पोरी पदर घे उन लागलं

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
17 May 2010 - 11:11 pm

पोरी पदर घे उन लागलं
चाल: येथे ऐका

आगं पोरीsss पदर घे ग
उन लागलं गssss
रंग काळल गss

आता ग पोरी पदर घे उन लागलं
आता ग पोरी पदर घे ग उन लागलं
उन लागलं ग
रंग काळल
पोरी पदर घे उन लागलं
आता ग पोरी पदर घे ग उन लागलं

बाहेर पडती तू गं दुपारमधनं
वेगी चाल रस्ता सारा पायाखालनं
उन आहे जाळ आसं चैत्रातलं
पोरी पदर घे ग उन लागलं
आता ग पोरी पदर घे उन लागलं

माती उडतीया आशी गं वार्‍यावर
डोळा जाईल धुळ ss अन होईल येळ
वाट पाहायची आता उगा किती काळ
आता तरी सांग सारं मनातलं
ग पोरी पदर घे ग उन लागलं

आता ग पोरी पदर घे उन लागलं
आता ग पोरी पदर घे ग उन लागलं
उन लागलं ग
रंग काळल
पोरी पदर घे उन लागलं
आता ग पोरी पदर घे ग उन लागलं

शांतरसप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

शुचि's picture

18 May 2010 - 4:52 am | शुचि

नक्की कोण गाण गातय आई काळजीनी गातेय का मित्र गातोय? :D

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

शुचि's picture

18 May 2010 - 5:33 am | शुचि

सॉरी कळलं मला मित्र गातोय. प्रेमकाव्य प्रकार आहे :(
माफ करा.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

पाषाणभेद's picture

18 May 2010 - 6:01 pm | पाषाणभेद

हं.... अन आई बी पिरेमच करतीया नव्ह?
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही

इंटरनेटस्नेही's picture

18 May 2010 - 5:45 am | इंटरनेटस्नेही

मस्त!
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.