उत्तर शोधायचे आहे!

ॐकार's picture
ॐकार in जनातलं, मनातलं
31 Mar 2008 - 1:31 am

ओशो रजनिश यांच्या संत कबीरांवरील प्रवचनांचे भाषांतर वाचण्याचा योग आला. त्यात ओशोंनी पुढील दाखला दिला आहे -

एकदा चार बायका एक प्रसिद्ध सूफी संताकडे ज्ञानप्राप्तीकराता जातात आणि त्याने गुरू बनावे अशी विनवणी करतात. त्यांना त्याच्याकडून ज्ञान म्हणजे काय हे समजून घ्याअय्चे असते. परंतु सूफी संत मात्र तयार होत नाही. त्या बायका तश्याच दाराशी भुकेल्या तहानलेल्या बसून राहतात. अखेर त्याला त्यांची दया येते. तो त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवतो. परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या स्त्रीला शिष्या करून घेण्यास तो तयार होतो. तो प्रत्येकीला एकेकटीला एक प्रश्न विचारतो - "समजा तू ) ती स्त्री) आणि ५० पुरुष एका जहाजावर आहात. ते जहाज वादळात फुटले आणि तुम्ही सगळे एका निर्जन बेटावर येऊन पोहोचलात. त्या ५० पुरुषांपासून तू स्वतःला वाचवायला काय उपाय करशील?"

पहिली स्त्री कुमारिका. तिला ह्या कल्पनेनेच भीती वाटते. ती म्हणते - मी पोहत पोहत खोल समुद्रात जाईन आणि अखेर मरेन. मेले तरी बेहेत्तर पण त्या पुरुषांसोबत राहणार नाही.
तो संत तिला परत पाठवून देतो.

दुसरी स्त्री विवाहित. ती विचार करते आणि म्हणते - मी त्यातल्या सर्वात बलवान पुरुषाशी लग्न करेन, म्हणजे बाकी पुरुषांपासून माझे तोच संरक्षण करेल.
तो संत तिलाही परत पाठवून देतो.

तिसरी असते वेश्या - ती म्हणते - ह्यात मूळात समस्या आहेच कुठे. बचावाचा प्रश्नच कुठे येतो?
तो संत तिलाही परत पाठवून देतो.

चौथी विचार करते. थोड्या वेळाने म्हणते - मला ठाऊक नाही. ह्याबबतीत मी अज्ञानी आहे.
तो संत तिला आपली शिष्या म्हणून पत्करतो.

---

पहिल्या स्त्रीने आत्महत्या हा मर्ग निवडला. आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा नाही. दुसर्‍या स्त्रीने तिच्या अनुभवातून सर्वात बलवान पुरुष निवडण्याचा मार्ग सांगितला. पण एकटा बलवान पुरुष बाकी ४९ पुरुष एकत्र आले तर त्यांच्याशी दोन हात करू शकणार नाही. तिसर्‍या स्त्रीला तर ही समस्याच वाटत नाही. जे काही चालले आहे ते आलबेल आहे असे तिला तिचे अनुभव पटवून देत होते. ह्या सर्वांनी आपपल्या कुवतीनुसार उत्तरे शोधली होती. त्यांच्यामते त्या ज्ञानी होत्या. चौथ्या स्त्रीला मात्र आपले अज्ञान उमगले. ज्याला आपले अज्ञान उमगते त्यालाच ज्ञानाचा मार्ग दाखवता येतो. ज्याला अखेर स्वतःचे ज्ञान होते त्याला स्वत्व विसरता येते. ह्याला अद्वैत म्हणा.

संदर्भ -
पुस्तक - आलं ज्ञानाचं तुफान ( भाषांतरित)
- कबीरांच्या वचनांवर प्रवचने
ओशो रजनीश

समाजजीवनमानतंत्रप्रकटनविचारमतसंदर्भमाध्यमवेधअनुभवमाहितीवादआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

31 Mar 2008 - 2:32 am | विसोबा खेचर

१) आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा नाही.

सहमत आहे!

२) पण एकटा बलवान पुरुष बाकी ४९ पुरुष एकत्र आले तर त्यांच्याशी दोन हात करू शकणार नाही.

हम्म! भिती रास्त आहे!

३) तिसर्‍या स्त्रीला तर ही समस्याच वाटत नाही. जे काही चालले आहे ते आलबेल आहे असे तिला तिचे अनुभव पटवून देत होते.

अगदी बरोबर. मग तिसर्‍या स्त्रीचं चुकलं कुठे? तिने तिच्या अनुभवाप्रमाणे उत्तर दिलंन त्यात तिला त्या संताने नापास करण्यासारखं काय होतं? कदाचित, त्या वेश्येकडे जगाचा अनुभव त्या संतापेक्षाही अधिक असावा! तिने अधिक दुनिया पाहिली असावी, तिचं अनुभवचिश्व त्या संतापेक्षा अधिक वास्तव असावं असंच निदान आम्ही तरी म्हणू! असो.. :)

४) चौथ्या स्त्रीला मात्र आपले अज्ञान उमगले.

या स्त्रीबद्दल काही अधिक माहिती मिळाली असती तर बरं झालं असतं! तिचं वय काय होतं? ती दिसायला कशी होती, वगैरे वगैरे!

कदाचित, तो संत तिच्या रुपावर मोहीत झाला असेल आणि त्याने तिला शिष्य म्हणून पसंत केले असेल! शिवाय ती अज्ञानी आहे, अशी तिने स्वत:हूनच कबुली दिली होती, त्यामुळे तिला सगळ्या गोष्टी अगदी पहिल्यापासून शिकवणे अधिक सोयिस्कर असाही विचार त्या संताने केला असेल!

असो, परंतु तिच्या वयाबद्दल आणि रुपाबद्दल पुरेसा विदा उपलब्ध नसल्यामुळे तूर्तास तरी आम्ही आमचं मत राखीव ठेवत आहोत! :)

--संत तात्याबा महाराज.

१) आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा नाही.
खरच आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा होउच शकत नाही.
आजच्या तरुण पिढी मधे मात्र आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे असे दिसुन येते,
सामुहिक आत्महत्येचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. (अख्खे कुटुंब आत्महत्या करते किंवा त्यांचा कुटुंबप्रमुख त्यांना मारुन स्वतः ला संपवतो)
आत्महत्या ही आजच्या काळातील भिषण समस्या आहे.
आत्महत्या हे कुठल्या ही समस्येचे उत्तर नसुन ,तो फक्त पळपुटेपणा आहे असे मला वाटते.
२)ज्याला आपले अज्ञान उमगते त्यालाच ज्ञानाचा मार्ग दाखवता येतो.
अगदी सहमत.....

(उत्तराच्या शोधात)
मदनबाण

प्रभाकर पेठकर's picture

31 Mar 2008 - 1:59 pm | प्रभाकर पेठकर

पहिल्या तिघींनाही काही तरी ज्ञान होते म्हणून तो सूफी संत त्यांना परत पाठवून देतो.

चौथी म्हणते. 'ह्याबाबतीत मी अज्ञानी आहे.' ह्या विधानातून, तिच्या जवळही 'बाकी ज्ञान आहे', असा ती इन्डायरेक्ट दावा करते आहे. तरीही तो सूफी संत तिला आपली (?) शिष्या म्हणून पत्करतो.

म्हणजेच 'ह्याबाबतीतले' ज्ञान तिला मिळवून देण्यासाठीच (फक्त) तो तिला निवडतो असे 'वरकरणी' तरी दिसते आहे.