चौथा मजला (पूर्वार्ध)
कथेतील स्थळे, पात्रे पुर्णतः काल्पनिक आहेत. पहिल्यांदाच कथा हा प्रकार हाताळतो आहे. सांभाळून घ्यालच. पुढचा भाग डोक्यात पक्का आहे. लवकरच टंकेन
"आज कारखान्यात जाशील तेव्हा चौथ्या मजल्यावर हे पान न विसरता ठेव होऽ"
दर वर्षी पितृपंधरवड्याच्या तृतीयेला आजी ही सुचना बाबांबा पूर्वी दिल्याचे रोहनला आठवले. आज तीच सुचना आई त्याला देत होती. का कोण जाणे पण, रोहनने बाबांना कधी आजीला हे का करायचं, हे का नाही करायचं वगैरे विचारताना बघितलं नव्हतं. पण त्याला आता अजून उत्सूकता थोपवणं शक्य नव्हतं.
"पण का?" बहुदा जो प्रश्न कधी विचारला गेला नव्हता तो त्याने विचारला होता.
आईचा चेहरा कावराबावरा झाला.
"हे बघ, तुला सांगितलं आहे ते ऐक. नसते प्रश्न विचारू नकोस" आईनं ते पान आणि त्यावरचे जिन्नस पॅक केले होते ते टेबलवर ठेऊन ती रोहनचं काहीही न ऐकता आत गेली. रोहनही एखाद्या गोष्टीच्या मागे लागला की ती गोष्ट अशी सहज सोडणार्यातला नव्हता. तोही आईच्या मागे गेला.
"अगं हे काय? रागावतेस काय? तु सांग अथवा सांगु नकोस मी पान ठेवणारच आहेस पण गेली ३० वर्षे मी हे बघतोय. आधी आजी बाबांना हे पान ठेवायला द्यायची. त्यांनी आजीला कधीतरी विचारलं असेलच की नाही? की हे का करायचं? "
आई काहीच बोलली नाही,
"अगं सांग ना गंऽ"
"हे बघ रोहन. काही प्रश्न असे असतात ज्याची उत्तरे मिळवायला जाऊ नयेत. त्यांची उत्तरे मिळाल्यावर होणारा त्रास ती उत्तरे माहित नसताना होणार्या त्रासापेक्षा फार कमी असतो."
"हे बघ ज्या अर्थी आपण पितृपक्षात एका विशिष्ट दिवशी पान ठेवतो त्या अर्थी हे कोणा व्यक्तीशी निगडीत असणार इतकं मला कळतं. ती डिटेल्स तुला माहित नाहीत म्हणाली असतीस तर ठिक आहे. पण ते पान कारखान्यात ठेवणं, तेही त्या चौथ्या मजल्यावर जी जागा मला बाबा ऑफीसच्या एक्सपांशनसाठीही वापरू देत नाहीत- रिकामीच ठेवायला लावतात, तेही कोणासाठी हे मला माहित नसताना; तु ते मला सांगणार नाहीस हे जरा अती होत नाही का?"
"हे बघ तुझ्या आजोबांनी मोठ्या कष्टाने हा व्यवसाय सुरू केला आहे. तुझ्या आजीने त्यासाठी खूप त्रास सहन केला. ही जागा टिकवण्यामागेही तिचा त्याग फार मोठा आहे. तेव्हा जिच्यामुळे ही जागा मिळाली.."
आणि आई अचानक गप्प झाली
"अगं काय? कोणामुळे जागा मिळाली?"
"हे बघ रोहन! तुला शेवटचं सांगतेय. तुझी जर इच्छा असेल तर आजीच्या व बाबांच्या मर्जीखातर आज तिथे पान ठेव. तेही सूर्यास्ताच्या आत. नाहीतर तु आणि तुझं नशीब"
"अग आई..."
आई ने तोंडावर बोट ठेवलं आणि खूण केली मागे बाबा व्हीलचेअरवरून येत होते. त्यांनी टेबलवरची तयारी पाहिली आणि रोहनच्या पाठिवरून हात फिरवला, म्हणाले, "हा खरा गुणी पोरगा आहे. माझ्या अॅक्सिडन्टनंतर फक्त ऑफीसच सांभाळतोय असं नाही तर माझे ऋणही फेडतोय"
"म्हणजे?"
"म्हणजे काही नाही. नीघ तू." रोहन आईसमोर कितीही आकांडतांडव करत असला तरी बाबांचा अॅक्सिडन्ट झाल्यापासून त्यांच्याशी वाद टाळत होता.
रोहनने बुट चढवले. स्वतःचा डबा आणि आईने दिलेली पानाची तयारी गाडीत भरली आणि ऑफीसकडे निघाला.
तो गेल्यावर आई बाबांना म्हणाली "त्याला एकदा सांगून टाकुया. खूप खोदून विचारत होता."
"हो! तो आता मोठा झालाय आणि इतक्या वर्षांनी लपवण्यासारखं काही राहिलेलं नाही. पुढच्यावेळी जेव्हा विचारेल तेव्हा सांग त्याला"
-------------
रोहन कारखान्यात पोचला पण तो अस्वस्थ होता. आपल्यापासून गोष्ट लपवून ठेवली आहे हे त्याला अधिक अस्वस्थ करत होतं. त्याच्या आजोबांनी हा उभा केलेला कारखाना. एकट्याने पेरलेल्या बीजाचा आता वृक्ष झाला होता. रोहन त्याची फळे चाखत होता. आता कारखान्याचा व्याप इतका वाढला होता की आजुबाजुची जमिनही ताब्यात घेऊन तिथेही काम चालु होतं. अपवाद होता ह्या चौथ्या मजल्याचा. तिथे कोणालाही काम करायला परवानगी नव्हती. अर्थातच त्यामुळे त्यामजल्याबद्दल अनेक वदंता होत्या. आज रोहन तिथे जाणार होता.
संध्याकाळ व्हायची होती. आईने सूर्यास्ताच्या आत पान ठेवायला सांगितलं होतं. रोहनची पहिलीच वेळ होती. तो तिसर्या मजल्यावर उभा होता. वर जाणारा जिना त्याला खुणावत होता. जिना नेहमीचाच फक्त पायर्यांवर धुळ. काही पावले देखील. "चौथ्या मजल्याला एक ओपन टेरेस आहे तिथे काहि मंडळी फुंकायला जात त्यांच्या पावलांचे ठसे असतील" रोहनने विचार केला.
शेवटी तो वर गेलाच. दार लोटलेले होते त्याने मनाचा हिय्या केला दार उघडले. आत गेला पान काढलं.. वर पदार्थ मांडले.. आणि निघणार इतक्यात त्याला टेरेसवर कुणी आहे असा भास झाला.. तो गर्रकन वळला.. एक मुलगी पाठमोरी उभी होती.. एकटीच..
"कोण असेल ही?" रोहनने स्वत:शीच प्रश्न केला. स्वतः स्वतःलाच उत्तर देऊ लागला "असेल कोणी तरी कर्मचारी. आली असेल वरती. तुझं काम संपलं ना चल खाली चल"
खाली जायला निघाला आणि पुन्हा वळला "बघुया तर कोण आहे!"
तिच्या मागे उभा राहिला. ती जराही हलली नव्हती.
"एक्सक्युजमी!"
काहि उत्तर नाही
"एक्सक्युजमीऽ मिस"
फक्त वार्याचा एक झोत तिची ओढणी फडफडवून गेला. तिने केस मोकळे सोडले होते. ते मात्र खोटे असल्यासारखे स्तब्ध होते.
"एक्सक्युजमी!!!" रोहन जरा जोरात बोलला, पण प्रतिसाद न आल्याने त्याने तिला स्पर्श केला.
ती फटकन मागे वळली!!!
"हाय रोहन!!"
रोहन अचानक आपले नाव पुकारले गेल्याने दचकला आणि तिच्याकडे बघतच राहिला....
(क्रमशः)
Book traversal links for चौथा मजला (पूर्वार्ध)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कथा आवडली.
वडिलोपार्जित इश्टेट
वाचतोय.
वाचतोय रे ऋ. चांगल लिहिलयस.
आयला
नक्कीच चेष्टा!
+२
ऋषि'ली', होतास कुठे एवढे
ऋ, पुढ्च्या भागाची वाट
मसत लिहित आहात .. वाचतोय
उत्सुकता वाढली आहे...
हम्म..
मस्त!
लवकर लिहि रे ऋ पुढचा भाग.
उत्कंठा वाढविण्यात
वाचतेय......
बेस्ट.. येऊद्या लवकर!
मग पुढे काय झालं? लवकर टंका
उत्कंठावर्धक
आभार
अशा ठिकाणी क्रमश:
येऊद्या लवकर
मला वाटतेय सर्वांचा पोपट होणार आहे..
केस का नाही हलले मग?
मेंदी
रोहनची मुलीशी भेट व्हावी
मस्त
थोडी दुरुस्ती ऋषिकेश, मला
अरे हो की!
सॉल्लिड झाली आहे
नेमक्या वेळी
भारी
अरे ॠ पुढचा भाग लिहि ना
वाचतोय रे !!
पूर्वार्ध आवडला.
अप्रतिम
च्यायला, बाकीच्या
संपादक
मस्तच
अरे बाबा, कितीवेळा तो