आमचे काही पूर्व-जन्म....

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in कलादालन
28 Mar 2010 - 8:52 pm

आमचे काही पूर्वजन्मः
आणखी काही पूर्वजन्म पुन्हा कधीतरी......

१६२४ साली इंग्लंड मधील एक लढवय्या.....

एक संस्थानिक.....

अर्धांगिनीसहः

कलासंस्कृतीइतिहासजीवनमानछायाचित्रण

प्रतिक्रिया

शशिकांत ओक's picture

28 Mar 2010 - 11:08 pm | शशिकांत ओक

चित्रगुप्तराव,
वा! अजबच आहे!!
सयाजीरावांनी आपला पोषाख भेट दिलेला दिसतोय! बर पण खरी वायको सोडून मोनालिसा म्हणजे चित्रगुप्तांच्या हिशोबात काही घोळ आहे नक्की.
वाटतेय नाड़ी महर्षींना विचारायला हवे की काय?
शशिकांत

राजेश घासकडवी's picture

30 Mar 2010 - 3:24 am | राजेश घासकडवी

फोटोशॉपमध्ये चेहेऱ्याचं आरोपण करणं ही एक कला आहे. मी खूप ठिकाणी कापून चिकटवलेले चेहेरे बघितलेले आहेत. आणि ते मैलभर अंतरावरून कळतात. तुम्ही केलेल्यात चेहेऱ्याचा कोन, आकार, एकंदरीत प्रकाशयोजना, रंगसंगती व कडा चपखलपणे मिसळून देणे या सर्व गोष्टी अतिशय सुंदर साधलेल्या आहेत. तुमच्या या कौशल्याला हॅट, पगडी व फेटा - ऑफ!

(वैनींचा मात्र मूळ फोटो नसल्याने चेहेरा किंचित कृत्रिम वाटतो, पण ते खापर श्री. डा विंची यांच्या माथ्यावर.)

राजेश

बेसनलाडू's picture

30 Mar 2010 - 5:23 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

चित्रगुप्त's picture

30 Mar 2010 - 9:16 am | चित्रगुप्त

आपल्या आपुलकीच्या प्रतिसादाबद्दल आभार.
सध्या आम्हाला असल्या उचापती करण्याचा बराच नाद लगलेला आहे......असली आणखी बरीचशी चित्रे मिपावर देण्याचा विचार आहे.....

आमचा आगामी उपद्व्यापः
मेनका पुराण : विष्णुचे दहा आणि मेनकेचे शंभर अवतार.

प्रमोद देव's picture

30 Mar 2010 - 9:35 am | प्रमोद देव

मग आता चित्रगुप्त ’विष्णू’पंत होणार की काय?
आणि मोना वहिनी ’मेन’का? ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Mar 2010 - 12:52 pm | बिपिन कार्यकर्ते

मिष्टर गुप्त, ते विष्णूचे राहू द्या... सध्या मेनकेलाच घ्या प्रायॉरिटीवर... :D

बिपिन कार्यकर्ते

वाहीदा's picture

30 Mar 2010 - 12:52 pm | वाहीदा

तुमच्या या कौशल्याला हॅट, पगडी व फेटा - ऑफ! 8>

सहमत !!
~ वाहीदा

वेताळ's picture

30 Mar 2010 - 10:06 am | वेताळ

अजुन येवु द्या.

वेताळ

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Mar 2010 - 10:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

'कारागिरी' सुंदरच! पण भारतीय चेहेरा इंग्लिश माणूस म्हणून खपत नाही; फोटोशॉपची किमया साधली असली तरीही नाक-डोळे लगेच रहस्यभेद करतात. मोनालिसेच्या बाबतीत हे अगदी उलट झालेलं आहे.

अदिती

मानलं बुवा !!!!!! फोटोशॉपची किमया न्यारी ! आम्हालासुद्धा जमेल का हो बरी !!!!!!!!

अरुंधती's picture

30 Mar 2010 - 3:18 pm | अरुंधती

=D> =D> =D> =D> =D> =D> =D>

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

ओंकार देशमुख's picture

30 Mar 2010 - 5:20 pm | ओंकार देशमुख

मोनालिसा काकूंनी भुवया का काढल्या हो ??

http://pune-marathi-blog.blogspot.com/