शब्दबंध २०१०

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जनातलं, मनातलं
10 Mar 2010 - 10:21 am

२००८ व २००९ या दोन्ही वर्षी 'शब्दबंध' या आंतरजालीय जालनिशीकारांच्या उपक्रमात सहभागी झालो होतो. आता या वर्षीच्या 'शब्दबंध'चे वारे वाहू लागले आहेत. त्या संबंधीची 'शब्दबंध'च्या अधिकृत जालनिशीवरील उद्घोषणा इच्छुकांच्या अधिक माहितीसाठी येथे डकवत आहे.
===========================================================================

२००८ मधे १० लोकांनी साकारलेल्या शब्दबंधने मागच्या वर्षी २९ लोकाना सामावून घेतलं! मराठी ब्लॉगर्सच्या या जागतीक ई-सभेचे आयोजन आपण याही वर्षी दिमाखात करणार आहोत. मित्रहो तारखांची नोंद करा - ५ आणि ६ जुन २०१०!
परत एकदा आपण सर्वजण या सभेत भेटायचंय. काही नवे तर काही जुने शब्दबंधी घेऊन यायचंय. जिथे आहात तिथून, थेट सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचायचंय. परत एकदा सर्व हौशी मराठी ब्लॉगर्सना त्यांचं लिखाण त्यांच्या थाटात व्यक्त करण्यासाठी हे खास व्यासपीठ सजवायचंय.

मागील वेळेसारखेच, मराठीमध्ये १०० % स्वतःचं लेखन असलेला किमान एक ब्लॉग असलेल्या कुठल्याही ब्लॉगकाराला यात सहभागी होता येईल. या सभेची व्याप्ती अधिकाधिक वाढवणे आणि अधिकाधिक मराठी ब्लॉगर्सना त्यांनी लिहिलेल्या, त्याना आवडणाऱ्या, आणि त्यांच्या लिखाणाचं वाचन करण्यासाठी ई-व्यासपीठ ऊपलब्ध करून देणे हा यावेळीही हेतू आहे. मराठीमधलं लिखाण हा एकच समान दुवा पकडून आपण सर्वजण एकत्र येणार आहोत. प्रवास वर्णनं, अनुभव, कथा, कविता, व्यक्तीचित्रं, लघुनिबंध, तंत्रज्ञान आणि अशाच कित्येक छटांनी सजलेल्या मराठी ब्लॉगविश्वाची छोटीशी झलक आपल्याला या सभेमधे साकार करायचीये. तेही अनौपचारीक पद्धतीने.
सर्वसाधारणतः या सभेचं स्वरूप असं असेल. स्काईप, किंवा तत्सम साधन वापरून, आपण वेगवेगळी सत्रं आयोजीत करू. सहभागी होणाऱ्या सर्व हौशी ब्लॉगर्सना या तंत्राची माहिती सभेच्या आधी करून देण्यात येईल. जपान-ऑस्ट्रेलियापासून ही सभा सुरू होईल. सत्रांची सूत्रं क्रमाक्रमाने पश्चिमेकडे हस्तांतरीत होऊन भारत-आफ़्रिका-युरोप-अमेरिका या क्रमाने अभिवाचनाचं सत्र सुरू राहील.

शब्दबंध-२०१० मधे सहभागी होणं सोपं आहे. सहभाग घेण्यासाठी किंवा केवळ आयोजनामधे मदत करण्यासाठीही, कृपया या फॉर्मवर नोंद करावी -https://spreadsheets.google.com/viewform?formkey=dHhIT3dWN21tYWpDVHo4UG9.... तुमच्याबद्दलची माहिती आणि तुमच्या सहभागाचं स्वरूप आम्हाला या फॉर्मवरून कळेल. सर्व जुन्या आणि नव्या शब्दबंधीनी या फॉर्मवरून नोंद करावी ही विनंती. ईथे नाव नोंदवणाऱ्या सर्वाना आपोआप shabdabandha@googlegroups.com मधे प्रवेश दिला जाईल आणि तिथेच पुढच्या सर्व चर्चा होतील. (तुम्ही आधीपासून जरी shabdabandha@googlegroups.com चे सभासद असाल, तरीसुद्धा शब्दबंध-२०१० मध्ये सहभागासाठी, कृपया फॉर्ममधे नोंद करावी. तसदीबद्दल क्षमस्व.)

लवकरच भेटू. आपली वाट बघतोय.

- शब्दबंध स्वागतक आणि कार्यकारी मंडळ

कलाधोरणवावरविचारसंदर्भप्रतिसादबातमीशिफारसमाध्यमवेधअनुभवमाहितीप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

10 Mar 2010 - 10:41 am | विसोबा खेचर

अभिवाचन करावं, सादरीकरण करावं अश्या लायकीचं लेखन आमच्या ब्लॉगवर तरी नाही..

असो,

सहभाग घेऊ इच्छिणार्‍या अन्य सर्वांना शुभेच्छा..

तात्या.

ऋषिकेश's picture

10 Mar 2010 - 1:39 pm | ऋषिकेश

इथे स्वतःचा ब्लॉग असणं गरजेचं दिसतंय :(
आंतरजालावरच्या संकेतस्थळांवर केलेले लेखन ग्राह्य धरले जाणार नाहि का?

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

प्रशांत उदय मनोहर's picture

10 Mar 2010 - 2:03 pm | प्रशांत उदय मनोहर

ब्लॉगलेखकांची सभा असल्यामुळे स्वत:चा मराठी लेखन असलेला ब्लॉग असणं आवश्यक आहे.
आपला,
(शब्दबंधी) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Mar 2010 - 3:19 pm | बिपिन कार्यकर्ते

नाव नोंदवलेलं आहे.

बिपिन कार्यकर्ते

मदनबाण's picture

11 Mar 2010 - 3:15 am | मदनबाण

फॉर्म भरला आहे,सभेत सहभागी होण्याचा प्रयत्न नक्की करेन.
तुमच्या या उपक्रमाला शुभेच्छा... :)

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com

चतुरंग's picture

11 Mar 2010 - 3:15 am | चतुरंग

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

11 Mar 2010 - 3:44 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो !
(बेला , काय बंधबिंध बांधायचेत ते आता बांधून घ्या ! नंतर निराळे काही बांधून घ्यायची गरज नाही ! ) ;-)

१० जूनला येथून कलटी!! १६ जुलैस वापस. ५-६जूनला अस्मादि़कांसह सगळे सामान नवीन अपार्टमेन्टात हलवायचे आहे (शब्देतर बंधांच्या तयारीचा भाग म्हणून ;) :) ) त्यामुळे दुर्दैवाने या वर्षीच्या शब्दबंधमध्ये वाचक किंवा श्रोता म्हणून सहभागी होता येणार नाही.
(दुर्दैवी)बेसनलाडू