मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विनोद

आई शप्पथ सांगतो...

यसवायजी ·
प्रेमात धड-पडायचंय म्हणता म्हणता पडलो एकदाचा.. नव्हे, चांगला आपटलोच. हाडं खिळखिळी झाली.. पार चेंदा-मेंदा झाला.. बरं झालं म्हणा.. यातुनच शिकायला मिळतं.. पण अशी का वागली ती??? A ---------------------------------------------- तीचं लग्न होऊन, आता २ महिने उलटून गेले.. रडून-रडून अश्रू संपले.. आता डोळे सुद्धा सुकून गेले.. :( तीनं अस का केलं ? उत्तर काही मिळणार नाही.. आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..

दाग अच्छे होते हैं

चिखल्या ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मला चिखल आवडतो. दाग अच्छे होते हैं जाहिरात पण आवडते. चिखलातले कमळ देवाला चालते पण चिखल चालत नाही. मला देव(आनंद), कमळ आणि भाजपा तिन्ही आवडत नाही. कुंभार चिखलापासून भांडे बनवतो. कुंभाराचे चाक आणि बैलगाडीचे चाक दोन्ही सारखेच वाटतात मला, भांडे फुटतात पण चिखल फुटत नाही. पण माठात पाणी साठवता येते, चिखलात पाणी साठवता येत नाही, डबक्यात पाणी आणि चिखल दोन्ही साठतो, पण लोक डबक्यातले पाणी पीत नाहीत . डबक्यातले पाणी प्राणी पितात असे आई म्हणते. बाबा मला डुक्कर म्हणतात. पण मी माठातले पाणी पितो. आई माठात वाळा टाकते. वाळा वाळलेला नसतो, ओलाच असतो. पण डबक्यात घाण असते आणि चिखलसुद्धा...

काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने -२

सस्नेह ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आणखी काही नामांकित रसायने ही आहेत. शेजारी. हे रसायन स्फोटक नसले तरी अत्यंत उपद्रवी व बरेचसे चिकट असते. याचा शब्द-नाद अत्यंत मधुर असतो. किल्ल्यांपासून कुत्र्याच्या पिल्ल्यांपर्यंत काहीही जबाबदारी यांच्याकडून आपल्याला चिकटवली जाऊ शकते. म्हणून हे रसायन हाताळताना त्याचे अति निकट सान्निध्य टाळण्याची खबरदारी बाळगावी अन्यथा चिकट अनुभव येतो. हे रसायन पाण्यापेक्षाही प्रवाही असल्याने फट दिसली की आत घुसलेच म्हणून समजावे. आपल्या घरी काही खमंग पदार्थ बनत असताना आपल्याआधी याला त्या पदार्थाचा वास पोचतो.

एक दक्खनी कविता - कुतुबमिनार

विसुनाना ·
काव्यरस
'परसूंकीच बात है' हा लेख लिहून बरेच दिवस झाले. त्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये दक्खनी भाषेबद्दलही काही विचारणा होत्या. मी काही दक्खनी भाषेचा जाणकार नाही. पण त्या भाषेची आणखी ओळख वाचकांना व्हावी म्हणून म्हणून इथे त्या भाषेतील एक कविता देत आहे. दक्खनी ही मराठीची खूपच जवळची बहिण आहे. (कदाचित 'सख्खी' असे म्हणता येईल.) दक्खनी भाषेचे एक अभिमानी, उर्दु-हिंदीचे हरहुन्नरी कवी आणि प्रथितयश चित्रकार श्री. नरेन्द्र राय श्रीवास्तव 'नरेन' यांची एक विनोदी दक्खनी कविता वाचनात आली.

सुन री पवन

तिमा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
http://www.youtube.com/watch?v=FSbTl3kEyMI 'सुन री पवन' या अनुराग चित्रपटातल्या अप्रतिम गाण्याचं हे रसग्रहण नव्हे, त्यातल्या व्हिडिओची ही रनिंग कॉमेंटरी. गाण्याची टिंगल करण्याचा हेतू नाही. केवळ मौजमजा. गाण्याची सुरवात होते तेंव्हा, प्रथम एक पामेरियन कुत्रे बीचवर धावताना दिसते. एक गुब्बु मुलगा बीचवर बॉल खेळताना दिसतो न दिसतो तोच, मौशुमी वाळूचे घर बांधताना दिसते. निळ्या साडीत गाताना ती आपले सुळे चमकवत असते. पाठीमागे आणखी बर्‍याच निळ्या साडीतल्या मुली दिसतात, फक्त त्यांच्या धुवट साड्या असतात आणि चेहेरे हे, 'आपण यांना का पाहिलत' या कार्यक्रमासारखे असतात. त्या सगळ्या अंध असाव्यात अशी शंका येते.

काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने

सस्नेह ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बालपणातली आठवण अशी की आजारी पडलो, की आई-वडील किंवा आजी-मावशी बरोबर (औषधाच्या) बाटल्या घेऊन दवाखान्यात जायचो. तिथं एक (च) डॉक्टर अन एक कंपाउंडर असायचा. डॉक्टरकाका तपासायचे अन एका कागदावर चार ‘अर्वाच्य’ (पक्षी-वाचता न येणारे ) शब्द खरडून द्यायचे. मग कंपाउंडरकाका मागच्या कपाटातून भरलेल्या असंख्य बाटल्यांपैकी काहींची बुचे फिरवून एका पत्र्याच्या पांढऱ्या मगात त्याचे ‘मिक्स्चर’ बनवीत अन आमच्या बाटल्यांमध्ये भरून देत. अन पुढे चार दिवस आम्ही ते मिक्स्चर अन वहीच्या कागदाने बांधलेल्या पुडीतल्या गोळ्या पोटात ढकलायचो.

जावई बसले अडून

अधिराज ·
लेखनप्रकार
आमच्या शेजारच्या पावटे काकूंना त्यांच्या पोरीच्या म्हंजे स्वर्णीच्या लग्नाबद्दलचा लेख मुकपीठ मध्ये छापून आणायचा होता. त्यांच्या मते हे लग्न आगळेवेगळे आणि अभिनव पद्धतीने झालेले होते.शेजारधर्म पाळण्यात कसूर नगं म्हणून त्यांच्याकडून तिच्या लग्नाची बैजवार माहिती घेऊन लेख लिहून काढला. म्हटलं छापायला देण्यापूर्वी एकदा सगळ्यांच्या डोळ्याखालून सरकवावा. आन् कोणी अजुन काही चांगलं शीर्षक सुचवतय का ते बघावं. कारण ह्या बाबत मिपाकरांनी खटासि खट यांना त्यांच्या मुतपीठाच्या लेखासाठी केलेल्या मदतीचा अनुभव जमेला व्हता. तेव्हा शांत चित्ताने आपण हा लेख वाचावा अशी नम्र इनंती करुन माझे भाषण संपिवतो.

देहाला चोळुन घेता

ज्ञानोबाचे पैजार ·
काव्यरस
देहाला चोळुन घेता राखेने उदी बनावे धुवून सारी पापे स्वर्गात स्थानही द्यावे घाबर्‍या कोडग्या मनाते दुजे न काही रुचते भस्माच्या पट्टी मागे ते तोंड लपवुनी बसते (कुण्या भाग्यवंताचा) हा तुटता लटका आधार आत्मरुप दिसे भेसुर गलीतगात्र मग होई नरपुंगव तो लाचार, मग तुटती तटतट पाश मनी पडतो स्वच्छ प्रकाश त्या अनंत धेय्या साठी सुरु अंतहीन प्रवास

माझ्या कुतुहलाची दीनगाथा!

आनन्दिता ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजतागायत मानवप्राणी जे काही साध्य करू शकलाय ते त्याच्या 'कुतुहल' या गुणामुळेच, असं अनेक विचारवंत म्हणतात. पण माझा मात्र यावर काडी इतकाही विश्वास नाही. खरंतर माझा 'विचारवंत' या जातीवरच विश्वास नाही. मुळात डोक्यावरचं जंगल अन दाढीचे खुंट अस्ताव्यस्त वाढवून लोकं विचारवंत होतातच कशाला?? हा प्रश्न मला नेहमी पडतो.हे असले अवतार करून लोकांची टरकवण्यापेक्षा स्वत:च्या डोक्याला अधून मधून 'कंगवा' दाखवून ते 'विंचारवंत' का होत नाहीत ? हे माझं आपलं एक कुतूहल आहे. असो...

भारत रत्न पूनम ताई पांडे आणि प्रतिक्रिया!

चिखल्या ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
(लेख इतरत्र पुर्व-प्रकाशित) या देशाला वस्त्रहरणाची प्राचीन परंपरा लाभली आहे. युद्धात विजय मिळाला कि एकतर स्वतःचे तरी कपडे काढायचे नाहीतर दुसर्याचे ओढायचे ही महान शिकवणूक इतिहासाने आपल्याला दिली आहे. महाभारतात विजयी उन्मादात द्रौपदीचे वस्त्रहरण योजिले होते, पण तो बेत फसला. असो, महाभारत आपला विषय नाही. आता काळ बदलला आणि पुनमताई पांडे यांनी वस्त्रहरण स्वतःच करायची संधी साधली. इथे द्रौपदीच तयारीतच बसलेली असल्यामुळे देवांना त्रास नाही झाला. नशीब त्यांचं. भारत विश्वचषक जिंकल्यानंतर काही विघ्नसंतोषी लोकांमुळे तो बेत एकदा फसला, पण ही बाई हार मानायला तयार नव्हती.