सिनेमातील अमिताभ का म्हणालो होतो .ते स्पष्ट होईन .
प्रसंग असा की कंपनीचे मालक व कामगार नेते ह्यांच्यात मांडवली होते .व कराराची बोलणी होतात .
ह्या प्रसंगात रंजना मालकीण बाई म्हणून हजर असतात .
बाकी माझ्या मते अशोक सराफ /रविद्र महाजनी ( मराठी सिनेमातील विनोद खन्ना असा त्यांचा उल्लेख व्हायचा .) त्याकाळात विनोद हा अमिताभ पेक्षा प्रसिध्द होता .
व आशा काळे असे अनेक दिग्गज
ह्यात रंजना ह्यांना एकाही वाक्य नाही मात्र .अशोक मामास आहे .
पण जेव्हा सर्व कलाकारांची एक झलक दिसते .त्यात केवळ २ ते ३ सेकंद रंजनाची झलक दिसते .
तेव्हा तोंडात काजू किंवा तस्सम गोष्ट चघळत असल्याचा एक बिलंदर भाव मुद्रा ती करते .( पूर्ण सिनेमात तिची ह्याच पठडीतील भूमिका म्हणजे श्रीमंतीचा व आपल्या शिक्षण व शहरी पणाचा तोरा मिरवणे होती. )
ह्या संपूर्ण सीन मध्ये महत्वाचे संवाद म्हणणारे (म्हणजे समाजवादाचे समर्थन करणारे /कामगार एकजुटीचा विजय दाखवणारे ) संवाद बाजूला दुय्यम ठरतात व प्रेषक सिनेमागृहातून बाहेर पडताना रंजना व तिची भूमिका एवडेच लक्षात ठेवून बाहेर पडतो .
नुकताच महिला दिन झाला .
पण त्या काळात पुरुष प्रधान भारतीय सिनेजगतात
एक महिला असून अशी एकतर्फी सत्ता गाजवणारी तीच
.
अनिल कपूर ने तेजाब मध्ये माधुरी गाजली त्याची सव्याज परतफेड १ टू का ४ म्हणत रामलखन मध्ये केली .
रंजनाला असे कोणीच भारी पडले नाही .
तिच्या नंतर प्रिया बेर्डे म्हणतात तसे'' भूमिकांची वाटणी झाली''
गावाकडच्या भूमिका तिच्याकडे व शहरी किशोरी व अश्विनी कडे
वर्षा ताई होत्या त्या दोन्ही साकारायच्या
पण महागुरू त्यांना संधी देत नसत शिनेमाचे मुख्य आकर्षण बनण्याचे .
म्हणून म्हणतो'' तिच्या सारखी तीच''
रंजना ही मराठीतील आवडत्या अभिनेत्रींच्या यादीत आहेच. वर उल्लेखण्यात बरेचसे आलेले चित्रपट आणि भूमिका पाहिले आहेत. तिचे आणि अशोक सराफचे 'मनाने माझ्या हेरलाय ऐसा…' हे गाणे लहानपणी टीव्ही वर लागायचे. युट्यूबवर पण सापडले नाही.बहुतेक गुपचूप'मधले आहे पण त्या पिक्चरच्या विडीओ मध्ये पण दिसत नाहीये. रंजना आणि अशोक गवळी, शेतकरी, सोनार , शहरी पांढरपेशा अश्या अनेक गेटअपमध्ये एकाच गाण्यात दिसतात. मस्त वाटायचे तेव्हा गाणे पाहताना.
माझ्यापण प्रचंड आवडीचं आहे हे गाणं!! गाणं चार की पाच मिनटांचं असल्याने पिक्चरमधून वजा केलं असावं. सह्याद्रीवर कधी कधी लागतं. तुनळीवर अजून शोधलं नाहीये.
प्रतिक्रिया
तिने त्याला जाऊ दिले असेल
आयबीएन लोकमतवर अशोक सराफ
यशो - ही मुलाखत नेटावर आहे
माहित नाही गं पहायला हवे.
>>लग्ना नंतर कामावर
रंजनावरचा धागा खूप आवडला.
ही असली तरच मी लहानपनी मराठी
ऱंजना चा चित्रपट , तिचा सहज
विजूभाऊ! थोडी दुरुस्ती
रंजना उत्तरते " पोळा आहे...
रंजना, बालपणीची आवड!
गणपा चांगला धागा आहे. बरेचसे
ईथे पहा : गोंधळात गोंधळ. / बिनकामाचा नवरा.
अरे
तेच म्हणतो मी
युट्यूब लिंक
कोण होतीस तू ह्या गाण्याच्या
लक्ष्मीची पावले ह्या
ब्लोग चान आहे
रंजना ही मराठीतील आवडत्या
माझ्यापण प्रचंड आवडीचं आहे हे