Skip to main content

जाते म्हणतेस...................

लेखक मंगेशपावसकर यांनी शनिवार, 27/02/2010 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
जाते म्हणतेस................... जाते म्हणतेस हरकत नाही ढाळतो मी अश्रू एकदा तरी पाहून जा नाते तोडतेस हरकत नाही मनी आज फक्त एकदा तरी राहून जा भातुकली मोडतेस हरकत नाही पुन्हा आज फक्त एकदा डाव मांडून जा हसते आहेस हरकत नाही माझी बुडती नाव पाहून जा जाळत आहेस हरकत नाही जळणारे माझे गाव पाहून जा छळत आहेस हरकत नाही माझे छीन-विच्छिन शरीर पाहून जा ................ मंगेश पावसकर mgccmangeshpaw@gmail.com
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3207
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

छान कविता आहे, अजून येऊ द्या. -दिलीप बिरुटे

छान आहे कविता. पण मूळ कवी कोण आहे कळेल काय ?

In reply to by भारद्वाज

सदर कवितेच्या खाली मूळ कवीचे नाव लिहिले आहे अथवा. कृपया मला दूरध्वनी करावा नाव वाचून दिले जाईल.

सदर कवितेच्या खाली मूळ कवीचे नाव लिहिले आहे. कृपया मला दूरध्वनी करावा नाव वाचून दिले जाईल.

In reply to by मंगेशपावसकर

अजुन काय येउ द्या? प्रतिसाद? =)) =)) उत्तर ऑर्कुटावर दिले तरी चालेल.

सदर कवितेच्या खाली मूळ कवीचे नाव लिहिले आहे अथवा. कृपया मला दूरध्वनी करावा नाव वाचून दिले जाईल-------मंगेशपावसकर अजून येऊ द्या---मंगेशपावसकर मी बोलतो चालु द्या.. जाते म्हणतेस?..........चल निघ ईथुन काय झक मारायला आलेलीस थोड्यावेळेसाठी!!!!..तुझ्या......... कमीत कमी ८-१० लेख लिह मंगेश रोज......ते फुसके लेख वाचायचा वैताग आलाय..........प्रतिक्रीया पण भारी आहेत......चालू द्या.

अरेच्चा, गूगलने पहा काय दिले ... अगदीच तसंच्यातसं नाही तरी विचार जुळतात हो! असो. आता अगदी, अगदी रहावलं नाही हां! ढापतो म्हणतोस हरकत नाही लिंका डकवते, प्रेरणा तरी देऊन जा प्रतिसाद मागतोस हरकत नाही क्वालिटी खरी एकदा तरी लिहून जा धागा टाकतोस हरकत नाही विडंबनास्तव कच्चा माल लिहून जा स्तुती करतोस हरकत नाही लगोलग 'रिकामा'ही म्हणून जा आगी लावतोस हरकत नाही करमणूक आमची करून जा छळत आहेस हरकत नाही एक दिवस जोडे घालून निघून जा अदिती फळकुट@मारा.कॉम

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी तुमची फ्याण च झाले हो आता!!!! =)) =)) =)) =)) =))

विडंबन काव्य आवडल अदिती. एकदम फट्याक. कशी ही उचला उचली. गुगल पण कस अणि कुणाला उघडं पाडेल काही नेम नाही हो. होतकरु कविंचा हिरमोड करणा-या गुगल वर बंदी आणावी असा मी प्रस्ताव मांडतो ;-) उचलेश ***कर *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

विडंबन लई भारी चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील. नाना बेरके

अदिती विडंबन लयं भारी. :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com

अप्रिय अदिती, छान आहे विडंबन. पण मूळ विडंबक कोण आहे कळेल काय ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

३_१४ विक्षिप्त अदिती.. धन्यवाद! आता मला खरेच उत्सुकता लागून राहिली आहे की.. मयुरेश पोटफोडे ही असामी कोण आहे?? आद्याक्षरं तर्र जुळतायत.. ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

In reply to by आशिष सुर्वे

आद्याक्षरं तर्र जुळतायत..
हॅ हॅ हॅ फारच 'तर्र' प्रतिक्रीया ! बाजी मपो हि अद्याक्षरे 'महाराष्ट्र पोलिस' साठी पण जुळतात आणी 'मला पोसा' शी पण. ©º°¨¨°º© परा होम्स ©º°¨¨°º© आमचे राज्य

छाण ! वगळीच कविता ! सुंदर टार्‍या.