Skip to main content

पोरी पदर घे उन लागलं

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 17/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पोरी पदर घे उन लागलं चाल: येथे ऐका आगं पोरीsss पदर घे ग उन लागलं गssss रंग काळल गss आता ग पोरी पदर घे उन लागलं आता ग पोरी पदर घे ग उन लागलं उन लागलं ग रंग काळल पोरी पदर घे उन लागलं आता ग पोरी पदर घे ग उन लागलं बाहेर पडती तू गं दुपारमधनं वेगी चाल रस्ता सारा पायाखालनं उन आहे जाळ आसं चैत्रातलं पोरी पदर घे ग उन लागलं आता ग पोरी पदर घे उन लागलं माती उडतीया आशी गं वार्‍यावर डोळा जाईल धुळ ss अन होईल येळ वाट पाहायची आता उगा किती काळ आता तरी सांग सारं मनातलं ग पोरी पदर घे ग उन लागलं आता ग पोरी पदर घे उन लागलं आता ग पोरी पदर घे ग उन लागलं उन लागलं ग रंग काळल पोरी पदर घे उन लागलं आता ग पोरी पदर घे ग उन लागलं
काव्यरस

वाचने 1947
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

नक्की कोण गाण गातय आई काळजीनी गातेय का मित्र गातोय? :D सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

सॉरी कळलं मला मित्र गातोय. प्रेमकाव्य प्रकार आहे :( माफ करा. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मस्त! -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.