मराठा लाईट इनफंट्री - भाग - ५

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
8 Aug 2010 - 1:06 pm

मराठी लाईट इनफंट्री... भाग १ , भाग २ , भाग ३ , भाग ४ , भाग ५

***

भाग – ५
व्हिक्टोरीया क्रॉस :
Victoria_Cross_Medal_Ribbon_&_Bar
१८५४ साली ब्रिटन आणि रशिया यांचे जे युध्द झाले त्यालाच क्रिमियन वॉर असे म्हणतात. या युध्दात ब्रिटीश सैनिकांनी जे पराक्रम गाजवले, त्याची इतिहासात नुसतीच नोंद झाली. तोपर्यंत ब्रिटीश सैन्यात पराक्रमासाठी पदक वगैरे देण्याची प्रमाणित अशी पध्दतच नव्हती. सर्वोच्च पराक्रमाला बढती आणि त्या खालोखाल लढाईच्या इतिवृत्तात उल्लेख अशी पध्दत होती. याचा एक तोटा असा होत होता की त्या सैन्याच्या कमांडरच्या हाताखालीच जे काम करत त्यांचा पराक्रम लगेच डोळ्यात भरे. पण दुरवर लढाईत भाग घेणार्‍या सैनिकांची उपेक्षा व्हायची. आता हे सगळे अधिकारी राजाच्या रक्ताचे असल्यामुळे बरेचजण हा बहुमान मिळवणारे हेच असायचे. अर्थात याचा अर्थ पराक्रम न गाजवता त्यांना हा सन्मान मिळत असे असा नाही. पण इतरांकडे दुर्लक्ष होत असे हे निश्चित. असे एखादे बक्षिस निर्माण करण्याची गरज राजाला व त्याच्या दरबार्‍यांना वाटू लागली की जेणे करून एखादा सैनिक किती काळ सैन्यात आहे यावर अवलंबून न रहाता त्याच्या पराक्रमाचे कौतुक केले जाईल. २९ जनेवारी १८५६ साली व्हिक्टोरिया राणीने हे असे पदक द्यावे अशी शिफारस केली आणि हे पदक जन्माला आले.

हे पदक तसे साधेसुधे, ४१मि,मि. लांब आणि ३६ मि.मि. रुंद असून त्याच्यावर “FOR VALOUR” हे शब्द कोरलेले आहेत. हे पदक एका धातूच्या पट्टीला एका रिबीनीने लटकवलेले असून, त्या रिबिनीचा रंग साधरणत: वाईनच्या रंगाचा असतो. पदकाच्या मागे एक वर्तूळाकार भाग असून त्यावर त्या सैनिकाचे नाव लिहिण्याची पध्दत आहे. वर अशा एका पदकाचे चित्र दिलेले आहे.

हे पदक लंडनस्थीत हॅंकॉक नावाची कंपनी तयार करते. यासाठी लागणारा धातू इंग्लंड्च्या ऑर्डनंन्स डेपोतूनच दिले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे क्रिमियन युध्दात ज्या चीनी तोफा रशियन सैन्याकडून जिंकल्या गेल्या होत्या, त्याचे तुकडे पाडून वितळवून ही पदके तयार केली जातात. आत्तापर्यंतची सर्व पदके याच धातूपासून व एकाच पध्दतीने तयार केली गेलेली आहेत. ही सर्व Hand crafted आहेत.

दिसायला अत्यंत साधे असलेले हे पदक कोणाला मिळते ?
....Most conspicuous or some daring or pre-eminent act of valour or self sacrifice, or extreme devotion to duty in the presence of enemy”.

शेवटचे चार शब्द फार महत्वाचे आहे. जो काही पराक्रम असेल तो शत्रूच्या समोर, त्याच्याशी लढताना गाजवलेला असला पाहिजे. युध्दात अशाही अनेक कामगिर्‍या असतात की ज्या शत्रूसमोर पार पाडल्या जात नाहीत. त्यांच्यासाठी वेगळी पदके असतात. ती कामे कितीही महत्वाची असली तरी.

सर्वोच्च दर्जाचे पदक असल्यामुळे ज्या सभारंभात ही जी सगळी पदके दिली जातात त्यात VC हे पहिल्यांदा दिले जाते मग बाकीची. उदा. एखाद्या कार्यक्रमात जर एखाद्याला “Knighthood” आणि एखाद्या सैनिकाला जर VC द्यायचा असेल तर VC पहिल्यांदा दिला जातो. जनरल Sir Mike Jackson यांच्या अगोदर एका सैनिकाला अगोदर ते पदक देऊन या प्रथेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. सगळ्यात महत्वाचे असल्यामुळे नावाच्या पुढे ज्या काही पदव्या लावायच्या असतील त्याच्या अगोदर VC असे लिहावे लागते. हे छातीवर नेहमीच पहिल्यांदा लावावे लागते.
सॅल्युट हा एक फौजेचा अविभाज्य घटक आहे. आपल्या अधिकार्‍याला आदर दाखवण्यासाठी कडक सॅल्युट केला जातो आणि ज्याला केला जातो तोही तेवढ्याच आत्मियतेने तो परत करतो. अशी एक वदंता आहे की सर्व श्रेणीच्या सैनिकांनी, अधिकार्‍यांनी ज्याला VC मिळाला आहे त्यांना सॅल्युट करायचा असतो. असा नियम आहे का ? तर नाही. पण असे केले जाते का ? तर त्याचे उत्तर “होय” असेच द्यायला लागेल. त्यामुळे लष्कराचे सर्वोच्च अधिकारी पण सामान्य सैनिकाला ज्यांना VC मिळवला आहे अशा सैनिकांना सॅल्युट करण्यात धन्यता मानतात.

आत्तापर्यंत १८५६ सालापासून फक्त १३५६ VC बहाल करण्यात आले आहेत. ज्यांनी मिळवले आहेत त्यांची संख्या आहे १३५२. दुसर्‍या महायुध्दानंतर फक्त १३ वेळा हे पदक द्यायची वेळ आलेली आहे.

हे पदक मिळवल्यानंतर काही सैनिकांची पदके त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल जप्त करण्यात आली व त्यांचा हा मानमरातब काढून घेण्यात आला, व यादीतून नावही काढून टाकण्यात आले. पण जॉर्ज पाचवा यानी एक खास आदेश काढून असे करता येणार नाही असा नियम केला. २६ जुलै १९२० साली त्यांनी लिहीले “ मला असे मनापासून ठामपणे वाटते की कुठल्याही प्रकारचा गुन्हा या सैनिकांच्या हातून घडला असेल तरीही त्यांचे हे पदक काढून घेतले जाऊ नये. जरी त्या गुन्ह्यासाठी त्याला फाशीची शिक्षा झाली असेल तरीही त्याला फासावर जाताना त्याला हे पदक छातीवर लावायची परवानगी द्यावी”. १९३१ साली हा नियम अमलात आणण्यात आला आणि ज्यांची ज्यांची पदके काढून घेण्यात आली होती, त्यांची नावे परत यादीत समविष्ट करण्यात आली.

ही झाली व्हिक्टोरिया क्रॉसची माहिती. आता आपण आपल्या मराठा सैनिकांकडे वळू ज्यांनी हे असे पदक मिळवले.

१० जुलैला नाईक यशवंत घाडगे यांच्या कंपनीने शत्रूच्या एका मशिनगनच्या ठाण्यावर हल्ला चढवला. या ठाण्याचा त्यांनी चांगलाच बंदोबस्त केला होता. मूख्य म्हणजे त्याची जागा त्यांनी अत्यंत हुषारीने निवडली होती. हा हल्ला चढवला आणि त्यांच्यावर मशिनगन्समधून तुफानी गोळीबार करण्यात आला. हा अत्यंत जवळून करण्यात आल्यामुळे नाईक यशवंत घाडगे यांचे सर्व सहकारी यात मृत्यूमुखी पडले. आता ते एकटेच उरले होते. पण मनात कुठलीही भिती न बाळगता, त्यांनी आपले आक्रमण चालूच ठेवले. त्या ठाण्यापाशी पोहोचल्यावर त्यांनी त्यावर एक हॅंड ग्रेनेड फेकला व ती मशिनगन चालवणार्‍यास यमसदनास पाठवले. दुसर्‍या जर्मन सैनिकाला आपल्या हातातील टॉमीगनने ठार मारले. या हातगाईच्या लढाईत ते आता उरलेल्या जर्मन सैनिकांच्या फार जवळ पोहोचले होते. तेवढ्यात त्यांच्या टॉमीगन मधल्या गोळ्याही संपल्या. आता त्यांना मॅगझिन बदलायलाही वेळ नव्हता. त्यांनी आपली टॉमीगन उलटी करुन बॅरेल हातात धरले आणि उरलेल्या दोन सैनिकांना त्या बंदूकीच्या दस्त्याने ठेचून ठार मारले. तेवढ्यात शत्रूच्या एका स्नायपरने त्यांच्या छातीचा वेध घेतला आणि या शुरवीराची जिवनयात्रा संपली. या पराक्रमासाठी त्यांना व्हिक्टोरिया क्रॉस प्रदान करण्यात आला.

हाच हा शूरवीर –
VC1Ghadge
व जेथे श्री. यशवंत घाडगे यांचे नाव एका पॅनेलवर कोरण्यात आले आहे ती ही सैनिकांची दफनभूमी.
कॅसिनो घाडगे
Burial:
Cassino War Cemetery
Cassino
Lazio Region, Italy
Plot: No Known Grave; name is lited at Panel 17 on the Cassino Memorial.

आपण या दफनभूमीवर येथे फुले वाहू शकता.

जरूर वाहा कारण यांनी जे शौर्य गाजवले त्याचे उदा. डोळ्यासमोर ठेवून आजही अनेक मराठे आपल्या संरक्षणासाठी घरादाराची काळजी न करता सिमेवर तैनात आहेत.

जयंत कुलकर्णी
भाग ५ संपूर्ण.
पुढे चालू........
पुढच्या भागात अजून एका शुरवीराची कहाणी.......

इतिहासलेख

प्रतिक्रिया

शानबा५१२'s picture

8 Aug 2010 - 1:13 pm | शानबा५१२

छान,माहीतीपर लेख आहे जयंत सर.
वाचताना अंगावर काटा आला
ह्यांच्यासमोर आपले जीवन ते काय!

क्रुपया माहीतीचा स्त्रोत नमुद करावा ही विनंती.

पुष्करिणी's picture

8 Aug 2010 - 2:35 pm | पुष्करिणी

मस्त लेख, VC बद्द्ल इतकी माहिती नव्हती .

हुतात्मा यशवंत घाडगे यांच्या स्मृतीस वंदन.

वारा's picture

8 Aug 2010 - 3:42 pm | वारा

धन्य ते वीर..
आपले लेख नेहमीच आवडतात..
हाही असाच स्फुरण चढवणारा लेख..
VC च्या माहीती बद्द्ल धन्यवाद..

स्वाती२'s picture

8 Aug 2010 - 4:10 pm | स्वाती२

वाचत आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Aug 2010 - 5:24 pm | बिपिन कार्यकर्ते

फार कमी वेळा मनापासून धन्यवाद दिले जातात. कुलकर्णीसाहेबांनी ही एका अगदी वेगळ्याच विषयावर लेखमाला लिहिल्याबद्दल आज तसे वाटते आहे.

धन्यवाद कुलकर्णीसाहेब.

फुले वाहतोच.

डॉ.प्रसाद दाढे's picture

8 Aug 2010 - 10:20 pm | डॉ.प्रसाद दाढे

वाचतांना अंगावर काटा उभा राहतो..

मीनल's picture

8 Aug 2010 - 10:44 pm | मीनल

खरेच. लेखनासाठी वेगळा विषय निवडला आहे. अतिशय माहितीपूर्ण , वाचनिय आहे.
फुल वाहण्याची कल्पना मस्त. पण `साईन इन` ची भानगड आहे असे दिसले. नंतर बघते साइन करून.

चावटमेला's picture

8 Aug 2010 - 11:28 pm | चावटमेला

अतिशय छान आणि महितीपूर्ण लेख..

जयंत कुलकर्णी's picture

9 Aug 2010 - 8:55 am | जयंत कुलकर्णी

माझ्या सर्व वाचक मित्रांना/मैत्रिणींना मनापासून धन्यवाद.
आपल्या या प्रोत्साहनामुळेच मी लिहू शकतो याची मला जाणीव आहे आणि पुढेही राहील.

जयंत कुलकर्णी's picture

9 Aug 2010 - 9:27 am | जयंत कुलकर्णी

माझ्या ब्लॉगवर आलेली एक उस्फुर्त प्रतिक्रिया. वाचून बरे वाटले..

प्रतिक्रिया:....

ह्या विषयावरील लिखाणाबद्दल आपले अनेकानेक आभार... मराठा सैनिकाबद्दल असे लिखाण वाचून खरच भरून पावलो... ह्या संदर्भात काही पुस्तके किंवा इतर साहित्य उपलब्ध असल्यास कृपया कळवा... पूर्ण वाचावे म्हणतोय...

१७-१८व्या शतकात सुद्धा अनेक समकालीन लेखक, कवींनी मराठा फौजेविषयी बरेच लिहून ठेवले आहे..
जसे की ... विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा' मध्ये म्हणतो,"मराठ्यांच्या घोडयाना जणू पंख होते. एक-एक घोड़ा सैनिकांपेक्षा ही वरचढ़ होता. मराठ्यांची प्रत्येक घोडी म्हणजे जणू परीच. ती चंद्राची सखी असते. मराठा वीर जेंव्हा काव्याने लढू लागतो, तेंव्हा सारे विश्व नदीच्या भोवऱ्यात सापडल्यागत होते. मराठा शिपाई रणावर तळपू लागला म्हणजे जणू तो वार्‍याशी गुजगोष्टी करीत असतो.
अश्यावेळी त्याचे मुंडासे हात-हात वर उड़ते; धरती त्याच्या हालचालीने डळमळू लागते."

पुढे तो म्हणतो,"वार्‍याचाही शिरकाव होणार नाही अशाही स्थळी मराठे सैनिक जाउन पोचतात. किंबहुना अश्या ठिकाणी प्रवेश करणे मराठ्यांच्या घोडयाना एक प्रकारचा खेळ वाटतो. या लष्कराने आणि शिवाजीने आकाशाशी स्पर्धा करणारे उंच-उंच गड़ चढून काबीज केले. जहाजत बसूनही मराठे लढले आणि त्यांनी फिरंग्यान्ना धाक बसवला. त्यांच्या वर्दळीमुळे समुद्रावर नेहमीच तूफ़ान येत राहिले."

रोहन चौधरी.

सुंदर. धन्यवाद रोहन !

अभिरत भिरभि-या's picture

9 Aug 2010 - 10:07 am | अभिरत भिरभि-या

सुरेख लेखमाला ..

एक शंका
>> ती ही सैनिकांची दफनभूमी`
ब्रिटिश फौजेत हिन्दू सैनिकांचे दफन व्हायचे ?

जयंत कुलकर्णी's picture

9 Aug 2010 - 10:23 am | जयंत कुलकर्णी

नमस्कार !

शंका योग्य आहे.

खरंतर अशा युध्दात जेव्हा मृतांची संख्या जास्त असते तेव्हा ही प्रेते जाळूनच टाकतात. शत्रूंची सुध्दा. पण ते त्या ता वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असते. (वेळ आहे का यावर ) इतर धर्मियांची दफन केली जातातही. पण सगळ्यांची आठवण जागवली जाते ती मात्र अशा War Cemetary मधे. कधी कधी प्रेते जाळताही येत नाहीत. विमानांच्या हल्ल्याच्या भितीने. तेव्हा त्यांचे दफनच करावे लागते. किंवा बर्‍याच वेळी दफन करण्या इतका वेळ नसतो तेव्हा जाळूनही टाकायला लागतात. बरीच Flexibility असते तेव्हा. :-)
जेव्हा मृत्यू आजुबाजूला वावरत असतो त्यावेळी असे विचार मनाला शिवत नाहीत.

:-)