एक दक्खनी कविता - कुतुबमिनार
काव्यरस
'परसूंकीच बात है' हा लेख लिहून बरेच दिवस झाले. त्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये दक्खनी भाषेबद्दलही काही विचारणा होत्या. मी काही दक्खनी भाषेचा जाणकार नाही. पण त्या भाषेची आणखी ओळख वाचकांना व्हावी म्हणून
म्हणून इथे त्या भाषेतील एक कविता देत आहे. दक्खनी ही मराठीची खूपच जवळची बहिण आहे. (कदाचित 'सख्खी' असे म्हणता येईल.)
दक्खनी भाषेचे एक अभिमानी, उर्दु-हिंदीचे हरहुन्नरी कवी आणि प्रथितयश चित्रकार श्री. नरेन्द्र राय श्रीवास्तव 'नरेन' यांची एक विनोदी दक्खनी कविता वाचनात आली.
या कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे ती केवळ दक्खनी भाषेचा लेहजा अचूक पकडते इतकेच नसून ती दक्खनी (विशेषतः हैदराबादी) मानसिकतेचेही अचूक चित्रण करते.
थोड्या खेदाची गोष्ट अशी की ही कविता ज्यांना या भाषेचे उच्चारण ऐकून माहित नाही त्यांना तिचा पूर्ण आस्वाद घेता येणार नाही.
तर पेश है-
कुतुबमिनार
टीचर हूं मैं एक इस्कुल का, एक सवाल बच्चे से पुछा,
कुतुबमिनार कू कोन बनाया, सोच समज को बोलो बेटा |
बच्चा बोला, ये क्या पूछरैं, ये सवाल है भौतिच आसाँ,
कुतुबमिनार बनाए, अपन के,हैदराबाद के कुली कुतुबशा|
मैं बोला,ये जवाब ग़लत है,पोट्ट बोला, आप ग़लत हैं|
मैं चकराको फिर फिर पूछ्या, बावा तुम ये काँ पडको आँइ,
उन बोला पड़ने का क्या है, कुतुबमिनार है, कुतुबशा बनवाँइ|
सिर पीट लेको फिर मैं पूछ्या, चान्मिनार कू कोन बनाया,
शान से उटको ज़रा अकड़ को पोट्टा मेरे कू समजाया|
मौक़ा नँई देना चाहते थे, गिरी पड़ी तो पचताने कू,
एक मिनार दिल्ली में बनवाए, कुली कुतुबशा अज़माने कू|
सीदी सच्ची अच्छी बन गई, ख़ुश हो को फिर हैदराबाद आए,
पिलान१विलान के सात उनो फिर, दक्कन मे चान्मिनार बनवाए|
-श्री. नरेन्द्र राय श्रीवास्तव 'नरेन'
१. पिलान-विलान : इंग्रजी प्लान - मराठी 'प्लॅन-बीन' - आराखडा
वाचने
3726
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
क्या नाना. क्या लिखते तुम?
खडे ख्डे गिरनेकी नौबता आयी.
.
(लट्टावाली जैबुन चा चाहता)
;)
In reply to आला है by अभ्या..
लट्टो ,घाबरा-जन्नत या गप गे भाणा...
एक नंबर!
'भव्य हिमालय तुमचा, अमुचा केवळ माझा सह्यकडा' ह्या ओळी (मूळ कवितेचा संदर्भ सोडून) आठवल्या.
पोराने 'तर्कटपणा" या गुणाला वेगळ्याच उंचीवर नेऊन बसविले :)
मस्त लिहिलयं नाना तुम्ही. वाचताना मजा आली.
ही हैदराबादी लै भारी आहे! आणि कवितेतलं तर्कशास्त्र तर अगागागा!
=))
क्या शायरी लिखते लोगां, दिल होगया भौतिच खुश
हौ नक्को करको करको लिखरा प्रतिसाद फुसफुस
ये देखके याद आयी मुल्ला नुसरती की बातां,
बिज्यापुर मे था पर लिख्ख्या शिवाजी की करामातां!!
मै सोच्या के कुतूबमिनार के मॉडेलाको काटके ट्रकामें डालके हैद्राबादा लाया. रास्तेमें टुटफुट हुयी और उसे चार मिनारामें खडा किया.
वैसे वो पोट्टे का मिसलपावपे आयडी लगता है| यहींचसे सिखके गया ऐसा मालूम होता है|
:) विसुनाना कविता मस्तच है. भाषेचा लहजा तर खासच. पूछ्ररै, भौतिच, ऑसा, बनवाई, खासच.
>>> दक्खनी ही मराठीची खूपच जवळची बहिण आहे.
मराठी आपली खूप जूनी. आता दोन हजारवर्षापूर्वीची म्हणू. मराठी, तामिळी आणि अजून काही भाषेत अरबी शब्द घुसळून तयार झाली ती दक्खनी. मला यावर अधिक वाचलं पाहिजे. :)
-दिलीप बिरुटे
In reply to कविता मस्तच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>मला यावर अधिक वाचलं पाहिजे. >>> विकीवर का? :D
In reply to >>मला यावर अधिक वाचलं पाहिजे. by यशोधरा
अगागागा
In reply to >>मला यावर अधिक वाचलं पाहिजे. by यशोधरा
विकीवर मिळालं असतं तर वाचलं असतं. ज्ञानाचं काय ज्ञान कुठूनही मिळवलं पाहिजे.
बाकी, जरा सवड काढून काही दक्खनी वर मिळालं तर विकिवर नक्कीच डकवा.
दक्खनीवर अजून कोणी लिहिलेलं नाही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
[मराठी विकिपीडिया सदस्य, खाते क्र.११६५]
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझा प्रांत असता तर जरुर लिहिले असते. :)
तुम्ही तिथे अपडेट केलेत की जरुर सांगा, नक्की वाचणार.
विसुनाना,
कविता आणि लेख दोन्ही अतिशय आवडले.
कविता आणि लेख एकदम भारी.
कविता मुळात 'नरेन' यांची आहे.त्यामुळे वाचकांना जे आवडले त्याचे श्रेय त्यांचे आहे.
फोडिले भांडार धन्याचा माल । मी तो हमाल भार वाही ॥
In reply to मी तो भारवाही by विसुनाना
फोडिले भांडार धन्याचा माल । मी तो हमाल भार वाही ॥
हे भारी आहे! अगदी निवडक माल उचलणारा कसबी हमाल दिसतो.
कविता भारीच. तुम्हाला आवडणार्या आणखी काही या लहेजाच्या कविता वा लिखाण देता आल तर फार उपकार होतील.
आला है