Skip to main content

विनोद

कॉफीचं कॅथार्सिस अर्थात चिडचिड-ए-सोमवार

लेखक आदूबाळ यांनी सोमवार, 20/01/2014 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
अरबट कॉफी चरबट कॉफी | कागदाच्या कपात करपट कॉफी || डोक्याची ग्रेव्ही, इनबॉक्सचं मटण | कॅफेनची किक, बुळबुळीत बटण | पहिला ढकलतोय, चारच बाकी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||१|| परीट घडी, टायचा बावटा | आकड्यांची उसळ, एक्सेल पावटा | बॉस निकम्मा, टीम पापी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||२|| पायांची घडी, मांडीवर पोट | अप्रेझल मीटिंग, बोका भोट | परफॉर्मन्स मदिरा, रेटिंग साकी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||३|| गारगिट्ट पोळ्या, बकाबकाबका | सिग्रेटचा धूर, फकाफकाफका | पगार, पीएफ, बोनस टॉफी | कागदाच्या कपात करपट कॉफी ||४||

क्ष-गफ ला पत्र

लेखक वडापाव यांनी रविवार, 19/01/2014 02:13 या दिवशी प्रकाशित केले.
विनाकारण छोट्याशा गैरसमजावरून मोठ्ठंसं भांडण झालं. नेहमीप्रमाणेच माझे जुने माफ केलेले (माफ करण्यापूर्वी घातलेल्या थैमानाचा आता, 'तरी मी शांतपणे सहन केलं होतं ते सगळं' असा न विसरता उल्लेख) अक्षम्य गुन्हे पुन्हा वर उपसण्यात आले!! मी सगळ्या शंकां-कुशंकांचं निरसन केलं, पण रूळावर पडलेल्या तीन मेजर धोंड्यांपायी गाडी जागची हलेना. नुसतीच भोंगा वाजवत बसली. वाजून वाजून शेवटी भोंगा थकला आणि गाडीने ट्रॅकच सोडून दिला.

लेखकु

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी बुधवार, 18/12/2013 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
कविता माझी वाच, कथा माझी वाच लेख नक्की वाच, लेखकु म्हणे आपुली जी रिक्षा, दुसर्‍याची ती भिक्षा जनतेस का शिक्षा, या संकेतस्थळी ध्यान असता सुंदर, लेखनास मान निरंतर टीका वाटे जंतरमंतर, लेखकासि आव पिडीताचा, सात्विक संतापाचा वळवी ओघ सहानुभूतीचा, लेखकु तो वाढुनी ठेवता ताट, स्तुती करतो भाट इतरांची लावू वाट, दिसता क्षणी ओलावले डोळे, भारावले मन शब्द की ग्लिसरीन, वाचकु म्हणे दर तेरावा प्रतिसाद, देई धन्यवाद वर आणण्याचा नाद, लेखनाला इकडेतिकडे देतो कान, पाहुनी इतरांचा सन्मान काढी फेसबुकी पान, स्वत:चे नित्य गुळ लावित, झाला अखेर प्रस्थापित सदैव तरी दिवाभीत, लेखकु हा || --------------------------

कविता : घरची मैफल !!

लेखक बाळअमोघ यांनी बुधवार, 11/12/2013 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
घरची मैफल !! मैफल झाली गंधर्वांची अहा काय ते गाणे झाले सूर अजूनही संगीताचे कानी माझ्या भरून राहीले रात्रीच्या त्या दुसऱ्या प्रहरी असा कसा मी असतो गाफील कसे पामरा ठाव असावे सुरू व्हायची घरची मैफल खिसा रिकामा, किल्ली विसरलो आठवतो कालचाच तंटा अन दारावरती वाजवतो मी मैफलीची ही तिसरी घंटा जरा कुठे मज झोप लागली वेंधळ्याची ही जात कशी दारामागून शिव्या देऊनी सुरवातीची नांदी अशी संताप राग हा तार सप्तकी ताल तिखट अतिद्रुत ती लय पाहुनिया आवेश हिचा मज वाटू लागे भलते भय संथ आलापी रुसव्याची ती नंतर ताना कडकड कडकड दमदाटीचे घेऊन तीय्ये बोलतानी तर अशक्य बडबड रौद्र भयाची
काव्यरस

मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी

लेखक सुज्ञ माणुस यांनी सोमवार, 02/12/2013 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी आजवर ट्रेकचे अर्धशतक झाले. कुठलाही विकांताला ट्रेकला चला असे कोणीही म्हटले की आम्ही एका पायावर तयार! कुठलेही ट्रेक चे ठिकाण असो, काय फरक पडतोय? काय फरक पडतोय ??? फरक तो पडता है भाई, ट्रेकिंग लोकेशन सिलेक्ट करनेमे हमेशा सावधांनी रखो. ! नाहीतर "तू प्लान कर. मी येतो" असे म्हणून तुम्ही एका पायावर तयार व्हायचा ट्रेकला आणि समोरचा पठ्ठ्या तुम्हाला सिव्ह्गडावर न्यायचा. देव करो आणि असले वाईट प्रसंग न येवोत तुमच्यावर! सिव्हगड वा सिंहगड जायचे म्हणजे फुल टू डोके सरकते. आणि त्यात रविवारी जायचे म्हणजे आवराच ! असो, आपले काही वैर नाहीये सिव्ह्गडाशी वा तानाजीशी.

आमचे अग्निहोत्र !!!

लेखक विदेशी वचाळ यांनी शनिवार, 30/11/2013 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल गॅस लाच लाइटर असतो ते बरे आहे बुआ. काही दिवसांपूर्वी गॅस चा लाइटर सापडला नाही म्हणून शेजारणीने "सुमे जा ग जरा माझा लाइटर घेऊन ये पर्स मधून" असे फर्मावल्याचे आठवते. त्या पुर्वी, शेजारच्या, निर्मला ताई, त्या एकदा म्हणाल्या होत्या, अरे जरे जरा बाबांचा लाइटर घेऊन म्हणून. त्याचा आधीच्या सगूणा बाई "शिंदळीची काडेपेटी कुठे गेली काही कळत नाय!. ए पोर्‍या बापाची काडेपेटी आणा रे" असे म्हणाल्याचे ऐकिवात आहे. पण त्याचा पूर्वीच्या बायका आग कशी लावत असत बरे? म्हणजे स्वयंपाक करताना हो! (बाकी आग लावायाच्या पद्धती बदलल्या नसाव्यात असे वाटते.

सरकारमान्य महिष्यौच्चवंशरेतन केंद्राचे उद्घाटन

लेखक नगरीनिरंजन यांनी रविवार, 24/11/2013 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
मौजे चढेवाडी, जातिवंत प्रतिनिधीकडून: देशातल्या पहिल्या आणि एकमेव सरकारमान्य महिष्यौच्चवंशरेतन केंद्राचे काल मौजे चढेवाडी येथे भव्य उद्घाटन झाले. आपल्या म्हशींच्या पोटी जातिवंत अवलादी पैदा व्हाव्यात म्हणून व्याकुळ झालेल्या पंचक्रोशीतल्या शेतकर्‍यांना यामुळे फार मोठा आधार मिळाला आहे असे मानले जाते. हे केंद्र उभारले जाईल असे माननीय खासदार श्री. गोरक्षनाथ गोर्‍हे यांनी गेल्या निवडणुकीत दिलेले आश्वासन अशारितीने पूर्ण करून आपल्या समाजसेवेच्या व्रताचे उदाहरणच लोकांसमोर ठेवले आहे असे चढेवाडीचे सरपंच माननीय श्री. सखाराम दामोदर चढे यांनी आवर्जून सांगितले.

शिव्यांना शिव्या देऊ नये.

लेखक वडापाव यांनी शनिवार, 23/11/2013 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी खरं सांगतो, शक्यतो मी शिव्या देत नाही. पण तरी त्यांच्याबद्दल मनात एक आत्मीयता आहे. एक आपुलकीचा आणि कृतज्ञतेचा भाव आहे. विशेषतः मराठी शिव्यांबद्दल; नव्हे, फक्त मराठी शिव्यांबद्दलच. बाकी भाषांमधल्या शिव्या अतिशय नेभळट वाटतात... तर हा एक शिव्यांबद्दलचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न. [ज्या शिव्या लेखात दिसतील त्या मी स्वतः कोणाला देत नाहीये, त्यामुळे त्यांच्याकडे केवळ एक (प्रभावी आणि परिणामकारक) शब्द म्हणून पाहिलं जावं ही विनंती. रसभंग होईल या भितीने शक्य तिथे शि* असं न लिहीता शिवी असं पूर्ण लिहीलं आहे, तेव्हा थोर मनानं सांभाळून घ्या.] सुरुवात झाली 'अईला!!' पासून.

चार विनोद

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 17/11/2013 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
विनोद: लेखक- निमिष सोनार 1) एक सरदार कामासाठी बँकेत जातो. काम झाल्यावर तो एक सूचना वाचतो, "आपल्याला बँकेबद्दल तक्रार असल्यास या पेटीत टाका " तो हे वाचून एक नवी वही विकत आणतो, एक पान फाडतो त्यावर लिहीतो, "मला या बँकेबद्दल काही तक्रार नाही " पेटीत टाकतो आणि निघून जातो. 2) बागेत बाकड्या जवळ एक सूचना लावली होती, "रंग ओला आहे. हात लावू नका. बसू नका. खात्री नसली तर हात लावाच. रंग निघाल्यास बाकड्याखाली ब्रश आणि रंग ठेवले आहे. रंग द्या आणि जा. " 3) एका रेडीओ वर एकदा घोषणा करतात, "आपण पहात आहात आकाशवाणी " 4) विज महामंडळ प्रायोजीत मालीका, "कटौती बीजली की " प्रसारण समय— लोड शेडींग सुरू झाल्यावर

वैकुंठ-सहगमन!!

लेखक वडापाव यांनी शनिवार, 16/11/2013 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर सुरु: (शीर्षकाबद्दल कोणाला काही आक्षेप असलाच तर अ‍ॅडव्हान्समध्ये माफी मागतो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही) (चू भू द्या घ्या. ह घ्या.) डिस्क्लेमर समाप्त प्रवेश 1 ला (स्टेजवर एक माणूस एका प्लॅस्टिकच्या खुर्चीत बसला आहे. मध्येच तो खिशातून एक मोबाईल काढून त्यात बघतो, त्याच्यावर स्वत:ची बोटं आदळतो, मग वरती धरतो, खाली धरतो. पण एवढं करून त्याचं समाधान झालेलं दिसत नाही. मग तो मोबाईल गदागदा हलवून बघतो. त्या यंत्राकडून त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होते. तेवढ्यात एक मोलकरीण स्टेजवर येते, आणि झाडू मारायला सुरुवात करते.