जाते म्हणतेस...................

मंगेशपावसकर's picture
मंगेशपावसकर in जे न देखे रवी...
27 Feb 2010 - 9:53 am

जाते म्हणतेस...................

जाते म्हणतेस हरकत नाही
ढाळतो मी अश्रू एकदा तरी पाहून जा

नाते तोडतेस हरकत नाही
मनी आज फक्त एकदा तरी राहून जा

भातुकली मोडतेस हरकत नाही
पुन्हा आज फक्त एकदा डाव मांडून जा

हसते आहेस हरकत नाही
माझी बुडती नाव पाहून जा

जाळत आहेस हरकत नाही
जळणारे माझे गाव पाहून जा

छळत आहेस हरकत नाही
माझे छीन-विच्छिन शरीर पाहून जा ................

मंगेश पावसकर

mgccmangeshpaw@gmail.com

करुणप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Feb 2010 - 10:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान कविता आहे, अजून येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

भारद्वाज's picture

28 Feb 2010 - 12:47 pm | भारद्वाज

छान आहे कविता. पण मूळ कवी कोण आहे कळेल काय ?

मंगेशपावसकर's picture

28 Feb 2010 - 7:51 pm | मंगेशपावसकर

सदर कवितेच्या खाली मूळ कवीचे नाव लिहिले आहे अथवा. कृपया मला दूरध्वनी करावा नाव वाचून दिले जाईल.

मंगेशपावसकर's picture

28 Feb 2010 - 7:51 pm | मंगेशपावसकर

सदर कवितेच्या खाली मूळ कवीचे नाव लिहिले आहे. कृपया मला दूरध्वनी करावा नाव वाचून दिले जाईल.

मंगेशपावसकर's picture

11 Mar 2010 - 10:45 am | मंगेशपावसकर

अजून येऊ द्या

Nile's picture

11 Mar 2010 - 11:16 am | Nile

अजुन काय येउ द्या? प्रतिसाद? =)) =))

उत्तर ऑर्कुटावर दिले तरी चालेल.

शानबा५१२'s picture

11 Mar 2010 - 11:36 am | शानबा५१२

सदर कवितेच्या खाली मूळ कवीचे नाव लिहिले आहे अथवा. कृपया मला दूरध्वनी करावा नाव वाचून दिले जाईल-------मंगेशपावसकर
अजून येऊ द्या---मंगेशपावसकर

मी बोलतो चालु द्या..

जाते म्हणतेस?..........चल निघ ईथुन काय झक मारायला आलेलीस थोड्यावेळेसाठी!!!!..तुझ्या.........

कमीत कमी ८-१० लेख लिह मंगेश रोज......ते फुसके लेख वाचायचा वैताग आलाय..........प्रतिक्रीया पण भारी आहेत......चालू द्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Mar 2010 - 12:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरेच्चा, गूगलने पहा काय दिले ... अगदीच तसंच्यातसं नाही तरी विचार जुळतात हो!

असो. आता अगदी, अगदी रहावलं नाही हां!

ढापतो म्हणतोस हरकत नाही
लिंका डकवते, प्रेरणा तरी देऊन जा

प्रतिसाद मागतोस हरकत नाही
क्वालिटी खरी एकदा तरी लिहून जा

धागा टाकतोस हरकत नाही
विडंबनास्तव कच्चा माल लिहून जा

स्तुती करतोस हरकत नाही
लगोलग 'रिकामा'ही म्हणून जा

आगी लावतोस हरकत नाही
करमणूक आमची करून जा

छळत आहेस हरकत नाही
एक दिवस जोडे घालून निघून जा

अदिती
फळकुट@मारा.कॉम

सविता's picture

11 Mar 2010 - 5:11 pm | सविता

मी तुमची फ्याण च झाले हो आता!!!! =)) =)) =)) =)) =))

jaypal's picture

11 Mar 2010 - 1:10 pm | jaypal

विडंबन काव्य आवडल अदिती. एकदम फट्याक. कशी ही उचला उचली. गुगल पण कस अणि कुणाला उघडं पाडेल काही नेम नाही हो.

होतकरु कविंचा हिरमोड करणा-या गुगल वर बंदी आणावी असा मी प्रस्ताव मांडतो ;-)
उचलेश ***कर
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

नाना बेरके's picture

11 Mar 2010 - 1:12 pm | नाना बेरके

विडंबन लई भारी

चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके

भारद्वाज's picture

11 Mar 2010 - 2:54 pm | भारद्वाज

=)) :loll: :rollinglaugh:

फोनचे पैसे वाचले...

मदनबाण's picture

11 Mar 2010 - 5:16 pm | मदनबाण

अदिती विडंबन लयं भारी. :)

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com

परिकथेतील राजकुमार's picture

11 Mar 2010 - 5:23 pm | परिकथेतील राजकुमार

अप्रिय अदिती,
छान आहे विडंबन. पण मूळ विडंबक कोण आहे कळेल काय ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

आशिष सुर्वे's picture

11 Mar 2010 - 5:35 pm | आशिष सुर्वे

३_१४ विक्षिप्त अदिती.. धन्यवाद!

आता मला खरेच उत्सुकता लागून राहिली आहे की..
मयुरेश पोटफोडे ही असामी कोण आहे??

आद्याक्षरं तर्र जुळतायत..

======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

परिकथेतील राजकुमार's picture

11 Mar 2010 - 6:06 pm | परिकथेतील राजकुमार

आद्याक्षरं तर्र जुळतायत..

हॅ हॅ हॅ फारच 'तर्र' प्रतिक्रीया !
बाजी मपो हि अद्याक्षरे 'महाराष्ट्र पोलिस' साठी पण जुळतात आणी 'मला पोसा' शी पण.

©º°¨¨°º© परा होम्स ©º°¨¨°º©
आमचे राज्य

वा सुटली बिचारी तुमच्या तावडीतुन. तिच्या भाग्याचा हेवा वाटतो.

वेताळ

टारझन's picture

11 Mar 2010 - 7:49 pm | टारझन

छाण ! वगळीच कविता !

सुंदर

टार्‍या.