गंप्या कोठेही जातो तेथे रस्त्याने जाताना त्याला दुकानांचे फलक,घराबाहेर च्या पाट्या,जाहिरातींचे फलक वाचण्याचे वेड आहे,त्यातून तो काही विनोद शोधण्याचा प्रयत्न करत असतो,टकले हेअर कटिंग सलून,अंधळे ओप्टीशियंस ,पुस्तके रद्दी डेपो अशा मजेदार पाट्या होत्या नागडे वस्त्र भंडार वाचून त्याला वाटले अंगावरचे सर्व कपडे काढून दुकानात विकण्यास ठेवले कि काय?
अंधारे विद्युत सेवा केंद्र ,तपस्वी शृंगार सदन,लोखंडे ज्वेलर्स,दाउद खादी भंडार अश्या पाट्या पाहून त्याला विनोद सुचत,डॉ काळे यांचे गोरे पणाचे क्रीम कसे काम करत असेल असे त्याला वाटले,मुळे टिफिन सेंटर च्या डब्यात बहुदा रोज मुळ्याची भाजी असावी असा कयास त्याने क