चौथा मजला (पूर्वार्ध)

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जनातलं, मनातलं
29 Sep 2010 - 7:41 pm

कथेतील स्थळे, पात्रे पुर्णतः काल्पनिक आहेत. पहिल्यांदाच कथा हा प्रकार हाताळतो आहे. सांभाळून घ्यालच. पुढचा भाग डोक्यात पक्का आहे. लवकरच टंकेन

"आज कारखान्यात जाशील तेव्हा चौथ्या मजल्यावर हे पान न विसरता ठेव होऽ"
दर वर्षी पितृपंधरवड्याच्या तृतीयेला आजी ही सुचना बाबांबा पूर्वी दिल्याचे रोहनला आठवले. आज तीच सुचना आई त्याला देत होती. का कोण जाणे पण, रोहनने बाबांना कधी आजीला हे का करायचं, हे का नाही करायचं वगैरे विचारताना बघितलं नव्हतं. पण त्याला आता अजून उत्सूकता थोपवणं शक्य नव्हतं.
"पण का?" बहुदा जो प्रश्न कधी विचारला गेला नव्हता तो त्याने विचारला होता.
आईचा चेहरा कावराबावरा झाला.
"हे बघ, तुला सांगितलं आहे ते ऐक. नसते प्रश्न विचारू नकोस" आईनं ते पान आणि त्यावरचे जिन्नस पॅक केले होते ते टेबलवर ठेऊन ती रोहनचं काहीही न ऐकता आत गेली. रोहनही एखाद्या गोष्टीच्या मागे लागला की ती गोष्ट अशी सहज सोडणार्‍यातला नव्हता. तोही आईच्या मागे गेला.
"अगं हे काय? रागावतेस काय? तु सांग अथवा सांगु नकोस मी पान ठेवणारच आहेस पण गेली ३० वर्षे मी हे बघतोय. आधी आजी बाबांना हे पान ठेवायला द्यायची. त्यांनी आजीला कधीतरी विचारलं असेलच की नाही? की हे का करायचं? "
आई काहीच बोलली नाही,
"अगं सांग ना गंऽ"
"हे बघ रोहन. काही प्रश्न असे असतात ज्याची उत्तरे मिळवायला जाऊ नयेत. त्यांची उत्तरे मिळाल्यावर होणारा त्रास ती उत्तरे माहित नसताना होणार्‍या त्रासापेक्षा फार कमी असतो."
"हे बघ ज्या अर्थी आपण पितृपक्षात एका विशिष्ट दिवशी पान ठेवतो त्या अर्थी हे कोणा व्यक्तीशी निगडीत असणार इतकं मला कळतं. ती डिटेल्स तुला माहित नाहीत म्हणाली असतीस तर ठिक आहे. पण ते पान कारखान्यात ठेवणं, तेही त्या चौथ्या मजल्यावर जी जागा मला बाबा ऑफीसच्या एक्सपांशनसाठीही वापरू देत नाहीत- रिकामीच ठेवायला लावतात, तेही कोणासाठी हे मला माहित नसताना; तु ते मला सांगणार नाहीस हे जरा अती होत नाही का?"
"हे बघ तुझ्या आजोबांनी मोठ्या कष्टाने हा व्यवसाय सुरू केला आहे. तुझ्या आजीने त्यासाठी खूप त्रास सहन केला. ही जागा टिकवण्यामागेही तिचा त्याग फार मोठा आहे. तेव्हा जिच्यामुळे ही जागा मिळाली.."
आणि आई अचानक गप्प झाली
"अगं काय? कोणामुळे जागा मिळाली?"
"हे बघ रोहन! तुला शेवटचं सांगतेय. तुझी जर इच्छा असेल तर आजीच्या व बाबांच्या मर्जीखातर आज तिथे पान ठेव. तेही सूर्यास्ताच्या आत. नाहीतर तु आणि तुझं नशीब"
"अग आई..."
आई ने तोंडावर बोट ठेवलं आणि खूण केली मागे बाबा व्हीलचेअरवरून येत होते. त्यांनी टेबलवरची तयारी पाहिली आणि रोहनच्या पाठिवरून हात फिरवला, म्हणाले, "हा खरा गुणी पोरगा आहे. माझ्या अ‍ॅक्सिडन्टनंतर फक्त ऑफीसच सांभाळतोय असं नाही तर माझे ऋणही फेडतोय"
"म्हणजे?"
"म्हणजे काही नाही. नीघ तू." रोहन आईसमोर कितीही आकांडतांडव करत असला तरी बाबांचा अ‍ॅक्सिडन्ट झाल्यापासून त्यांच्याशी वाद टाळत होता.
रोहनने बुट चढवले. स्वतःचा डबा आणि आईने दिलेली पानाची तयारी गाडीत भरली आणि ऑफीसकडे निघाला.
तो गेल्यावर आई बाबांना म्हणाली "त्याला एकदा सांगून टाकुया. खूप खोदून विचारत होता."
"हो! तो आता मोठा झालाय आणि इतक्या वर्षांनी लपवण्यासारखं काही राहिलेलं नाही. पुढच्यावेळी जेव्हा विचारेल तेव्हा सांग त्याला"
-------------
रोहन कारखान्यात पोचला पण तो अस्वस्थ होता. आपल्यापासून गोष्ट लपवून ठेवली आहे हे त्याला अधिक अस्वस्थ करत होतं. त्याच्या आजोबांनी हा उभा केलेला कारखाना. एकट्याने पेरलेल्या बीजाचा आता वृक्ष झाला होता. रोहन त्याची फळे चाखत होता. आता कारखान्याचा व्याप इतका वाढला होता की आजुबाजुची जमिनही ताब्यात घेऊन तिथेही काम चालु होतं. अपवाद होता ह्या चौथ्या मजल्याचा. तिथे कोणालाही काम करायला परवानगी नव्हती. अर्थातच त्यामुळे त्यामजल्याबद्दल अनेक वदंता होत्या. आज रोहन तिथे जाणार होता.

संध्याकाळ व्हायची होती. आईने सूर्यास्ताच्या आत पान ठेवायला सांगितलं होतं. रोहनची पहिलीच वेळ होती. तो तिसर्‍या मजल्यावर उभा होता. वर जाणारा जिना त्याला खुणावत होता. जिना नेहमीचाच फक्त पायर्‍यांवर धुळ. काही पावले देखील. "चौथ्या मजल्याला एक ओपन टेरेस आहे तिथे काहि मंडळी फुंकायला जात त्यांच्या पावलांचे ठसे असतील" रोहनने विचार केला.
शेवटी तो वर गेलाच. दार लोटलेले होते त्याने मनाचा हिय्या केला दार उघडले. आत गेला पान काढलं.. वर पदार्थ मांडले.. आणि निघणार इतक्यात त्याला टेरेसवर कुणी आहे असा भास झाला.. तो गर्रकन वळला.. एक मुलगी पाठमोरी उभी होती.. एकटीच..
"कोण असेल ही?" रोहनने स्वत:शीच प्रश्न केला. स्वतः स्वतःलाच उत्तर देऊ लागला "असेल कोणी तरी कर्मचारी. आली असेल वरती. तुझं काम संपलं ना चल खाली चल"
खाली जायला निघाला आणि पुन्हा वळला "बघुया तर कोण आहे!"
तिच्या मागे उभा राहिला. ती जराही हलली नव्हती.
"एक्सक्युजमी!"
काहि उत्तर नाही
"एक्सक्युजमीऽ मिस"
फक्त वार्‍याचा एक झोत तिची ओढणी फडफडवून गेला. तिने केस मोकळे सोडले होते. ते मात्र खोटे असल्यासारखे स्तब्ध होते.
"एक्सक्युजमी!!!" रोहन जरा जोरात बोलला, पण प्रतिसाद न आल्याने त्याने तिला स्पर्श केला.
ती फटकन मागे वळली!!!
"हाय रोहन!!"
रोहन अचानक आपले नाव पुकारले गेल्याने दचकला आणि तिच्याकडे बघतच राहिला....
(क्रमशः)

कथा

प्रतिक्रिया

शामलभाटे's picture

29 Sep 2010 - 7:52 pm | शामलभाटे

पुढील भाग लवकर टाका!

प्रियाली's picture

29 Sep 2010 - 7:54 pm | प्रियाली

भूत भूत भूत आहे का? पुढला भाग लवकर टंक.

नगरीनिरंजन's picture

29 Sep 2010 - 7:55 pm | नगरीनिरंजन

वाचतोय.

वाचतोय रे ऋ.
चांगल लिहिलयस. आंदो अगला भाग.....

श्रावण मोडक's picture

29 Sep 2010 - 7:59 pm | श्रावण मोडक

आयला... पहिलाच प्रयत्न? सकाळच्यान कोण भेटलं नाही का?
लिही पुढचा भाग. वाचतोय!

पैसा's picture

29 Sep 2010 - 8:43 pm | पैसा

एकदम नारायण धारप वाचतेय काय असं वाटलं.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Sep 2010 - 9:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ऋषि'ली', होतास कुठे एवढे दिवस?

विजुभाऊ's picture

29 Sep 2010 - 11:04 pm | विजुभाऊ

ऋषि'ली', होतास कुठे एवढे दिवस?
ठ्यॉ......... =)) =)) =))
ऋष्या आता ही गोष्ट आत"ली" आहे पण तुला सांगतो. ते जे कोणी /जे काही आहे ना त्याचा शेवट भरधाव ट्रक च्या खाली करायला विसरायचे नाही हां

मस्त कलंदर's picture

29 Sep 2010 - 8:19 pm | मस्त कलंदर

ऋ, पुढ्च्या भागाची वाट पाहातेय.. सुरूवात तर एकदम झक्कास झालीय

गणेशा's picture

29 Sep 2010 - 8:20 pm | गणेशा

मसत लिहित आहात ..

वाचतोय

शेखर's picture

29 Sep 2010 - 8:21 pm | शेखर

उत्सुकता वाढली आहे...

मेघवेडा's picture

29 Sep 2010 - 8:24 pm | मेघवेडा

हम्म..

विकास's picture

29 Sep 2010 - 8:40 pm | विकास

पहीला भाग मस्त!

प्रभो's picture

29 Sep 2010 - 8:50 pm | प्रभो

लवकर लिहि रे ऋ पुढचा भाग. :)

शिल्पा ब's picture

29 Sep 2010 - 9:04 pm | शिल्पा ब

उत्कंठा वाढविण्यात यशस्वी...
पुढचा भाग टाका लवकर.

सविता's picture

29 Sep 2010 - 9:39 pm | सविता

वाचतेय......

यशवंतकुलकर्णी's picture

29 Sep 2010 - 10:30 pm | यशवंतकुलकर्णी

बेस्ट.. :) येऊद्या लवकर!

मग पुढे काय झालं?
लवकर टंका हो साहेब!

शुचि's picture

29 Sep 2010 - 10:52 pm | शुचि

उत्कंठावर्धक

ऋषिकेश's picture

30 Sep 2010 - 12:21 am | ऋषिकेश

इतक्या उत्साहवर्धक प्रतिक्रीयांबद्दल आभार. पुढचा भाग टंकतो आहेच. उद्यापर्यंत प्रकाशित करायचा प्रयत्न करतो

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Sep 2010 - 12:27 am | विश्वनाथ मेहेंदळे

अशा ठिकाणी क्रमश: टाकल्याबद्दल निषेध. पुढील भाग लवकर टाकल्यासच निषेध मागे घेतला जाईल. :-)

जानम's picture

30 Sep 2010 - 2:02 am | जानम

येऊद्या लवकर :)

मला वाटतेय सर्वांचा पोपट होणार आहे....ती मुलगी म्हणजे रोहनला सांगून आलेली असणार्..तिची आणि रोहनची भेट व्हावी असा आई/बाबांचा उद्देश असणार...

बाकी उत्सुकता वाढली आहे...मी सुद्धा असेच म्हणेन्..लवकर पुढचा भाग टाका...

शुचि's picture

30 Sep 2010 - 3:55 am | शुचि

केस का नाही हलले मग?

शेखर's picture

30 Sep 2010 - 4:02 am | शेखर

मेंदी लावली असेल.

रोहनची मुलीशी भेट व्हावी म्हणून ३० वर्षं पान वाढायचे म्हणजे जरा जास्तच वाटते.

नंदन's picture

30 Sep 2010 - 3:59 am | नंदन

सुरुवात छान झाली, वाचतो आहे.

अवांतर - शब्दशः आणि लाक्षणिक अर्थानेही वरचा मजला रिकामा असं तर सुचवायचं नाही ना? :)

थोडी दुरुस्ती

ऋषिकेश,

मला वाटतं, खालील वाक्यात उत्तरे मिळाल्यावर होणारा त्रास जास्त असतो असे असायला पाहिजे.

"त्यांची उत्तरे मिळाल्यावर होणारा त्रास, ती उत्तरे माहित नसताना होणार्‍या त्रासापेक्षा फार कमी असतो."

प्रिया

ऋषिकेश's picture

30 Sep 2010 - 1:26 pm | ऋषिकेश

चुक लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.

संपादक,
१) ते वाक्य पुढीलप्रमाणे बदलता येईल का?
"त्यांची उत्तरे मिळाल्यावर होणारा त्रास, ती उत्तरे माहित नसताना होणार्‍या त्रासापेक्षा फार अधिक असतो."

२) पहिली दोन सुचनेची वाक्ये करडी केली होती. ती फुल एच्टीएमेल न केल्याने काळीच आली आहेत. कृपया लेख फुल एच.टी.एम.एल. करता येईल का?

प्राजु's picture

30 Sep 2010 - 5:20 am | प्राजु

सॉल्लिड झाली आहे सुरूवात.
पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत. :)

गुंडोपंत's picture

30 Sep 2010 - 5:24 am | गुंडोपंत

काय झकास लिहितोस तू?
सरस्वतीचा वरदहस्त आहे रे बाबा तुझ्या डोक्यावर!
हात घालशील त्या विषयाचे सोने करतोस तू.
असेच असू देत.

पण हे राहूकाळातले लेखन आहे की काय? नेमक्या क्लायमॅक्स ला क्रमश:? ;))
अरे काय हे? लवकर लिहा पुढचा भाग!

सहज's picture

30 Sep 2010 - 6:51 am | सहज

पुढचा भाग लवकर येउ दे :-)

निखिल देशपांडे's picture

30 Sep 2010 - 11:14 am | निखिल देशपांडे

अरे ॠ पुढचा भाग लिहि ना लवकर..

सुहास..'s picture

30 Sep 2010 - 11:18 am | सुहास..

वाचतोय रे !!

दत्ता काळे's picture

30 Sep 2010 - 11:37 am | दत्ता काळे

छान सुरवात. उत्सुकता लागून राहीलेली आहे.

Shubhangi Pingale's picture

30 Sep 2010 - 1:57 pm | Shubhangi Pingale

खुपच सुरेख
पुढचा भाग लिहा लवकर
वाटेच्या वळणावर

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Sep 2010 - 8:37 pm | बिपिन कार्यकर्ते

च्यायला, बाकीच्या फापटपसार्‍यात हे दिसलंच नाही. ऋष्या, झ्याक रे. टंक लवकर.

श्रावण मोडक's picture

1 Oct 2010 - 12:03 am | श्रावण मोडक

संपादक, संपादक...!

चित्रा's picture

1 Oct 2010 - 12:36 am | चित्रा

वाट पाहते आहे, दुसर्‍या भागाची. कधी टाकणार?

रेवती's picture

1 Oct 2010 - 12:45 am | रेवती

अरे बाबा, कितीवेळा तो पूर्वार्धच वाचायचा?
लिहि कि लवकर!