सवय झाली आहे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
15 Apr 2010 - 10:21 am

सवय झाली आहे
(फर्मास इडंबन आलं पाहीजे याच्यावालं बरं का मंडली!)

कार्यालयात युपीएससी तून नवीन भरती झाली आहे.
नवा साहेब तरणा आहे.
पिकले केस अन अनूभव नाही दिसत त्याला.
त्याची सवय झाली आता.

सोसायटीच्या जिन्यात देवांच्या टाईल्स लावल्या आहेत.
तरीही पान, तंबाखुच्या पिंका कोपर्‍यात पडतातच आहेत.
मला त्याची सवय झाली आहे.
काय सांगावं, पिंका टाकणार्‍यानाही त्याची
आता सवय झाली आहे.

शाळेत आताशा शिकवत नाही.
म्हणून मुलाला ट्यूशन लावली.
आमच्या वेळी नव्हत असं काही.
असं एकायची सवय झाली.

दररोज जाहिराती पहायच्या
नोकरी अर्ज नेहमी करायचा
मुलाखतीत उत्तरे द्यायची
अन 'नंतर कळवू' चा नकार घ्यायचा
सवय झाली आहे याची.

बाबांनी नियमीत मुलगे बघायचे
आमंत्रणासाठी उंबरठे झिजवायचे
कांदे फोहे देवून स्वत:ला बघवून घ्यायचे
अन 'नंतर कळवतो' ही आशा पहायची
सवय झाली आहे याची.

(मंडळी नुकताच मी 'काव्यपंधरवडा' साजरा केला. त्याला अनुषंगून...)

हा पाषाण्या दररोज एक कविता टाकतोय
लावणी काय लिहीतो आम्ही आपले वाचतोय
हिरवीन नाचवतो कधी हिरो नाचवतो
आज तरी नको तसलं नवीन काही
उगाच आपलं म्हणायचं सवय झाली आहे याची.

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१५/०४/२०१०

शांतरसकवितामुक्तक

प्रतिक्रिया

शुचि's picture

24 Apr 2010 - 1:31 am | शुचि

>> हा पाषाण्या दररोज एक कविता टाकतोय
लावणी काय लिहीतो आम्ही आपले वाचतोय
हिरवीन नाचवतो कधी हिरो नाचवतो
आज तरी नको तसलं नवीन काही
उगाच आपलं म्हणायचं सवय झाली आहे याची.>>
=)) =))

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.

मदनबाण's picture

24 Apr 2010 - 1:54 am | मदनबाण

दफोराव आजचं मुक्तक आवडलं...

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

लावणी काय लिहीतो ...हिरवीन नाचवतो कधी ....

चित्रगुप्त
http://www.misalpav.com/node/11663
http://www.misalpav.com/node/11860
http://www.misalpav.com/node/11667